Skip to main content

मराठी अमेरिकन्स ..

लेखक अज्ञात यांनी बुधवार, 18/02/2009 19:20 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल भारताबाहेर राहुन , इतर देशाचे नागरिकत्व घेउन त्यांची भाट गिरी करित आणि भारतात रहाणाऱ्या लोकांना तसेच, इथल्या सिस्टिम ला नांवे ठेवणे हे एक फॅशन स्टेटमेंट झाले आहे. त्यातल्या त्यात, अमेरिकेची सिटीझनशिप मिळाली की मग तर आभाळालाच हात पोहोचले , आणि मग तर त्या लोकांना सगळ्या भारतियांना ज्ञान शिकवण्याचा परवाना मिळाला आहे असे वाटते. ह्या भारतिय नागरिक नसलेल्या , पण मराठी बोलणाऱ्या अमेरिकन्स च्या ’अक्कल शिकवण्याच्या वागणुकीची भारताला गरज आहे कां? इथल्या ज्या राजनैतिक नेत्यांची जे खिल्ली उडवतात, त्याच नेत्यांना हार्वर्ड ला लेक्चर द्यायला बोलवतात. इथल्या डबे वाल्या कडुन सिक्स सिग्मा बद्दल शिकण्याचे प्रयत्न करतात... ... ही गोष्ट साधारणतः एखाद्या डिस्कशन ग्रुप मधे, नेट वर, किंवा एखाद्या लेखाच्या रिस्पॉन्स वर दिसुन येते.. हिच गोष्ट आज बघितली इ सकाळच्या साइटवर..आणि मला खुप इन्सल्टींग वाटलं.. त्यामुळेच ’त्यांना’ म्हणजे मराठी बोलणाऱ्या अमेरिकन्स ना सांगावंस वाटलं.. ते इथे आहे.... वाचा हे लेखन कोणाच्या विरुध्द व्यक्तिशः लिहिलेले नाही .. त्यांच्या जनरल टेंडन्सी बद्दल लिहिलंय..

वाचने 33038
प्रतिक्रिया 127

प्रतिक्रिया

जशी आजकाल भारतात न राहता परदेशात राहून भारताला शिव्या घालायची जशी फॅशन आहे तशीच फॅशन भारतातही आली आहे. परदेशात राहणार्‍या लोकाना शिव्या घालायची. मग तो माणूस बरोबर जरी बोलत असेल तरी परदेशात राहतो ना मग त्याला घाला शिव्या मग तो भले बरोबरही बोलत असेनाका. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984

In reply to by llपुण्याचे पेशवेll

पेशवे भाऊ.. सहम्त आहे १००% महेंद्र साहेब, आपण स्लम डोग मिलिनेर पाहिला का हो? तो पाहून इथल्या अमेरिकनांनी विचारलेले प्रश्न जर तुम्हाला सांगितले तर्..अमेरिकेत राहणार्‍या मराठी लोकांबद्दल असं बोलणार नाही तुम्ही, जयहिंद! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

अगदी बरोबर बोललीस तु प्राजु... मी इथे या 'ड्च' लोकांना तो 'पिक्चर' पाहुन काय काय उत्तर दिली आहे मलाच माझं माहित..

In reply to by प्राजु

मला पण हेच म्हणायचं आहे , शेवटी गोरी कातडी ही आपल्या वाईट गोष्टीच दाखवुन पैसा कमावणार ना. डॅनी बॉयल हा ब्रिटीश. ति फिल्म ब्रिटिश... अशाच गोष्टी दाखवणे गरजेचे होते कां? ह्याचं उत्तर आधी द्या मला... अमेरिकेत रहाणारे आणि सकाळव्या वेब साईट्वर अकलेचे तारे तोडणार्यांविषयी मी लिहिलंय.. पुन्हा एकदा सांगतो.. प्लिज पर्सनली घेउ नका...

In reply to by llपुण्याचे पेशवेll

अगदी १०००००% सहमत... महेंद्र सर, काय असतना जेव्हा माणुस हा बाहेरची दुनिया बघतो, तेव्हा तिथल्या चांगल्या गोष्टी आपल्या इथे पण असाव्या असा विचार करतो आणि बोलुन दाखवतो. पण आपले लोकं त्याचीच 'अक्कल' काढतात आणि वरुन बोलायला मोकळी असतात.. 'याच काय जातय...'

In reply to by किट्टु

बाहेरची दुनिया मी पण बघितली आहे. म्हणुन काही भारतियांना नावे ठेवण्याचा परवाना मिळत नाही. जे चांगलं आहे ते आहे, पण एकदा मुंबईला विमान लँड झालं की गम खाउन कागद चुरगाळुन खाली फेकणारे ( समोरच डस्ट बिन असतांना पण) आपणच....

In reply to by महेंद्र (verified= न पडताळणी केलेला)

पण एकदा मुंबईला विमान लँड झालं की गम खाउन कागद चुरगाळुन खाली फेकणारे ( समोरच डस्ट बिन असतांना पण) आपणच....
ए कोण आहे रे तो ? पक्काआआड ... पक्काआआड ... कोण कचरा करतोय .. पकडा आणि महेंद्र साहेबांच्या ताब्यात द्या त्याला ... परदेशातुन येउन कचरा करतो म्हणजे काय .. आं ? प्रश्ण : हे फक्त अमेरिका रिटर्ण लोकांसाठी आहे का बाकी कंट्रीत जाणार्‍या गावठींसाठीही आहे ? (विमान लँडल्याबरोबर भारतीय जमीनीवर घाण करणारा) टारझन ...

In reply to by llपुण्याचे पेशवेll

त्यात बरोबर काय बोलले आहेत ते?? म्हणे स्वाती दांडेकरांचा अभिमान आणि भारतिय नेत्यांची लाज वाटली पाहिजे.. अशा स्टेटमेंट्स्ची खरंच गरज आहे कां? एक सांगा... जर उद्या काही कारणाने, जर अमेरिकन मराठी मुलं.. ३जी.. समजा मरिन्स मधे गेलीत, आणि जर कधी भारतावर अटॅक केला, तर ते भारतावर बॉंबिंग करतिलच नां?? त्यांचे हात कापतिल का बाँब टाकतांना.....मग ते भारतिय आहेत कां? नाही! मराठी बोलणारे अमेरिकन्स... हे माझं मत आहे . नथिंग पर्स्नल..

In reply to by महेंद्र (verified= न पडताळणी केलेला)

त्यात चूक काय आहे.. आमचे सगळे नेते काही कारण नसताना हिंदीत बोलतात. आमचा मुख्यमंत्री सातार्‍याला सतारा म्हणतो, भांडारकर ला भंडारकर म्हणतो तेव्हा मला त्याची लाज वाटते. हा कसला मराठी. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984

In reply to by llपुण्याचे पेशवेll

अगदी सहमत. सुक्या (बोंबील) चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.

कायमचे परदेशी रहायला गेलेले लोक भारतीयच नव्हेत. का त्यांच्या विषयी बोलून वेळ वाया घालवायचा. जे परदेशात राहून करता येतं तेच थोडे अधीक कष्ट घेऊन भारतातही करता येतं. हे टाटा, अंबानी, घैसास आणि अनेक लोकांनी सिद्ध केलं आहे. मायभूमीला फाट्यावर मारलतंच, पण मग जिथे जाता तिथली संस्कॄती तरी क्रुतज्ञेपोटी आपलीशी करा. तिथे राहून इथले गोडवे आणि राष्ट्रप्रेमाचे उमाळे आणू नका. मुलं मोठी होऊ लागल्यावर आजूबाजूचं वातावरण बघून आपला (?) भारतच बरा असाही साक्षात्कार काही लोकांना होतो. एकत्र कुटूंब पद्धतीचं महत्व पटू लागतं. मग येतात इकडे. आणि वर इथे आल्यावर भारतावर उपकार केल्यासारखे वागतात. तिकडे तसं नसतं, सतरा वेळा ऐकायला लागतं. बाबांनो, तुम्ही आहात तिकडे सुखी रहा. भारत तुमच्या शिवाय आत्तापर्यंत चाललाय आणि या पुढेही चालेल. सरकारनी चालवलेल्या उत्तमोत्तम कॉलेजेस मधून स्वस्तात शिकून समाजाला त्याचा काडीचाही फायदा न करून देता परदेशी उडणार्‍यांना तर हंटर मारले पाहिजेत. अवांतर: ह्या धाग्याला पण लवकरच कुलूप लागणार :)

In reply to by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)

>> जे परदेशात राहून करता येतं तेच थोडे अधीक कष्ट घेऊन भारतातही करता येतं. हे टाटा, अंबानी, घैसास आणि अनेक लोकांनी सिद्ध केलं आहे. शंभर कोटीच्या देशात फक्त हाताच्या बोटावर मोजता येणारे टाटा, अंबानी, घैसास आणि अनेक? तुला खरंच असं वाटतं की फक्त थोडे अधिक कष्ट केल्याने परदेशात राहून करता येतं तेच इथे करता येतं? --------- कृपया 'हंटरने मारले पाहिजे' वगैरे भाषा वापरू नकोस. 'हंटरने मारण्या योग्य' लोक तुला भारतातही पाहिजे तितके मिळतील.

In reply to by संदीप चित्रे

टाटा अंबानी घैसास ही अतीश्रीमंतांची उदाहरणं झाली. लाखानी पगार घेणारे अनेक माझ्या ओळखीत आहेत, आजूबाजूला आहेत. कृपया 'हंटरने मारले पाहिजे' वगैरे भाषा वापरू नकोस. मग ह्या कॄतघ्नतेबद्दल जाण्याआधी त्यांना सुवासिनींकडून ओवाळायचं का? 'हंटरने मारण्या योग्य' लोक तुला भारतातही पाहिजे तितके मिळतील. विषय काय, बोलताय काय.

In reply to by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)

टाटा अंबानी घैसास ही अतीश्रीमंतांची उदाहरणं झाली. लाखानी पगार घेणारे अनेक माझ्या ओळखीत आहेत, आजूबाजूला आहेत. किती उदाहरणं देऊ, भारतातल्या संशोधन संस्थांमधे, पात्रता असताना, फक्त कोणी गॉडफादर नाहीत म्हणून, कधी 'चुकीचा' गॉडफादर आहे म्हणून अनेक हुशार लोकांना संधी न मिळाल्याची? किती उदाहरणं देऊ की जे परदेशातल्या लॅब्जमधे कामं करून आलेले लोकं आय.आय.टी.मधे लोकं संशोधन करत नाहीत, लॅब्ज विकसित करत नाहीत म्हणून सडून आहेत? किती उदाहरणं देऊ जे हुशार लोकं इथल्या संशोधन संस्थांमधल्या राजकारणाला कंटाळतात आणि बुद्धीचा वापर करायला बाहेर जातात? किती घरातून आलेले हुशार विद्यार्थी दाखवू जे लोकं पीएच.डी. आणि पोस्ट-डॉक्सना तुटपुंजा पगार मिळतो आणि परदेशात जाऊन आल्याशिवाय इथे कायमस्वरुपी नोकरी मिळत नाही म्हणून देशाबाहेर जातात? अर्थात, मी या क्षेत्रात आहे म्हणून या क्षेत्रातलं बोलते. अब्दुल कलामांचं वाक्य आहे, "If you pay them peanuts, you'll get monkeys"; माणसं जातात युरोप, अमेरिकेत कामाला! अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

माझा स्वतःचा सख्खा मित्र तो पॉवरसप्लाईज डिझाईन करतो. ज्याने १५ वर्ष स्वतःची कंपनी पुण्यात चालवली. अनेक उत्तमोत्तम परदेशी पॉवर सप्लाईज डिझाईन्सला पर्याय म्हणून त्याने भारतीय बनावटीची तितकीच ताकदवान डिझाईन्स पुरवली, ज्याने तयार केलेला मिलिटरी ग्रेड सप्लाय आपल्या 'अर्जुन' रणगाड्यामधे वापरला जातो, त्या माझ्या मित्राने सर्व ठिकाणी चालणारी लाचखोरी, भ्रष्टाचार, दप्तरदिरंगाई, टॅक्सचे अनंत प्रॉब्लेम्स, कर्ज मिळण्यातली कागदपत्रांची मारामारी ह्याला कंटाळून चांगला चालणारा धंदा, जो पंधरा इंजिनियर्सना रोजगार देत होता, तो बंद केला आणि आता तो फिलिपाईन्स, मनिला मधे गेलाय. त्याला काय प्रचंड यातना झाल्या असतील कल्पना आहे हे सगळं बंद करताना? मला आहे. कारण दहा वर्षांपूर्वी मीही माझा चांगला चालणारा धंदा बंद केला होता आणि नोकरीची वाट पकडली होती. कुठेही परदेशात जाण्यासाठी मी प्रयत्न केलेले नाहीत, ते माझं स्वप्न कधीच नव्हतं, हे सांगूनही खरं वाटणार नाही. माझ्या कामाने मला कंपनीनेच आपसूक इकडे आणलं आणि मला वेगवेगळी कामाची दालनं उघडी झाली. ह्यात मला माझा मोठेपणा सांगायचा नाहीये, तर माझ्यासारखे अनेक लोक आहेत की जे असे आलेले असतील. ऍडी जोशी साहेब, बोलणं आणि दोष देणं फार सोपं असतं, त्यात राहून तुम्ही आतून बाहेरुन जळालात ना की तुम्हाला कळतं खरं दु:ख काय आहे!! चतुरंग ता. क. एक अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली की माझ्या ह्या मित्राकडे आयायटीची डीग्री नाहीये तो ज्ञानेश्वर विद्यापीठातून सेकंड क्लासमधे पास झालाय. पण पुण्यातल्या एका अतिशय मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स कंपनीच्या मालकाने त्याच्या कंपनीत ह्याच्यासाठी चीफ डिझायनरची पोस्ट राखीव ठेवली आहे त्याला हे सांगून "की बाबारे, कधीही तुला परत यावसं वाटलं तर ह्या पोस्टची खुर्ची तुझ्यासाठी हजर आहे!" टलेंटची कदर असणे आणि नसणे ही एकच गोष्ट हा सगळ्या प्रश्नाचं मूळ आहे!

In reply to by चतुरंग

तो मालदिवचा अध्यक्ष करतोय तसे आपण केले पाहिजे, ज्यांना इथल्या भ्रष्ट समाजाचा वीट आलाय त्यांनी ऑस्ट्रेलियासारख्या एखाद्या देशातील प्रचंड जमीनीतील काही लाख हेक्टर जमीन विकत घेउन नवा भारत विकसीत केला पहिजे. राहुदे इथे ज्यांना रहायचे आहे त्यांना कायमचे.

In reply to by त्रास

वो ३_१४ व्यस्त अदिती बाई, आता घेतली आहे बरका तुमची बाजू. नाहीतर वरडाल आमच्यावर परत.

In reply to by चतुरंग

लाचखोरी, भ्रष्टाचार, दप्तरदिरंगाई, अहो ह्यातून मी सुद्धा गेलो आहे. माझी बाईक चोरीला गेल्यावर ह्या सगळ्याच्या प्रत्येक स्टेज वर अनूभव घेतला. पण १ पैशाची लाच देणार नाही हा निर्धार केला होता. भ्रष्टाचार आवडत नाही मग कितीही त्रास झाला तरी त्याला हातभार लावायचा नाही ह्या मतावर ठाम होतो होता. १०-१२ दिवस रोज ३-४ तास पोलीस स्टेशन मधे बसून असायचो. ऑफीसला पोचायला उशीर व्हायचा म्हणून राती २-३ वाजेपर्यंत थांबून काम पूर्ण करायचो. सकाळी पुन्हा पोलीस स्टेशन. शेवट पर्यंत माझं मत ठणकाऊन सांगत होतो. शेवटी लाच न देता काम झालं तिथे माझं. उगाच बोलत नाही. ह्यावर सगळ्यांना हे शक्य नसतं असं मत मांडलं जाऊ शकतं, पण जे शक्य आहे ते तर करा. माझ्यावर व्यवसाय बंद करण्याइतका गंभीर प्रसंग ओढवला नाहिये, पण जे आलं त्याला तोंड दिलं आहे. काम लवकर व्हावं म्हणून स्वत: १०० रुपये द्यायचे आणि मग भ्रष्टाचार भ्रष्टाचार म्हणून बोंब मारायची ह्याला काही अर्थ नाही. तो होऊ नये म्हणून आपण काय करतो ह्याचा कधी विचार करणार आपण. ह्या लांडग्यांच्या हाती देशाला सोपवणार का लचके तोडायला? कुठेही परदेशात जाण्यासाठी मी प्रयत्न केलेले नाहीत, ते माझं स्वप्न कधीच नव्हतं, हे सांगूनही खरं वाटणार नाही. विश्वास आहे.

In reply to by चतुरंग

तुमच्या उदाहरणाबद्दल वाद नाही पण ही अशी उदाहरणे सांगून अमेरीकेत शिक्षण झाल्यानंतर त्या माणसाला परत जाण्यापासून परावृत्त करायला बघणारे ९९% लोक असतात. अतिशय विचित्र पद्धतीचं असतं हे ब्रेनवॉशिंग. मी घेतलाय अनुभव. माझ्या पहिल्या वर्षापासून 'तू तुझं टॅलेन्ट वाया घालवणार आहेस.' ते 'जाशील नी परत येशील!' पर्यंत आणि अजून काय काय.. हे मी ऐकलंय. बोलणारे लोक कुणी आगंतुक नसतात. ज्यांच्याकडे परक्या देशात विश्वासाने बघावं अशी काका, मामा मंडळी, त्यांचे मित्र असे सगळे 'आपले' म्हणावेत असे लोक असतात. नाही म्हणलं तरी परिणाम होतोच. आपल्याच निर्णयांबद्दल साशंकता होतेच निर्माण. मला खूप त्रास झाला होता. त्यापायी शिकल्यानंतर एक वर्ष जॉब करायचा ठरवला होता. पण जॉब मिळाल्याचा फोन आला आणि त्या बाईंशी बोलताना निर्णय झाला अन त्यांना मी चालले परत सांगून टाकलं. चालू होता तो २ महिन्याचा जॉब पूर्ण करून मी परत आले. निदान किमान प्रत्येक परत जाउ इच्छिणार्‍या विद्यार्थ्याचं मनोधैर्य खच्ची न करणं एवढं तरी पाळू शकता की नाही? - नी http://saaneedhapa.googlepages.com/home

In reply to by नीधप

अमेरीकेत शिक्षण झाल्यानंतर त्या माणसाला परत जाण्यापासून परावृत्त करायला बघणारे ९९% लोक असतात ते तसे करणारच , त्यांना त्यांचा कळप वाढवणे गरजेचे असते. आमच्या सारखे कितितरी आहेत असे स्पष्टीकरण ते मग देउ शकतात

In reply to by नीधप

अशी माणसे असतात ही वस्तुस्थिती आहे. मात्र ९९% आहेत असे मात्र मला वाटत नाही. जर कुणी परत भारतात जाणार म्हणले तर ८-१० वर्षांपुर्वीपर्यंत अगदी नक्की विरोधात ऐकायला येयचे. कुठेतरी याचे कारण स्वतःच्या येथे राहण्याचे जस्टीफिकेशन असते. वास्तवीक तसे जस्टीफिकेशन का करावे हे कळत नाही. आपली माणसे भारतात सर्वत्र राहत असताना त्यांना ते त्यांच्या महाराष्ट्रातील घरात नाही याचे जस्टीफिकेशन करावेसे वाटते का? अर्थातच नाही, मग ते अमेरिकेत असतानाच का करावे आणि का करायला लावावे? कोकणातला माणूस मुंबईत आणि देशाकडील विशेष करून पुण्यात येऊन राहतो. त्यांना असे इतरांना समजावून सांगावेसे वाटते का? अर्थातच नाही. आणि तसे करायला लागू पण नाही. तसेच पहायला गेलात तर आजकालची माणसे अमेरिका-युरोप आणि इतरत्र हिंडतात, स्थायीक होतात पण ते पुर्वी इतके वाटेल तशी नावे ठेवतात असे वाटत नाही. किंबहूना आधीच्या पिढीपेक्षा कितीतरी पटीने अधिक ते भारतात मदत करू इच्छितात आणि करतात. तरी देखील एखादी गोष्ट खटकली आणि तसे स्पष्टपणे सांगितले तर राग येण्याचे कारण नाही, अर्थात जो पर्यंत सांगणार्‍याचा सूर हा अपमानकारक नाही तो पर्यंत, इतकेच म्हणावेसे वाटते.

In reply to by विकास

तरी देखील एखादी गोष्ट खटकली आणि तसे स्पष्टपणे सांगितले तर राग येण्याचे कारण नाही, आधी नव्हते का खटकत ? आणि स्पष्टपणे सांगताना "तिकडच्या" गोष्टींशी तुलना केली जाते , ती अधीक चीड आणणारी असते.

In reply to by मराठी_माणूस

आधी नव्हते का खटकत ? आणि स्पष्टपणे सांगताना "तिकडच्या" गोष्टींशी तुलना केली जाते , ती अधीक चीड आणणारी असते. बाहेर गेलं की डोळ्यांना लगेच दिसतं की बाहेर लोकं फार शिस्तप्रिय आहेत. कचरा फक्त कचरा-पेटीतच टाकतात, गाड्या चालवताना उगाच भोंगे वाजवत नाहीत, शिस्तीत आपल्या लेनमधून गाडी चालवतात, आपल्या वागण्याचा दुसर्‍याला त्रास होणार नाही याची खूप जास्त काळजी घेतात ... दुसर्‍याचं चांगलं ते घ्या एवढं म्हटलं का एवढा राग यावा? अलिकडेच बीबी-का-मकबरा पाहिला. तिथली अस्वच्छता, संडासांची अवस्था पाहिली आणि अगदी सहज मनात आलं, "ब्रिटीश लोकं त्यांच्या देशातले नुस्ती पडझड झालेले बंगले दाखवायचे वाजवून दहा-बारा पाऊंड घेतात पण चांगली खाणं-पिण्याची, संडासांची चांगली सोय पुरवतात, वास्तूंचं संवर्धन करतात; मग आपलं सरकार पाच-दहाच्या जागी पन्नास-शंभर रुपये घेऊन नीट स्वच्छता का राखू शकत नाही? जुन्या वास्तूंचं नीट संवर्धन का करू शकत नाही?" खाण्याची सोय सगळीकडे होते, पण जाण्याचं काय हो? परदेशात फिरताना असा त्रासदायक अनुभव आला नाही, पण आता भारतात याच कारणासाठी फिरणं बंद होतं ना, तेव्हा खरोखर जीव जळतो. अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

दुसर्‍याचं चांगलं ते घ्या एवढं म्हटलं का एवढा राग यावा? नुसतेच चांगले म्हणा ना , लगेच इथले कसे वाईट हे कशाला पाहीजे. दुसर्‍यांच्या चांगल्यामदध्ये आपला वाटा शुन्य पण इथले जे चुकीचे वाटत असेल त्यात अंशतः का होईना आपला वाटा आहे हे विसरु नये.

In reply to by मराठी_माणूस

... आपला वाटा आहे हे विसरु नये. म्हणूनच भारताबद्दल बोलतात ना, झिंबाव्बेमधली सुपर-हायपर चलनवाढ आणि नौरूमधलं बेसुमार खाणकाम याबद्दल बोलत नाहीत. पण आपण भारतात रहाणारेच त्यांना परके करून टाकतो. :-( अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

पण आपण भारतात रहाणारेच त्यांना परके करून टाकतो कारण खुप जण तसेच वागतात. ऑनसाईट वरुन आले की , सुरु , किती घाण, कीती धुळ, हातात बिसलेरी, ईत्यादी. परके न वाटतील तर नवलच.

In reply to by मराठी_माणूस

कारण खुप जण तसेच वागतात. ऑनसाईट वरुन आले की , सुरु , किती घाण, कीती धुळ, हातात बिसलेरी, ईत्यादी. परके न वाटतील तर नवलच. +१ पण (तुम्ही पाहिलेले) खूपजण आणि सगळेजण यांच्यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. आणि हे तुम्हाला मान्य नसेल तर या वादात माझ्याकडून हा शेवटचा प्रतिसाद. किती घाण, किती धूळ म्हणत बिसलेरी पिणारे मी खूप कमी पाहिले आहेत. पाहिले आहेत ते इथे येऊन सार्वजनिक स्वच्छता आणि शिस्त याबाबतीत हळहळ व्यक्त करणारे, त्यासाठी आपल्याला जेवढं करता येईल तेवढं करणारे. सगळेच लोक जागरुक असतात असं नाही, तसं सगळेच लोक 'स्नॉब्ज'ही नसतात. अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मी १००% असे म्हटले नाही. काहीच परीणाम न झालेले मी सुध्दा पाहीले आहेत , पण अगदी नगण्य.

In reply to by मराठी_माणूस

ऑनसाईट वरुन आल्यानंतर हातात बिसलेरी असेल तर ते लगेच परके झाले का? काय राव काहीही!

In reply to by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)

>> लाखानी पगार घेणारे अनेक माझ्या ओळखीत आहेत, आजूबाजूला आहेत. मोजकी क्षेत्रे आहेत रे पण ती.... खरी काळजी आहे ती पगारांमधली दरी रूंदावतीये ती. -------- विषयही कळलाय आणि बोलणेही त्याला धरूनच आहे. नीट विचार केलास की पटेल :)

थोडेसे टोकाचे मत वाटले. मी तुमच्या काही मुद्द्यांशी सहमत आहे- १. भारतात रहाणाऱ्या लोकांना नावे ठेवणे- ते जर तसे करत असतील तर २. सगळ्या भारतियांना ज्ञान शिकवण्याचा परवाना मिळाला आहे असे वाटणे काही मुद्द्यांशी असहमत आहे- १. त्यातल्या त्यात, अमेरिकेची सिटीझनशिप मिळाली की मग तर आभाळालाच हात पोहोचले , आणि मग तर त्या लोकांना सगळ्या भारतियांना ज्ञान शिकवण्याचा परवाना मिळाला आहे असे वाटते.- असे किती जण करतात? भारताबाहेर १ कोटी भारतीय राहतात २. आजकाल भारताबाहेर राहुन , इतर देशाचे नागरिकत्व घेउन त्यांची भाट गिरी करित आणि भारतात रहाणाऱ्या लोकांना तसेच, इथल्या सिस्टिम ला नांवे ठेवणे हे एक फॅशन स्टेटमेंट झाले आहे.भारत्तात राहून्ही खूप मंडळी हेच करत्तात. पेज ३ कल्चर बाबत आओपले काय मत आहे?

In reply to by त्रास

कृपया पोस्ट पर्स्नलाइज्ड वे ने घेउ नका. सकाळ ची ति लिंक आहे अजुनही . ती वाचा. माझी बहिण पण आहे तिथेच.. तसेच बायकोचा भाउ पण आहेच.. ते सकाळवरचे पोस्ट वाचले, स्वाती दांडेकरांचे भाषण वाचले, आणि त्यावरच्या कॉमेंटस पण वाचल्या... तुम्ही पण वाचा. जर तुमचे अजुनही भारतिय नागरिकत्व असेल तर नक्कीच राग येइल वाचुन आणि इन्सल्टेड पण वाटेल. तुम्हाला दांडेकरांची स्तुती करायची असेल तर जरुर करा पण् त्याच सोबत भारतियांवर कॉमेंट्स ची गरज नव्हती..

In reply to by महेंद्र (verified= न पडताळणी केलेला)

त्यांचे भाषण ऐकून, आणि सकाळमध्ये आलेला लेख आणि त्यावरच्या कॉमेंट्स वाचून सरससकट भारता बाहेर राहणार्‍या लोकांबद्दल आपण वक्तव्य केलंत. स्पेसिफिकली.. "स्वाती दांडेकरांचे हे भाषण बरोबर आहे का? " अशा मथळ्याचा काथ्याकूट टाकायचा होतात. आणि आता पर्सनली घेऊ नये असे सांगून काय उपयोग? - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by महेंद्र (verified= न पडताळणी केलेला)

ते सकाळवरचे पोस्ट वाचले, स्वाती दांडेकरांचे भाषण वाचले, आणि त्यावरच्या कॉमेंटस पण वाचल्या... तुम्ही पण वाचा. जर तुमचे अजुनही भारतिय नागरिकत्व असेल तर नक्कीच राग येइल वाचुन आणि इन्सल्टेड पण वाटेल. तुम्हाला दांडेकरांची स्तुती करायची असेल तर जरुर करा पण् त्याच सोबत भारतियांवर कॉमेंट्स ची गरज नव्हती.. अहो, तुम्हाला जे 'इन्सल्टींग' (पक्षी: अपमानास्पद) वाटलं त्याचा एक दुवा तरी द्यायचात. तुमच्या अनुदिनीवरून वाचण्यापेक्षा मूळ ई-सकाळच्या बातमीचा दुवा जास्त परिणामकारक वाटला असता. (राग मानू नका, पण तुमच्या अनुदिनीवरचे फॉण्टस छान नाही वाटत आहेत, वाचायला त्रास होत आहे.) आणि दुसरं एक स्वाती दांडेकर आणि त्यांना प्रतिक्रिया देणारे ९१ मराठी लोकं (यातही सगळे 'परदेशी' मराठी/भारतीय नाहीतच) या, ९२ लोकांच्या (फारतर २०० होतील?) मतांवरून आपण सगळ्याच परदेशातल्या भारतीयांवर बोलणार आहात का? खरंतर मला त्यांच्या बोलण्यात काहीही आक्षेपार्ह वाटलं नाहीच. पण अगदी त्या काही आक्षेपार्ह बोलल्या असं गृहीत धरलं तरीही १०० लोकांवरून तुम्ही इतर बाकीच्या लोकांनाही बोल लावता हे संपूर्णपणे अमान्य आणि आक्षेपार्ह आहे. शिवाय भारतीय पारपत्र असणार्‍या, पण सध्या भारतात वास्तव्य न करणार्‍या लोकांनी भारताबद्दल बोलू नये हे आपण कसं काय सांगणार? त्यांनातर मतदानाचाही अधिकार घटनेने दिला आहे. कोणी चार लोकं परदेशात जाऊन, डोक्यात हवा गेल्यावर बरळतात; आणि तसेतर इथेही आहेतच ना? पण छोट्या संख्येतल्या लोकांच्या चुकांसाठी तुम्हीतर संपूर्ण जमावालाच वाईट ठरवत आहात. अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

(राग मानू नका, पण तुमच्या अनुदिनीवरचे फॉण्टस छान नाही वाटत आहेत, वाचायला त्रास होत आहे.) हाहाहा... आदिती.. जियो!! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

विप्र यांच्या संगतीने सगळे लोक क्रिप्टीक लिहायला लागले आहेत. "फाँट" हा "म्याटर" या शब्दाऐवजी वापरलायसे दिसते अदितीबाईंनी. ;-) (राग मानू नका !)

In reply to by त्रास

अहो त्रासकाका, आमच्याकडे पुण्यातून (जे भारत, अमेरिका वगैरे सगळ्यांच्यापेक्षा व्याख्येप्रमाणेच उच्च आहे ;-) ) मिपा वापरताना आम्ही असंच असतो, ठ्यॉ करून ... कोई श्शक्? अदिती

In reply to by प्राजु

प्राजु, मी (कधी नव्हे ते!) एवढं तर्कशुद्ध लिहायचा प्रयत्न केला आणि तुला ते तेवढं एकच वाक्य प्रतिक्रिया देण्यालायक वाटलं? ;-) असो. मूळ लेख कुठे आहे, तर तो खोदून खोदून शोधावा लागला, तोही ईसकाळच्या भयंकर आणि अंगावर येणार्‍या वेबसायटीवर! त्यातून इथे धागा काय तर 'माझे विचार मी त्या अनुदिनीवर लिहिले आहेत, तिथे वाचा' मग इथे का नाही डकवले? या 'चर्चे'शी संबंधित जुना एक धागा आठवला. मुक्तसुनीत यांनी एक उत्तम प्रकटन लिहिलं होतं आपण आणि आपले "ठराविक साचे". त्या मुद्द्यांचा जरूर विचार करा आणि मग 'अनेकवचना'त लोकांचा तिरस्कार करा. अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

त्यातून इथे धागा काय तर 'माझे विचार मी त्या अनुदिनीवर लिहिले आहेत, तिथे वाचा' मग इथे का नाही डकवले? हेच म्हणते. तिरस्कारच करायचा तर अनुदिनीवर का फक्त? आणि आता केलाच आहे तर.. पर्सनली घेऊ नये म्हणायचे कशाला? डॉन्याच्या धाग्यात तात्या म्हणाले तसे.. "आली अंगावर घेतली शिंगावर..." याप्रमाणे आता तयार रहा ना. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

अदिती.. समंजस प्रतिसादासाठी मनापासून धन्यवाद. महेंद्रना जो काही राग आला असेल तो त्यांच्याकडे... एका फटक्यात सरसकट सगळ्यांना शिव्या घालायचा अधिकार त्यांना कसा मिळतो? महेंद्र -- कृपया ही इंग्रजी म्हण ध्यानात ठेवा -- तुमचा हात फिरवण्याचे स्वातंत्र्य त्या ठिकाणी संपते ज्या ठिकाणी माझे नाक सुरू होतं. भारतात राहून भारताला शिव्या देणारे मराठी लोकही मी पाहिले आहेत आणि अमेरिकन नागरिकत्व घेऊनही भारतातल्या छोट्या गावांत सुधारणा याव्या म्हणून धडपडणारे मराठी लोक पाहिले आहेत. कृपया सरसकट सगळ्यांना शिव्या देणं टाळा ही नम्र विनंती !

In reply to by संदीप चित्रे

=D> अगदी बरोबर बोललात तुम्ही संदीप.....

In reply to by महेंद्र (verified= न पडताळणी केलेला)

एका व्यक्तिचा राग सगळ्या अनिवासी भारतियांवर काढणे योग्य आहे का? अगदि परक करुन टाकलस कि आम्हा सगळ्यांना

परदेशवाशीयान्चा उद्देश भारताला नाव ठेवण्याचा मुळीच नसतो. भारतवाशीयान्कडे अपार बुध्दीमत्ता आहे. त्याचा उपयोग जर तिथे झाला तर आपल्या लोकान्ना , आपल्या मातीला सोडुन यायची कोणाला ईच्छा होईल हो तुम्हीच सान्गा. जे काही चान्गले आहे ते भारताने आपलेसे करावे असे वाट्ते.

In reply to by शुभान्गी

सहमत आहे मी.. फक्त आजच्या सकाळ मधल्या कॉमेंट्स वाचल्या आणि राग आला मला...

In reply to by शुभान्गी

त्याचा उपयोग जर तिथे झाला तर आपल्या लोकान्ना , आपल्या मातीला सोडुन यायची कोणाला ईच्छा होईल हो तुम्हीच सान्गा. प्रयत्न तरी केले जातात का? शिक्षण संपायच्या आधीच लोकांना परदेशात जायचे वेध लागले असतात. आणि भारतात उत्तम करियर असणारी / पैसा कमावणारी लोकं नाहियेत का? अरे सगळी हुशार मुलं 'इथे काय ठेवलंय?' म्हणून भारताल शिव्या घालून निघून गेली तर देशाने कुणाकडे पहायचं. ही हुशार, कर्तबगार तरूण हीच तर देशाची संपत्ती आहे. १ कोटी उच्चशिक्षीत भारतीय लोकं भारता बाहेर आहेत ही काय गम्मत आहे का? कशी होणार आपल्या देशाची प्रगती? सावरकरांचा अभिमान वाटतो पण 'जरी उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा, हा व्यर्थ भार विद्येचा' 'गुणसुमने मी वेचीयली ह्या भावे, की तिने सुगंधा घ्यावे' ह्यातली तळमळ नाही जाणवत. स्वत: पुढे बघायची दॄष्टीच पैसा आणि लाईफस्टाईलच्या हव्यासापायी गमावून बसल्याने इथे काय ठेवलंय असे प्रश्न पडतात. तुम्ही काय दिलंत तुमच्या देशाला हा प्रश्न विचारला की मात्र डोक्यात तिडीक जाते. असं का? तिथे स्वातंत्र्य दिवस साजरा केला जातं. मग भोंगळ देशप्रेमाचे उसासे टाकले जातात. एव्हढच प्रेम आहे देशाबद्दल तर या परत. करा भारताला सशक्त आणि समर्थ. थोडी वर्ष द्यावी लागतील आयुष्यातली पण बदल नक्कीच घडेल. स्वातंत्र्यसैनीक वरून पहात असतील तर त्यांना लाज वाटेल. ह्याचसाठी का आम्ही आयुष्य ओवाळून टाकलं देशावर की आमच्या मुलांनी देश वार्‍यावर सोडून दुसर्‍या देशाची प्रगती करून द्यावी. ह्या अशा कॄतघ्न लोकांसाठी आम्ही जिवाची होळी केली? अरेरे, आम्हीच मुर्ख. गांधी, सावरकर, चाफेकर बंधू हे पण ह्या अ भारतीय भारतीयांसारखे वागले असते तर? पुन्हा आधीचंच वाक्य - परदेशी स्थायीक झालेल्या भारतीय लोकांबद्दल माझ्या मनात तीळमात्रही आपलेपणा / आदर नाही. माझ्यासाठी एक सामान्य परदेशी नागरीक आणि ते सारखेच. नाही, त्याहूनही खाले. किमान तो परदेशी नागरीक स्वत:च्या देशात तर आहे.

In reply to by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)

"अरे सगळी हुशार मुलं 'इथे काय ठेवलंय?' म्हणून भारताल शिव्या घालून निघून गेली तर देशाने कुणाकडे पहायचं. ही हुशार, कर्तबगार तरूण हीच तर देशाची संपत्ती आहे. १ कोटी उच्चशिक्षीत भारतीय लोकं भारता बाहेर आहेत ही काय गम्मत आहे का? कशी होणार आपल्या देशाची प्रगती?" ही मंडळी भारतात $$ पाठवतातः इथे वाचा

In reply to by त्रास

ह्याचं उत्तर मूळ लेखात दिलंय तुम्ही लोकांनी इकडे पैसे गुंतवले ते मातृन्भुमीचे प्रेम म्हणुन नाही, तर फ्लरिशिंग शेअर मार्केट मुळे.. आणि हेच सत्य आहे. अमेरिकेत व्याजाचे दर २ ते ३ टक्के आहेत म्हणुन तुम्हाला भारत लागतो पैसे गुंतवायला. तुम्ही इथे पैसे पाठवता ते तुमच्या स्वार्थासाठी… उगीच मोठेपणा घेउ नका स्वतःकडे..

In reply to by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)

परदेशी करियर करने म्हणजे चोर दरोडेखोर बनल्यासारखे आहे का? तुम्ही इतके का हात धुउन मागे लागला आहात?

In reply to by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)

थोडं जपून बोला. काय आहे माहिती आहे का, अरे सगळी हुशार मुलं 'इथे काय ठेवलंय?' म्हणून भारताल शिव्या घालून निघून गेली तर देशाने कुणाकडे पहायचं. ही हुशार, कर्तबगार तरूण हीच तर देशाची संपत्ती आहे. १ कोटी उच्चशिक्षीत भारतीय लोकं भारता बाहेर आहेत ही काय गम्मत आहे का? कशी होणार आपल्या देशाची प्रगती? भारतात राहणारे तरी देशाच्या प्रगतीसाठी किती धडपडतात? आणि आम्ही भारतात रहात नाही म्हणून हा द्वेष की, काही वैयक्तिक आकस?? स्वातंत्र्यसैनीक वरून पहात असतील तर त्यांना लाज वाटेल. ह्याचसाठी का आम्ही आयुष्य ओवाळून टाकलं देशावर की आमच्या मुलांनी देश वार्‍यावर सोडून दुसर्‍या देशाची प्रगती करून द्यावी. ह्या अशा कॄतघ्न लोकांसाठी आम्ही जिवाची होळी केली? अरेरे, आम्हीच मुर्ख. गांधी, सावरकर, चाफेकर बंधू हे पण ह्या अ भारतीय भारतीयांसारखे वागले असते तर? किती दिवस आणखी आपण आपल्या स्वातंत्र्यवीरांच्या आहुतीचं भांडवल करणार?? आणि आता भांडवल करून, देशाची किती प्रगती साध्य होणार?? प्रगती प्रगती म्हणतात ती इतिहास उगळून होत नाही हे कटू असलं तरी सत्य आहे. आता भारतात जे चालू आहे, जी काहि लोकशाही ची वीटंबना चालू आहे ती बघून सावरकर, चाफेकर बंधू यांच्यापैकी कोणीही शाबासकी देणार नाही हे निश्चित. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

भारतात राहणारे तरी देशाच्या प्रगतीसाठी किती धडपडतात? ह्यावर वैयक्तीक स्वार्थासाठी देशाला वार्‍यावर सोडून गेलेल्या लोकांनी प्रतिक्रीया न देणे उत्तम. ज्या गावाला जायचेच नाही त्याच्या चौकशा कशाला? आणि आम्ही भारतात रहात नाही म्हणून हा द्वेष की, काही वैयक्तिक आकस?? देश माझा आहे. त्यामुळे इथे शिकून वैयक्तीक स्वार्थासाठी दुसर्‍या देशाची तुंबडी भरण्यात धन्य मानणार्‍या सगळ्यांबद्दल वैयक्तीक आकस आहे. किती दिवस आणखी आपण आपल्या स्वातंत्र्यवीरांच्या आहुतीचं भांडवल करणार?? भांडवल नाही जाणीव करून द्यायचा प्रयत्न आहे. आता भारतात जे चालू आहे, जी काहि लोकशाही ची वीटंबना चालू आहे ती बघून सावरकर, चाफेकर बंधू यांच्यापैकी कोणीही शाबासकी देणार नाही हे निश्चित. हे वाक्य तिथे राहून बोलण्याला काहीही अर्थ नाहिये. आम्ही स्वत:च्या इच्छेने इथे रहातो आणि देशाला आमच्या परीने योगदान देण्याचा प्रयत्नही करतो. इथल्या राकजारण / संधी इत्यादींवर टिका करणारी लोकं तिथलं समाज जीवन, संस्कॄती ह्यांवर टिका करतात. भारताला आपले मानले नाहीतच, किमान जिथे जाता तिथे तरी एकनिष्ठ रहा ही विनंती.

In reply to by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)

हे वाक्य तिथे राहून बोलण्याला काहीही अर्थ नाहिये. आम्ही स्वत:च्या इच्छेने इथे रहातो आणि देशाला आमच्या परीने योगदान देण्याचा प्रयत्नही करतो. हे वाक्य अमेरिकाच आणि पुणंच काय पण बंगळुरू आणि आय.एस.एस. (इंटरनॅशनल स्पेस स्टेशन)वरूनही बोललं तरी अयोग्य ठरणार नाही. अदिती

In reply to by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)

भारताला आपले मानले नाहीतच, किमान जिथे जाता तिथे तरी एकनिष्ठ रहा ही विनंती. सोयिस्कर गैरसमज... - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

गैरसमज कशा बाबतीत भारताला आपले मानले मानणे की जिथे जातो तिथे एकनिष्ठ रहायची अपेक्षा करणे?

In reply to by प्राजु

आणि आम्ही भारतात रहात नाही म्हणून हा द्वेष की, काही वैयक्तिक आकस?? हे म्हणजे स्वतःच स्वतः साठी टाळ्या वाजवल्या सारखे आहे

In reply to by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)

प्रत्येकाच्या बाबतीत प्रकार निराळा असतो. आपण म्हणता तसे अमेरिकेत जायची क्रेझ असलेले लोक असतातच. पण...
अरे सगळी हुशार मुलं 'इथे काय ठेवलंय?' म्हणून भारताल शिव्या घालून निघून गेली तर देशाने कुणाकडे पहायचं. ही हुशार, कर्तबगार तरूण हीच तर देशाची संपत्ती आहे. १ कोटी उच्चशिक्षीत भारतीय लोकं भारता बाहेर आहेत ही काय गम्मत आहे का? कशी होणार आपल्या देशाची प्रगती?
मी भारतात असताना माझ्या उच्च शिक्षणाच्या संधी आटल्या होत्या आणि अदिती म्हणाली तसे शेंगदाणे हातावर मिळत होते. बाहेर आल्यावर उच्चशिक्षण घेणे शक्य झाले आणि त्यामुळे एकदम ब्रेन ड्रेन झाले ! :) (माझी स्थिती प्रातिनिधिक असू शकते म्हणून लिहिले.) बाकी 'बाहेर' जाऊन जीवन सार्थकी लागल्याचा आनंद होणारे अनेक पाहिले आहेत.. त्यामुळे वरील पैकी अनेक मुद्द्यांशी सहमतच आहे. -- लिखाळ.

In reply to by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)

काढून टाकलं! लईच पर्सनल झालं होतं!! पण तुला माझ्या मनातला उद्वेग समजला असेल अशी आशा आहे ऍडी!! कुठल्याही प्रश्नाचं असं जनरलायजेशन फारच चुकीचं असतं. चतुरंग

In reply to by चतुरंग

तुम्ही वयाने मोठे असल्याने मनातलं उत्तर देत नाहिये.

In reply to by चतुरंग

चला एक काथ्याकूटच टाकते, देशी बनावटीच्या ब्राण्डेड दारू, सिगारेट्स, बाईक्स कोणत्या ते! पुढच्या वेळी सगळ्यांना संदर्भ म्हणून उपयोगी पडेल! मला काही वेळ नव्हता, पाच-सहा वर्ष पीएच.डी. करायला, महिन्याला ८ हजार मिळवत, मग गेले सरळ परदेशात, तीन वर्षात मिळवली पदवी, सहा महिने बसून खाता येईल एवढं जमवलं आणि मग नोकरी मिळाल्याचं समजलं. खूप आनंद झाला. मग तीन महिने वाट पाहिली कधी हातात 'पत्र' येईल. नाहीच आलं, मग जाऊन ठिय्या दिला आणि तिकडे आठ दिवस बिनपगारी काम केलं, तेव्हा कुठे पत्र मिळालं. महिन्याला आठ हजार (आता बारा हजार जास्तीत जास्त) कमावून हे किती लोकांना शक्य झालं असतं हो ऍडीभौ? अदिती

In reply to by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)

पुन्हा आधीचंच वाक्य - परदेशी स्थायीक झालेल्या भारतीय लोकांबद्दल माझ्या मनात तीळमात्रही आपलेपणा / आदर नाही. सख्ख्या आईला सोडुन सावत्र आईचे गुणगान गाणार्‍या बद्दल आपलेपणा / आदर असण्याचे काहीच कारण नाही.

In reply to by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)

आदी, एकांगी बोलतोयस. एकच बाजू. परदेशात सेटल होण्याचे समर्थन मी करत नाही. करणारही नाही. असा निर्णय मी कधी घेणार नाही पण तिथे राहण्यातले 'पर्क्स' मला माहीती आहेत आणि त्यासाठी कोणी निर्णय घेतला तसा तर त्याला दूषणं देण्यात अर्थ नाही. माणूस आहे आणि त्याला आपल्या आयुष्याचे निर्णय घेण्याचा अधिकार आहे आणि त्यावर भाष्य करायचा आपला अधिकार नाही. पण बाहेर स्थायिक झालेला माणूस देशद्रोही आणि अजून काय काय असतो इतक्या उथळपणे हे पाह्यलं जाउ नये. पण एक आहे की ३५ एक वर्षांपूर्वी जे तिथे स्थायिक झाले त्यांच्या डोक्यात एक गिल्ट निश्चितच आहे. पैसा, समृद्धी, लाइफस्टाइल यासाठी आम्ही हे आयुष्य पत्करले इतकं सरळपणे ते सांगू शकत नाहीत. त्यासाठी मग ते भारताची सिस्टीम इत्यादी कारणे देतात. गिल्ट लपवायला भारताला नावे ठेवू लागतात. त्यांची मुले त्यावरच वाढतात आणि संधी मिळाली की भारतावर टिका सुरू करतात. अशी उदाहरणं खूप पाह्यली मी. अर्थात अपवाद होतेच. पण त्यामानाने गेल्या १०-१५ वर्षात तिथे गेलेले लोक प्रामाणिक म्हणायला हवेत. ते सरळ सरळ मान्य करतात की याच कष्टात भारतात जे मिळालं असतं त्याच्या कैकपटीने इथे मिळतंय. म्हणून आम्ही इथे रहातो. असो... - नी http://saaneedhapa.googlepages.com/home

In reply to by नीधप

माणूस आहे आणि त्याला आपल्या आयुष्याचे निर्णय घेण्याचा अधिकार आहे आणि त्यावर भाष्य करायचा आपला अधिकार नाही. पण बाहेर स्थायिक झालेला माणूस देशद्रोही आणि अजून काय काय असतो इतक्या उथळपणे हे पाह्यलं जाउ नये. इतक्या उथळपणे पहात नाहिये गं. मला राग अशांचा येतो की जे तिथे जाऊन भारताला शिव्या घालतात. तुम्ही देश वार्‍यावर सोडून संघर्ष न करता बुडाला पाय लाऊन पाळालात ना? मग तुम्हाला काय अधिकार इथे काय चाललंय त्यावर भाष्य करायचा. देश सुधरावा म्हणून तुम्ही काहीच प्रयत्न केले नाहीत मग आता आम्हाला अक्कल शिकवू नका की इथे काय ठेवलंय. म्हणून मी स्वातंत्र्यसैनीकांच उदाहरण दिलं. किती पिढ्यांनी त्याग केला आपल्या पुढच्या पिढीला स्वतंत्र देशात श्वास घ्यायला मिळावा म्हणून. त्याच्या ०.००००१% जरी आपण प्रत्येकाने करायचं ठरवलं तर देश सुधारणार नाही का? परिस्थीती इतकी वाईट झाली आपल्यामुळेच ना?

In reply to by नीधप

पण एक आहे की ३५ एक वर्षांपूर्वी जे तिथे स्थायिक झाले त्यांच्या डोक्यात एक गिल्ट निश्चितच आहे. पैसा, समृद्धी, लाइफस्टाइल यासाठी आम्ही हे आयुष्य पत्करले इतकं सरळपणे ते सांगू शकत नाहीत. त्यासाठी मग ते भारताची सिस्टीम इत्यादी कारणे देतात. गिल्ट लपवायला भारताला नावे ठेवू लागतात. त्यांची मुले त्यावरच वाढतात आणि संधी मिळाली की भारतावर टिका सुरू करतात. अशी उदाहरणं खूप पाह्यली मी. अर्थात अपवाद होतेच. साफ चूक. मी अमेरिकेत गेली १२ वर्षे रहातो आहे (१-२ वर्षे नाही). या १२ वर्षात मी असंख्य लोकांना भेटलो कि जे ईथे १९६०-७० च्या दशकात आले. ते लोक आनंदाने भारतात जातात. त्यांच्या पुण्या-मुंबई मधल्या घरात १-२ महिने रहातात. पुतण्या/भाचे यांच्या कार्यात आनंदाने भाग घेतात. पण मला कोणीही भारताबद्दल नाराजीचा सूर काढताना किंवा सिस्टीमला नावं ठेवताना दिसला नाही. अगदी त्यांची मुलं/मुली अगदी अमेरिकन जावई सुध्दा. मा़झ्या ओळखीची एक व्यक्ती आहे. ते ईथे १९६३ साली आलेत. सध्या बे एरियातील एका मोठ्या कंपनी साठी काम करतात, पण त्यांनी मुद्दामून २ वर्षांसाठी बेंगलोरचे पोस्टींग मागून घेतले. मी विचारल्यावर म्हणाले "अरे मला ईतका अनूभव मिळाला आहे की आपल्या भारतातल्या लोकांना त्याचा उपयोग नको का व्हायला? प्रत्येक ईंजीनियर काही अमेरिकेत येणार नाही त्या पेक्षा मीच तिकडे जातो आणि त्यांना काही माझ्या ज्ञानाचा, अनूभवाचा फायदा होतो का ते बघतो". सांगा मला यात कुठला गिल्ट दिसतो आणि कुठे भारतावर टिका केलेली दिसते. हे एकच नाही तर असे अनेक लोकांना मी खुप जवळुन ओळखतो. तेव्हा त्यांच्या डोक्यात एक गिल्ट निश्चितच आहे हे विधान जरा जपून करा. वुडहाऊसला दुसर्‍या महायुध्दानंतर विचारले, "प्लम तुला जर्मनांचा तिटकारा नाही येतं?" त्यावर वुडहाऊस म्हणाला 'I don't hate in plural.". - नाटक्या

In reply to by नाटक्या

>>मी अमेरिकेत गेली १२ वर्षे रहातो आहे (१-२ वर्षे नाही). >>तेव्हा त्यांच्या डोक्यात एक गिल्ट निश्चितच आहे हे विधान जरा जपून करा. मी पाहिलेल्या उदाहरणांवरून हे वाक्य मी बोलते आहे. माझ्या संपर्कातल्या अनेक व्यकींना सुद्धा हाच अनुभव आहे. आपण ह्या सगळ्यांचा अनुभव खोटा आहे असं म्हणताय का? तुम्ही १२ वर्षे आहात हे सांगायची काहीच गरज आहे असं वाटत नाही. तुम्ही नक्की काय सांगू पाहताय या वाक्यातून? 'विधान जपून करा' 'साफ चूक' इत्यादी शब्दांची जरूर नाही. नीट बोला. - नी http://saaneedhapa.googlepages.com/home

In reply to by नीधप

तुम्ही १२ वर्षे आहात हे सांगायची काहीच गरज आहे असं वाटत नाही. तुम्ही नक्की काय सांगू पाहताय या वाक्यातून? मला यातून फक्त एव्हढेच म्हणायचे आहे कि मी अर्ध्या हळकुंडाने पिवळा (डांबीस नाही) नाही झालो. माझ्या पहाण्यात अनेक जण आहेत की जे अमेरिकेत २-३ महिन्यांसाठी येतात आणि असली विधानं करतात. मी पाहिलेल्या उदाहरणांवरून हे वाक्य मी बोलते आहे. माझ्या संपर्कातल्या अनेक व्यकींना सुद्धा हाच अनुभव आहे. आपण ह्या सगळ्यांचा अनुभव खोटा आहे असं म्हणताय का? तुमचा अनुभव खोटा आहे असे मला म्हणायचे नाही पण 'निश्चीतच आहे' असे generalized statement करण्याची देखील काही आवश्यकता नाही. 'विधान जपून करा' 'साफ चूक' इत्यादी शब्दांची जरूर नाही. नीट बोला. 'विधान जपून करा' यात काही चुकले असे मला वाटत नाही. आणि जर 'साफ चूक' ह्या शब्दांची जरुरत नसेल तर 'नीट बोला' ची पण नसावी, नाही का?

In reply to by नाटक्या

>>मला यातून फक्त एव्हढेच म्हणायचे आहे कि मी अर्ध्या हळकुंडाने पिवळा (डांबीस नाही) नाही झालो. माझ्या पहाण्यात अनेक जण आहेत की जे अमेरिकेत २-३ महिन्यांसाठी येतात आणि असली विधानं करतात. मग त्यांना बोला. मी ३ वर्षे शिक्षणासाठी होते. आणि मी पण भरपूर उदाहरणं पाह्यली आहेत. >>तुमचा अनुभव खोटा आहे असे मला म्हणायचे नाही पण 'निश्चीतच आहे' असे generalized statement करण्याची देखील काही आवश्यकता नाही. साफ चूक असे generalized statement तुमचेच आहे ना? मी उदाहरणे पाह्यली असतानाही असं नाहीच आहे असं धडधडीतपणे तुम्ही कसं म्हणू शकता. आणि मला generalized statement बद्दल सांगताना तुम्ही 'अपवाद असणारच आहेत' या वाक्याकडे दुर्लक्ष करताय त्याचं काय? >>'विधान जपून करा' यात काही चुकले असे मला वाटत नाही. आणि जर 'साफ चूक' ह्या शब्दांची जरुरत नसेल तर 'नीट बोला' ची पण नसावी, नाही का? तुम्हाला चुकले वाटत नाही तर मलाही माझे काही चुकले वाटायला नको. 'विधान जपून करा!' हा उपदेश आणि 'साफ चूक' असं विधान हे तुम्ही म्हणता तेच योग्य आणि बाकीच्यांचे अनुभव खोटे अश्या तुमच्या स्टान्सचे वाटते. तेव्हा त्याची प्रतिक्रिया 'नीट बोला' अशीच येणार हे लक्षात ठेवा. - नी http://saaneedhapa.googlepages.com/home