आशुची राउंड - भाग २ व शेवटचा .
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
आशु मोठ्या खुशीत घरी येउन पोचला व त्याने गाडी पार्क केली .आजची राउंड त्याला चांगलीच फायदेशीर ठरली होती .
दुसरया दिवशी कॉलेजला गेल्यावर त्याने आपल्या सर्व मित्रांना कालची घटना मोठ्या रुबाबात वर्णन करुन सांगितली . मित्रांनीही मग त्याला गोड बोलून आणखी हरभरयाच्या झाडावर चढवले .
' काय राव , आधीच नविन गाडी , त्यात , तु तर आता सरांचा खास आदमी झाला कि बे'
'आता काय सबमिशन , टर्म वर्क सगळीकडे एकदम जोर आहे गडयाचा , काटाच किर्रर '
'अबे, जरा आपल्या गरीब दोस्तांना चहा पाणी तर दे , काढ कुट्टा '
अशा रितीने सर्वांनी आपली त्या दिवसाची चहा नाश्त्याची सोय करून घेतली .
पुढे दोन दिवसांनी आशुच्या वर्गाचे मंथली सबमिशन होते . यांमध्ये मागच्या महिन्यात झालेल्या ४ प्रॅक्टिकलसचे रिपोर्टस देशमुख सर तपासणार होते . आशु एकदम निवांत होता . त्याचे रिपोर्टसही तयार होते व तो आता सरांचा खास विद्यार्थी होता . त्यामुळे तो आरामात आपला नंबर येण्याची वाट पाहत होता . 'आपुन तो सरका खासमखास है . अपनेको क्या डर' हे त्याचे आपल्या मित्रांना ऐकवून झाले होते . त्याचा नंबर आल्यावर तो आपली रिपोर्टसची फाईल घेउन हसतमुख चेहरयाने देशमुख सरांच्या केबिनमध्ये शिरला .
दहा मिनीटांनी आशु चिमणीएवढे तोंड करुन बाहेर आला . त्याचा चेहरा चांगलाच उतरला होता . देशमुख सरांनी त्याच्या ४ ही रिपोर्टसमध्ये ढिगभर चुका काढल्या होत्या . व ४ ही रिपोर्टसना रिपीटचा शेरा देउन सात दिवसांत ते ४ ही रिपोर्टस नव्याने सबमिट करण्याची तंबीही दिली होती . हा सर्व प्रकार कळल्यावर त्याच्या मित्रांना आतुन आनंदाच्या उकळ्या फुटल्या . पण वरकरणी हसु दाबत ते आशुला धीर देउ लागले .
'अरे अजुन सात दिवस आहेत ना , मग डरतो कशाला '
'२ नाईट मार यार , होउन जाईल सगळं .लढ बाप्पु' .
हे त्यांचे धीराचे बोल व सल्ले ऐकताना आशुच्या मनात मात्र एकच विचार राहुन राहुन येत होता .
' च्यामारी , आपल्याला रविवारची राउंड चांगलीच महागात पडली तर ' .
-- कथा व भाग २ समाप्त .
प्रतिक्रिया
छान ..
धन्यवाद !
अरे इतक्या लवकर संपले पण ? :(
बरोबर!
...
सुचना
पहिला भाग आवडला नव्हता पण
भाग १ ची लिंक