सर एक श्रावणाची बरसून काय गेली!
सर एक श्रावणाची बरसून काय गेली
गळत्या घरी गरीबी पसरुन पाय गेली!
आता कळून चुकले,पाण्यात पीठ होते
आई मला म्हणाली,करपून साय गेली!
पिल्लू कुणी जगावे,इतकीच आस होती
जमले स्तनांत तितके,पाजून गाय..गेली!
वाचायचीच आहे,वाचू उद्या सकाळी...
चिठ्ठी कशी उश्याला,विसरुन माय गेली!
पेरुन जे उगवले वाहून जात होते...
जाईल बाप..आई,लागून हाय,गेली!
तो बापही जगाचा,निश्चल उभाच आहे
भक्ती भुकेजलेली अन् ठाय-ठाय गेली!
—सत्यजित
जुल्काफिया गझल!
दुसरा शेर फारच विदग्ध करून
दुसरा आणि चौथा शेर सुरेख जमले
वा!
मी सहसा काव्य हा प्रकार
सुरेख गझल!
खरोखर सुन्दर.
जबरदस्त
सुरेख गझल
गझलधारा
धन्यवाद!
चटका लावणारी गझल.
सुरेख गझल ...
धन्यवाद!
अत्यंत ताकदीची गझल... एक एक
खिन्न ! चटका लावणारी गझल !
अत्यंत सुरेख गझल. जवळ जवळ
धन्यवाद!