मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पाश्चिमात्य साहित्य

हेमंत लाटकर · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
महायुद्ध आणि इतर अनेक युद्धे, संघर्ष, महामंदी अशा अनेक उलथापालथीतून पाश्चिमात्य समाज गेला होता. या पार्श्वभूमीवर डोस्टोव्हस्की, फ्रँझ काफ्का, अल्बर्ट कामू, सार्त्र, अर्नेस्ट हेंमिग्वे, जाॅन स्टाईनबेख, डिकन्स, लाॅरेन्स अशा अनेक पाश्चिमात्य साहित्यिकांनी नीतिमत्ता, कुटुंबव्यवस्था, लैंगिकस्वातंत्र्य यासारख्या जीवनाची अनेक अंगे बघितली होती तसेच यांची स्वत:ची आयुष्य प्रचंड वादळी होती. त्यांचे आयुष्याचे अनुभव जिवंत होते आणि त्यामुळेच त्यांचे साहित्य रसरशीत आणि जिवंत वाटते. काही गाजलेली इंग्रजी पुस्तके - : १) लस्ट फाॅर लाईफ, आयर्विग स्टोन २) फाॅर हूम दी बेल टोल्स, अर्नेस्ट हेंमिग्वे ३) आॅफ माईस अँड मेन, जाॅन स्टाईनबेख ४) कॅचर इन दी राय, जे.डी. सॅलिंगर ५) सन्स अँड लव्हर्स, डी.एच. लाॅरेन्स ६) क्राईम अँड पनिशमेंट, डोस्टोव्हस्की ७) ब्रदर्स कारामाझोव्ह, डोस्टोव्हस्की ८) दी स्ट्रेंजर, अल्बर्ट कामू ९) दी फाॅल, अल्बर्ट कामू १०) दी आऊटसाईडर, अल्बर्ट कामू ११) रोड्ज टू फ्रीडम, सार्त्र १२) दी एज आॅफ रीझन, सार्त्र १३) दी रिप्रिव्ह, सार्त्र १४) दी थीप्स जर्नल, जिअँ जेने १५) द मेटॅमाॅरफाॅसिस, फ्रँझ काफ्का १६) एन्ड आॅफ अफेअर, ग्रॅहम ग्रीन १७) फाँटमारा, इग्नाझिओ सिलोने १८) डार्कनेस अॅट नून , आर्थर कोएस्टलर १९) एरहून, सॅम्युएल बटलर २०) पिग्मॅलियन, बर्नार्ड शाॅ

वाचने 12173 वाचनखूण प्रतिक्रिया 45

In reply to by टवाळ कार्टा

अभ्या.. 28/09/2016 - 01:19
असतात रे जीव जाळणारे काहीजण. असो. तुझ्या उडालेल्या धाग्याबद्दल वाईट वाटले बरका मला. माझेही चारपाच प्रतिसाद होते त्यात. किम्मत राह्यली नै आजकाल आपल्या लिखाणाची. ;)

In reply to by टवाळ कार्टा

केवळ हातात घेऊन बघत बसायचीच पुस्तके हेलांनी आजपर्यंत पाहिली असण्याची शक्यता आहे ;)

In reply to by टवाळ कार्टा

नाखु 28/09/2016 - 09:01
ही पुस्तके कुणाकडे असतील लाटकर काकांना त्याचा अनुवाद करून हवा आहे. (दुस्र्या आंतरजालावर टाकायला) काहीही हं टका श्री श्री श्री श्री श्री श्री श्री

In reply to by नाखु

टवाळ कार्टा 28/09/2016 - 09:08
इतका वेळ कोण थांबणार, फेसबुकवर कोणीतरी काहीतरी लिहिले असेलच कि, करा कॉपी आणि पेस्टावा मिपावर होऊदे खर्च मिपा आहे घरचं बाकी माझ्या टिंब धाग्यावर सर्व्हर स्पेस वाया जाते म्हणून गळे काढणारे कोण ते?

In reply to by टवाळ कार्टा

पैसा 28/09/2016 - 09:19
लाटकरांना अभिव्यक्ति स्वातंत्र्य आहे. त्याना एक लाटकर स्पेशल धागा संपादकांनी काढून द्यावा. रोजचे दिव्य भास्करमधले कॉपी पेस्ट तिथेच ते चिकटवत जातील. हाकानाका.

In reply to by टवाळ कार्टा

पैसा 28/09/2016 - 09:34
इकडे तिकडे गेलेली मांजराची पिल्ले बास्केटमधे टाकतो तसे तिकडे नेऊन चिकटावायचे थोडे दिवस. पाहिजे तर उजव्या कॉलममधे दखल सारखी एक लिंक करून द्यायची. हाकानाका.

हेमन्त वाघे 28/09/2016 - 10:19
आत्मकेंद्रित आणि गतिमान भांडवलशही जीवनमानामुळे विसंवादी होणाऱ्या मानवसमूहाची जळजळ आणि तळमळ हि बहूरायामी पुस्तकाने अधोरेकीत करतात असे वाटावे असे मला वाटते . हे ला आपले यावर मत जाणून घेण्यास मला नक्कीच आवडेल !

नीलमोहर 28/09/2016 - 10:48
प्रत्येक पुस्तकाच्या नावाखाली थोडक्यात ते कशाबद्दल आहे तेही ऍड करा म्हणजे बरे पडेल, वरीलपैकी काफ्काचे मेटामॉर्फोसिस सोडून बाकी वाचलेले नाही,

In reply to by सचु कुळकर्णी

नाखु 29/09/2016 - 08:52
अजूनही पहिलीत* असतील (आणि त्याचा मिपाकराम्ना उपद्रव होत असेल) तर काय करावे यावर वरील दोघांनी काथ्याकूट कुटावा. पहिलीत* फक्त समजदृष्ट्या,वयाने शरीराने गॄहस्थाश्र्मात असलेले. ता.क.लगेच मोर्चा काढू नये, जे प्रश्न चर्चेने सुटतात ते मोर्चाने सुटतीलच असे नाही. अखिल मिपा पहिले मिपा रक्षण मग कशाला आरक्षण संघा तर्फे मिपाकर हितार्थ जारी

कंजूस 29/09/2016 - 07:19
फाळणीवर आधारीत इथल्या पुस्तकांची यादीही द्या.त्यावेळीही त्रास झाला होता.परदेशी लोकांना युद्धात झाला तेवढा आम्हाला तरी वाटतो. * पंचावन कोटिंचे बळी * the train to pakistan - khushwant slngh

खफ. झाला.. अता इथेही? जौ दे.. अता आपण माश्यांनाच समजावून सांगू. तुम्ही तर समजत नाही, त्या तरी समजतील! . . . . . . . . . . . . . . . . अभी नेत्री~ काहिही चालन्..! ;)