दर 18 वर्षांनी येणारे विवाहित स्त्रियांचे कोकीळा व्रत
लेखनप्रकार
सध्या महिलावर्गाची कोकीळा व्रत करण्याची गडबड चालू आहे. हे व्रत आषाढ शु 15 ते श्रावण शु 15 असे महिनाभर चालते. अधिक आषाढ महिना संपून निज आषाढातील पोर्णिमा येईल तेव्हा सुरू करून श्रावण पौर्णिमे पर्यंत करावे लागते. हे व्रत 18 वर्षानी एकदा येते. ज्या वर्षी अधिक आषाढ मास असतो तेव्हाच करायचे असल्यामुळे आयुष्यात जास्तीत जास्त 3 वेळा करण्याची सॆधी मिळते. यावेळेला हे व्रत 29 जूलै ते 29 आॅगस्ट या महिन्यात आहेे.
हे व्रत विवाहित स्त्रिया करू शकतात. हे व्रत केल्याने स्त्रियांनां दीर्घकाळ सौभाग्य, घनवृद्धि, व सॆतंतीसौख्य व इतर प्रपंचातील सुखे प्राप्त होते. व्रत महिनाभराच्या पुण्यकाळात कुणी महिनाभर, कुणी 3 दिवस, कुणी 1 दिवस करतात. हे व्रत ब्रह्मर्षी वसिष्ठ मुनींनी शत्रुघ्नाची पत्नी कीर्तिमाला हिला सांगितले.
कोकीळा व्रताची कहाणी: ब्रह्मदेवाला दहा पुत्र त्यातील दक्षप्रजापती,, त्याला 101 कन्या होत्या. जेष्ठ कन्या दाक्षायणीचा शंकराशी, 27 कन्या चंद्राला व इतर कन्यांचे विवाह इतर देवांशी करून दिले. दक्षाला पुत्र नव्हता म्हणून कपीलमुनीनूी त्यास पुत्रकामेष्टि यज्ञ करण्यास सुचविले. दक्षाने मग एका विशाल मैदानात यज्ञाची सिद्धता केली. दक्षाने सर्व देवांना, ऋषिनां आमंत्रणे पाठविली, पण शंकराला मात्र वगळले कारण दक्षाला शंकराचे वेदबाह्य वर्तन, स्मशानात राहणे, भुतांचा सहवास, नागांची भुषणे व अघोरी वागणे आवडत नसे.
यज्ञाच्या वेळी सर्व देवांनी दक्षाला शंकराच्या अनुपस्थितीविषयी विचारले तेव्हा त्याने शंकराला बोलावण्यास स्पष्ट नकार दिला. मग यज्ञाला आरंभ झाला, पण नारदमुनी (कळलावे) तिथून थेट कैलासावर आले व दक्षाच्या यज्ञाचे रसभरीत वर्णन सांगितले. ते ऐकून शंकर शांत बसले पण दाक्षायणीला मात्र आपल्या वडिलांनी सर्वांना बोलावले पण शंकराला बोलावले नाही याचा राग आला. (बायकांना आपल्या नवर्याला माहेरी बाेलावले नाही तर फार राग येतो.)
शंकराने गणपती, शिवगणांचे सैन्य, वाहन नंदी यांना दाक्षायणी सोबत माहेरी पाठवले. तेथे यज्ञ धुमधडाक्यात चालला होता, तेथे वडिल व आईने तिच्याकडे दुर्लक्ष केले, हे दाक्षायणिला जिव्हारी लागले. तिने रागाने कुणाला काही कळण्याआधी यज्ञकुंडात उडी घेतली. अग्नीने काही क्षणातच तिची आहुती घेतली. सर्वजण स्तंभीत झाले. काही वेळाने सर्व भानावर आले. सर्वत्र हाहा:कार माजला. नारद गुपचूप निघून कैलासावर गेले व त्यानी शंकराला सर्व सांगितले.
हे ऐकूण शंकर ताडकन उठले व रागारागाने आपल्या जटा एका शिळेवर आपटल्या. त्या क्षणी तिथे एक विराट पुरूष (वीरभद्र) प्रगटला. शंकराने त्याला आज्ञा केली सर्व सैन्यानिशी तेथे जाऊन यज्ञाचा विध्वंस करा तसेच सर्व निमंत्रितांचा संहार करून दक्षाला मृत्युदंड द्या
वीरभद्र त्वरेने मोठ्या सेनेसह यज्ञस्थळी पोहचला. त्याने हल्ला सुरू केला, सर्व देवांनी व ऋषि-मुनींनी वेदमंत्रांनी दर्भ शक्तीयुक्त करून प्रतिकार केला. वीरभद्राने व त्याच्या सैन्याने भयानक संहार केला, वीरभद्राने तलवारीने दक्षाचे मुडंके छाटून यज्ञात फेकले.
बह्मा, विष्णू व नारदाने वीरभद्राने केलेला संहार सांगून वीरभद्राला शांत करण्यास सांगितले. तेव्हा शंकर उठले व यज्ञभूमीवर आले व सर्वांना जिवंत केले. बह्माने आपला पुत्र दक्षाला जिवंत करण्याची पार्थना केली. शंकराने त्याचे मुंडके आणण्यास सांगितले पण ते यज्ञात जळून खाक झाले होते. मग कोणतेही शिर आणा असे शंकर म्हणाले. तेव्हा जवळ पडलेले बोकडाचे मुंडके दक्षाच्या मानेवर ठेवले व त्याला जिवंत केले.
नारदाने दाक्षायणिला (शंकराची पत्नी) जिवंत करण्याची विनंती केली. तेव्हा शंकराने सांगितले की तिचे दर्शन तुम्हाला घडवितो परंतु तिचे शरीर नसल्यामुळे ती पुर्नजीवित होणार नाही. असे म्हणून यज्ञकुंडातील राख हवेत फेकली तेव्हा दाक्षायणी प्रगटली. तिने हात जोडून शंकराची क्षमा मागितली. परंतु शंकर म्हणाले, प्रिये रागाच्या भरात तुझ्याकडून आत्महत्या व यज्ञाचा अपमान हे दोन अपराध घडले. त्याचे फळ अटळ असल्यामुळे पुढील दहा हजार वर्ष तुला काळ्या रंगाची व कुरूप पक्षिणी व्हावे लागेल.
दाक्षायणिने उ:शाप मागितला तेव्हा शंकर म्हणाले तुला पश्चाताप झाला आहे म्हणून तू पक्षिणी जरी झालीस तरी गोड आवाजाची कोकीळा होऊन सदैव नंदवनात विहार करतील. शंकर पुढे म्हणाले दहा हजार वर्ष झाल्यावर तुला हिमालयाची पत्नी मेनका हिच्या पोटी जन्म मिळेल आणि हरितालिका व्रताच्या प्रभावाने पुन्हा आपला विवाह होईल.
वाचने
34240
वाचनखूण
प्रतिक्रिया
124
यापूर्वी
नवीन माहिती
In reply to नवीन माहिती by विकास
दाक्षायणी ही सती म्हणुन ओळखली
In reply to दाक्षायणी ही सती म्हणुन ओळखली by स्पंदना
राईट स्पदंनाजी
In reply to दाक्षायणी ही सती म्हणुन ओळखली by स्पंदना
+१
खूप छान लाटकर भाऊ! अतिशय
In reply to खूप छान लाटकर भाऊ! अतिशय by मांत्रिक
हे व्रत एका दिवसातही करता
In reply to हे व्रत एका दिवसातही करता by हेमंत लाटकर
खूप खूप धन्यवाद! मी परवा
छान माहिती दिलात.
व्रत विधी सांगता का?
In reply to व्रत विधी सांगता का? by स्पंदना
पुजेचे साहित्य:
कोकिळेचा स्वर
In reply to कोकिळेचा स्वर by ऋतुराज चित्रे
पण ऑगस्ट्/सप्टेंबरात कोकिळा
In reply to पण ऑगस्ट्/सप्टेंबरात कोकिळा by आदूबाळ
कशाला?
In reply to कोकिळेचा स्वर by ऋतुराज चित्रे
त्यासाठी पर्यायी व्यवस्था
In reply to त्यासाठी पर्यायी व्यवस्था by हेमंत लाटकर
प्राचीन तंत्रज्ञान
खूप छान माहिती. कधी या
शंका
कॉल्लिंग अत्रुप्त बुवा! तुमचा बिजनेस वाढायची ऑपॉर्च्युनिटी दिसते आहे इथे!
In reply to शंका by पैसा
असं होय! मला वाटलं, या सगळ्या
In reply to असं होय! मला वाटलं, या सगळ्या by प्रसाद गोडबोले
व्रताचा धागा आहे. सभ्य व्हा.
In reply to असं होय! मला वाटलं, या सगळ्या by प्रसाद गोडबोले
+१
In reply to +१ by बॅटमॅन
ते एक आणि
In reply to ते एक आणि by पैसा
धर्माच्या नावाखाली असले
In reply to धर्माच्या नावाखाली असले by बॅटमॅन
मला वाटते
In reply to मला वाटते by विकास
पाय लागू सरजी. _/\_
In reply to पाय लागू सरजी. _/\_ by बॅटमॅन
या व्रतात जीवलग मिपामित्र
In reply to धर्माच्या नावाखाली असले by बॅटमॅन
धर्माच्या नावाखाली असले
In reply to धर्माच्या नावाखाली असले by प्रसाद गोडबोले
धर्माचे सुधारित नियम (आणि
In reply to धर्माचे सुधारित नियम (आणि by बॅटमॅन
तळटीप
In reply to धर्माच्या नावाखाली असले by बॅटमॅन
पाश्चामात्यांचे अनुकरण
In reply to पाश्चामात्यांचे अनुकरण by हेमंत लाटकर
पाश्चामात्यांचे अनुकरण
In reply to पाश्चामात्यांचे अनुकरण by थॉर माणूस
सती परंपरा चुकीची आहे.
In reply to पाश्चामात्यांचे अनुकरण by हेमंत लाटकर
असली बिनडोक व्रतवैकल्ये करून
In reply to असली बिनडोक व्रतवैकल्ये करून by बॅटमॅन
अगदी सहमत.
In reply to अगदी सहमत. by प्रचेतस
ही कथा ब्रिटिशकाळातली आहे?
In reply to ही कथा ब्रिटिशकाळातली आहे? by बॅटमॅन
इणजण्न्रल अशा बहुतेक सर्वच
In reply to इणजण्न्रल अशा बहुतेक सर्वच by प्रचेतस
हां हे करेक्टेय!
In reply to हां हे करेक्टेय! by बॅटमॅन
मला खरंच एक प्रांजळ मत हवे
In reply to मला खरंच एक प्रांजळ मत हवे by प्रसाद गोडबोले
मूळासकट उपटून टाकले पाहिजे.
In reply to मला खरंच एक प्रांजळ मत हवे by प्रसाद गोडबोले
सवय
In reply to इणजण्न्रल अशा बहुतेक सर्वच by प्रचेतस
यात सामाजिक भाग जास्त आहे का?
In reply to यात सामाजिक भाग जास्त आहे का? by प्यारे१
प्रत्येक धर्मात धर्म
In reply to प्रत्येक धर्मात धर्म by प्रसाद गोडबोले
पश्या माझं पण आधी तेच मत होतं
In reply to पश्या माझं पण आधी तेच मत होतं by प्यारे१
आज समजलं की हे सगळां व्यर्थ
In reply to यात सामाजिक भाग जास्त आहे का? by प्यारे१
पेशवाई संपली हा भाग असावाच.
In reply to यात सामाजिक भाग जास्त आहे का? by प्यारे१
पेशवाई संपल्यामुळे
In reply to पेशवाई संपल्यामुळे by बॅटमॅन
एक कारण
In reply to एक कारण by पैसा
मेबी, पाहिले पाहिजे जरा.
In reply to इणजण्न्रल अशा बहुतेक सर्वच by प्रचेतस
यात सामाजिक भाग जास्त आहे का?
In reply to असली बिनडोक व्रतवैकल्ये करून by बॅटमॅन
यात माझा काय फायदा माहितीसाठी
In reply to यात माझा काय फायदा माहितीसाठी by हेमंत लाटकर
अर्रर्रर्रर्र
In reply to अर्रर्रर्रर्र by अभ्या..
या धाग्यात कोणती माहिती
In reply to अर्रर्रर्रर्र by अभ्या..
अभ्याजी तुम्ही फारच खोचक
In reply to ते एक आणि by पैसा
प्रसाद खाल्ला नाही म्हणून
In reply to प्रसाद खाल्ला नाही म्हणून by सूड
नाव बुडवायचे धंदे
In reply to प्रसाद खाल्ला नाही म्हणून by सूड
.
In reply to ते एक आणि by पैसा
प्रसाद खाल्ला नाही म्हणून
In reply to प्रसाद खाल्ला नाही म्हणून by हेमंत लाटकर
अरेच्चा!
In reply to प्रसाद खाल्ला नाही म्हणून by हेमंत लाटकर
अच्चा, मंजे प्रसाद म्हणून
म्हणून तू पक्षिणी जरी झालीस
In reply to म्हणून तू पक्षिणी जरी झालीस by थॉर माणूस
सगळच गंडलय.
दाक्षायणीला का शाप?
In reply to दाक्षायणीला का शाप? by समीरसूर
आता लगेच तुम्ही हिंदूद्वेष्टे
In reply to दाक्षायणीला का शाप? by समीरसूर
या कथा भगवान शंकरांनी तरी
In reply to या कथा भगवान शंकरांनी तरी by मांत्रिक
तो कथालेखकाचाच दोष नाही का?
In reply to तो कथालेखकाचाच दोष नाही का? by बॅटमॅन
=))
In reply to या कथा भगवान शंकरांनी तरी by मांत्रिक
अजिबात अपमानकारक नाही
In reply to अजिबात अपमानकारक नाही by समीरसूर
समीरसूर साहेब. तुमची बाजू
In reply to अजिबात अपमानकारक नाही by समीरसूर
आज-काल धार्मिक कट्टरता इतकी
In reply to आज-काल धार्मिक कट्टरता इतकी by सूड
वर्षा-दीड वर्षातून
In reply to दाक्षायणीला का शाप? by समीरसूर
ओ, का पेटवताय?
In reply to दाक्षायणीला का शाप? by समीरसूर
दाक्षायणीला का शाप? तिने
In reply to दाक्षायणीला का शाप? तिने by हेमंत लाटकर
यज्ञाचा अपमान म्हणजे नेमके काय?
In reply to यज्ञाचा अपमान म्हणजे नेमके काय? by समीरसूर
यज्ञ चालु असतांना त्यात
अगदी सहमत.बी ग्रेडी सिनेमा!!
गोष्ट सांगण्याची हातोटी आवडली
दिलेल्या कथेचा आणि कोकीळ
In reply to दिलेल्या कथेचा आणि कोकीळ by थॉर माणूस
आजकाल मिडिया एखाद्या छाेट्या
In reply to आजकाल मिडिया एखाद्या छाेट्या by हेमंत लाटकर
हाच का तो
दाक्षायणिने उ:शाप मागितला
In reply to दाक्षायणिने उ:शाप मागितला by प्रचेतस
मस्तच प्रचेतसजी!
In reply to दाक्षायणिने उ:शाप मागितला by प्रचेतस
अप्सरा लग्न करत नसतात.
In reply to अप्सरा लग्न करत नसतात. by प्रसाद गोडबोले
पण त्या अजिंक्य राहत नाहीत
In reply to दाक्षायणिने उ:शाप मागितला by प्रचेतस
बरोबर आहे पोथी मध्ये नावाची
कुहु कुहु
जेपीराजे ५० होत आले.
In reply to जेपीराजे ५० होत आले. by मांत्रिक
बरच ठावुक आहे वो तुमाला.
धागालेखकाला खरेच व्रताचा
कर्मकांड -- एक वेगळा विचार
In reply to कर्मकांड -- एक वेगळा विचार by सुबोध खरे
धन्यवाद डाॅक्टर साहेब. तुम्ही