✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मिपावर चित्रे टाकण्याची कृती

ड
डॉ सुहास म्हात्रे यांनी
गुरुवार, 04/14/2016 - 00:14  ·  लेख
लेख
मिपावर चित्रे टाकताना बर्‍याच जणांना समस्या येतात असे दिसते आहे. या विषयावर अगोदर लिहीले गेले आहेच. परंतु सहजपणे ही माहिती समोर असावी यासाठी हा परत केलेला प्रपंच. खालील पायर्‍या वापरल्यास मिपावर चित्रे टाकणे सहजसाध्य होईल. इतकेच नव्हे तर ती योग्य आकारात व प्रमाणबद्ध दिसतील. १. प्रथम तुमची चित्रे गुगल-फोटो, फ्लिकर किंवा तत्सम संस्थळावर चढवा. २. चित्रांचे तिथले स्टेट्स "पब्लिकली शेअर्ड" असे करा. चित्रे मिपावर दिसण्यासाठी हे आवश्यक आहे. असे केल्यावर तुमची चित्रे मिपावर टाकण्यायोग्य स्थितीत येतील. ३. त्या संस्थळावर चित्र पूर्णपणे (थंबनेल अथवा छोटी आवृत्ती नव्हे) उघडून त्यावर राईट क्लिक करा आणि "Copy image URL" पर्यायावर टिचकी मारा... आता ते चित्र मिपामध्ये टाकण्यासाठी त्याचा दुवा कॉपी केला गेलेला आहे. हे चूक आहे...  . हे बरोबर आहे...  आता मिपावर या आणि... ४. लेखन करण्याच्या चौकोनाच्या (टेक्टबॉक्सच्या) वर असलेल्या बटणांपैकी सर्वात डावीकडच्या (सुर्योदयाचे चित्र असलेल्या) बटणावर क्लिक करा. (त्या बटणावर कर्सर ठेवल्यास Insert/edit image असा मेसेज दिसेल व "Insert/edit image टेक्स्टबॉक्स" दिसू लागेल.) .  . ५. दिसू लागलेल्या Insert/edit image टेक्ट बॉक्स मध्ये खालीलप्रमाणे माहिती भरा: ......अ) Insert Image मध्ये वर कॉपी केलेली युआर एल पेस्ट करा (Ctrl + V) ......आ) Width X Height: कोरे ठेवा. ......इ) Alternate Text: इथे तुम्हाला हवे ते चित्राचे नाव टाका अथवा फक्त एकदा स्पेसबार दाबून एक स्पेस टाका. ६. OK बटन दाबल्यावर टेक्ट बॉक्समध्ये त्या चित्राचा कोड दिसू लागेल. ७. चित्र "पूर्वपरिक्षण" करुन पहा: ......अ) चित्र लेखनाच्या चौकटीत योग्य जागी दिसत असल्यास टाकलेला कोड योग्य आहे. ......आ) चित्र लेखनचौकटीबाहेर जात असल्यास आणि/किंवा उजव्या बाजूच्या मिपासंबधीच्या माहितीवर आक्रमण करत असल्यास Width मध्ये ६६० ते ३०० यामधला एक पर्याय वापरून "पूर्वपरिक्षण" करुन पहा व योग्य तो पर्याय स्विकारा. (सर्वसाधारणपणे आडव्या (लॅड्स्केप) चित्रांना ६०० ते ६६० व उभ्या (पोर्ट्रेट) चित्रांना ३०० ते ४५० Width योग्य होते) ......इ) Height नेहमीच कोरी ठेवा. मिपा तुम्ही स्विकारलेल्या Width ला योग्य ती Height वापरून चित्र प्रमाणबद्ध ठेवते. (अंदाजे Height टाकण्याच्या प्रयत्नात बहुदा चित्र वेडेवाकडे दिसते, तेव्हा ते टाळा.) ८. पायरी क्रमांक ३ ते ७ परत परत वापरून पुढच्या प्रत्येक चित्राचा योग्य कोड लेखात अंतर्भूत करा. ९. लेखाचे सर्व चित्रांसह "पूर्वपरिक्षण" करून तो मनाजोगता दिसू लागला की मगच तो "प्रकाशित करा". कारण लेख प्रकाशित केल्यावर सर्वसामान्य लेखकाला त्यात बदल करता येत नाही. १०. लेख प्रसिद्ध केल्यावर लेखनात अथवा चित्रांत काही दोष आढळले तर ते सुधारण्यासाठी साहित्य संपादकांशी संपर्क करा. .

खास सूचना :

मिपात टाकलेले फोटो (अ) साठवण केलेल्या जागी एडीट केले आणि / किंवा (आ) त्यांना दुसर्‍या अल्बममध्ये हलविले तर त्यांच्या दुव्यांच्या मजकूरात (लिंक्स) बदल होतो व त्यामुळे ते फोटो मिपातिल लेखात दिसणे बंद होते. असे फोटो लेखात परत दिसण्यासाठी त्यांचे बदलेले नवे दुवे मिपात टाकणे जरूर असते.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
तंत्र
लेखनप्रकार (Writing Type)
माहिती

प्रतिक्रिया द्या
92793 वाचन

💬 प्रतिसाद (112)

प्रतिक्रिया

उपयुक्त माहिती

श्रीरंग_जोशी
गुरुवार, 04/14/2016 - 00:29 नवीन
मिपावर प्रथमच फोटो प्रकाशित करताना ज्या समस्या येतात त्यांच्यासाठी हा धागा मदत पानाची भूमिका पार पाडणार याबद्दल विश्वास वाटतो. एक माहिती जोडतो. ~ फोटो पब्लिकली शेअर झाला आहे की नाही याची चाचणी ~ समजा क्रोम ब्राउझरमध्ये तुम्ही तो गुगल फोटोज, फ्लिकर किंवा तत्सम साइट्सवर तुमच्या लॉगिनने अपलोड केला व शेअर केला तर त्याचा दुवा धाग्यात दिला आहे त्या पद्धतीने मिळवून दुसर्‍या ब्राउझरमध्ये जिथे तुमचे त्या साइटवर लॉगिन नाही आहे तेथे उघडून बघा. पब्लिकली शेअर झाला नसेल तर तो तुम्हालाही दिसणार नाही. दोन ब्राउझर्स वापरत नसल्यास एकच ब्राउझर वापरूनही ही चाचणी करता येईल. फक्त फोटोचा दुवा मिळवल्यावर त्या साइटमधून लॉग आउट करायचे अन मग त्याच ब्राउझरमध्ये तो दुवा उघडावा.
  • Log in or register to post comments

(No subject)

मितभाषी
गुरुवार, 04/14/2016 - 00:57 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

(No subject)

मितभाषी
गुरुवार, 04/14/2016 - 01:14 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

माहीती चांगली आहे पण चार

खटपट्या
गुरुवार, 04/14/2016 - 01:37 नवीन
माहीती चांगली आहे पण चार क्रमांकाच्या पायरीमधील चित्र गंडले आहे. किमान मला तरी दीसत नाही. वर्तूळात आडवी रेघ येतेय...
  • Log in or register to post comments

चित्र दिसत आहे. रिफ्रेश करून

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 04/14/2016 - 14:08 नवीन
चित्र दिसत आहे. रिफ्रेश करून पहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

एक प्रयत्न करतोय फक्त चित्र टाकण्याचा

मारवा
Mon, 05/02/2016 - 20:42 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

जमलं ! चित्र दिसत आहे.

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 05/02/2016 - 21:11 नवीन
जमलं ! चित्र दिसत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा

जमतंय नीट! आभार!!!

नाना स्कॉच
गुरुवार, 04/14/2016 - 08:29 नवीन
Image removed. जमतंय नीट! आभार!!!
  • Log in or register to post comments

हे दिसत नाही. height कॉलम

अत्रे
गुरुवार, 04/14/2016 - 08:49 नवीन
Image removed. हे दिसत नाही. height कॉलम रिकामा सोडला आहे.
  • Log in or register to post comments

छान दिसतेय की !

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 04/14/2016 - 13:31 नवीन
छान दिसतेय की ! Height रिकामी ठेवल्याने हे चित्र मूळ चित्राच्या उंची-रुंदीचे प्रमाण राखून आहे (डिस्टॉर्शन झालेले नाही).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रे

ओह , मोबाईल वर दिसत नव्हते!

अत्रे
गुरुवार, 04/14/2016 - 13:54 नवीन
ओह , मोबाईल वर दिसत नव्हते! laptop वर दिसतंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

मोबाईलच्या कॉनफिगरेशनवर

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 04/14/2016 - 14:06 नवीन
मोबाईलच्या कॉनफिगरेशनवर अवलंबून असल्याने हाय रेझॉल्युअशन चित्रे लोड होण्यासाठी जास्त वेळ लागू शकतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रे

फ्लिकर वापरुन

Rahul Sable
गुरुवार, 04/14/2016 - 13:33 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

या ठिकाणी टाकलेले चित्र

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 04/14/2016 - 13:50 नवीन
या ठिकाणी टाकलेले चित्र "पब्लिकली शेअर्ड" नाही त्यामुळे ते दिसत नाहीय. "पब्लिकली शेअर्ड" केल्यास ते असे दिसेल... Image removed. "इंडियन स्पॉट बिल्ड डक"चा सुंदर फोटो !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rahul Sable

माझा प्रयत्न फसला

Rahul Sable
गुरुवार, 04/14/2016 - 13:37 नवीन
चित्र दिसत नाहि
  • Log in or register to post comments

(No subject)

Rahul Sable
गुरुवार, 04/14/2016 - 13:41 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rahul Sable

वर पहा.

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 04/14/2016 - 13:52 नवीन
वर पहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rahul Sable

डॅाक, एक साइट शोधलीय https

कंजूस
गुरुवार, 04/14/2016 - 20:24 नवीन
डॅाक, एक साइट शोधलीय https jumpshare dot com यातून चित्र चढवता येतं का ते सांगा.पिडीएफसाठीही आहे.
  • Log in or register to post comments

हो शक्य आहे.

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 04/14/2016 - 23:12 नवीन
हो शक्य आहे. १. आताच ही ग्राफिक फाईल तिथे अपलोड करून इथे टाकली आहे... Image removed. २. टेक्स्ट फाईल असल्यास ती त्या संस्थळावर टाकून... अ) मिपावर तिचा दुवा असा देता येईल : https://jumpshare.com/v/9ZjYHACZ21RMOqeabLyH किंवा आ) तिच्या दुव्याला नाव देऊन मिपावर अशी टाकता येईल. सावधगिरीची सूचना : मिपावर (किंवा इतर कोठेही दुवे देऊन) टाकलेल्या फाईल्स भविष्यातही खात्रीने चालू राहतील अश्याच संस्थळांवर टाकाव्यात. अन्यथा फाईल्स असलेले संस्थळ बंद पडल्यास / समस्या देऊ लागल्यास / फी आकारणी करू लागल्याने तुम्ही त्याचा वापर बंद केल्यास; त्यावर असलेल्या फाईल्स मिपावर दिसणे बंद होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

तात्काळगावातले (instagram)

वडापाव
गुरुवार, 04/14/2016 - 23:45 नवीन
तात्काळगावातले (instagram) फोटू चढवता येतील का? मी अॅपव्यतिरिक्त instagram वर गेलो नाही पण क्रोमवरून जाता येऊ शकतं म्हणून विचारतोय
  • Log in or register to post comments

मला इन्स्टाग्रामचा अनुभव नाही

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 04/15/2016 - 00:33 नवीन
मला इन्स्टाग्रामचा अनुभव नाही. इथे प्रयत्न करून पहा. त्या माहितीचा सगळ्यांनाच फायदा होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वडापाव

हो

श्रीरंग_जोशी
Fri, 04/15/2016 - 00:38 नवीन
हो, इंस्टाग्रामच काय कुठलीही साइट जिथे फोटो पब्लिकली शेअर करता येतात अन प्रत्यक्ष फोटोच्या फाइलचा दुवा मिळवता येतो त्या प्रत्येक साइटचा वापर मिपावर फोटोज प्रकाशित करताना येईल. हा एक फोटो इंस्टाग्रामवरून साभार. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वडापाव

धन्यवाद डॅाक.मी हे करून

कंजूस
Fri, 04/15/2016 - 05:41 नवीन
धन्यवाद डॅाक.मी हे करून पाहिले परंतू चित्र उमटत नव्हते image tag वापरून म्हणून विचारले.तुमचेही चित्र,फाइलमाझ्या IE11मध्ये उघडत नाहीये आणि खात्री झाली की ही साइट नाही वापरता येणार."https" असल्याने त्या सिइट वापरण्याविषयी उत्सुक होतो. पिकासा,फ्लिकर वगैरे साइट्स चांगल्या असल्या तरी मोबाइल आणि स्लो नेटस्पीडला काही उपयोगाच्या नाहीत.एक चित्र अपलोड करून इकडे टाकायला १०एमबी डेटा सहज खातो.श्रीरंगचे इन्स्टाग्राम करून नाही पाहिले. फ्लिकर अथवा तत्सम साइटवरती तीन वेगळ्या लिंक्स मिळतात शिवाय पब्लिक अकसेसही न विसरता ठेवावे लागते. अजूनएक keepandshare dot com try करत आहे.
  • Log in or register to post comments

मोबाईलसाठी

पैसा
Fri, 04/15/2016 - 20:15 नवीन
मोबाईलसाठी तुम्ही छान धागा काढला होता! तो मदतपानात आहेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

tinypic dot com साइट बरोबर

कंजूस
Fri, 04/15/2016 - 22:07 नवीन
tinypic dot com साइट बरोबर चालते,त्यातले फोटो सर्वांना दिसतात. "https" secure site शोधत असतो परंतू त्या साइट मोबल्यात चालत नाहीत अथवा डेटा प्रचंड खातात.संगणकातली 8+gb RAM, ब्राडबँडचे ग्लुकोज सलाइनमुळे भारी साइट्स सहज चालतात पण मोबल्याचा घामटा निघतो. छोट्या कंपन्या कधीही बंद पडतील आणि फ्री चालवण्यासाठी जाहिराती मारतात हा त्रास असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

चित्र कोठूनही टाकले तरी त्या

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 04/15/2016 - 21:08 नवीन
चित्र कोठूनही टाकले तरी त्या साईट्वर ते "पब्लिक शेअर्ड" असावेच लागेल, नाहीतर ती साईट त्या चित्राचा डेटा पाठवत नाही. गुगलफोटो वापरून पहा. या संस्थळाचा माझा अनुभव चांगला आहे. मला अजूनतरी मोठी समस्या आलेली नाही. फोटो "ओरिजिनल रिझॉल्युशन" ऐवजी "हाय रिझॉल्युशन" मधे ठेवले तर फारसा रिझॉल्युशन लॉस न होता चित्रांची बाईटसाईझ खूपच कमी होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

(No subject)

Rahul Sable
Fri, 04/15/2016 - 18:33 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

rahul,18:33चे चित्र आणि

कंजूस
Fri, 04/15/2016 - 19:35 नवीन
rahul,18:33चे चित्र आणि डॅाकचे ""पब्लिकली शेअर्ड" केल्यास ते असे दिसेल..वाले स्पॅाटबिल्ड दोन्ही न दिसण्याचे कारण काय असेल? instagram चे फार लहान टाकले आहे का?
  • Log in or register to post comments

instagram

श्रीरंग_जोशी
Fri, 04/15/2016 - 19:59 नवीन
हो, १०० रुंदी वापरली. चाचणी म्हणून टाकले होते. त्यावर क्लिक केल्यास नव्या टॅबमध्ये मूळ आकारमानात उघडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

(No subject)

शिव कन्या
Fri, 04/15/2016 - 20:22 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

योग्य दुवा

श्रीरंग_जोशी
Fri, 04/15/2016 - 20:27 नवीन
योग्य दुवा Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिव कन्या

मी मोबाईलवरून डकवतोय. पूर्वपरीक्षणात मला फोटू दिसत नाहीये.

वडापाव
Fri, 04/15/2016 - 20:24 नवीन
Image removed. तुम्हाला दिसतोय का फोटू?
  • Log in or register to post comments

एम्बेड कोड वापरून

श्रीरंग_जोशी
Fri, 04/15/2016 - 20:30 नवीन

Golden Beach #karwar #karwarbeach #beachesofindia #indianbeaches #sunsetphotographs #sunsets #fadingsun #fadingglow #fadingglory #goldenglow #goldenglory #sand #sea #waves #reflection #hdr #nature #naturelovers #canon #canonpowershot

A photo posted by Kaustubh Anil Pendharkar (@kaustubhpendharkar) on Jan 31, 2016 at 9:09pm PST

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वडापाव

धन्यवाद _/\_

वडापाव
Fri, 04/15/2016 - 20:31 नवीन
धन्यवाद _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

तासभर प्रयत्न केले, सगळ्या

शिव कन्या
Fri, 04/15/2016 - 20:26 नवीन
तासभर प्रयत्न केले, सगळ्या पायऱ्या पार केल्या , पण गंडलं .....जौ दे....मिपा आपण काढलेल्या छायाचित्रासाठी नसावेच! :(
  • Log in or register to post comments

सर्वात महत्वाची पायरी

श्रीरंग_जोशी
Fri, 04/15/2016 - 20:31 नवीन
सर्वात महत्वाची पायरी - इमेज फाइलचा दुवा फोटोवर राइट क्लिक करून मिळवणे अन तो मिपावर वापरणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिव कन्या

लेखातल्या सगळ्या पायर्‍या

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 04/15/2016 - 21:12 नवीन
लेखातल्या सगळ्या पायर्‍या तंतोतंत वापरल्या तर समस्या येऊ नये. विषेशतः ठळक केलेल्या पायर्‍या काळजीपूर्वक वापरा. बहुतेक समस्या तेथेच तयार होतात. वरवर जरी कठीण/लांबलचक प्रोसिजर वाटले तरी एकदा सवय झाली आणि चित्रे नीट दिसू लागली ते हातचा मळ वाटेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिव कन्या

अगदी खरं आहे. आपण

गोरगावलेकर
Tue, 03/05/2019 - 06:58 नवीन
अगदी खरं आहे. आपण सांगितल्याप्रमाणे कृती करून कालच एका भटकंती धाग्याच्या प्रतिक्रियेत फोटो चढवून पहिला. सहज जमतंय. कृती सचित्र व सोपी करून सांगितल्याबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

हो.. बघा ना मी पण केव्हाची ट्राय करतेय पण जमतच नाही आहे.

गौतमी
गुरुवार, 05/05/2016 - 13:21 नवीन
हो.. बघा ना मी पण केव्हाची ट्राय करतेय पण जमतच नाही आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिव कन्या

Ohh... I am 100th? (Photo

वडापाव
Fri, 04/15/2016 - 20:48 नवीन

Ohh... I am 100th? (Photo resolution reduced for IG) #100thpost #100thpostoninstagram #macaque #monkey #peering #reflection #reflectioninwater #instagram #dailyinsta #instadaily #monkeypics #gatecrasher #thirsty #thirst #thirstforwater

A photo posted by Kaustubh Anil Pendharkar (@kaustubhpendharkar) on Jan 10, 2016 at 8:49pm PST

  • Log in or register to post comments

फोटो खास आहे

श्रीरंग_जोशी
Fri, 04/15/2016 - 20:51 नवीन
फोटो खास आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वडापाव

धन्स _/\_ सगळ्यासाठीच :-)

वडापाव
Fri, 04/15/2016 - 20:52 नवीन
धन्स _/\_ सगळ्यासाठीच :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

हुश्श... झालं

वडापाव
Fri, 04/15/2016 - 20:49 नवीन
हुश्श... झालं
  • Log in or register to post comments

एक भाबडा प्रश्न...

चांदणे संदीप
Mon, 05/02/2016 - 20:47 नवीन
सर्वसामान्य लेखकाला त्यात बदल करता येत नाही
असामान्य लेखक होण्यासाठी काय करावे लागेल? ;) Sandy
  • Log in or register to post comments

तुम्ही सामान्य नसून सन्माननिय

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 05/06/2016 - 10:59 नवीन
गुगली आवडला ! ;) तुम्ही सामान्य नसून सन्माननिय असामान्य लेखक आहात हे अगोदरच सिद्ध झाले आहे आणि त्याचा आम्हा सर्व मिपाकरांना सार्थ अभिमान आहे ! तेव्हा असामान्यत्वाचे गुपित तुम्हीच उलगडू शकाल :) ;) वरच्या प्रतिसादात, "सर्वसामान्य (मिपाकर) लेखक" आणि "विशेषाधिकार असलेले (मिपाकर) लेखक (पक्षी : पदाधिकारी)" अशी विभागणी होती. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

म्हात्रेकाका!! :O

चांदणे संदीप
Fri, 05/06/2016 - 13:33 नवीन
म्हात्रेकाका!! :O माझी साधीच गुगली होती की ओ! पण, तुम्ही असा टोलवला चेंडू की तो शोधूनही सापडेना! :(
वरच्या प्रतिसादात, "सर्वसामान्य (मिपाकर) लेखक" आणि "विशेषाधिकार असलेले (मिपाकर) लेखक (पक्षी : पदाधिकारी)" अशी विभागणी होती. :)
हे अर्थातच माहिती आहे! :) Sandy
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

""पब्लिकली शेअर्ड" ऑप्शन कुठे

गौतमी
गुरुवार, 05/05/2016 - 13:23 नवीन
""पब्लिकली शेअर्ड" ऑप्शन कुठे आहे?
  • Log in or register to post comments

हा ऑप्शन तुम्ही ज्या

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 05/06/2016 - 10:51 नवीन
हा ऑप्शन तुम्ही ज्या वेबसाईटवर चित्रे साठवता, तिच्यावर असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गौतमी

फायनली जमलं मला.......... (४

गौतमी
गुरुवार, 05/05/2016 - 14:30 नवीन
फायनली जमलं मला.......... (४ तासांच्या अथक परिश्रमानंतर)
  • Log in or register to post comments

धन्यवाद :)

मेघना मन्दार
Fri, 05/06/2016 - 10:49 नवीन
या माहिती साठी अनेक धन्यवाद. मला फोटो टाकता आले.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा