Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by जयंत कुलकर्णी on Tue, 11/29/2016 - 10:20
लेखनविषय (Tags)
कथा
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा
...सारंगची भानगड ऐकून मित्रमंडळीत एकदम गडबड उडाली. मध्यमवर्गीय मानसिकता असलेल्या आमच्या मित्रमंडळींची फार मोठी पंचाईत झाली खरी. त्याला आता कसे सुनवायचे, किंवा त्याची मित्रमंडळींतून कशी हकालपट्टी करायची याबद्दल एकत्र व खाजगीत चर्चा झडू लागल्या. खरे तर त्याचा हा वैयक्तिक प्रश्र्न होता आणि आमच्यापैकी कोणालाही त्यात नाक खुपसायची गरज नव्हती. पण समाजाच्या संस्कृतीच्या रक्षणाची जबाबदारी आमच्यावरच असल्यासारखी आमची मंडळी व त्यांच्या बायका वागत होत्या. सारंगने सध्याच्या नैतिक अधिष्ठानाला जोरदार धक्का दिला व आमच्या मित्रमंडळींना व त्यांच्या बायकांना तोंडघशी पाडले. त्यांना समाजात तोंड दाखविण्यास जागा उरली नाही असे त्यांचे म्हणणे होते. बायकांनीही फारसा विचार न करता नवऱ्यांच्या हो ला हो मिळविण्यातच आपली खरी वडपूजा आहे अशा ठामसमजुतीने त्यांच्या विचाराभोवती स्वत:चे धागे गुंडाळले. यात त्या बाईचेही म्हणणे ऐकून घ्यायला पाहिजे हे त्या सोयिस्कररित्या विसरल्या. सारंग काय म्हणतोय याचा विचार न करता हे सगळे चालले होते. तो सांगून सांगून दमला की त्याचीही बाजू कोणीतरी ऐकावी. पण नाही. पुरुष मंडळी खरे तर त्याच्यावर जळत होती. अशी सुंदर स्त्री त्याच्या नशिबी यावी याचा सगळ्यांनाच मत्सर वाटत होता. मत्सराने विचारांना तिलांजली दिली व त्याच्या धुरात आमच्या मैत्रीचा जीव घुसमटला. सारंगने गावाहून एका बाईला पळवून आणले होते. दुर्दैवाने तिचे लग्न झाले होते. त्यामुळे हे सगळे मोहोळ उठले होते. असो. आज याचा तुकडा पाडायचा असे ठरवून सगळे भेटणार होते. अखेरीस सगळे समीरच्या घरी जमले. बायकांनीही हट्ट धरल्यामुळे सारंगच्या प्रेमपात्रासही हजर होण्यासाठी हुकुम सोडला गेला होता. आता तुम्ही विचाराल की सारंगने हे सर्व कसे काय कबूल केले. एकतर त्याला तो याला यशस्वीपणे तोंड देईल याची त्याला खात्री असावी. दुसरे म्हणजे आम्ही शाळेपासून मित्र असल्यामुळे त्याला हे बंध तोडणे जड जात असावे आणि तिसरे पण मुख्य म्हणजे समाजातील अत्यंत सामान्य विचारांच्या माणसांवर व त्यांच्या सामान्य विचारांवर आसूड ओढण्याची एकही संधी तो सोडत नसे. ग्लास भरल्यावर चर्चा सुरु झाली. प्रत्येकाने त्याचे हे वागणे कसे आवडले नाही, त्याच्या अशा वागण्याने त्यांचीही कशी बदनामी होते इ.इ. ठासून सांगितले. बायकांना खरे तर यात काहीच रस नव्हता. त्यांना रस होता त्यांच्या प्रेमकहाणीत. ते एकमेकांना कसे भेटले, तिच्या नवऱ्याने आता याचा सूड घेतला तर.....म्हणजे त्यांना या कहाणीच्या सिरियलमधे खरा रस होता. पार्वती मात्र गुपचुपपणे एका खिडकीजवळ खुर्चीत बसली होती. फारच झाले की खिडकीबाहेर तंद्रीत नजर लावण्याचे नाटक करीत होती. पुरुष मंडळी तर चोरुन तिच्याकडे चोरुन पहाण्यात गर्क होती. एका दोघांना तिच्याकडे पाहताना सारंगने त्यांना पकडले सुद्धा. त्यांच्या ओशाळलेल्या हास्याकडे पहात त्याने नुसते स्मितहास्य केले. पण त्या हास्याने आमच्या सगळ्यांचे पितळ उघडे पाडले हे मात्र मान्य करायलाच हवे. असो. आता तुम्हाला प्रकरण काय आहे याची कल्पना आली असेल्. अखेर सांरंगने तोंड उघडले. ‘‘मला कल्पना आहे की तुमच्या चारित्र्य या विषयीच्या भ्रामक समजुतींना फार मोठा धक्का बसलाय. अर्थात मी ‘तुम्हाला काय करायचे आहे माझ्या वैयक्तिक आयुष्यात नाक खुपसून?’ असे सहज विचारु शकलो असतो पण मी तसे करणार नाही. त्याची कारणे नंतर पाहू. पण माझी बाजू मांडण्याआधी मी तुम्हाला एक कथा सांगतो. नंतर काही प्रश्र्न विचारतो. त्याची उत्तरे प्रामाणिकपणे देण्याची गरज तुम्हाला आहे. बहुदा त्यानेच हे प्रकरण येथेच संपेल. नाही संपले तर मी तुमच्या सगळ्या प्रश्र्नांची उत्तरे देईन. या प्रश्र्नांची उत्तरे येथे उपस्थित असलेल्या सर्व स्त्रियांनीही द्यायची आहेत कारण त्यांनी एका स्त्रिला वाळीत टाकण्याचा निर्णय घेतला आहे. अजून एक. हे सगळे झाल्यावर आणि तुम्हाला माझी बाजू समजा पटली तर झालं गेलं सगळं विसरुन पूर्वीप्रमाणे आपले संबंध रहावेत अशी माझी इच्छा आहे आणि त्या इच्छेला तुम्ही प्रामाणिकपणे मान द्यावा असे माझे मागणे आहे. ‘‘माझी अजून एक अट आहे. माझे बोलून झाल्यावर सगळ्यांच्या नावाने चिठ्ठ्या टाकाव्यात व प्रत्येकाने त्याने केलेल्या कुठल्याही स्त्रिवरील अन्यायाची हकिकत सांगावी. मग ती कोणीही असो..प्रेयसी, बायको, आई, बहीण मैत्रिण...इ. इ. आयुष्यात कुठल्याच स्त्रीवर अन्याय केलाच नाही असे होऊ शकत नाही आणि मी तुम्हाला सगळ्यांना अगदी जवळून ओळखतोच. मान्य असेल तर चिठ्ठ्या टाका.’’ सगळ्यांनी अडखळत होकार दिल्यावर चिठ्ठ्या टाकल्या गेल्या. ..अर्थात त्याची ही अट कशाला मान्य केली, असे सगळ्यांना वाटले असणार या बद्दल शंकाच नाही. सात क्रमांक लावण्यात आले. समीरचा दुसरा क्रमांक आला. आठवा सारंग म्हणाला, ‘‘तर ऐका तर... शूरसेन देशात एक मथुरा नावाची नगरी होती. तेथे शूद्र जातीचा एक माणूस रहात होता. तो बुद्धीमान, कलेचा व सौंदर्याचा मोठा भोक्ता होता. मित्रामित्रांमधील कलह मिटविण्यात तर त्याचा हात कोणीही धरत नसे. तो त्याच्या या गुणामुळे एवढा लोकप्रिय झाला की त्याला सर्वजण कलह-कंटक म्हणून ओळखू लागले. एकदा कलहकंटकाने एका चित्रकाराने रंगविलेले कुठल्यातरी स्त्रीचे तैलचित्र पाहिले. ते चित्र पाहताच तो कामातूर झाला व म्हणाला, “महाराज या चित्रात भरपूर विरोधाभास भरलेला दिसतोय.” चित्रकाराने त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिल्यावर त्याने त्याच्या विधानापुष्ट्यर्थ खालील निरीक्षणे नोंदविली- ‘एवढी सुंदर स्त्री सामान्य, सभ्य घरात जन्माला येणे जरा अशक्यच वाटते पण तिच्या शांत, नम्र चेहऱ्यावरुन ती एका घरंदाज घरातील वाटते. तिचा चेहरा तरुण व शरीर एखाद्या तरुण वयातील स्त्रीसारखे दिसत आहे पण तिच्या डोळ्यातील भाव एखाद्या प्रौढ अनुभवी स्त्रीसारखे दिसत आहेत. तिने केसाची एकच वेणी घातली आहे पण तिचा पती परगावी गेल्याच्या इतर खुणा दिसत नाहीत. तिच्या फक्त उजव्या अंगावर नखक्षते दिसतात म्हणजे बहुधा ती एखाद्या वयस्कर माणसाची पत्नी असावी व ती असमाधानी असावी. रतिसुखापासून वंचित राहिलेल्या या स्त्रीचे चित्र तू कुठे काढले आहेस? कोणाची पत्नी आहे ही?’’ त्याने बांधलेले आडाखे बरोबर ठरल्याने त्या चित्रकाराने त्याचे अभिनंदन केले व म्हणाला, “उज्जैनीचा प्रसिद्ध सार्थवाह अनंतकीर्तिची ती पत्नी आहे. तिच्या नितंबाच्या मोहक हालचालींमुळे तिचे नाव नितंबावती पडले आहे. मी तिला प्रथम पाहिले तेव्हाच तिचे सौंदर्य माझ्या मनात भरल्यामुळे मी लगेचच तिचे तैलचित्र रंगविले.’’ कलहकंटक त्या चित्राकडे पहात तिच्या प्रेमातच पडला. तो इतका कामातूर झाला की त्याने तिच्या दर्शनासाठी तडक उज्जैनिचा रस्ता धरला. ज्योतिषाचा वेष करुन तो भविष्य सांगण्याच्या बहाण्याने तो तिच्या घरात शिरला. तेथे त्याला त्याच्या आराध्यदेवतेचे दर्शन झाले. तिला प्रत्यक्ष पाहताच तिला प्राप्त करण्याची त्याची इच्छा अजूनच प्रबळ झाली. तिच्या दर्शनाने तृप्त झाल्या झाल्या त्याने गावातील प्रतिष्ठितांची गाठ घेतली व स्मशानाचा राखणदार म्हणून ठेवण्याची त्यांना विनंती केली. अर्थातच त्या जागेवर काम करण्यासाठी कोणी मिळत नसल्यामुळे त्याची ती विनंती लगेचच मान्य करण्यात आली. नंतर त्याने एका अर्हंतिका नावाच्या श्रमणिकेशी संधान बांधले व प्रेतांवरील अनेक मौल्यवान वस्तू भेट देऊन तिला खूष केले. अर्हंतिकेकडून त्याने नितंबवतीला अनेक निरोप पाठविले पण ते सगळे प्रयत्न वाया गेले. अर्हंतिकेने शेवटी त्याला समजावून सांगितले की घरंदाज स्त्रिया अशा कारस्थानांना बळी पडून गैरमार्गाला लागणे अवघडच असते. हे पटल्यावर त्याने अर्हंतिकेला तिच्याकडे परत एकदा जाण्यास सांगितले व खाजगीमधे तिला निरोप सांगण्यास सांगितले, ‘मी जग फार जवळून पाहिले आहे. जगाचे भलेबुरे मार्ग मला चांगलेच माहीत आहेत पण मी आता सगळे सोडून योगाभ्यासाच्या मागे लागलोय. मी आपल्यासारख्या कुलीन स्त्रीला भ्रष्ट करण्याचा विचार तरी कसा करेन? मी तुमची परिक्षा घेत होतो. अर्थात आपण त्यात उत्तीर्ण झाला आहात हे सांगणे न लगे. आता तुम्हाला पुत्रप्राप्ती व्हावी एवढेच माझे परमेश्वराजवळ मागणे आहे. पण आपला पती पंडुरोगाने ग्रस्त आहे त्यामुळे ते अवघड आहे. आपण काळजी करु नका. आपण वृक्षवाटिकेमधे या. तेथे मी एका मांत्रिकाला पाठवतो. तेथे आपण आपले पाऊल त्याच्या हातात ठेवा व त्याला त्याचे मंत्र म्हणू द्या. एकदा हे झाले की प्रणयकाळात त्याच पायाने तुमच्या पतीच्या छातीवर एक लाथ मारा. याने त्याला त्याची शक्ती परत मिळेल व त्याच्यापासून आपल्याला पुत्रप्राप्ती होईल. एवढेच नाही तर तो शेवटपर्यंत आपल्या आज्ञेत राहील याची मी खात्री देतो..’ ‘मला खात्री आहे हा निरोप मिळाल्यावर ती तुझ्याबरोबर येण्यास तयार होईल. मी रात्री वृक्षवाटिकेत गेल्यावर तू तिला तेथे घेऊन ये. मी तुझे उपकार या जन्मी विसरणार नाही.’ अर्हंतिकेने त्याने सांगितल्याप्रमाणे सगळे केले. त्याच रात्री कलहकंटक आनंदाने वृक्षवाटिकेत गेला. अर्हंतकिनेही नितंबावतीचे मन तेथे जाण्याबद्दल वळविले. मंत्र उच्चारणावेळी त्याने तिच्या पायाला हलकासा हात लावला व चलाखीने तिच्या त्या पायातील पैजण काढून घेतले. एवढेच नाही तर त्याने तिच्या मांडीच्या आतील बाजूस एका सुईने जखम केली व तेथून पळून गेला. ती घाबरली व स्वत:च्या मूर्खपणाला दूषणे देत तिने त्या माणसाचा उद्धार केला व घरी परतली. घरी परत आल्यावर तिने ती जखम धुतली व त्यावर मलमपट्टी केली. आजारी असल्याचा बहाणा करत तिने तिच्या पायातील दुसरे पैंजण काढले व झोपी गेली. काही दिवस असेच गेले. इकडे हा बदमाष अनंतकीर्तिकडे ते पैजण विकण्यास गेला. अनंतकीर्तिने ते पैंजण त्याच्या पत्नीचे आहे हे ओळखले व त्याला ते कुठे सापडले हे दरडावून विचारले. पण तो गप्प बसला. खोदून विचारल्यावर त्याने ती हकिकत व्यापार्यांच्या समितीसमोरच सांगेल अशी अट घातली. अनंतकीर्तिने ताबडतोब त्याच्या पत्नीकडे तिची पैजणे पाठवून देण्यास सांगितले. तिने घाबरुन उत्तर दिले, ‘मी रात्री वृक्षवाटिकेत गेले असता माझे एक पैंजण तेथे पडले आहे. बराच शोध घेऊनही ते सापडले नाही पण मी दुसरे तुमच्याकडे पाठवीत आहे.’ ही माहिती मिळाल्यावर अनंतकिर्तीने ते पैंजण व कलहकंटकाला बरोबर घेऊन व्यापार्यांचे समिती कार्यालय गाठले. त्या बैठकीत उलट तपासणीला उत्तर देत असताना त्याने त्याला ते पैंजण कुठे व कसे सापडले ते सांगितले, “मी स्मशानभूमित रखवालदाराचे काम करतो हे आपल्याला माहितच आहे. आपणच मला ते काम दिले आहे. मी तेथेच राहतो व रात्री स्मशानात झोपतो कारण काही लोभी निशाचर रात्री प्रेते जाळण्यास येतात. त्या दिवशी रात्री मला एक बुरखा घेतलेली स्त्री एक अर्धवट जळालेले प्रेत चितेवरुन खाली खेचताना दिसली. माझ्या कर्तव्याला जागून, न घाबरता मी त्या स्त्रीला पकडले. झालेल्या झटापटीत तिचे हे पैंजण माझ्या हातात आले व तिच्या मांडीवर माझ्या हातातील शस्त्राने जखमही झाली. पण दुर्दैवाने ती पळून गेली. ते हे पैजण, याचे पुढे काय करायचे ते आपण ठरवा!’ त्याच्या कबुलीजबाबावर चर्चा झाल्यावर व मांडीवरील जखमेची खातरजमा केल्यावर सर्वानुमते नितंबावती एक चेटकीण आहे असा निकाल झाला. झालेल्या अपमानाने दु:खी होत तिने आत्महत्या करण्यासाठी स्मशान गाठले. तिला पाहिल्याबरोबर या बदमाषाने तिला गाठले. तिच्या हातापाया पडून, गयावया करत त्याने तिची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, ‘हे सुंदरी मी तुला प्राप्त करण्यासाठी बरेच प्रयत्न केले व शेवटी हा मार्ग स्वीकारला. मी तुझ्यावाचून राहूच शकत नाही. माझ्यावर कृपा कर व माझी हो! तुझ्याशिवाय मला कोण आहे? मी तुझा दास होऊन राहीन.’’ अनेकवेळा तिच्या पाया पडत व अनेक वचने देत त्याने ही विनंती वारंवार केली. शेवटी तिलाही कोठे जाण्यास जागा नसल्यामुळे तिने त्याची विनंती मान्य केली. नंतर ते सुखाने संसार करु लागले... आता माझे प्रश्र्न... १ नितंबावती अपत्यसुखासाठी तडफडत होती, ते चूक आहे का? ती स्त्रिसुलभ भावना नाही का ? २ जर एखाद्या स्त्रिला मूल नाही म्हणून आजही घराबाहेर काढले जाते तर ती नवऱ्यापासून मुल होत नाही म्हणून नवरा सोडू शकत नाही का ? ३ रतिसुख हे एक जिवनाचे महत्वाचे अंग आहे तर नितंबावतीने स्वत:ला त्यापासून वंचित का ठेवावे ? ४ जर नितंबावती तिच्या नवऱ्याला शारीरिक सूख देऊ शकली नसती तर त्याने काय केले असते. ५ आहे तसेच आयुष्य जगून दोघांचेही आयुष्य बरबाद झाले असते. आणि ते केवळ समाजाच्या दबावाखाली. हे बरोबर आहे का ? ६ मी एखाद्या स्त्रिला जर या प्रकरणात अशी मदत केली आणि ती तिच्या नवऱ्याच्या खिजगणतीतही नसल्यास माझे काय चुकले ? ७ या प्रकरणात मी कोणावर अन्याय केला आहे ? थांबा ! उत्तरे देण्याआधी तुम्हालाही बोलायचे आहे हे लक्षात ठेवा. तुम्हालाही प्रश्र्न विचारले जाणार आहेत हे लक्षात घ्या आणि मग उत्तरे द्या.. अशी माझी विनंती आहे...'' एवढे बोलून त्याने एक मोठा श्र्वास घेतला व काय परिणाम साधला आहे हे पाहण्यासाठी श्रोत्यांवरुन एक भेदक नजर फिरविली... क्षणभर तेथे स्मशान शांतता पसरली.... बायकांची कुजबुज थांबली. त्या त्यांच्या नवऱ्यांकडे पाहू लागल्या. त्याच्या नजरेतच अनेक प्रश्र्न दडलेले होते.... जयंत कुलकर्णी. या लिखाणातील सर्व पात्रे आणि प्रसंग काल्पनिक आहेत. कुणाला इतर हयात वा मृत व्यक्तिशी साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. सर्व हक्क लेखकाच्या स्वाधीन. नितंबावतीची कहाणी मी अनुवाद केलेल्या दशकुमारचरितम्मधून घेतलेली आहे. मुळ लेखक आचार्य श्री दण्डी. (ही पुस्तकाची जहिरात नाही. मी ही कथा लिहिण्याचे ते पुस्तक वाचल्यावाचल्याच ठरविले होते)
  • Log in or register to post comments
  • 21948 views

प्रतिक्रिया

Submitted by ज्ञानोबाचे पैजार on Tue, 11/29/2016 - 10:31

Permalink

मस्त...

पहिला भाग आवडला.. पुढील भागांच्या प्रतिक्षेत... पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

Submitted by एस on Tue, 11/29/2016 - 12:25

In reply to मस्त... by ज्ञानोबाचे पैजार

Permalink

+१.

+१.
  • Log in or register to post comments

Submitted by तुषार काळभोर on Tue, 11/29/2016 - 12:55

In reply to +१. by एस

Permalink

हेच

+२
  • Log in or register to post comments

Submitted by सस्नेह on Tue, 11/29/2016 - 12:05

Permalink

रोचक !

पुभाप्र.
  • Log in or register to post comments

Submitted by आदूबाळ on Tue, 11/29/2016 - 12:12

Permalink

इंट्रेष्टिंग...

इंट्रेष्टिंग...
  • Log in or register to post comments

Submitted by पद्मावति on Tue, 11/29/2016 - 12:59

Permalink

+१

+१
  • Log in or register to post comments

Submitted by खेडूत on Tue, 11/29/2016 - 13:29

Permalink

कथा आवडली.

कथा आवडली. एक छोटीशी दुरूस्ती करायला हवी.नवव्या परिच्छेदाच्या सुरुवातीस ''क्षूद्र जातीचा एक माणूस रहात होता.'' हे शूद्र असे असायला हवे. (तत्कालीन संदर्भ लक्षात घेता)
  • Log in or register to post comments

Submitted by जयंत कुलकर्णी on Tue, 11/29/2016 - 14:24

In reply to कथा आवडली. by खेडूत

Permalink

धन्यवाद ! मी प्रथम शूद्र असेच

धन्यवाद ! मी प्रथम शूद्र असेच लिहिले होते पण नंत क्षूद्र केले. आता परत शूद्र केले आहे. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on Tue, 11/29/2016 - 13:45

Permalink

अफाट आहे ही कथा ! सर्वसामान्य

अफाट आहे ही कथा ! सर्वसामान्य लोकांच्या आंधळ्या भोळ्याभाबड्या कल्पनांना हदरवुन टाकणार्‍या अन परत सुरवातीपासुन , मुळापासुन समाज , नैतिकता , संस्कृती , सभ्यता वगैरेंचा विचार करायला लावणार्‍या असा गोष्टी अत्यंत भारी वाटतात ! ( बाकी ह्या कथेवरुन मिपावर मागे एकदा पॉर्न ओके प्लीज वर जोरदार चर्चा झालेली त्याची आठवण झाली. असो! ) कविर्दण्डी कविर्दण्डी कविर्दण्डी न संशयः || ________________/\______________ पुढील भागाच्या प्रतिक्षेत ! अपेक्षा आहे की ती ही अशीच मुलभुत पुर्वग्रहांना हदरवणारी आणि चिकित्सेच्या मायक्रोस्कोप खाली आणणारी असेल !
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Tue, 11/29/2016 - 13:53

In reply to अफाट आहे ही कथा ! सर्वसामान्य by प्रसाद गोडबोले

Permalink

+१११

+१११
  • Log in or register to post comments

Submitted by पिलीयन रायडर on Tue, 11/29/2016 - 19:06

In reply to अफाट आहे ही कथा ! सर्वसामान्य by प्रसाद गोडबोले

Permalink

अगदी अगदी!!!

अगदी अगदी!!!
  • Log in or register to post comments

Submitted by शलभ on Tue, 11/29/2016 - 13:58

Permalink

मस्त..

मस्त..
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Tue, 11/29/2016 - 15:11

Permalink

पुभालटा.

पुभालटा.
  • Log in or register to post comments

Submitted by पाटीलभाऊ on Tue, 11/29/2016 - 15:40

Permalink

मस्त लिहिलंय

पुढचा भाग लवकर येऊ द्या.
  • Log in or register to post comments

Submitted by कपिलमुनी on Tue, 11/29/2016 - 16:34

Permalink

छान कथा आणि गहन विषय

सहजीवन आणि रतीसुख हा मोठा गहन विषय आहे . ( काही आयडीच्या भितीने त्याची चर्चा नको वाटते . अन्यथा ही सामाजिक समस्या आहे )
  • Log in or register to post comments

Submitted by नाखु on Wed, 11/30/2016 - 09:05

In reply to छान कथा आणि गहन विषय by कपिलमुनी

Permalink

+११

अर्थात काही उथळ आणि सवंग शेर्यांनी त्याला कधी गांभीर्याने आणि विश्लेषणात्मक घेतले गेले नाही हे कटु सत्य आहे. पुभाप्र.
  • Log in or register to post comments

Submitted by अजया on Tue, 11/29/2016 - 16:43

Permalink

रोचक कथा

पुभाप्र.
  • Log in or register to post comments

Submitted by अन्कुश शिन्दे on Tue, 11/29/2016 - 18:29

Permalink

मस्तच

+१११११११ वाचून चांदोबा मधील वेताळ कथांची आठवण झाली. पुढील भाग लवकर टाका
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Tue, 11/29/2016 - 19:02

Permalink

कथा अतिशय सुंदर आहे आणि भीषण

कथा अतिशय सुंदर आहे आणि भीषण सत्य सुरेख शब्दात मांडले आहे. आणि त्यातील बरेचसे भाग तुकड्यातुकड्याने का होईना पण वैद्यकीय व्यवसायात आम्हाला पाहायला मिळतात.
  • Log in or register to post comments

Submitted by जव्हेरगंज on Tue, 11/29/2016 - 19:20

Permalink

क्रमश: का लिहीले नाही हो!

क्रमश: का लिहीले नाही हो! कथा अतिशय आवडली!!
  • Log in or register to post comments

Submitted by वरुण मोहिते on Tue, 11/29/2016 - 19:37

Permalink

इंटरेस्टिंग

महत्वाचा विषय .. पुभाप्र
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Tue, 11/29/2016 - 20:06

Permalink

कथा नेहमीप्रमाणेच उत्कृष्ट.

कथा नेहमीप्रमाणेच उत्कृष्ट.
  • Log in or register to post comments

Submitted by पगला गजोधर on Tue, 11/29/2016 - 20:21

Permalink

"मलेना".......

मोनिका बेलुशी आठवली....
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Wed, 11/30/2016 - 10:23

In reply to "मलेना"....... by पगला गजोधर

Permalink

डिट्टो ;)

डिट्टो ;)
  • Log in or register to post comments

Submitted by तुषार काळभोर on Wed, 11/30/2016 - 11:08

In reply to "मलेना"....... by पगला गजोधर

Permalink

कथा वाचून नाही आठवली...

पण प्रतिसाद वाचून आठवली. मग आख्खं इंजिनियरिंग पण आठवलं.
  • Log in or register to post comments

Submitted by चांदणे संदीप on Wed, 11/30/2016 - 14:22

In reply to "मलेना"....... by पगला गजोधर

Permalink

¿¿¿¿¿¿¿

हा$$$$$$$$$$य!!
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Tue, 11/29/2016 - 23:23

Permalink

कथा आवडली.

कथा आवडली.
  • Log in or register to post comments

Submitted by अर्धवटराव on Wed, 11/30/2016 - 00:54

Permalink

तत्कालीन संदर्भात कथा स्फोटक असेल...

पण सद्यःपरिस्थीत अशी घटना थोडीफार रोचक वाटेल, स्फोटक नाहि. स्त्री-पुरुष संबंधातले अनेक पारंपारीक आयाम आता बरेचसे शिथील होताना दिसतात, नाहिसे होताना दिसतात.
  • Log in or register to post comments

Submitted by खटपट्या on Wed, 11/30/2016 - 03:33

Permalink

लैच रोचक. पु.भा.प्र.

लैच रोचक. पु.भा.प्र.
  • Log in or register to post comments
Profile picture for user गामा पैलवान

Submitted by गामा पैलवान on Wed, 11/30/2016 - 04:00

Permalink

विचारप्रवर्तक कथा

जयंतराव, कथा विचारप्रवर्तक आहे. माझ्या मते कलहकंटक दोषी आहे. त्याच्या कृतीमागे नितंबावतीस मदत करण्याचा हेतू नसून स्वत:चा काम शमवणे हा होता. दुसऱ्यांच्या बायका पळवणे उचित नाही. नितंबावतीचा काही दोष दिसंत नाही. मात्र सारंगाच्या कथेत वेगळा न्याय लावायला पाहिजे. पार्वती बहुधा आधीपासूनंच बहिष्कृत दिसते आहे. अशा प्रसंगी सारंगासारख्या परपुरुषाने आधार देणं सयुक्तिक वाटतं. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

Submitted by माझीही शॅम्पेन on Wed, 11/30/2016 - 12:34

In reply to विचारप्रवर्तक कथा by गामा पैलवान

Permalink

+१०००००००० योग्य मत

+१०००००००० योग्य मत
  • Log in or register to post comments

Submitted by Ram ram on Wed, 11/30/2016 - 09:38

Permalink

आदरणीय गा. पै. यांच्याशी सहमत

आदरणीय गा. पै. यांच्याशी सहमत ,
  • Log in or register to post comments

Submitted by कलंत्री on Wed, 11/30/2016 - 11:12

Permalink

दोषी निर्दोषीची चर्चा कशाला?

कथा म्हणून रसास्वाद घ्या. स्त्री आणि पुरुष या पारंपारीक कल्पनातून बाहेर यायला यातून मदतच होईल.
  • Log in or register to post comments

Submitted by तुषार काळभोर on Wed, 11/30/2016 - 17:58

In reply to दोषी निर्दोषीची चर्चा कशाला? by कलंत्री

Permalink

२ थंब्ज अप!!

+२
  • Log in or register to post comments

Submitted by धर्मराजमुटके on Wed, 11/30/2016 - 11:24

Permalink

हं !

हं ! तर तात्पर्य काय की वंधत्व उपचारासाठी डॉक्टरकडे जाताना नेहमी पतीसोबतच जावे !
  • Log in or register to post comments

Submitted by मितान on Wed, 11/30/2016 - 13:44

Permalink

उत्तम कथा ! याबद्दल चर्चा

उत्तम कथा ! याबद्दल चर्चा वाचण्यास उत्सुक !
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Wed, 11/30/2016 - 22:11

Permalink

कविर्दण्डी कविर्दण्डी कविर्दण्डी न संशयः ||

कविर्दण्डी कविर्दण्डी कविर्दण्डी न संशयः || हेच!!!
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on गुरुवार, 12/01/2016 - 12:16

Permalink

ही कथा वाचताच माझ्या टकुर्

ही कथा वाचताच माझ्या टकुर्‍यात हॅलोजन पेटला ! साधारण अशीच कथा कुट तरी वाचलीया असं वाटाया लागल ! लयं विचार करुन राहिल्यावर टकुर्‍यातल्या पेटलेल्या हॅलोजन ने नीट फोकस पाडला... लहानपणी वेताळ पंचवीसी वाचली होती ! त्यात अशाच स्वरुपाची कथा असल्याचे हॅलोजन फोकस ने दाखवले ! ;) मग काय गुगल बाबा की जय ! ती कथा खाली देत आहे ! पापी कौन ? काशी में प्रतापमुकुट नाम का राजा राज्य करता था। उसके वज्रमुकुट नाम का एक लड़का था। एक दिन राजकुमार दीवान के लड़के को साथ लेकर शिकर खेलने जंगल में गया। घूमते-घूमते उन्हें तालाब मिला। उसके पानी में कमल खिले थे और हंस किलोल कर रहे थे। किनारों पर घने पेड़ थे, जिन पर पक्षी चहचहा रहे थे। दोनों मित्र वहाँ रुक गये और तालाब के पानी में हाथ-मुँह धोकर ऊपर महादेव के मन्दिर पर गये। घोड़ों को उन्होंने मन्दिर के बाहर बाँध दिया। मन्दिर में दर्शन करके बाहर आये तो देखते क्या हैं कि तालाब के किनार राजकुमारी अपनी सहेलियों के साथ स्नान करने आयी है। दीवान का लड़का तो वहीं एक पेड़ के नीचे बैठा रहा, पर राजकुमार से न रहा गया। वह आगे बढ़ गया। राजकुमारी ने उसकी ओर देखा तो वह उस पर मोहित हो गया। राजकुमारी भी उसकी तरफ देखती रही। फिर उसने किया क्या कि जूड़े में से कमल का फूल निकाला, कान से लगाया, दाँत से कुतरा, पैर के नीचे दबाया और फिर छाती से लगा, अपनी सखियों के साथ चली गयी। उसके जाने पर राजकुमार निराश हो अपने मित्र के पास आया और सब हाल सुनाकर बोला, “मैं इस राजकुमारी के बिना नहीं रह सकता। पर मुझे न तो उसका नाम मालूम है, न ठिकाना। वह कैसे मिलेगी?” दीवान के लड़के ने कहा, “राजकुमार, आप इतना घबरायें नहीं। वह सब कुछ बता गयी है।” राजकुमार ने पूछा, “कैसे?” वह बोला, “उसने कमल का फूल सिर से उतारकर कानों से लगाया तो उसने बताया कि मैं कर्नाटक की रहनेवाली हूँ। दाँत से कुतरा तो उसका मतलब था कि मैं दंतबाट राजा की बेटी हूँ। पाँव से दबाने का अर्थ था कि मेरा नाम पह्मावती है और छाती से लगाकर उसने बताया कि तुम मेरे दिल में बस गये हो।” इतना सुनना था कि राजकुमार खुशी से फूल उठा। बोला, “अब मुझे कर्नाटक देश में ले चलो।” दोनों मित्र वहा” से चल दिये। घूमते-फिरते, सैर करते, दोनों कई दिन बाद उसी शहर में पहुँचे। राजा के महलों के पास गये तो एक बुढ़िया अपने द्वार पर बैठी चरखा कातती मिली। उसके पास जाकर दोनों घोड़ों से उतर पड़े और बोले, “माई, हम सौदागर हैं। हमारा सामान पीछे आ रहा है। हमें रहने को थोड़ी जगह दे दो।” उनकी शक्ल-सूरत देखकर और बात सुनकर बुढ़िया के मन में ममता उमड़ आयी। बोली, “बेटा, तुम्हारा घर है। जब तक जी में आए, रहो।” दोनों वहीं ठहर गये। दीवान के बेटे ने उससे पूछा, “माई, तुम क्या करती हो? तुम्हारे घर में कौन-कौन है? तुम्हारी गुज़र कैसे होती है?” बुढ़िया ने जवाब दिया, “बेटा, मेरा लड़का राजा की चाकरी में है। मैं राजा की बेटी पह्मावती की धाय थी। बूढ़ी हो जाने से अब घर में रहती हूँ। राजा खाने-पीने को दे देता है। दिन में एक बार राजकुमारी को देखने महल में जाती हूँ।” राजकुमार ने बुढ़िया को कुछ धन दिया और कहा, “माई, कल तुम वहाँ जाओ तो राजकुमारी से कह देना कि जेठ सुदी पंचमी को तुम्हें तालाब पर जो राजकुमार मिला था, वह आ गया है।” अगले दिन जब बुढ़िया राजमहल गयी तो उसने राजकुमार का सन्देशा उसे दे दिया। सुनते ही राजकुमारी ने गुस्सा होंकर हाथों में चन्दन लगाकर उसके गाल पर तमाचा मारा और कहा, “मेरे घर से निकल जा।” बुढ़िया ने घर आकर सब हाल राजकुमार को कह सुनाया। राजकुमार हक्का-बक्का रह गया। तब उसके मित्र ने कहा, “राजकुमार, आप घबरायें नहीं, उसकी बातों को समझें। उसने देसों उँगलियाँ सफ़ेद चन्दन में मारीं, इससे उसका मतलब यह है कि अभी दस रोज़ चाँदनी के हैं। उनके बीतने पर मैं अँधेरी रात में मिलूँगी।” दस दिन के बाद बुढ़िया ने फिर राजकुमारी को ख़बर दी तो इस बार उसने केसर के रंग में तीन उँगलियाँ डुबोकर उसके मुँह पर मारीं और कहा, “भाग यहाँ से।” बुढ़िया ने आकर सारी बात सुना दी। राजकुमार शोक से व्याकुल हो गया। दीवान के लड़के ने समझाया, “इसमें हैरान होने की क्या बात है? उसने कहा है कि मुझे मासिक धर्म हो रहा है। तीन दिन और ठहरो।” तीन दिन बीतने पर बुढ़िया फिर वहाँ पहुँची। इस बार राजकुमारी ने उसे फटकार कर पच्छिम की खिड़की से बाहर निकाल दिया। उसने आकर राजकुमार को बता दिया। सुनकर दीवान का लड़का बोला, “मित्र, उसने आज रात को तुम्हें उस खिड़की की राह बुलाया है।” मारे खुशी के राजकुमार उछल पड़ा। समय आने पर उसने बुढ़िया की पोशाक पहनी, इत्र लगाया, हथियार बाँधे। दो पहर रात बीतने पर वह महल में जा पहुँचा और खिड़की में से होकर अन्दर पहुँच गया। राजकुमारी वहाँ तैयार खड़ी थी। वह उसे भीतर ले गयी। अन्दर के हाल देखकर राजकुमार की आँखें खुल गयीं। एक-से-एक बढ़कर चीजें थीं। रात-भर राजकुमार राजकुमारी के साथ रहा। जैसे ही दिन निकलने को आया कि उसने उसे छिपा दिया। रात को फिर बाहर निकाल लिया। इस तरह कई दिन बीत गये। अचानक एक दिन राजकुमार को अपने मित्र की याद आयी। उसे चिन्ता हुई कि पता नहीं, उसका क्या हुआ होगा। उदास देखकर राजकुमारी ने कारण पूछा तो उसने बता दिया। बोला, “वह मेरा बड़ा प्यारा दोस्त हैं बड़ा चतुर है। उसकी होशियारी ही से तो तुम मिली हो।” राजकुमारी ने कहा, “मैं उसके लिए बढ़िया-बढ़िया भोजन बनवाती हूँ। तुम उसे खिलाकर, तसल्ली देकर लौट आना।” खाना साथ में लेकर राजकुमार अपने मित्र के पास पहुँचा। वे महीने भर से मिले नहीं। थे, राजकुमार ने मिलने पर सारा हाल सुनाकर कहा कि राजकुमारी को मैंने तुम्हारी चतुराई की सारी बातें बता दी हैं, तभी तो उसने यह भोजन बनाकर भेजा है। दीवान का लड़का सोच में पड़ गया। उसने कहा, “यह तुमने अच्छा नहीं किया। राजकुमारी समझ गयी कि जबतक मैं हूँ, वह तुम्हें अपने बस में नहीं रख सकती। इसलिए उसने इस खाने में ज़हर मिलाकर भेजा है।” यह कहकर दीवान के लड़के ने थाली में से एक लड्डू उठाकर कुत्ते के आगे डाल दिया। खाते ही कुत्ता मर गया। राजकुमार को बड़ा बुरा लगा। उसने कहा, “ऐसी स्त्री से भगवान् बचाये! मैं अब उसके पास नहीं जाऊँगा।” दीवान का बेटा बोला, “नहीं, अब ऐसा उपाय करना चाहिए, जिससे हम उसे घर ले चलें। आज रात को तुम वहाँ जाओ। जब राजकुमारी सो जाये तो उसकी बायीं जाँघ पर त्रिशूल का निशान बनाकर उसके गहने लेकर चले आना।” राजकुमार ने ऐसा ही किया। उसके आने पर दीवान का बेटा उसे साथ ले, योगीका भेस बना, मरघट में जा बैठा और राजकुमार से कहा कि तुम ये गहने लेकर बाज़ार में बेच आओ। कोई पकड़े तो कह देना कि मेरे गुरु के पास चलो और उसे यहाँ ले आना। राजकुमार गहने लेकर शहर गया और महल के पास एक सुनार को उन्हें दिखाया। देखते ही सुनार ने उन्हें पहचान लिया और कोतवाल के पास ले गया। कोतवाल ने पूछा तो उसने कह दिया कि ये मेरे गुरु ने मुझे दिये हैं। गुरु को भी पकड़वा लिया गया। सब राजा के सामने पहुँचे। राजा ने पूछा, “योगी महाराज, ये गहने आपको कहाँ से मिले?” योगी बने दीवान के बेटे ने कहा, “महाराज, मैं मसान में काली चौदस को डाकिनी-मंत्र सिद्ध कर रहा था कि डाकिनी आयी। मैंने उसके गहने उतार लिये और उसकी बायीं जाँघ में त्रिशूल का निशान बना दिया।” इतना सुनकर राजा महल में गया और उसने रानी से कहा कि पद्मावती की बायीं जाँघ पर देखो कि त्रिशूल का निशान तो नहीं है। रानी देखा, तो था। राजा को बड़ा दु:ख हुआ। बाहर आकर वह योगी को एक ओर ले जाकर बोला, “महाराज, धर्मशास्त्र में खोटी स्त्रियों के लिए क्या दण्ड है?” योगी ने जवाब दिया, “राजन्, ब्राह्मण, गऊ, स्त्री, लड़का और अपने आसरे में रहनेवाले से कोई खोटा काम हो जाये तो उसे देश-निकाला दे देना चाहिए।”यह सुनकर राजा ने पद्मावती को डोली में बिठाकर जंगल में छुड़वा दिया। राजकुमार और दीवान का बेटा तो ताक में बैठे ही थे। राजकुमारी को अकेली पाकर साथ ले अपने नगर में लौट आये और आनंद से रहने लगे। इतनी बात सुनाकर बेताल बोला, “राजन्, यह बताओ कि पाप किसको लगा है?” राजा ने कहा, “पाप तो राजा को लगा। दीवान के बेटे ने अपने स्वामी का काम किया। कोतवाल ने राजा को कहना माना और राजकुमार ने अपना मनोरथ सिद्ध किया। राजा ने पाप किया, जो बिना विचारे उसे देश-निकाला दे दिया।” राजा का इतना कहना था कि बेताल फिर उसी पेड़ पर जा लटका। राजा वापस गया और बेताल को लेकर चल दिया। संदर्भ :- विक्रम बेताल – कहानी 1

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- तेरे गीतों कि में दिवानी...ओ दिलबर जानी.तुने कही और मैंने मानी...ओ दिलबर जानी. :- Prem Geet
  • Log in or register to post comments

Submitted by माझीही शॅम्पेन on गुरुवार, 12/01/2016 - 13:12

In reply to ही कथा वाचताच माझ्या टकुर् by मदनबाण

Permalink

बाब्बो .... एवढा अभ्यास

बाब्बो .... एवढा अभ्यास प्रतिसाद ऑफ द ईयर आहे हा __/\__
  • Log in or register to post comments

Submitted by नरेश माने on गुरुवार, 12/01/2016 - 14:07

In reply to बाब्बो .... एवढा अभ्यास by माझीही शॅम्पेन

Permalink

एवढा अभ्यास प्रतिसाद ऑफ द ईयर

एवढा अभ्यास प्रतिसाद ऑफ द ईयर आहे हा __/\__ >>> +१
  • Log in or register to post comments

Submitted by जव्हेरगंज on गुरुवार, 12/01/2016 - 21:19

In reply to एवढा अभ्यास प्रतिसाद ऑफ द ईयर by नरेश माने

Permalink

+1

+1
  • Log in or register to post comments

Submitted by जयंत कुलकर्णी on गुरुवार, 12/01/2016 - 21:46

In reply to ही कथा वाचताच माझ्या टकुर् by मदनबाण

Permalink

हो बरोबर आहे. अशा अनेक कथा

हो बरोबर आहे. अशा अनेक कथा भारतीय पुराणात साहित्यात आहेत. ही कथा लिहिली श्री. आचर्य दण्डी यांनी जी मी या कथेत वापरली आहे. आणि मला वाटते मी तसे कथेच्या खाली लिहिलेले आहे. असो. पण या "प्रतिसाद ऑफ द इयरसाठी'' धन्यवाद :-) हे त्या तिघांनी काय लिहिले आहे हे मला समजले नाही...आपल्याला समजले असेल तर कृपया मला समजून सांगावे....
  • Log in or register to post comments

Submitted by पिलीयन रायडर on गुरुवार, 12/01/2016 - 22:32

In reply to हो बरोबर आहे. अशा अनेक कथा by जयंत कुलकर्णी

Permalink

+११

+११
नितंबावतीची कहाणी मी अनुवाद केलेल्या दशकुमारचरितम्मधून घेतलेली आहे. मुळ लेखक आचार्य श्री दण्डी.
हे लिहीलंय की स्पष्ट लेखात. मग काही तरी चोरी पकडल्याच्या आविर्भावात का वरचे प्रतिसाद येत आहेत? की मलाच तसा भास होतोय. जयंत कुलकर्णी काकांचा लेख आहे हा. इकडुन तिकडुन ढापुन इथे चोप्य पस्ते करणार्‍या एखाद्या डु आयडीचा नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by जयंत कुलकर्णी on Fri, 12/02/2016 - 06:32

In reply to +११ by पिलीयन रायडर

Permalink

श्री. मदणबाण यांची

श्री. मदणबाण यांची प्रतिक्रिया वाचल्यावर मला ही तसेच वाटले. इतर तिघांचे प्रतिसाद वाचल्यावर मला त्याची खात्रीच वाटू लागली आहे. लोकं घाई करतात. शेवटपर्यंत वाचत नाहीत, :-) ठीक आहे.... पण या कथेतील सगळ्यात महत्वाची वाक्ये आहेत शेवटची तीन. - बायकांची कुजबुज थांबली. ''त्या त्यांच्या नवऱ्यांकडे पाहू लागल्या. त्याच्या नजरेतच अनेक प्रश्र्न दडलेले होते....'' आणि त्यातील शेवटचे सगळ्यात महत्वाचे. का ते विचार करुन ठरवायला पाहिजे...
  • Log in or register to post comments

Submitted by संजय क्षीरसागर on Fri, 12/02/2016 - 15:26

In reply to श्री. मदणबाण यांची by जयंत कुलकर्णी

Permalink

या कथेतील सगळ्यात महत्वाची वाक्ये आहेत शेवटची तीन ?

एक तर कथा संपली का पुढचे भाग आहेत ते क्लिअर नाही. पण बहुदा संपलीये ! पुढे तुम्ही म्हणतायं : आणि त्यातील शेवटचे सगळ्यात महत्वाचे. का ते विचार करुन ठरवायला पाहिजे... हा विचार कुणी करायचा आहे ? यावरनं मला ररांची ती अर्थशून्य (सॉरी अंतहीन) पिक्चर स्टोरी आठवली. त्या बाईवर रेप झाला का नाही? असा साधा प्रश्न विचारल्यावर, ररा म्हणाले होते, इथे अनेक शक्यतांचा जन्म होतो ! म्हणजे बोंबलायला मूळ प्रश्न अनुत्तरित आणि पुन्हा नव्या प्रश्नांना जन्म. त्यापेक्षा चांदोबातली स्टोरी बरीये. कुठे तरी पटेलसे लॉजिक देऊन, निदान संपते तरी.
  • Log in or register to post comments

Submitted by जयंत कुलकर्णी on Fri, 12/02/2016 - 15:56

In reply to या कथेतील सगळ्यात महत्वाची वाक्ये आहेत शेवटची तीन ? by संजय क्षीरसागर

Permalink

१ कथा संपली. पुढील भाग

१ कथा संपली. पुढील भाग लिहिणार नाही. २ विचार ज्याला करायचा आहे त्याने करावा ३ संक्षिसाहेब तुमचे साहित्याचे व अध्यात्माचे ज्ञान अगाध आहेच त्याबद्दल शंकाच नाही. त्यामुळे आपण म्हणाल ते मान्य आहेच.... Constant outside the Bracket... :-) ४ पण लॉजिकने सगळ्याची उत्तरे मिळत नाहीत.
  • Log in or register to post comments

Submitted by संजय क्षीरसागर on Fri, 12/02/2016 - 16:08

In reply to १ कथा संपली. पुढील भाग by जयंत कुलकर्णी

Permalink

असं कसं ?

पुढील भाग लिहिणार नाही ? का पुढला भागच नाहीये? पण असेल तर लिहा. कारण बाकीचे नाराज होतील. विचार ज्याला करायचा आहे त्याने करावा पुन्हा ररा आठवले! संक्षिसाहेब.... ते सगळ्यांचं आणि नेहेमीचं आहे, त्यामुळे....ठीके. पण लॉजिकने सगळ्याची उत्तरे मिळत नाहीत. मग प्रश्नच निर्माण करु नये हे बेस्ट!
  • Log in or register to post comments

Submitted by जयंत कुलकर्णी on Fri, 12/02/2016 - 16:33

In reply to असं कसं ? by संजय क्षीरसागर

Permalink

//मग प्रश्नच निर्माण करु नये

//मग प्रश्नच निर्माण करु नये हे बेस्///// का म्हणे ?
  • Log in or register to post comments

Submitted by पगला गजोधर on Fri, 12/02/2016 - 16:57

In reply to या कथेतील सगळ्यात महत्वाची वाक्ये आहेत शेवटची तीन ? by संजय क्षीरसागर

Permalink

मला ररांची ती अर्थशून्य (सॉरी

मला ररांची ती अर्थशून्य (सॉरी अंतहीन) पिक्चर स्टोरी आठवली
आता हे ररां कोण ?
  • Log in or register to post comments

Submitted by संजय क्षीरसागर on Fri, 12/02/2016 - 19:17

In reply to मला ररांची ती अर्थशून्य (सॉरी by पगला गजोधर

Permalink

स्वतःच्या जवाबदारीवर वाचा !

जंगलवाटांवरचे कवडसे आठ भाग आहेत पण कन्क्लूजन विचारायचं नाही ! कारण शेवट असा आहे : एक शंका: ही गोष्ट ज्या काळात लिहिली गेली, त्या वेळेस 'बलात्कार' हा गुन्हा नव्हता का? ररांचं त्यावर उत्तर : हे प्रश्न चित्रपट पाहून संपल्यावर मनात उमटले नाहीत (कारण तोवर त्याहून मूलभूत प्रश्नांनी तुमच्या मनाचा ताबा घ्यायला हवा) तरच चित्रपटाचे मर्म तुम्हाला गवसले असे म्हणता येईल. म्हणजे मेन प्रश्न गेला काशीला. आता त्याहून मूलभूत प्रश्न पाडून घ्या. आणि नाही पडले तर तुम्हाला चित्रपटच कळला नाही !
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com