जा॑भळ्या टेकडी तळिचे
ते तळे खुणावुन हसले
अन पहाटफुटणी मधल्या
केशरात अलगद लपले
थरथरली तीरावरची
गवताची पाती ओली
वाऱ्याची फु॑कर येता
पाण्यावर झु॑बर फुटले
घनदाट शा॑तता तिथली
तोलून थिरकत्या प॑खी
पाखरू एक इवलेसे
क्षण एक लकेरुन गेले
नि:शब्द, तरल जे सारे
ते इथेच जन्मा आले
कोवळे ऊन टिपताना
झिरझिरित धुके शिरशिरले
चल पुन्हा तळ्याच्या काठी
चल पुन्हा, पुन्हा चल जाऊ
अस्वस्थ जगाचे मागे
कोलाहल सोडुनी सगळे.
- उदय
अत्यंत सुरेख कविता.
नाव वाचूनच लेख उघडावा अशा मिपाकरांपैकी तुम्ही एक आहात.
अन पहाटफुटणी मधल्या केशरात अलगद लपलेआहाहा...
वाऱ्याची फु॑कर येता पाण्यावर झु॑बर फुटले....प्रचंड आवडले आहे.
सुंदर!
अप्रतिम सुंदर रचना.
>>>घनदाट शा॑तता तिथली
तोलून थिरकत्या प॑खी
पाखरू एक इवलेसे
क्षण एक लकेरुन गेले>>>क्या बात है! क्या बात है!
खूप आवडली कविता! दोन वेळा वाचली...नि मग पुन्हा पुन्हा स्मरत राहिली! धन्यवाद!
वा! कविता आवडली.
अहाहा... काय सुंदर!
"पाण्यावर झु॑बर फुटले" फारच आवडले.
मिपावर सध्या एक से एक कविता येत आहेत.
फारच सुंदर
सर्व प्रतिसादका॑ना मनःपूर्वक धन्यवाद!
वा! सुरेख!
अप्रतिम रचना. आवडली.
++,
सुंदर कविता. आवडली.
धन्यवाद!
धन्यवाद!
चित्रदर्शी कविता ! सुरेख !!!