✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

शिकाम्बा-मशाम्बा

आ
आतिवास यांनी
गुरुवार, 02/19/2015 - 15:39  ·  लेख
लेख
कोणत्या गोष्टी कधी आठवतील, काही सांगता येत नाही. त्या दिवशी मी होते मॅक्वेन्जेरे (Macuenjere) नामक एका गावात. निमित्त होतं ‘स्कूल कौन्सिल’ प्रशिक्षणाचं. पालकांचा आणि पर्यायाने समाजाचा शिक्षणव्यवस्था सुधारण्यात सहभाग वाढावा, शाळेने कार्यक्रम आखताना आणि राबवताना समाजाचा सहभाग घ्यावा आणि या माध्यमातून “सर्वांसाठी (प्राथमिक) शिक्षण” हे उद्दिष्ट साध्य व्हावे असा मोझाम्बिक सरकारचा प्रयत्न. या स्कूल कौन्सिलमध्ये विद्यार्थी आणि विद्यार्थिनी प्रतिनिधी असतात, काही शिक्षक असतात आणि काही पालक. दर तीन वर्षांनी स्कूल कौन्सिलची निवडणूक होत असली तरी प्रत्यक्षात अनेक ठिकाणी वर्षानुवर्ष तेच लोक आहेत. पण तो आजचा विषय नाही. मुलींच्या शिक्षणाशी संबंधित एका प्रकल्पावर मी सध्या ‘स्वयंसेवक’ म्हणून काम करते आहे. त्यामुळे या कौन्सिलचं प्रशिक्षण पाहणं; त्याचा आढावा घेऊन त्यात योग्य ते बदल सुचवणं; ते अमंलात येतील हे पाहणं – हे माझं (अनेक कामांपैकी) एक काम. या गावात जाताना जेव्हा मुख्य रस्ता सोडून आम्ही उजवीकडे वळलो; तेव्हा डाव्या बाजूला ‘शिकाम्बा’ नामक नदीवर बांधलेलं धरण असल्याची आणि त्या धरणाला ‘शिकाम्बा लेक’ म्हटलं जातं अशी माहिती उत्साही सहका-यांनी दिली होती. “आज वेळ नाही आपल्याकडे, पण पुढच्या भेटीत जमवू आणि जाऊ थोडा वेळ तरी ‘शिकाम्बा लेक’ परिसरात” असंही आमचं आपापसात बोलणं झालं. त्यामुळे ‘शिकाम्बा’ शब्द मेंदूत रुजला. आज माझ्या सोबत स्थानिक एनजीओचे जे सहकारी आहेत, त्यांच्यातल्या कुणालाच इंग्रजी भाषा समजत नाही. त्यामुळे मी पोर्तुगीज भाषा किती आत्मसात केली आहे याची आज कसोटी आहे. प्रशिक्षण सुरु झालं आणि पहिल्याच मिनिटात माझ्या लक्षात आलं की मला स्थानिक लोकांचं ‘पोर्तुगीज’ नीटसं समजत नाहीये. चौकशी केल्यावर स्थानिक भाषा ‘शुटे’ (Chute) असल्याचं कळलं. मग लोक काय बोलतात ते मला पोर्तुगीजमध्ये अनुवाद करून सांगायची आणि माझं पोर्तुगीज लोकांना त्यांच्या भाषेत सांगण्याची जबाबदारी बेलिन्या आणि किटेरिया या दोघींनी घेतली आणि फार अडचणी न येता माझा लोकांशी संवाद सुरु झाला. लोक काय काम करतात; शेती आहे का; त्यात काय उगवतं; ते पुरतं का कुटुंबासाठी; कुणाकुणाच्या मुली या शाळेत आहेत; माध्यमिक शिक्षणासाठी मुली पुढे कुठे जातात; प्राथमिक शाळेतून मुलींची गळती मोठ्या प्रमाणात होण्याची कारणं; कुटुंबात साधारण किती लोक असतात; स्त्रियांचं आरोग्य ..... असंख्य प्रश्न. मी भारतीय असल्याचं त्यांना सुरुवातीलाच सांगितलं आहे मी; त्यामुळे (मी पाहुणी असल्याने) आमची मस्त चर्चा चालू आहे. एक सत्र संपून दुसरे सुरु होताना एखादा खेळ घ्यावा म्हणून बेलिन्या पुढे येते. पण स्थानिक स्त्रिया (ज्या स्कूल कौन्सिलच्या सदस्य आहेत) त्या बेलिन्याला थांबवतात आणि माझ्याकडे हात दाखवत काहीतरी म्हणतात – त्यावर सगळा समूह हसत तत्काळ सहमत होतो. मी प्रश्नार्थक नजरेने किटेरियाकडे पाहते. “भारतातल्या मुली खेळतात असा एखादा खेळ तुम्ही घ्या आमचा” अशी त्या लोकांची मागणी आहे. एक क्षण मी विचारात पडते. प्रशिक्षणात दोन सत्रांच्या मध्ये घेतले जाणारे हे खेळ छोटे आणि गमतीदार असतात. लोकांचा कंटाळा घालवायचा हाच त्याचा मर्यादित उद्देश असतो. आता इथं त्या खेळाचा अनुवाद करत बसले तर मजा जाणार. मला एकदम ‘शिकाम्बा लेक’ची आठवण येते. मी पुढं येते. सगळ्यांना गोलात उभे राहायला सांगते. ‘शिकाम्बा सगळ्यांना माहिती आहे का’ ते विचारते – अर्थात ते त्या सगळ्यांना माहिती असतं. मी जे शब्द बोलेन त्यानुसार कृती करायची हे मी समजावून सांगते आणि मग मी ‘शिकाम्बा’ शब्द उच्चारून पुढे उडी मारते. त्यांना समजतं; अनुवादाची गरज नाही. मग मी म्हणते ‘मशाम्बा’ आणि मागे उडी मारते. त्यांना समजतं; अनुवादाची गरज नाही. सगळे हसतात. मी ‘शिकाम्बा’ म्हटलं की सगळे पुढे उडी मारतात आणि मी ‘मशाम्बा’ म्हटलं की सगळे मागे उडी मारतात. खिडकीतून अनेक लहान मुलं कुतूहलाने पाहताहेत आमच्याकडं – विशेषत: माझ्याकडं! दोन चार उड्या झाल्यावर मी ‘मशाम्बा’ म्हणत पुढे उडी मारते ....अनेकजण माझं अनुकरण करतात. मग हास्याची एक लाट. आम्ही पुढे काही मिनिटं खेळतो. “शिकाम्बा–मशाम्बा” म्हणजे आपलं “तळ्यात-मळयात”. पोर्तुगीज भाषेत ‘मशाम्बा’ म्हणजे शेत. संध्याकाळी मी तिथून निघते तेव्हा शाळेचा आवारात काही मुलं “शिकाम्बा-मशाम्बा” खेळताहेत. लहानपणी मी ज्या गावात होते तिथल्या तळ्याची मला फार आठवण येते. आता लवकारात लवकर ‘शिकाम्बा लेक’ला जायला हवं....
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
लेखनप्रकार (Writing Type)
अनुभव

प्रतिक्रिया द्या
13072 वाचन

💬 प्रतिसाद (41)

प्रतिक्रिया

झक्कास!

सोत्रि
गुरुवार, 02/19/2015 - 16:10 नवीन
झक्कास! - (‘शिकाम्बा लेक’ला जायला हवं असं वाटू लागलेला) सोकाजी
  • Log in or register to post comments

भारी!!

अनुप ढेरे
गुरुवार, 02/19/2015 - 16:51 नवीन
भारी!!
  • Log in or register to post comments

तुमचं

तिमा
गुरुवार, 02/19/2015 - 19:46 नवीन
तुमचं नांव बघितलं की आपोआप धागा उघडला जातो. आणि कधीही निराशा होत नाही.
  • Log in or register to post comments

+११११११११११

चाणक्य
गुरुवार, 02/19/2015 - 23:06 नवीन
फुल सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा

बाडिस

सुनील
Fri, 02/20/2015 - 08:32 नवीन
बाडिस
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा

सहमत!!

पलाश
Fri, 02/20/2015 - 09:53 नवीन
सहमत!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा

+११११११११११११११११११११११११११

बॅटमॅन
Fri, 02/20/2015 - 22:45 नवीन
अगदी अगदी!!!!!!!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा

मस्त !

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 02/19/2015 - 20:18 नवीन
मस्त !
  • Log in or register to post comments

छान आयडिया.

रेवती
गुरुवार, 02/19/2015 - 21:00 नवीन
छान आयडिया.
  • Log in or register to post comments

स्स्स्सह्ही

अर्धवटराव
गुरुवार, 02/19/2015 - 22:35 नवीन
:)
  • Log in or register to post comments

मस्त

पिरतम
गुरुवार, 02/19/2015 - 23:21 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments

सुंदर!

रुपी
Fri, 02/20/2015 - 01:00 नवीन
सुंदर!
  • Log in or register to post comments

(No subject)

आनन्दिता
Fri, 02/20/2015 - 01:10 नवीन
:)
  • Log in or register to post comments

मजेशीर !

पहाटवारा
Fri, 02/20/2015 - 02:06 नवीन
काहि व्यक्तींच्या अनुभव्-विश्वात डोकावल्यावर असे वाटते की कधीतरी हे असे आपल्यालाहि अनुभवयाला मिळावे .. तुमचे लेख वाचून असे जरा जास्तच वेळा वाटते :) -पहाटवारा
  • Log in or register to post comments

+ १

स्रुजा
Fri, 02/20/2015 - 02:17 नवीन
लेख पण मस्त नेहेमेप्रमाणेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पहाटवारा

पहाटवारा +१

गवि
Fri, 02/20/2015 - 14:54 नवीन
पहाटवारा +१ या ताईंचं अनुभवविश्व, तदनुषंगिक भटकंती, संवेदनशीलता असं सर्व पाहून सर्वाधिक हेवा वाटतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पहाटवारा

लेख आवडलाच नेहेमीप्रमाणे!

अजया
Fri, 02/20/2015 - 07:17 नवीन
मनात शिकाम्बा मशाम्बा सुरु आहे एका कामावरुन!
  • Log in or register to post comments

मस्त लेख...

मुक्त विहारि
Fri, 02/20/2015 - 07:31 नवीन
आवडला....
  • Log in or register to post comments

मस्त.... आवडला. लहानपणी

ज्योति अळवणी
Fri, 02/20/2015 - 09:16 नवीन
मस्त.... आवडला. लहानपणी खेळलेले खेळ आणि त्याला तुम्ही ज्या सहजतेने गुफलत ते अप्रतिम
  • Log in or register to post comments

मस्त....

जेम्स बॉन्ड ००७
Fri, 02/20/2015 - 09:25 नवीन
मस्त....
  • Log in or register to post comments

किती मस्त

सविता००१
Fri, 02/20/2015 - 11:14 नवीन
सुंदर लिहिलंय. नेहमीप्रमाणेच. किती दिवसांनी तळ्यात-मळ्यात आठवलं.!
  • Log in or register to post comments

निव्वळ अप्रतिम..

गवि
Fri, 02/20/2015 - 11:29 नवीन
निव्वळ अप्रतिम..
  • Log in or register to post comments

सुरेख अनुभव

मित्रहो
Fri, 02/20/2015 - 12:12 नवीन
सुरेख अनुभव आणि सुरेख लेख नेहमीप्रमाणे.
  • Log in or register to post comments

धागांम्बा आवडुंबा !

मदनबाण
Fri, 02/20/2015 - 12:13 नवीन
धागांम्बा आवडुंबा ! :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- HTTP/2 finished, coming to browsers within weeks HTTP/2 Frequently Asked Questions
  • Log in or register to post comments

वाह!

एस
Fri, 02/20/2015 - 12:19 नवीन
मनातल्या मनात त्या शिकाम्बा धरणात डुंबून आलोपण जरासा.
  • Log in or register to post comments

समयसूचकता

प्रियाजी
Fri, 02/20/2015 - 14:27 नवीन
अतिवास, तुमची समयसूचकता खूपच आवडली. अजून अनुभव वाचायला आवडतील.
  • Log in or register to post comments

झकास...मस्त...

ज्ञानोबाचे पैजार
Fri, 02/20/2015 - 15:05 नवीन
नेहमीप्रमाणेच आवडले. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

क्या बात!!!!!!!!! बाकी ही

बॅटमॅन
Fri, 02/20/2015 - 22:44 नवीन
क्या बात!!!!!!!!! बाकी ही नावं एकदम आफ्रिकनछाप आहेत खरी. :)
  • Log in or register to post comments

“शिकाम्बा–मशाम्बा” मनातल्या

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 02/20/2015 - 23:49 नवीन
“शिकाम्बा–मशाम्बा” मनातल्या मनात खेळून मोगँबो खुश हुवा :)
  • Log in or register to post comments

आवडले.

सन्दीप
Sat, 02/21/2015 - 13:09 नवीन
आवडले.
  • Log in or register to post comments

मस्तच

विनिता००२
Sat, 02/21/2015 - 14:08 नवीन
मस्तच
  • Log in or register to post comments

मस्त!

जे.पी.मॉर्गन
Tue, 02/24/2015 - 11:10 नवीन
आवडलं! जे.पी.
  • Log in or register to post comments

मस्त लेख आहे.

विजुभाऊ
Tue, 02/24/2015 - 11:45 नवीन
मस्त लेख आहे. तोत्तोचान ची आठवण आली
  • Log in or register to post comments

आवडला

स्नेहल महेश
Tue, 02/24/2015 - 11:55 नवीन
मस्त लेख...
  • Log in or register to post comments

तुमच्या धाग्यांचा खुप

राशी
Tue, 02/24/2015 - 20:28 नवीन
तुमच्या धाग्यांचा खुप आधीपासुन पंखा आहे. परंतु काही कारणास्तव फक्त वाचक होते मिसळपाव वर. आता सदस्य व्हायचे ठरवले आणि प्रतिक्रिया द्यायला मिळाले.
  • Log in or register to post comments

प्रतिसाद...

जेपी
Tue, 02/24/2015 - 20:38 नवीन
प्रतिसाद... . . . . . .देऊ . . .की नको ..!! . . . .देऊ !! . . . .की नको..!! . . . देऊ..!! . . . .की नको.. . . . . .देतो..!! ..आवडल. :-)
  • Log in or register to post comments

शिकाम्बा - मशाम्बा

बोका-ए-आझम
Wed, 09/16/2015 - 14:29 नवीन
असं तुमच्या लेखाबद्दल कधीच होत नाही. मस्त लेख!
  • Log in or register to post comments

मस्तच!

मांत्रिक
Wed, 09/16/2015 - 14:30 नवीन
मस्तच!
  • Log in or register to post comments

हाहा!

पैसा
Wed, 09/16/2015 - 14:33 नवीन
मस्त आहे! मी गावाला असताना हा लेख वाचायला राहिला वाटतं!
  • Log in or register to post comments

कमाल आहे

रमेश आठवले
Wed, 09/16/2015 - 22:56 नवीन
स्थानिक भाषेच्या तुटपुंज्या सरावाचा इतका छान उपयोग ! कौतुक आणि अभिनंदन.
  • Log in or register to post comments

:)

माहितगार
Wed, 09/16/2015 - 23:07 नवीन
:)
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा