खूब-रुयोंसे यारियाँ न गयी..
हसरत मोहानी.. मौलाना हसरत मोहानी हे भारतातले शायर. प्रेमाच्या शायरीसोबत भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात भाग घेणार्यांपैकी एक ठळक मनुष्य. सर्वात आधी "संपूर्ण स्वराज्या"ची मागणी करणार्यांपैकी एक. टिळकांच्या मतासारखी मागणी असलेला. लोकमान्य टिळकांचा खास समर्थक.
तुरुंगवास तर खूपच सोसलेला. तुरुंगातही बरंच काव्य केलेलं आहे. त्याच्या फ्रीडम फायटर या अंगापेक्षा आज आत्ता त्याची ही एक गझल इथे आठवण्याची इच्छा होतेय. सगळेच शेर नाही घेत इथे. थोडेसेच.. पण अगदी पुरेसे. यातली अर्थाची समजूत ही निव्वळ एक विशिष्ट एकट्याने ऐकताना झालेली समजूत आहे. शेर वेगवेगळ्या लोकांना खूप वेगळं काहीतरी सांगतात.. तीच तर त्यांची खुमारी. तेव्हा इतरांना काही वेगळा फ्लेवर सापडला तर मोअर द मेरियर..
...
खूब-रुयोंसे यारियाँ न गई
दिलकी बेइख्तियारियाँ न गई
खूबसूरत चेहर्यांशी, त्या सुंदर मुखड्यांशी जीव लावणं सुटलं नाही..
हृदयाचं, दिलाचं ओढाळपण सुटलं नाही..
अक्ल ए सब्र ए आश्नासे कुछ न हुआ
शौक की बेकरारियाँ न गई
संयम, धीर वगैरे सगळ्या सगळ्याची अक्कल असूनही काही उपयोग नाही झाला..
आस लागण्यातली, त्या आसुसलेपणातली बेचैनी सुटलीच नाही..
दिनकी सहरानवर्दियाँ न छुटी
शब की अख्तर शुमारियाँ न गई
दिवसाची माझी वाळवंटात तापत रखडत सरकणारी ती सफर चालूच राहिली, ती सफर सुटली नाही
आणि तरीही रात्रीचं माझं ते आसमानातले तारे मोजणं.. तेही सुटलं नाही.
थे जो हमरंग ए नाज उनके सितम
दिलकी उम्मीदवारियाँ न गई
तिचे अन्याय अन अत्याचार तिच्याच रंगरुपाचे होते..तिच्याच चेहर्याचे होते... तिच्यासारखेच..
पण.. हृदयाची, दिलाची त्या स्पर्धेतली उमेदवारी, आशा संपली नाही..
तर्ज ए मोमिनमें मरहबा हसरत
तेरी रंगीं निगारियाँ न गई
वा रे हसरत*.. देवाधर्माला कडक पाळून चालण्याच्या तुझ्या या नादात, तुझ्या या मार्गात..
तुझा रंगीबेरंगी नजरिया, हा रंगीलेपणा, ही तुझी रंगीबेरंगी शायरी मात्र सुटली नाही..
* खुद्द शायर
इथे ही "खूब-रूयोंसे" अवश्य ऐका.. दिल के पास जाऊन बसेल. गुलाम अलीसाहेबांची गायकी तर काय बोलावी. चार चांद.
चुपके चुपके रात दिन, आंसू बहाना याद है.. ही आणखी एक गजल. फारच जास्त प्रसिद्ध गझल आहे. किमान गजल ऐकणार्यांनीही ती एकदा ऐकलेली असते. तीदेखील हसरतसाहेबांनीच रचलेली आहे. त्याविषयी पुन्हा कधीतरी.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
क्या बात! बहोत खूब!
हायला
मस्त मस्त मस्त
इतरही शेर आपले आवडते असणारे
दारावर टक टक झाली असती तर
बाकी माझा पर्सनल फेवरेट अहमद
..वाह माशाल्ला..
वानगीदाखल अहमद फराज़ यांची एक
वाह!
आता अहमद फराज शोधणे आले! फक्त
बाकी माझा पर्सनल फेवरेट अहमद
बाकी माझा पर्सनल फेवरेट अहमद फ़राज़.हाथ मिलाईए जनाब.. , एकही कश्तीके सवार है हम... जाने किस बात पे उस ने मुझे छोड़ दिया है फ़राज़ ! मैं तो मुफलिस था किसी मन की दुआओं की तरह.. उस शक्श को तो बिछड़ने का सलीका नहीं फ़राज़! जाते हुए खुद को मेरे पास छोड़ गया अब उसे रोज सोचो तो बदन टूटता है फ़राज़.. उम्र गुजरी है उसकी याद नशा करते करते बे -जान तो मै अब भी नहीं फराज.. मगर जिसे जान कहते थे वो छोड़ गया.. जब्त ऐ गम कोई आसान काम नहीं फराज. आग होते है वो आंसू , जो पिए जाते हैं. क्यों उलझता रहता है तू लोगो से फराज. ये जरूरी तो नहीं वो चेहरा सभी को प्यारा लगे.वाह ! बहोत खूब ! वाह !
वाह.. माशाल्लाह..
मस्त धागा.एक अशीच साठवणीतली.
सहज सुंदर ! :)
चुपके चुपके
खरं सांगू ? मराठीत टाकले नसते
बहोत खूब
क्या बात!
अप्रतिम! नवीन गझलेची इतकी
नातवाँ - अशक्त, दुबळा
उर्दूचे आणि आमचे काही पटत नाही....
आम्ही आपले साध्या सरळ हिंदी
मग हिंदी सिनेमांबद्दल भरपूर "शिकवे" क्यूं? ;-)
सुंदर! खूब-"रुयोसे" ऐवजी खूब-
खाँसाहेबांनी 'खूब-रुयोसे'
दोन्हीही उच्चार बरोबर आहेत.
उर्दू लिपीचं ज्ञान मला नाही,
ती गायनातली सोय असावी माझ्या
तेच.. एक्झॅक्टली..
(+)
वा!
जुन्या लिन्क कुनाकदे आहेत का?