✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

Confession Box : शकीरा..बहूरुपी आणि..... भाग १

म
मार्मिक गोडसे यांनी
Fri, 04/15/2016 - 14:35  ·  लेख
लेख
कांदेपोहे खाताखाता टिव्हीवर म्युझिक चॅनलवरील गाणी बघत असताना दारावरची बेल वाजली. टिव्हीचा आवाज म्युट केला व दरवाजा उघडला. साहेब आहेत का? खाकी वर्दीतल्या व्यक्तीने विचारले. हो. - मी कोण आहे ? - बाबांनी विचारले. पोलिसकाका आहेत. - मी हातातील वर्तमानपत्र बाजुला ठेवून बाबा पटकन उठून दाराजवळ आले. आपल्या सोसायटीतील मैदानात कार्यक्रम करायचा आहे, सोसायटीच्या सेक्रेटरीने आपली सही घेऊन यायला सांगितले आहे. - पोलिसकाका बाबांनी वाचून वहीत सही केली. ११ वाजता कार्यक्रम बघायला या असे आमंत्रण देऊन पोलिसकाका निघून गेले. बाबांनी दरवाजा बंद केला व आईला हाक मारून बोलावले. आपल्या चिरंजीवाला पोलिस व बहुरूपीतील फरक कळत नाही, खाकी कपडे घातलेल्या प्रत्येक माणसाला हा पोलिसच समजतो. आईला काहीच समजले नाही. बाबांनी मी केलेला पराक्रम सांगितल्यावर आईला काय बोलावे हे सुचेना, ती गप्प उभी राहीली. अगं आई, काहीतरी बोल ना. मागे नाही का एकदा एका गाण्यात प्रिती झिंटाला बघून बाबा म्हणाले होते, अरे! मुमताज अजूनही सिनेमात काम करतेय? तेव्हा बाबांची चूक तू कशी खिलाडूपणे माफ केली होती, आता का गप्प बसलीस.(हे सगळे स्वगत) काही न बोलता आई किचनमध्ये निघून गेली. मी निर्लज्जपणे टिव्ही बघायला लागलो. फार दिवसांनी शकीराचे गाणे लागले होते, त्याचा आनंद घेऊ लागलो. दारावरची बेल पुन्हा वाजली. संकटे आली की, ती एकटी-दुकटी येत नाही, त्याचाच प्रत्यय लगेचच आला. ह्यावेळेस बाबांनी दरवाजा उघडला. दारात बाबांचा मित्र उभा. बाबांनी मित्राला घरात घेतले व मला टिव्ही बंद करायला सांगितले. मी टिव्हीचा फक्त आवाज म्युट केला. बाबांच्या मित्राचे पोहे खाताखाता पेपर चाळणे चालू होते. अधूनमधून टिव्हीवरील गाणेही बघत होते. हे वाचले का ? मित्राने पेपरमधील एका बातमीकडे बाबांचे लक्ष वेधत विचारले. बघ ना, कोणत्याही सोयीसुविधा नसताना ही ग्रामीण भागातील मुलं इतके मोठे यश मिळवतात. एक नाही तर तीन मुलांनी MPSC परिक्षेत यश मिळवले आहे. आपली शहरातील मुलं सामान्यज्ञानात मागेच पडतात. बाबांनी माझ्याकडे बघत होकारार्थी मान डोलावली.बाबांच्या मित्राने नकळत आगीत तेल ओतले होते. पुढील अर्धा एक तास ग्रामीण व शहरातील विद्यार्थी ह्यावर दोघांची चर्चा चालू होती. ग्रामीण भागातील मुलांच्या जिद्दिचा विषय निघाला आणि अचानक बाबांच्या मित्राला काहीतरी आठवले, त्यांनी बाबांना कॉम्प्यूटर चालू करायला सांगितला. बाबांनी कॉम्प्यूटर व नेट चालू केले. मित्राने युट्युबवर एक विडिओ बाबांना दाखवला, सुरवातीला मी फक्त ऐकत होतो, परंतू विडिओतील व्यक्तीची ग्रामीण भाषा व प्रामाणीकपणामुळे मी पुरता भारावून गेलो व मीही तो विडिओ बघू लागलो. खालील विडिओतून चूकीचा संदेश दिला जात असेल तर धागालेखक त्याचे समर्थन करत नाही.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
शिक्षण
लेखनप्रकार (Writing Type)
अनुभव

प्रतिक्रिया द्या
4287 वाचन

💬 प्रतिसाद (8)

प्रतिक्रिया

एक नंबर

धर्मराजमुटके
Fri, 04/15/2016 - 16:11 नवीन
एक नंबर ! आवडले.
  • Log in or register to post comments

मस्त

आनन्दा
Fri, 04/15/2016 - 17:49 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments

आवडले!

रातराणी
Fri, 04/15/2016 - 22:19 नवीन
आवडले!
  • Log in or register to post comments

इंटरेस्टिंग!

पैसा
Sat, 04/16/2016 - 14:18 नवीन
लेख खूप छान पद्धतीने लिहिलाय. पण सगळ्यांना एक तासाचा व्हिडिओ नेटवर बघणे कठीण आहे! त्याचा आशयही थोडक्यात लिहा प्लीज.
  • Log in or register to post comments

हेच म्हणतो, भाषन ऐकले नाही.

तर्राट जोकर
Sun, 04/17/2016 - 16:37 नवीन
हेच म्हणतो, भाषन ऐकले नाही. नेटपॅक संपेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

१ लंबर

भीमराव
Sat, 04/16/2016 - 21:01 नवीन
१ लंबर जवा लय कट्टाळा याचा आभ्यासाचा तवा तवा आमी हॉस्टेल मधले मित्र भरत भौ यांचे ते स्पीच ऐकायचो, प्रयत्नांची पराकाष्ठा केली राव, एकदा मात्र एका दोस्तानं त्यांचं भाषण ऐकुन हा काष्ट वाला हाय म्हनुन कमी मार्क आसुन पन फुड गेला आशी प्रतीक्र्या दिलेली, तवा मात्र वाईट वाटले. ही काडी नाही एक आलेला अनुभव सहज सांगीतला, नाहीतर उगाच त्याजावरुन चावाचावी सुरु होईल.
  • Log in or register to post comments

ऐकलेलं आहे हे. खरंच अगदी

उगा काहितरीच
Sun, 04/17/2016 - 14:56 नवीन
ऐकलेलं आहे हे. खरंच अगदी प्रामाणिकपणे बोलतात भरत सर . रच्याकने विश्वास नांगरे पाटील यांचही भाषण ऐका तेही असंच प्रेरणादायी आहे.
  • Log in or register to post comments

धन्यवाद पैसाताई. बघतो प्रयत्न

मार्मिक गोडसे
Mon, 04/18/2016 - 19:19 नवीन
धन्यवाद पैसाताई. बघतो प्रयत्न करून. भरत आंधळे यांनी आपला ITI ते IPS अधिकारी पर्यंतचा प्रवास मिष्कील भाषेत व प्रामाणीकपणे मांडला आहे. प्रतिकूल परिस्थीतीतून केवळ जिद्दिच्या जोरावर हे यश त्यांनी संपादन केले आहे. स्पर्धा परिक्षेत बर्‍याच वेळा अपयश आले,परंतू ते खचले नाही.मिळालेल्या संधीचा फायदा घेवून अंतिम प्रयत्नात त्यांनी यश प्राप्त केले. त्यांच्याच शब्दात सांगायचे झाल्यास "अपयश ही यशाची पहीली पायरी असते हे माहीत होते, परंतू मला अंतीम यश प्राप्त करायला अपयशाचा जिनाच चढावा लागला". हे यश मिळाल्यावर ते तेथेच थांबले नाहीत्, तर ग्रामीण भागातील कमीतकमी २ लाख विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचा संकल्प केला आणि आठवड्याच्या प्रत्येक शनिवार व रविवार ते न चुकता राज्यात कुठेना कुठे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतात. तीव्र ईच्छाशक्ती व प्रचंड मेहनत केल्यास अपयशावर मात करता येते व परिक्षेत अपयश आल्यास आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नका असे सांगताना ते तरुणांना स्वतःचे उदाहरण देतात. जमिनीवर पाय असलेल्या ह्या माणसाला सलाम.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा