आमच बी क्वाश्चुम डिजाइन
आमच बी क्वास्चुम डिझाईन
तर काय सांगत व्हतो मी. हां आमी कापड घाल्तो ती सोताच उन थंडी वारा पाउस या पासुन सौरक्षन व ल्वॊकांच लज्जा रक्षन याच्यासाटी. आता कापडाच्या आत समदीच मान्स भोंगळी असत्यात म्हनून काय भोंगळ फिरायच?
आता यकदा आमची प्यांट लाग्ली गळायला. पट्टा घालायला लागला. लै़च वैताग यायला लागला. मंग आमी ती प्यांट घालन सोडुन दिल. दुसरी प्यांट घालायला लाग्लो. तसे आमी कंच्या बी प्यांटवर कंचा बी शर्ट घालतोय. कापडं घालतोय ह्य काय थोडयं का? काही दिवसांनी ही प्यांट टाईट व्हायला लाग्ली. मंग आमी पह्यली प्यांट काल्ढी.ती बी आता टाईट व्ह्यायला लागली. च्यायला! आमी वैतागलो. म्हनल आता लेंगा घालावा. पन त्यो अस्तोय ढवळा. लईच लौकर खराब व्हतोय. आन शहरात लेंगा घातल्याव ल्वॊक पावटा म्हंतीन ना? प्यांटच यक कलर डार्क घेतला की मंग झाल. धुवायची भानगड नश्ष्ये. ल्वॊक म्हनली प्यांट मळाली की मंग धुवायची. पन या टाईट लुज च काय करायच. आमच्या जीवन शिक्षन मंदिरात प्वॊर खाकी प्यांटीवर कर्गुटा बांदायची.त्याची आठवन आली. खाकी प्यांट ढवळा सद्रा आन डोक्याव टोपी. प्यांटीच बिटान तुटल की पोष्ट उघड. वरुन सद्रा आसायचाच. आन कोन पघतय?
सद्र्याच बिटान तुट्ल कि मंग तिथ सुईचा टाका मारायचा. पक्की गाठ. अशी बिटान तुटत जायची आन मंग तवर सद्रा पाठीवर ईरुन फाटायचा. मंग तिथुनच काढायचा. तव्हाच आंघुळ्या करुन घ्यायच्या. मंग सदु शिंप्याने शिवलेला न्हाईत बाजारातुन आन्लेला नवीन सद्रा न धुताच घालायचा. त्येच्या बाहीव मिलचा शिक्का बी दिसायचा. नंतर तो बी शेंबुड पुसु पुसु घालवायचा. कर्गुट्याची आयडिया म्हनल आपन आता करावी. पन आमी आता पल्डो पुन्यात. आन आता विल्याश्टिकचा जमाना आलाय. मंग म्हन्ल हितल्या शिंप्याला ईचाराव प्यांटीला विल्याश्टिक लाउन दे ट्राउजरवानी .फ्याशन वाल्या टेलर ला ईचारल तर तो न्हाई म्हन्ला. मंग यकानी पटवर्धन
टेलरच नाव सांगातल.त्येच्याक बी गेलो.. त्याला म्हन्ल प्यांट गळू नये म्हनुन पुर्वी दोन बंद व्हतेच की. मराठी पिच्चरमदी पैशेवाल्याच्या मंद बुद्दीच्या पोराला असल्या काळ्या प्यांटी घालायची ; हिंदी पिच्चरमदी डिटेक्टिवला बी आस्ल्या प्यांटी घालायची
ईनोदी दिस्ते म्हनुन. हॆ हॆ हॆ . द्या टाळी ! म्हनुन त्येच्याक पघितल पन त्या पटवर्धननी न्हाईचा प्रहार पुनेरी पद्धती ने आमच्या डोस्क्याव हान्लाच..
नंतर काळात मंग प्यांटीच्या कमरेवर दोन बिटान आन येक फ्ल्याप. अशी बी क्वाश्चुम फ्याशन व्हतीच ना . म्हजी आमच्या यकट्याचा प्राब्लेम न्हाई हा. लोकान्लाबी शेम प्रोब्लेम असनार. नंतर मंग म्हनल यखादा सादा टेलर पघावा. बायकुच्या वळखीने त्येच्याक गेलो. त्येला म्हनल प्यांटीच्या कमरेवर विल्याश्टिक लावायच. आतुन नीट ववुन घ्यायच.तो म्हन्ला प्यांटीच्या कमरेव वळ्या दिसतीन. म्हन्ल चालन. वय झाल्याव शिंव्ह कटीव बी वळ्या दिसत्यात. मंग यकदाची प्यांट झाली. घालुन पघितल. प्वॊट फुगुन पघितल. यकदम रिल्याक्स पुरवनी झाल्ती या विल्याश्टिकची. आमच्या या कॊश्चुम डिजाईन नी आमी सोतावरच खुश झालो. लई दिस मंग आमी ती प्यांट न धुता लोकान्ला आमच कॊश्चुम डिजाईन दाखवत फिरलो. सुरवातीला लोकांनी कवतिक केल पन वास यायला लाग्ल्याव मंग ल्वोकांनी सांगातल. तसं आमी रात्रीतुन प्यांट धुतली. सकाळी पघितल. बाकी प्यांट वाळल्याली पन कमरेला वल्ली व्हती. आम्ही लवकर वाळावी म्हनुन गरम गरम विस्त्री मारली. आन घालायला गेलो त प्यांट गळायला लागली आन त्यासोबत आमचा अहंकार ही.
वाचने
14785
वाचनखूण
प्रतिक्रिया
30
लै भारी
आम्ही लवकर
__/\__
In reply to __/\__ by आनंदयात्री
अरे हो
In reply to __/\__ by आनंदयात्री
सदशिव
हाहाहा!
काका!!!!!!!!!!!!!
हाहाहाहाहा
लई भारी
लय भारी
In reply to लय भारी by इनोबा म्हणे
ठ्ठो!
In reply to लय भारी by इनोबा म्हणे
+१,
In reply to लय भारी by इनोबा म्हणे
हुच्च....लै
प्रकाशकाका
काय घाटपांडे काका?
In reply to काय घाटपांडे काका? by चतुरंग
स ह म त
In reply to काय घाटपांडे काका? by चतुरंग
अगदी
अहो फॅशन
शॉल्लीड
लै भारी !
समृद्ध वाचक
In reply to समृद्ध वाचक by प्रकाश घाटपांडे
उत्तम
घाटपांडे
लेख
मस्त.. तरीच
समस्याचे आकलन.
क्र. १
फ्याशनेबल भौ
लय
खी खी खी