✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मिपा लंडन कट्टा- ग्रिनीच

व
विजुभाऊ यांनी
गुरुवार, 06/23/2016 - 03:11  ·  लेख
लेख
मिपा लंडन कट्टा सालाबाद प्रअमाणे ठरला एकदा कट्टा करायचे ठरले की ठरले. मिपाकर अडचणींकडे क्षुल्लक महणून पहातात. कट्टा करायचे ठरले मात्र स्थळ ठरत नव्हते. वर्‍हाडी जमा झाले मात्र कार्यालयाचा पत्ता ठाउक नाही असे काहीसे सुरवातीला झाले. त्याचे काय झाले. विजुभाउ लंडन मधे आले याची आदुबाळाला कुणकुण लागली. त्याने व्यनीफीनी तुन फोनाफोनी करुन विजुभाऊना सम्पर्क केला. आणि कट्टा करायचअ घात घातला. स्वाती राजेश या अनाहिता मधील जबरदस्त सदस्यानी ती आयडिया उचलून धरली. आदू बाळ आणि अस्वस्थामा ने कुठे कुठे जायचे याची चर्चा करत जुने मध्य लंडन नेहमीच बघतो राणीचा राजवाडा , राजाची बाग , ती कसलीशी घंटा आणि रोज मोडणारा लंडन ब्रीज , यांचे अस्सल मिपाकराला कसले आले कौतूक. खरा मिपाकर हा गप्पा नवी माहिती , खादाडी आणि देशी इतिहासात रमतो. जगात तो कुठेही असू द्या मनाने तो शिवरायाच्या महाराष्ट्रातच असतो. गप्पा मारता मारता असे कळाले की इथे लंडन मधे एक सुवर्णदूर्ग नावाचा किल्ला आहे. साहेबाने त्याचे नाव सोवेनदुर्ग असे मोडले आहे . पण ते असो. सुवर्णदूर्गाच्या आठवणीत रमायचे म्हणून त्याचे नाव तसे ठेवले गेले अशी एक माहिती उडत उडत कानावर आली. झाले ठिकान मुक्रर झाले. तारीखही पक्की झाली. थेम्स काठावरील ग्रीनीच जवळ हा किल्ला आहे. शनिवारी जमायचे ठरले. त्यानुसार लअंडन मधील मिपाकराना निरोप गेले. वाचनमात्र असणारे एक सदसय श्री लोथार यानी कटट्याला जायचे म्हणून धावपळ करून सदस्यत्व घेतले. त्याना अस्सल मिपाकर पहायचे होते. स्वपनील ( अस्वस्थामा ) बाथ जवळच्या एका गावाहुन येणार होते.आदूबाळ स्लाव मधून , स्वाती राजेश सनबरी हुन तर विजुभाऊ फेल्टम हुन येणार होते. सर्वाना सोयीचे व्हावे म्हणून स्थळ मुक्रर झाल्यानंतर ते पुन्हा एकदा बदलण्यात आले. पण त्यातही अडचणी होत्याच. बर्‍याच चर्चेनंतर ते पुनः मूळ ठिकाणावर आले. त्यानुसार ग्रीनीच ला जमा झाले, ट्यूब ने ओव्हरग्राउंडने , गाडी ने ,बस ने, बोटीने अशा वेगवेगळ्या वहानानी प्रवास करत एककेक जण जमा झाले. ग्रीनीच म्हणजे शून्य रेखाम्शाचे ठिकाण. येथून जगाची वेळ ठरवली जाते. शाळेत शिकलो होतो तो भूगोल आता प्रत्यक्ष अनुभवायला मिळत होता. ग्रीनीच रेखांश आणि जगाची वेळ यांचे जवळचे नाते आहे. इथे घड्याळी वेळ स्थानीक वेळ आणि जागतीक वेळ अशा अनेक वेळांची संगती लागते. नौवहनासाठी सोय व्हावी म्हणूउन जागतीक वेळ ही संकल्पना आली. त्यावरून ठिकाण निश्चित करण्यासाठी अक्षांश रेखांश या संकल्पना कशा आल्या याचा इतिहास आपल्या डोळ्यासमोर उभा केला जातो. मिपाकर या माहितीचा आनंद घेत होते , इथली वेधशाळा , विल्यम हर्शेलची दुर्बीण आणि वेळ मोजण्याच्या विवीध पद्धती विवीध यंत्रे यांची भरभरून माहिती मिळत होती. मिपाच्या या कट्ट्यावर अशी माहितीची खादाडी चालू होती. त्या गडबडीत जेवण बीवण करायचे कोणाच्याच लक्षात आले नाही. त्यातच गप्पाना ही रंग भरला. जुने नवे लेख आठवले. रामदास काका, आनंदयात्री , तात्या , डयांबीस काका , बयाटमयान, प्रचेतस , वल्ली , ट का , आदिती, गणपा, जेनी, क्लिंटन सर्वांचे ले़ख पुन्हा पुन्हा वर आले. गप्पांचा मस्त फड जमला. मधेच धमाल मुलाने फोनवर हजेरी लावली. आपण कोणाला पहिल्यांदाच भेटतोय असे वाटतच नव्हते. कट्टा पुन्हा करायचा. पुढच्या वेळेस लंडन बाहेर बाथ ला कट्टा करुया असे भरघोस आमंत्रण सौ व श्री अस्वस्थामा यानी दिलय. ##### नाही म्हणायला थोडिशी खादाडी झालीच. आदुबाळाने " गव्हाची बीयर " या प्रकारची ओळख करुन दिली. त्या बद्दल पुन्हा कधीतरी. "मल्हार आदुबाळ " या नव्या भन्नाट अफलातून आईनस्टाईन दोस्ताची मात्र झकास जानपहचान झाली. त्याबद्दल ही सविस्तर पुन्हा कधीतरी. a डावीकडून उजवीकडे: मल्हार, चैत्रबन, प्रश्नलंका, अस्वस्थामा, लोथार मथायस, विजुभाऊ, आदूबाळ vb विजुभाऊ आणि बेल्जियन गव्हाची बियर nnn ग्रीनिचचा रेखांश आणि मुंबईचा अक्षांश
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
वावर
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद

प्रतिक्रिया द्या
12865 वाचन

💬 प्रतिसाद (59)

प्रतिक्रिया

येतहे शून्य रेखांश रेशेवर उभे

विजुभाऊ
गुरुवार, 06/23/2016 - 03:15 नवीन
येतहे शून्य रेखांश रेशेवर उभे रहाता येते. जगातील हे बहुतेक एकमेव ठिकाण असेल की जेथे रेखांशाची रेश आखलेली आहे.
  • Log in or register to post comments

फोटोतल्या लाइनीपासले पाय

अभ्या..
गुरुवार, 06/23/2016 - 22:36 नवीन
फोटोतल्या लाइनीपासले पाय मिपाकराचे नव्हेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

अभ्या भो

भीडस्त
Sat, 06/25/2016 - 12:31 नवीन
तुम्हि काय २२१ बी बेकर स्ट्रीट लंडन हिथं र्हात्या काय??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

एलिमेण्टरी डॉ. भिडस्त. ;)

अभ्या..
Sat, 06/25/2016 - 13:23 नवीन
एलिमेण्टरी डॉ. भिडस्त. ;) फॉटोशॉपने लावली सवय बारीक बघायची.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भीडस्त

शून्यरेखांश स्थळ (मेरिडियन मॉन्युमेंट)

गामा पैलवान
Sat, 06/25/2016 - 13:59 नवीन
विजुभाऊ, ब्रायटनच्या जवळ पीसहेवन नावाच्या नगरात असेच एक स्थळ आहे : http://www.peacehavencouncil.co.uk/attractions/meridian-monument-cliff-top-walk-peacehaven/ वरील लेखानुसार ग्रीनिचव्यतिरिक्त अनेक स्थळे आहेत. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

व्रुत्तान्त छान. या वेळी नाही

अश्विनी वैद्य
गुरुवार, 06/23/2016 - 03:33 नवीन
व्रुत्तान्त छान. या वेळी नाही जमले... पुढच्या कट्ट्याला नक्की येणार. फोटो नाहीत का ?
  • Log in or register to post comments

लंडन कट्टा

अनिवासि
गुरुवार, 06/23/2016 - 05:10 नवीन
अरेरे! यायची इच्छा होती पण वेळ सोयीस्कर नव्हती- . पुढच्या वेळेस. पण लंडन कट्टा बाथ ला ? खूपच लांब आहे! तसे ग्रिनिच पण उत्तर लंडन पासून दूरच आहे तेथे जाण्याचे कारण आज कळले. किल्ला पाहिला का?पुन्हा एकदा शुभेच्छा ! त्या दिवशी आदूबाळ ह्यांना फोन केला होताच.
  • Log in or register to post comments

ऑं.. लंडनकर लांब वगैरे काय

अस्वस्थामा
गुरुवार, 06/23/2016 - 17:33 नवीन
ऑं.. लंडनकर लांब वगैरे काय म्हणताय हो. सगळेच जण किमान १ ते ३ तास प्रवास करुन आलेले कट्ट्याला. हे म्हंजे पुणे-सातार्‍यावरुन लोक्स कट्ट्याला मुंबईत यावे आणि दादरकरांनी बोरिवली लांब आहे असे म्हणावं असं झालं. :) बाथ लांब आहे हे तर आहेच पण फक्त दिड तास आहे ट्रेनने. तेव्हा लंडनच्या बाहेर पण भेटुयात की जमेल तेव्हा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिवासि

Foto??

पिलीयन रायडर
गुरुवार, 06/23/2016 - 06:52 नवीन
Foto??
  • Log in or register to post comments

+१

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 06/23/2016 - 08:20 नवीन
फोटो शिवाय वृत्तांत खरा वाटत नाही. असे काल्पनिक वृत्तांत आम्ही कितीही लिहु शकतो. विजु भौ कडून तरी अशी काल्पनिक कट्टयाची अपेक्षा नव्हती. तीव्र निषेध व्यक्त करतो. आणि दोन शब्द संपवतो. -दिलीप बिरुटे -
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

एवढ्या बहुचर्चित कट्टयाचा

अभ्या..
गुरुवार, 06/23/2016 - 08:48 नवीन
एवढ्या बहुचर्चित कट्टयाचा इतका सपक वृत्तांत विजुभाऊ कडून अपेक्षित नव्हता. आदूबाळा किंवा अस्वस्थाम्याने पुरवणी प्लस फोटो वृत्तांत जोडावा. मल्हार आदूबाळ हे प्रकरण पहायचेच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

+१

नाखु
गुरुवार, 06/23/2016 - 08:52 नवीन
होय आणि यात कुठेही आडवळणाका होईना पुण्याचा उल्लेख नाही त्यामुळे हा व्रूत्तांतच विजूभाऊंनी लिहिला नसावा असा पक्का अंदाज आहे. माझ्यासारख्या नवशिक्या मिपाकराने फोटोशिवाय गड किल्ले भटकंती टाकली तर एकवेळ समजू शकतो पण.... नित वाचक नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वृत्तांत फर्मास...पण फटू नैत

टवाळ कार्टा
गुरुवार, 06/23/2016 - 11:14 नवीन
वृत्तांत फर्मास...पण फटू नैत त्यामुळे मनाचे श्लोक असणाचाही संभव आहे =))
जुने नवे लेख आठवले. रामदास काका, आनंदयात्री , तात्या , डयांबीस काका , बयाटमयान, प्रचेतस , वल्ली , ट का , आदिती, गणपा, जेनी, क्लिंटन सर्वांचे ले़ख पुन्हा पुन्हा वर आले.
या दिग्गज लेखकांच्या यादीत माझे नाव बघून अंह झालो...माझ्या जिल्ब्यांची आठवण काढल्याबद्दल धण्यवाड :) ते "बयाटमयान" लैच आवडल्या गेले आहे =))
  • Log in or register to post comments

फोटो शिवायचा वृत्तांत आवडला...

मुक्त विहारि
गुरुवार, 06/23/2016 - 12:13 नवीन
आता "बाथ"च्या वृत्तांताच्या प्रतिक्षेत.
  • Log in or register to post comments

https://s32.postimg.org

आदूबाळ
गुरुवार, 06/23/2016 - 19:40 नवीन
https://s32.postimg.org/bno5pwq1x/IMG_20160622_WA0014.jpg https://s32.postimg.org/rsxanrb9h/IMG_20160619_WA0014.jpg https://s31.postimg.org/uayheexiz/IMG_20160622_WA0007.jpg
  • Log in or register to post comments

अरे वा? अता ओळख परेड द्या

टवाळ कार्टा
गुरुवार, 06/23/2016 - 12:26 नवीन
अरे वा? अता ओळख परेड द्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

वा! फारच छान! मिपाकरांना

एस
गुरुवार, 06/23/2016 - 13:15 नवीन
वा! फारच छान! मिपाकरांना पाहून आनंद वाटला.
  • Log in or register to post comments

सर्व शंकासुरांनी फटू बघून

आदूबाळ
गुरुवार, 06/23/2016 - 13:35 नवीन
सर्व शंकासुरांनी फटू बघून घ्यावा.
  • Log in or register to post comments

दिसंना झालाय.

सूड
गुरुवार, 06/23/2016 - 14:04 नवीन
दिसंना झालाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

काका मस्त वृतान्त

चैत्रबन
गुरुवार, 06/23/2016 - 13:38 नवीन
झकास :)
  • Log in or register to post comments

मस्त झाला कट्टा पण जायला

विशाखा राऊत
गुरुवार, 06/23/2016 - 14:36 नवीन
मस्त झाला कट्टा पण जायला मिळाला नाही. पुढच्या वेळी जरा लंडनमध्ये कट्टा झाला तर जमवु भेटायचे. किल्ला बघितला की नाही? सगळे वर्णनतर ग्रीनिचबद्दल आहे. किल्ला तिथुन लांब आहे.
  • Log in or register to post comments

मस्तं!

पद्मावति
गुरुवार, 06/23/2016 - 14:37 नवीन
मस्तं!
  • Log in or register to post comments

मस्त झाला कट्टा

जगप्रवासी
गुरुवार, 06/23/2016 - 15:09 नवीन
मस्त झाला कट्टा
  • Log in or register to post comments

लंडनकर सगळे मिपाकर हँडसम आहेत

अभ्या..
गुरुवार, 06/23/2016 - 15:17 नवीन
लंडनकर सगळे मिपाकर हँडसम आहेत असे निरीक्षण नोंदवतो. अस्वस्थामा तर बॉलिवूड सोडून तिकडे गेला असावा. मल्हारराव आपला आवलीपणा फोटोत सोडाया तयार नाहीत. पोरगे डॅशिंग आहे.
  • Log in or register to post comments

:))

अस्वस्थामा
गुरुवार, 06/23/2016 - 17:16 नवीन
:)) बास का अभिदादा, झाले का सुरु तुमी. मल्हाररावांनी उकेमध्ये राहून चक्क चक्क "सदृश्य" हा शब्द बोलताना वापरला आणि आम्ही सद्गदित झालो राव (पालकांचे क्रेडिट तर आहेच). कट्ट्याचे उत्सवमूर्ती विजूभाऊ होते तरी सगळे फुटेज या छोट्या मिपाकराने घेतलेले मस्तपैकी. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

आयायायाया

अभ्या..
गुरुवार, 06/23/2016 - 17:29 नवीन
आयायायाया ते आदूबाळाचे बाळ आहे, असली व्यामिश्र वैय्याकारण्याच्यावर वरची भाषाच वापरणार. लंडनच्या एखाद्या सेंट अमुक्तामुकाच्या फादराला झीट आणणार एक दिवस.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अस्वस्थामा

मस्त!

जव्हेरगंज
गुरुवार, 06/23/2016 - 18:35 नवीन
फोटोंबाबत एवढी कंजुशी का?
  • Log in or register to post comments

क्षमस्व

पीशिम्पी
गुरुवार, 06/23/2016 - 21:06 नवीन
क्षमस्व मंडळी, मनात असूनही आणि लंडन मध्ये नसल्याने येता नाही आले, पण पुढच्या कट्ट्याची तारीख थोडी आधी जर जाहीर केली तर वेळापत्रकाचे योग्य नियोजन करण्यास मदत होईन आणि कट्ट्याला हजरही राहून थोरामोठ्यांच्या दर्शनही होईल आणि सहवासाचे पुण्यही लाभेल :)
  • Log in or register to post comments

आता बाथच्या कट्ट्याला या.

आदूबाळ
गुरुवार, 06/23/2016 - 21:45 नवीन
आता बाथच्या कट्ट्याला या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पीशिम्पी

एखादा बाथकट्टा पुण्यात करायला

अभ्या..
गुरुवार, 06/23/2016 - 22:33 नवीन
एखादा बाथकट्टा पुण्यात करायला हरकत नै. ते मुळशी बिळशी ड्यामात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

होऊन जाऊ द्या एखादा कट्टा आता

महासंग्राम
Fri, 06/24/2016 - 15:20 नवीन
होऊन जाऊ द्या एखादा कट्टा आता पुण्यात अभ्या भौ काढा धागा एखादा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

आम्ही कसा पुण्याच्या धाग्याचा

अभ्या..
Sat, 06/25/2016 - 13:25 नवीन
आम्ही कसा पुण्याच्या धाग्याचा कट्टा काढायचा मंदारभो? आमचे आधारकार्ड तर सोलापुरातले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महासंग्राम

वा..

स्वाती दिनेश
गुरुवार, 06/23/2016 - 21:09 नवीन
कट्टा मस्त झालेला दिसतो आहे, स्वाती
  • Log in or register to post comments

वा, दीवस कट्ट्याचे दीसतायत...

खटपट्या
गुरुवार, 06/23/2016 - 22:01 नवीन
वा, दीवस कट्ट्याचे दीसतायत....
  • Log in or register to post comments

विजूभौंनी खूप कंजूसी केली

प्रचेतस
गुरुवार, 06/23/2016 - 22:06 नवीन
विजूभौंनी खूप कंजूसी केली वृत्तांत टाकण्यात. अजून सविस्तर येऊ द्यात.
  • Log in or register to post comments

वा, वा ! मस्तं झालेला दिसतोय

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 06/23/2016 - 22:34 नवीन
वा, वा ! मस्तं झालेला दिसतोय कट्टा ! आता फोटो पाहिल्यावर विश्वास बसला ;) :)
  • Log in or register to post comments

वृत्तांत आवडला

श्रीरंग_जोशी
Fri, 06/24/2016 - 09:47 नवीन
थोडक्यात लिहिलेला वृत्तांत आवडला. प्राडाँच्या विजुभाऊंनी लिहिलेला काल्पनिक वृत्तांत हा उल्लेख वाचून खालचा प्रसंग डोळ्यासमोर उभा राहिला. विजुभाऊ उवाच - इंग्लंडातल्या माझ्या पहिल्या मिपा कट्ट्यासाठी जोरदार तयारी केली. तंदुरुस्तीच्या प्रत्यक्ष नमुना दाखवण्यासाठी सायकलने जायचे ठरवले. अगोदरच्या संध्याकाळीच भाड्याची सायकल आणून ठेवली. तसेच जुन्या वस्तूंच्या दुकानातून सेकन्ड हॅन्ड हवा भरायचा मिनि पम्प पण आणून ठेवला. भल्या पहाटे उठून शिकरण व मटार उसळ यांची न्याहारी करून सायकलवर टांग मारून ग्रिनिचच्या रस्त्याला लागलो. रस्ता चांगला रुंद होता व रविवारची सकाळ असल्याने अगदीच जेमतेम वाहतूक होती. तेवढ्यात एक जुनाट रणगाडा मला ओव्हरटेक करून गेला. सायकलचा वेग वाढवून त्याला ओव्हरटेक करून खुन्नस देण्याची खूप इच्छा झाली पण मिपा कट्ट्याला निघालो असल्याने नको त्या भानगडीत पडायचा मोह टाळला. दोन तीन किमी पलिकडे गेल्यावर पाहतो तर काय रणगाडा रस्त्याच्या शेजारी थांबलेला दिसला. पुढे जाऊन पाहतो तर काय? चक्क आदूबाळ रणगाड्यापुढे डोक्यावर हात मारून बसले होते. त्यांचे कुटूंब आत रणगाड्यातच होते. मी सायकल थांबवून स्टँडवर लावली अन आदूबाळांजवळ गेलो व स्वतःची ओळख दिली. आपला मिपावरचा माणूस भेटला हे पाहून त्यांचा चेहरा खुलला. मिपाकरांना सरप्राइझ देण्यासाठी आदूबाळांनी पहिल्या महायुद्धात निवृत्त झालेला रणगाडा व्हिंटेज रेन्टल स्टोरमधून भाड्याने घेतला होता. पण ऐन प्रवासात त्याचे पुढचे चाक पंक्चर झाले होते. जवळपास कुणी पंक्चरवाला नव्हता. तेवढ्यात मी सायकलला बांधलेला मिनि पम्प आदूबाळांच्या नजरेस पडला. त्यांनी तात्पुरता उपाय म्हणून पंक्चर झालेल्या चाकात थोडी थोडी हवा भरून मार्गक्रमण करायचे ठरवले. मग मीच हवा भरून दिली व दोघेही पुन्हा ग्रिनिचकडे मार्गस्थ झालो. रस्त्यात पुन्हा दोनदा हवा भरावी लागली. ऐन कट्ट्यास्थळाच्या जवळ पोचल्यावर इंधन संपल्याने रणगाडा बंद पडला. कितना देता हैं हा प्रश्न न विचारताच आदूबाळांनी तो भाड्याने घेतला होता. मग काय करणार, माझ्या सॅकमध्ये असलेल्या रेड बुल इन्स्टंट एनर्जी ड्रिंकच्या ४ कॅन्स गटागटा पिल्या अन जीन्सला बांधलेला कंबरेचा पट्टा काढून त्याचे एक टोक रणगाड्याच्या गोळाफेक करायच्या नळीला लावले अन दुसरे माझ्या सायकलच्या मडगार्डला. हळू हळू करत कट्टास्थळी पोचलो तर इतर कट्टेकरी तोवर न आल्याने आमचा जरा हिरमोडच झाला.
  • Log in or register to post comments

=))

जेपी
Fri, 06/24/2016 - 10:10 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

धन्य !!

नीलमोहर
Fri, 06/24/2016 - 10:16 नवीन
जबर वृत्तांत =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

खिक्क....

जिन्गल बेल
Fri, 06/24/2016 - 11:06 नवीन
खिक्क....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

कहर! पंपाने हवा भरणारे

आदूबाळ
Fri, 06/24/2016 - 11:38 नवीन
कहर! पंपाने हवा भरणारे विजुभाऊ आणि जुनाट रणगाडा डोळ्यासमोर आला!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

हा हा हा!! =)) =))

चतुरंग
Fri, 06/24/2016 - 11:44 नवीन
"श्रीरंग्_मोजी" यांचा वृत्तांत आवडला!! ;) (रणगाडाप्रेमी)रंगाडा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

हा हा हा भारीच

विशाखा राऊत
Fri, 06/24/2016 - 12:47 नवीन
हा हा हा भारीच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

=))

पद्मावति
Fri, 06/24/2016 - 13:40 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

:)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 06/24/2016 - 13:54 नवीन
चांगलं जमलंय ! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

डिट्टो!

जव्हेरगंज
Fri, 06/24/2016 - 18:25 नवीन
हाहाहा!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

हा हा हा.

विजुभाऊ
Fri, 06/24/2016 - 18:31 नवीन
हा हा हा. आरे ते टाईपायचे राहिले की. आदुबाळाने बीयरच्या बाटलीत भरून गव्हाची खीर आणली होती. तर अस्वस्थामा ने फिरकीच्या ताम्ब्यात बीयर आणली होती. ;) मधेच आलेल्या पावसाने रणगाडा भिजला होता आणि त्याच्या स्पार्कप्लग मधे पाणे जाऊन रणगाड्याला सटासट शिंका येत होत्या. लोक चुकून त्या फायर ला मिसफायर समजत होते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

भारी !!!

पियुशा
Fri, 06/24/2016 - 11:13 नवीन
भारी !!!
  • Log in or register to post comments

हायला आदुबाळ मी तुम्हाला ५०

सनईचौघडा
Fri, 06/24/2016 - 12:05 नवीन
हायला आदुबाळ मी तुम्हाला ५० शी च्या पुढचा समजत होतो. केस विरळ , चश्मा, असा काहीसा. आज फोटूमध्ये तर एकदम चिकना गडी दिसतोयस की. आणि कट्टा वृत्तांत आवडला.
  • Log in or register to post comments

तो फोटो मॉर्फ करून माझ्याजागी

आदूबाळ
Fri, 06/24/2016 - 12:50 नवीन
तो फोटो मॉर्फ करून माझ्याजागी मुलाचा फोटो लावलाय.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा