✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

< निशःब्द >

व
विजुभाऊ यांनी
Sat, 07/13/2013 - 17:31  ·  लेख
लेख
आमची प्रेरणा http://misalpav.com/node/25136 सुरेश चे लग्न जमत नसते त्यामुळे तो टेन्शन मधे असायचा. आज बुधवार होता. बुधवारी एक कविता करणे हा सुरेशचा नियम होता त्यामुळे तो आजतरी बाहेर जाणार नव्हता. मात्र लग्न जमत नाही या तेन्शन मुळॅ त्याच्या बुधवारच्या कविता आटल्या होत्या. इतक्यात रमेश चा फोन आला " काय अरे सुरेश बाबांची प्यान्ट टेलरकडुन आणायची विसरलास. मी ती दीड वीत लहान करायला दिली होती. तू सुद्धा ...अरे मी देखील टेलर मास्तरला ती बाबांची प्यान्ट दीड वीत कमी करा म्ह्णून सांगुन आलोय." सुरेश. म्हणजे तु सुद्धा." रमेश " हो" सुरेश त्या प्यान्टचे काय झाले आसेल आत्ता" रमेश. ते ठीक आहे रे. पण बाबा कालपासून सोसायटीत चट्ट्यापट्ट्याची अन्डरप्यान्ट घालूनच फिरताहेत. पार लाज आणली आहे त्याने त्याना प्यान्ट लवकर आणुन द्यायला हवी." सुरेश तु जातोस का टेलर मास्तर कडे" रमेश नको मला तेन्शन आहे" सुरेश कसले टेन्शन? माजेह लग्न जमत नाहिय्ये. तुला माहीतच आहे ना त्यासाठी मी पाम्ढरे बुधवार करतो. सोड रे बुधवार करून कोणाचे काही झालय? आज रामगड ला तमाशा आहे. येतोस. तमाशा? पण आज बुधवार आहे त्याला काय झाले बुधवारी मी वाईट कामे करत नाही. बुधवारी सकाळी धुतोस ना.... हो.ते चांगले काम आहे. वाईट नाही. असो... एका नर्तकीच्या आणि तिच्या साथीदाराना पोटाची भूक भागवण्यासाठी मदत करणे हे देखील पवित्र काम आहे. ते बुधवारी केल्यास पूण्यच मिळेल. असे म्हणतोस...... चल मग येतोच मी. माझी बाईक मागच्या वेळेस जीप उडवताना जीपसोबत नदीत पडली. तीला सर्दी झालीये. स्पार्क प्लग मधुन सारखे मिसफायरचे फट्ट फट्ट आवाज येताहेत. हरकत नाही आपण सोसायटीच्या वॉचमन ची सायकल घेवून जाऊया. चल निघू या. मी तुला हायएव वरच्या धाब्यावर भेटतो. तेथेच जेवू अन जाऊया. हायवेवरच्या धाब्यावर मटार उसळ अन केळ्याचे शिकरण चापून झाल्यावर सुरेश रमेश दोघे तमाशाला गेले. गण झाला गवळण झाली कटाव झाला वग सुरु झाला. वगाच्या मधे एक लावणी आली. " हात सोडा राया माझा..... लगीन ठरलया... अन राया माझं लगीन ठरलया...." रमेश लावणीच्या अदाकारीत गुंग झाला होता. सुरेश मात्र लावणीच्या शब्दानी आणखीच टेन्शन मधे आला. मघा धाब्यावर चापलेल्या केल्याच्या शिकरणाची धुंदी आता जास्तच चढली होती. त्याचा अम्मल म्हणा किंवा टेन्शन म्हणा सुरेश ला आता फार राग येवु लागला. त्याच्या मनात येवू लागले " माझी ही अवस्था झाली त्या गणीताच्या दामले मास्तरांमुळेच त्यानी शाळेत मला गृहपाठात चांगले मार्क दिले असते तर सोनाली पूर्णफातरफेकरने मला त्यावरच्या डिफीकल्टीज विचारल्या असत्या. त्या डिफीकल्तीज मी सोडवून दिल्या असत्या. अन आज माझ्यावर ही अवस्था ओढवली नसते. आज मी रमेश सोबत तमाशा पहाण्या ऐवजी सौ सोनाली सुरेश पूर्णफातरफेकर-अर्धकामे सोबत टीव्हीवर सास बहू मालीका पहात बसलो असतो. सुरेशचा राग वाढत होता. एका क्षणी सुरेश जाग्यावरून उठला. तमाशातील नाच्याला वाटले की सुरेश बक्षीशी देण्याकरीताच उठला आहे. त्याने सुरेशच्या जवळ जात सुरेशच्या हनुवटीला हात लावला. सुरेश चिडलेला हो ताच नाच्याने हनुवटीला हात लावलेले पाहून केळ्याच्या शिकरणीची झिंग जागी झाली त्याने नाच्याला जोरात ओढले. लावणीवर नाचणारी स्त्री अवाक झाली. लावणी थांबली. तसा नाच्या बेहान झाला त्याने सुरेश ला एक ठेवून दिली. तो वार वर्मी बसला. सुरेश तिथेच आडवा झाला. पडताना त्यने डावा हात आधाराला घेतला. डाव्या हातावर पडताना नाच्याने त्याचा उजवा हात धरूनच टेह्वला होता. हात लचकला. सुरेश धुमसतच तमाशाच्या कनातीतून बाहेर पडला. त्याने सायकल घेतली. हात लचकलेला पाय हेलपडत होते. त्यातच केळ्याच्या शिकरणची धुंदी.होतीच. रागारागातच सुरेशने सायकल काढली. अन पायडल हाणत त्याने दामले मास्तरांच्या घराकडे वाटचाल सुरू केली. त्याच्या डोक्यात राग पुर्ण चढलेला होता. काहिही झाले तरी दामले मास्तराना त्यानी केलेल्या पापाचे प्राय:श्चित द्यायचे होते. चढावर सुरेश सायकल हाणत होता. एकदम बुंगाट १५/२० किमी च्या वेगाने सायकल जात होती. गार हवेमुळे मुळे शिकरण आता जास्तच चढू लागले होते. समोरून कोणीतरी अर्जून रनगाडा चालवत येत होते. सुरेश ने नीट पाहिले. ओह्ह्ह न्नो..... सोनाली पुर्णफातफेकर.... सुरेशला आठवले सोनालीचा नवरा नरेश सैन्यात होता. सोनाली अन नरेश बहुतेक रणगाड्यातून पिकनीकला निघाले असावेत. रणगाड्याच्या काचेतून सोनाली नरेशच्या खांड्यावर मान टाकून प्रवास एन्जॉय करत असल्याचे दिसले. सुरेशचा राग अनावर झाला. या असल्या रणगाडावाल्यासोबत गेलीस तू माझ्यात काय कमी होते. रणगाडा नसेल पण माझ्याकडे स्वतःची बाईक होती. त्यावर बसून मला मागून घट्ट मिठी मारत तू अशीच माझ्या बरोबर फिरली असतीस. तुझ्या बापाला तो रणगाडावाला आवडला ना..... दामले मास्तर मिर्दाबाद. सुरेश चे आता भान सुटले होते. रणगाडा त्याला पास करून पुढे गेला. सुरेशने सायकल सिग्नल नसतानादेखील डिव्हायडरवरून यू टर्न घेवून उलट्या दिशेने चालवायला सुरवात केली.आता उतारच होता. जोरात सायकल हाणत सुरेश ने रणगाड्याला गाठले. नरेश आणि सोनाली अर्धफातरफेकर अजूनही तशाच अवस्थेत रणगाड्यात होते. सोनालीच्या मानेचा अँगल आता थोडा अधीकच तिरका झाला होता. तिचे डोळे मितलेले असले तरी त्यातून सूख पाझरत असल्याचे स्पष्ट कळत होएत. सुरेशचा राग आता आवरायच्या पलीकडे गेला. त्याने आणखीनच जोरात हाणायला सुरवात केली. सायकल वेगात पुढे चालू लागली. रणगाडा आता खूपच मागे पडला. नीरा नदीचा पूल ओलांडल्यानंतर सुरेशने पुन्हा एकदा यूटर्न घेतला. सायकलने वेग घेतला. रणगाडा आता समोर फक्त पन्नास फुटांवर होता. सुरेशच्या डोळ्यात खून चढला होता.त्याने ने सयकलचा हॅन्डल घट्ट धरला. पाय्डल वर पाय नीट रोवला. फुल्ल टेन्शन ने पाय खाली नेला...... सायकल वेगात अर्जून रणगाड्याच्या दिशेने निघाली. धडाम ठॉऑऑऑऑऑऑऑऑप. फुस्स्स्स्स्स्स आवाज झाला सायकलची रणगाड्याशी जोरात धडक बसली होती. सुरेशचे इप्सीत साध्य झाले होते. रणगाडा च्या साखळ्या तुटून रणगाडात नदीत कोसळताना त्याला स्पष्ट दिसत होता. डोळ्या समोर अंधार पसरला. शुद्ध आली तेंव्हा सुरेश सिव्हील हॉस्पीटल मधे होता. रनगाडा नदीत पडताना नरेश अन सोनाली ने त्यातून उड्या मारून स्वतःचा जीव वाचवला होता. रणगाड्याच्या चेनमध्ये अडकल्यामुळे सायकलचे पुढच्या चाकाचे दोन स्पोक तुटले होते. सुरेशचा तोल जावून तो नदीत फेकला गेला होता. मात्र सोनाली पूर्णफातफेकर आनि सैन्यातल्या नरेशने त्याचा वाचवले. सुरेश ला हाताच्या कोपर्‍याला खरचतले होते. गावच्या कुंभाराने त्यावर मातीचा लेप देवून सुरेशचा जीव वाचवला होता. ज्या सोनाली पूर्णफातरफेकरला आपण मारण्याचा प्रयत्न केला तीनेच वेळेवर येवून आपला जीव वाचवला. हे समजल्यावर सुरेश निशःब्द झाला. जिला आपण आपले आयुष्य उद्ध्वस्त केल्याबद्दल दोषी ठरवून मारायला निघालो होतो...........तिच्यामुळेच आज मृत्युच्या दारातून आपण परत आलो.............हे समजल्यावर नक्की काय बोलावे तेच त्याला कळत नव्हते...........................!
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
बालकथा
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
30963 वाचन

💬 प्रतिसाद (58)

प्रतिक्रिया

वेड्यासारखी हसत सुटले आहे,

भावना कल्लोळ
Sat, 07/13/2013 - 17:54 नवीन
वेड्यासारखी हसत सुटले आहे, कार्यालयातले लोक वेड लागले आहे का असे पाहत आहेत माझ्याकडे, अरे काय हे, काहीतरी …. आणि असा कोणता धाबा आहे जिथे केळ्याचे शिकरण भेटते. बाकी जे काही लिहिले आहे भन्नाट.
  • Log in or register to post comments

****

जेपी
Sat, 07/13/2013 - 18:16 नवीन
मीपण निशःब्द :-)
  • Log in or register to post comments

__/\__ __/\__ __/\__

उगा काहितरीच
Sat, 07/13/2013 - 18:28 नवीन
:D :D :D __/\__ :D :D :D :D :D :D __/\__ :D :D :D :D :D :D __/\__ :D :D :D
  • Log in or register to post comments

उत्तम विडंबन

राजेश घासकडवी
Sat, 07/13/2013 - 18:40 नवीन
मजा आली वाचून. :)
  • Log in or register to post comments

१. त्या खास केळ्याच्या

डॉ सुहास म्हात्रे
Sat, 07/13/2013 - 18:59 नवीन
Image removed.Image removed.Image removed. १. त्या खास केळ्याच्या शिक्रणाची पाकृ येउ दे. २. माझी बाई मागच्या वेळेस जीप उडवताना जीपसोबत नदीत पडली. तीला सर्दी झालीये. स्पार्क प्लग मधुन सारखे मिसफायरचे फट्ट फट्ट आवाज येताहेत. यावरून मागच्या अपघाताचा प्रसंग झाला तेव्हा तुमच्या बरोबर कोणतरी बसले होते असे दिसते. "बाई"ला स्पार्क प्लग असतात ही नविन शास्त्रिय माहिती मिळाली... आतापर्यंत कुठे वाचले नव्हते. सर्दी झाल्यावर बायका शिंकांऐवजी "मिसफायरचे फट्ट फट्ट आवाज" काढतात हेही नवेच. असो. मणोरंजणाबरोबर ज्ञानात पण भर्पूर भर पडली !!! +D +D +D
  • Log in or register to post comments

स्पार्क प्लग

कपिलमुनी
Mon, 07/15/2013 - 14:23 नवीन
"बाई"ला स्पार्क प्लग असतात ही नविन शास्त्रिय माहिती मिळाली
असतात ;) शोधा म्हणजे सापडेल..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

भारी!!

कवितानागेश
Sat, 07/13/2013 - 19:35 नवीन
भारी!! :D गावच्या कुंभाराने त्यावर मातीचा लेप देवून सुरेशचा जीव वाचवला होता. हे मस्तच.
  • Log in or register to post comments

साष्टांग दंडवत विजूभाऊ,

भाते
Sat, 07/13/2013 - 20:40 नवीन
___/\___, खालचा एकही प्रतिसाद न वाचता लिहितो आहे. नंतर पुन्हा एकदा वाचून योग्य प्रतिसाद देईन. वाचायला दहा मिनिटे लागली. हसून हसून पोट दुखायला लागले. आधीचा लेख वाचल्यावर तुमचा प्रतिसाद वाचुन थक्क झालो. बाकीचे नंतर लिहितो.
  • Log in or register to post comments

हाहाहा!

पैसा
Sat, 07/13/2013 - 21:44 नवीन
लै भारी!
  • Log in or register to post comments

विजुभाउ

दिपक.कुवेत
Sat, 07/13/2013 - 21:53 नवीन
यु टु? पण सॉल्लीड जमलीये.....केळ्याची शीकरण खासच!
  • Log in or register to post comments

व्हॉट्टे फ्यांटसी !

सस्नेह
Sat, 07/13/2013 - 21:54 नवीन
डिव्हायडरवरून यू टर्न घेवून Image removed.
  • Log in or register to post comments

शिकरण, बाईकची सर्दी, १५/२० चा

बॅटमॅन
Sat, 07/13/2013 - 23:41 नवीन
शिकरण, बाईकची सर्दी, १५/२० चा बुंगाट स्पीड, रणगाडा, डिव्हायडरवरून यू टर्न, सगळेच अतिशय जबरी =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) वायझेडसारखा सत्राशेसाठ वेळेला हसत सुटलो आहे अन तोंडातले ताक लॅपटॉपवर पसरलेय!! विजुभौ, किस ढाबे का शिक्रण खाते हो ऐसे विडंबन पाडने के लिये?
  • Log in or register to post comments

ज ब री

मंदार कात्रे
Sat, 07/13/2013 - 23:52 नवीन
ज ब री वि ड म्ब न !!! ;)
  • Log in or register to post comments

काय हो ते " " डॉळामारू

बॅटमॅन
Sun, 07/14/2013 - 00:00 नवीन
काय हो ते " ;) " डॉळामारू स्मायळी तुमची सिग्नेचर आहे काऽय म्हंटो मी, सगळीकडे दिस्ताय ते =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मंदार कात्रे

ब्याटम्यान....... बहुतेक

विजुभाऊ
Mon, 07/15/2013 - 15:36 नवीन
ब्याटम्यान....... बहुतेक सगळेच जण डोळे मारताहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

तरी बरं डोळे मारून कुणाचा

बॅटमॅन
Mon, 07/15/2013 - 15:50 नवीन
तरी बरं डोळे मारून कुणाचा रणगाडा फोडत नाहीत ते =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

हा हा हा .... महा महाप्रचंड

सुहास झेले
Sun, 07/14/2013 - 03:40 नवीन
हा हा हा .... महा महाप्रचंड =)) =)) =))
  • Log in or register to post comments

हॅ हॅ हॅ... आवडेश.

शिल्पा ब
Sun, 07/14/2013 - 06:46 नवीन
<<<सुरेशचे इप्सीत साध्य झाले होते. रणगाडा च्या साखळ्या तुटून रणगाडात नदीत कोसळताना त्याला स्पष्ट दिसत होता. हॅ हॅ हॅ... आवडेश.
  • Log in or register to post comments

ज ब री विडंबन

मूकवाचक
Sun, 07/14/2013 - 14:35 नवीन
=))
  • Log in or register to post comments

बरेच दिवसांनी

अग्निकोल्हा
Mon, 07/15/2013 - 03:06 नवीन
ड्युएलचे इतके सुरेख वर्णन वाचले. मजा आलि.
  • Log in or register to post comments

_/\_

स्मिता चौगुले
Mon, 07/15/2013 - 09:55 नवीन
धन्य आहात... जबरि आहे हे... :)
  • Log in or register to post comments

_^_

चावटमेला
Mon, 07/15/2013 - 12:00 नवीन
काळजाला घरे पाडणारी कथा ;)
  • Log in or register to post comments

त्या घरांची कॉलनी झाली का?

विजुभाऊ
गुरुवार, 10/17/2013 - 02:16 नवीन
त्या घरांची कॉलनी झाली का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चावटमेला

कुठली म्हाडाची की अन्य

बॅटमॅन
गुरुवार, 10/17/2013 - 12:59 नवीन
कुठली म्हाडाची की अन्य बिल्डरची?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

(No subject)

मोदक
Mon, 07/15/2013 - 13:58 नवीन
:-))
  • Log in or register to post comments

आन्गाश्शी

सुहास..
Mon, 07/15/2013 - 13:58 नवीन
=)) लईच
  • Log in or register to post comments

खंग्री !

कपिलमुनी
Mon, 07/15/2013 - 14:26 नवीन
पार भुस्काट पाडलतं !!
  • Log in or register to post comments

लेखातील खालील दोन

विजुभाऊ
Mon, 07/15/2013 - 14:30 नवीन
लेखातील खालील दोन प्रसंगासाठी मिपावुड मध्ये एका फिल्म साठी हक्क देण्यात आलेलेले आहेत. "एक था ताईगर" चा रीमेक निघतोय. प्रसंग १ ) रणगाड्याच्या फ्रंट विन्डशील्ड (किती लहान अस्तं म्हैतै?) सुरेश ने सोनाली अन नरेश ला पाहिले तेही सोनाली नरेशच्या खांद्यावर मान टाकून बसली होती. ***या नंतर गाणे आहे " बहारो फूल बरसाऑ ( रीमिक्स) रणगाड्याच्या चेन मध्ये सायकल अडकून फक्त दोन स्पोक तुटले. रणगाड्याची मात्र चेन तुटली. सुरेश अन सोनाली ने रणगाडा पडताना त्यातून बाहेर उडी मारुन जीव वाचवला.( *** या नंतरही गाणॅ आहे "सोने की हँडल चांदीकी सीट .आओ चले डार्लींग चले डब्बल सीट ( स्लो स्पीड मधे ( ये दोसती हम नही तोडेंगे....... शोले मधे शेवटी जसे होते तसे " है का नाय सलमान खानचा " एक था ताईगर".... सुपर रीमेक
  • Log in or register to post comments

मेलो..

चिगो
Mon, 07/15/2013 - 21:44 नवीन
=)) =)) =)) भारी...
  • Log in or register to post comments

मेलो..

चिगो
Mon, 07/15/2013 - 21:49 नवीन
=)) =)) =)) भारी...
  • Log in or register to post comments

मिपावरती विडंबनांचा हॉल ऑफ

बॅटमॅन
Mon, 07/15/2013 - 21:51 नवीन
मिपावरती विडंबनांचा हॉल ऑफ फेम कुणीतरी सुरू करा राव....लै हसलोय आणि हसतोय हे विडंबन वाचून =)) =))
  • Log in or register to post comments

ह्या ह्या ह्या

किसन शिंदे
Mon, 07/15/2013 - 23:07 नवीन
ह्या ह्या ह्या =)) विजूभौंना सध्या बराच वेळ मोकळा दिसतोय. ;)
  • Log in or register to post comments

जाकी रं जोरात

बांवरे
Tue, 07/16/2013 - 04:24 नवीन
कसलं शिरकाण नाट्य हाय ! हहह !
  • Log in or register to post comments

कश्श्याचा काहीही पत्ता लागला

विक्रान्त कुलकर्णी
Wed, 07/17/2013 - 16:50 नवीन
कश्श्याचा काहीही पत्ता लागला नाही... आणि लोक्स बावळ्यागत हसतायत...
  • Log in or register to post comments

मूळ प्रेरणेची लिंक दिलीय ती

बॅटमॅन
Wed, 07/17/2013 - 16:52 नवीन
मूळ प्रेरणेची लिंक दिलीय ती पाहण्याचे अंमळ कष्ट घ्यावेत...मग कळेल काय भानगड आहे ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विक्रान्त कुलकर्णी

नुस्ते वर्तमान बघुन काय

विजुभाऊ
Wed, 07/17/2013 - 19:11 नवीन
नुस्ते वर्तमान बघुन काय समजणार. इतिहास म्हैत पायजेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विक्रान्त कुलकर्णी

जौंद्या आप्पा...

धमाल मुलगा
Wed, 07/17/2013 - 21:36 नवीन
हितली लोकं बावळीच हैत. उगं येड्यासारखी रोज रोज मिपावर येतात काय, रोज रोज लेख वाचतात काय, त्या लेखांचे संदर्भ लक्षात ठेवतात काय अन मग त्यावर आलेली विडंबनंपण वाचतात, त्या विडंबनांच्या वर-खाली कुठेतरी दिलेली लिंक क्लिकवून मूळ धागाही पाहतात काय अन बावळ्यागत हसतात काय! खुळ्याची चावडी है जी सगळी. त्यातल्यात्यात एक गोष्ट जमेची- विडंबन म्हणजे काय त्ये 'लोक्सांना' ठाऊक आहे, आणि विडंबन कळण्यासाठी मूळ कलाकृती(?) आधी पहावी लागते इतकं उमजतं ह्या खुळ्यांना. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विक्रान्त कुलकर्णी

आइच्या गावात. ढिश्क्याव

मृत्युन्जय
Wed, 07/17/2013 - 18:39 नवीन
आइच्या गावात. ढिश्क्याव विडंबन आहे एक्दम. विजुभौंना पुढच्या भेटीत एक मस्तानी (प्यायची) सप्रेम भेट ;)
  • Log in or register to post comments

झालं!

यशोधरा
गुरुवार, 10/17/2013 - 02:27 नवीन
केलास ना पचका विजूभौंचा! :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

तरी बरं तो धाब्यावर शिकरण

विजुभाऊ
गुरुवार, 10/17/2013 - 02:36 नवीन
तरी बरं तो धाब्यावर शिकरण खायला जाऊयात असे नाही म्हणाला ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

LOL!

यशोधरा
गुरुवार, 10/17/2013 - 02:49 नवीन
LOL!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

वेड्यासारखा हसलो

सुधीर
Wed, 07/17/2013 - 22:04 नवीन
वेड्यासारखा हसलो. भारी!
  • Log in or register to post comments

*lol*

क्रेझी
गुरुवार, 10/17/2013 - 14:38 नवीन
*lol* *lol* *lol* कथा तर कथा, प्रतिसादही जबरा आहेत
  • Log in or register to post comments

हा धागा वाचून परत एकदा नि

बॅटमॅन
Mon, 10/28/2013 - 15:53 नवीन
हा धागा वाचून परत एकदा नि:शब्द होऊन प्रचंड हसल्या गेले आहे =)) =)) =)) =))
  • Log in or register to post comments

वा वा वा.

llपुण्याचे पेशवेll
गुरुवार, 10/31/2013 - 13:06 नवीन
वा वा वा.
  • Log in or register to post comments

मुळ कथेतील प्रतिसाद अन

पाषाणभेद
Sun, 11/03/2013 - 18:27 नवीन
मुळ कथेतील प्रतिसाद अन विजूशेठ यांची ही कथा वाचून हसतोय नुसता.
  • Log in or register to post comments

विडंबन वाचुन पुन्हा एकदा मनसोक्त हसु आले.

भाते
Mon, 11/04/2013 - 05:42 नवीन
विडंबन वाचुन पुन्हा एकदा मनसोक्त हसु आले. वाहवा विजुभाऊ.
  • Log in or register to post comments

नुस्ती धमाल.

चित्रगुप्त
Mon, 11/04/2013 - 13:07 नवीन
काय राव नुस्ती धमाल आहे ही कथा. प्यान्ट काय, शिकरण काय, तमाशा काय, सायकल काय, रणगाडा काय अन काय काय. यापूर्वी वाचली होती तेंव्हा काही समजले नव्हते, कारण प्रेरणा - कथेकडे लक्ष गेले नव्हते. आज दोन्ही कथा वाचल्या आणि कलेजा खलास झाला. वाचताचि या कथेला, कलेजा खलास झाला.
  • Log in or register to post comments

हा हा हा... फारच जबरी!

रुपी
Sat, 06/20/2015 - 03:59 नवीन
हे अफाट विडंबन आणि मूळ कथा (त्यातले प्रतिसाद) सगळंच याआधी वाचायचं राहिलं होतं =)
  • Log in or register to post comments

___/\___ विजुभौ खडक्स!

प्यारे१
गुरुवार, 10/29/2015 - 15:20 नवीन
___/\___ विजुभौ खडक्स!
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा