मराठी अस्मिता, आपण आणि राजकारण
"नाही यार नाही. हा नाही. अरे तो ठीक आहे पंतप्रधान म्हणून. महाराष्ट्रात हा नाही पाहिजे. अरे तो मराठी माणसाचा, आपला, असा पक्ष नाहीये मित्रा.... तो महाराष्ट्रात मराठी माणसाला पोरकं करेल, अरे मारून टाकेल तो आपल्या अस्मितेला...." अगदी कळकळीने काल रस्त्यावर एक माणूस दुस-या माणसाला सांगत होता.
या सगळ्या विचारांत काहीसं तथ्य असलं जरी, तरी बरचसं नाही आहे. मुंबईतला एक मुख्य पक्ष हा पहिल्यापासून मराठी माणसाचा पक्ष राहिलेला आहे. मराठी माणसाला मुंबईत कधीच पोरकं केलं गेलं असतं. पण त्याला बळ दिलं, त्याचा दरारा प्रस्थापित केला तो या पक्षाने. दंगलींच्या वेळी मराठी माणसाला मुंबईत आधार होता तो याच पक्षाचा. या आणि अशा अनेक गोष्टी अगदी ख-या आणि महत्वाच्या आहेत. पण मला त्या माणसाच्या बोलण्यातला एकच मुद्दा खटकला. अस्मितेचा.
मराठी अस्मिता ! मराठी अस्मिता !.... कधी बंगळुरू मधे कन्नडी अस्मिता ! असं कुणी बोंब मारताना ऐकलंय का? मी तरी नाही. चेन्नईत मल्ल्याली अस्मितेच्या नावाने कुणी ओरडत नाही की बंगाल मधे बंगाली अस्मितेच्या नावाने नाही. पण ही अस्मिता त्यांच्या रोजच्या, सततच्या वागण्यातून दिसते. बंगळुरू मधे रिक्षावाले ठासून नो इंग्लिश नो हिंदी म्हणतात. ओनली कन्नडा. मग तिथे रहायला गेलेली मराठी मंडळी घरी आल्यावर मी थोडं थोडं कन्नड शिकलोय म्हणतात, त्यांना घरचेही अरे वा ! मस्त म्हणून शाबासकी देतात. इथे अस्मिता कुणाची श्रेष्ठ ठरली?
लोकल ट्रेन मधे आपण प्रवास करतो. अगदी सहजपणे आपण हिंदीत संवाद साधत असतो. उदा. 'भाईसाब जरा बाजू होना', 'कौनसा स्टेशन गया?', 'आपको कहां उतरना है?'. किंवा अगदीच फस्ट क्लास किंवा एसी बस मधे असू किंवा जरा टापटीप माणूस/बाई दिसली की आपण थेट इंग्रजी सुरू करतो. उदा. 'एक्स्क्यूज मी, डज धिस बस गो टू चेंबूर'. का? आपल्याला कुणी प्रतिबंध करत नाही 'नो हिंदी नो इंग्लिश' म्हणायला. शिरजोर पणे 'हिंदी मे बोल यार' म्हणणारी अमराठी मंडळी अनेकांनी कार्यालयात बघितली असतील कदाचित. त्यांच्यासमोर आपली अस्मिता मूग गिळून का बसते?
इंग्रजी शाळांवरचं प्रेम, इंग्रजी सण, आपले मराठी सणही साजरे करायच्या इंग्रजी पद्धती, या आणि अशा बाबतीत 'आपलीच' मराठी अस्मिता दाखवण्यात आपल्याला वाटणारा कमीपणा किंवा कालबाह्यतेची भावना अशा अनेक गोष्टींद्वारे आपण आपली ही अस्मिता मारतच असतो की. 'जीते जी' म्हणतात तसं.
हे असं असताना निवडणुका आल्या की कुण्या पक्षाची आणि लगोलग आपलीही अस्मिता मात्र जागी होते. मग आपल्याला पुळका येतो; भाषेचा, आणि ती भाषा, तिचा अभिमान बाळगणा-या अशा पक्षांचा. आता वास्तविक हा असा प्रकार कालबाह्य झाला आहे. पक्षांसाठी भाषिक मुद्द्यावर निवडणुका लढवणं योग्य राहिलेलं नाही आणि लोकांनी कुण्या राजकीय पक्षावर 'आपल्या' भाषेची अस्मिता जपण्याकरिता अवलंबून रहाणं योग्य राहिलेलं नाही. पुढे गेलंय सगळं आता. दोन दशकांपूर्वी जेंव्हा एका पक्षाने मराठी माणसाचं सबलीकरण केलं, तेंव्हा त्यासाठी तो काळ योग्य होता. पण आता जेंव्हा इतर पक्ष विकासाची कास धरत आहेत, ती लोकांच्या बुद्धीला पटत आहे, तेंव्हाही हे योग्य ठरेल ही शक्यता कमीच.
मराठी भाषा, तिची अस्मिता जपायला हवी, तर ती प्रत्येकाने कृतीतून, वागण्यातून जपायला हवी. जिथे तिथे मराठीचा पुरस्कार व्हायला हवा. छोट्या छोट्या गोष्टीतून मराठीचा, मराठी असल्याचा अभिमान दिसायला हवा. बंगळुरूच्या रिक्षावाल्यापासून ते जरीकाठी लुंगी घालून फिरणा-या भारताच्या माजी अर्थमंत्र्यांच्या वागण्यातून दिसतो तसा. एक पक्ष येईल, मराठी अस्मिता जपेल असं म्हणणं म्हणजे कुणीतरी येईल, वाढून देईल म्हणण्यासारखं आहे. आपण आपल्या बाजूने अस्मिता वा-यावर सोडायची, आणि एखादा राजकीय पक्ष ती जपेल म्हणत त्याला मत द्यायचं म्हणजे खुळेपणा आहे. क्रांतिवीर चित्रपटातला 'आज मै तुम्हे बचाऊंगा, कल कौन आयेगा?' वाला संवाद इथे आठवतो. सुजाणांनी त्यातून बोध घ्यावा.
एक मराठी म्हणून प्रत्येक माणसाला अभिमान जरी असला, तरी तोच राजकारणाच्या अग्रस्थानी ठेवण्यावर संबंधित पक्षांनी, मतदारांनी विचार करायला हवा. कारण याच्यामुळेच कदाचित आपण जे खरोखर गरजेचे मुद्दे आहेत, जो आपल्या हक्काचा विकास आहे, त्याच्यापासून दूर राहिले असू. तेंव्हा आज खरं तर विकासासारख्या महत्वाच्या मुद्द्याला प्राधान्य दिलं पाहिजे. लढाई विकासाची असली पाहिजे. मराठी आहेच; आणि राहील. आजच्या काळात गरज मराठीच्या तलवारीला धार लावण्याची नसून विकासाच्या तलवारीला मराठीची मूठ बसविण्याची आहे. आणि त्या मुठीला इथल्या मराठी माणसांची एकत्रित ताकद मिळाली पाहिजे. मग अटकेपार झेंडे रोवण्यापासून मराठीला मराठी माणसाला कुणीही अडवू शकणार नाही. एकत्रित ताकद मिळाली नाही तर मात्र भविष्यात अल्पसंख्यांकतेची ढाल करायची वेळ आपल्यावर येईल हे नक्की.
- अपूर्व ओक
वाचने
35022
वाचनखूण
प्रतिक्रिया
132
मराठी भाषा, तिची अस्मिता
In reply to मराठी भाषा, तिची अस्मिता by प्रसाद१९७१
नाही जपली तर काय फरक पडतो?
In reply to नाही जपली तर काय फरक पडतो? by विजुभाऊ
नावातील अस्मिता
In reply to नाही जपली तर काय फरक पडतो? by विजुभाऊ
@विजूभाऊ - मी तो गिरिजा काका
In reply to नाही जपली तर काय फरक पडतो? by विजुभाऊ
पर्सनली घ्यायची काहीच गरज
In reply to मराठी भाषा, तिची अस्मिता by प्रसाद१९७१
>>>समजा १०० वर्षानी मराठी
मुंबै-पुणेकरांसाठी आहे का लेख
अस्मिता ही नेहमीच आर्थिक
In reply to अस्मिता ही नेहमीच आर्थिक by बोका-ए-आझम
७०० वर्षांहून जास्त काळ
In reply to ७०० वर्षांहून जास्त काळ by विजुभाऊ
तेच तर म्हणतोय मी विजुभौ!
In reply to तेच तर म्हणतोय मी विजुभौ! by बोका-ए-आझम
ज्या भाषा नष्ट झाल्या त्या
In reply to ज्या भाषा नष्ट झाल्या त्या by विजुभाऊ
उदा: उद्या समजा मराठीवर अशी
In reply to उदा: उद्या समजा मराठीवर अशी by प्रसाद१९७१
खिक्क !!!
In reply to खिक्क !!! by सुहास..
गिरिजाकाकूंचे लॉजीक लावायचे
In reply to गिरिजाकाकूंचे लॉजीक लावायचे by विजुभाऊ
संध्या वगैरे सगळ्या गोष्टी या
In reply to गिरिजाकाकूंचे लॉजीक लावायचे by विजुभाऊ
संध्या वगैरे सगळ्या गोष्टी या
In reply to गिरिजाकाकूंचे लॉजीक लावायचे by विजुभाऊ
@विजुभाऊ - मी गिरीजा काकु
In reply to @विजुभाऊ - मी गिरीजा काकु by प्रसाद१९७१
काय लॉजिक आहे
In reply to काय लॉजिक आहे by कपिलमुनी
उंदीर मारणे तर सोडाच,
In reply to उंदीर मारणे तर सोडाच, by बॅटमॅन
उंदीर मारणे तर सोडाच,
In reply to उंदीर मारणे तर सोडाच, by विजुभाऊ
मी परत स्वैंपाक घरात जातो ,
In reply to उंदीर मारणे तर सोडाच, by बॅटमॅन
माझा मुद्दा संध्ये बद्दल होता
In reply to उंदीर मारणे तर सोडाच, by बॅटमॅन
असेच बोलायचे तर औरंगजेबाने
In reply to असेच बोलायचे तर औरंगजेबाने by प्रसाद१९७१
तुमच्या जातीचा इथे काहीच
In reply to तुमच्या जातीचा इथे काहीच by मृत्युन्जय
प्रश्न स्पेसिफिक होता "कायम
In reply to प्रश्न स्पेसिफिक होता "कायम by प्रसाद१९७१
संध्या
In reply to संध्या by कपिलमुनी
मुळात "संध्या करणे" म्हणजे
In reply to मुळात "संध्या करणे" म्हणजे by सतिश गावडे
संध्या किंवा इतर प्रथा
In reply to संध्या किंवा इतर प्रथा by कपिलमुनी
.
In reply to खिक्क !!! by सुहास..
अनेकतेत एकता हा निव्वळ भोंगळ
In reply to अनेकतेत एकता हा निव्वळ भोंगळ by प्रसाद१९७१
आता मात्र अती झाल !
In reply to आता मात्र अती झाल ! by सुहास..
प्रसादशेठ, तुमचा ट्रॅक बघतोय
In reply to प्रसादशेठ, तुमचा ट्रॅक बघतोय by प्रसाद१९७१
(No subject)
In reply to आता मात्र अती झाल ! by सुहास..
खो खो खो
In reply to पुन्हा अर्धवट उचलला आहे by सुहास..
एक गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही
In reply to एक गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही by काळा पहाड
मी ही सामान्य माणुस आहे ही
In reply to एक गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही by काळा पहाड
:)
In reply to :) by क्लिंटन
अफझलखान येईपर्यंत मी स्वतः
In reply to अफझलखान येईपर्यंत मी स्वतः by काळा पहाड
विशेषतः नरेंद्र मोदींना
In reply to विशेषतः नरेंद्र मोदींना by सुहास..
>>> अमीत शहा चुव्वा कोणाला
In reply to पुन्हा अर्धवट उचलला आहे by सुहास..
>>> तेच तर म्हणतोय , दम लागतो
In reply to >>> तेच तर म्हणतोय , दम लागतो by श्रीगुरुजी
चुकीची माहिती देताय. ५
In reply to चुकीची माहिती देताय. ५ by सुहास..
हेच डिस्कशन आता त्या निवडणुका
In reply to चुकीची माहिती देताय. ५ by सुहास..
>>> तरी ही १२१ हे मात्र काही
In reply to >>> तरी ही १२१ हे मात्र काही by श्रीगुरुजी
हा हा हा हा हा हा !!
In reply to हा हा हा हा हा हा !! by सुहास..
दुसर्या एका धाग्यावरील माझा
In reply to खूप दिवसात असा निखळ विनोदी प्रतिसाद वाचला नव्हता by क्लिंटन
जाऊ द्या हो.
In reply to जाऊ द्या हो. by अर्धवटराव
पुढे तर यापेक्षा भयानक आहे .
In reply to पुढे तर यापेक्षा भयानक आहे . by सुहास..
इट्स इनेव्हिटेबल.
In reply to हल्ली आयआयएम मध्ये नेमक काय by सुहास..
निव्वळ भाजपा नाही, प्रत्येक
In reply to निव्वळ भाजपा नाही, प्रत्येक by बोका-ए-आझम
नरेंद्र मोदी / भाजपा आता
In reply to हल्ली आयआयएम मध्ये नेमक काय by सुहास..
अाय.आय.एम. मधल्या शिक्षणाचा
In reply to अाय.आय.एम. मधल्या शिक्षणाचा by बोका-ए-आझम
आझमशेठ !!
In reply to आझमशेठ !! by सुहास..
सायबा - दुसर्या पार्टीने काय
In reply to सायबा - दुसर्या पार्टीने काय by प्रसाद१९७१
तुम्ही तुमच्या पार्टीकडे लक्ष
In reply to तुम्ही तुमच्या पार्टीकडे लक्ष by सुहास..
भाजपने पण ५० वर्ष कॉग्रेस कशी
In reply to भाजपने पण ५० वर्ष कॉग्रेस कशी by प्रसाद१९७१
५० वर्षे?
In reply to ५० वर्षे? by प्रदीप
भाजप म्हणजे जनसंघ्+भाजप.
In reply to भाजप म्हणजे जनसंघ्+भाजप. by प्रसाद१९७१
बरोबर
In reply to बरोबर by प्रदीप
बाजपाईंचे कसले ते भाजपचे
In reply to आझमशेठ !! by सुहास..
सुहाससाहेब, मी काय करावं आणि
In reply to सुहाससाहेब, मी काय करावं आणि by बोका-ए-आझम
सुहाससाहेब, मी काय करावं आणि
In reply to सुहाससाहेब, मी काय करावं आणि by सुहास..
फुकटात न मागता ज्ञान
In reply to फुकटात न मागता ज्ञान by बोका-ए-आझम
म्हणूनच गेल्या निवडणुकीत
In reply to सुहाससाहेब, मी काय करावं आणि by सुहास..
अरे सुहास लोग क्या बोल रहे है, तुम क्या बोल रहे हो ?
In reply to अरे सुहास लोग क्या बोल रहे है, तुम क्या बोल रहे हो ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सुहास, माझ्यासकट आत्तापर्यंत
In reply to अरे सुहास लोग क्या बोल रहे है, तुम क्या बोल रहे हो ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
:)
In reply to अरे सुहास लोग क्या बोल रहे है, तुम क्या बोल रहे हो ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अरे सुहास लोग क्या बोल रहे है
In reply to अरे सुहास लोग क्या बोल रहे है by बॅटमॅन
.
In reply to . by hitesh
हा हा हा. तसे तर मग जगातला
In reply to हल्ली आयआयएम मध्ये नेमक काय by सुहास..
>>> अरे रे ! अतिशय बायस्ड ,
In reply to >>> अरे रे ! अतिशय बायस्ड , by श्रीगुरुजी
जशी शिवसेना एकटी निवडणुक
In reply to खो खो खो by क्लिंटन
या परिच्छेदातून प्रस्तुत
In reply to या परिच्छेदातून प्रस्तुत by विजुभाऊ
जरूर
In reply to उदा: उद्या समजा मराठीवर अशी by प्रसाद१९७१
+१
In reply to +१ by आजानुकर्ण
अगदी हेच लिहिणार होतो.
In reply to उदा: उद्या समजा मराठीवर अशी by प्रसाद१९७१
तसा तुम्ही जिल्बी टाकुनपण
In reply to उदा: उद्या समजा मराठीवर अशी by प्रसाद१९७१
नाही दिसले हे पदार्थ, तर काय
In reply to नाही दिसले हे पदार्थ, तर काय by विजुभाऊ
आयला वीजूभाऊ - तुम्ही तर महान
In reply to ज्या भाषा नष्ट झाल्या त्या by विजुभाऊ
अवांतर-
In reply to अवांतर- by यसवायजी
"म्हाद्या " ही भरपूर कांदा
In reply to "म्हाद्या " ही भरपूर कांदा by विजुभाऊ
रेसीपी टाका हो.
In reply to अवांतर- by यसवायजी
अनिल अवचट यांचं ' छंदांविषयी
In reply to ज्या भाषा नष्ट झाल्या त्या by विजुभाऊ
जरा इच्चार करीसन फेका दादा.
In reply to जरा इच्चार करीसन फेका दादा. by आनंदी गोपाळ
हे आणखी एक. तिथलंच.
In reply to हे आणखी एक. तिथलंच. by आनंदी गोपाळ
हा हा हा, अगदी अगदी
भाषेची निर्मिती का झाली ?
In reply to भाषेची निर्मिती का झाली ? by पिंपातला उंदीर
मला वाटले होते की माझ्या
In reply to मला वाटले होते की माझ्या by प्रसाद१९७१
अरेरे.... तसं सुचवायचं होतंत
मराठी अस्मिता हे एक भोंगळ