मिपावर चित्रे टाकण्याची कृती
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
मिपावर चित्रे टाकताना बर्याच जणांना समस्या येतात असे दिसते आहे. या विषयावर अगोदर लिहीले गेले आहेच. परंतु सहजपणे ही माहिती समोर असावी यासाठी हा परत केलेला प्रपंच.
खालील पायर्या वापरल्यास मिपावर चित्रे टाकणे सहजसाध्य होईल. इतकेच नव्हे तर ती योग्य आकारात व प्रमाणबद्ध दिसतील.
१. प्रथम तुमची चित्रे गुगल-फोटो, फ्लिकर किंवा तत्सम संस्थळावर चढवा.
२. चित्रांचे तिथले स्टेट्स "पब्लिकली शेअर्ड" असे करा. चित्रे मिपावर दिसण्यासाठी हे आवश्यक आहे.
असे केल्यावर तुमची चित्रे मिपावर टाकण्यायोग्य स्थितीत येतील.
३. त्या संस्थळावर चित्र पूर्णपणे (थंबनेल अथवा छोटी आवृत्ती नव्हे) उघडून त्यावर राईट क्लिक करा आणि "Copy image URL" पर्यायावर टिचकी मारा... आता ते चित्र मिपामध्ये टाकण्यासाठी त्याचा दुवा कॉपी केला गेलेला आहे.
हे चूक आहे...
.
हे बरोबर आहे...
आता मिपावर या आणि...
४. लेखन करण्याच्या चौकोनाच्या (टेक्टबॉक्सच्या) वर असलेल्या बटणांपैकी सर्वात डावीकडच्या (सुर्योदयाचे चित्र असलेल्या) बटणावर क्लिक करा. (त्या बटणावर कर्सर ठेवल्यास Insert/edit image असा मेसेज दिसेल व "Insert/edit image टेक्स्टबॉक्स" दिसू लागेल.)
.
.
५. दिसू लागलेल्या Insert/edit image टेक्ट बॉक्स मध्ये खालीलप्रमाणे माहिती भरा:
......अ) Insert Image मध्ये वर कॉपी केलेली युआर एल पेस्ट करा (Ctrl + V)
......आ) Width X Height: कोरे ठेवा.
......इ) Alternate Text: इथे तुम्हाला हवे ते चित्राचे नाव टाका अथवा फक्त एकदा स्पेसबार दाबून एक स्पेस टाका.
६. OK बटन दाबल्यावर टेक्ट बॉक्समध्ये त्या चित्राचा कोड दिसू लागेल.
७. चित्र "पूर्वपरिक्षण" करुन पहा:
......अ) चित्र लेखनाच्या चौकटीत योग्य जागी दिसत असल्यास टाकलेला कोड योग्य आहे.
......आ) चित्र लेखनचौकटीबाहेर जात असल्यास आणि/किंवा उजव्या बाजूच्या मिपासंबधीच्या माहितीवर आक्रमण करत असल्यास Width मध्ये ६६० ते ३०० यामधला एक पर्याय वापरून "पूर्वपरिक्षण" करुन पहा व योग्य तो पर्याय स्विकारा. (सर्वसाधारणपणे आडव्या (लॅड्स्केप) चित्रांना ६०० ते ६६० व उभ्या (पोर्ट्रेट) चित्रांना ३०० ते ४५० Width योग्य होते)
......इ) Height नेहमीच कोरी ठेवा. मिपा तुम्ही स्विकारलेल्या Width ला योग्य ती Height वापरून चित्र प्रमाणबद्ध ठेवते. (अंदाजे Height टाकण्याच्या प्रयत्नात बहुदा चित्र वेडेवाकडे दिसते, तेव्हा ते टाळा.)
८. पायरी क्रमांक ३ ते ७ परत परत वापरून पुढच्या प्रत्येक चित्राचा योग्य कोड लेखात अंतर्भूत करा.
९. लेखाचे सर्व चित्रांसह "पूर्वपरिक्षण" करून तो मनाजोगता दिसू लागला की मगच तो "प्रकाशित करा". कारण लेख प्रकाशित केल्यावर सर्वसामान्य लेखकाला त्यात बदल करता येत नाही.
१०. लेख प्रसिद्ध केल्यावर लेखनात अथवा चित्रांत काही दोष आढळले तर ते सुधारण्यासाठी साहित्य संपादकांशी संपर्क करा.
.
प्रतिक्रिया
उपयुक्त माहिती
(No subject)
(No subject)
माहीती चांगली आहे पण चार
चित्र दिसत आहे. रिफ्रेश करून
एक प्रयत्न करतोय फक्त चित्र टाकण्याचा
जमलं ! चित्र दिसत आहे.
जमतंय नीट! आभार!!!
हे दिसत नाही. height कॉलम
छान दिसतेय की !
ओह , मोबाईल वर दिसत नव्हते!
मोबाईलच्या कॉनफिगरेशनवर
फ्लिकर वापरुन
या ठिकाणी टाकलेले चित्र
माझा प्रयत्न फसला
(No subject)
वर पहा.
डॅाक, एक साइट शोधलीय https
हो शक्य आहे.
तात्काळगावातले (instagram)
मला इन्स्टाग्रामचा अनुभव नाही
हो
धन्यवाद डॅाक.मी हे करून
मोबाईलसाठी
tinypic dot com साइट बरोबर
चित्र कोठूनही टाकले तरी त्या
(No subject)
rahul,18:33चे चित्र आणि
instagram
(No subject)
योग्य दुवा
मी मोबाईलवरून डकवतोय. पूर्वपरीक्षणात मला फोटू दिसत नाहीये.
एम्बेड कोड वापरून
धन्यवाद _/\_
तासभर प्रयत्न केले, सगळ्या
सर्वात महत्वाची पायरी
लेखातल्या सगळ्या पायर्या
अगदी खरं आहे. आपण
हो.. बघा ना मी पण केव्हाची ट्राय करतेय पण जमतच नाही आहे.
Ohh... I am 100th? (Photo
फोटो खास आहे
धन्स _/\_ सगळ्यासाठीच :-)
हुश्श... झालं
एक भाबडा प्रश्न...
तुम्ही सामान्य नसून सन्माननिय
म्हात्रेकाका!! :O
""पब्लिकली शेअर्ड" ऑप्शन कुठे
हा ऑप्शन तुम्ही ज्या
फायनली जमलं मला.......... (४
धन्यवाद :)
Pagination