मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सहजच

रातराणी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
आळसावलेल्या एका सकाळी तू म्हणाव चल फिरून येऊ कुठे कस काही न सांगता घेऊन यावस मग समुद्रकिनारी मी विचाराव, "का रे, आज एवढ्या लांब?" तू म्हणाव, "सहजच, गंमत आपली" सूर्य पाण्यात पोहू लागेपर्यंत पडून राहाव गरम वाळुत सूर्यास्ताला जाव गार पाण्यात हलकेच उलगडावी तू माझी वेणी मी म्हणाव, "काय रे? केस विस्कटतील" तू म्हणाव, "असू देत असेच सहजच " बोचर्या थंडीची पर्वा न करता ओल्या वाळुत उमटवाव्यात पाउलखुणा अंधार पांघरुन मग मोजत बसाव्या आकाशभर चमचमणाऱ्या चांदण्या मी हळूच ओठ टेकवावे तुझ्या गालांवर तू विचाराव, "अरे वा, आज काय विशेष?" मी म्हणाव, "काही नाही, सहजच"

वाचने 12769 वाचनखूण प्रतिक्रिया 33

In reply to by माम्लेदारचा पन्खा

यशोधरा Sun, 10/09/2016 - 19:35
राराने इतकी रोम्यांटीक कविता लिहिली आणि तुम्ही एकदम करपायच्याच गोष्टी बोलायला लागलात! दुत्त!

प्रचेतस Sun, 10/09/2016 - 20:09
सहीच लिहिलंय. बाकी सूर्यास्तानंतर समुद्राचं पाणी उबदार असते आणि जमीन गार म्हणून तर मतलई वारे सुरु होतात.

अभ्या.. Mon, 10/10/2016 - 00:56
करपलेल्या भाजीची पर्वा न करता भरावेत बकाण्यावर बकाणे लक्ख डब्याचे झाकण लावता लावता आठवावेत ते सुखाचे उखाणे मी हळूच पहावे तुझ्या डब्याकडे तू विचाराव, "अरे वा, आज काय विशेष?" मी म्हणाव, "काही नाही, विशेष आमची मिशेष" . येनी वे रारा. कविता ज्याम आवाडलीय. मस्तच.

सतिश गावडे Mon, 10/10/2016 - 07:40
अंधार पांघरुन मग मोजत बसाव्या आकाशभर चमचमणाऱ्या चांदण्या
वाह..