मराठी अमेरिकन्स ..

महेंद्र's picture
महेंद्र in काथ्याकूट
18 Feb 2009 - 7:20 pm
गाभा: 

आजकाल भारताबाहेर राहुन , इतर देशाचे नागरिकत्व घेउन त्यांची भाट गिरी करित आणि भारतात रहाणाऱ्या लोकांना तसेच, इथल्या सिस्टिम ला नांवे ठेवणे हे एक फॅशन स्टेटमेंट झाले आहे.
त्यातल्या त्यात, अमेरिकेची सिटीझनशिप मिळाली की मग तर आभाळालाच हात पोहोचले , आणि मग तर त्या लोकांना सगळ्या भारतियांना ज्ञान शिकवण्याचा परवाना मिळाला आहे असे वाटते.

ह्या भारतिय नागरिक नसलेल्या , पण मराठी बोलणाऱ्या अमेरिकन्स च्या ’अक्कल शिकवण्याच्या वागणुकीची भारताला गरज आहे कां?
इथल्या ज्या राजनैतिक नेत्यांची जे खिल्ली उडवतात, त्याच नेत्यांना हार्वर्ड ला लेक्चर द्यायला बोलवतात. इथल्या डबे वाल्या कडुन सिक्स सिग्मा बद्दल शिकण्याचे प्रयत्न करतात... ...
ही गोष्ट साधारणतः एखाद्या डिस्कशन ग्रुप मधे, नेट वर, किंवा एखाद्या लेखाच्या रिस्पॉन्स वर दिसुन येते..

हिच गोष्ट आज बघितली इ सकाळच्या साइटवर..आणि मला खुप इन्सल्टींग वाटलं..
त्यामुळेच ’त्यांना’ म्हणजे मराठी बोलणाऱ्या अमेरिकन्स ना सांगावंस वाटलं.. ते इथे आहे.... वाचा

हे लेखन कोणाच्या विरुध्द व्यक्तिशः लिहिलेले नाही .. त्यांच्या जनरल टेंडन्सी बद्दल लिहिलंय..

प्रतिक्रिया

llपुण्याचे पेशवेll's picture

18 Feb 2009 - 7:27 pm | llपुण्याचे पेशवेll

जशी आजकाल भारतात न राहता परदेशात राहून भारताला शिव्या घालायची जशी फॅशन आहे तशीच फॅशन भारतातही आली आहे. परदेशात राहणार्‍या लोकाना शिव्या घालायची. मग तो माणूस बरोबर जरी बोलत असेल तरी परदेशात राहतो ना मग त्याला घाला शिव्या मग तो भले बरोबरही बोलत असेनाका.

पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

प्राजु's picture

18 Feb 2009 - 7:33 pm | प्राजु

पेशवे भाऊ.. सहम्त आहे १००%

महेंद्र साहेब, आपण स्लम डोग मिलिनेर पाहिला का हो?
तो पाहून इथल्या अमेरिकनांनी विचारलेले प्रश्न जर तुम्हाला सांगितले तर्..अमेरिकेत राहणार्‍या मराठी लोकांबद्दल असं बोलणार नाही तुम्ही,

जयहिंद!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

किट्टु's picture

18 Feb 2009 - 7:42 pm | किट्टु

अगदी बरोबर बोललीस तु प्राजु... मी इथे या 'ड्च' लोकांना तो 'पिक्चर' पाहुन काय काय उत्तर दिली आहे मलाच माझं माहित..

महेंद्र's picture

18 Feb 2009 - 8:37 pm | महेंद्र

मला पण हेच म्हणायचं आहे , शेवटी गोरी कातडी ही आपल्या वाईट गोष्टीच दाखवुन पैसा कमावणार ना. डॅनी बॉयल हा ब्रिटीश. ति फिल्म ब्रिटिश...
अशाच गोष्टी दाखवणे गरजेचे होते कां? ह्याचं उत्तर आधी द्या मला...
अमेरिकेत रहाणारे आणि सकाळव्या वेब साईट्वर अकलेचे तारे तोडणार्यांविषयी मी लिहिलंय.. पुन्हा एकदा सांगतो.. प्लिज पर्सनली घेउ नका...

किट्टु's picture

18 Feb 2009 - 7:39 pm | किट्टु

अगदी १०००००% सहमत...

महेंद्र सर, काय असतना जेव्हा माणुस हा बाहेरची दुनिया बघतो, तेव्हा तिथल्या चांगल्या गोष्टी आपल्या इथे पण असाव्या असा विचार करतो आणि बोलुन दाखवतो. पण आपले लोकं त्याचीच 'अक्कल' काढतात आणि वरुन बोलायला मोकळी असतात.. 'याच काय जातय...'

महेंद्र's picture

18 Feb 2009 - 8:34 pm | महेंद्र

बाहेरची दुनिया मी पण बघितली आहे.
म्हणुन काही भारतियांना नावे ठेवण्याचा परवाना मिळत नाही. जे चांगलं आहे ते आहे, पण एकदा मुंबईला विमान लँड झालं की गम खाउन कागद चुरगाळुन खाली फेकणारे ( समोरच डस्ट बिन असतांना पण) आपणच....

टारझन's picture

19 Feb 2009 - 7:27 pm | टारझन

पण एकदा मुंबईला विमान लँड झालं की गम खाउन कागद चुरगाळुन खाली फेकणारे ( समोरच डस्ट बिन असतांना पण) आपणच....

ए कोण आहे रे तो ? पक्काआआड ... पक्काआआड ... कोण कचरा करतोय .. पकडा आणि महेंद्र साहेबांच्या ताब्यात द्या त्याला ... परदेशातुन येउन कचरा करतो म्हणजे काय .. आं ?

प्रश्ण : हे फक्त अमेरिका रिटर्ण लोकांसाठी आहे का बाकी कंट्रीत जाणार्‍या गावठींसाठीही आहे ?

(विमान लँडल्याबरोबर भारतीय जमीनीवर घाण करणारा) टारझन ...

महेंद्र's picture

18 Feb 2009 - 8:40 pm | महेंद्र

त्यात बरोबर काय बोलले आहेत ते?? म्हणे स्वाती दांडेकरांचा अभिमान आणि भारतिय नेत्यांची लाज वाटली पाहिजे..
अशा स्टेटमेंट्स्ची खरंच गरज आहे कां?
एक सांगा... जर उद्या काही कारणाने, जर अमेरिकन मराठी मुलं.. ३जी.. समजा मरिन्स मधे गेलीत, आणि जर कधी भारतावर अटॅक केला, तर ते भारतावर बॉंबिंग करतिलच नां?? त्यांचे हात कापतिल का बाँब टाकतांना.....मग ते भारतिय आहेत कां? नाही! मराठी बोलणारे अमेरिकन्स... हे माझं मत आहे . नथिंग पर्स्नल..

llपुण्याचे पेशवेll's picture

18 Feb 2009 - 9:53 pm | llपुण्याचे पेशवेll

त्यात चूक काय आहे.. आमचे सगळे नेते काही कारण नसताना हिंदीत बोलतात. आमचा मुख्यमंत्री सातार्‍याला सतारा म्हणतो, भांडारकर ला भंडारकर म्हणतो तेव्हा मला त्याची लाज वाटते. हा कसला मराठी.

पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

सुक्या's picture

18 Feb 2009 - 10:41 pm | सुक्या

अगदी सहमत.

सुक्या (बोंबील)
चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.

ऍडीजोशी's picture

18 Feb 2009 - 7:59 pm | ऍडीजोशी (not verified)

कायमचे परदेशी रहायला गेलेले लोक भारतीयच नव्हेत. का त्यांच्या विषयी बोलून वेळ वाया घालवायचा. जे परदेशात राहून करता येतं तेच थोडे अधीक कष्ट घेऊन भारतातही करता येतं. हे टाटा, अंबानी, घैसास आणि अनेक लोकांनी सिद्ध केलं आहे.

मायभूमीला फाट्यावर मारलतंच, पण मग जिथे जाता तिथली संस्कॄती तरी क्रुतज्ञेपोटी आपलीशी करा. तिथे राहून इथले गोडवे आणि राष्ट्रप्रेमाचे उमाळे आणू नका. मुलं मोठी होऊ लागल्यावर आजूबाजूचं वातावरण बघून आपला (?) भारतच बरा असाही साक्षात्कार काही लोकांना होतो. एकत्र कुटूंब पद्धतीचं महत्व पटू लागतं. मग येतात इकडे. आणि वर इथे आल्यावर भारतावर उपकार केल्यासारखे वागतात. तिकडे तसं नसतं, सतरा वेळा ऐकायला लागतं.

बाबांनो, तुम्ही आहात तिकडे सुखी रहा. भारत तुमच्या शिवाय आत्तापर्यंत चाललाय आणि या पुढेही चालेल.

सरकारनी चालवलेल्या उत्तमोत्तम कॉलेजेस मधून स्वस्तात शिकून समाजाला त्याचा काडीचाही फायदा न करून देता परदेशी उडणार्‍यांना तर हंटर मारले पाहिजेत.

अवांतर: ह्या धाग्याला पण लवकरच कुलूप लागणार :)

संदीप चित्रे's picture

18 Feb 2009 - 9:04 pm | संदीप चित्रे

>> जे परदेशात राहून करता येतं तेच थोडे अधीक कष्ट घेऊन भारतातही करता येतं. हे टाटा, अंबानी, घैसास आणि अनेक लोकांनी सिद्ध केलं आहे.
शंभर कोटीच्या देशात फक्त हाताच्या बोटावर मोजता येणारे टाटा, अंबानी, घैसास आणि अनेक?
तुला खरंच असं वाटतं की फक्त थोडे अधिक कष्ट केल्याने परदेशात राहून करता येतं तेच इथे करता येतं?
---------
कृपया 'हंटरने मारले पाहिजे' वगैरे भाषा वापरू नकोस. 'हंटरने मारण्या योग्य' लोक तुला भारतातही पाहिजे तितके मिळतील.

ऍडीजोशी's picture

18 Feb 2009 - 9:10 pm | ऍडीजोशी (not verified)

टाटा अंबानी घैसास ही अतीश्रीमंतांची उदाहरणं झाली. लाखानी पगार घेणारे अनेक माझ्या ओळखीत आहेत, आजूबाजूला आहेत.

कृपया 'हंटरने मारले पाहिजे' वगैरे भाषा वापरू नकोस.
मग ह्या कॄतघ्नतेबद्दल जाण्याआधी त्यांना सुवासिनींकडून ओवाळायचं का?

'हंटरने मारण्या योग्य' लोक तुला भारतातही पाहिजे तितके मिळतील.
विषय काय, बोलताय काय.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

18 Feb 2009 - 9:16 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

टाटा अंबानी घैसास ही अतीश्रीमंतांची उदाहरणं झाली. लाखानी पगार घेणारे अनेक माझ्या ओळखीत आहेत, आजूबाजूला आहेत.

किती उदाहरणं देऊ, भारतातल्या संशोधन संस्थांमधे, पात्रता असताना, फक्त कोणी गॉडफादर नाहीत म्हणून, कधी 'चुकीचा' गॉडफादर आहे म्हणून अनेक हुशार लोकांना संधी न मिळाल्याची?
किती उदाहरणं देऊ की जे परदेशातल्या लॅब्जमधे कामं करून आलेले लोकं आय.आय.टी.मधे लोकं संशोधन करत नाहीत, लॅब्ज विकसित करत नाहीत म्हणून सडून आहेत?
किती उदाहरणं देऊ जे हुशार लोकं इथल्या संशोधन संस्थांमधल्या राजकारणाला कंटाळतात आणि बुद्धीचा वापर करायला बाहेर जातात?
किती घरातून आलेले हुशार विद्यार्थी दाखवू जे लोकं पीएच.डी. आणि पोस्ट-डॉक्सना तुटपुंजा पगार मिळतो आणि परदेशात जाऊन आल्याशिवाय इथे कायमस्वरुपी नोकरी मिळत नाही म्हणून देशाबाहेर जातात?

अर्थात, मी या क्षेत्रात आहे म्हणून या क्षेत्रातलं बोलते. अब्दुल कलामांचं वाक्य आहे, "If you pay them peanuts, you'll get monkeys"; माणसं जातात युरोप, अमेरिकेत कामाला!

अदिती

माझा स्वतःचा सख्खा मित्र तो पॉवरसप्लाईज डिझाईन करतो. ज्याने १५ वर्ष स्वतःची कंपनी पुण्यात चालवली. अनेक उत्तमोत्तम परदेशी पॉवर सप्लाईज डिझाईन्सला पर्याय म्हणून त्याने भारतीय बनावटीची तितकीच ताकदवान डिझाईन्स पुरवली, ज्याने तयार केलेला मिलिटरी ग्रेड सप्लाय आपल्या 'अर्जुन' रणगाड्यामधे वापरला जातो, त्या माझ्या मित्राने सर्व ठिकाणी चालणारी लाचखोरी, भ्रष्टाचार, दप्तरदिरंगाई, टॅक्सचे अनंत प्रॉब्लेम्स, कर्ज मिळण्यातली कागदपत्रांची मारामारी ह्याला कंटाळून चांगला चालणारा धंदा, जो पंधरा इंजिनियर्सना रोजगार देत होता, तो बंद केला आणि आता तो फिलिपाईन्स, मनिला मधे गेलाय. त्याला काय प्रचंड यातना झाल्या असतील कल्पना आहे हे सगळं बंद करताना?
मला आहे. कारण दहा वर्षांपूर्वी मीही माझा चांगला चालणारा धंदा बंद केला होता आणि नोकरीची वाट पकडली होती.

कुठेही परदेशात जाण्यासाठी मी प्रयत्न केलेले नाहीत, ते माझं स्वप्न कधीच नव्हतं, हे सांगूनही खरं वाटणार नाही. माझ्या कामाने मला कंपनीनेच आपसूक इकडे आणलं आणि मला वेगवेगळी कामाची दालनं उघडी झाली. ह्यात मला माझा मोठेपणा सांगायचा नाहीये, तर माझ्यासारखे अनेक लोक आहेत की जे असे आलेले असतील.

ऍडी जोशी साहेब, बोलणं आणि दोष देणं फार सोपं असतं, त्यात राहून तुम्ही आतून बाहेरुन जळालात ना की तुम्हाला कळतं खरं दु:ख काय आहे!!

चतुरंग

ता. क. एक अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली की माझ्या ह्या मित्राकडे आयायटीची डीग्री नाहीये तो ज्ञानेश्वर विद्यापीठातून सेकंड क्लासमधे पास झालाय. पण पुण्यातल्या एका अतिशय मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स कंपनीच्या मालकाने त्याच्या कंपनीत ह्याच्यासाठी चीफ डिझायनरची पोस्ट राखीव ठेवली आहे त्याला हे सांगून "की बाबारे, कधीही तुला परत यावसं वाटलं तर ह्या पोस्टची खुर्ची तुझ्यासाठी हजर आहे!" टलेंटची कदर असणे आणि नसणे ही एकच गोष्ट हा सगळ्या प्रश्नाचं मूळ आहे!

नाटक्या's picture

18 Feb 2009 - 9:42 pm | नाटक्या

रंगा,

मी स्वतः यातून गेलो आहे. मला काय त्रास झाला (आणि दिला) हा माझा मलाच ठावूक.

- नाटक्या

त्रास's picture

18 Feb 2009 - 9:49 pm | त्रास

तो मालदिवचा अध्यक्ष करतोय तसे आपण केले पाहिजे, ज्यांना इथल्या भ्रष्ट समाजाचा वीट आलाय त्यांनी ऑस्ट्रेलियासारख्या एखाद्या देशातील प्रचंड जमीनीतील काही लाख हेक्टर जमीन विकत घेउन नवा भारत विकसीत केला पहिजे. राहुदे इथे ज्यांना रहायचे आहे त्यांना कायमचे.

त्रास's picture

18 Feb 2009 - 9:52 pm | त्रास

वो ३_१४ व्यस्त अदिती बाई, आता घेतली आहे बरका तुमची बाजू. नाहीतर वरडाल आमच्यावर परत.

ऍडीजोशी's picture

18 Feb 2009 - 9:54 pm | ऍडीजोशी (not verified)

लाचखोरी, भ्रष्टाचार, दप्तरदिरंगाई,

अहो ह्यातून मी सुद्धा गेलो आहे. माझी बाईक चोरीला गेल्यावर ह्या सगळ्याच्या प्रत्येक स्टेज वर अनूभव घेतला. पण १ पैशाची लाच देणार नाही हा निर्धार केला होता. भ्रष्टाचार आवडत नाही मग कितीही त्रास झाला तरी त्याला हातभार लावायचा नाही ह्या मतावर ठाम होतो होता. १०-१२ दिवस रोज ३-४ तास पोलीस स्टेशन मधे बसून असायचो. ऑफीसला पोचायला उशीर व्हायचा म्हणून राती २-३ वाजेपर्यंत थांबून काम पूर्ण करायचो. सकाळी पुन्हा पोलीस स्टेशन. शेवट पर्यंत माझं मत ठणकाऊन सांगत होतो. शेवटी लाच न देता काम झालं तिथे माझं. उगाच बोलत नाही. ह्यावर सगळ्यांना हे शक्य नसतं असं मत मांडलं जाऊ शकतं, पण जे शक्य आहे ते तर करा.

माझ्यावर व्यवसाय बंद करण्याइतका गंभीर प्रसंग ओढवला नाहिये, पण जे आलं त्याला तोंड दिलं आहे. काम लवकर व्हावं म्हणून स्वत: १०० रुपये द्यायचे आणि मग भ्रष्टाचार भ्रष्टाचार म्हणून बोंब मारायची ह्याला काही अर्थ नाही. तो होऊ नये म्हणून आपण काय करतो ह्याचा कधी विचार करणार आपण.

ह्या लांडग्यांच्या हाती देशाला सोपवणार का लचके तोडायला?

कुठेही परदेशात जाण्यासाठी मी प्रयत्न केलेले नाहीत, ते माझं स्वप्न कधीच नव्हतं, हे सांगूनही खरं वाटणार नाही.
विश्वास आहे.

नीधप's picture

19 Feb 2009 - 7:46 am | नीधप

तुमच्या उदाहरणाबद्दल वाद नाही पण ही अशी उदाहरणे सांगून अमेरीकेत शिक्षण झाल्यानंतर त्या माणसाला परत जाण्यापासून परावृत्त करायला बघणारे ९९% लोक असतात. अतिशय विचित्र पद्धतीचं असतं हे ब्रेनवॉशिंग. मी घेतलाय अनुभव.
माझ्या पहिल्या वर्षापासून 'तू तुझं टॅलेन्ट वाया घालवणार आहेस.' ते 'जाशील नी परत येशील!' पर्यंत आणि अजून काय काय.. हे मी ऐकलंय. बोलणारे लोक कुणी आगंतुक नसतात. ज्यांच्याकडे परक्या देशात विश्वासाने बघावं अशी काका, मामा मंडळी, त्यांचे मित्र असे सगळे 'आपले' म्हणावेत असे लोक असतात. नाही म्हणलं तरी परिणाम होतोच. आपल्याच निर्णयांबद्दल साशंकता होतेच निर्माण. मला खूप त्रास झाला होता. त्यापायी शिकल्यानंतर एक वर्ष जॉब करायचा ठरवला होता. पण जॉब मिळाल्याचा फोन आला आणि त्या बाईंशी बोलताना निर्णय झाला अन त्यांना मी चालले परत सांगून टाकलं. चालू होता तो २ महिन्याचा जॉब पूर्ण करून मी परत आले.
निदान किमान प्रत्येक परत जाउ इच्छिणार्‍या विद्यार्थ्याचं मनोधैर्य खच्ची न करणं एवढं तरी पाळू शकता की नाही?
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

मराठी_माणूस's picture

19 Feb 2009 - 8:02 am | मराठी_माणूस

अमेरीकेत शिक्षण झाल्यानंतर त्या माणसाला परत जाण्यापासून परावृत्त करायला बघणारे ९९% लोक असतात

ते तसे करणारच , त्यांना त्यांचा कळप वाढवणे गरजेचे असते. आमच्या सारखे कितितरी आहेत असे स्पष्टीकरण ते मग देउ शकतात

विकास's picture

19 Feb 2009 - 8:26 am | विकास

अशी माणसे असतात ही वस्तुस्थिती आहे. मात्र ९९% आहेत असे मात्र मला वाटत नाही. जर कुणी परत भारतात जाणार म्हणले तर ८-१० वर्षांपुर्वीपर्यंत अगदी नक्की विरोधात ऐकायला येयचे.

कुठेतरी याचे कारण स्वतःच्या येथे राहण्याचे जस्टीफिकेशन असते. वास्तवीक तसे जस्टीफिकेशन का करावे हे कळत नाही. आपली माणसे भारतात सर्वत्र राहत असताना त्यांना ते त्यांच्या महाराष्ट्रातील घरात नाही याचे जस्टीफिकेशन करावेसे वाटते का? अर्थातच नाही, मग ते अमेरिकेत असतानाच का करावे आणि का करायला लावावे? कोकणातला माणूस मुंबईत आणि देशाकडील विशेष करून पुण्यात येऊन राहतो. त्यांना असे इतरांना समजावून सांगावेसे वाटते का? अर्थातच नाही. आणि तसे करायला लागू पण नाही.

तसेच पहायला गेलात तर आजकालची माणसे अमेरिका-युरोप आणि इतरत्र हिंडतात, स्थायीक होतात पण ते पुर्वी इतके वाटेल तशी नावे ठेवतात असे वाटत नाही. किंबहूना आधीच्या पिढीपेक्षा कितीतरी पटीने अधिक ते भारतात मदत करू इच्छितात आणि करतात. तरी देखील एखादी गोष्ट खटकली आणि तसे स्पष्टपणे सांगितले तर राग येण्याचे कारण नाही, अर्थात जो पर्यंत सांगणार्‍याचा सूर हा अपमानकारक नाही तो पर्यंत, इतकेच म्हणावेसे वाटते.

मराठी_माणूस's picture

19 Feb 2009 - 11:33 am | मराठी_माणूस

तरी देखील एखादी गोष्ट खटकली आणि तसे स्पष्टपणे सांगितले तर राग येण्याचे कारण नाही,

आधी नव्हते का खटकत ? आणि स्पष्टपणे सांगताना "तिकडच्या" गोष्टींशी तुलना केली जाते , ती अधीक चीड आणणारी असते.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

19 Feb 2009 - 11:43 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

आधी नव्हते का खटकत ? आणि स्पष्टपणे सांगताना "तिकडच्या" गोष्टींशी तुलना केली जाते , ती अधीक चीड आणणारी असते.

बाहेर गेलं की डोळ्यांना लगेच दिसतं की बाहेर लोकं फार शिस्तप्रिय आहेत. कचरा फक्त कचरा-पेटीतच टाकतात, गाड्या चालवताना उगाच भोंगे वाजवत नाहीत, शिस्तीत आपल्या लेनमधून गाडी चालवतात, आपल्या वागण्याचा दुसर्‍याला त्रास होणार नाही याची खूप जास्त काळजी घेतात ...
दुसर्‍याचं चांगलं ते घ्या एवढं म्हटलं का एवढा राग यावा?

अलिकडेच बीबी-का-मकबरा पाहिला. तिथली अस्वच्छता, संडासांची अवस्था पाहिली आणि अगदी सहज मनात आलं, "ब्रिटीश लोकं त्यांच्या देशातले नुस्ती पडझड झालेले बंगले दाखवायचे वाजवून दहा-बारा पाऊंड घेतात पण चांगली खाणं-पिण्याची, संडासांची चांगली सोय पुरवतात, वास्तूंचं संवर्धन करतात; मग आपलं सरकार पाच-दहाच्या जागी पन्नास-शंभर रुपये घेऊन नीट स्वच्छता का राखू शकत नाही? जुन्या वास्तूंचं नीट संवर्धन का करू शकत नाही?"
खाण्याची सोय सगळीकडे होते, पण जाण्याचं काय हो? परदेशात फिरताना असा त्रासदायक अनुभव आला नाही, पण आता भारतात याच कारणासाठी फिरणं बंद होतं ना, तेव्हा खरोखर जीव जळतो.

अदिती

मराठी_माणूस's picture

19 Feb 2009 - 12:28 pm | मराठी_माणूस

दुसर्‍याचं चांगलं ते घ्या एवढं म्हटलं का एवढा राग यावा?

नुसतेच चांगले म्हणा ना , लगेच इथले कसे वाईट हे कशाला पाहीजे. दुसर्‍यांच्या चांगल्यामदध्ये आपला वाटा शुन्य पण इथले जे चुकीचे वाटत असेल त्यात अंशतः का होईना आपला वाटा आहे हे विसरु नये.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

19 Feb 2009 - 12:36 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

... आपला वाटा आहे हे विसरु नये.
म्हणूनच भारताबद्दल बोलतात ना, झिंबाव्बेमधली सुपर-हायपर चलनवाढ आणि नौरूमधलं बेसुमार खाणकाम याबद्दल बोलत नाहीत.
पण आपण भारतात रहाणारेच त्यांना परके करून टाकतो. :-(

अदिती

मराठी_माणूस's picture

19 Feb 2009 - 12:47 pm | मराठी_माणूस

पण आपण भारतात रहाणारेच त्यांना परके करून टाकतो

कारण खुप जण तसेच वागतात. ऑनसाईट वरुन आले की , सुरु , किती घाण, कीती धुळ, हातात बिसलेरी, ईत्यादी. परके न वाटतील तर नवलच.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

19 Feb 2009 - 12:54 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

कारण खुप जण तसेच वागतात. ऑनसाईट वरुन आले की , सुरु , किती घाण, कीती धुळ, हातात बिसलेरी, ईत्यादी. परके न वाटतील तर नवलच.

+१
पण (तुम्ही पाहिलेले) खूपजण आणि सगळेजण यांच्यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. आणि हे तुम्हाला मान्य नसेल तर या वादात माझ्याकडून हा शेवटचा प्रतिसाद.

किती घाण, किती धूळ म्हणत बिसलेरी पिणारे मी खूप कमी पाहिले आहेत. पाहिले आहेत ते इथे येऊन सार्वजनिक स्वच्छता आणि शिस्त याबाबतीत हळहळ व्यक्त करणारे, त्यासाठी आपल्याला जेवढं करता येईल तेवढं करणारे. सगळेच लोक जागरुक असतात असं नाही, तसं सगळेच लोक 'स्नॉब्ज'ही नसतात.

अदिती

मराठी_माणूस's picture

19 Feb 2009 - 12:59 pm | मराठी_माणूस

मी १००% असे म्हटले नाही. काहीच परीणाम न झालेले मी सुध्दा पाहीले आहेत , पण अगदी नगण्य.

टिउ's picture

19 Feb 2009 - 8:51 pm | टिउ

ऑनसाईट वरुन आल्यानंतर हातात बिसलेरी असेल तर ते लगेच परके झाले का? काय राव काहीही!

संदीप चित्रे's picture

18 Feb 2009 - 9:18 pm | संदीप चित्रे

>> लाखानी पगार घेणारे अनेक माझ्या ओळखीत आहेत, आजूबाजूला आहेत.
मोजकी क्षेत्रे आहेत रे पण ती....
खरी काळजी आहे ती पगारांमधली दरी रूंदावतीये ती.
--------
विषयही कळलाय आणि बोलणेही त्याला धरूनच आहे. नीट विचार केलास की पटेल :)

त्रास's picture

18 Feb 2009 - 8:23 pm | त्रास

थोडेसे टोकाचे मत वाटले.

मी तुमच्या काही मुद्द्यांशी सहमत आहे-
१. भारतात रहाणाऱ्या लोकांना नावे ठेवणे- ते जर तसे करत असतील तर
२. सगळ्या भारतियांना ज्ञान शिकवण्याचा परवाना मिळाला आहे असे वाटणे

काही मुद्द्यांशी असहमत आहे-
१. त्यातल्या त्यात, अमेरिकेची सिटीझनशिप मिळाली की मग तर आभाळालाच हात पोहोचले , आणि मग तर त्या लोकांना सगळ्या भारतियांना ज्ञान शिकवण्याचा परवाना मिळाला आहे असे वाटते.- असे किती जण करतात? भारताबाहेर १ कोटी भारतीय राहतात
२. आजकाल भारताबाहेर राहुन , इतर देशाचे नागरिकत्व घेउन त्यांची भाट गिरी करित आणि भारतात रहाणाऱ्या लोकांना तसेच, इथल्या सिस्टिम ला नांवे ठेवणे हे एक फॅशन स्टेटमेंट झाले आहे.भारत्तात राहून्ही खूप मंडळी हेच करत्तात. पेज ३ कल्चर बाबत आओपले काय मत आहे?

महेंद्र's picture

18 Feb 2009 - 8:31 pm | महेंद्र

कृपया पोस्ट पर्स्नलाइज्ड वे ने घेउ नका. सकाळ ची ति लिंक आहे अजुनही . ती वाचा. माझी बहिण पण आहे तिथेच.. तसेच बायकोचा भाउ पण आहेच..
ते सकाळवरचे पोस्ट वाचले, स्वाती दांडेकरांचे भाषण वाचले, आणि त्यावरच्या कॉमेंटस पण वाचल्या...
तुम्ही पण वाचा. जर तुमचे अजुनही भारतिय नागरिकत्व असेल तर नक्कीच राग येइल वाचुन आणि इन्सल्टेड पण वाटेल. तुम्हाला दांडेकरांची स्तुती करायची असेल तर जरुर करा पण् त्याच सोबत भारतियांवर कॉमेंट्स ची गरज नव्हती..

प्राजु's picture

18 Feb 2009 - 8:42 pm | प्राजु

त्यांचे भाषण ऐकून, आणि सकाळमध्ये आलेला लेख आणि त्यावरच्या कॉमेंट्स वाचून सरससकट भारता बाहेर राहणार्‍या लोकांबद्दल आपण वक्तव्य केलंत. स्पेसिफिकली..
"स्वाती दांडेकरांचे हे भाषण बरोबर आहे का? " अशा मथळ्याचा काथ्याकूट टाकायचा होतात.
आणि आता पर्सनली घेऊ नये असे सांगून काय उपयोग?

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

18 Feb 2009 - 8:46 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

ते सकाळवरचे पोस्ट वाचले, स्वाती दांडेकरांचे भाषण वाचले, आणि त्यावरच्या कॉमेंटस पण वाचल्या...
तुम्ही पण वाचा. जर तुमचे अजुनही भारतिय नागरिकत्व असेल तर नक्कीच राग येइल वाचुन आणि इन्सल्टेड पण वाटेल. तुम्हाला दांडेकरांची स्तुती करायची असेल तर जरुर करा पण् त्याच सोबत भारतियांवर कॉमेंट्स ची गरज नव्हती..

अहो, तुम्हाला जे 'इन्सल्टींग' (पक्षी: अपमानास्पद) वाटलं त्याचा एक दुवा तरी द्यायचात. तुमच्या अनुदिनीवरून वाचण्यापेक्षा मूळ ई-सकाळच्या बातमीचा दुवा जास्त परिणामकारक वाटला असता. (राग मानू नका, पण तुमच्या अनुदिनीवरचे फॉण्टस छान नाही वाटत आहेत, वाचायला त्रास होत आहे.)

आणि दुसरं एक स्वाती दांडेकर आणि त्यांना प्रतिक्रिया देणारे ९१ मराठी लोकं (यातही सगळे 'परदेशी' मराठी/भारतीय नाहीतच) या, ९२ लोकांच्या (फारतर २०० होतील?) मतांवरून आपण सगळ्याच परदेशातल्या भारतीयांवर बोलणार आहात का? खरंतर मला त्यांच्या बोलण्यात काहीही आक्षेपार्ह वाटलं नाहीच. पण अगदी त्या काही आक्षेपार्ह बोलल्या असं गृहीत धरलं तरीही १०० लोकांवरून तुम्ही इतर बाकीच्या लोकांनाही बोल लावता हे संपूर्णपणे अमान्य आणि आक्षेपार्ह आहे.

शिवाय भारतीय पारपत्र असणार्‍या, पण सध्या भारतात वास्तव्य न करणार्‍या लोकांनी भारताबद्दल बोलू नये हे आपण कसं काय सांगणार? त्यांनातर मतदानाचाही अधिकार घटनेने दिला आहे.

कोणी चार लोकं परदेशात जाऊन, डोक्यात हवा गेल्यावर बरळतात; आणि तसेतर इथेही आहेतच ना? पण छोट्या संख्येतल्या लोकांच्या चुकांसाठी तुम्हीतर संपूर्ण जमावालाच वाईट ठरवत आहात.

अदिती

प्राजु's picture

18 Feb 2009 - 8:52 pm | प्राजु

(राग मानू नका, पण तुमच्या अनुदिनीवरचे फॉण्टस छान नाही वाटत आहेत, वाचायला त्रास होत आहे.)

हाहाहा... आदिती.. जियो!!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

मुक्तसुनीत's picture

18 Feb 2009 - 8:54 pm | मुक्तसुनीत

विप्र यांच्या संगतीने सगळे लोक क्रिप्टीक लिहायला लागले आहेत. "फाँट" हा "म्याटर" या शब्दाऐवजी वापरलायसे दिसते अदितीबाईंनी. ;-) (राग मानू नका !)

त्रास's picture

18 Feb 2009 - 8:55 pm | त्रास

ठ्ठ्यॉ!!!!!

आमच्या भारतात असे हसत नाही, बरका. हं..

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

18 Feb 2009 - 9:03 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

अहो त्रासकाका,

आमच्याकडे पुण्यातून (जे भारत, अमेरिका वगैरे सगळ्यांच्यापेक्षा व्याख्येप्रमाणेच उच्च आहे ;-) ) मिपा वापरताना आम्ही असंच असतो, ठ्यॉ करून ... कोई श्शक्?

अदिती

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

18 Feb 2009 - 8:59 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

प्राजु, मी (कधी नव्हे ते!) एवढं तर्कशुद्ध लिहायचा प्रयत्न केला आणि तुला ते तेवढं एकच वाक्य प्रतिक्रिया देण्यालायक वाटलं? ;-)

असो. मूळ लेख कुठे आहे, तर तो खोदून खोदून शोधावा लागला, तोही ईसकाळच्या भयंकर आणि अंगावर येणार्‍या वेबसायटीवर! त्यातून इथे धागा काय तर 'माझे विचार मी त्या अनुदिनीवर लिहिले आहेत, तिथे वाचा' मग इथे का नाही डकवले?

या 'चर्चे'शी संबंधित जुना एक धागा आठवला. मुक्तसुनीत यांनी एक उत्तम प्रकटन लिहिलं होतं आपण आणि आपले "ठराविक साचे". त्या मुद्द्यांचा जरूर विचार करा आणि मग 'अनेकवचना'त लोकांचा तिरस्कार करा.

अदिती

प्राजु's picture

18 Feb 2009 - 9:08 pm | प्राजु

त्यातून इथे धागा काय तर 'माझे विचार मी त्या अनुदिनीवर लिहिले आहेत, तिथे वाचा' मग इथे का नाही डकवले?

हेच म्हणते. तिरस्कारच करायचा तर अनुदिनीवर का फक्त? आणि आता केलाच आहे तर.. पर्सनली घेऊ नये म्हणायचे कशाला?
डॉन्याच्या धाग्यात तात्या म्हणाले तसे.. "आली अंगावर घेतली शिंगावर..." याप्रमाणे आता तयार रहा ना.

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

संदीप चित्रे's picture

18 Feb 2009 - 8:57 pm | संदीप चित्रे

अदिती..
समंजस प्रतिसादासाठी मनापासून धन्यवाद.
महेंद्रना जो काही राग आला असेल तो त्यांच्याकडे... एका फटक्यात सरसकट सगळ्यांना शिव्या घालायचा अधिकार त्यांना कसा मिळतो?

महेंद्र -- कृपया ही इंग्रजी म्हण ध्यानात ठेवा -- तुमचा हात फिरवण्याचे स्वातंत्र्य त्या ठिकाणी संपते ज्या ठिकाणी माझे नाक सुरू होतं.

भारतात राहून भारताला शिव्या देणारे मराठी लोकही मी पाहिले आहेत आणि अमेरिकन नागरिकत्व घेऊनही भारतातल्या छोट्या गावांत सुधारणा याव्या म्हणून धडपडणारे मराठी लोक पाहिले आहेत. कृपया सरसकट सगळ्यांना शिव्या देणं टाळा ही नम्र विनंती !

किट्टु's picture

18 Feb 2009 - 9:04 pm | किट्टु

=D> अगदी बरोबर बोललात तुम्ही संदीप.....

लवंगी's picture

19 Feb 2009 - 5:50 am | लवंगी

एका व्यक्तिचा राग सगळ्या अनिवासी भारतियांवर काढणे योग्य आहे का? अगदि परक करुन टाकलस कि आम्हा सगळ्यांना

शुभान्गी's picture

18 Feb 2009 - 8:41 pm | शुभान्गी

परदेशवाशीयान्चा उद्देश भारताला नाव ठेवण्याचा मुळीच नसतो. भारतवाशीयान्कडे अपार बुध्दीमत्ता आहे. त्याचा उपयोग जर तिथे झाला तर आपल्या लोकान्ना , आपल्या मातीला सोडुन यायची कोणाला ईच्छा होईल हो तुम्हीच सान्गा. जे काही चान्गले आहे ते भारताने आपलेसे करावे असे वाट्ते.

महेंद्र's picture

18 Feb 2009 - 8:43 pm | महेंद्र

सहमत आहे मी.. फक्त आजच्या सकाळ मधल्या कॉमेंट्स वाचल्या आणि राग आला मला...

ऍडीजोशी's picture

18 Feb 2009 - 8:59 pm | ऍडीजोशी (not verified)

त्याचा उपयोग जर तिथे झाला तर आपल्या लोकान्ना , आपल्या मातीला सोडुन यायची कोणाला ईच्छा होईल हो तुम्हीच सान्गा.

प्रयत्न तरी केले जातात का? शिक्षण संपायच्या आधीच लोकांना परदेशात जायचे वेध लागले असतात. आणि भारतात उत्तम करियर असणारी / पैसा कमावणारी लोकं नाहियेत का?

अरे सगळी हुशार मुलं 'इथे काय ठेवलंय?' म्हणून भारताल शिव्या घालून निघून गेली तर देशाने कुणाकडे पहायचं. ही हुशार, कर्तबगार तरूण हीच तर देशाची संपत्ती आहे. १ कोटी उच्चशिक्षीत भारतीय लोकं भारता बाहेर आहेत ही काय गम्मत आहे का? कशी होणार आपल्या देशाची प्रगती?

सावरकरांचा अभिमान वाटतो पण 'जरी उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा, हा व्यर्थ भार विद्येचा' 'गुणसुमने मी वेचीयली ह्या भावे, की तिने सुगंधा घ्यावे' ह्यातली तळमळ नाही जाणवत.

स्वत: पुढे बघायची दॄष्टीच पैसा आणि लाईफस्टाईलच्या हव्यासापायी गमावून बसल्याने इथे काय ठेवलंय असे प्रश्न पडतात. तुम्ही काय दिलंत तुमच्या देशाला हा प्रश्न विचारला की मात्र डोक्यात तिडीक जाते. असं का? तिथे स्वातंत्र्य दिवस साजरा केला जातं. मग भोंगळ देशप्रेमाचे उसासे टाकले जातात. एव्हढच प्रेम आहे देशाबद्दल तर या परत. करा भारताला सशक्त आणि समर्थ. थोडी वर्ष द्यावी लागतील आयुष्यातली पण बदल नक्कीच घडेल.

स्वातंत्र्यसैनीक वरून पहात असतील तर त्यांना लाज वाटेल. ह्याचसाठी का आम्ही आयुष्य ओवाळून टाकलं देशावर की आमच्या मुलांनी देश वार्‍यावर सोडून दुसर्‍या देशाची प्रगती करून द्यावी. ह्या अशा कॄतघ्न लोकांसाठी आम्ही जिवाची होळी केली? अरेरे, आम्हीच मुर्ख. गांधी, सावरकर, चाफेकर बंधू हे पण ह्या अ भारतीय भारतीयांसारखे वागले असते तर?

पुन्हा आधीचंच वाक्य - परदेशी स्थायीक झालेल्या भारतीय लोकांबद्दल माझ्या मनात तीळमात्रही आपलेपणा / आदर नाही. माझ्यासाठी एक सामान्य परदेशी नागरीक आणि ते सारखेच. नाही, त्याहूनही खाले. किमान तो परदेशी नागरीक स्वत:च्या देशात तर आहे.

त्रास's picture

18 Feb 2009 - 9:14 pm | त्रास

"अरे सगळी हुशार मुलं 'इथे काय ठेवलंय?' म्हणून भारताल शिव्या घालून निघून गेली तर देशाने कुणाकडे पहायचं. ही हुशार, कर्तबगार तरूण हीच तर देशाची संपत्ती आहे. १ कोटी उच्चशिक्षीत भारतीय लोकं भारता बाहेर आहेत ही काय गम्मत आहे का? कशी होणार आपल्या देशाची प्रगती?"

ही मंडळी भारतात $$ पाठवतातः

इथे वाचा

ऍडीजोशी's picture

18 Feb 2009 - 9:32 pm | ऍडीजोशी (not verified)

ह्याचं उत्तर मूळ लेखात दिलंय

तुम्ही लोकांनी इकडे पैसे गुंतवले ते मातृन्भुमीचे प्रेम म्हणुन नाही, तर फ्लरिशिंग शेअर मार्केट मुळे.. आणि हेच सत्य आहे. अमेरिकेत व्याजाचे दर २ ते ३ टक्के आहेत म्हणुन तुम्हाला भारत लागतो पैसे गुंतवायला. तुम्ही इथे पैसे पाठवता ते तुमच्या स्वार्थासाठी… उगीच मोठेपणा घेउ नका स्वतःकडे..

वजीर's picture

19 Feb 2009 - 9:17 pm | वजीर

परदेशी करियर करने म्हणजे चोर दरोडेखोर बनल्यासारखे आहे का? तुम्ही इतके का हात धुउन मागे लागला आहात?

प्राजु's picture

18 Feb 2009 - 9:18 pm | प्राजु

थोडं जपून बोला.
काय आहे माहिती आहे का,

अरे सगळी हुशार मुलं 'इथे काय ठेवलंय?' म्हणून भारताल शिव्या घालून निघून गेली तर देशाने कुणाकडे पहायचं. ही हुशार, कर्तबगार तरूण हीच तर देशाची संपत्ती आहे. १ कोटी उच्चशिक्षीत भारतीय लोकं भारता बाहेर आहेत ही काय गम्मत आहे का? कशी होणार आपल्या देशाची प्रगती?

भारतात राहणारे तरी देशाच्या प्रगतीसाठी किती धडपडतात? आणि आम्ही भारतात रहात नाही म्हणून हा द्वेष की, काही वैयक्तिक आकस??

स्वातंत्र्यसैनीक वरून पहात असतील तर त्यांना लाज वाटेल. ह्याचसाठी का आम्ही आयुष्य ओवाळून टाकलं देशावर की आमच्या मुलांनी देश वार्‍यावर सोडून दुसर्‍या देशाची प्रगती करून द्यावी. ह्या अशा कॄतघ्न लोकांसाठी आम्ही जिवाची होळी केली? अरेरे, आम्हीच मुर्ख. गांधी, सावरकर, चाफेकर बंधू हे पण ह्या अ भारतीय भारतीयांसारखे वागले असते तर?

किती दिवस आणखी आपण आपल्या स्वातंत्र्यवीरांच्या आहुतीचं भांडवल करणार?? आणि आता भांडवल करून, देशाची किती प्रगती साध्य होणार??
प्रगती प्रगती म्हणतात ती इतिहास उगळून होत नाही हे कटू असलं तरी सत्य आहे. आता भारतात जे चालू आहे, जी काहि लोकशाही ची वीटंबना चालू आहे ती बघून सावरकर, चाफेकर बंधू यांच्यापैकी कोणीही शाबासकी देणार नाही हे निश्चित.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

शुभान्गी's picture

18 Feb 2009 - 9:21 pm | शुभान्गी

प्राजु १००% सहमत.....

ऍडीजोशी's picture

18 Feb 2009 - 9:30 pm | ऍडीजोशी (not verified)

भारतात राहणारे तरी देशाच्या प्रगतीसाठी किती धडपडतात?
ह्यावर वैयक्तीक स्वार्थासाठी देशाला वार्‍यावर सोडून गेलेल्या लोकांनी प्रतिक्रीया न देणे उत्तम. ज्या गावाला जायचेच नाही त्याच्या चौकशा कशाला?

आणि आम्ही भारतात रहात नाही म्हणून हा द्वेष की, काही वैयक्तिक आकस??
देश माझा आहे. त्यामुळे इथे शिकून वैयक्तीक स्वार्थासाठी दुसर्‍या देशाची तुंबडी भरण्यात धन्य मानणार्‍या सगळ्यांबद्दल वैयक्तीक आकस आहे.

किती दिवस आणखी आपण आपल्या स्वातंत्र्यवीरांच्या आहुतीचं भांडवल करणार??
भांडवल नाही जाणीव करून द्यायचा प्रयत्न आहे.

आता भारतात जे चालू आहे, जी काहि लोकशाही ची वीटंबना चालू आहे ती बघून सावरकर, चाफेकर बंधू यांच्यापैकी कोणीही शाबासकी देणार नाही हे निश्चित.
हे वाक्य तिथे राहून बोलण्याला काहीही अर्थ नाहिये. आम्ही स्वत:च्या इच्छेने इथे रहातो आणि देशाला आमच्या परीने योगदान देण्याचा प्रयत्नही करतो.

इथल्या राकजारण / संधी इत्यादींवर टिका करणारी लोकं तिथलं समाज जीवन, संस्कॄती ह्यांवर टिका करतात. भारताला आपले मानले नाहीतच, किमान जिथे जाता तिथे तरी एकनिष्ठ रहा ही विनंती.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

18 Feb 2009 - 9:33 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

हे वाक्य तिथे राहून बोलण्याला काहीही अर्थ नाहिये. आम्ही स्वत:च्या इच्छेने इथे रहातो आणि देशाला आमच्या परीने योगदान देण्याचा प्रयत्नही करतो.

हे वाक्य अमेरिकाच आणि पुणंच काय पण बंगळुरू आणि आय.एस.एस. (इंटरनॅशनल स्पेस स्टेशन)वरूनही बोललं तरी अयोग्य ठरणार नाही.

अदिती

प्राजु's picture

18 Feb 2009 - 9:34 pm | प्राजु

भारताला आपले मानले नाहीतच, किमान जिथे जाता तिथे तरी एकनिष्ठ रहा ही विनंती.

सोयिस्कर गैरसमज...
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

ऍडीजोशी's picture

18 Feb 2009 - 9:38 pm | ऍडीजोशी (not verified)

गैरसमज कशा बाबतीत

भारताला आपले मानले मानणे की जिथे जातो तिथे एकनिष्ठ रहायची अपेक्षा करणे?

प्राजु's picture

18 Feb 2009 - 9:42 pm | प्राजु

दोन्ही...
:)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

मराठी_माणूस's picture

19 Feb 2009 - 7:12 am | मराठी_माणूस

आणि आम्ही भारतात रहात नाही म्हणून हा द्वेष की, काही वैयक्तिक आकस??

हे म्हणजे स्वतःच स्वतः साठी टाळ्या वाजवल्या सारखे आहे

अनामिका's picture

19 Feb 2009 - 5:03 pm | अनामिका

प्राजु २०००% सहमत
"अनामिका"

लिखाळ's picture

18 Feb 2009 - 9:45 pm | लिखाळ

प्रत्येकाच्या बाबतीत प्रकार निराळा असतो. आपण म्हणता तसे अमेरिकेत जायची क्रेझ असलेले लोक असतातच. पण...

अरे सगळी हुशार मुलं 'इथे काय ठेवलंय?' म्हणून भारताल शिव्या घालून निघून गेली तर देशाने कुणाकडे पहायचं. ही हुशार, कर्तबगार तरूण हीच तर देशाची संपत्ती आहे. १ कोटी उच्चशिक्षीत भारतीय लोकं भारता बाहेर आहेत ही काय गम्मत आहे का? कशी होणार आपल्या देशाची प्रगती?

मी भारतात असताना माझ्या उच्च शिक्षणाच्या संधी आटल्या होत्या आणि अदिती म्हणाली तसे शेंगदाणे हातावर मिळत होते. बाहेर आल्यावर उच्चशिक्षण घेणे शक्य झाले आणि त्यामुळे एकदम ब्रेन ड्रेन झाले ! :) (माझी स्थिती प्रातिनिधिक असू शकते म्हणून लिहिले.)

बाकी 'बाहेर' जाऊन जीवन सार्थकी लागल्याचा आनंद होणारे अनेक पाहिले आहेत.. त्यामुळे वरील पैकी अनेक मुद्द्यांशी सहमतच आहे.
-- लिखाळ.

चतुरंग's picture

18 Feb 2009 - 9:51 pm | चतुरंग

काढून टाकलं! लईच पर्सनल झालं होतं!!

पण तुला माझ्या मनातला उद्वेग समजला असेल अशी आशा आहे ऍडी!!
कुठल्याही प्रश्नाचं असं जनरलायजेशन फारच चुकीचं असतं.

चतुरंग

ऍडीजोशी's picture

18 Feb 2009 - 9:55 pm | ऍडीजोशी (not verified)

तुम्ही वयाने मोठे असल्याने मनातलं उत्तर देत नाहिये.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

18 Feb 2009 - 9:59 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

चला एक काथ्याकूटच टाकते, देशी बनावटीच्या ब्राण्डेड दारू, सिगारेट्स, बाईक्स कोणत्या ते! पुढच्या वेळी सगळ्यांना संदर्भ म्हणून उपयोगी पडेल!

मला काही वेळ नव्हता, पाच-सहा वर्ष पीएच.डी. करायला, महिन्याला ८ हजार मिळवत, मग गेले सरळ परदेशात, तीन वर्षात मिळवली पदवी, सहा महिने बसून खाता येईल एवढं जमवलं आणि मग नोकरी मिळाल्याचं समजलं. खूप आनंद झाला. मग तीन महिने वाट पाहिली कधी हातात 'पत्र' येईल. नाहीच आलं, मग जाऊन ठिय्या दिला आणि तिकडे आठ दिवस बिनपगारी काम केलं, तेव्हा कुठे पत्र मिळालं.
महिन्याला आठ हजार (आता बारा हजार जास्तीत जास्त) कमावून हे किती लोकांना शक्य झालं असतं हो ऍडीभौ?

अदिती

मराठी_माणूस's picture

19 Feb 2009 - 6:53 am | मराठी_माणूस

पुन्हा आधीचंच वाक्य - परदेशी स्थायीक झालेल्या भारतीय लोकांबद्दल माझ्या मनात तीळमात्रही आपलेपणा / आदर नाही.

सख्ख्या आईला सोडुन सावत्र आईचे गुणगान गाणार्‍या बद्दल आपलेपणा / आदर असण्याचे काहीच कारण नाही.

नीधप's picture

19 Feb 2009 - 8:01 am | नीधप

आदी,
एकांगी बोलतोयस. एकच बाजू.
परदेशात सेटल होण्याचे समर्थन मी करत नाही. करणारही नाही. असा निर्णय मी कधी घेणार नाही पण तिथे राहण्यातले 'पर्क्स' मला माहीती आहेत आणि त्यासाठी कोणी निर्णय घेतला तसा तर त्याला दूषणं देण्यात अर्थ नाही. माणूस आहे आणि त्याला आपल्या आयुष्याचे निर्णय घेण्याचा अधिकार आहे आणि त्यावर भाष्य करायचा आपला अधिकार नाही.
पण बाहेर स्थायिक झालेला माणूस देशद्रोही आणि अजून काय काय असतो इतक्या उथळपणे हे पाह्यलं जाउ नये.

पण एक आहे की ३५ एक वर्षांपूर्वी जे तिथे स्थायिक झाले त्यांच्या डोक्यात एक गिल्ट निश्चितच आहे. पैसा, समृद्धी, लाइफस्टाइल यासाठी आम्ही हे आयुष्य पत्करले इतकं सरळपणे ते सांगू शकत नाहीत. त्यासाठी मग ते भारताची सिस्टीम इत्यादी कारणे देतात. गिल्ट लपवायला भारताला नावे ठेवू लागतात. त्यांची मुले त्यावरच वाढतात आणि संधी मिळाली की भारतावर टिका सुरू करतात. अशी उदाहरणं खूप पाह्यली मी. अर्थात अपवाद होतेच.

पण त्यामानाने गेल्या १०-१५ वर्षात तिथे गेलेले लोक प्रामाणिक म्हणायला हवेत. ते सरळ सरळ मान्य करतात की याच कष्टात भारतात जे मिळालं असतं त्याच्या कैकपटीने इथे मिळतंय. म्हणून आम्ही इथे रहातो.

असो...
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

ऍडीजोशी's picture

19 Feb 2009 - 11:40 am | ऍडीजोशी (not verified)

माणूस आहे आणि त्याला आपल्या आयुष्याचे निर्णय घेण्याचा अधिकार आहे आणि त्यावर भाष्य करायचा आपला अधिकार नाही.
पण बाहेर स्थायिक झालेला माणूस देशद्रोही आणि अजून काय काय असतो इतक्या उथळपणे हे पाह्यलं जाउ नये.

इतक्या उथळपणे पहात नाहिये गं. मला राग अशांचा येतो की जे तिथे जाऊन भारताला शिव्या घालतात. तुम्ही देश वार्‍यावर सोडून संघर्ष न करता बुडाला पाय लाऊन पाळालात ना? मग तुम्हाला काय अधिकार इथे काय चाललंय त्यावर भाष्य करायचा. देश सुधरावा म्हणून तुम्ही काहीच प्रयत्न केले नाहीत मग आता आम्हाला अक्कल शिकवू नका की इथे काय ठेवलंय. म्हणून मी स्वातंत्र्यसैनीकांच उदाहरण दिलं. किती पिढ्यांनी त्याग केला आपल्या पुढच्या पिढीला स्वतंत्र देशात श्वास घ्यायला मिळावा म्हणून. त्याच्या ०.००००१% जरी आपण प्रत्येकाने करायचं ठरवलं तर देश सुधारणार नाही का? परिस्थीती इतकी वाईट झाली आपल्यामुळेच ना?

नाटक्या's picture

19 Feb 2009 - 1:11 pm | नाटक्या

पण एक आहे की ३५ एक वर्षांपूर्वी जे तिथे स्थायिक झाले त्यांच्या डोक्यात एक गिल्ट निश्चितच आहे. पैसा, समृद्धी, लाइफस्टाइल यासाठी आम्ही हे आयुष्य पत्करले इतकं सरळपणे ते सांगू शकत नाहीत. त्यासाठी मग ते भारताची सिस्टीम इत्यादी कारणे देतात. गिल्ट लपवायला भारताला नावे ठेवू लागतात. त्यांची मुले त्यावरच वाढतात आणि संधी मिळाली की भारतावर टिका सुरू करतात. अशी उदाहरणं खूप पाह्यली मी. अर्थात अपवाद होतेच.

साफ चूक.
मी अमेरिकेत गेली १२ वर्षे रहातो आहे (१-२ वर्षे नाही). या १२ वर्षात मी असंख्य लोकांना भेटलो कि जे ईथे १९६०-७० च्या दशकात आले. ते लोक आनंदाने भारतात जातात. त्यांच्या पुण्या-मुंबई मधल्या घरात १-२ महिने रहातात. पुतण्या/भाचे यांच्या कार्यात आनंदाने भाग घेतात. पण मला कोणीही भारताबद्दल नाराजीचा सूर काढताना किंवा सिस्टीमला नावं ठेवताना दिसला नाही. अगदी त्यांची मुलं/मुली अगदी अमेरिकन जावई सुध्दा.

मा़झ्या ओळखीची एक व्यक्ती आहे. ते ईथे १९६३ साली आलेत. सध्या बे एरियातील एका मोठ्या कंपनी साठी काम करतात, पण त्यांनी मुद्दामून २ वर्षांसाठी बेंगलोरचे पोस्टींग मागून घेतले. मी विचारल्यावर म्हणाले "अरे मला ईतका अनूभव मिळाला आहे की आपल्या भारतातल्या लोकांना त्याचा उपयोग नको का व्हायला? प्रत्येक ईंजीनियर काही अमेरिकेत येणार नाही त्या पेक्षा मीच तिकडे जातो आणि त्यांना काही माझ्या ज्ञानाचा, अनूभवाचा फायदा होतो का ते बघतो". सांगा मला यात कुठला गिल्ट दिसतो आणि कुठे भारतावर टिका केलेली दिसते.

हे एकच नाही तर असे अनेक लोकांना मी खुप जवळुन ओळखतो. तेव्हा त्यांच्या डोक्यात एक गिल्ट निश्चितच आहे हे विधान जरा जपून करा.

वुडहाऊसला दुसर्‍या महायुध्दानंतर विचारले, "प्लम तुला जर्मनांचा तिटकारा नाही येतं?" त्यावर वुडहाऊस म्हणाला 'I don't hate in plural.".

- नाटक्या

नीधप's picture

19 Feb 2009 - 3:01 pm | नीधप

>>मी अमेरिकेत गेली १२ वर्षे रहातो आहे (१-२ वर्षे नाही).<<
>>तेव्हा त्यांच्या डोक्यात एक गिल्ट निश्चितच आहे हे विधान जरा जपून करा.<<
मी पाहिलेल्या उदाहरणांवरून हे वाक्य मी बोलते आहे. माझ्या संपर्कातल्या अनेक व्यकींना सुद्धा हाच अनुभव आहे. आपण ह्या सगळ्यांचा अनुभव खोटा आहे असं म्हणताय का?
तुम्ही १२ वर्षे आहात हे सांगायची काहीच गरज आहे असं वाटत नाही. तुम्ही नक्की काय सांगू पाहताय या वाक्यातून?

'विधान जपून करा' 'साफ चूक' इत्यादी शब्दांची जरूर नाही. नीट बोला.
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

नाटक्या's picture

19 Feb 2009 - 3:28 pm | नाटक्या

तुम्ही १२ वर्षे आहात हे सांगायची काहीच गरज आहे असं वाटत नाही. तुम्ही नक्की काय सांगू पाहताय या वाक्यातून?

मला यातून फक्त एव्हढेच म्हणायचे आहे कि मी अर्ध्या हळकुंडाने पिवळा (डांबीस नाही) नाही झालो. माझ्या पहाण्यात अनेक जण आहेत की जे अमेरिकेत २-३ महिन्यांसाठी येतात आणि असली विधानं करतात.

मी पाहिलेल्या उदाहरणांवरून हे वाक्य मी बोलते आहे. माझ्या संपर्कातल्या अनेक व्यकींना सुद्धा हाच अनुभव आहे. आपण ह्या सगळ्यांचा अनुभव खोटा आहे असं म्हणताय का?
तुमचा अनुभव खोटा आहे असे मला म्हणायचे नाही पण 'निश्चीतच आहे' असे generalized statement करण्याची देखील काही आवश्यकता नाही.

'विधान जपून करा' 'साफ चूक' इत्यादी शब्दांची जरूर नाही. नीट बोला.
'विधान जपून करा' यात काही चुकले असे मला वाटत नाही. आणि जर 'साफ चूक' ह्या शब्दांची जरुरत नसेल तर 'नीट बोला' ची पण नसावी, नाही का?

नीधप's picture

19 Feb 2009 - 3:59 pm | नीधप

>>मला यातून फक्त एव्हढेच म्हणायचे आहे कि मी अर्ध्या हळकुंडाने पिवळा (डांबीस नाही) नाही झालो. माझ्या पहाण्यात अनेक जण आहेत की जे अमेरिकेत २-३ महिन्यांसाठी येतात आणि असली विधानं करतात.<<
मग त्यांना बोला. मी ३ वर्षे शिक्षणासाठी होते. आणि मी पण भरपूर उदाहरणं पाह्यली आहेत.

>>तुमचा अनुभव खोटा आहे असे मला म्हणायचे नाही पण 'निश्चीतच आहे' असे generalized statement करण्याची देखील काही आवश्यकता नाही.<<
साफ चूक असे generalized statement तुमचेच आहे ना? मी उदाहरणे पाह्यली असतानाही असं नाहीच आहे असं धडधडीतपणे तुम्ही कसं म्हणू शकता. आणि मला generalized statement बद्दल सांगताना तुम्ही 'अपवाद असणारच आहेत' या वाक्याकडे दुर्लक्ष करताय त्याचं काय?

>>'विधान जपून करा' यात काही चुकले असे मला वाटत नाही. आणि जर 'साफ चूक' ह्या शब्दांची जरुरत नसेल तर 'नीट बोला' ची पण नसावी, नाही का?<<
तुम्हाला चुकले वाटत नाही तर मलाही माझे काही चुकले वाटायला नको. 'विधान जपून करा!' हा उपदेश आणि 'साफ चूक' असं विधान हे तुम्ही म्हणता तेच योग्य आणि बाकीच्यांचे अनुभव खोटे अश्या तुमच्या स्टान्सचे वाटते. तेव्हा त्याची प्रतिक्रिया 'नीट बोला' अशीच येणार हे लक्षात ठेवा.

- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

टारझन's picture

19 Feb 2009 - 9:14 pm | टारझन

पण काहीही म्हणा, परदेशात खुप वेळ असतो हं .. टंकायला हो ..

डाण्या .... तु परदेशी वाटतोस लेका :)

वदनी

शुभान्गी's picture

18 Feb 2009 - 8:46 pm | शुभान्गी

साहजिकच आहे

नाटक्या's picture

18 Feb 2009 - 9:31 pm | नाटक्या

ही कविता मला एका ढकलपत्रातून आली होती. मला वाटते ही कविताच पुरेशी बोलकी आहे.

तात्या/संपादक मंडळ: जर आक्षेपार्ह वाटली तर काढून टाका.

===========
चिऊच्या घराची गोष्ट
===========

एक होती चिऊ, एक होता काऊ.
चिऊ दिवसभर कामात मग्न,
बिचारीला बोलायलाही नव्हता वेळ.
तिची लगबग पाहून काऊ शेवटी म्हणालाच-
चिऊताई, कसलं सारखं काम करत राहणं?
बघ तरी, एवढा वसंत फुललेला..
सोनेरी ऊन पडलेलं, सारं कसं छान छान!

चिऊ धापा टाकत म्हणाली,
काऊदादा, खरंय बाबा तुझं.
दिसतंय ख्ररं सगळं सुंदर,
पण ते असंच नाही राहणार.
पिल्लं अजून लहान माझी, अन
लवकरच पावसाळा सुरू होणार;
तेव्हा अन्न शोधुनही नाही सापडणार.
तेव्हा करते आताच सारी बेगमी,
अन माझं घरटंही करते जरा आणखी भक्कम!

काऊला चिऊची दया आली,
पण मग तिच्याकडे दुर्लक्ष करून
तो छान उडू, नाचू, बागडू लागला!

उन्हाळा संपला,
अन एक दिवस सोसाट्याचा आला वारा.
काऊचं तोडकंमोडकं घर पुर्णच तुटलं.
मग आला मुसळधार पाऊस.
भिजल्या, कुडकूडत्या अंगाने, भुकेल्या पोटाने,
काऊ चिऊला- राहायला दे, खायला दे- म्हणाला.
चिऊ म्हणाली, नाही रे बाबा कऊदादा..
खुप राबले मी या घरासाठी अन पिल्लांसाठी.
एकतर जागा नाही इथे, अन खाणं तर माझ्या पिल्लांसाठीच.

काऊ चिडला, अन बोलावली सरळ पत्रकार परिषदच!
चॅनेलवाले, पेपरवाले हजर झाले लगेच.
मग लाईव्ह टेलेकास्टमध्ये काऊ म्हणाला-
मी इथं पाण्यानं भिजतोय, थंडीनं कुडकूडतोय, अन्नावाचून मरतोय..
अन बघा ही बया, खुशाल खातेय, मजेत राहतेय!!
मग सर्वांना आला काऊचा कळवळा..
एका पेपरवाल्याने सरळ बातमीच छापली..
चिऊच्या दारात बिचार्‍या काऊचं उपोषण म्हणून!!
एका 'तेज'तर्रार चॅनेलनं तंबूच दिला बांधून सरळ..
अन कॅमेर्‍यानं त्यांचं २४ तास रतीब घालण्याचं काम केलं.

मग काय विचारता राव....??

मुलभूत हक्कांची पायमल्ली!!
हीच आहे का लोकशाही??
लोकप्रतिनिधी झोपलेत काय?
सरकारचे डोके फिरले काय?
साम्यवादाचा विजय असो!
काऊ-राव-जी-पंत-चंद्र-महाराज-साहेब- चिरायू होवो!
गरीबी हटाव, चिऊला भगाव!!

काऊ फक्त अंगार है, बाकी सब भंगार है!
काऊरावजी आगे बढो, हम तुम्हारे साथ है!!
न्याय मिळालाच पाहिजे..
शोषण बंद झालेच पाहिजे!
पर्यावरणाचा र्‍हास होतोय..
समानतेचा नाश होतोय!
राजीनामा दिलाच पाहिजे..
कारभारी बदललाच पाहिजे!

काय काय अन बरंच काय-काय...

चॅनेल्सवर झळकून, पेपरांत मिरवून,
काऊचा झाला झिरोतून हिरो;
मग त्याने ठेवलाच सरळ एक पी.आर.ओ.!
काऊचे कपडे मग ब्रँडेड झाले,
अंग काळेच, पण केस मात्र डाय झाले!!
रात्रीसुध्दा काऊ रे-बॅन लावूनच बोलू लागला,
पाहिजे त्या गोष्टींसाठी स्पाँसर्सही मिळवू लागला!!

काऊने मुद्दा लावून धरला, तसा
विधानसभेतच गदारोळ माजला!
आयूक्त, प्रशासक बदलले..
अन मंत्रीमंडळही विस्तारले!
पण शेवटी परिस्थिती हाताळण्यात अपयश
आल्याकारणाने मुख्यमंत्रीच बदलले!!
केंद्रसरकार हादरले,
दर तासाला परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत, म्हणू लागले!
प्रतिक्रिया तर पैशाला पासरीभर,
आपण मागे पडू, म्हणून सर्वांची धडपड!

अल्पसंख्यांक, मागासवर्गीय, दारिद्र्यरेषा..
गरीब, सवर्ण, आरक्षण, स्पेशल कोटा..
पक्षांतर, घोडेबाजार, जातीयवाद..
सभा, मोर्चे, बंद, अटक अन मतदारराजाला साद!!
समर्थक, भक्त, अनुयायी, उगवते नेतृत्व..
काही खरं नाही, कशाला येईल महत्व!!

सरकार बदललं, तसा कायदाही बदलला,
चिऊच्या घरावर सरळ सरकारी कब्जाच आला.
लेखण्या सरसावल्या, कॅमेरे क्लिकाटले..
समारंभपुर्वक काऊरावजी घराचे मालक झाले!!

चिऊ बिचारी रडली, ओरडली..
वैतागून तिने शेवटी पिल्लांसह अमेरिका गाठली!
चिऊ तिथेही राब-राब राबली,
कंस्ट्रक्शन व्यव्सायात बिझनेस-वुमन बनली!!

काऊला आजही स्वतःचं घर बांधता येत नाही,
पण भाषण करण्यात त्याचा कुणी हात धरत नाही!
आता तो नेहमी वेगवेगळ्या निवडणूका लढवतो..
एन.आर.आय. लोकांनी देशाला मदत केली पाहिजे म्हणतो..!!

=================================

प्राजु's picture

18 Feb 2009 - 9:37 pm | प्राजु

मस्त मस्त मस्त...
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

शुभान्गी's picture

18 Feb 2009 - 9:40 pm | शुभान्गी

अतिशय सुन्दर.... वास्तवता आहे.

रेवती's picture

18 Feb 2009 - 9:41 pm | रेवती

किती वेगळी कविता आहे!
आवडली म्हणून हा प्रतिसाद आपण दिलेल्या कवितेला!
धाग्याला कोणतीही प्रतिक्रिया देण्याची इच्छा राहिलेली नाही.

रेवती

छोटा डॉन's picture

18 Feb 2009 - 9:52 pm | छोटा डॉन

आवडली म्हणून हा प्रतिसाद आपण दिलेल्या कवितेला!
धाग्याला कोणतीही प्रतिक्रिया देण्याची इच्छा राहिलेली नाही.

+१, रेवतीकाकुंशी शब्दशः सहमत आहे

कविता लै भारी आहे आणि एकदम समयोचीत ..!

बाकी चालु द्यात.
आम्ही "बाल्कनीतली शीट" पकडुन बसलो आहे, बरोबर चघळायला भडंग करुन आणली आहे.
होऊन जाऊ द्या काय व्हायचे ते ...

------
( एकदा गडबडीत दोन्ही बाजुने कडाकड भांडलेला व नंतर ह्यातल्या "फोलपणाचा" साक्षात्कार झालेला ) छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

अतिशय योग्य वर्णन!! धन्यवाद नाटक्या!!!

चतुरंग

नाटक्या's picture

18 Feb 2009 - 10:28 pm | नाटक्या

रंगाशेठ/प्राजू/रेवती/संदीप,

सर्वांना मनापासून धन्यवाद.

- नाटक्या

संदीप चित्रे's picture

18 Feb 2009 - 10:18 pm | संदीप चित्रे

=D> =D>

सरपंच -- कृपया ही कविता उडवू नये ही विनंती

बेसनलाडू's picture

19 Feb 2009 - 2:48 am | बेसनलाडू

नाटक्याशेठ,
अगदी मार्मिक!
(मार्मिक)बेसनलाडू

वजीर's picture

19 Feb 2009 - 9:16 pm | वजीर

कविता

अवलिया's picture

18 Feb 2009 - 9:55 pm | अवलिया

वा!

--अवलिया

घाटावरचे भट's picture

18 Feb 2009 - 10:31 pm | घाटावरचे भट

असेच म्हणतो.

--घाटावरचे भट

सिद्धेश's picture

18 Feb 2009 - 10:43 pm | सिद्धेश

भारतात शिक्षण घेऊन बाकीच्या देशांची भांडी घासायला जाणारयांना उलटे टांगून मिरचीची धुरी दिली पाहिजे. सरकारच्या शिष्यवृत्त्यांवर शिकतात आणि बाहेरच्या देशांच्या तुंबड्या भरतात. सरकारसुद्धा या शिष्यवृत्त्या जनतेने दिलेल्या करांतूनच देत असते.म्हणजे त्यांच्या उच्चशिक्षणात जनतेचा वाटा असतो.

सावरकरांनासुद्धा बॅरिस्टरीनंतर भारतात बाहेरच्या इतक्या कुठे चांगल्या संधी होत्या?पण त्यानीं देशाची गरज लक्षात घेऊन आयुष्याचा पुढचा मार्ग निवडला.'माझ्या एकट्याच्या बॅरिस्टरीमुळे देशाला काय स्वातंत्र्य मिळणार आहे?' असा विचार त्यांनी मुळीच केला नाही. पुढे त्यांना प्रत्यक्ष वकीली कधीच करावी लागली नाही. जे शिक्षण घेतले त्यातच करिअर करावे असा काही नियम नाही तर त्या शिक्षणाचा देशाला किती फायदा आहे हे पहावे . अमेरिका आणि तत्सम देशांमध्ये
जाणार्या लोकांनी त्यांच्या शिक्षणाचा देशाला किती फायदा आहे हे पहावे.

नाटक्या's picture

18 Feb 2009 - 11:13 pm | नाटक्या

काय पण प्रतिक्रिया आहे..

सावरकरांनासुद्धा बॅरिस्टरीनंतर भारतात बाहेरच्या इतक्या कुठे चांगल्या संधी होत्या?

म्हणजे आपल्याला नेमके काय म्हणायचे आहे? संध्या नव्हत्या म्हणून सावरकर परत आलेत? =))

भारतात शिक्षण घेऊन बाकीच्या देशांची भांडी घासायला जाणारयांना उलटे टांगून मिरचीची धुरी दिली पाहिजे
प्रत्येक जण भांडी घासतोच हो. आणि बाहेरच्या देशात फक्त भांडी घासायला जातात हा दृष्टांत तुम्हाला कधी झाला? आणि एन. आय. आर. लोकांकडुन $$$$ पर्यायाने परकीय चलन मिळते त्याचे काय? मला आठवतं १९९०-९२ साली चंद्रशेखर यांचे सरकार होते (चु.भु.द्या.घ्या.) तेव्हा सोने गहाण ठेवून परकीय चलन मिळवावे लागले होते. तेव्हा भिक्षांदेही करताना सरकारला लाज नाही वाटली का? ते जावू दे. २००४/२००५ साली महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीच अमेरिकेत दौरा करून ईथल्या उद्योजकांना भारतात उद्योग काढा, आम्ही तुम्हाला अमक्या सवलती देवू, हे फुकट देवू, कर माफ करू सांगून गेलेते. तेव्हा काय हा स्वाभीमान पुलंच्या भाषेत 'प्लीज फाईल' केला होता काय? या आणि अशा अनेक राजकारणी लोकांची मुलं शिकायला अमेरिकेत्/युरोपातच जातात ना? मग त्यांना का नाही आधी मिरच्यांची धुरी देत?

अर्थव्यवस्था खुली तर करायची.. ग्लोबलायझेशनमुळे होणारे फायदे पण खिशात घालायचे. पण त्या ग्लोबलायझेशन साठी जे झटतात/झटले त्यांच्या नावानी गळे काढायचे. तुम्हाला काय वाटले की अमेरिकन/युरोपियन लोकांना स्वप्न पडले होते भारतात खुप चांगले ईंजीनियर्स/तंत्रज्ञ आहेत म्हणून. हे त्यांना पटवून देण्यासाठी कोणीतरी तिकडे जावूनच आपल्या कष्टांनी/हुशारीनेच पटवून दिले ना? मगच आता भारतात इतक्या संध्या उपलब्ध झाल्यात.

आणि उच्चशिक्षण घेवून परदेशात स्थायीक झालेले लोक देशासाठी काही करत नाहीत हे तुम्हाला कसे कळले. अमेरिकेत महाराष्ट्र फाउंडेशन (http://www.indiancharity.org/) अतिशय भरीव काम करते आहे, ते एकदा पहा. आय. आय. टी. मधल्या लोकांनी गेल्या वर्षी १० लाख डॉलर्स इतकी मदत पाठवली आय. आय. टी. मध्ये नवीन प्रयोगशाळा/यंत्रसामग्री घेण्यासाठी. स्वतः भारताचे राष्ट्राध्यक्ष डॉ. कलाम आले होते आय. आय. टी. च्या संमेलनाला आणि या लोकांनी केलेल्या देणगी आणि इतर कार्याबद्द्ल प्रशंसा करून गेलेते ते काय उगाच.

या सगळ्या बाबींचा विचार करा आणि मग ठरवा मिरच्यांची धुरी कोणाला द्यायची ते.

- नाटक्या

सुक्या's picture

18 Feb 2009 - 11:16 pm | सुक्या

राहु द्या. राहु द्या.
देशसेवा करायला देशातच रहायला पाहीजे हे तुम्हाला कुणी सांगीतलं? मीही सरकारच्या शिष्यवृतीवर शिकलो. काम करीन तर अस्सल भारतीय कंपनीत म्हटलो अन एका 'अस्सल' भारतीय कंपनीत ५ वर्षे घालवली. महीना पगार ६०००/-. रहायला घर फुकट. हाजी हाजी करायचा कंटाळा आला अन इथे आलो. सरकारी करातुन येणारी शिष्यवृती तुम्हाला दिसते हो पण जनतेचा कर बर्‍याच ठिकाणी गटारीत जातो. ते का नाही थांबवत? सरकारी कर्मचारी काम करायचे पैसे मागतात त्यांना कधी सुनावलय का? 'तुमचा पगार जनतेच्या करातुन येतो ते?'

देशाबाहेर राहुन देशसेवा करणारे लोक मी पाहीले आहेत. देशात राहुन देशाला विकणारेही पाहीलेत. त्यांना टांगा उलटं. फोडा हंटरने. त्यांना द्या मिरचीची धुरी.

सुक्या (बोंबील)
चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.

प्राजु's picture

18 Feb 2009 - 11:25 pm | प्राजु

मस्त प्रतिसाद.
नाटक्या रावांचा पण मस्त प्रतिसाद..
धुरी द्यायची ना.. तर आधी सरकारी कर्मचार्‍यांना द्या.
आणि मग त्यांच्या नाकातून जर प्रामाणिक पणा बाहेर आला तर बाकींच्यांना द्या.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

चतुरंग's picture

18 Feb 2009 - 11:20 pm | चतुरंग

धुरी द्यायला तरी अमेरिकेला यालच ना? तेव्हा विमानतळावरुन आणण्याची व्यवस्था करीन! शेवटी आपल्या देशबांधवांना मदत नको का करायला?? ;)

एच वन झाला की कळवा, भारतीयांनाच धुरी द्यायला जातोय हे सांगितलेत की लगेच मिळेलही, कारण बाहेरच्या लोकांना जाणार्‍या जॉब्जमुळे गोरे अमेरिकन सुद्धा वैतागलेलेच आहेत! ;)

चतुरंग

भाग्यश्री's picture

18 Feb 2009 - 10:49 pm | भाग्यश्री

नेमेचि येतो पावसाळा तशा या पोस्ट्स असतात! काही नवीन नाही राहीलंय..
उद्या उठून कोणी परदेशस्थ भारतियांबद्दल,( हो भारतीयच!) दोन वाक्यं नॉर्मल बोलले ना तरच मला आता ते आश्चर्य वाटेल..

संपादकांना एक विनंती..
सेम विषय असलेले धागे परत उघडले गेले तर पूर्वीचा धागा दाखवून नवीन विषय बंद करावा..
चर्चाकर्त्याला अजुनही त्यावर चर्चा/वाद करायचे असतील तर पूर्वीच्या धाग्यावर चालूदे.. सारखं हेच हेच पाहून वैताग येतो!
शिवाय चर्चा करून फायदाही नसतो! नवीन माणूस येतो आणि जुना+नवीन तिरस्कार ऍड होतो, इतकाच अर्थ उरलाय. साचे बदलायला कोणी तयार नसतंच नाहीतरी..

(असल्या चर्चांना वैतागलेली!) भाग्यश्री.
http://bhagyashreee.blogspot.com/

नीधप's picture

19 Feb 2009 - 12:08 pm | नीधप

दोन वाक्य?
बाई तिथे आख्खी पोस्ट टाकलीये ती दिसत नाही की हा तुमचा एकांगी पणा समजायचा?
:)
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

भाग्यश्री's picture

19 Feb 2009 - 10:42 pm | भाग्यश्री

कुठली आख्खी पोस्ट? मला नाही कळले..

http://bhagyashreee.blogspot.com/

खादाड_बोका's picture

19 Feb 2009 - 2:15 am | खादाड_बोका

मला वाटतो की तुम्च्यात आणी त्यांच्यात फरकच काय ? कारण आजकाल काही स्वतःला अतीहुशार समजणार्या मराठी लोकांना अशी गैरसमजुत झाली आहे की कोणीही येवुन परदेशात, त्यातल्या त्यात अमेरीकेत राहणार्या मराठी लोकांबद्दल आपण काहीही गरळ ओकु शकतो, आणी आपण महाराष्ट्रात राहतो , तर जसे काही हा आपल्याला कायद्यानीच अधीकार मिळाला आहे बॉ.
तेव्हा असे लेख टाकण्याच्या आघी पुर्ण तयारी पाहीजे की लोकांच्या तिखट प्रतिक्रिया येणारच. मी आत्ता त्या दुव्यावर "जॉन" चे उत्तर वाचले. माझे हे म्हणण आहे की ह्या ईटरनेटच्या काळात ईतके जास्त फ्री पॉर्न ऊपलब्ध आहे की कोणी त्या मटा या सकाळ सारख्या भुक्कड लेखांकडे लक्षही देत नसतील. आणी ज्याला पाहीचे आहे, ही त्याची मर्जी. आपण कोण हो ठरवणारे. आणी जेव्हा ईंटरनेट नव्हते तेव्हा काय लोक अष्लील मासीक या सिनेमे पाहीचे नाही काय ?
लोक काय करतात, ह्याच्यापेक्शा आपण जर आपल्या मुलांकडे लक्ष देवुन, ते तर कमी वयात अशा गोष्टी पाहात नाही ना, ह्या कडे जास्त लक्ष द्या.

आणी परदेशात राहुन जर आम्ही आमच्या मात्रुभुमीवर आजही जीवपारप्रेम करतो, गुण गातो, तर मात्रुभुमीत होणार्‍या वाईट गोष्टीबद्दल बोलण्याचा तेवढाच अधीकार आम्हालाही आहे. आणी ह्या मागची ही ईछ्या आहे की मात्रुभुमीचाही तेवढाच विकास व्हावा. जसे मांजराला डोळे मिटुन दुध पिताना वाटते की कोणालाच काही दिसत नाही. त्याचप्रमाणे तुम्हालाही वाटते की भारतात होणार्‍या वाईट गोष्टी कोणालाच दिसत नाही ,पण सर्व जग बघतोय.

ह. घ्या. तुम्हालाही या तुमच्यासारख्या कोणालाही परदेशात राहणार्‍या मराठी या भारतीयंबद्दल गरळ ओकण्याचा अधीकार नाही.
मला एक म्हण आठविली, की जेव्हा कोल्हा अंगुराच्या वेलीवर लटकलेल्या अंगुराच्या घडा पर्यंत पोहोचु शकत नाही तर तो लोकांना सांगत सुटतो की "अंगुर अंगुर खट्टे है " :''( :''(

जय महाराष्ट्र...."

मराठी_माणूस's picture

19 Feb 2009 - 12:05 pm | मराठी_माणूस

कोल्हा अंगुराच्या वेलीवर लटकलेल्या अंगुराच्या घडा पर्यंत पोहोचु शकत नाही तर तो लोकांना सांगत सुटतो की "अंगुर अंगुर खट्टे है

कारण कीत्येका साठी ते 'खट्टे' च असतात , पण ते इकडच्या लोकांना असे सांगतात की ते इतके गोड आहेत की तुम्ही आज पर्यंत खाल्ले नसतील.

बेसनलाडू's picture

19 Feb 2009 - 2:44 am | बेसनलाडू

वर सगळ्यांनीच योग्य तो ऊहापोह केलाच असल्याने अधिक काही लिहीत नाही; फक्त असे आचरट काहीतरी लिहिण्यापेक्षा गप्प बसणे श्रेयस्कर असा आगाऊ सल्ला नक्की देतो.
(आगाऊ)बेसनलाडू
एरव्ही असा आगाऊपणा केलाही नसता; पण अनिवासी मराठीजनांना शिव्या द्यायची जी फ्याशन आली आहे. तिच्याविरोधात असे तिखट बोलण्याशिवाय काही पर्याय ठेवलेला नाही फ्याशन आणणेल्यांनी!
(पर्यायी)बेसनलाडू

शाहरुख's picture

19 Feb 2009 - 4:38 am | शाहरुख

समोरचा माणुस जर आपला दोष दाखवत असेल तर तो सुधारण्याचा प्रयत्न करावा ना...तो अमेरिकेत राहतो का इंग्लंडात राहतो का युगांडात राहतो याने काय फरक पडतो ??? यात नाव ठेवणार्‍याची प्रगती न होता झाली तर आपलीच प्रगती होईल.

(भारतात सार्वजनिक स्वच्छतेची बोंब असल्याचे कबुल करणारा आणि सार्वजनिक जागी स्वत: कचरा न फेकणारा) शाहरुख

वरची चिउ च्या घराची गोष्ट 'साजिरा' या आयडीने येथे लिहीली होती. मेल मधून बरीच फिरलेली दिसते.
http://www.maayboli.com/node/2102

पक्या's picture

19 Feb 2009 - 1:20 pm | पक्या

अमेरिकेमध्ये राहून भारताला नावे ठेवणारे भारतीय पाहिले नाहीत असे नाही.
पण त्याच वेळी कंपनीने ग्रीन कार्ड करण्याची ऑफर दिलेली असताना किंवा ग्रीन कार्ड हातात मिळून देखील ते ठुकरावून भारतात परत गेलेले मित्र ही पाहिले आहेत. अमेरिकेत राहूनही इथले काही सुखावह न वाटणारे आणि भारतात परतायचे आहे पण अजुन परतले नाहीत असेही लोक पाहिले आहेत आणि इथली सिटीझनशिप घेउन कायमचे (?) भारतात परत गेलेली कुटुंबेही पाहिली आहेत.

परदेशी रहा, पैसा कमवा पण काही काळानंतर मायभूमीला परत जा (असं माझं व्यक्तिगत मत आहे ...कोणाला सल्ला देत नाहिये)...भारत इतकाही वाईट देश नाहीये की एकदा परदेशी गेलो की परत यावेसेच वाटू नये.

अमेरिकेचे नागरीकत्व घेताना शेवटची पायरी म्हणजे शपथविधी. ह्याचे मला नेहमी कोडे पडलेले आहे की भारतीय लोक 'अमेरिकेशी एकनिष्ठ राहीन 'वगैरे अशी शपथ कशी घेतात? खरीखुरी शपथ घेतली तर तुम्हाला मायभुमीबद्द्ल प्रेम नाही आणि खोटी शपथ घेतली तर तुम्ही अमेरिकन सरकारला फसवत आहात असा अर्थ होत नाही का ? कि असं दुट्प्पी वागून फक्त आपला स्वार्थ साधायचा?

मनीषा's picture

19 Feb 2009 - 6:42 am | मनीषा

तुम्ही जे लिहिले आहे ते तुमचे अनुभव आहेत कि वाचून / ऐकून बनलेले विचार आहेत?
देशप्रेम ही काही कोणाची मक्तेदारी नाही ... तुम्ही भरतात रहातात याचा अर्थ by default तुम्ही देशभक्त आणि निष्ठावान भारतीय नागरिक होत नाही .
आणि भारतात रहाणे हा काही अस्सल भरतीय असण्याचा एकमेव निकष नाहीये .

पक्या's picture

19 Feb 2009 - 1:18 pm | पक्या

मनिषाताई,
'अतिशय एकांगी विचार..' हे आपण सदर लेखकाला (महेन्द्र) उद्देशून लिहिले आहे की माझ्या प्रतिसादाला उत्तर देण्याकरता लिहीले आहे? कोणाबद्द्ल बोलताय त्याचा उल्लेख करायला हवा होता.
(माझ्या प्रतिसादाला असेल तर मी कुठलेच विचार मांडले नाहीयेत फक्त माझी निरिक्षणे नोंदवली आहेत आणि मला नेहमी पडणारा प्रश्न लिहीला आहे. आणि मी सध्या भारतात रहात नाहीये.)

सुचेल तसं's picture

19 Feb 2009 - 7:06 am | सुचेल तसं

महेंद्र साहेब,

आपल्या लेखावरुन असं वाटतं की, आपलं एखाद्या परदेशस्थ भारतीयाशी भांडणं असावं. त्यावरुन तुम्ही सरसकट सगळ्यांना एकाच तराजूत तोलण्याची चूक करत आहात. तुम्ही ज्या नेत्याबद्दल (लालूंबद्दलच ना?) त्यांना "हार्वर्ड ला लेक्चर द्यायला बोलवतात" असं विधान केलं आहे, त्या नेत्याला आपण आदर्श मानायचं का? तुम्हाला जर लालू ग्रेट वाटत असतील तर त्यांनी बिहारची जी वाट लावली आहे त्याबद्दल तुमचं मत जाणून घ्यायला उत्सुक आहे.

मिपावर बरेच परदेशस्थ भारतीय आहेत, पण आजपर्यंत मी कुणालाही भारतात राहणार्‍यांना ज्ञान शिकवताना पाहिले नाही. आधीच जातीची/धर्माची कुंपणं आहेत. त्यात अजून तुम्ही परदेशस्थ्/भारतात राहणारे असा भेद करु नका ही नम्र विनंती.

तू माझ्याशी चांगलं वागलास की मी तुझ्याशी चांगलं वागतो,
तू माझ्याशी वाकडं वागलास की मी तुझ्याशी वाकडं वागतो,
मग माझं म्हणून काय असतं?
-श्याम मनोहर

साजिरा's picture

19 Feb 2009 - 11:51 am | साजिरा

माझी मागे एकदा मायबोलीवर लिहिलेली "चिऊच्या घराची गोष्ट" वरती आली आहे. ही गोष्ट लक्षात आणून दिल्याबद्दल फारेंडाचे आभार मानतो.
अशा वेळी लिंक दिली जावी अशी अपेक्षा असते. जेणे करून मुळ लेखकाला त्याचे क्रेडिट मिळावे. पण तरी हरकत नाही. माझ्या वरील कवितेला जे प्रतिसाद आले होते त्यातच कुणीतरी तेव्हा मला 'आमच्या मित्रांना मेल करू का?' असे विचारले होते; व मी त्याला 'नक्कीच करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही कविता पोचावी असे मला वाटते' असे उत्तर दिले होते. मेल मधून फिरत फिरत ही कविता इथे आली असेल, तर तो उद्देश साध्य झाला असे म्हणावे!!
असो. वरती कवितेवर प्रतिक्रिया दिलेल्यांचे आभार.
बाकी तुमची चर्चा चालू द्या.

नाटक्या's picture

19 Feb 2009 - 12:37 pm | नाटक्या

ही कविता मला ढकलपत्रातून मिळाली. त्यावर कोणाची, कुठून, कशी हे काही लिहीलेले नव्हते आणि मलाही ठावूक नव्हते. तसेच जेव्हा ती कविता ईथे टाकली तेव्हा त्याचा बद्द्ल मी क्रेडिट माझ्या कडे घेतले नाही (कविता टाकतानाच याचा उल्लेख केला आहे. वर असेही संपादक मंडळाला लिहिले आहे कि जर जरूर वाटली तर काढून टाकावी). जर माहीत असते तर १००% सांगतो की त्या बरोबर तुमचे नाव आणि लिंक दिली असती.

तरी देखील एक सुंदर कविता लिहिल्या बद्दल आणि त्या मार्गाने आमच्या भावनांना शब्दरूप दिल्याबद्दल धन्यवाद...

- नाटक्या

कवटी's picture

19 Feb 2009 - 2:48 pm | कवटी

आ रे फक्त अमेरिकाच का? तिकडे आफ्रिका ,वेस्ट इंडीज मधे पण झाडा रे २-४ दुगाण्या... आपला टार्‍यापण येयिल आखाड्यात....

कवटी

http://www.misalpav.com/user/765

पक्या's picture

19 Feb 2009 - 3:01 pm | पक्या

>>आ रे फक्त अमेरिकाच का? तिकडे आफ्रिका ,वेस्ट इंडीज मधे पण झाडा रे २-४ दुगाण्या...
नाही हो. तिथे अमेरिकेच्या तुलनेत कायमस्वरुपी रहाणारे खूप कमी आहेत. आणि अमेरिकन डॉलर ला भाव आहे ना. ;)

'इथे वाचा' वर मला तरी स्वाती दांडेकर ह्यांचे विचार (ज्यावरून एवढा गदारोळ माजला आहे) वाचायला मिळाले नाहीत. श्री. महेंद्र ह्यांनी 'स्वाती दांडेकर' ह्यांच्या विचारांचा 'सकाळ' ह्या वर्तमानपत्राचा दुवा द्यायला हवा होता, असे वाटाते. असो.

मी अमेरिकेत नाही पण भारताबाहेर २५ वर्षे राहिलो आहे. अजूनही त्या देशाशी संबंध राखून आहे. ह्या वास्तव्यात मला तरी भारताला शिव्या घालणारा कोणी महाराष्ट्रीयन (की महाराष्ट्रिय?) भेटला नाही. सर्वांना भारताबद्दल प्रेमच दिसून आले. भारतातील गैरप्रकारांवर बोट ठेवणे म्हणजे काहितरी मोठ्ठे पाप करणे असा विचार कोणाच्याही मनात येत नाही. भारतात बुद्धीवंतांची कमी नाही. पण भ्रष्टाचार, राजकारण्यांची समाजकारणातील उदासिनता, समाजातील वाढती ऐहिकता, पारंपारिक जिवनमुल्यांचा र्‍हास, नविन पिढीची ऐतिहासिक वारशाबद्दलची अनास्था आदी अनेक मुद्दे भारत भेटीत प्रकर्षाने जाणवतात त्यावर 'तिथे' मराठी माणसांमध्ये स्वाभाविक पणे चर्चा होते. नुसती चर्चा होते का? तर नाही पुढील पिढीला संस्कारक्षम बनविण्यचा प्रयत्नही होतो. पण त्यावरही,' 'मुंजी लावल्या, शुभंकरोती शिकविले' म्हणजे आपण खूप काही संस्कार केले, असे एन्. आर्. आय्. ना वाटते', असे हिणकस शेरे, स्वदेशी आणि स्वबांधवांकडून कानावर येतात. असो. त्यांचे विचार त्यांच्या जवळ असे म्हणून सोडून द्यायचे.
भारताबद्दल प्रेम वाटते तर परदेशात का राहता? परत येऊन भारताची सेवा करा, त्याला प्रगतीपथावर न्या. असा पोकळ आरडाओरडा करण्यापेक्षा आपण इथे आहोत तर प्रथम आपण स्वतःला सुधारू, मग आपल्या गल्ली-मोहल्ल्याला सुधारू, पुढे आपल्या शहरला सुधारू म्हणजे देश आपोआप सुधारुन आज ना उद्या प्रगती पथावर नेता येईलच. १०० कोटी जनतेतील फक्त १ कोटी जनता परदेशात आहे असे धरले तर ९९% टक्के लोकांनी देश सुधारण्याची जबाबदारी घ्यायची की १कोटी जनतेवर दोषारोप करून आगपाखड करायची? स्वाती दांडेकराचे विचार माझ्या वाचण्यात आले नाहीत त्यामुळे त्यावर मी काही भाष्य करू शकत नाही. पण त्या काहितरी 'गैर' बोलल्या आहेत असे एकूण श्री. महेंद्र ह्यांच्या लिखाणावरून वाटते. ठीक आहे ते त्यांचे विचार आहेत असे म्हणून तिकडे दुर्लक्ष करून आपण आपले लक्ष भारताच्या सद्य परिस्थितीवर केंद्रित करावे.
वरील सर्व सल्ला/उपदेश मी खडकावर उभा राहून पाण्यात बुडणार्‍याला पोहण्याचे धडे देत नसून मी स्वतः ह्या व्यवस्थेत गटांगळ्या खात पोहण्याचा प्रयत्न करतो आहे. दर महिना काही हजार परकिय चलन भारताला मिळवून देतो आहे. भारतातल्या १५ जणांना परदेशात पोटापाण्याला लावले आहे, भारतात सर्व टॅक्स भरून व्यवसाय उभारतो आहे. भारतात ३० जणांना पोटापाण्याला लावले आहे. पुण्यासारख्या शहरात सुशिक्षित (?) म्हणवणारे वय वर्षे १५ ते ७५ पर्यंत सर्व, स्त्री काय किंवा पुरुष काय, जेंव्हा बेशिस्तपणे वागून रहदारीचे नियम तोडतात तेंव्हा त्यांचा रोष पत्करून मी त्यांना समजविण्याचे, लोकशिक्षणाचे कार्य तिथल्या तिथे रस्त्यातच करीत असतो. भारताची पुढची पिढी महत्त्वाची. माझ्या स्वतःच्या मुलाला तो परदेशात असल्यापासून सार्वजनिक ठिकाणी कचरा न करणे बद्दल वारंवार मार्गदर्शन केले आहे. आज तागायत विविध स्तरावर त्याला 'घडविण्याचा' प्रयत्न करतो आहे. तसेच गल्लीबोळात क्लासेसच्या बाहेत रस्त्यावर आपापल्या दुचाक्या उभ्या करून गप्पा मारत बसलेल्या विद्यार्थ्यांनाही 'रहदारीला अडथळा निर्माण होईल असे वागू नका' अशी हात जोडून विनंती करीत असतो. रस्त्यात पान खाऊन थुंकणार्‍यांनाही समजावत असतो. असो. शासनाचीही काही जबाबदारी असते. आपल्याकडे सार्वजनिक मुतार्‍या अगदी नगण्य असतात. असतात त्याही 'वापरण्यापलिकडच्या' अवस्थेला पोहोचल्या असतात. स्त्रियांसाठी तर अशी सार्वजनिक सोयच नसते. समानतेचा ढिंढोरा पिटण्याच्या आजच्या काळात ही असमानता का? त्या मुळे कोणी पुरूष मंडळी रस्त्याच्या कडेला उभी असतील तर ते गैर आहे हे जाणूनही तिकडे दुर्लक्ष करावे लागते. मी स्वतः, बँका, मॉल, उपहारगृहे अशा आस्थापनांमधील स्वच्छतागृहांचा वापर निसर्गाच्या हाकेला ओ देण्यासाठी करतो. पण अशी नागरी सुविधा उपलब्ध करून न देणे (जनतेकडून भला थोरला कर वसूल करूनही) हे सरकारचे अपयशच आहे.
'धंदा, स्वतःचा व्यवसाय करणार्‍यांसाठी सरकारने अनेक नियम केलेले असतात पण त्यांचे काटेकोरपणे पालन करून व्यवसाय करणे कधी शक्य होऊ नये अशाच पद्धतीने ते बनविले असतात.' हे माझे विधान नसून प्रसिद्ध उद्योगपती श्री. शंतनुराव किर्लोस्करांचे ७०च्या दशकातले वाक्य आहे. मी फक्त सध्या तसा अनुभव घेतो आहे. माझ्या उपहारगृहासाठी अग्निशमन दलाचे ना हरकत प्रमाणपत्र मिळविण्यासाठी मला काही 'खर्च ' आला. तो करण्यावाचून गत्यंतरच नसते. कारण अग्निशमन दलाचा अधिकारीच मला सांगतो की असे एकेक नियम आहेत की ते पाळून तुम्ही व्यवसाय करूच शकणार नाही. तिच कथा महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाची, तिच कथा पोलिस परवान्याची, तिच कथा महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्डाची आणि तिच कथा कोर्ट कचेर्‍यातली. एकतर ह्या भ्रष्टाचाराचा भाग बना नाहितर घरी बसा. मी कायद्याला धरूनच वागेन, व्यवसाय करेन असे म्हणाल तर तुमचा व्यवसाय ४ महिनेही चालू देणार नाही ही व्यवस्था.
ह्या, वरील उदाहरणांना 'टिप ऑफ द आईस बर्ग' असेही म्हणता येणार नाही, इतका हा 'कर्करोग' भारतभर पसरला आहे. कुणा परदेशस्थ मराठी (किंवा कोणीही भारतियाने) काही कॉमेंट करावी आणि आपण तमाम परदेशस्थांवर उखडण्याला समर्थनिय मानावे तर त्याच मापदंडाने जे काही भारतात चालले आहे त्या ह्या पापाला वाचा फोडून, त्याविरुद्ध चळवळ उभारण्याची प्राथमिकता कितीतरी पटीने अधिक आहे. कुणा एका व्यक्तीच्या वक्तव्याने आपण विद्ध होऊन 'शितावरून भाताची परीक्षा' हा न्याय सर्व पारदेशस्थांना लावित आहात पण भारतभर पसरलेल्या 'भाता'कडे सोयिस्कर दुर्लक्ष करीत आहात.
'निंदकाचे घर असावे शेजारी' असे कुणा संताने म्हणून ठेवले आहे. त्याचा अर्थ एवढाच कि, 'त्याच्या निंदेतून आपल्याला आपलेच दोष स्वच्छ दिसून येतात. ते दूर करून स्वतःचे व्यक्तिमत्त्व सुधारण्याचा आपल्याला वाव मिळतो.' खरे पाहता आपण अशी स्पष्ट टिका करणार्‍यांचे आभारच मानले पाहिजेत.

असो. हे माझे विचार आहेत. तुम्हाला ते पटले तर उत्तमच आहे नाही पटले तरी मी माझ्या मार्गावरून मार्गक्रणा करीत राहणारच आहे.
धन्यवाद.

दारूने प्रश्न सुटत नाहीत, पण दुधाने तरी कुठे सुटतात?

नाटक्या's picture

19 Feb 2009 - 3:17 pm | नाटक्या

मानले तुम्हाला. अतिशय संयमी आणि समर्पक प्रतिक्रिया दिलीत.

१०० कोटी जनतेतील फक्त १ कोटी जनता परदेशात आहे असे धरले तर ९९% टक्के लोकांनी देश सुधारण्याची जबाबदारी घ्यायची की १ कोटी जनतेवर दोषारोप करून आगपाखड करायची?

नेमके वर्मावर बोट ठेवलेत आपण.

- नाटक्या

पक्या's picture

19 Feb 2009 - 3:28 pm | पक्या

>>१०० कोटी जनतेतील फक्त १ कोटी जनता परदेशात आहे असे धरले तर ९९% टक्के लोकांनी देश सुधारण्याची जबाबदारी घ्यायची की १ कोटी जनतेवर दोषारोप करून आगपाखड करायची?

पेठकर काकांची प्रतिक्रिया छानच त्याबद्द्ल वाद नाही. फक्त एकच सांगायचे की ९९% मध्ये देश सुधारण्याची जबाबदारी पेलवणारे किती असावेत? बेसुमार लोकसंख्या वाढलेल्या या देशात दोन वेळच्या खाण्याची भ्रांत असलेले गरीब जन किती असावेत? सरसकट ९९% आकडा बरोबर नाही वाटत.

प्रभाकर पेठकर's picture

19 Feb 2009 - 3:45 pm | प्रभाकर पेठकर

'तो ' प्रॉब्लेम तर १ टक्यातही असणारच. ह्या १ टक्के अनिवासी भारतियात सर्वजण थोडेच शिकले-सवरले असणार आहेत? जे काही शिकले-सवरलेले आहेत त्यांच्यातही ती 'धमक' असेलच असे कशावरून?
स्वातंत्र्य संग्रामात ज्यांनी ज्यांनी उडी घेतली ते सर्व उच्चविद्याविभूषित नव्हते. परिपक्व बुद्धीचा कोणी अशिक्षितही समाजकारण करू शकतो. असो.
तसेच, ९९% टक्के म्हंटले म्हणजे अगदी बारावीच्या रिझल्ट सारखे नाही म्हणायचे आहे मला. मुद्दा एवढाच आहे की अनिवासी भारतिय निवासी भारतियांच्या तुलनेत बरेच कमी आहेत.
तुमच्या समाधानासाठी १ % आणि ४०% असे प्रमाण घेतले तरी तेही अनिवासींपेक्षा बरेच भारी आहे.
सगळेच शिकले/सवरलेले/समर्थ अमेरिकेत गेले आणि अशिक्षित/बावरलेले/असमर्थ भारतात मागे राहिले अशी परिस्थिती नाहीए.

दारूने प्रश्न सुटत नाहीत, पण दुधाने तरी कुठे सुटतात?

सूहास's picture

19 Feb 2009 - 5:47 pm | सूहास (not verified)

हे सा॑गतोय..जे परदेशात बसुन कविता पाठवितात त्या॑च्यासाठी,,

काय असत माहीत आहे का ?
कचरा असेल ना तर दुरवरून " वास "येतो,त्याचप्रमाणे वाईट बाब लगेच लक्षात येते,
अत्तर मात्र बोटाला लावुन नाकाजवळ न्याव लागत्,त्याच प्रमाणे चाग॑ली बाब लक्षात येण्यासाठी त्याच्याजवळ जाव॑ लागत,
दुर असणार्‍या॑ना का समजणार.

समस्या

१)अस्वछता : ही एक सार्वजनीक जबाबदारी आहे,आपण जे काही करताय ते व॑दनीय आहे.
मी काय केल आहे : अशीच "नागपुरचाळ" ह्या झोपडट्टीची सुधारणा केली आहे,आता तिथे जाल तर ती झोपडपट्टीची वाटणार नाही,"सुविधा"आणी आमदाराचे हात पाय जोडुन सार्वजनीक स॑डास (एकुण १०) बाधुन घेतेले आहेत.एक जिम (टार्‍या पुण्याला आला की खास निमत्र॑ण आहेच्,सोबत त॑दूरी.ह.घ्या.)गेल्या आठ वर्षापासुन आम्ही(साधारण १५० मे॑बर)तिथे एक फ॑ड चालवितो.२% व्याजाने केवळ शिक्षणासाठी कर्ज देतो,मागील वर्षा॑पासुन१% केला आहे.बरेच जण उच्चपद्स्थ आहेत,भाउ,मित्र,झोपडपट्टीच्या मुली ,मी स्वतः आतापर्यत पर्यत यु.एस्.ला जाउन आलो,दोन जण I.I.T. engineers आहेत,बायका॑बरोबर यु.एसला रहातात.पण मुळ घर अजुन नागपुरचाळीत,
अपेक्षा:जिथे असाल तिथे स्वछता असा आग्रह धरा...जालावर खडे फोडण्यापेक्षा..आम्हा परदेशी वास्तव्यात असलेल्या भारतीय बाध॑वाकडुन हिच अपेक्षा करतो..

सुहास..

संदीप चित्रे's picture

19 Feb 2009 - 7:27 pm | संदीप चित्रे

तुमचा उपक्रम खूपच स्तुत्य आहे... पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

प्राजु's picture

19 Feb 2009 - 8:04 pm | प्राजु

तू आणी तुझ्या स्टॅन्ड अप कॉमेडीच्या ग्रुप ने काय केलं ते नाही सांगितलंस तू.
हा संदीपचा ग्रुप... एक कवडीही न घेता महाराष्ट्र फाऊंडेशन साठी पैसे जमाकरण्या करता त्यांच्या ३ तासाच्या शो चे खेळ करतात. आणि जमलेला सगळा निधी महाराष्ट्र फाऊंडेशन ला पाठवून देतात. नेहमीच्या कामकाजातून.. विकांताला सगळे कार्यक्रम असतात यांचे. आता पर्यंत कित्येक हजार डॉलर्स यांनी पाठवले आहेत महाराष्ट्र फाऊंडेशन साठी.
आता काय म्हणाल याला?
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

पक्या's picture

19 Feb 2009 - 10:28 pm | पक्या

>>स्टॅन्ड अप कॉमेडीच्या ग्रुप .....महाराष्ट्र फाऊंडेशन साठी. आता काय म्हणाल याला?
देशसेवा, भरीव योगदान.
चित्रे साहेब सलाम आपल्या कार्याला.

यशोधरा's picture

19 Feb 2009 - 10:43 pm | यशोधरा

अतिशय उत्तम प्रतिक्रिया पेठकर काका!

सायली पानसे's picture

19 Feb 2009 - 3:26 pm | सायली पानसे

काका सहमत आहे....अगदी छान लिहिल आहे.
आम्हि हि आमच्या परिने खारिचा वाटा उचलण्याचा प्रयत्न करतोच ...पण उगाच आम्ही परदेशात राहतो म्हणून कोणी काहीही बोलला कि त्रास होतो. आमचा देशप्रेम खोट त्यांच ते खर अस नसत ना.

प्रभाकर पेठकर's picture

19 Feb 2009 - 4:04 pm | प्रभाकर पेठकर

'उडदा माजी काळे गोरे' हे सर्वत्र असणारच. जास्त मनावर नाही घ्यायचे. समाजकारण करीत राहावे. कोणी काहीही म्हणू देत. 'ऍकला चॉलो रे!'

दारूने प्रश्न सुटत नाहीत, पण दुधाने तरी कुठे सुटतात?

सिद्धेश's picture

19 Feb 2009 - 5:18 pm | सिद्धेश

१०० कोटी जनतेतील फक्त १ कोटी जनता परदेशात आहे असे धरले तर ९९% टक्के लोकांनी देश सुधारण्याची जबाबदारी घ्यायची की १ कोटी जनतेवर दोषारोप करून आगपाखड करायची?

आज भारतातील साक्षरता फक्त६०%आहे. आणि ४०%लोकांना पोटभर खायला पण मिळत नाही. मग त्यांच्याकडून काय डोंबलाची अपेक्षा करणार देश सुधारण्याची? परदेशात असणार्या भारतीयांना उत्तम ज्ञान आहे. जागतिक घडामोडी काय चालू आहेत भारताला प्रगतीसाठी काय करायला पाहिजे याची त्यांना चांगली माहिती आहे. आणि एवढी सगळी साधनं असतानाही ते पूर्ण योगदान देत नाहीत यामुळे च जीव तुटतो. उत्तम ज्ञान असणारे भारतात पण आहेत पण त्यांच्यामध्ये हे १लाख मिसळले तर संख्या नक्कीच वाढेल.
आसिन्धुसिन्धुपर्यंता यस्य भारतभूमिका |
पित्रुभू: पुण्यभू:श्चैव सः हिन्दु इति एव स्मृतः ||

प्रभाकर पेठकर's picture

19 Feb 2009 - 10:38 pm | प्रभाकर पेठकर

भारतातील साक्षरता फक्त६०%आहे. आणि ४०%लोकांना पोटभर खायला पण मिळत नाही. मग त्यांच्याकडून काय डोंबलाची अपेक्षा करणार देश सुधारण्याची?

मुळात देश सुधारणे म्हणजे काय? ह्यावर सखोल अभ्यास झाला पाहिजे. मला वाटते जे अशिक्षित, निरक्षर आहेत त्यांना 'ग्राम स्वच्छता अभियाना'चे महत्त्व पटले आणि त्यांनी ते अभियान यशस्वी करण्याचा प्रयत्न केला तरी त्यांनी देशसेवा केली असेच म्हणावे लागेल.
दूसरे, ते शिकले नाहित निरक्षर राहिले पण त्यांनी त्यांच्या मुलांना प्राथमिक का होईना शिक्षण देण्याचा प्रयत्न जरी केला तरी त्यांच्या हातून देशसेवा घडली असेच म्हणावे लागेल.
त्यांनी व्यसनमुक्तीचा प्रयत्न केला तरी देशसेवा घडेल.
त्यांनी 'तंटामुक्त गाव' अभियान चालविले तरी देशसेवा घडेल.
देशसेवा अनेक मार्गांनी करता येते. शिक्षणाचा, साक्षरतेचा इथे संबंध नाही.
जितके सुशिक्षित अनिवासी आहेत त्यांच्या पेक्षा कितीतरी सुशिक्षित निवासी भारतिय आहेत. त्या १ टक्यावाचूनच भारताची सर्व प्रगती अडली आहे अशा आडमुठ्या गैरसमजात राहणे मला तरी रुचत नाही.

सिद्धेश's picture

19 Feb 2009 - 5:26 pm | सिद्धेश

भारतात ३० जणांना पोटापाण्याला लावले आहे. पुण्यासारख्या शहरात सुशिक्षित (?) म्हणवणारे वय वर्षे १५ ते ७५ पर्यंत सर्व, स्त्री काय किंवा पुरुष काय, जेंव्हा बेशिस्तपणे वागून रहदारीचे नियम तोडतात तेंव्हा त्यांचा रोष पत्करून मी त्यांना समजविण्याचे, लोकशिक्षणाचे कार्य तिथल्या तिथे रस्त्यातच करीत असतो. भारताची पुढची पिढी महत्त्वाची. माझ्या स्वतःच्या मुलाला तो परदेशात असल्यापासून सार्वजनिक ठिकाणी कचरा न करणे बद्दल वारंवार मार्गदर्शन केले आहे. आज तागायत विविध स्तरावर त्याला 'घडविण्याचा' प्रयत्न करतो आहे. तसेच गल्लीबोळात क्लासेसच्या बाहेत रस्त्यावर आपापल्या दुचाक्या उभ्या करून गप्पा मारत बसलेल्या विद्यार्थ्यांनाही 'रहदारीला अडथळा निर्माण होईल असे वागू नका' अशी हात जोडून विनंती करीत असतो. रस्त्यात पान खाऊन थुंकणार्‍यांनाही समजावत असतो.

आप्ण केलेल्या या देशसेवेबद्द्ल मी एक भारतीय म्हणून आपला शतशः ऋणी आहे.

आसिन्धुसिन्धुपर्यंता यस्य भारतभूमिका |
पित्रुभू: पुण्यभू:श्चैव सः हिन्दु इति एव स्मृतः ||

प्रभाकर पेठकर's picture

19 Feb 2009 - 10:41 pm | प्रभाकर पेठकर

मी माझे कर्तव्य करतो. 'ऋणाची' भाषा मी करत नाहिए.

वजीर's picture

19 Feb 2009 - 9:15 pm | वजीर

अमेरिकेत गेला कुणी तर चांगलेच आहे की. स्वताच्या हिमतीवर परदेशात कुणी करियर केले तर बाकिच्याना का त्रास? तुमच्यात धमक असेल तर तुम्ही तर पण जा ना परदेशात.

पक्या's picture

19 Feb 2009 - 10:21 pm | पक्या

>>अमेरिकेत गेला कुणी तर चांगलेच आहे की. स्वताच्या हिमतीवर परदेशात कुणी करियर केले तर बाकिच्याना का त्रास? ..तुमच्यात धमक असेल तर तुम्ही तर पण जा ना परदेशात.

मुद्दे भरकटवू नका हो. परदेशात शिक्षण, करियर - नोकरी , पेसा कमावणे चूक की बरोबर असा वाद नाहिये. आणि तो नसावाही.
परदेशी राहून भारतातल्या सिस्टिम ला नावे ठेवणे ह्या विरोधात लेखकाने लिहिले आहे.
परदेशी जायला धमक च लागते असे नाही...हुशारी , चांगले शिक्षण असून , नोकरीतला भरभक्कम अनुभव असूनही काही जणांना जायची संधी मिळत नाही. त्यात घरच्या महत्वाच्या जबाबदार्‍या , पैशाची कमतरता, नशीब हे भाग ही असू शकतात. इथे अनिवासिंच्या विरोधात लिहीणारे सर्वच भारतात रहात आहेत, ते कधीही परदेशी गेले नाहीत आणि त्यांच्यात धमक नाहिये हा तुमचा गैरसमज आहे.

वजीर's picture

19 Feb 2009 - 10:31 pm | वजीर

माझ्या म्हणण्याचा विपर्यास करु नका. मी कधीच असे म्हणालि नाही कि जे परदेशी जात नाहीत त्यांच्यात धमक नाही. माझे म्हणणे इतकेच आहे की जे जातात ते स्वबळावर जातात दुरदेशी खेळ मांडणे हा काही वाटतो तितका सोपा प्रकार नाही. तरीही उगीचच त्याना हिणवणे, हंटरने मारने वगैरे शब्दप्रयोग योग्य नाहीत. हे लोक काही चोर दरोडेखोर आहेत का? कि तुमच्या वाट्याचं हिसकावुन खात आहेत?

नीधप's picture

22 Feb 2009 - 4:28 am | नीधप

>>परदेशी जायला धमक च लागते असे नाही...हुशारी , चांगले शिक्षण असून , नोकरीतला भरभक्कम अनुभव असूनही काही जणांना जायची संधी मिळत नाही. त्यात घरच्या महत्वाच्या जबाबदार्‍या , पैशाची कमतरता, नशीब हे भाग ही असू शकतात. <<
सहमत. कारणांमधे ठरवून घेतलेले निर्णय हे पण समाविष्ट करा.

>>इथे अनिवासिंच्या विरोधात लिहीणारे सर्वच भारतात रहात आहेत, ते कधीही परदेशी गेले नाहीत आणि त्यांच्यात धमक नाहिये हा तुमचा गैरसमज आहे.<<
इथेही सहमत.

- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

पक्या's picture

19 Feb 2009 - 10:53 pm | पक्या

वजीरजी, मी स्वतः सध्या परदेशी च रहात आहे. त्यामुळे आपण म्हणताय त्या परिस्थितीबद्द्ल जाणून आहे.
विपर्यास नाही केलाय . 'तुमच्यात धमक असेल तर तुम्ही तर पण जा ना परदेशात' असे तुम्हीच आधीच्या प्रतिसादात लिहीले आहे ना. त्याला उत्तर दिलंय मी , ते नीट वाचल्यास आपल्याला समजेल. उगाच प्रतिसाद खोडून काढायचा म्हणून लिहू नका. हंटरने मारने असा शब्दप्रयोग मला दिसला नाही कुणी वापरलेला. वाचताना नजरचुकीने सूटला असेल तर माहीत नाही. ज्याने तो वापरला असेल त्याला तिथल्या तिथेच समज द्यायची होती ना मग.

कवटी's picture

20 Feb 2009 - 12:17 pm | कवटी

बाझवला तिच्यायला..!

अनिवासी आहेत असे आहेत. कुणी प्रेम करा किंवा जळा!

प्रेम करण्यार्‍यांबद्दल अर्थातच आपुलकी आहे. आणि जळणार्‍यांना अनिवासी साले फाट्यावर मारतात. या सर्व जळूंना हे अनिवासी पुरून उरतील हे नक्की! आणि उरलेही आहेत!

कवटी अभ्यंकर
अवांतर : सिरीयस लेखाच्या विडंबनात आलेल्या सिरीयस प्रतिक्रीयांचे मुळ लेखात विडंबन करायची नविन प्रथा सुरु करत आहोत.

हेरंब's picture

22 Feb 2009 - 4:53 pm | हेरंब

ज्यांना जायला मिळत नाही त्यांच्या मनात एक सुप्त असुया असते, ती अशा चर्चेत बाहेर येते. आधी बाहेर का जावे लागते त्याचा विचार करा. इथले सगळे मार्ग तुम्हीच बंद करुन टाकलेत तर ती पोरं काय स्वस्थ बसणार का उपाशी मरणार? ती जाणारच. आधी या देशातले घाणेरडे राजकारण बंद करा, सर्वांना समान संधी उपलब्ध करा आणि तरी कोणी गेले तर बोला.