मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

छायाचित्रणकला: स्पर्धा क्र. ७: शांतता

संपादक मंडळ · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा क्र. ७: "शांतता" http://www.misalpav.com/node/28571 http://www.misalpav.com/node/28729 http://www.misalpav.com/node/28931 http://www.misalpav.com/node/29297 http://www.misalpav.com/node/29690 http://www.misalpav.com/node/29884 ******************************************** नमस्कार मंडळी! ६ वी स्पर्धा स्वॅप्स यांनी अत्यंत यशस्वीपणे आयोजित केल्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद! आता पुढच्या काही स्पर्धा पुन्हा जुन्या फॉर्मॅटप्रमाणे घेऊ आणि मग पुन्हा एखाद्या जाणकार मिपाकरांना स्पर्धा आयोजित करायची विनंती करू. यावेळच्या स्पर्धेसाठी विषय आहे "शांतता". ही संकल्पना केंद्रस्थानी असलेली तुमची छायाचित्रे येऊ द्यात इथे! प्रत्येक स्पर्धकाला एकच प्रवेशिका देता येईल. प्रवेशिका पाठवण्याची मुदत आजपासून १५ दिवस. दिनांक १५ फेब्रुवारी २०१५ पर्यंत स्पर्धक आपल्या प्रवेशिका पाठवू शकतील. इतर सर्व नियम पहिल्या ५ स्पर्धांप्रमाणेच राहतील. सर्वच स्पर्धकांना आणि सहभागीं मंडळींना शुभेच्छा! ************************************* (एक विनंती: खूपच सुंदर छायाचित्रे येत आहेत. मात्र निसर्गचित्रांमधे शांतता खूप सहज सापडते. अजून काही कल्पक विषय हाताळावेत अशी सर्वांनाच विनंती.)

वाचने 76713 वाचनखूण प्रतिक्रिया 149

बेमिसाल गुरुवार, 02/05/2015 - 00:12
shantataa खरोखर शांतता छाया चित्रणा मध्ये टिपणे अवघड्च काम आहे. माझाही एक छोटा प्रयत्न.......... हे प्रचि एका तळ्या काठ्च्या आरस्पानी शांततेचे आहे.झाडांची आणि लता मंडपाची प्रतिबिंबे ही स्थिर आहेत.निरव शांतता असेही म्हणता येइल...[अमेरिकेतिल विखॉम पार्क मधिल]

कहर गुरुवार, 02/05/2015 - 09:08
*lol* *LOL* :-)) :)) =)) +)) :-))) :))) :lol: http://m.mensxp.com/special-features/today/22621-11-annoying-things-every-amateur-photographer-does-on-facebook.html *dash1* *DASH* *WALL*

सस्नेह गुरुवार, 02/05/2015 - 13:31
१. कास पठारवरील शांत एकांत अ २. सज्जनगडावरून उरमोडीच्या पाण्याकडे पहातानाची समाधी. अ

वेल्लाभट Fri, 02/06/2015 - 11:24
(एक विनंती: खूपच सुंदर छायाचित्रे येत आहेत. मात्र निसर्गचित्रांमधे शांतता खूप सहज सापडते. अजून काही कल्पक विषय हाताळावेत अशी सर्वांनाच विनंती.)
प्रवेशिका बदलता येईल का? एका स्पर्धकाची एकच प्रवेशिका हवी हा नियम असल्याने 'आणखी एक देता येईल का?' असं विचारत नाही :) असल्यास विचार करता येईल थोडा.

In reply to by पैसा

वेल्लाभट Sat, 02/07/2015 - 14:33
नमस्कार, आयोजकांनी सुचवल्यावर विषयाचा आणखी वेगळा विचार केला. त्यापरत्वे माझी एक फेर प्रवेशिका इथे टाकत आहे. ही ग्राह्य धरावी अशी आयोजकांना विनंती आहे. राग, उद्वेग, संताप, कंटाळा, किंवा आनंद, उत्साह, या आणि अशा सगळ्या भावनांना न्यूट्रलाईझ करण्याचा माझा मार्ग लक्षण आवाजाचं असलं तरी परिणाम 'शांतता' हा असतो. aa एक्झिफ कॅमेरा - कॅनन ईओएस ७०डी एफ ४ १/२५ आयएसओ ६४०० फोकल लेन्ग्थ २८ एमएम

sagarparadkar Fri, 02/06/2015 - 15:17
स्वित्झर्लंड मधील अपेंत्सेल गावातील एक शांत रस्ता ..... Peaceful Road in Appenzel, Switzerland एक निवांत स्थळ …. अपेंत्सेल A Relaxing point behind Appenzeller Cheese Factory, Appenzel, Switzerland अपेंत्सेल जवळील एग्गली येथील निवांत डोंगर वाट .... A beautiful walk in Eggli Hillock

विशाखा पाटील Fri, 02/06/2015 - 21:50
'तुजसाठी मरण ते जनन मरण ते जनन तुजवीण जनन ते मरण जनन ते मरण' इथे काळ्या पाण्याची शिक्षा भोगणाऱ्या हजारो स्वातंत्र्यसैनिकांच्या सोबतीला वर्षानुवर्ष फक्त शांतता होती. photo photot (क्लिक केलं की फोटो निघतो एवढ्या ज्ञानाच्या जोरावर काढलेले फोटो. :) )

स्रुजा Sat, 02/07/2015 - 09:35
वरचा प्रतिसाद उडवा प्लीज. मला त्यात फोटो नीट टाकता आलेले नाहीत. एका सदस्याला किती फोटो देता येतात? ek katar wel कातर वेळ ajun ek शांत सुखावणारा सुर्यास्त

In reply to by इशा१२३

असंका Sat, 02/07/2015 - 15:45
कायतरी खुस्पट काढता येतंय का म्ह्णून बघत होतो, तोवर आपली प्रवेशिका (+ प्रस्तावना) फारच अपील व्हायला लागली आहे.... चांगली कल्पना!!

In reply to by मिनियन

श्रीरंग_जोशी Mon, 02/09/2015 - 00:30
वर चित्र प्रकाशित करण्यासाठी जो दुवा वापरला आहे तो गुगल ड्राइव्ह वरून शेअर करण्यासाठी वापरला आहे. त्याऐवजी त्या चित्रावर राइट क्लिक करून Copy Image URL केल्या हा दुवा मिळतो. त्याने चित्र दिसू शकेल. चित्र खरंच खूप सुंदर आहे. संपादक महोदय वरच्या चित्रात हा दुवा वापरावा. अधिक मार्गदर्शन - मिसळपाव वर फोटो कसा चढवावा?

प्रभाकर पेठकर Mon, 02/09/2015 - 01:48
सगळीच छायाचित्र उल्लेखनिय आहेत. हमखास शांतता अनुभवण्याचे ठिकाण म्हणजे एखदे स्मशानगृह, कबरस्थान इ. असे एकच छायाचित्र आलेले आहे. दुर्दैवाने त्यात शांतता प्रतित होत नाहीए. वेगळी वेळ, छायाप्रकाशाचा वेगळा खेळ कॅमेरात पकडता आला असता तर छायाचित्र जास्त परिणामकारक झाले असते. दर्‍याखोर्‍यातही अतीव शांतता अनुभवास येते. तिथेही पहाटे पहाटे नुकतीच सुर्यकिरणे दरीत उतरतानाचे छायाचित्र अतिशय 'शांत' वाटेल. फार फार वर्षांपूर्वी (म्हणजे माझ्या तरूणपणी) खंडाळ्याला रात्री २-२.३० वाजता, बर्‍यापैकी अपेयपान झाल्या नंतर आम्हा ४-६ मित्रांना भटकण्याची इच्छा झाली. बाहेर मस्त थंडी आणि मनांत खोलवर उतरणारी शांतता पसरली होती. घाटात कुठल्यातरी एका वळणावर आम्ही आपापसात कांहीही न बोलता धुम्रकाड्यांचा आनंद उपभोगत बसलो असताना खाली खोल कुठेतरी, डोंगराच्या पायथ्याशी एका सुनसान गावातल्या अशाच एखाद्या पडक्या देवळात टाळ मृदुंगाच्या आवाजात भजन सुरु होते. आवाज इतका क्षीण होता की आम्हाला फार शांत बसावे लागले. आपल्या श्वासोच्छ्वासाचाही आवाज येऊ न देता ऐकल्यावरच तो आवाज ऐकू येत होता. अंतर कित्येक किलोमिटर्सचे होते. पण त्या शांत वातावरणाने अंगावर रोमांच उभे केले होते. गुलजार ह्यांचे दिल ढुंडता है फिर वहीं ... गाण्यातील हे शब्द फारच बोलके आहेत. 'बर्फिली सर्दियोंमे किसीभी पहाड पर, वादीमें गुंजती हुवी, खामोशीयां सुने.......'

In reply to by प्रभाकर पेठकर

असंका गुरुवार, 02/12/2015 - 12:01
हमखास शांतता अनुभवण्याचे ठिकाण म्हणजे एखदे स्मशानगृह, कबरस्थान इ. असे एकच छायाचित्र आलेले आहे. दुर्दैवाने त्यात शांतता प्रतित होत नाहीए. वेगळी वेळ, छायाप्रकाशाचा वेगळा खेळ कॅमेरात पकडता आला असता तर छायाचित्र जास्त परिणामकारक झाले असते.
अगदी माझ्या मनातलं बोल्लात....एक शब्द इकडचा इकडं नाही.

In reply to by असंका

किल्लेदार गुरुवार, 02/12/2015 - 18:30
ब्बारं......बुआ....शोधतो असेल तसा एखादा तर.... बाकी स्मशानात बरेचदा गेलो असलो तरी कॅमेरा घेऊन जायचा योग कमीच.... *pleasantry*

मोहन Mon, 02/09/2015 - 10:17
आयोजकांच्या सूचनेनुसार माझी ही प्रवेशिका कृपया ग्राह्य धरण्यात यावी. कसदार गायकाने तानपुर्याच्या साथीने लावलेला एखादा सच्चा सूर देखील शब्दातीत शांततेची अनुभूती देऊ शकतो , .... गायकाला आणि श्रोत्यांनाही ! shaantata 2

अजून एक प्रचि (स्पर्धेसाठी नाही) शक्यतो अशा प्रसंगी प्रचंड कोलाहल असतो. पण कधीकधी एखादी वेळ अशीही येते. त्रिवेंद्रमच्या कोवलम बीचवर टिपलेले हे छायाचित्र. ३०-४० कोळी बांधव समुद्रात जाळे टाकतात. अतिशय जोरजोराने ओरडत, गाणी म्हणत हे जाळे समुद्रातून बाहेर ओढून काढले जाते. पण कधी-कधी अशीही परिस्थिती येते की या जाळ्यात एकही मासा सापडत नाही. ही परिस्थिती अतिशय अपवादात्मक असते. अशाच एका वेळी जाळ्यात एकही मासा न सापडल्याने अचानक एक प्रकारची विलक्षण शांतता निर्माण झालेली होती. सुन्न झालेले कोळी बांधव त्या रिकाम्या जाळ्याकडे बघत उभे होते. माझ्याही नकळत मी तो क्षण टिपला... kovalam

पिलीयन रायडर Tue, 02/10/2015 - 15:11
अरे सगळेच फोटो निसर्गाचे आहेत... कुणी तरी तर वेगळं काही तरी द्या ना.. जसं की स्पा ची प्रवेशिका.. फोटॉमध्येच शांततेची कहाणी कळतेय.. पण बाकी सगळे फक्त निसर्गचित्रच टाकत आहेत..

कपिलमुनी गुरुवार, 02/12/2015 - 11:20
इतक्या सुंदर फोटोंच्या स्पर्धेत नाही पण सहभाग म्हणून कॅमेरा :पाँईट टू शूट भंडारदरा डॅम : bhandardara कोणे एके काळचा नागाव बीच nagav मैत्री : ४ जिवलग एकत्र असताना शांत बसून मूक संवाद साधत असतात . friends प्रवेशिका म्हणून ३ रा फोटो ( कारण तो आवडता आहे ;) ) !

खेडूत Fri, 02/13/2015 - 20:13
चिमण्या गेल्यायत बागडायला तेव्हढीच थोडावेळ इथे शांतता !! A