थोडं जपून बोला.
काय आहे माहिती आहे का,
अरे सगळी हुशार मुलं 'इथे काय ठेवलंय?' म्हणून भारताल शिव्या घालून निघून गेली तर देशाने कुणाकडे पहायचं. ही हुशार, कर्तबगार तरूण हीच तर देशाची संपत्ती आहे. १ कोटी उच्चशिक्षीत भारतीय लोकं भारता बाहेर आहेत ही काय गम्मत आहे का? कशी होणार आपल्या देशाची प्रगती?
भारतात राहणारे तरी देशाच्या प्रगतीसाठी किती धडपडतात? आणि आम्ही भारतात रहात नाही म्हणून हा द्वेष की, काही वैयक्तिक आकस??
स्वातंत्र्यसैनीक वरून पहात असतील तर त्यांना लाज वाटेल. ह्याचसाठी का आम्ही आयुष्य ओवाळून टाकलं देशावर की आमच्या मुलांनी देश वार्यावर सोडून दुसर्या देशाची प्रगती करून द्यावी. ह्या अशा कॄतघ्न लोकांसाठी आम्ही जिवाची होळी केली? अरेरे, आम्हीच मुर्ख. गांधी, सावरकर, चाफेकर बंधू हे पण ह्या अ भारतीय भारतीयांसारखे वागले असते तर?
किती दिवस आणखी आपण आपल्या स्वातंत्र्यवीरांच्या आहुतीचं भांडवल करणार?? आणि आता भांडवल करून, देशाची किती प्रगती साध्य होणार??
प्रगती प्रगती म्हणतात ती इतिहास उगळून होत नाही हे कटू असलं तरी सत्य आहे. आता भारतात जे चालू आहे, जी काहि लोकशाही ची वीटंबना चालू आहे ती बघून सावरकर, चाफेकर बंधू यांच्यापैकी कोणीही शाबासकी देणार नाही हे निश्चित.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
भारतात राहणारे तरी देशाच्या प्रगतीसाठी किती धडपडतात?
ह्यावर वैयक्तीक स्वार्थासाठी देशाला वार्यावर सोडून गेलेल्या लोकांनी प्रतिक्रीया न देणे उत्तम. ज्या गावाला जायचेच नाही त्याच्या चौकशा कशाला?
आणि आम्ही भारतात रहात नाही म्हणून हा द्वेष की, काही वैयक्तिक आकस??
देश माझा आहे. त्यामुळे इथे शिकून वैयक्तीक स्वार्थासाठी दुसर्या देशाची तुंबडी भरण्यात धन्य मानणार्या सगळ्यांबद्दल वैयक्तीक आकस आहे.
किती दिवस आणखी आपण आपल्या स्वातंत्र्यवीरांच्या आहुतीचं भांडवल करणार??
भांडवल नाही जाणीव करून द्यायचा प्रयत्न आहे.
आता भारतात जे चालू आहे, जी काहि लोकशाही ची वीटंबना चालू आहे ती बघून सावरकर, चाफेकर बंधू यांच्यापैकी कोणीही शाबासकी देणार नाही हे निश्चित.
हे वाक्य तिथे राहून बोलण्याला काहीही अर्थ नाहिये. आम्ही स्वत:च्या इच्छेने इथे रहातो आणि देशाला आमच्या परीने योगदान देण्याचा प्रयत्नही करतो.
इथल्या राकजारण / संधी इत्यादींवर टिका करणारी लोकं तिथलं समाज जीवन, संस्कॄती ह्यांवर टिका करतात. भारताला आपले मानले नाहीतच, किमान जिथे जाता तिथे तरी एकनिष्ठ रहा ही विनंती.
हे वाक्य तिथे राहून बोलण्याला काहीही अर्थ नाहिये. आम्ही स्वत:च्या इच्छेने इथे रहातो आणि देशाला आमच्या परीने योगदान देण्याचा प्रयत्नही करतो.
हे वाक्य अमेरिकाच आणि पुणंच काय पण बंगळुरू आणि आय.एस.एस. (इंटरनॅशनल स्पेस स्टेशन)वरूनही बोललं तरी अयोग्य ठरणार नाही.
अदिती
प्रत्येकाच्या बाबतीत प्रकार निराळा असतो. आपण म्हणता तसे अमेरिकेत जायची क्रेझ असलेले लोक असतातच. पण...
अरे सगळी हुशार मुलं 'इथे काय ठेवलंय?' म्हणून भारताल शिव्या घालून निघून गेली तर देशाने कुणाकडे पहायचं. ही हुशार, कर्तबगार तरूण हीच तर देशाची संपत्ती आहे. १ कोटी उच्चशिक्षीत भारतीय लोकं भारता बाहेर आहेत ही काय गम्मत आहे का? कशी होणार आपल्या देशाची प्रगती?
मी भारतात असताना माझ्या उच्च शिक्षणाच्या संधी आटल्या होत्या आणि अदिती म्हणाली तसे शेंगदाणे हातावर मिळत होते. बाहेर आल्यावर उच्चशिक्षण घेणे शक्य झाले आणि त्यामुळे एकदम ब्रेन ड्रेन झाले ! :) (माझी स्थिती प्रातिनिधिक असू शकते म्हणून लिहिले.)
बाकी 'बाहेर' जाऊन जीवन सार्थकी लागल्याचा आनंद होणारे अनेक पाहिले आहेत.. त्यामुळे वरील पैकी अनेक मुद्द्यांशी सहमतच आहे.
-- लिखाळ.
काढून टाकलं! लईच पर्सनल झालं होतं!!
पण तुला माझ्या मनातला उद्वेग समजला असेल अशी आशा आहे ऍडी!!
कुठल्याही प्रश्नाचं असं जनरलायजेशन फारच चुकीचं असतं.
चतुरंग
चला एक काथ्याकूटच टाकते, देशी बनावटीच्या ब्राण्डेड दारू, सिगारेट्स, बाईक्स कोणत्या ते! पुढच्या वेळी सगळ्यांना संदर्भ म्हणून उपयोगी पडेल!
मला काही वेळ नव्हता, पाच-सहा वर्ष पीएच.डी. करायला, महिन्याला ८ हजार मिळवत, मग गेले सरळ परदेशात, तीन वर्षात मिळवली पदवी, सहा महिने बसून खाता येईल एवढं जमवलं आणि मग नोकरी मिळाल्याचं समजलं. खूप आनंद झाला. मग तीन महिने वाट पाहिली कधी हातात 'पत्र' येईल. नाहीच आलं, मग जाऊन ठिय्या दिला आणि तिकडे आठ दिवस बिनपगारी काम केलं, तेव्हा कुठे पत्र मिळालं.
महिन्याला आठ हजार (आता बारा हजार जास्तीत जास्त) कमावून हे किती लोकांना शक्य झालं असतं हो ऍडीभौ?
अदिती
पुन्हा आधीचंच वाक्य - परदेशी स्थायीक झालेल्या भारतीय लोकांबद्दल माझ्या मनात तीळमात्रही आपलेपणा / आदर नाही.
सख्ख्या आईला सोडुन सावत्र आईचे गुणगान गाणार्या बद्दल आपलेपणा / आदर असण्याचे काहीच कारण नाही.
आदी,
एकांगी बोलतोयस. एकच बाजू.
परदेशात सेटल होण्याचे समर्थन मी करत नाही. करणारही नाही. असा निर्णय मी कधी घेणार नाही पण तिथे राहण्यातले 'पर्क्स' मला माहीती आहेत आणि त्यासाठी कोणी निर्णय घेतला तसा तर त्याला दूषणं देण्यात अर्थ नाही. माणूस आहे आणि त्याला आपल्या आयुष्याचे निर्णय घेण्याचा अधिकार आहे आणि त्यावर भाष्य करायचा आपला अधिकार नाही.
पण बाहेर स्थायिक झालेला माणूस देशद्रोही आणि अजून काय काय असतो इतक्या उथळपणे हे पाह्यलं जाउ नये.
पण एक आहे की ३५ एक वर्षांपूर्वी जे तिथे स्थायिक झाले त्यांच्या डोक्यात एक गिल्ट निश्चितच आहे. पैसा, समृद्धी, लाइफस्टाइल यासाठी आम्ही हे आयुष्य पत्करले इतकं सरळपणे ते सांगू शकत नाहीत. त्यासाठी मग ते भारताची सिस्टीम इत्यादी कारणे देतात. गिल्ट लपवायला भारताला नावे ठेवू लागतात. त्यांची मुले त्यावरच वाढतात आणि संधी मिळाली की भारतावर टिका सुरू करतात. अशी उदाहरणं खूप पाह्यली मी. अर्थात अपवाद होतेच.
पण त्यामानाने गेल्या १०-१५ वर्षात तिथे गेलेले लोक प्रामाणिक म्हणायला हवेत. ते सरळ सरळ मान्य करतात की याच कष्टात भारतात जे मिळालं असतं त्याच्या कैकपटीने इथे मिळतंय. म्हणून आम्ही इथे रहातो.
असो...
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
माणूस आहे आणि त्याला आपल्या आयुष्याचे निर्णय घेण्याचा अधिकार आहे आणि त्यावर भाष्य करायचा आपला अधिकार नाही.
पण बाहेर स्थायिक झालेला माणूस देशद्रोही आणि अजून काय काय असतो इतक्या उथळपणे हे पाह्यलं जाउ नये.
इतक्या उथळपणे पहात नाहिये गं. मला राग अशांचा येतो की जे तिथे जाऊन भारताला शिव्या घालतात. तुम्ही देश वार्यावर सोडून संघर्ष न करता बुडाला पाय लाऊन पाळालात ना? मग तुम्हाला काय अधिकार इथे काय चाललंय त्यावर भाष्य करायचा. देश सुधरावा म्हणून तुम्ही काहीच प्रयत्न केले नाहीत मग आता आम्हाला अक्कल शिकवू नका की इथे काय ठेवलंय. म्हणून मी स्वातंत्र्यसैनीकांच उदाहरण दिलं. किती पिढ्यांनी त्याग केला आपल्या पुढच्या पिढीला स्वतंत्र देशात श्वास घ्यायला मिळावा म्हणून. त्याच्या ०.००००१% जरी आपण प्रत्येकाने करायचं ठरवलं तर देश सुधारणार नाही का? परिस्थीती इतकी वाईट झाली आपल्यामुळेच ना?
पण एक आहे की ३५ एक वर्षांपूर्वी जे तिथे स्थायिक झाले त्यांच्या डोक्यात एक गिल्ट निश्चितच आहे. पैसा, समृद्धी, लाइफस्टाइल यासाठी आम्ही हे आयुष्य पत्करले इतकं सरळपणे ते सांगू शकत नाहीत. त्यासाठी मग ते भारताची सिस्टीम इत्यादी कारणे देतात. गिल्ट लपवायला भारताला नावे ठेवू लागतात. त्यांची मुले त्यावरच वाढतात आणि संधी मिळाली की भारतावर टिका सुरू करतात. अशी उदाहरणं खूप पाह्यली मी. अर्थात अपवाद होतेच.
साफ चूक.
मी अमेरिकेत गेली १२ वर्षे रहातो आहे (१-२ वर्षे नाही). या १२ वर्षात मी असंख्य लोकांना भेटलो कि जे ईथे १९६०-७० च्या दशकात आले. ते लोक आनंदाने भारतात जातात. त्यांच्या पुण्या-मुंबई मधल्या घरात १-२ महिने रहातात. पुतण्या/भाचे यांच्या कार्यात आनंदाने भाग घेतात. पण मला कोणीही भारताबद्दल नाराजीचा सूर काढताना किंवा सिस्टीमला नावं ठेवताना दिसला नाही. अगदी त्यांची मुलं/मुली अगदी अमेरिकन जावई सुध्दा.
मा़झ्या ओळखीची एक व्यक्ती आहे. ते ईथे १९६३ साली आलेत. सध्या बे एरियातील एका मोठ्या कंपनी साठी काम करतात, पण त्यांनी मुद्दामून २ वर्षांसाठी बेंगलोरचे पोस्टींग मागून घेतले. मी विचारल्यावर म्हणाले "अरे मला ईतका अनूभव मिळाला आहे की आपल्या भारतातल्या लोकांना त्याचा उपयोग नको का व्हायला? प्रत्येक ईंजीनियर काही अमेरिकेत येणार नाही त्या पेक्षा मीच तिकडे जातो आणि त्यांना काही माझ्या ज्ञानाचा, अनूभवाचा फायदा होतो का ते बघतो". सांगा मला यात कुठला गिल्ट दिसतो आणि कुठे भारतावर टिका केलेली दिसते.
हे एकच नाही तर असे अनेक लोकांना मी खुप जवळुन ओळखतो. तेव्हा त्यांच्या डोक्यात एक गिल्ट निश्चितच आहे हे विधान जरा जपून करा.
वुडहाऊसला दुसर्या महायुध्दानंतर विचारले, "प्लम तुला जर्मनांचा तिटकारा नाही येतं?" त्यावर वुडहाऊस म्हणाला 'I don't hate in plural.".
- नाटक्या
>>मी अमेरिकेत गेली १२ वर्षे रहातो आहे (१-२ वर्षे नाही).<<
>>तेव्हा त्यांच्या डोक्यात एक गिल्ट निश्चितच आहे हे विधान जरा जपून करा.<<
मी पाहिलेल्या उदाहरणांवरून हे वाक्य मी बोलते आहे. माझ्या संपर्कातल्या अनेक व्यकींना सुद्धा हाच अनुभव आहे. आपण ह्या सगळ्यांचा अनुभव खोटा आहे असं म्हणताय का?
तुम्ही १२ वर्षे आहात हे सांगायची काहीच गरज आहे असं वाटत नाही. तुम्ही नक्की काय सांगू पाहताय या वाक्यातून?
'विधान जपून करा' 'साफ चूक' इत्यादी शब्दांची जरूर नाही. नीट बोला.
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
तुम्ही १२ वर्षे आहात हे सांगायची काहीच गरज आहे असं वाटत नाही. तुम्ही नक्की काय सांगू पाहताय या वाक्यातून?
मला यातून फक्त एव्हढेच म्हणायचे आहे कि मी अर्ध्या हळकुंडाने पिवळा (डांबीस नाही) नाही झालो. माझ्या पहाण्यात अनेक जण आहेत की जे अमेरिकेत २-३ महिन्यांसाठी येतात आणि असली विधानं करतात.
मी पाहिलेल्या उदाहरणांवरून हे वाक्य मी बोलते आहे. माझ्या संपर्कातल्या अनेक व्यकींना सुद्धा हाच अनुभव आहे. आपण ह्या सगळ्यांचा अनुभव खोटा आहे असं म्हणताय का?
तुमचा अनुभव खोटा आहे असे मला म्हणायचे नाही पण 'निश्चीतच आहे' असे generalized statement करण्याची देखील काही आवश्यकता नाही.
'विधान जपून करा' 'साफ चूक' इत्यादी शब्दांची जरूर नाही. नीट बोला.
'विधान जपून करा' यात काही चुकले असे मला वाटत नाही. आणि जर 'साफ चूक' ह्या शब्दांची जरुरत नसेल तर 'नीट बोला' ची पण नसावी, नाही का?
>>मला यातून फक्त एव्हढेच म्हणायचे आहे कि मी अर्ध्या हळकुंडाने पिवळा (डांबीस नाही) नाही झालो. माझ्या पहाण्यात अनेक जण आहेत की जे अमेरिकेत २-३ महिन्यांसाठी येतात आणि असली विधानं करतात.<<
मग त्यांना बोला. मी ३ वर्षे शिक्षणासाठी होते. आणि मी पण भरपूर उदाहरणं पाह्यली आहेत.
>>तुमचा अनुभव खोटा आहे असे मला म्हणायचे नाही पण 'निश्चीतच आहे' असे generalized statement करण्याची देखील काही आवश्यकता नाही.<<
साफ चूक असे generalized statement तुमचेच आहे ना? मी उदाहरणे पाह्यली असतानाही असं नाहीच आहे असं धडधडीतपणे तुम्ही कसं म्हणू शकता. आणि मला generalized statement बद्दल सांगताना तुम्ही 'अपवाद असणारच आहेत' या वाक्याकडे दुर्लक्ष करताय त्याचं काय?
>>'विधान जपून करा' यात काही चुकले असे मला वाटत नाही. आणि जर 'साफ चूक' ह्या शब्दांची जरुरत नसेल तर 'नीट बोला' ची पण नसावी, नाही का?<<
तुम्हाला चुकले वाटत नाही तर मलाही माझे काही चुकले वाटायला नको. 'विधान जपून करा!' हा उपदेश आणि 'साफ चूक' असं विधान हे तुम्ही म्हणता तेच योग्य आणि बाकीच्यांचे अनुभव खोटे अश्या तुमच्या स्टान्सचे वाटते. तेव्हा त्याची प्रतिक्रिया 'नीट बोला' अशीच येणार हे लक्षात ठेवा.
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
ही कविता मला एका ढकलपत्रातून आली होती. मला वाटते ही कविताच पुरेशी बोलकी आहे.
तात्या/संपादक मंडळ: जर आक्षेपार्ह वाटली तर काढून टाका.
===========
चिऊच्या घराची गोष्ट
===========
एक होती चिऊ, एक होता काऊ.
चिऊ दिवसभर कामात मग्न,
बिचारीला बोलायलाही नव्हता वेळ.
तिची लगबग पाहून काऊ शेवटी म्हणालाच-
चिऊताई, कसलं सारखं काम करत राहणं?
बघ तरी, एवढा वसंत फुललेला..
सोनेरी ऊन पडलेलं, सारं कसं छान छान!
चिऊ धापा टाकत म्हणाली,
काऊदादा, खरंय बाबा तुझं.
दिसतंय ख्ररं सगळं सुंदर,
पण ते असंच नाही राहणार.
पिल्लं अजून लहान माझी, अन
लवकरच पावसाळा सुरू होणार;
तेव्हा अन्न शोधुनही नाही सापडणार.
तेव्हा करते आताच सारी बेगमी,
अन माझं घरटंही करते जरा आणखी भक्कम!
काऊला चिऊची दया आली,
पण मग तिच्याकडे दुर्लक्ष करून
तो छान उडू, नाचू, बागडू लागला!
उन्हाळा संपला,
अन एक दिवस सोसाट्याचा आला वारा.
काऊचं तोडकंमोडकं घर पुर्णच तुटलं.
मग आला मुसळधार पाऊस.
भिजल्या, कुडकूडत्या अंगाने, भुकेल्या पोटाने,
काऊ चिऊला- राहायला दे, खायला दे- म्हणाला.
चिऊ म्हणाली, नाही रे बाबा कऊदादा..
खुप राबले मी या घरासाठी अन पिल्लांसाठी.
एकतर जागा नाही इथे, अन खाणं तर माझ्या पिल्लांसाठीच.
काऊ चिडला, अन बोलावली सरळ पत्रकार परिषदच!
चॅनेलवाले, पेपरवाले हजर झाले लगेच.
मग लाईव्ह टेलेकास्टमध्ये काऊ म्हणाला-
मी इथं पाण्यानं भिजतोय, थंडीनं कुडकूडतोय, अन्नावाचून मरतोय..
अन बघा ही बया, खुशाल खातेय, मजेत राहतेय!!
मग सर्वांना आला काऊचा कळवळा..
एका पेपरवाल्याने सरळ बातमीच छापली..
चिऊच्या दारात बिचार्या काऊचं उपोषण म्हणून!!
एका 'तेज'तर्रार चॅनेलनं तंबूच दिला बांधून सरळ..
अन कॅमेर्यानं त्यांचं २४ तास रतीब घालण्याचं काम केलं.
मग काय विचारता राव....??
मुलभूत हक्कांची पायमल्ली!!
हीच आहे का लोकशाही??
लोकप्रतिनिधी झोपलेत काय?
सरकारचे डोके फिरले काय?
साम्यवादाचा विजय असो!
काऊ-राव-जी-पंत-चंद्र-महाराज-साहेब- चिरायू होवो!
गरीबी हटाव, चिऊला भगाव!!
काऊ फक्त अंगार है, बाकी सब भंगार है!
काऊरावजी आगे बढो, हम तुम्हारे साथ है!!
न्याय मिळालाच पाहिजे..
शोषण बंद झालेच पाहिजे!
पर्यावरणाचा र्हास होतोय..
समानतेचा नाश होतोय!
राजीनामा दिलाच पाहिजे..
कारभारी बदललाच पाहिजे!
काय काय अन बरंच काय-काय...
चॅनेल्सवर झळकून, पेपरांत मिरवून,
काऊचा झाला झिरोतून हिरो;
मग त्याने ठेवलाच सरळ एक पी.आर.ओ.!
काऊचे कपडे मग ब्रँडेड झाले,
अंग काळेच, पण केस मात्र डाय झाले!!
रात्रीसुध्दा काऊ रे-बॅन लावूनच बोलू लागला,
पाहिजे त्या गोष्टींसाठी स्पाँसर्सही मिळवू लागला!!
काऊने मुद्दा लावून धरला, तसा
विधानसभेतच गदारोळ माजला!
आयूक्त, प्रशासक बदलले..
अन मंत्रीमंडळही विस्तारले!
पण शेवटी परिस्थिती हाताळण्यात अपयश
आल्याकारणाने मुख्यमंत्रीच बदलले!!
केंद्रसरकार हादरले,
दर तासाला परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत, म्हणू लागले!
प्रतिक्रिया तर पैशाला पासरीभर,
आपण मागे पडू, म्हणून सर्वांची धडपड!
अल्पसंख्यांक, मागासवर्गीय, दारिद्र्यरेषा..
गरीब, सवर्ण, आरक्षण, स्पेशल कोटा..
पक्षांतर, घोडेबाजार, जातीयवाद..
सभा, मोर्चे, बंद, अटक अन मतदारराजाला साद!!
समर्थक, भक्त, अनुयायी, उगवते नेतृत्व..
काही खरं नाही, कशाला येईल महत्व!!
सरकार बदललं, तसा कायदाही बदलला,
चिऊच्या घरावर सरळ सरकारी कब्जाच आला.
लेखण्या सरसावल्या, कॅमेरे क्लिकाटले..
समारंभपुर्वक काऊरावजी घराचे मालक झाले!!
चिऊ बिचारी रडली, ओरडली..
वैतागून तिने शेवटी पिल्लांसह अमेरिका गाठली!
चिऊ तिथेही राब-राब राबली,
कंस्ट्रक्शन व्यव्सायात बिझनेस-वुमन बनली!!
काऊला आजही स्वतःचं घर बांधता येत नाही,
पण भाषण करण्यात त्याचा कुणी हात धरत नाही!
आता तो नेहमी वेगवेगळ्या निवडणूका लढवतो..
एन.आर.आय. लोकांनी देशाला मदत केली पाहिजे म्हणतो..!!
=================================
आवडली म्हणून हा प्रतिसाद आपण दिलेल्या कवितेला!
धाग्याला कोणतीही प्रतिक्रिया देण्याची इच्छा राहिलेली नाही.
+१, रेवतीकाकुंशी शब्दशः सहमत आहे
कविता लै भारी आहे आणि एकदम समयोचीत ..!
बाकी चालु द्यात.
आम्ही "बाल्कनीतली शीट" पकडुन बसलो आहे, बरोबर चघळायला भडंग करुन आणली आहे.
होऊन जाऊ द्या काय व्हायचे ते ...
------
( एकदा गडबडीत दोन्ही बाजुने कडाकड भांडलेला व नंतर ह्यातल्या "फोलपणाचा" साक्षात्कार झालेला ) छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
भारतात शिक्षण घेऊन बाकीच्या देशांची भांडी घासायला जाणारयांना उलटे टांगून मिरचीची धुरी दिली पाहिजे. सरकारच्या शिष्यवृत्त्यांवर शिकतात आणि बाहेरच्या देशांच्या तुंबड्या भरतात. सरकारसुद्धा या शिष्यवृत्त्या जनतेने दिलेल्या करांतूनच देत असते.म्हणजे त्यांच्या उच्चशिक्षणात जनतेचा वाटा असतो.
सावरकरांनासुद्धा बॅरिस्टरीनंतर भारतात बाहेरच्या इतक्या कुठे चांगल्या संधी होत्या?पण त्यानीं देशाची गरज लक्षात घेऊन आयुष्याचा पुढचा मार्ग निवडला.'माझ्या एकट्याच्या बॅरिस्टरीमुळे देशाला काय स्वातंत्र्य मिळणार आहे?' असा विचार त्यांनी मुळीच केला नाही. पुढे त्यांना प्रत्यक्ष वकीली कधीच करावी लागली नाही. जे शिक्षण घेतले त्यातच करिअर करावे असा काही नियम नाही तर त्या शिक्षणाचा देशाला किती फायदा आहे हे पहावे . अमेरिका आणि तत्सम देशांमध्ये
जाणार्या लोकांनी त्यांच्या शिक्षणाचा देशाला किती फायदा आहे हे पहावे.
काय पण प्रतिक्रिया आहे..
सावरकरांनासुद्धा बॅरिस्टरीनंतर भारतात बाहेरच्या इतक्या कुठे चांगल्या संधी होत्या?
म्हणजे आपल्याला नेमके काय म्हणायचे आहे? संध्या नव्हत्या म्हणून सावरकर परत आलेत? =))
भारतात शिक्षण घेऊन बाकीच्या देशांची भांडी घासायला जाणारयांना उलटे टांगून मिरचीची धुरी दिली पाहिजे
प्रत्येक जण भांडी घासतोच हो. आणि बाहेरच्या देशात फक्त भांडी घासायला जातात हा दृष्टांत तुम्हाला कधी झाला? आणि एन. आय. आर. लोकांकडुन $$$$ पर्यायाने परकीय चलन मिळते त्याचे काय? मला आठवतं १९९०-९२ साली चंद्रशेखर यांचे सरकार होते (चु.भु.द्या.घ्या.) तेव्हा सोने गहाण ठेवून परकीय चलन मिळवावे लागले होते. तेव्हा भिक्षांदेही करताना सरकारला लाज नाही वाटली का? ते जावू दे. २००४/२००५ साली महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीच अमेरिकेत दौरा करून ईथल्या उद्योजकांना भारतात उद्योग काढा, आम्ही तुम्हाला अमक्या सवलती देवू, हे फुकट देवू, कर माफ करू सांगून गेलेते. तेव्हा काय हा स्वाभीमान पुलंच्या भाषेत 'प्लीज फाईल' केला होता काय? या आणि अशा अनेक राजकारणी लोकांची मुलं शिकायला अमेरिकेत्/युरोपातच जातात ना? मग त्यांना का नाही आधी मिरच्यांची धुरी देत?
अर्थव्यवस्था खुली तर करायची.. ग्लोबलायझेशनमुळे होणारे फायदे पण खिशात घालायचे. पण त्या ग्लोबलायझेशन साठी जे झटतात/झटले त्यांच्या नावानी गळे काढायचे. तुम्हाला काय वाटले की अमेरिकन/युरोपियन लोकांना स्वप्न पडले होते भारतात खुप चांगले ईंजीनियर्स/तंत्रज्ञ आहेत म्हणून. हे त्यांना पटवून देण्यासाठी कोणीतरी तिकडे जावूनच आपल्या कष्टांनी/हुशारीनेच पटवून दिले ना? मगच आता भारतात इतक्या संध्या उपलब्ध झाल्यात.
आणि उच्चशिक्षण घेवून परदेशात स्थायीक झालेले लोक देशासाठी काही करत नाहीत हे तुम्हाला कसे कळले. अमेरिकेत महाराष्ट्र फाउंडेशन (http://www.indiancharity.org/) अतिशय भरीव काम करते आहे, ते एकदा पहा. आय. आय. टी. मधल्या लोकांनी गेल्या वर्षी १० लाख डॉलर्स इतकी मदत पाठवली आय. आय. टी. मध्ये नवीन प्रयोगशाळा/यंत्रसामग्री घेण्यासाठी. स्वतः भारताचे राष्ट्राध्यक्ष डॉ. कलाम आले होते आय. आय. टी. च्या संमेलनाला आणि या लोकांनी केलेल्या देणगी आणि इतर कार्याबद्द्ल प्रशंसा करून गेलेते ते काय उगाच.
या सगळ्या बाबींचा विचार करा आणि मग ठरवा मिरच्यांची धुरी कोणाला द्यायची ते.
- नाटक्या
राहु द्या. राहु द्या.
देशसेवा करायला देशातच रहायला पाहीजे हे तुम्हाला कुणी सांगीतलं? मीही सरकारच्या शिष्यवृतीवर शिकलो. काम करीन तर अस्सल भारतीय कंपनीत म्हटलो अन एका 'अस्सल' भारतीय कंपनीत ५ वर्षे घालवली. महीना पगार ६०००/-. रहायला घर फुकट. हाजी हाजी करायचा कंटाळा आला अन इथे आलो. सरकारी करातुन येणारी शिष्यवृती तुम्हाला दिसते हो पण जनतेचा कर बर्याच ठिकाणी गटारीत जातो. ते का नाही थांबवत? सरकारी कर्मचारी काम करायचे पैसे मागतात त्यांना कधी सुनावलय का? 'तुमचा पगार जनतेच्या करातुन येतो ते?'
देशाबाहेर राहुन देशसेवा करणारे लोक मी पाहीले आहेत. देशात राहुन देशाला विकणारेही पाहीलेत. त्यांना टांगा उलटं. फोडा हंटरने. त्यांना द्या मिरचीची धुरी.
सुक्या (बोंबील)
चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.
मस्त प्रतिसाद.
नाटक्या रावांचा पण मस्त प्रतिसाद..
धुरी द्यायची ना.. तर आधी सरकारी कर्मचार्यांना द्या.
आणि मग त्यांच्या नाकातून जर प्रामाणिक पणा बाहेर आला तर बाकींच्यांना द्या.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
धुरी द्यायला तरी अमेरिकेला यालच ना? तेव्हा विमानतळावरुन आणण्याची व्यवस्था करीन! शेवटी आपल्या देशबांधवांना मदत नको का करायला?? ;)
एच वन झाला की कळवा, भारतीयांनाच धुरी द्यायला जातोय हे सांगितलेत की लगेच मिळेलही, कारण बाहेरच्या लोकांना जाणार्या जॉब्जमुळे गोरे अमेरिकन सुद्धा वैतागलेलेच आहेत! ;)
चतुरंग
नेमेचि येतो पावसाळा तशा या पोस्ट्स असतात! काही नवीन नाही राहीलंय..
उद्या उठून कोणी परदेशस्थ भारतियांबद्दल,( हो भारतीयच!) दोन वाक्यं नॉर्मल बोलले ना तरच मला आता ते आश्चर्य वाटेल..
संपादकांना एक विनंती..
सेम विषय असलेले धागे परत उघडले गेले तर पूर्वीचा धागा दाखवून नवीन विषय बंद करावा..
चर्चाकर्त्याला अजुनही त्यावर चर्चा/वाद करायचे असतील तर पूर्वीच्या धाग्यावर चालूदे.. सारखं हेच हेच पाहून वैताग येतो!
शिवाय चर्चा करून फायदाही नसतो! नवीन माणूस येतो आणि जुना+नवीन तिरस्कार ऍड होतो, इतकाच अर्थ उरलाय. साचे बदलायला कोणी तयार नसतंच नाहीतरी..
(असल्या चर्चांना वैतागलेली!) भाग्यश्री.
http://bhagyashreee.blogspot.com/
मला वाटतो की तुम्च्यात आणी त्यांच्यात फरकच काय ? कारण आजकाल काही स्वतःला अतीहुशार समजणार्या मराठी लोकांना अशी गैरसमजुत झाली आहे की कोणीही येवुन परदेशात, त्यातल्या त्यात अमेरीकेत राहणार्या मराठी लोकांबद्दल आपण काहीही गरळ ओकु शकतो, आणी आपण महाराष्ट्रात राहतो , तर जसे काही हा आपल्याला कायद्यानीच अधीकार मिळाला आहे बॉ.
तेव्हा असे लेख टाकण्याच्या आघी पुर्ण तयारी पाहीजे की लोकांच्या तिखट प्रतिक्रिया येणारच. मी आत्ता त्या दुव्यावर "जॉन" चे उत्तर वाचले. माझे हे म्हणण आहे की ह्या ईटरनेटच्या काळात ईतके जास्त फ्री पॉर्न ऊपलब्ध आहे की कोणी त्या मटा या सकाळ सारख्या भुक्कड लेखांकडे लक्षही देत नसतील. आणी ज्याला पाहीचे आहे, ही त्याची मर्जी. आपण कोण हो ठरवणारे. आणी जेव्हा ईंटरनेट नव्हते तेव्हा काय लोक अष्लील मासीक या सिनेमे पाहीचे नाही काय ?
लोक काय करतात, ह्याच्यापेक्शा आपण जर आपल्या मुलांकडे लक्ष देवुन, ते तर कमी वयात अशा गोष्टी पाहात नाही ना, ह्या कडे जास्त लक्ष द्या.
आणी परदेशात राहुन जर आम्ही आमच्या मात्रुभुमीवर आजही जीवपारप्रेम करतो, गुण गातो, तर मात्रुभुमीत होणार्या वाईट गोष्टीबद्दल बोलण्याचा तेवढाच अधीकार आम्हालाही आहे. आणी ह्या मागची ही ईछ्या आहे की मात्रुभुमीचाही तेवढाच विकास व्हावा. जसे मांजराला डोळे मिटुन दुध पिताना वाटते की कोणालाच काही दिसत नाही. त्याचप्रमाणे तुम्हालाही वाटते की भारतात होणार्या वाईट गोष्टी कोणालाच दिसत नाही ,पण सर्व जग बघतोय.
ह. घ्या. तुम्हालाही या तुमच्यासारख्या कोणालाही परदेशात राहणार्या मराठी या भारतीयंबद्दल गरळ ओकण्याचा अधीकार नाही.
मला एक म्हण आठविली, की जेव्हा कोल्हा अंगुराच्या वेलीवर लटकलेल्या अंगुराच्या घडा पर्यंत पोहोचु शकत नाही तर तो लोकांना सांगत सुटतो की "अंगुर अंगुर खट्टे है " :''( :''(
जय महाराष्ट्र...."
कोल्हा अंगुराच्या वेलीवर लटकलेल्या अंगुराच्या घडा पर्यंत पोहोचु शकत नाही तर तो लोकांना सांगत सुटतो की "अंगुर अंगुर खट्टे है
कारण कीत्येका साठी ते 'खट्टे' च असतात , पण ते इकडच्या लोकांना असे सांगतात की ते इतके गोड आहेत की तुम्ही आज पर्यंत खाल्ले नसतील.
वर सगळ्यांनीच योग्य तो ऊहापोह केलाच असल्याने अधिक काही लिहीत नाही; फक्त असे आचरट काहीतरी लिहिण्यापेक्षा गप्प बसणे श्रेयस्कर असा आगाऊ सल्ला नक्की देतो.
(आगाऊ)बेसनलाडू
एरव्ही असा आगाऊपणा केलाही नसता; पण अनिवासी मराठीजनांना शिव्या द्यायची जी फ्याशन आली आहे. तिच्याविरोधात असे तिखट बोलण्याशिवाय काही पर्याय ठेवलेला नाही फ्याशन आणणेल्यांनी!
(पर्यायी)बेसनलाडू
समोरचा माणुस जर आपला दोष दाखवत असेल तर तो सुधारण्याचा प्रयत्न करावा ना...तो अमेरिकेत राहतो का इंग्लंडात राहतो का युगांडात राहतो याने काय फरक पडतो ??? यात नाव ठेवणार्याची प्रगती न होता झाली तर आपलीच प्रगती होईल.
(भारतात सार्वजनिक स्वच्छतेची बोंब असल्याचे कबुल करणारा आणि सार्वजनिक जागी स्वत: कचरा न फेकणारा) शाहरुख
अमेरिकेमध्ये राहून भारताला नावे ठेवणारे भारतीय पाहिले नाहीत असे नाही.
पण त्याच वेळी कंपनीने ग्रीन कार्ड करण्याची ऑफर दिलेली असताना किंवा ग्रीन कार्ड हातात मिळून देखील ते ठुकरावून भारतात परत गेलेले मित्र ही पाहिले आहेत. अमेरिकेत राहूनही इथले काही सुखावह न वाटणारे आणि भारतात परतायचे आहे पण अजुन परतले नाहीत असेही लोक पाहिले आहेत आणि इथली सिटीझनशिप घेउन कायमचे (?) भारतात परत गेलेली कुटुंबेही पाहिली आहेत.
परदेशी रहा, पैसा कमवा पण काही काळानंतर मायभूमीला परत जा (असं माझं व्यक्तिगत मत आहे ...कोणाला सल्ला देत नाहिये)...भारत इतकाही वाईट देश नाहीये की एकदा परदेशी गेलो की परत यावेसेच वाटू नये.
अमेरिकेचे नागरीकत्व घेताना शेवटची पायरी म्हणजे शपथविधी. ह्याचे मला नेहमी कोडे पडलेले आहे की भारतीय लोक 'अमेरिकेशी एकनिष्ठ राहीन 'वगैरे अशी शपथ कशी घेतात? खरीखुरी शपथ घेतली तर तुम्हाला मायभुमीबद्द्ल प्रेम नाही आणि खोटी शपथ घेतली तर तुम्ही अमेरिकन सरकारला फसवत आहात असा अर्थ होत नाही का ? कि असं दुट्प्पी वागून फक्त आपला स्वार्थ साधायचा?
तुम्ही जे लिहिले आहे ते तुमचे अनुभव आहेत कि वाचून / ऐकून बनलेले विचार आहेत?
देशप्रेम ही काही कोणाची मक्तेदारी नाही ... तुम्ही भरतात रहातात याचा अर्थ by default तुम्ही देशभक्त आणि निष्ठावान भारतीय नागरिक होत नाही .
आणि भारतात रहाणे हा काही अस्सल भरतीय असण्याचा एकमेव निकष नाहीये .
मनिषाताई,
'अतिशय एकांगी विचार..' हे आपण सदर लेखकाला (महेन्द्र) उद्देशून लिहिले आहे की माझ्या प्रतिसादाला उत्तर देण्याकरता लिहीले आहे? कोणाबद्द्ल बोलताय त्याचा उल्लेख करायला हवा होता.
(माझ्या प्रतिसादाला असेल तर मी कुठलेच विचार मांडले नाहीयेत फक्त माझी निरिक्षणे नोंदवली आहेत आणि मला नेहमी पडणारा प्रश्न लिहीला आहे. आणि मी सध्या भारतात रहात नाहीये.)
प्रतिक्रिया
जोशी साहेब..
सहमत
.
हे वाक्य
भारताला
.
दोन्ही... -
आणि आम्ही
प्राजु
प्रत्येका
ऍडी एकच सांगतो,
.
चला एक
सहमत
आदी, एकांगी
.
चूक
>>मी
तुम्ही १२
>>मला यातून
पण काहीही
सहमत
ही कविता वाचा..
जोरदार टाळ्या...
सूरेख
किती वेगळी
+१,
नाही, ही कविता काढली जाणार नाही!
धन्यवाद..
कविता मस्त आहे
वा वा
चांगली
वा!
+१
मत
वा!
राहु द्या साहेब . .
सुके राव..
सिद्धेश,
नेमेचि
दोन
कुठली
तुम्हीही मनावर घेवु नका...
कोल्हा
गप्प बसा!
समोरचा
चिउ च्या घराची गोष्ट येथून आली
निरीक्षणं
अतिशय एकांगी विचार..
मनिषाताई,