आळसावलेल्या एका सकाळी
तू म्हणाव चल फिरून येऊ
कुठे कस काही न सांगता
घेऊन यावस मग समुद्रकिनारी
मी विचाराव, "का रे, आज एवढ्या लांब?"
तू म्हणाव, "सहजच, गंमत आपली"
सूर्य पाण्यात पोहू लागेपर्यंत
पडून राहाव गरम वाळुत
सूर्यास्ताला जाव गार पाण्यात
हलकेच उलगडावी तू माझी वेणी
मी म्हणाव, "काय रे? केस विस्कटतील"
तू म्हणाव, "असू देत असेच सहजच "
बोचर्या थंडीची पर्वा न करता
ओल्या वाळुत उमटवाव्यात पाउलखुणा
अंधार पांघरुन मग मोजत बसाव्या
आकाशभर चमचमणाऱ्या चांदण्या
मी हळूच ओठ टेकवावे तुझ्या गालांवर
तू विचाराव, "अरे वा, आज काय विशेष?"
मी म्हणाव, "काही नाही, सहजच"
| लेखनविषय: |
|---|
वाचने
12885
प्रतिक्रिया
33
मिसळपाव
प्रतिक्रिया
वाह...मस्तच. आवडली.
वाह...मस्तच. आवडली.
:) धन्यवाद :)
In reply to वाह...मस्तच. आवडली. by पद्मावति
:) धन्यवाद :)
!!! एकदम रोमँटिक कविता !!!
!!! एकदम रोमँटिक कविता !!!
छान कविता. थोडंसं 'लुप्त
छान कविता. थोडंसं 'लुप्त मात्रा अनुस्वार' याकडं लक्ष दिलं पाहिजे.
होय, उत्साहात जरा दुर्लक्ष
In reply to छान कविता. थोडंसं 'लुप्त by एस
होय, उत्साहात जरा दुर्लक्ष झालं खरं :)
मस्त! सुर्रेख लिहिली आहे!
मस्त! सुर्रेख लिहिली आहे!
आज काय ब्वा मजाय तुमच्या ह्यांची.....
एकच कल्ला नुसता !
रच्याकने दिवसभर समुद्रावर बसून करपायला नाही का होणार ?
राराने इतकी रोम्यांटीक कविता
In reply to आज काय ब्वा मजाय तुमच्या ह्यांची..... by माम्लेदारचा पन्खा
राराने इतकी रोम्यांटीक कविता लिहिली आणि तुम्ही एकदम करपायच्याच गोष्टी बोलायला लागलात! दुत्त!
खरं आहे पण.....
In reply to राराने इतकी रोम्यांटीक कविता by यशोधरा
प्रश्न तर पडतातच नं !
आं दुत्त दुत्त, आपण ज्याला
In reply to खरं आहे पण..... by माम्लेदारचा पन्खा
आं दुत्त दुत्त, आपण ज्याला करपने म्हणतो ते काही लोक हौस म्हणून टयान केलय म्हणतात बर!
सहीच लिहिलंय.
सहीच लिहिलंय.
बाकी सूर्यास्तानंतर समुद्राचं पाणी उबदार असते आणि जमीन गार म्हणून तर मतलई वारे सुरु होतात.
अरे देवा, इथे पण भूगोलच आठवला
In reply to सहीच लिहिलंय. by प्रचेतस
अरे देवा, इथे पण भूगोलच आठवला ? :)
=))
In reply to अरे देवा, इथे पण भूगोलच आठवला by रातराणी
=))
चितळे मास्तरांच गोदाक्का
In reply to =)) by प्रचेतस
चितळे मास्तरांच गोदाक्का सांगा बर आता वारे कुठल्या दिशेला वाहतायत? आठवल सहजच =))
:) कविता आवडली.
:)
कविता आवडली.
धन्यवाद :)
धन्यवाद :)
एकदम 'सहज' लिहील्यासारखी
एकदम 'सहज' लिहील्यासारखी वाटली!
:)
करपलेल्या भाजीची पर्वा न करता
करपलेल्या भाजीची पर्वा न करता
भरावेत बकाण्यावर बकाणे
लक्ख डब्याचे झाकण लावता लावता
आठवावेत ते सुखाचे उखाणे
मी हळूच पहावे तुझ्या डब्याकडे
तू विचाराव, "अरे वा, आज काय विशेष?"
मी म्हणाव, "काही नाही, विशेष आमची मिशेष"
.
येनी वे रारा. कविता ज्याम आवाडलीय. मस्तच.
=))
In reply to करपलेल्या भाजीची पर्वा न करता by अभ्या..
अभ्यादादाचा तडका.... कविताका अंग अंग भडका! ;)
रातराणीतै कविता येकच लंबर... ज्याम आवडलीये!
Sandy
खी खी खी =))
In reply to करपलेल्या भाजीची पर्वा न करता by अभ्या..
खी खी खी =))
छान
छानचं!
छान !!
वाह..
पद्मावतीतै, अभिजीत, एसभाऊ,
पद्मावतीतै, अभिजीत, एसभाऊ, यशोतै, मापदादा, वल्लीसर, अजयातै, जव्हेरभाऊ, अभ्या.., संदीपदा, मिकादादा, आणि गावडेसर सर्वांचे मनापासून आभार :)
+१
रोमँटीक. दिल गार्डन गार्डन हो गया.
:)
छान,
चाणक्य आणि नीमो धन्यवाद :)
चाणक्य आणि नीमो धन्यवाद :)
कविता सुंदर आहे. अगदी अलगद
कविता सुंदर आहे. अगदी अलगद सहज पणे मनातून पानावर उमटलीये !!!!!
धन्यवाद विवि :)
धन्यवाद विवि :)
एक्दम फर्मास
उपमांचा मारा न करता, म्हणून खूप आवडली.
कवीता ही सहजच झाली पाहिजे.
अरे वा, छानच!
अरे वा, छानच!
.
👌
अप्रतिम... निव्वळ अप्रतिम...
अप्रतिम... निव्वळ अप्रतिम...
सर्व नवीन वाचकांना धन्यवाद.
थँक्यु थँक्यु थँक्यु 🤗