अत्तरायण..! भाग - ३
लेखनप्रकार
अत्तरायण..! भाग - १
अत्तरायण..! भाग - २
आठ वर्षापूर्वीची घटना..
गणपतिचा पहिला दिवस..
नेहमीप्रमाणे मी माझ्या पहिल्या कामाच्या ठिकाणी पोहोचलो. आणि काम अवरल्यावर आलेला चहा पीत असताना,त्या यजमानानी मला "गुरुजी हात पुढे करा!" असं फर्मावलं. मी आपला मनात,'आज यांना काहि खटकलय कि काय?' 'अथर्वशीर्ष तर सावकाशच म्हटलं होतं' वगैरे बाळबोध आत्मशंका घ्यायला लागलो. पण नंतर त्यानी माझ्या हतावर जे लेपन केलं.त्यानंतर मी चहा विसरलो,पुढचं काम्,त्यादिवशीचा डोक्यात मॅच करत ठेवलेला आकडा(अर्थातच दक्षिणेचा ;) )..इत्यादी सगळं विसरलो.आणि त्या वासातच गूं.....................ग झालो. अंतरमनाला असा काहि तरल पण तितकाच सलग करंट बसत गेला,की वाटायला लागलं,ह्या पहाटेच्या शांत वेळी एखाद्या पुराणोक्त कादंबरी मधे वर्णन केल्याप्रमाणे निसर्गानी वेढलेल्या शां...........त तळयाकाठी एखाद्या देवालयात ह्या गणपतिचे मुदाकरात्त मोदकं..सारखं स्तोत्र मन भरेपर्यंत म्हणत बसावं.आजचा दिवस हेच कमवावं. आह्हाह्हाह्हा...काय अजब मोहिनी त्या वासाची! शेवटी कडेनी त्या काकूंनी मला, "गुरुजी.........अहो तुंम्ही ह्यांच्या ह्या अत्तरांच्या नादात नका र्हाऊ,अख्खा दिवस इथेच र्हाल नायतर!" असं मला वास्तवात-आणणारं वाक्य टाकलं.आणि मला (तात्पुरत) भानावर आणलं. डोळे उघडले,तसे आमचे हे (आमच्या इतकेच :D ) अट्टल यजमान्,गड जिंकल्याच्या आविर्भावात फक्त कस्तुरीहीना असं म्हणाले. मी त्या शब्दानीही त्या वसा इतकाच किंबहुना काहिसा अधिक मोहित झालो.
मग त्या दिवशीचे सगळे गणपती त्याच करंट मधे बसविले. एक दोन यजमानांनी "गुरुजी..काय लगिन वगैरे ठरलं काय???" असंही विचारलं. इतका त्याचा असर,त्या दिवशी जास्ती होता माझ्यावर. मला हीना माहित होतं. किंबहुना पूर्वी म्हटल्याप्रमाणे वो मेरा पेहेला प्यार है। पण आज त्याला पेहेला प्यार म्हणत असेन्,तर याला पेहेला नशा म्हणावस वाटतं! आणि नशेची सुरवात नावापासून आहे..कस्तुरीहीना!!!
तसं ह्या अत्तराचं बाजारातलं नाव मुश्कहीना
.
फोटो:-अं.जा.साभार.
कदाचित मी पूर्वी कधी त्याचा वास घेतलाही असेल. पण आमच्या ह्या यजमानानी ते ज्या व्यक्ति कडून घेतलं होतं त्या व्यक्तिनी त्याच्या काँबिनेशन मधे काहितरी स्पेशल जादू तरी केलेली आहे.किंवा खास अपना टच तरी निर्माण केलेला आहे.असं मी खात्री पूर्वक म्हणू शकतो. ( मी ज्यांना आधीच्या लेखात,माझे अत्तरगुरु म्हणालो तीच ही व्यक्ति!) आमच्या एका अगदी अट्टल हीनाप्रेमी मित्रालाही मी जेंव्हा हे अत्तर लावलं.तेंव्हा तो ही असाच वेडा झाला होता.
काय आहे की आधी कस्तुरी ही वासांची राणी म्हटली पाहिजे. (लैच्च गोग्गोड वास हो तिचा...हाsssय! ) मी कस्तुरीचा वास पहिल्यांदा घेतला(खरं तर आला म्हणायला पाहिजे.) तो त्या नगरच्या पाठशाळेत असतानाच. तिथे दत्त पादुकांवर जो नित्य अभिषेक व्हायचा त्यात केशर आणि कस्तुरीचं मिश्रण असायचं. एकदा आंम्ही सकाळच्या पाठाला बसलेले असताना. अचानक हा वास अक्षरशः वार्यावर यायला लागला.आणि आमच्यातल्या एक जुन्या विद्यार्थ्यानी,त्या कस्तुरी विकणार्या माणसाचं नाव एकदम मोठ्ठ्यांदी घेतलं. बाहेर जाऊन त्याला 'वरती ये' असंही म्हणाला. एका चामड्याच्या बॅग मधून त्यानी १०/१२ कस्तुरी बाहेर काढल्या.
फोटो:-अं.जा.साभार.
तोपर्यंत आमचा अख्खा हॉल दरवळायला लागला होता. तो वास माझ्या अजुनंही स्मरणात आहे. पुढे मी जेंव्हा कस्तुरी, अत्तरं स्वरुपात पाहिली,तेंव्हा मला त्या सुगंधाशी याची तूलना नाही करता आली. पण नंतर मी जेंव्हा औषधी स्वरुपातला कस्तुरीचा अर्क पाहिला ,तब बात कुछ अलग बनी। गुर्हाळात जसा त्या कढणार्या रसाचा एक मंद गो..ड वास येतो. तसं ह्या कस्तुरी अर्काचं आहे.अतिशय गो...........ड सात्विक जादूई सुवास. त्या अर्काचं आणी हीनाचं संमिश्रण म्हणजे कस्तुरीहीना.
अता मूळात हीना हा मोह्,आणि कस्तुरी ही जादू! मग मोह आणि जादू एकत्र झालं तर काय होतं???? नशा!!!
कोणाला खरं वाटो न वाटो..पण माझ्यासाठी ह्याचा सुगंध म्हणजे एक नशाच आहे. वेड लावणारी नशा!
खुषरंगहीना.... कस्तुरीहीना!
======================
क्रमशः
वाचने
14565
वाचनखूण
प्रतिक्रिया
32
मस्त हे गुरुजी...
ऐसी अत्तरे रसिके मेळवीन!आज
मस्त...
छान लिहिलंय.
In reply to छान लिहिलंय. by प्रचेतस
वल्ली जी पैसे घेतले का हो
In reply to वल्ली जी पैसे घेतले का हो by आनन्दिता
हो ना. पक्के पुणेकर आहेत ते.
In reply to हो ना. पक्के पुणेकर आहेत ते. by प्रचेतस
छ्या बाबा !! मित्र नसावे तर
In reply to छ्या बाबा !! मित्र नसावे तर by आनन्दिता
@मित्र नसावे तर अशे!! >>>
In reply to छान लिहिलंय. by प्रचेतस
मस्क हीना उग्र नाहीये. अहाहा
मस्त!
छान लिहिलय. आवडलं!
माझ्यासाठी ह्याचा सुगंध
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Who Will Get Caught When The Oil Debt Bubble Pops? Grow Your Way Out of Debt? Don’t Make Us Laugh…In reply to माझ्यासाठी ह्याचा सुगंध by मदनबाण
@पुढचा भाग कोणत्या अत्तरावर ?
In reply to माझ्यासाठी ह्याचा सुगंध by मदनबाण
@असं ऐकुन आहे की कस्तुरी
In reply to @असं ऐकुन आहे की कस्तुरी by अत्रुप्त आत्मा
अज्जुन पण कस्तूरी मिळते का?
In reply to अज्जुन पण कस्तूरी मिळते का? by मुक्त विहारि
नक्की माहित नाही... US $ 45
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Who Will Get Caught When The Oil Debt Bubble Pops? Grow Your Way Out of Debt? Don’t Make Us Laugh…In reply to नक्की माहित नाही... US $ 45 by मदनबाण
हे हरिण हा गंध कुठुन येतो
हे हरिण हा गंध कुठुन येतो त्याचा शोध घेत बसते आणि याचा त्याच्या खाण्या-पिण्यावर सुद्धा परिणाम होतो असे म्हणतात...या गंधाचा उपयोग त्या हरिणाला त्याच्या मालकी हक्काच्या जागेची आखणी करण्यासाठी आणि माद्यांना आकृष्ट करण्यासाठी होतो.In reply to अज्जुन पण कस्तूरी मिळते का? by मुक्त विहारि
कस्तुरीचा भाव
सुंदर
सुन्दर.
हा भाग खासच रंगलाय... नाही
In reply to हा भाग खासच रंगलाय... नाही by डॉ सुहास म्हात्रे
@ 'मिट्टी'का नंबर कब आयेगा ?
कस्तुरी हीना....आहाहा!!
खूपच छान!
In reply to खूपच छान! by पैसा
मदनबाण,इस्पीकचा एक्का
In reply to मदनबाण,इस्पीकचा एक्का by अत्रुप्त आत्मा
आणखी एक बोरकर
In reply to आणखी एक बोरकर by पैसा
@कदाचित त्यांना मित्र म्हणावे
मुश्क हीना प्रमाणेच मुश्क
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Russia to bail out Trust Bank with up to $530 million Ruble Swap Shows China Challenging IMF as Emergency Lender Moody's: Ukraine's economic downturn and deteriorating public finances raise likelihood of bond restructuring next year China Local Debt Crisis Spells Global Opportunity in 2015In reply to मुश्क हीना प्रमाणेच मुश्क by मदनबाण
@मुश्क हीना प्रमाणेच मुश्क
एक शंका....
In reply to एक शंका.... by मुक्त विहारि
इथे यानबुला पण अत्तरे मिळतात.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Russia to bail out Trust Bank with up to $530 million Ruble Swap Shows China Challenging IMF as Emergency Lender Moody's: Ukraine's economic downturn and deteriorating public finances raise likelihood of bond restructuring next year China Local Debt Crisis Spells Global Opportunity in 2015चक्क रसिक माणसाला चोर ठरवल