✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मी आज केलेला व्यायाम...!!

म
मोदक यांनी
Wed, 11/02/2016 - 17:16  ·  लेख
लेख
. नमस्कार, गेली दोन वर्षे मी जमेल तसे सायकलवर भटकत आहे आणि शक्य त्या राईडचे लेख लिहीत आहे. यादरम्यान एक गोष्ट लक्षात आली, मिपावरील लेख वाचून किंवा आपल्या मित्रांच्या संगतीने अनेक लोकांना सायकल चालवावीशी वाटली आणि बहुदा अशा एखाद्या ट्रिगर मुळे अनेक लोक उत्साहाने आणि नियमीतपणे सायकल चालवत आहेत. मला व्यनीमधून अनेकांनी सायकलबाबत प्रश्न विचारले आणि तेथेही पुढील प्रगती कळवत आहेत. व्यायामाचे फायदे येथे कोणाला समजावून सांगावेत अशी परिस्थिती नक्कीच नाही. तसेच आपल्या सर्वांच्या व्यस्त दिनक्रमामुळे अनेकदा इच्छा असूनही व्यायाम होत नाही हे ही तितकेच खरे आहे. मग आपण या धाग्यावर "आज केलेला व्यायाम" नोंदवत राहूया. व्यायाम करणे आवश्यक आहे मग तो कोणत्याही प्रकारे करा. सायकल चालवा, सकाळी फिरायला जा, पळा, सूर्यनमस्कार घाला, योगासने करा, जिम मध्ये घाम गाळा पण नियमीतपणे काहीतरी करा आणि येथे नक्की नोंदवा. आपल्यामुळे आणखी बरेच लोक प्रोत्साहन घेतील आणि व्यायामाला नक्की सुरूवात करतील. मग... आज किती व्यायाम केला..? ************************************************************** काही डिस्क्लेमर्स. १) या धाग्याचा उद्देश "जास्तीतजास्त लोकांनी व्यायाम करावा" इतकाच आहे. २) आपल्या व्यायामाच्या अनुषंगाने अनेकांना अनेक शंका असू शकतात त्या येथे बिन्धास्त विचारा. मिपाकर भरपूर उत्साही आहेत आणि अनेक वेगवेगळ्या प्रकारात निष्णात आहेत. माझीही शँपेन (उर्फ चंपाग्ने) हाफ / फुल मॅरेथॉन पळतो, वेल्लाभट नियमीतपणे जिम करतो, शैलेंद्र, प्रशांत मालक, डॉ श्रीहास, आनंदराव, (शेफ) केडी असे अनेक मुरलेले सायकलिस्ट लोक आहेत. डॉक्टर खरे आणि एक्काकाका वैद्यकीय सल्ले देतातच. अशा अनेक अनुभवी लोकांना आपले पेटारे उघडण्यासाठी उद्युक्त करूया. ३) ही कोणतीही स्पर्धा नाहीये त्यामुळे स्वतःशी प्रामाणिक राहून येथे नोंदी करा. फायदा तुम्हालाच मिळणार आहे. :) ************************************************************** टीप - येथे अवांतर पोस्ट शक्यतो टाळाव्यात. बाकी संपादक मंडळ व चालक-मालक समर्थ आहेतच. :)
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
क्रीडा
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
अनुभव

प्रतिक्रिया द्या
112299 वाचन

💬 प्रतिसाद (496)

प्रतिक्रिया

लेमन टी लैच खास हो जावईबुआ!

कैलासवासी सोन्याबापु
Sat, 11/05/2016 - 06:59 नवीन
लेमन टी लैच खास हो जावईबुआ! म्हणजे बघा फ्रिज मध्ये चिल केला तर भारी कोल्ड्रिंक होते त्याचे.
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध.वैद्य

जी!

अनिरुद्ध.वैद्य
Sat, 11/05/2016 - 07:51 नवीन
आईसड लेमन टी ... आहाहा! आज बनानाही पडताय बापु!
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

ल ओ ल!

वेल्लाभट
Fri, 11/04/2016 - 17:23 नवीन
ल ओ ल!
↩ प्रतिसाद: पद्मावति

अर्रर्र. लोकांचे अपडेट्स

एस
Fri, 11/04/2016 - 15:41 नवीन
अर्रर्र. लोकांचे अपडेट्स वाचून लयच गिल्ट यायला लागला आहे! :-(

सायकल आणि चालने

मित्रहो
Fri, 11/04/2016 - 16:52 नवीन
सायकल २० किमी एकदा किंवा दोनदा, ह्लली कठीण होत आहे. फक्त वाीकेंड सायकल. शनिवार: ३०-५० किमी रविवार: ७५ ूद ९० किमी. ११५+ महि्यातून एकदा. चालने ३-५ किमी रोज

फुरुष लोक्स करिता, मेन्स

कैलासवासी सोन्याबापु
Fri, 11/04/2016 - 17:38 नवीन
फुरुष लोक्स करिता, मेन्स फिटनेस मॅगझिनचे ऍप जबराट आहे. एकतर मेन्स फिटनेसचे नाव मोठे, ऍप पण जबराट बनवले आहे. फिल्टर्स असतात त्यात तुम्हाला कसा व्यायामाचा माहोल हवाय ते पहिले भरायचे (ओपन ग्राउंड/ जिम/ होम जिम/ डंबेल-केटलबेल सेट्स/ बॉडी वेट) मग काय टार्गेट आहे ते पण बयाजवार विचारते (अपर बॉडी/ऍब्स-कोर/कार्डिओ/मसलग्रुप वगैरे) हे फिल्टर्स अप्लाय केले की तुम्हाला (तुमच्या परिस्थितीला) साजेसे वर्कआऊट प्रोग्राम्स ऍप सजेस्ट करते, हे ऍप पेड आहे पण पैसे जास्त घेत नाही, तसंही चकटफू आहे म्हणून ऍप फाट्यावर मारून फिटनेस मध्ये टंगळमंगळ करण्यापेक्षा थोडे पैसे गेले तर माणुस किमान पैसे वसूल करायला तरी व्यायाम करेल असे वाटते.(भाबडा आशावाद). आठ महिने अगोदर वापरत होतो तेव्हा वर्षाचे १२०० (₹१२००/वर्ष फक्त) शुल्क लागत असे आत्ताचे माहिती नाही. (स्लिप डिस्कची आयमायबापआजा उध्दार करत ढेरी कुरवळणारा) बाप्याव

एक शंका - बॅडमिंटन खेळतानाचा

मोदक
Fri, 11/04/2016 - 18:45 नवीन
एक शंका - बॅडमिंटन खेळतानाचा व्यायाम कसा मोजायचा..? रनींग अ‍ॅपने की स्टेप काऊंटरने..?

पेडोमीटर

कैलासवासी सोन्याबापु
Fri, 11/04/2016 - 18:56 नवीन
पेडोमीटर
↩ प्रतिसाद: मोदक

शक्य नाही वाटत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 11/04/2016 - 20:02 नवीन
मोबाइल खिशात ठेवायचा का खेळतांना ? -दिलीप बिरुटे
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

शक्य नाही ते.. तोच विचार करतो

मोदक
Fri, 11/04/2016 - 20:03 नवीन
शक्य नाही ते.. तोच विचार करतो आहे.
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आर्मपाऊच

चाणक्य
Mon, 11/07/2016 - 09:49 नवीन
बघा वापरून. फार अडचण जाणवणार नाही.
↩ प्रतिसाद: मोदक

हार्ट रेट मॉनिटर

श्रीरंग_जोशी
Fri, 11/04/2016 - 19:49 नवीन
हार्ट रेट मॉनिटर असणारा अ‍ॅक्टिव्हिटी ट्रॅकर अथवा चतुरघड्याळ वापरून.
↩ प्रतिसाद: मोदक

जास्त काय बोलत नै, उद्याचं

संदीप डांगे
Fri, 11/04/2016 - 19:52 नवीन
जास्त काय बोलत नै, उद्याचं उद्या बघू.. आज डान्स केला 15 मिनिटे, हाय इंटेन्सिटी. 5+2+5+2+5

धाग्याने प्रोत्साहित केलं हे

वेल्लाभट
Fri, 11/04/2016 - 22:35 नवीन
धाग्याने प्रोत्साहित केलं हे विशेषत्वाने नमूद करतो आजचा व्यायाम जोर २० * २ फ्रीवेट स्क्वॉट्स २० * २ (पॉवर स्क्वॉट्स. स्लो एक्स्टेन्शन, फास्ट कॉन्ट्रॅक्शन)

धन्यवाद वेल्लाश्री :)

मोदक
Fri, 11/04/2016 - 22:51 नवीन
धन्यवाद वेल्लाश्री :)
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

आजचा व्यायामः

अनिरुद्ध.वैद्य
Fri, 11/04/2016 - 23:16 नवीन
थरो वार्माप + जोर + पुल अप मग पाय लईच दुखत होते तर जीम मध्ये सर्कीट ट्रेनिंग करत बसलो. पहिल्याच राऊंडला घाम निघाला एसी मध्ये :) ९ व्यायाम प्रकारांचे ३ सेट केले. मग अ‍ॅब्सकरता लेग राईझ अन क्रंचेस.

आज का वॉक, आज का टॉक.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 11/05/2016 - 08:53 नवीन
आज ३.१६ चाललो. नंतर दीड तास चार सेट बॅडमिंटनचे खेळलो. आता मरणाचा थकलोय. आपल्या सर्वांचा दिवस सुखाचा जावो. Image removed. -दिलीप बिरुटे

जिओ सर

प्रशांत
Sat, 11/05/2016 - 09:38 नवीन
दंडवत स्विकारा
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मी पण

मोहन
Sat, 11/05/2016 - 09:16 नवीन
धाग्यामुळे स्फूर्ती घेवून मी पण आज २ कि.मी. चालणे व दोन मजले चढणे हा व्यायाम केला ! बघू किती दिवस चालतो.

कालची सायकलिंग (कुंडमळा)

प्रशांत
Sat, 11/05/2016 - 09:42 नवीन
Image removed.

सायकलिंगवाल्यांना एक प्रश्न:

एस
Sat, 11/05/2016 - 09:55 नवीन
सायकलिंगवाल्यांना एक प्रश्न: वरच्या फोटोतल्या सायकलचे टायर इतके बारीक आहेत म्हणजे ही रोडरेसिंग सायकल आहे का? एमटीबी सायकलचे टायर चांगलेच जाडजूड असतात ना? मग कुठली सायकल चांगली? कुठली फास्ट पळते?

MTB सायकल - सर्वात जाड टायर -

मोदक
Sat, 11/05/2016 - 10:07 नवीन
MTB सायकल - सर्वात जाड टायर - जास्ती फ्रिक्षन त्यामुळे वेग कमी हायब्रीड सायकल - MTB पेक्षा अरुंद टायर - वेग बऱ्यापैकी जास्त पण पंक्चरची शक्यता जास्त रोड बाईक - एकदम अरुंद टायर - कमी फ्रिक्षन मुळे भरपूर वेग हायब्रीड आणि रोड बाईकला पंक्चर रेझीस्टन्ट टायर मिळतात त्यामुळे शक्यतो पंक्चर होत नाही (प्रशांत मालकांचे टायर साध्या हायब्रीडपेक्षाही अरुंद आहेत)
↩ प्रतिसाद: एस

अच्छा! पण रस्त्यावर जर खडी,

एस
Sat, 11/05/2016 - 10:14 नवीन
अच्छा! पण रस्त्यावर जर खडी, वाळू इ. पसरल्यामुळे रस्ता निसरडा झाला असल्यास अशा रस्त्यावर कुठली सायकल घसरण्याची शक्यता कमी असेल? मला तरी सुरक्षितता आणि दणकटपणा यासाठी एमटीबी बरी वाटते. विशेषतः आपल्याकडील रस्त्यांची अवस्था लक्षात घेऊन.
↩ प्रतिसाद: मोदक

MTB ला तोड नाही.

मोदक
Sat, 11/05/2016 - 10:20 नवीन
MTB ला तोड नाही. कशीही ताबडा, काहीही होत नाही, रस्त्यावर मजबूत ग्रिप असते फक्त जास्ती पळत नाही आणि थोडा जास्त घाम गाळावा लागतो
↩ प्रतिसाद: एस

कालच मी एक "सुविचार" वाचला

विंजिनेर
Sat, 11/05/2016 - 21:23 नवीन
कालच मी एक "सुविचार" वाचला - "माउंटन बाईक ईज लाईक युअर बडी, रोड बाईक इज युवर लव्हर"
↩ प्रतिसाद: मोदक

MTB,हायब्रीड आणि रोडबाईक ....

डॉ श्रीहास
Sat, 11/05/2016 - 12:42 नवीन
MTB,हायब्रीड आणि रोडबाईक ....... मी तिन्ही वापरल्या आहेत.... हायब्रीड आणि MTB आपल्या रस्त्यांसाठी उत्तम त्याशिवाय स्टॅमिना वाढवण्यास मदत करतात.... पण रोडबाईक(नावाप्रमाणे रोडच) जी एरोडायनॅमिक्स आणि कमी वजन ह्यॅ वैशिष्ठ्यांनी ओळखली जाते ती लांबचे पल्ले गाठण्यासाठी चांगली, तसं बघायला गेलात तर टुरिंग बाईक्स हा एक वेगळाच प्रकार आहे जो हायब्रीड/MTB + रोडबाईक यांच्या काॅम्बिनेशन मधुन उगवलेला आहे जो फारच मोठे पल्ले सामानसुमान बांधुन जाण्यासाठी वापरला जातो..... सुरवात करणार असाल तर हायब्रीड सर्वोत्तम, पण दिसायला चांगली म्हणून बरेचदा MTB ला प्राधान्य दिलं जातं! खुप सायकलींग केल्यावर रोडबाईक खुणावायला लागते आणि माझ्यासारखे काहीजण बळी पडतात ;)) एक असतांना दुसरी सायकल कशाला ? असा प्रश्न खंद्या सायकलस्वाराला पडत नाही तो त्याच्या किंवा तिच्या घरच्यांना पडतो.....
↩ प्रतिसाद: मोदक

धन्यवाद डॉ. आणि मोदकदादा! ;-)

एस
Sat, 11/05/2016 - 18:20 नवीन
धन्यवाद डॉ. आणि मोदकदादा! ;-) म्हणजे व्यायामासाठी एमटीबी बेस्ट.
↩ प्रतिसाद: डॉ श्रीहास

अजून एक प्रश्न याच अनुषंगाने

एस
Sat, 11/05/2016 - 22:36 नवीन
अजून एक प्रश्न याच अनुषंगाने : लेह-लडाख सायकलवारी करणारे कोणत्या प्रकारची सायकल वापरतात? एमटीबी की अजून दुसरी? (प्रश्न विचारून भंडावून सोडल्याबद्दल क्षमस्व. :-) )
↩ प्रतिसाद: एस

लेह लदाखवाले बहुतांश MTB च

मोदक
Sat, 11/05/2016 - 23:50 नवीन
लेह लदाखवाले बहुतांश MTB च वापरतात. अन्यथा मॉडीफाय केलेली टूरींग बाईक. पण तेथे MTB (आणि बुलेटच) राज्य करतात. आता विषय निघाला आहे म्हणून हा एक व्हिडीओ बघा. आणि त्याच ग्रूपचा हा आणखी एक अप्रतीम व्हिडीओ... (असे काहीतरी करायला कधी वेळ मिळेल देव जाणे....)
↩ प्रतिसाद: एस

मोदक भाऊ (दादा नाही)

झेन
Sun, 11/06/2016 - 09:15 नवीन
कलीजा खलास व्हीडीओ, मला खात्री आहे तुमचा ही असा व्हीडीओ आम्हाला ईथे पहायला मिळेल. अलिकडे एका दीवसात जास्तीत जास्त ८० की.मी. सायकल चालवलेला ...अनियमित झेन.
↩ प्रतिसाद: मोदक

८० किमी करताय तर १०० अवघड

मोदक
Sun, 11/06/2016 - 11:50 नवीन
८० किमी करताय तर १०० अवघड नाही... सेंच्युरी मारा एकदा..!!
↩ प्रतिसाद: झेन

आज पणऩो व्यायाम. उद्यापण

त्रिवेणी
Sat, 11/05/2016 - 14:13 नवीन
आज पणऩो व्यायाम. उद्यापण सुट्टी.

एक आवडतं वाक्य

वेल्लाभट
Sat, 11/05/2016 - 14:43 नवीन
Image removed.

आजचा व्यायाम:

अनिरुद्ध.वैद्य
Sat, 11/05/2016 - 23:23 नवीन
वार्मअप अन सर्किट ट्रेनिंग ४० मिनिटे.

आज नो वॉक, सो नो टॉक.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 11/06/2016 - 11:29 नवीन
रविवारी ब्याडमिंटनच्या म्याचेस असतात. त्यामुळे नो वॉक. पण जीवापेक्षा जास्त खेळतो. प्रचन्ड थकून जातो. -दिलीप बिरुटे

डीबी (:D)

मोदक
Sun, 11/06/2016 - 11:44 नवीन
डीबी (:D) इलेक्ट्रॉल किंवा ग्लुकॉन-डी आठवणीने प्या. लै बॅडमिंटन खेळले की प्रचंड घाम येतो आणि डीहायड्रेशन होते.
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हो ना राव.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 11/06/2016 - 18:26 नवीन
आज लटकून गेलो. दिवसभर लोळत राहीलो. :( -दिलीप बिरुटे
↩ प्रतिसाद: मोदक

कालचा व्यायाम..

मोदक
Sun, 11/06/2016 - 11:42 नवीन
कालचा व्यायाम.. Image removed. काल पहिल्यांदाच बॅडमिंटन खेळताना पेडोमीटर ट्राय केले, खिशात मोबाईलचे वजन जाणवत होते. नीट खेळता आले नाही. तसेच या अ‍ॅपने सायकलिंगच्या वेळेतला थोडा डेटा ट्रॅक केला. Image removed.

75 किमी सायकल

अनिरुद्ध.वैद्य
Sun, 11/06/2016 - 18:08 नवीन
अन नंतर 2 तास बॅडमिंटन!! जबरी _/\_
↩ प्रतिसाद: मोदक

आजचे चालणे २.८ कि.मी. रविवार

मोहन
Sun, 11/06/2016 - 12:37 नवीन
आजचे चालणे २.८ कि.मी. रविवार असुन. हे केवळ ह्या धाग्यामुळेच. एरवी रविवारचा बहाना नक्कीच मिळाला असता !

६-११-१६

वेल्लाभट
Sun, 11/06/2016 - 13:06 नवीन
(१० जोर १० स्क्वॅाट) * ४ न थांबता वॅार्मअप नंतर अर्थात

वॅार्मअप

प्रशांत
Sun, 11/06/2016 - 14:57 नवीन
काय काय आणि किती वेळ करता
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

बेसिक वॉर्मअप

वेल्लाभट
Mon, 11/07/2016 - 10:14 नवीन
१ मनगटं वर्तुळाकार फिरवणे *१५ २ दोनही हात खांद्यातून एकदा पुढच्या दिशेने व एकदा मागच्या दिशेने वर्तुळाकार फिरवणे *१५ ३ टॉर्सो ट्विस्ट - विश्रामावस्थेत उभं राहून कमरेवरचं शरीर एकदा डावीकडे एकदा उजवीकडे फिरवणे * १५ ४ लॅट स्ट्रेच - विश्रामावस्थेत उभं राहून कमरेवरचं शरीर एकदा डावीकडे एकदा उजवीकडे झुकवणे * १५ ५ दोनही पाय ताठ ठेवून हात अंगठ्यांना टेकवणे * ५ (एक दोन सेकंद ही अवस्था धरून ठेवणे) ६ दोनही पाय ताठ ठेवून कमरेवरील शरीर मागे झुकवणे (कमान टाकण्याची सुरुवात) * ५ (एक दोन सेकंद ही अवस्था धरून ठेवणे) ७ चवड्यावर उभं राहणे * १५ ८ मानेला ताण देणे - अ) हनुवटी गळ्याच्या दिशेने आणणे व त्याच्या विरुद्ध नेणे ब) मान डावीकडे व उजवीकडे झुकवणे क) मान डावीकडे व उजवीकडे वळवणे * १५ ९ हाताचे तळवे एकदा पाठीमागे नेऊन एकमेकांना टेकवणे व एकदा छातीपुढून परस्पर विरुद्ध खांद्यांना टेकवणे (मिठी मारल्यागत) * १५ १० जंपिंग जॅक्स * ५० Image removed.
↩ प्रतिसाद: प्रशांत

धन्स..

प्रशांत
Mon, 11/07/2016 - 11:44 नवीन
धन्स..
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

फारच महत्वाचं.....

डॉ श्रीहास
Mon, 11/07/2016 - 15:35 नवीन
अगदी योग्य आणि फारच जरूरी माहीती..... अनेक धन्स :))
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

Strava club for runners

स्थितप्रज्ञ
Sun, 11/06/2016 - 15:28 नवीन
धाग्याला मिळणारा उदंड प्रतिसाद लक्षात घेऊन मोदकरावांच्याच मार्गदर्शनाखाली Strava नामक मोबाईल अॅपवर खालील रनिंग क्लब सुरु करण्यात आला आहे. https://www.strava.com/clubs/miparunners जास्तीत जास्त सदस्य यातून प्रेरणा घेऊन पळणे चालू करतील या उद्देशाने हा क्लब बनवण्यात आलेला आहे तरी याचा अवश्य लाभ घ्या. ग्रुपचे नाव "MiPa Runners"

सात मजले चढणे

मन१
Sun, 11/06/2016 - 16:15 नवीन
ह्या प्रकाराला व्यायाम म्हणता यावं का, ह्याबद्दल साशंक आहे. मात्र सात मजले नियमित चढतो. घर नि हापिस दोन्ही लैच वरच्या मजल्यावर आहेत. शक्यतो लिफ्ट वापरत नाही. हल्ली पायर्‍या चढण्याचं एक तंत्र सवयीनं जमतय असं मला वाटतय. सतत , शांतपणे पायर्‍या चढायच्या; न बोलता. श्वास घेताना साधारणतः पूर्ण छाती भरुन घ्यायचा, साधारणपणे भस्त्रिका करताना करतो तसा. न थांबता सात मजले मी सध्या चढू शकतोय दीडेक मिनिटात आणि वरती गेल्यावर फार काही धाप लागलेली नसते. वरती पोचल्यावर श्वास किंचितच जोरात घ्यावा लागतो; तेही फक्त मिनिटभर. नंतर अगदि नॉर्मल. अर्थात अशा पद्धतीनं श्वास घेणं बरोबर की चूक हे मात्र माहित नाही; मला शरीर शास्त्राबद्दल शून्य माहिती आहे. निव्वळ अनुभव, प्रयोग शेयर करत आहे. जाणकारांकडून खात्री करुन घ्यावी. दिवसभरात ऑल्मोस्ट लिफ्ट वापरायचीच नाही, असा प्रयत्न असतो. बहुतांशी यशस्वी होतो. कधी कधी प्रयोग म्हणून बॅक-टू-बॅक दोनदा सात मजले चढतो. म्हणजे तळमजल्यापासून वर यायचं; श्वास नॉर्मल होइ पर्यंत मिनिटभर थांबायचं; मग पुन्हा तळमजला; आणी लगेच पुन्हा वरती यायचं. हे करुन पाहिलं. दोनदा चढउतार करुनही ऑल्मोस्ट काहीच दम लागला नाही. ( मिनिटभरात श्वास नॉर्मल होतो) धावणे , जिम , पोहणे , सायकलिंग ह्या गोष्टींसाठी मात्र वेगळा वेळ काढणे अजून जमत नाहिये :(

आज वॉर्मअप आणि दोन

एस
Mon, 11/07/2016 - 08:12 नवीन
आज वॉर्मअप आणि दोन सूर्यनमस्कार घातले.

आजचं सायकलींग....(रोड बाईक)

डॉ श्रीहास
Mon, 11/07/2016 - 08:32 नवीन
४२.४५ किमी, १:३८ तास, वेग २५.८ ते२६ किमी/तास...... एक दिवस आराम आणि एक दिवस प्रवास असे दोन दिवस आॅफ होते...

नो वॉक, नो प्ले.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 11/07/2016 - 08:50 नवीन
काल थकल्यामुळे आज पिव्वर आराम केला. पण उद्या वॉक ५ किमी झालाच पाहिजे. -दिलीप बिरुटे
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा