मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मी बी मंत्री होईन म्हणतो : नागपुरी तडका

गंगाधर मुटे · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
मी बी मंत्री होईन म्हणतो : नागपुरी तडका

लाल दिव्याची चमक पाहीन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!

शेतमालाला रास्त भाव
भेटला काय, न भेटला काय
शेतकर्‍याला दारिद्रीत जगायची
उपजत सवयच हाय
मी तरी आपलं जमवून
घेईन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!

शेतकर्‍याला कर्जमुक्ती
भेटली काय, न भेटली काय
शेतकर्‍याला कर्जात जगायची
उपजत सवयच हाय
मी तरी आपला खिसा भरून
घेईन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!

शेतीचे प्रश्न
सुटलेत काय, न सुटलेत काय
या बैताडबेलण्या शेतकर्‍याले
उपजत अक्कलच नाय
संघटनेची सीडी करून
सत्तेच्या बोहल्यावर चढेन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!

शेतीशी प्रतारणा करून
सत्तेत येता येते
शेतकर्‍याशी इमान राखणारा
खड्ड्यामधी जाते
शेतकर्‍याचे नाव फक्त
कामापुरते घ्यावे
सीडी चढून झाली की
खुशाल सोडून द्यावे
सत्ताकारण करावे
तरच मिळते अभय....!!
एकमुखाने बोला भाऊ!
सत्तासुंदरी की जय....!!!

                     - गंगाधर मुटे "अभय"
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

वाचने 176408 वाचनखूण प्रतिक्रिया 484

In reply to by गंगाधर मुटे

मोदक Tue, 07/19/2016 - 20:16
मिपाच्या मालकांना, व्यवस्थापकांना आणि संपादकांना विचारा.. बहुतेक सगळ्या जणांना मी भेटलो आहे. आणि तुम्ही राव येवढे सिनीयर.. मिपाचा इतका दांडगा अनुभव.. मग थोडा अभ्यास वाढवा अनेक धाग्यांवर फोटो पण मिळेल. आणखी काय खात्री करायची आहे? (व्हायरस फ्री) मोदक

In reply to by मोदक

गंगाधर मुटे Tue, 07/19/2016 - 20:22
मला पोस्टाचा पत्ता हवा आहे सविस्तर उत्तर पाठवायला कारण तुमच्या प्रश्नाचे उत्तर द्यायला ५००-६०० पाने लागू शकतात. हे मराठीत समजतय ना? इतर भाषा मला येत नाही.

In reply to by मोदक

सामान्य वाचक Tue, 07/19/2016 - 20:38
आता बस करा दुसऱ्या चांगल्या विषयावर चर्चा करा ज्या माणसाने कुणाचा कुठलाही विचार न ऐकण्याचे ठरवले आहे , तिथे कशाला वेळ आणि शक्ती व्यर्थ घालवता ?

मुटे साहेब, मांडलेला मुद्दा कळीचा आहे...पण कवीतेत तुम्ही एक विषय मांडलात की तुम्हाला मंत्री व्हायचय आणी परत प्रतीसादात म्हणताय की मंत्री बनूनही शेतकर्‍यांचे प्रश्ण काही सुटणार नाहीत. मग नक्की काय करायचे आहे तुम्हाला म्हणजे शेतकर्‍यांना फायदा होईल?? अजून एक..
हा धागा महाप्रलयाच्या दिशेने वाटचाल करू नये म्हणून प्रतिसादांना या धाग्यावर मी उपप्रतिसाद देण्याचे यानंतर टाळणार आहे.
>>> इथे तुम्ही म्हणालात की तुम्हाला धाग्याचे काश्मीर करायचे नाहीये आणी तुम्हीच प्रत्येक प्रतीसाद उप-प्रतीसाद देऊन खोडून काढायला बघताय.. का बरे असे? असे केल्याने धाग्याचे काश्मिर नाही तर निदान नागपूर तरी होईलच... असो.. हे माझे मत.

In reply to by स्वच्छंदी_मनोज

गंगाधर मुटे Tue, 07/19/2016 - 19:56
कवितेचा अर्थ तुम्हाला कळत नसेल तर शेजारच्या एखाद्या मराठी भाषिकाला विचारावा. कविला विचारण्याची मराठी संस्कृती तरी आहे का?

In reply to by गंगाधर मुटे

अहो मुटे साहेब.. शेजार्‍याला कशाला डायरेक्ट तुम्हालाच विचारला ना की तुम्हाला नक्की काय करायचे आहे. मंत्री व्हायचेय की अजून काय जेणे करून शेतकर्‍यांचे प्रश्ण सुटायला मदत होईल. आणी शेतकरी का कुठलाही असो नागपूर काय किंवा सोलापूर काय..तो अडचणीतच आहे...पिकवणारा जो पर्यंत विकत नाही तोपर्यंत तो पिचणारच असे वाटते. (कवितेतून जे मांडायचा प्रयत्न केलायत त्याच्याशी विरोधी भुमीका तुमच्या प्रतीसादातून वाटली आणी येण्यार्‍या प्रत्येक प्रतीसादाचे हिरीरीने खंडन करण्याचा अट्टहास जाणवला तुमच्या प्रतीसादातून..)

आदिजोशी Tue, 07/19/2016 - 20:07
मुटे काक, तुम्ही इतकी वर्ष ह्या क्षेत्रात आहात, उमेदीची अनेक वर्ष संघटना आणि शेतकर्‍यांसाठी वेचलीत... का ह्यांच्या नादी लागताय? ह्यांना तुम्ही कविता करण्याव्यतिरिक्त ठोस काम काय केलंय हे जाणून घ्यायचंय ना? मग करा एक यादी आणि ह्यांच्या तोंडावर फेकून मारा. शेतकर्‍यांच्या ह्या ह्या समस्या आहेत... त्यावर मी हे उपाय शोधले आणि अंमलात आणले... त्यातून शेतकर्‍यांचा असा असा फायदा झाला... एक कंसॉलिडेटेड रिप्ल्यास फेकून मारलात की विनाकारण बोलणारी थोबाडं बंद होतील...

In reply to by आदिजोशी

गंगाधर मुटे Tue, 07/19/2016 - 20:15
तुम्ही आलात? मला माहीतेय की बाकी सवंगडी दमले की तुम्ही बाजू लढवायला येत असता. (जुने धागे बघावेत) मी शेतकरी मानूस आ।ए. पीक घेण्यासाठी निंदण, खूरपण व फवारणी आवश्यक आहे, हे माहीत आहे. जनावरांनी त्रास दिला तरी शेती सोडून पळत नाही.

In reply to by गंगाधर मुटे

सुबोध खरे Tue, 07/19/2016 - 20:23
मुटे साहेब, असे डोक्यात राख घालून घेण्यापेक्षा "एवढे" लोक आपल्यावर टीका का करतात याचा शांत डोक्याने विचार करा. मिसळपाव हे सर्वात जास्त वाचले जाणारे मराठी संकेत स्थळ आहे असे काही दिवसांपूर्वी कुणीतरी लिहिल्याचे आठवते. आपली भूमिका शांतपणे मांडली गेल्यास जे लोक मिपाचे सदस्य नाहीत त्यांना ही आपल्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा फायदा होईल. मला अशा बऱ्याच वाचनमात्र असलेल्या लोकांचे फोन व्यनि येतात यामुळे याचा सर्वदूर असलेला परिचय लक्षात आला. बाकी दंगा करणारे करू द्या.

In reply to by सुबोध खरे

गंगाधर मुटे Tue, 07/19/2016 - 20:27
मिसळपाववर ते लेख कविता वाचायला येतात. तुमच्यासारख्यांचे प्रतिसाद नव्हे. जे वाचतात ते वेगळे मिपासदस्य आहेत. तुमच्या दहापाच जणांचा कंपू म्हणजे अख्खी मिसळपाव नव्हे.

In reply to by गंगाधर मुटे

अनुप ढेरे Tue, 07/19/2016 - 21:56
तुमच्यासारख्यांचे प्रतिसाद नव्हे.
ऑ?? आम्ही तर बुवा सुबोध खर्‍यांचे प्रतिसाद वाचायलाच येतो.

जेपी Tue, 07/19/2016 - 20:23
असल्या भाट लोंकामुळे शेतकरी संघटना पर्यायाने शेतकरी बदनाम झाला. नेणत्या राजाची हुजरेगीरी करण्यात संघटना वाया गेली. 2007 साली विनय हर्डीकर यांनी सकाळ मध्ये याविषयक लेख लिहीला होता.

गंगाधर मुटे Tue, 07/19/2016 - 20:41
संकेतस्थळ मालक आणि संपादक मंडळ केंद्रात सत्ताबदल झाल्यापासून पाहतोय मिपावरच १५-२० आयड्यांचं टोळकं माझ्या धाग्यावर तुटून पडत असते. हे १५-२० आयड्यांचं टोळकं म्हणजे अख्खी मिसळपाव आहे किंवा हे मिसळपावचे अधिकृत प्रतिनिधी आहे असे मी मानत नाही. तुम्ही काय मानताय हे मला माहीत नाही. स्वत:ची ओळख लपवणार्‍यांना काहीच धरबंद नसतो. ते काहीही बोलू शकतात, लिहू शकतात. पण त्याबद्दल मला काहीही म्हणायचे नाही. मात्र यावेळेस मी सर्वांना जशास तसे उत्तर देणार आहे, यांची दादागिरी अजिबात खपवून घेणार नाही. तुमच्याकडून एवढीच अपेक्षा आहे की, यापूर्वी सारखी एकतर्फ़ी कारवाई करून केवळ माझे उपप्रतिसाद उडवू नयेत. वाचकांना सर्व वाचू द्या. ते त्यांच्या सदसदविवेकबुद्धीने काय ठरवायचे ते ठरवतील. आपला एक सदस्य गंगाधर मुटे

In reply to by मोदक

सुबोध खरे Tue, 07/19/2016 - 20:49
पण मी कुठे म्हणालो मी नेव्हीत होतो? मी तर शेतकरी आहे आणि आमची कोकणात शेती आहे कुळकायद्यात बरीचशी जाऊन पोटापुरती थोडीशी शिल्लक आहे.

जेपी Tue, 07/19/2016 - 20:41
शेंच्युरी निमीत्त श्री.मुटे यांचा सत्कार एक ऊंट,दोन शेळ्या,तीन कडब्याच्या पेंड्या आणी चार संस्थळांचे पत्ते देऊन करण्यात येत आहे. शुभेच्छुक-जेपी आणी तमाम मिपाकर कार्यकर्ते..

In reply to by जेपी

गंगाधर मुटे Tue, 07/19/2016 - 20:44
तुमचा संपूर्ण परिचय व पत्ता देण्याची हिंमत दाखवाल तर तुमचा सत्कार स्विकारायला मी तयार आहे.

In reply to by जेपी

गंगाधर मुटे Tue, 07/19/2016 - 21:18
सत्काराची तारीख, स्थळ आणि वेळ सांगा मी यायला तयार आहे. आणि हो इथेच जाहीर करा. मिपाकरांना माहीत व्हायला पाहिजे की तुम्ही शब्दाचे पक्के आहात.

In reply to by सुबोध खरे

गंगाधर मुटे Tue, 07/19/2016 - 21:45
मला असे आठवते की गंगापूरवरून लातूरला जाताना मध्ये रेणापूर तालुका लागतो. पुढल्या दौर्‍याचे वेळी अवश्य त्यांचे घरी जाईन. उंट आणि इतर वस्तू त्यांचेकडे नसल्या तरी तेवढ्या रक्कम रोख किंवा चेक घेऊन गावच्या सरपंच्याच्या हस्ते शाल व श्रीफळ स्विकारता येईल. मात्र मिपावर फोटो अवश्य टाकेन.

In reply to by जेपी

चंपाबाई Sat, 07/23/2016 - 23:10
मोगाखानला भेटायला बोलावत होतास तेंव्हा तो फोन नंबर की अ‍ॅड्रेस मागत होता तेंव्हा नाय दिलास . आता मात्र दिलास. धिस ईज डिस्क्रिमिनेशन !

कविता१९७८ Tue, 07/19/2016 - 20:59
मिपाकरानो बस करा आता, हा धागा शतकी प्रतिसादाचा गक्कीच नाही, उगा अति महत्व देउ नका.यापेक्षा खुप चान्गले आणि माहीतीपुर्ण धागे आहेत त्यान्चा असा अपमान होउ देउ नका.

In reply to by कविता१९७८

गंगाधर मुटे Tue, 07/19/2016 - 21:16
कवितेशी संबंध नसलेला प्रतिसाद देऊन प्रतिसादाची संख्या स्वतःच वाढवायची आणि इतरांना (जे ऐकण्याची अजिबात शक्यता नाही) सल्ला द्यायचा. काय म्हणावे याला?

गंगाधर मुटे Tue, 07/19/2016 - 21:15
कवितेशी संबंध नसलेला प्रतिसाद देऊन प्रतिसादाची संख्या स्वतःच वाढवायची आणि इतरांना (जे ऐकण्याची अजिबात शक्यता नाही) सल्ला द्यायचा. काय म्हणावे याला?

In reply to by कविता१९७८

गंगाधर मुटे Tue, 07/19/2016 - 22:11
तुम्ही तसदी नियमितपणे न चुकता घेता आणि मी तसदी घेऊ नये? यह तो बहुत बडी नाइन्साफी होगी.

In reply to by माम्लेदारचा पन्खा

गंगाधर मुटे Tue, 07/19/2016 - 21:31
तुमचाही पत्ता द्या. थेट तुमची दुवा घ्यायला तुमच्या घरी येतो. आणि दुवा देण्याइतपत तुमचे कोनते महान कर्तुत्व आहे हेही मिपावर छायाचित्र आणि सविस्तर वृत्तांतासह जाहीर करतो.

In reply to by गंगाधर मुटे

तुमचे कार्य मात्र खचितच महान आणि लोकोपयोगी आहे हे आम्ही झाईर करु इच्छित आहे !

In reply to by माम्लेदारचा पन्खा

गंगाधर मुटे Tue, 07/19/2016 - 21:54
पळवाट शोधून पळू नका. पत्ता द्या. घरी येतो. दुवा द्या. चहाही मागणार नाही.

In reply to by गंगाधर मुटे

चहाचं म्हणत असाल तर एक चहा कट्टा करुया हवं तर...आम्ही लोकांना चहा आणि पाणी दोन्ही पाजतो ! तुम्ही आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने धाग्यावर भेटलात...जीवन धन्य झाले...आभार !

In reply to by माम्लेदारचा पन्खा

गंगाधर मुटे Tue, 07/19/2016 - 22:23
पत्ता कधी देणार? तेवढं सोडून अवांतर लिहिण्यात फारच उत्साह आहे तुम्हाला. पत्ता ध्या. तुमचा दुवा घ्यायला येतो.

In reply to by गंगाधर मुटे

धनावडे गुरुवार, 07/21/2016 - 14:04
मुटे साहेब सगळ्याचे पत्ते मागतायत मी द्यायला तयार आहे माझा पत्ता काय आहे सध्या भात लावणीसाठी गावी आलोय ते आलेतर भात लावायला मदत होईल आणि शेतीतज्ञ आहेत तर काहीतरी सल्ले पण देतील येताय का?

In reply to by माम्लेदारचा पन्खा

गंगाधर मुटे Tue, 07/19/2016 - 21:56
किंवा मी माझा पत्ता देतो. जाण्यायेण्याचा खर्च देतो. पाहुणचार करतो. माझ्या घरी या. दुवा द्या.

अभ्या.. Tue, 07/19/2016 - 21:37
मुटे सरांचे प्रतिसाद पाहून मला (पिक्चरात पाहिलेल्या) रणांगणात एकट्याने दांडपट्टा फिरवणाऱ्या शूरवीराची आठवण आली. खूप दिवसांनी आले सर पण पार धुराळाच केला.

In reply to by अभ्या..

गंगाधर मुटे Tue, 07/19/2016 - 21:49
तुमचा प्रतिसाद पाहून मलाही सिनेमाची आठवण झाली. गुंडांच्या टोळीचा नि:पात झाल्यानंतर पिक्चरमधे सामान्य जनता जशी खुशीने नाचायला लागते, तसंच वाटलं.

In reply to by गंगाधर मुटे

ब़जरबट्टू गुरुवार, 07/21/2016 - 11:55
अभ्या.. पार सामान्य जनतेच्या क्यातागिरीत गेला.. :) मुटे सर प्रतिसाद द्यायला परत धाग्यावर येतात, हे याची देहा पाहिले.. _/\_

In reply to by ब़जरबट्टू

अभ्या.. गुरुवार, 07/21/2016 - 14:30
सामान्यच हाय मी. त्यात काय लाजायचं. आणि मला खरच असली साउथ स्टाईल फायटिंग आवडती. एकटा हिरो लुंगी गुंडाळून सेंटरला. चारी साईडने सगळे कोयतेवाले.बाजूला कोर्पिओ, तवेरा, क्वालीस, सफाऱ्या. हे घापघीप घापघिप, नुसता धुराळा. येण्णा रासकला, मिनिस्टरा बेकू, हे घीप. शेती बेकू, हे गहिप्पप्प. पत्ता बेकू हे घीप. नुसती फायतांफाईट. पैशे वसूल.

In reply to by अभ्या..

संदीप डांगे गुरुवार, 07/21/2016 - 22:06
अवघ्या धाग्यावर एकमेवाद्वितीय प्रतिसाद. अभ्या.. तुमको गले लगाने तमन्ना होरी...

In reply to by संदीप डांगे

अभ्या.. Fri, 07/22/2016 - 14:59
संदीपाअण्णा, जस्ट आलेला वॉस्सप. . सलमाणः अपना मुवी ईदको आता है आमीरः अपना क्रिसमसको शारुखः अपना तो दिवाली को. . रजनीआन्ना: येन्ना रासकला, जिस दिन अप्ना मुवी आता है वई हॉलिडे होता है.

In reply to by अभ्या..

गंगाधर मुटे Fri, 07/22/2016 - 04:47
आपल्या आस्वादासाठी माझा एक शेर; कायम गहाण सारे करण्यास सातबारा बँकेसमोर झाले लाचार शेत आहे (मिसळपाववर पूर्वप्रकाशित)

In reply to by ब़जरबट्टू

गंगाधर मुटे Fri, 07/22/2016 - 04:44
आपल्या आस्वादासाठी माझा एक शेर; कोणीतरी यांची आता, पडजीभ उपटली पाहिजे नाटकी बोलतात साले, की गरिबी हटली पाहिजे (मिसळपाववर पूर्वप्रकाशित)

In reply to by अभ्या..

मितभाषी Tue, 07/19/2016 - 23:03
मुटे सरांचे प्रतिसाद पाहून मला (पिक्चरात पाहिलेल्या) रणांगणात एकट्याने दांडपट्टा फिरवणाऱ्या शूरवीराची आठवण आली. खूप दिवसांनी आले सर पण पार धुराळाच केला.
=)) हाहाहा काकांची चौफेर फटकेबाजी चालू आहे.

In reply to by मितभाषी

गंगाधर मुटे Fri, 07/22/2016 - 04:48
आपल्या चरणावर आस्वादासाठी माझा एक शेर अर्पण करतो; घे `अभय` दांडगाई सोसून लांडग्यांची झोपून वाघ असली जोवर गुहेत आहे (मिसळपाववर पूर्वप्रकाशित)

In reply to by राका

गंगाधर मुटे Fri, 07/22/2016 - 04:49
आपल्या चरणावर आस्वादासाठी माझा एक शेर अर्पण करतो; पेरले 'अभय' अनेक बीज जाणतोस तू हे प्रभो! निदान एक अंकुरायला हवे (मिसळपाववर पूर्वप्रकाशित)

In reply to by अनुप ढेरे

गंगाधर मुटे Fri, 07/22/2016 - 04:51
आपल्या आस्वादासाठी माझा एक शेर; श्वापदे पिसाळलीत शस्त्र घ्यायला हवे झोपले असेल शेत जागवायला हवे (मिसळपाववर पूर्वप्रकाशित)

आदिजोशी Tue, 07/19/2016 - 22:03
आत्तापर्यंतच्या सगळ्या सरकारांनी जे केले नाही ते मुटे काका मंत्री होऊन करणार आहेत असं ते म्हणतायत. पण मुळात समस्या काय आहे हेच ते सांगत नसल्याने मिपाकर विचारू पहात आहेत. हे थोडं केजरीवालांसारखं होतंय ना? निवडणुकीच्या आधी ते सुद्धा असंच बोलायचे. निवडून आल्यानंतर आनंदी आनंद झाला.

In reply to by गंगाधर मुटे

आदिजोशी Tue, 07/19/2016 - 22:11
घोडा चतूर... घोडा चतूर करू नका... स्वतः कविताबाह्य उत्तरे देता आणि त्याबद्दल कुणी विचारलं की कवितेत लिहिलं आहे का म्हणून विचारता. ए नाॅय चाॅलबे...

In reply to by आदिजोशी

गंगाधर मुटे Tue, 07/19/2016 - 22:13
पुन्हा एकदा वाचा. मी स्वतःहून कविताबाह्य विषय सुरू केलेला नाही आहे. प्रतिसादावर उपप्रतिसाद देत आहे.

गंगाधर मुटे Tue, 07/19/2016 - 22:05
आता दरवर्षीप्रमाणे यंदाही अन्य धाग्याप्रमाणे याही धाग्यावर श्री अनूप ढेरे यांचे आगमन झालेले आहे. कंपूच्या वतिने पुढील किल्ला ते लढवतील.

In reply to by आदिजोशी

गंगाधर मुटे Tue, 07/19/2016 - 22:18
कंपू म्हणण्यात माझी चूक झाली. कंपू नियोजित असतो. अकस्मात आलेल्या संधीत हात धुवून घ्यायला काही लोक जमावात मिसळतात. त्याला कंपू नव्हे तर झुंड म्हणतात. चुकीची दुरुस्ती केल्याबद्दल आभार!

In reply to by आदिजोशी

अनुप ढेरे Tue, 07/19/2016 - 22:34
माझाही नाही कुठला कंपू. पण आपणाला माझा प्रतिसाद दखलपात्र वाटला याबद्दल आभारी आहे. फोटो आवडला का?