मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गलित आहे गात्र अजुनी

चिमिचांगा · · जनातलं, मनातलं
कविवर्य सुरेश भटांच्या फेमस आव्हानाला समस्त पुरुषजातीचे उत्तर... तरुण आहे रात्र अजुनी राजसा निजलास का रे ? एवढ्यातच त्या कुशीवर तू असा वळलास का रे ? अजुनही विझल्या न गगनी तारकांच्या दीपमाला अजुन मी विझले कुठे रे ? हाय ! तू विझलास का रे ? सांग, ह्या कोजागरीच्या चांदण्याला काय सांगू ? उमलते अंगांग माझे आणि तू मिटलास का रे ? बघ तुला पुसतोच आहे पश्चिमेचा गार वारा रातराणीच्या फुलांचा गंध तू लुटलास का रे ? उसळती हुदयात माझ्या अमृताच्या धुंद लाटा तू किनार्‍यासारखा पण कोरडा उरलास का रे ? *************************************** गलित आहे गात्र अजुनी, लाडके अवधी जरा दे एवढ्यातच पुनर्प्रत्यय मागशी, देऊ कसा गे? अजुनही विझल्या न गगनी तारकांच्या दीपमाला अजुन उरली रात्र अवघी, का न धरीशी धीर जरा गे? बघ अजून पुसतोच आहे पाठीवरचा घाम सारा कोरडा पडला घसा अन् प्राणही कंठाशी आले सांग, ह्या आतुरल्या मुखचंद्रम्याला काय देऊ? सुकून गेले ओठ, आता थोडका 'सूकून' दे गे प्रेमरंगी खेळता, घाई सखे नाही बरी गे दोन डावां अंतरी, थोडीतरी टँप्लिज दे गे - कवि चिमिचांगेश खट

वाचने 7169 वाचनखूण प्रतिक्रिया 31

टिल्लू Sun, 02/08/2015 - 00:40
छान. बाकी ते "गे" मूळे या विडंबनाला एक गुढ अर्थ आला आहे. :)

In reply to by टिल्लू

चिमिचांगा Sun, 02/08/2015 - 06:33
छान. आता 'दे मला गे चंद्रिके प्रीती तुझी' चा भावार्थ सांगा पाहू!

शेवटच्या दोन ओळीनी गहिवरून आलं ! एकच डाव पण झकास झाला तर कशाला ट्यामप्लीज लागेल म्हणतो मी ? -दिलीप बिरुटे

अर्धवटराव Sun, 02/08/2015 - 08:46
नायिका आपल्या मृत पतिच्या शवासमोर हे गाणं म्हबते आहे. गात्र शांतच झाली आहेत... नेहमीकरता.

In reply to by पाषाणभेद

किंवा असलेल्याचं एखाद्या प्लेयराची समस्तं लक्षणे ओसंडुन व्हात आहेत असही म्हणु शकताय =))

hitesh Sun, 02/08/2015 - 10:44
तुमचे हे कवितेचे गात्र चुकीच्या सेक्शनात का खुपसलेत? काव्य विभागात खुप्सा

कदचीत आवडणार नाही, पण यात बराच सत्यांश आहे. तरुण भार्या आहे अपुली, राजसा विसरलास का रे? घरी आला जरी तरी तू, संगणकी, बुडलास का रे ? अजुनही लागला नसे रे, वंश दिप घरात अपुल्या, कुचक्या त्या टोमण्यांना, सामोरी जाउ कशी रे? सांग त्या शेजारणीला, उत्तरे मी काय देउ? रोज म्हणते तीन वेळा, अन तुझा महिनाच का रे? बघ कशा पडल्याच आहे, प्रोटीन एक्सच्या रिक्त शिश्या एवढे रिचवुन सारे, अल्पसा सहवास का रे? उसळती हृदयात माझ्या, मातृत्वाच्या उंच लाटा, ही मनिषा पूर्ण करण्या, साथ तू, देशील का रे? पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

@सांग त्या शेजारणीला, उत्तरे मी काय देउ? रोज म्हणते तीन वेळा, अन तुझा महिनाच का रे?>>> =)) __/\__ =))

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

चिमिचांगा Sun, 02/08/2015 - 20:04
रोज म्हणते तीन वेळा, अन तुझा महिनाच का रे
*lol* बहुधा प्रोटीन एक्सचं खत घालूनही घरच्या झाडाची फळं शेजारणीच्या अंगणात पडत असावीत ;)

चौकटराजा Mon, 02/09/2015 - 06:05
एकंदरीत कोणतेही " एक्स" न घेता सगळे जे काही वर सुटलेयत त्यामुळे हसून हसून मेलो .

बाबा पाटील Mon, 02/09/2015 - 14:00
शिलाजित मकरध्वज बरोबर जायफळ टाकुन दुध घ्या रे,गात्र परत जागेवर येतील. (** अधिक माहिती हवी असल्यास तपासणी फी द्यावी लागेल.)*blum3* :-P :P :-p :p +P =P +p =p :-b :b +b =b :tongue: