✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मुल्यांकन (?) : (शतशब्दकथा)

क
कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी
Sun, 07/12/2015 - 14:30  ·  लेख
लेख
आमचा पेर्णास्त्रोतः ही प्रतिक्रिया हे गंमत म्हणुन लिहिलेलं आहे तस्मात हलकं घेणे हे.वे.सां.न.ल. आक्रमक प्रतिक्रियांसाठीचा ड्रॉपबॉक्स पौड फाट्यावर ठेवलेला आहे. तस्मात :)!! विद्यापीठामधल्या परिक्षा विभागाचा पेपरतपासणीविभाग प्रचंड गडबडीमधे दिसत होता. परिक्षा होउन दोन महिने गेलेले होते. त्यामुळे "निकाल" लावायचं काम जोमानं चालु होतं. सकाळीचं नवा फ्रिज घेण्यावरुन बायकोशी भांडण झालेले प्राध्यापक सोनटक्के घुश्शातचं मेकॅनिक्सचे पेपर तपासत होते. प्राध्यापकांची लेखणी गुण लिहित असली तरी डोकं मात्र सकाळच्या भांडणामधेच अडकलेलं होतं. समोरच्या पेपरवर भोपळा काढताना आपला राग शांत होतोय हे त्यांच्या लक्षात आलं. पंधरा दिवस गेले आणि निकाल लागला. त्याच्या हातामधे गुणपत्रिका होती आणि डोळ्यामधे पाणी होतं. होस्टेलच्या खोलीवर परत येउन त्यानी एकदा गुणपत्रिकेकडे पाहिलं आणि त्यानी खुर्चीवर चढुन दोरीला गाठं मारायला सुरुवात केली. सोनटक्क्यांच्या घरी नव्या फ्रिजच्या खोक्याच्या दोरीची गाठ सोडली जात होती.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
12291 वाचन

💬 प्रतिसाद (75)

प्रतिक्रिया

आयला....भारीये

टवाळ कार्टा
Sun, 07/12/2015 - 14:32 नवीन
आयला....भारीये
  • Log in or register to post comments

कही खुशी कही गम !

माम्लेदारचा पन्खा
Sun, 07/12/2015 - 14:41 नवीन
सोनटक्क्यांचं चुकलंच जरा.... भोपळा नसता दिला तर एक निरपराध जीव वाचला असता ! सदोष मनुष्यवधाचे कलम लावायला हरकत नाही.... आत्महत्येस प्रवृत्त करणे हेही कलम चालेल !!
  • Log in or register to post comments

कथा पटली नाही.

प्यारे१
Sun, 07/12/2015 - 14:57 नवीन
कथा पटली नाही. mechanics उडाला म्हणून छताला दोरी??? सोनटक्केनी टक्के नाही दिले म्हणून डायरेक्ट गाठी? विन्जिनीरिंग ची पोरं घाबरत नसतेत असल्या के ट्या ला. बाकी प्रा डॉ नेहमी बेशुद्धलेखन तपासून मार्क देत असतात. मग ते स्वतचं असलं तरी! (ह.घ्या. सर )
  • Log in or register to post comments

माप आणि प्यारे

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sun, 07/12/2015 - 15:09 नवीन
माप आणि प्यारे फक्त दोरी बांधली. ती कशाला आणि का हे नै लिहिलेलं. ;) कदाचित कपडे वाळतं घालायसाठी असावी. ;) ;)!! पण अश्या घटना घडतात. युनिव्हर्सिटीचा स्वानुभव आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

आम्ही जरा "सिनेम्याटिक लिबर्टी" घेतली हो............

माम्लेदारचा पन्खा
Sun, 07/12/2015 - 15:13 नवीन
प्रसंगाचं गांभीर्य कसं कळावं मग??? ;-)
  • Log in or register to post comments

कथा म्हणून खरंच मस्त आहे.

जडभरत
Sun, 07/12/2015 - 15:14 नवीन
कथा म्हणून खरंच मस्त आहे. अर्थात दोरी कपडे वाळत घालायला पण बांधली असेल, हा युक्तिवाद बरोबर आहे. आपण पण कधीतरी कंटाळतो ह्या सगळ्याला. पण म्हणून टोकाचे निर्णय घेणारे फार्र कमी. असो असं कुणाच्याच बाबतीत घडायला नको.
  • Log in or register to post comments

मॉडरेशन असतं की हो...

आदूबाळ
Sun, 07/12/2015 - 15:15 नवीन
मॉडरेशन असतं की हो... - (मास्तराचा नापास पोर) आदूबाळ
  • Log in or register to post comments

ऑन सिरियस नोट.

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sun, 07/12/2015 - 16:30 नवीन
ऑन सिरियस नोट. मॉडरेशन हा पेपरतपासणीपेक्षा हास्यास्पद प्रकार आहे. जर मॉडरेशन गंभिरपणे केलं असतं आणि त्यानुसार कारवाई झाली असती तर इंजिनिअरिंगचा पासिंग रेट नक्की वाढला असता. कारण जेन्युइनली अभ्यास करणारा नापास कसा होईल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

चांगला प्रयत्न.

ज्ञानोबाचे पैजार
Sun, 07/12/2015 - 15:21 नवीन
बाकी कथेला माझ्याकडून पाचशे पैकी दीड गुण. प्रा.डॉ. सोनटक्के उर्फ पैजारबुवा, प्रतिसाद क्र २. मेकॅनिक्सच्याच विद्यार्थ्यांवर आत्महत्या करायची जबाबदारी हे नाकर्ते सरकार घेणार आहे का? आर्ट्स आणि कोमर्स चे विद्यार्थी नेहमी सत्ताधीश होतात आणि ते जाणून बूजून इंजिनिअरिंगवर अन्याय करतात. हे शोशण आता थांबलेच पाहिजे या साठी इंजिनिअरिंग विद्यार्थी नेते वरद जोशी मागील पन्नास वर्षे लढा देत आहेत. अभ्यास कसा करायचा , हे इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना सांगायची गरजच नाही. फक्त मार्क मिळवणे त्याच्या हातात नाही म्हणून विद्यार्थी नापास होता आहेत . मार्कांची सुबत्ता येऊन इंजॆनिअर लोकांची फळी निर्माण करायची असेल तर सर्व हितचिंतकांनी विद्यार्थांना मार्क वाटण्याच्या प्रक्रियेत वारंवार शासकीय पातळीवरून जो अडथळा निर्माण करण्यात येतो त्याला थोपवून धरणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांसाठी साठी अनुकूल आणि पूरक धोरणे जर सरकार राबवू शकत नसेल तर शिक्षणामध्ये निष्कारण होणारी शासकीय लुडबुड थांबविण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. पंगाधर कुटे उर्फ पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

हसुन हसुन "लोल"वलत हाँ!!

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sun, 07/12/2015 - 15:40 नवीन
हसुन हसुन "लोल"वलत हाँ!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

मैकेनिक्सच्या परीक्षार्थी

आदूबाळ
Sun, 07/12/2015 - 16:08 नवीन

मैकेनिक्सच्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांमध्ये असलेले अनुत्तीर्ण होण्यामुळे आत्महत्याप्रवण विचारांचे प्रमाण आणि सुद्धा गूगलमध्ये म वर अर्धचंद्र देण्यात येणाऱ्या अडचणी

*हा धागालेख चीकीप्रकल्पांसाठी असल्यामुळे आपले प्रतिसाद प्रताधिकारमुक्त गृहीत धरले जातील. *अनुषंगिक नसलेले आवांतर टाळण्यासाठी आभार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

=))

डॉ सुहास म्हात्रे
Sun, 07/12/2015 - 17:15 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

हेही जमलं नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 07/12/2015 - 15:47 नवीन
अरे देवा...!!! चालु द्या. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

सरांना माध्यमिक शाळेवर आणा रे

प्यारे१
Sun, 07/12/2015 - 15:53 नवीन
सरांना माध्यमिक शाळेवर आणा रे कुणीतरी! आठवीपर्यंत कुणालाही नापास करायचं नाही सर. प्वार् ल्हान हाय जौंद्या ना सर. पाठीवर हात ठेवून फ़क्त (जिल्बी) काढ़ म्हणा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

:)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 07/12/2015 - 16:10 नवीन
प्रतिसादात मी जेव्हा दीड गुण लिहित होतो म्हणजे मनातल्या मनात अर्धा प्रतिसाद लिहून तो उतरवत होतो तेव्हाच मला कॅप्टन जॅक स्पॅरोची शेपटी ओढायचा मोह झाला होता. कॅप्टन जॅक स्पॅरो खूप छान लिहितात, त्यांचे प्रतिसादही छानच असतात, भांडन (वैचारिक) तेही दर्जेदार असतं. मिसळपावकरांची मेरीट लिष्ट काढू तेव्हा ते पहिल्या शंभरात नक्की असतील.

( हे माझं मत पुढे बदलुही शकतं)

-दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

कोणी शेपटीला हात घातला हे

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sun, 07/12/2015 - 16:27 नवीन
कोणी शेपटीला हात घातला हे पहायला जरा दोन पावलं मागे झालो तर चुकुन तुमच्या शेपटावर पाय पडला. आयला असा घोळ आहे होय. बाकी तुम्ही उत्तरपत्रिका तपासत असताना पहिल्या १०० मधे वगैरे काय मी येत नै ह्याची ग्यारंटी. त्यासाठी मला शेटिंगचं लावावी लागणार नैतर कॉपी करावी लागणार कोणाचीतरी. हलकच्चं घ्या. म्हणुनचं ढिस्केमर टाकलाय वरती. ( ) -कॅप्टन जॅक स्पॅरो-
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ब्वारं....!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 07/12/2015 - 16:51 नवीन
चालु द्या....!!! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

एका बुवाने सांगितलंय आम्हाला

कंजूस
Sun, 07/12/2015 - 16:20 नवीन
एका बुवाने सांगितलंय आम्हाला "ललित लेखनाचे मुल्यांकन वगैरे करू नका ,तुम्हाला कायपण कळत नाही त्यातलं." "हान् तेज्याल्या." हा वाक्प्रचार तुम्ही ठेवलेल्या पौडफाट्यावरच्या वडाफुनच्या ड्रापबाक्सात टाकून आलेलो आहे.
  • Log in or register to post comments

एकूण काय.....

माम्लेदारचा पन्खा
Sun, 07/12/2015 - 16:32 नवीन
आपापल्या शेपट्या सांभाळा बाबांनो.....
  • Log in or register to post comments

चालूद्यात :)

अन्या दातार
Sun, 07/12/2015 - 16:49 नवीन
चालूद्यात :)
  • Log in or register to post comments

कितवा अटेंप्ट होता ओ?

रातराणी
Sun, 07/12/2015 - 21:19 नवीन
कितवा अटेंप्ट होता ओ? पहिल्याला घरी आधीच सांगितलेल असतं, मेकेनिक्स आणि ग्राफिक्स राहणार. त्यामुळे लगेच दोरी नायत लावत कोण. तरीपण कथा आवडली आणि पैजारबुवांचा प्रतिसाद पण _/\_
  • Log in or register to post comments

कथा आवडली

श्रीरंग_जोशी
Sun, 07/12/2015 - 21:25 नवीन
कथा आवडली. पैजारबुवांच्या प्रतिसादाने चार चंद्र लावले आहेत.
  • Log in or register to post comments

विद्यापीठ

सिरुसेरि
Sun, 07/12/2015 - 22:05 नवीन
हे कुठले विद्यापीठ जिथे रीव्हॅल / रीचेक ची सोय नाही .
  • Log in or register to post comments

पुणे युनिव्हर्सिटीच्या अजब

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sun, 07/12/2015 - 22:19 नवीन
पुणे युनिव्हर्सिटीच्या अजब कारभाराचा तुम्ही अनुभव घेतला नसावा, रिकामे पेपरवाल्यांचे पेपर रीव्हॅल्युएशन मधे निघणं पेपर लिहिणार्‍यांचे पेपर रहाणं वगैरे प्रकारांचा अनुभव घेतलात तर समजेल. आणि लेखाला गंभिरपणे घेउ नका. काडी टाकायची होती म्हणुन टाकलेला लेख आहे. उद्दिष्ट सफल झालय. दोन दिवसात संपादकांना सांगुन लेख काढुन टाकायला सांगेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सिरुसेरि

मला अनुभव आहे

श्रीरंग_जोशी
Sun, 07/12/2015 - 23:49 नवीन
प्रत्येक सत्राच्या निकालानंतर ज्यात नापास झालो ते पेपर रिव्हॅलला टाकत असे. फक्त पहिल्या सेममध्ये एक क्लिअर झाला. ते देखील परिक्षेच्या एक आठवडा अगोदर निकालात कळले. इतर अनेक पेपर ३६/८० मिळून अडकलेले असत. त्यातही रिव्हॅलमध्ये ४ मार्कांची कृपा कधी मिळाली नाही. प्रत्येक सत्रात केवळ तीन पेपर्स रिव्हॅलला टाकता यायचे अन त्या काळात (२००२-०५) प्रति पेपर ₹३०० खूप महाग वाटायचे. उगाचच प्रसाद म्हणून मिळालेले पेपर्स बॅकलॉगला टाकले जायचे. ऑल क्लिअर वाली मंडळी केवळ कमी मार्क मिळाले म्हणून पेपर्स रिव्हॅलला टाकत असत अन काही वेळा त्यांच्यावर विद्यापीठ कृपा करायचे. माझेही पास झालेले पेपर्स असत ज्यात अपेक्षेपेक्षा कमी मार्क्स मिळाले असत. परंतु ते रिव्हॅलला टाकण्याची संधी कधी मिळाली नाही. वर्गात अनेकांनी रिव्हॅलला टाकले तरी रिव्हॅलद्वारे क्लिअर झालेली उदाहरणे म्हणजे त्या सहाध्यायालाही आशचर्याचा धक्का असायचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

कथा आवडली आणि पैजारबुवांचा

मधुरा देशपांडे
Sun, 07/12/2015 - 22:44 नवीन
कथा आवडली आणि पैजारबुवांचा प्रतिसादपण. अर्थात ते एकदम दोरी लावणं वगैरे उगाच्च दिसतंय, पण गुण मिळवायला तेवढा मसाला भरवलेला दिसतोय ;) बाकी पुणे विद्यापिठातच एका विषयात १७ गुण वाढले होते रिव्हॅलला. रिव्हॅलचा निकाल येईपर्यंत त्या पेपरचा अभ्यास परत चालु केला होता. पण नशीबाने बरेच आधी रिव्हॅलचा निकाल लागला. नाहीतर उद्या पेपर आहे आणि आज रिव्हॅलला विषय सुटला असेही झालेले पाहिले आहे.
  • Log in or register to post comments

माझ्या बाबतीत दोनदा दोन

एस
Sun, 07/12/2015 - 23:11 नवीन
माझ्या बाबतीत दोनदा दोन वेगवेगळ्या अभ्यासक्रमांच्या परीक्षांना अशा विषयांमध्ये मला विद्यापीठाने नापास केले ज्यात मी डोळे झाकून पेपर लिहिले तरी डिस्टिंक्शन मिळवले असते! तेव्हापासून (खरंतर शाळेपासूनच) माझा असा दृष्टिकोन झाला की आय अ‍ॅम द बेस्ट क्रिटिक ऑफ मायसेल्फ. दुसर्‍या कोणी मला नालायक म्हटल्याने मी खरेच नालायक होत नाही आणि तोंड फाटेपर्यंत स्तुती केल्याने फार भारी मनुष्यही होत नाही. स्वतःकडे तटस्थपणे बघता येण्याची देणगी ही ज्ञानलालसेनेच प्राप्त होऊ शकते. तेव्हापासून मार्क्सिस्ट होणे सोडून दिले. :-)
  • Log in or register to post comments

मार्क्सिस्ट

बहुगुणी
Mon, 07/13/2015 - 07:12 नवीन
मार्क्सिस्ट लईच उच्च! कोटी आवडली!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

आवडली

ज्योति अळवणी
Mon, 07/13/2015 - 01:15 नवीन
आवडली
  • Log in or register to post comments

बर्याच दिवसांनी आलात..

टवाळ कार्टा
Mon, 07/13/2015 - 10:43 नवीन
बर्याच दिवसांनी आलात...तुम्च्या लिखाणाच्ये इथे भर्पूर फ्यान्स हैत :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्योति अळवणी

माझा

नाखु
Mon, 07/13/2015 - 08:47 नवीन
केमीकल लोच्या हुता म्हून मेकॅनिकल साईड घावली नाही आणि बेकाम झालु. सोनटक्क्याचं काम वाचलं!!!! कप्तान इस लेखनीमें दम है! जे.के.सुपर सिमेंट
  • Log in or register to post comments

जान है

श्रीरंग_जोशी
Mon, 07/13/2015 - 08:52 नवीन
लेखनीमें जान है असे म्हणायचे असावे तुम्हाला :-) .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

बरोबर है

नाखु
Mon, 07/13/2015 - 09:02 नवीन
आम्चं चुक्याच! धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

भावना पोचल्या होत्याच...

श्रीरंग_जोशी
Mon, 07/13/2015 - 09:09 नवीन
भावना पोचल्या होत्याच... तसंही बाडीमे क्या रख्खा है ;-) .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

बाडीमे क्या रख्खा है ;-)

आदूबाळ
Mon, 07/13/2015 - 10:46 नवीन
बाडीमे क्या रख्खा है ;-)
रूपा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

भौतेक सुनील पाल

टवाळ कार्टा
Mon, 07/13/2015 - 11:09 नवीन
भौतेक सुनील पाल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

भौतेक नाही

श्रीरंग_जोशी
Mon, 07/13/2015 - 19:49 नवीन
भौतेक नाही, तोच - सुनील पाल. हमारे सामने कोई खडा नही हो सकता... (दारु की बहुत बास आती है) ;-) - अवांतरासाठी क्षमस्व.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

रतन नुरा और करता हु काम खतम पुरा

होबासराव
Tue, 07/14/2015 - 20:29 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

वास्तववादी आहे

पैसा
Mon, 07/13/2015 - 11:01 नवीन
कथा वास्तववादी आहे. अकरावीला नापास झालेल्या आणि आठवीत नापास झालेल्या दोन मुलांच्या आत्महत्या आता २ महिन्यात ऐकल्या आहेत. मूल्यांकन खरेच इनोदाचा विषय आहे. माझ्या मुलाला इंजिनिअरिंग ड्रॉईंगच्या पेपरात निकालात १० आणि फेरमूल्यांकनात ३४ मार्क्स दिले गेले होते. हे २४ मार्क्स कुठून वाढले माहीत नाही. पुन्हा परीक्षा दिल्यावर ६० मिळाले. जै हो त्या परीक्षा आणि पेपर तपासणार्‍या मास्तरांची! तो पहिल्या दुसर्‍या वर्षालाच असल्याने एवढे गंभीरपणे घेतले नाही. पण फायनल इयरच्या मुलाची अशी वाट लावली तर तो जीव द्यायलाच जाणार. पैजारबुवांचा, स्वॅप्सचा आणि अनेक प्रतिसाद आवडले.
  • Log in or register to post comments

मस्त आहे कथा.

अविनाश पांढरकर
Tue, 07/14/2015 - 03:20 नवीन
पूर्ण इंजिनीरिंगमध्ये एकंच पेपर रीव्हॅलला दिला ज्यात ११ मार्क वाढले. ४४ चे ५५ झाले. झाले एवढे उपकार बास म्हणत एकही पेपर रीव्हॅलला दिला नाही. पैजारबुवांचा, स्वॅप्सचा आणि अनेक प्रतिसाद आवडले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

असंच

स्मिता.
Tue, 07/14/2015 - 10:09 नवीन
इंजिनिअरिंग ड्रॉईंगच्या पेपराच्या बाबतीत माझाही अनुभव बरा नाही. मला कॉलेजात 'ड्रॉईंग चॅम्पिअन' म्हणत, वर्षभरात प्रत्येक ड्रॉईंग-शीटवर उत्तम असा शेरा मिळत असे. परिक्षेतही ८४ मार्कांचे ड्रॉईंग अगदी बरोबर काढले होते (हे खात्रीने सांगू शकते कारण ड्रॉईंग जर बरोबर नसले तर ते पूर्णपणे काढताच येत नाही), १६ मार्कांचे एक ड्रॉईंग काढायला वेळ पुरला नव्हता. माझ्या आजूबाजूच्या ५-६ परिक्षार्थींनी माझे बघून-बघून ड्रॉईंगस् काढले होते. निकाल लागला तेव्हा मात्र मला ४७ गुण आणि इतरांना ६० च्या आसपास! स्वानुभव वगळता इतरांचेही अनेक अनुभव पाहिले आहेत. एका मुलाने स्वतः सांगितले होते की त्याने फारफार तर १५-२० मार्कांचा पेपर लिहिला होता. तो मात्र ५०+ मिळवून पास झाला!! एका वेळी माझ्याच वर्गात पेपर लिहायला असलेल्या मुलाला निकालात चक्क गैरहजर दाखवले होते. तसंच रिव्हॅलचं... शेवटच्या वर्षाला असतांना एका मुलीचा दुसर्‍या वर्षाचा विषय राहिलेला होता. तो क्रिटिकलला असलेला विषय तिने रिव्हॅलला टाकून शेवटच्या वर्षाला अ‍ॅडमिशन घेतली. त्या सेमची प्रात्यक्षिक परिक्षा सुरू असतांना रिव्हॅलचा निकाल लागला आणि तिचा तो विषय पुन्हा राहिला. परिक्षा द्यायला आलेली त्या मुलीला निराश होवून घरी जाताना पाहिलीये. या आणि अश्या अनेक अनुभवांवरून विद्यापीठांमधल्या कारभाराची प्रचिती आलेली आहेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

आमच्या एका मित्राचे मार्क

विजुभाऊ
Mon, 07/13/2015 - 11:06 नवीन
आमच्या एका मित्राचे मार्क रीवॅल्युएशन मधे कमी झाले होते. ३२ चे २८ झाले........
  • Log in or register to post comments

माझेसुध्धा डिप्लोमाला अस्ताना

टवाळ कार्टा
Mon, 07/13/2015 - 11:09 नवीन
माझेसुध्धा डिप्लोमाला अस्ताना ८२ चे ८० झालेले...चायला आख्ख्या वर्गात अर्ध्याजणांना ९०+ होते त्या विषयात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

_/\_ खाली विशालभौंना दिलाय

रातराणी
Mon, 07/13/2015 - 23:16 नवीन
_/\_ खाली विशालभौंना दिलाय प्रतिसाद तोच आपल्याला पण!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

त्या पेपरला मला स्वतःला ९०+

टवाळ कार्टा
Tue, 07/14/2015 - 15:00 नवीन
त्या पेपरला मला स्वतःला ९०+ ची खात्री होती...निकालानंतर अर्ध्या वर्गाला ९०+ होते (ज्यात अगदी तळागाळातले सुध्धा होते) म्हणून रिव्हॅलला टाकलेला...BC त्या कमी झालेल्या २ मार्कांमुळे इंजीनीअरिंगची अ‍ॅडमिशन PVPP ला न मिळता सांगली संस्थानात मिळाली :( भंगार कॉलेज तिच्या**
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रातराणी

सर्व सब्जेक्टमध्ये मिळून

कपिलमुनी
Tue, 07/14/2015 - 14:56 नवीन
सर्व सब्जेक्टमध्ये मिळून ८२ होते का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

माझ्या मुलाला इंजिनिअरिंग

जडभरत
Mon, 07/13/2015 - 11:09 नवीन
माझ्या मुलाला इंजिनिअरिंग ड्रॉईंगच्या पेपरात निकालात १० आणि फेरमूल्यांकनात ३४ मार्क्स दिले गेले होते. हे २४ मार्क्स कुठून वाढले माहीत नाही. पुन्हा परीक्षा दिल्यावर ६० मिळाले. जै हो त्या परीक्षा आणि पेपर तपासणार्‍या मास्तरांची!
असं होत असेल तर फार वाइट आहे. एखादा मुलगा/मुलगी मानसिक द्रिष्ट्या कोलमडून जाईल या प्रकाराने. इतक्या बेशिस्तपणे विद्यार्थ्यांच्या पेपर तपासणार्‍या मास्तरचा त्रिवार धिककार.
  • Log in or register to post comments

आख्ख्या महाराष्ट्रातल्या

टवाळ कार्टा
Mon, 07/13/2015 - 11:10 नवीन
आख्ख्या महाराष्ट्रातल्या इंजिनीरिंग विद्यापिठांची हिच अवस्था आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जडभरत

मी तर रिव्हॅलचा धसकाच घेतलाच

विशाल कुलकर्णी
Mon, 07/13/2015 - 11:15 नवीन
मी तर रिव्हॅलचा धसकाच घेतलाच होता. डिप्लोमाला असताना डिजीटल टेक्नीक्सच्या पेपरमध्ये कमी गुण मिळाले म्हणून पेपर रिव्हॅलला टाकला. ६७ चे ६४ झाले. त्यानंतर कानाला खडा. कधीकधी तर वाटायचे काही प्रोफेसर्स पेपरच्या वजनावरून गुण देतात की काय? डिप्लोमाच्या तिसर्‍या वर्षाला आय.ओ.एम. च्या पेपरमध्ये सहा पुरवण्या जोडून अक्षरशः काहीही लिहीले होते. जेमतेम चाळीस-पंचेचाळीसची अपेक्षा होती आणि चक्क ८६ गुण मिळाले. त्या पेपरने मला डिप्लोमाला फर्स्ट क्लास मिळवून दिला असावा बहुतेक ;)
  • Log in or register to post comments

67 मिळाले म्हणून रीचेक? भारी

रातराणी
Mon, 07/13/2015 - 23:15 नवीन
67 मिळाले म्हणून रीचेक? भारी आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाल कुलकर्णी
  • 1
  • 2
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

Recent comments

  • भोंदूगिरी...
    1 hour 24 minutes ago
  • खरातचं काय चुकलं? काही नाही…
    1 hour 33 minutes ago
  • भोंदूबाबा ह्याचा नक्की अर्थ…
    8 hours 8 minutes ago
  • छान लेखन !किंमत प्रणाली हे…
    8 hours 12 minutes ago
  • तरी नशिब
    10 hours 13 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: चिनू१९८५
    नोंदणी: Wed, 03/25/2026 - 09:02
  • सदस्य: साधक भूषण
    नोंदणी: Mon, 03/23/2026 - 19:02
  • सदस्य: दीपक चकवे
    नोंदणी: Mon, 03/23/2026 - 11:07
  • सदस्य: भूषण तळवेलकर
    नोंदणी: Sun, 03/22/2026 - 23:18
  • सदस्य: Jayashree15
    नोंदणी: Sun, 03/22/2026 - 18:55
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा