ये रे माझ्या मागल्या........
"माझं ऐक - बोलिंग घे..... ओव्हरकास्ट आहे". २७५ शनिवार पेठ पुणे ह्या ठिकाणी बिल्डिंगच्या मध्ये असललेल्या साधारण ५० X १५० फुटी फर्शीच्या मैदानवर पिवळ्या स्मायलीच्या बॉलनी खेळताना ते ढोपरायेवढं कार्टं आपल्या गुडघ्यायेवढ्या कॅप्टनला सूचना करत होतं. आता त्या शेंबड्या पोराच्या ह्या आगावपणामध्ये त्याच्या (मुद्दामच उल्लेख केलेल्या) राहत्या ठिकाणाने दिलेल्या जन्मसिद्ध अधिकाराइतकाच वाटा होता आजकाल सगळीकडूनच मिळणार्या क्रिकेटच्या ज्ञानाचा! लहान असताना रबरी चेंडू प्यांटवर आम्हीदेखील घासला होताच... पण ह्यांचे म्हणजे नेणत्याचे घासणे | "वन लेग स्टंप" गार्ड काय घेतील..... चार पोरांच्यात फील्ड पोझिशन्स काय बघतील......"कॅप्टन" मिडऑनला काय उभा राहील... काही विचारू नका. "कुंबळेच्या अॅक्शनपेक्षा वॉर्नच्या अॅक्शननी स्पिन जास्त होतो" हे देखील ह्यांना कळतं....ड्राईव्ह करताना बॉटम हॅन्ड सैल सोडला नाही तर कॅच उडू शकतो हे ही कळतं. सांगायचं काय..... की ही पिढी अक्षरशः क्रिकेट कोळून प्यायलेली आहे.
आता जरा मुद्द्यावर येऊ. ढगाळ वातावरणात बॉल स्विंग होतो जे जर शनिवार पेठेतल्या त्या ढोपराएवढ्या शेंबड्या क्रिकेट तज्ञाला कळतं तर पिचकडून काही सहाय्य मिळत नसताना बोलर्सनी जास्त घाम गाळायला हवा.... खांद्यातून जास्त जोर लावून त्याच टप्प्यावरून बॉल जास्त बाउन्स करावा.... आपला बोलिंगचा वेग सतत कमी-जास्त करून बॅट्समनला सेटल होऊ देऊ नये...... त्याचबरोबर विचित्र आणि आक्रमक क्षेत्ररचना करून फलंदाजाची एकाग्रता भंग करण्याचा प्रयत्न करावा ह्या गोष्टी आमच्या महान होऊ घातलेल्या कर्णधाराला आणि गेली सात वर्षं आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार्या ६ फूट ४ इंच उंचीच्या वेगवान गोलंदाजाला कळू नयेत?
आता तुम्ही म्हणाल हा जेप्या आता कट्ट्यावरच्या क्रिकेटतज्ञागत बोलायला लागला. चला... धरून चाला घटकाभर - नाही कळत आपल्याला क्रिकेटमधलं काही. पण माणसातली जिंकायची, लढायची "भूक" तर कळते! ऑस्ट्रेलियात भारताने आजपर्यंत ४० कसोटींपैकी फक्त ५ जिंकलेल्या आहेत.... साला गावस्कर तेंडल्या द्रविडला जमलं नाही ते आपण करू रे... ह्यावेळी २-० नी ठोकू ह्या #$@ ऑझीजना. ईशांत आधी तिकडे खेळलेला आहे.... यादव, अॅरन, भुवी, शमी पंचविशीतली पोरं आहेत. ह्यांनी जीव तोडून गोलंदाजी नाही करायची तर कुणी? जेमतेम तिशी पार केलेले एका हाताच्या बोटावर मोजता येणारे खेळाडू असलेल्या संघानी देशासाठी खेळताना चवताळून खेळायला नको? अरे जर जगज्जेता असताना ऑस्ट्रेलियन संघ "फायनल फ्रंटियर" म्हणून भारतात येऊन त्वेषानी खेळू शकत असेल तर आपण जिथे आजतागायत एकदाही मालिका जिंकलेलो नाही अश्या ठिकाणी खेळताना अजून कोणत्या मोटिव्हेशनची गरज तरी आहे का? मग तुमचे चेहरे असे सुतकी आणि देहबोली अशी आजारी का?
हे छायाचित्र मी काढलेलं असतं तर मिपाच्या स्पर्धेत "भूक" विषयासाठी हीच एंट्री पाठवली असती! त्या हपापलेल्या सिडलची आणि क्षेत्ररक्षकांची बॉडी लँग्वेज बघा! बाबांनो आम्हाला क्रिकेटमधलं काही कळत नाही. पण जीव तोडून केलेला प्रयत्न नक्कीच कळतो. तुम्ही वर्षातले तीनशे दिवस क्रिकेटच खेळत असता, प्रेशर असतं सगळं मान्य.... आयपीएल खेळा, जाहिराती करा... आमचं काही म्हणणं नाही. पण ज्यासाठी आम्ही क्रिकेट बघतो ती मजा नका हिरावून घेऊ! तुम्ही पण लाइव्ह कार्यक्रमात lip synch करणार्या त्या चिर्कुट महागायकांसारखे आयपीएलच्या तमाश्यात नाचण्यात खुश असाल तर लक्षात ठेवा.... अजून ५ - ७ वर्षांत ते खूळ उतरेल आणि दुसर कुठलंतरी वेड लागेल क्रिकेटला. पण अजून दोन पिढ्यांनी तेव्हाचे आजोबा त्यांच्या नातवंडांना क्रिकेटच्या गोष्टी सांगतील तेव्हा तुम्ही त्यात असाल का हा विचार करा. हरायला आमची ना नाही... पण हरलात तरी अभिमानाने दाखवण्यासारखे घाव तरी अंगावर असले पाहिजेत रे! पहिल्या कसोटीत पहिल्या दोन दिवसातच माना नका टाकू! डोळ्यांला डोळे भिडवून लढा रे....दात ओठ खाऊन तुटून पडा....धीरोदात्तपणे त्यांच्या आक्रमणाचा सामना करा.....नवे डावपेच लढवा.... झोकून द्या स्वतःला.
बाकी काही नाही... तुम्ही असं केलंत ना तरच मी माझ्या पोराला सांगू शकीन "लेका ठेव ते पुस्तक बाजूला.... आपली लोकं बघ काय लढताहेत! ह्यांच्याकडून जास्त शिकशील!"

वाचने
15036
वाचनखूण
प्रतिक्रिया
28
समयोचित लेख!
सहीच लिहीलयं..
क्या लिख्खा है रे.... येकच
दगडावर डोके
In reply to दगडावर डोके by सिरुसेरि
इतकं सोपं नाहिये
In reply to इतकं सोपं नाहिये by जे.पी.मॉर्गन
@ जे पी,
In reply to @ जे पी, by प्यारे१
असेच म्हणतो
परफाॅर्मन्स खराब असला तरी
जुन्या मॅचेस
In reply to जुन्या मॅचेस by सिरुसेरि
सचिन , द्रविड , कुंबळे ,
In reply to सचिन , द्रविड , कुंबळे , by पिंपातला उंदीर
बीसीसीआयचा ह्या सगळ्या
In reply to बीसीसीआयचा ह्या सगळ्या by प्यारे१
प्यारे +१
अजूनपण बरीच लोक
लाज वाटुन राह्यली ना भावा
क्रिकेटसारख्या रिकामटेकड्या खेळात
सचिन नंतर
भारतीय फलंदाजांनी किमान आज
In reply to भारतीय फलंदाजांनी किमान आज by प्यारे१
काय पण ! यात बीसीसीआयचा हात
In reply to काय पण ! यात बीसीसीआयचा हात by पिंपातला उंदीर
असण्याची शक्यता आहेच.
In reply to काय पण ! यात बीसीसीआयचा हात by पिंपातला उंदीर
बीसीसीआय????
In reply to बीसीसीआय???? by बॅटमॅन
स्पेशल दिक्षा घेतली का रे
In reply to स्पेशल दिक्षा घेतली का रे by किसन शिंदे
अहो, पिपातले उंदीर ऊर्फ अमोल
पुन्हा जुनाच शो चाललाय. उद्या
In reply to पुन्हा जुनाच शो चाललाय. उद्या by जे.पी.मॉर्गन
झालं..संपली म्याच..जिंकू असे
लायोन की लायन
जेप्या, फ्रस्ट्रेशन दिसतंय रे
छान लिहिलंय
In reply to छान लिहिलंय by पैसा
चांगलंय !!