साखरेचे खाणार त्याला..!
तसा मी लहानपणापासूनच गोडघाशा. साजूक तुपातला शिरा, केळ्याचे काप घातलेला सत्यनारायणाचा शिरा असेल तर विचारूच नका, माझा य-य आवडता पदार्थ आहे! (आई सत्यनारायणाच्या प्रसादासाठी मोठ्या पातेल्यात आणि माझ्या खादाडीसाठी वेगळा छोट्या पातेल्यात शिरा काढून ठेवायची आणि लहानपणी मला कधीच तीर्थप्रसाद देण्यासाठी बसवले जात नसे! :S ) (पण इथे एक धोक्याचा इशारा द्यायला मी विसरेन असे वाटते त्याआधीच सांगतो - मुगाचा साजूक तुपातला शिरा हा पदार्थ मी एकदाच खाल्ला -आणि अक्षरशः मुगदळासारखा पुढचा संपूर्ण दिवस बसून होतो! एवढा जड पदार्थ मी आयुष्यात पुन्हा खाल्ला नाही. अहो अक्षरशः सुन्न झालो होतो. पुन्हा खाईन असे वाटत नाही!)
आता भारतात असताना वेगवेगळ्या सणवारांच्या, लग्नामुंजींच्या, सत्यनारायणाच्या निमित्ताने गोडाचे पदार्थ खायला मिळतात पण तेव्हा आपल्याला माज असतो, तेव्हा त्याची एवढी किंमत नसते आणि त्याचे खरे महत्त्व समजते ते तिथून बाहेर पडल्यावर!
इथे अमेरिकेत आल्यापासून एकतर आजूबाजूला गोड खाणार्या लोकांचे प्रमाण कमी; सारखे 'ओ, माय गॉड सो मेनी कॅलरीज!' करुन चिंताक्रांत असतात बरेचसे लोक! (ज्यांनी कमी खायला पाहिजे ते मात्र ऐकत नाहीत ते पिझ्झा, बर्गर, चीजकेक हाणत असतातच तो भाग वेगळा :) ) पण एकूणच त्यामुळे आपल्या गोड खाण्यावर नकळत बंधने येतात हे नक्की!
शिवाय इथे मिठाईची दुकाने, हलवायांची दुकानेही नाहीत (निदान माझ्या भागात तरी नाहीत - न्यू जर्सीला आहेत असे ऐकून आहे). 'इंडियन ग्रोसरी शॉप' नावाच्या तद्दन दुकानात टीनच्या डब्यातले गुलाबजाम किंवा प्लास्टिकच्या बॉक्समधल्या जिलब्या घेताना मनात कळ उमटते, (हे म्हणजे कादरखानने नटसम्राटची भूमिका केल्यासारखे असते! :T ) पण दुधाची तहान ताकावर ह्या न्यायाने त्याला पर्यायही नसतो.
असो, तर आज मिठाईची आठवण होण्याचे कारण परवा इथे आमच्या गुजराती शेजार्यांकडून समजले की जवळच एक मंदीर आहे आणि त्यात गुजराती समाजाचे हलवाई मिठाई बनवून देतात!
ही बातमी ऐकून बरं वाटलं आणि माझं मन मला झटक्यात माझ्या गावात, अहमदनगरला, घेऊन गेलं. नगर जिल्ह्याची एक गंमत आहे, तसा पूर्वीपासूनच दुष्काळी जिल्हा असला आणि त्यामुळे जनावरांच्या चार्याचा सतत प्रश्न असला तरी कसा कोण जाणे इथे अतिशय उत्तम प्रतीचा खवा फार पूर्वीपासून मिळतो. पारनेर, पाथर्डी अशा तालुक्याच्या ठिकाणी दुधाचा खवा करुन तो नगरला आणून विकणे हा परंपरागत व्यवसायच आहे. तुम्ही जर सकाळी सकाळी ६.३०-७ वाजता नगरच्या एस.टी.स्टँडवर गेलात तर भाजीच्या मोठ्या टोपल्या असतात तसल्या टोपल्यात झाकून आणलेले खव्याचे गोळे गाड्यांच्या टपावरुन उतरवून घेणारे गवळी दिसतील. किंवा खुद्द नगरपासून साधारण ८-१० मैलाच्या परिसरातून रोज सकाळी सायकलवरुन, मोटरसायकलवरुन दुधाचे मोठे कॅन आणि खव्याच्या टोपल्या, डबे आणणारे गवळी दिसतील. ह्यांचा वेषही अगदी ठराविक असतो. पायजमा, पांढरा शर्ट, गांधीटोपी किंवा धोतर, पांढरा शर्ट आणि रंगीत पागोटे - ह्या पागोटं वाल्यांना भरघोस मिशाही असतात! माझ्या बाबांना सकाळीच साधारण ४-५ मैलाची रपेट करायची सवय गेली कित्येक वर्षे आहे. मी दहा -बारा वर्षाचा असल्यापासून बर्याचवेळा त्यांच्याबरोबर फिरायला जायचो. त्यावेळी जाता येता हे गवळी लोक दिसायचे.
तर असे हे गवळी थेट हलवायांच्या दुकानात खवा आणि दूध घेऊन जायचे. तिथे दुधाचे कॅन रिकामे करायचे आणि खवा द्यायचे. भल्या पहाटेला गायी-म्हशींच्या धारा करुन, ८-१० मैलाची रपेट करुन आलेले हे गवळी भुकेजलेले असत. हलवायाकडेच ठाण मांडून
साजूक तुपातली, पिवळीधमक्-सोनेरी, गरमागरम जिलबी आणि ताजी भजी असा भरपेट नाष्टा झाला की चंची सोडून निवांत पान-तंबाखू लावून, जरा शिळोप्याच्या गप्पा करुन हे परतीच्या प्रवासाला सायकलवर टांग टाकून निघायचे. हे दृश्य मी अनेकवेळा बघितले आहे.
'बंबईवाला हलवाई' हे दुकान कापडबाजाराच्या एका बाजूच्या अगदी तोंडावर आहे. त्याचा मालक झालानी, हा माझ्या वडिलांचा शाळेतला विद्यार्थी. त्यामुळे त्याच्या दुकानावरुन जाताना तो 'नमस्ते सर' म्हणून बाबांना हटकून नमस्कार करायचा. एकदा बाबांच्या मागे लागून मी त्याच्या मुदपाकखान्यात प्रवेश मिळवला. एवढ्या कॅन दुधाचे हे लोक करतात तरी काय असा प्रश्न मला पडलेला. मी आत गेलो. रसरसलेल्या चुलाणावर भल्यामोठ्या काहिलीत दूध उकळत होतं आणि अंगात फक्त बनियन आणि अर्धी चड्डी घातलेला, कानात रंगीत डूल घातलेला एक तरतरीत, पोरसवदा राजस्थानी तरुण, लांब दांड्याच्या लोखंडी झार्यानं ते दूध ढवळत होता. ते दृश्य मी अवाक होऊन बघत होतो. ते बासुंदीसाठी दूध आटवणे सुरु होते. काहिलीतली साय ढवळून, खरवडून पुन्हा त्या दुधातच ढवळणे सुरु होते. दुसर्या कढईत आटलेल्या दुधात बदाबदा साखर घालून पुन्हा ढवळून आटवायला सुरुवात झाली. असं ते दृश्य डोळेभरुन पाहून मी बाहेर आलो. झालानीनं मला एका द्रोणातून गरमागरम बासुंदी दिलीन. बाबांकडे मी प्रश्नार्थक नजरेनच बघितलं ते घे म्हणाले. मी ती प्यायलो. त्या ताज्या बासुंदीची खरपूस चव न्यारीच. त्यानंतर त्यापेक्षा उच्च बासुंदी मी फक्त नरसोबाच्या वाडीला पुजार्यांकडे प्रसादाचे जेवण जेवताना खाल्ली आहे. कुरुंदवाड, दत्तवाड, दानवाड, नरसोबाची वाडी ह्या सगळ्या कॄष्णाकाठची बासुंदी म्हणजे अतिशय दाट, गंधासारखी घोटीव आणि अतिशय उत्कृष्ट चवीची असते. ह्या ठिकाणाव्यतिरिक्त तशी बासुंदी मला कुठेही खायला मिळाली नाही! असो. कुठून कुठे भटकून आलो बघा एका क्षणात!
नगरला 'घासगल्ली' नावाचा एक रस्ता आहे. पूर्वी टांगे असायचे त्यावेळी घोड्यांचा घास तिथे विक्रीला असे तेव्हापासून हे नाव पडले, आता जवळजवळ सगळे टांगे गेले तरी नाव अजून तसेच आहे. तर ह्या रस्त्याच्या साधारण मध्यावर 'बन्सीमहाराज' म्हणू एक मिठाईवाला आहे. मारवाडी समाजात आचार्याला महाराज म्हणतात. हे दुकान गुलाबजामसाठी अतिशय प्रसिद्ध. त्याचे गुलाबजाम सकाळी ९ ते दुपारी १२ एवढ्यातच मिळायचे त्यानंतर शिल्लकच रहायचे नाहीत! (आताची परिस्थिती वेगळी असेल कदाचित पण माझ्या लहानपणी तरी असं होतं). साखरेच्या पाकात पोहोणारे गुलाबजाम फारच खास दिसतात. ह्याच बन्सीमहाराजचे तेलीखुंट भागातही अजून एक दुकान आहे. सणासुदीला गुलाबजाम आणायचे असले तर मी हमखास पेढेघाटी डबा पिशवीत टाकून त्यात गुलाबजाम घेऊन अतिशय सावधपणे, बेताबेताने घरी येत असे. देवाला नैवेद्य दाखवेपर्यंत कशीबशी कळ काढून कधी एकदा जेवायला बसतो असं होऊन जाई (निदान त्यावेळी तरी वरण-भातापासून सुरुवात न करता थेट गुलाबजाम पासून का करत नाहीत असं मला नेहेमी वाटे! :D )
पेढा आणि निकालांचा (परीक्षेचे असोत किंवा प्रसूतीचे ;) ) फारच जवळचा संबंध आहे! त्याखेरीज उगीचच कोणी नुसती मिठाई म्हणून पेढे घरी आणून खाल्लेत असं माझ्यातरी बघण्यात नाही. 'महेंद्र पेढावाला' हा प्रसिद्ध पेढेवाला ही नगरच्या पेढ्याची ओळख आहे. अतिशय उत्तम प्रतीच्या खव्यापासून उत्तम प्रतीचे पेढे बनवानेत ते महेंद्रनेच. त्याचे केशरी पेढेही तितकेच प्रसिद्ध आहेत. तोंडात अक्षरशः विरघळणारा, पिठाचा गोळा खाल्ल्यागत टाळूला न चिकटणारा, अतिशय चविष्ट असा पेढा ह्याच्याकडे मिळतो. पेढे उत्तम व्हायला खवाही तसाच हवा. ताजा खवा कसा ओळखावा ह्याचीसुद्धा परीक्षा आहे. प्रथम दर्शनातच खवा हा किंचित तांबूस रंगावर, तुपाळ, तुकतुकीत असा दिसायला हवा. चिमूटभर तोंडात टाकून बघितल्यावर खमंग, खरपूस चव लागायलाच हवी. आंबूस, पिठूळ, गुळगुळीत चव लागली तर खवा शिळा, भेसळयुक्त, कच्चा किंवा यातील काहीही असू शकते. (बाकी सातारी साखरेत घोळलेले पेढे किंवा पुण्याच्या चितळ्यांचे पेठे मला कधीच आवडले नाहीत :()
तशी ह्या महेंद्रकडची बालूशाहीसुद्धा एकदम बढिया! अगदी अरवाळ, पापुद्रे सुटणारी, गोडीला बेतशीर बालूशाही म्हणजे मेजवानी असते.
पूर्वी ह्याच्याकडे फरसाणही उत्तम मिळत असे. त्याचाही मी भोक्ता होतो. त्यातल्या खमंग खुसखुशीत ढब्बू गाठी खायला मला फार आवडायचे.हल्ली एवढ्यात त्याच्याकडचे फरसाण चाखलेले नाही त्यामुळे सध्याचा दर्जा कसा आहे हे सांगता येत नाही.
म्हैसूरपाक हा पदार्थ मी पहिल्यांदा ह्याच्या दुकानात बघितला. तांबूस रंगाचे, छोटे-मोठे जाळीदार ठोकळे बघून मी त्याचे नाव विचारले आणि हा म्हैसूरपाक आहे हे समजले. तो मला फारसा कधी आवडला नाही.
साजूक तुपातले मोतीचुराचे लाडू हा माझा आणखी एक आवडता प्रकार. माझ्या मुंजीच्या वेळी नारायणअय्या हे कानडी आचारी घरीच बुंदी पाडायला बोलावले होते. बुटकेसे, चष्मावाले, बोलण्यात भरगच्च कानडी हेल असलेले, खांद्यावरचा पंचा आणि हातातला भला भरभक्कम झारा सावरत बोलणारे नारायणअय्या मला अजून आठवतात. वाड्यातल्या गच्चीवरच चुलाण मांडून त्यातल्या मोठ्या कढईत झराझरा बुंदी पाडून ती साजूक तुपातून तळून, ठक्कठक्क असा आवाज करुन झार्यात घेऊन, एका लयबद्ध झटक्याने ती शेजारच्या वर्तमानपत्रावर हलकेच ओतणारे अय्या मला फारच मोठे जादूगार वाटले होते! रात्रीच वळून गच्चीवर वाळायला ठेवलेल्या पिवळ्याधम्मक लाडवांचा तो नजारा अजूनही स्मृतीत कोरलेला आहे!
वर उल्लेखलेल्या पदार्थांच्या मानाने मला रसमलई किंवा रसगुल्ले हे पदार्थ तसे जरा डावेच वाटत आलेले आहेत. (तरी मी खायचे सोडत नाही हा भाग अलाहिदा ;) पण ती माझी पहिली आवड नव्हे! )
श्रीखंड हा पदार्थ ज्याने कुणी शोधला त्याला माझे लाख सलाम! पण तेही कसे घरी केलेले हवे. रात्री न विसरता साययुक्त, ताजे दही भरपूर प्रमाणात फडक्यात टांगून ठेवावे, सकाळी सगळे पाणी गळून गेल्यावर, विटांचे वजन देऊन उरलासुरला पाण्याचा अंश काढून घोटीव चक्का कापडातून हलकेच काढून घ्यावा, नंतर जेवढ्यास तेवढी साखर घालून हा चक्का पुरणयंत्रातून घोटून घ्यावा, सोबत दुधात घोटलेल्या केशराचा अर्क टाकावा, जायफळ लावले असेल तर उत्तमच, चारोळ्या, बदामाचे काप टाकून हे थंडगार श्रीखंड खाण्यास द्यावे! अहाहा!! असले श्रीखंड खाऊन दुपारची पडी मारणे म्हणजे स्वर्गसुखच! विकतच्यापैकी मला वारणाचे श्रीखंड आवडले होते. ते अजून मिळते की नाही माहीत नाही. 'अमूल'चेही चांगले असते.
उकडीच्या मोदकांचा उल्लेख केला नाही तर गणपतीबाप्पा सोंडेने एक फटका मारल्याखेरीज रहाणार नाही. अरवाळ पारी असलेले, पोटात गूळ-खोबर्याचे गुलगुलीत सारण भरलेले, वरून मजबूत तूप सोडलेले (असले पदार्थ खाताना उगीच तोंडदेखले चमचाभर वगैरे तूप घेणार्या लोकांची मला कीव येते, असे करणे हा मोदकांचा अपमान आहे असे माझे मत आहे! X( ), वाफाळते मोदक गटकणे हा आनंद ज्याने घेतला नाही तो जगलाच नाही असे मी म्हणेन!
तर असा हा माझा गोडाचा प्रवास लहानपणापासून चालू झालेला आहे. वाढत्या वजनाचे भय अतिरेकी नसले तरी आता पूर्वीपेक्षा जपूनच खातो हे ही खरेच. नशिबाने अजूनतरी मधुमेहासारखे काही पाठीमागे लागलेले नाही (लागूही नये अशी आशा आहे!).
'साखरेचे खाणार त्याला देव देणार' ह्या म्हणीवर माझा असलेला विश्वास मला माझी गोडयात्रा चालू ठेवण्यास हात(तोंड)भार लावतो आहे हे नक्की! :)
चतुरंग
वाचने
25071
वाचनखूण
प्रतिक्रिया
60
पाणी सुटलं तोंडाला
In reply to पाणी सुटलं तोंडाला by ३_१४ विक्षिप्त अदिती
व्वा.....वाडी
In reply to व्वा.....वाडी by विजुभाऊ
कवठाची बर्फी..
मस्त!
चतुरंग..
नगरला जात
बम्बैवाला
मीपण एक गोडघाशा
खूप खूप
In reply to खूप खूप by प्राजु
+१
वा!
काय त्रास आहे !!!
In reply to काय त्रास आहे !!! by बिपिन कार्यकर्ते
काय चाललाय
वा वा! एकदम
मस्त लेख
लेखही मस्त
In reply to लेखही मस्त by भडकमकर मास्तर
आता वाटेल
रंगाशेठचा निषेध! बिकाचा ही निषेध!
वा!!!
गोड गोड...
एक प्रतिसाद गोडाचा ...
In reply to एक प्रतिसाद गोडाचा ... by छोटा डॉन
आरे किती
In reply to एक प्रतिसाद गोडाचा ... by छोटा डॉन
+१ डान्याशी
वाह मस्त
वा!
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
In reply to वा! by नंदन
हां
मस्त गोड
यस यस... लेख
आयला,
का त्रास देतो रे बाबा?
गोड अगोड लेख!
ग्वाड
गोग्गोड
मलापण गोड
In reply to मलापण गोड by मेघना भुस्कुटे
मलापण गोड
'साखरेचे
मस्तच रंगाशेठ.......
लेख प्रचंड
एकदम
गोड..
अतिशय गोड लेख!!
बेळगावचा
In reply to बेळगावचा by श्रावण मोडक
+१
झक्कास लेख
धन्यवाद जनहो!
पाणी सुटले 'तोंडाक'
क्या बात है !!
काय फक्कड
गोड जवळीक
वा ! फारच
रंगाकाकाच
का वाचला हा लेख?
In reply to का वाचला हा लेख? by स्मिता.
आSSSब्ब्ब ....ढ्ढर्र्र्र्र्र्र्र्र्र्र....
स्मिता धन्यवाद!
भारी लेख. नगरचा खवा आणि
इथे अमेरिकेत आल्यापासून एकतर
गोड गोड
वाह काय एकेक आठवणी काढल्यात!!
मजा आली वाचून. गोडाचं विशेष
साखरेचे