पेटुनी आरक्त संध्या...
काव्यरस
पेटुनी आरक्त संध्या,मातला अंगार आहे...
केवडा वा रातराणी..मोगराही फार आहे!
मोकळे बाजार-रस्ते,शांत आहे शहर सारे...
वाटते आहे उद्याचा,वादळाचा वार आहे!
काजव्यांच्या चार ओळी,सारख्या फिरतात येथे...
सांग त्यांना..पेटलो तर,सूर्य माझे सार आहे!
एक तुकडा चांदण्याचा,बांधला होता उराशी...
त्याच तुकड्याने नभीचा,चंद्र मी टिपणार आहे!
मी कधी कुठल्या ऋतूची,काळजी केलीच नाही...
आजही या काळजाचा रंग हिरवागार आहे!
सोबती कोणी न माझा,ना कुणाचा सोबती मी...
मी निघालो त्या क्षणाला,काफिला निघणार आहे!
—सत्यजित
वाचने
6627
वाचनखूण
प्रतिक्रिया
28
छान
धन्यवाद!
वा वा सुरेख गजल!
तुमचे शेर सुरेखच असतात.
सुंदर !!!!
अ फ ला तू न ! ! !
धन्यवाद!
सु रे ख !
लिहित रहा ...
In reply to लिहित रहा ... by चौकटराजा
अरेच्चा....
In reply to अरेच्चा.... by चौकटराजा
धन्यवाद!
सावध, ऐक पुढल्या हाका...
In reply to सावध, ऐक पुढल्या हाका... by अनन्त्_यात्री
धन्यवाद!
मी कधी कुठल्या ऋतूची,काळजी
In reply to मी कधी कुठल्या ऋतूची,काळजी by अत्रुप्त आत्मा
धन्यवाद!
छान !
सोबती कोणी न माझा,ना कुणाचा
सुरेख!!
सुंदर!!
वाहवा!
धन्यवाद!
छान कविता.
धन्यवाद!
In reply to धन्यवाद! by सत्यजित...
मनाप्रमाणे उतरली नाही, तरी
सुंदर !
मी कधी कुठल्या ऋतूची,काळजी केलीच नाही... आजही या काळजाचा रंग हिरवागार आहे!आणिसोबती कोणी न माझा,ना कुणाचा सोबती मी... मी निघालो त्या क्षणाला,काफिला निघणार आहे!या ओळी विशेष आवडल्या.सुंदर
क्लास
धन्यवाद!