उद्धव ठाकरेंना कुणीतरी जागे करेल काय ?

Primary tabs

जीएस's picture
जीएस in जनातलं, मनातलं
21 Oct 2014 - 5:57 am

उद्धव ठाकरेंना कुणीतरी जागे करेल काय ?

उद्धव ठाकरेंच्या एका घोडचुकीने विधानसभेत शिवसेनेला बलवान बनवण्याची आणि ज्या मुख्यमंत्रीपदासाठी ते एवढे आतुर झाले होते ते पद मिळवण्याची दारी चालून आलेली संधी त्यांनी दवडली आहे.
आता त्यांची आणखी एक घोडचूक शिवसेनेचे फार मोठे खच्चीकरण करू शकते.

कसे ते सांगण्यासाठी मी राजकीय परिस्थितीचे माझ्या प्रदीर्घ अनुभवाद्वारे विश्लेषण वगैरे करणार नाही कारण ते किती सापेक्ष असते हे आपण विविध विश्लेषकांचे लेख वाचून अनुभवतो आहोत. मी फक्त निकालाच्या आकड्यांचा आधार घेऊन, आकडे काय दाखवतात ते लिहिणार आहे.

उद्धव ठाकरेंची पहिली घोडचूक: युती तुटू देणे.

युती खरच कोणी तोडली हा वाद न संपणारा आहे. आकड्यांचा मुद्दा काय होता ते बघू.

(१) २००९ मध्ये शिवसेना १६० आणि भाजप ११९ अशा जागा लढवल्या होत्या. तेंव्हाही कमी जागा लढवून भाजपाने जास्त जागा जिंकल्या होत्या.

(२) २०१४ मध्ये मोदी या घटकाने भाजपाची तुलनात्मक ताकद भरपूर वाढली होती हे लोकसभा निकालांनी स्पष्ट झाले होते.

(३) या पार्श्वभूमीवर भाजपने आधी समसमान म्हण्जे १३५-१३५ जागा लढवू अशी मागणी केली होती. आणि नंतर शिवसेना १४० - भाजपा १३० याला सुद्धा तयारी दाखवली होती. शिवसेनेने ९ जागा इतर मित्रपक्षांना देऊन १५१ चा आकडा लावून धरला होता.

(४) उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचेच होते, तेंव्हा भाजपापेक्षा जास्त जागा मिळवल्याच पाहिजेत हे त्यांना आवश्यक होतेच, त्यात काही गैर नाही पण शिवसेनेची आणि भाजपाची तुलनात्मक ताकद काय आणि त्या प्रमाणात न्याय्य जागावाटप होणे आवश्यक होते जे उद्धव ठाकरेंनी साफ धुडकावून लावले. ११९:१५१ प्रमाण न्याय्य होते की १३०:१४० न्याय्य होते हे आपण निकालाच्या विश्लेषणात बघूया.

(५) भाजपाला १२२ जागा मिळाल्या आणि शिवसेनेला ६३. शिवाय ३४ ठिकाणी भाजपा शिवसेनेच्या पुढे आणि दुसर्‍या स्थानावर आहे, तर ३५ ठिकाणी शिवसेना दुसर्‍या स्थानावर आणि भाजपाच्या पुढे आहे. म्हणजे भाजपा शिवसेना प्रमाण १५६:९८ आहे.

(६) भाजप तर यापेक्षा फारच कमी जागा मागत होता. त्या नाकारण्यामागे उद्धव ठाकरेंचा इगो होता की संजय राउतने केलेली दिशाभूल होती की काही डावपेच होते की वस्तुस्थितीचे भान नव्हते याचे उत्तर शिवसेनेच्या आतल्या गोटातीलच देऊ शकतील. पण त्या नाकारून उद्धव ठाकरेंनी स्वतःच्या पायावर कसा धोंडा पाडून घेतला ते मात्र आता आपण पुन्हा आकड्यांद्वारे बघू शकतो.

जर भाजप शिवसेना युती १३०:१४० या प्रमाणात झाली असती तर काय झाले असते ?

(७) सध्या मिळालेल्या जागा. भाजप १२२, शिवसेना ६३.

(८) शिवसेना भाजप एकत्र असते आणि राष्ट्रवादी व कॉंग्रेस एकत्र असते तर दोघांना आता मिळालेल्या मतांची बेरीज करता शिवसेनेला २२ आणि भाजपाला १६ जागा अधिक मिळाल्या असत्या. म्हणजे भाजप १३८ आणि शिवसेना ८५.

(९) भाजपने २००९ मध्ये लढवलेल्या ५ जागांवर शिवसेनेला यंदा विजय मिळाला. जर युती असती तर या जागा भाजपाकडे असत्या. म्हणजे भाजप १३८+५=१४३ आणि शिवसेना ८५-५=८०.

(१०) शिवसेनेने २००९ मध्ये लढवलेल्या ३९ जागांवर भाजपला विजय मिळाला. जर युती असती तर या जागा शिवसेनेकडे असत्या. पण युती झाली असती तर शिवसेनेने १३०-११९ म्हणजे ११ जागा भाजपाला लढायला दिल्या असत्या त्यातील साधारण ७ जागांवर भाजप जिंकला असे धरले तर उरलेल्या ३९-७=३२ जागांवर शिवसेना निवडून आली असती. म्हणजे भाजप १४३-३२=१११ आणि शिवसेना ८०+३२=११२.

(११) यात एक दोन जागांची चूक होण्याची शक्यता गृहीत धरुनही हे पुरेसे स्पष्ट होते की १३०:१४० तत्वावर युती झाली असती तर शिवसेनाही भाजपएवढीच ताकदवान असती, युतीकडे मित्रपक्ष वगळूनही २२३ एवढे मोठे मताधिक्य असते आणि उद्धव ठाकरेंना हवे असलेले मुख्यमंत्रीपद मिळण्याचीही ५०% तरी शक्यता होती. शिवाय स्वबळावर न लढल्याने शिवसेनेची झाकली मूठ मोठ्या भावाची राहिली असती. जी आता १५६:९८ या प्रमाणामुळे किमान पुढच्या निवडणूकीपर्यंत तरी फारच लहान भावाची झाली आहे.

(१२) दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आकडे काय म्हणतात हे समजून न घेताच शिवसेना आणि त्यांचे समर्थक स्तंभलेखक अजूनही खंजीर, आम्ही मोठे भाऊ, दिल्ली विरुद्ध महाराष्ट्र यातच रममाण झाले आहेत. निवडणूक प्रचारातही दोन पक्षांच्या जागावाटपाच्या भांडणात नक्की चूक कुणाची ? शिवसेना नेत्याचा अपमान म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचा अपमान !!! किंवा धाकल्या बाळराजांना 'काका, काका' म्हणत दुडूदुडु धावत जाऊन बसायला आज भाजपमध्ये मांडी शिल्लक राहिली नाही !!! हे महाराष्ट्रापुढच्या खर्‍या आव्हानांचा काहीही संबंध नसलेले पक्ष व व्यक्तीकेंद्रित मुद्दे उगाळले गेले तेंव्हाच उद्धव ठाकरे वास्तवपासून किती दूरच्या जगात वावरत आहेत याचे दर्शन घडले होते.

पुन्हा घोडचुकीकडे

(१३) शिवसेनेची निकालानंतरची वक्तव्ये व सामनामधील लेख पाहिले तर त्यांना अजूनही वस्तुस्थितीचे भान आले आहे असे दिसत नाही.

(१४) भाजपला बहुमतासाठी फक्त २२ जागा कमी पडत आहेत. त्यात १० अपक्षांनी आणि ४१ सदस्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा जाहीर केला आहे.
( भाजपने हा पाठिंबा घेणे योग्य आहे असे माझे म्हणणे नाही. ज्यांच्याविरुद्ध लढले म्हणून लोकांनी साथ दिली त्यांच्याच पाठिंब्याने सरकार स्थापन करायचे असला केजरीवालछाप अनैतिक संधीसाधूपणा भाजपने करू नये असे मला वाटते, पण तो या लेखाचा विषय नाही)

(१५) आता आम्ही आधी भाजपशी बोलणार नाही. उपमुख्यमंत्रीपद हवेच. विशिष्ट खाती हवीच वगैरे अडवणूक केल्यास आता अशी चूक शिवसेनेला पुढच्या पाच वर्षात मोठ्या खच्चीकरणाकडे नेऊ शकते याचे भान असलेल्या कुणीतरी उद्धवजींना जागे करून वस्तुस्थितीच्या जगात आणण्याची गरज आहे असे वाटते. हे जागे करण्याचे काम कुणी करेल काय ?

-जीएस

राजकारणविचार

प्रतिक्रिया

देवंद्र ने पुर्ण फंड वापरला नाही, हे खोटं आहे का ? अट्टल गुन्हेगार शिवाजी कर्डिलेंच्या खांद्यावर हात ठेवल्यावर तो निवडुन आला हे खोटे आहे का ? नागपुरचा डॉन पार गळ्यात पडतोय उमेदवारांच्या ? ( होय, दिलीय की सातार्‍यात गुंडाला तिकीट दिल की मनसेने, पण सातार्‍यात उद्नराजे च्या विरूध्द उभ रहायला कोणी तयार नाही काय करायचे !! त्यात तिथे गुंडाना निवडुन द्यायची परंपरा आहे की काय माहीत ) पण मिडियातर्फे फोकस करताना मनसे टार्गेट झाले तसे भाजपा का नाही याचा ही विचार करा. ( किरकोळ एक वेळा बातमी दाखविली फक्त ) मॅन्डेट दिली आहे की !! पण कंप्लीट नाही , घसा बसेपर्यंत २५ सभा झाल्यात तरी ही बहुमत नाही अजुन ..तिकडे उप निवडणुकांमधुन ही कधी नव्हे ते गुजरात आणि राजस्थान मध्ये कॉग्रेस निवडुन आली , तासगावच्या सभेत महागर्दी होवुन आणि उलटे-पालटी मुक्ताफळे आराआर निवडुन आलेच की ...राणेंचा पराभव सेनेच्या वैभव ने केलाय...परवा-परवा पर्यंत ( स्मार्टे सिटी करणार म्हणे ) औरगांबाद ला येणारा, ११,००० कोटींचा अ‍ॅक्टिव्हा चा प्रोजेक्ट अहमदनगर ला गेलाय ..मुंबई मध्ये कमलाबेन च्या मुखातुन ज्ञानेश्वरी बाहेर पडत नव्हती , धर्मपीठांमधुन तर धर्मगुरु दररोज मुक्ताफळे( आधी गटारगंगा हा शब्द लिहिला होता ) उधळताहेत{ ( बाकी हे असले स्तोम, राम मंदिर, दलीतांना मंदीर प्रवेशबंदी (जसा लय उत्साह दलीतांना मंदीर प्रवेशाचा ), मोहसीन खानंच ब्रुटल मर्डर, नितीन आगे ची हत्या आणि जेतवड च हत्याकांड (अजुन स्पष्ट नाही कशामुळे झालेय ते पण तरी ही), ते काय ते लव्ह जेहाद ( भाजपा वाल्यानेच पैसै देवुन करवुन घेतल्याच स्पष्ट झालच ना ) हे भाजपाच सरकार असल्यावरच का येतात ( मग एमआयएम निवडुन आलं की चिंतेत बसायच ) } ..अजुन राजकारण तर सोडुनच ड्या पण समाजाशी अहितकारक बर्‍याचश्या गोष्टी , ज्या केवळ १०० दिवसात झाल्यात ..मांडेन तो ही कच्चा चिठ्ठा कधीतरी ...

माझ्याकडे पक्ष-बांधणीच काम तर आहेच ( किमान आता जे उरलेत ते अधिक कट्टर झालेत ! ) तुम्ही इथ सांगताय की बोलुच नका म्हटल्यावर बॉस ही मुस्कटदाबी करु नये, चार लेबल लावलेले आडनावं घेवुन, माझ्या वैयक्तीक हल्ले करु नका हि नम्र विनंती , मी बोलतच रहाणार , आणि पहाड शेठ, स्कोर सेटलिंग साठी किमान मुद्दा तरी नीट निवडायचा असो ...शेतकर्‍यांचा जीवावर उठलाय तो मुद्दा ( शेती-प्रधान देश आहे आपला, आणि नागरिक समान आहे आहेत. शेतकर्‍याने थोड मध्यमवर्गीय झाल्यास का हरकत असावी, इथे आधीच शेतीचा टक्का घसरत चाललाय ! ) असो... असे बरेच प्रश्न विचारले मी ? उत्तर तर छोड ही दो ..माझ्यावरच आगपाखड करत बसलेत लोक्स ..चालु द्यात ..मी ही पाच वर्षे इथे आहे आणि तुम्ही ही

सुहास..'s picture

24 Oct 2014 - 5:57 pm | सुहास..

अरे हो एमआयएम च्या एका उमेदवाराची गंच्छंती होणार ! चार पोरं आहेत म्हणे ;) ....., प्रदीप दादा.. अभिनंदन !!

विकास's picture

24 Oct 2014 - 6:47 pm | विकास

हे काय प्रकरण आहे? असा खरेच कायदा आहे आपल्याकडे? माहिती मिळवण्यासाठी विचारत आहे.

निवडुन येण्यार्‍या कोणास ही दोन च्या वर अपत्ये नसावीत असा कायदा आहे !!

हेच विचारताय ना ?

नितिन थत्ते's picture

24 Oct 2014 - 7:11 pm | नितिन थत्ते

साठ वर्षात काहीच झालेले नाही असा प्रचार झाल्यामुळे अशा कायद्यांची माहिती नसेल कदाचित. ;)

विकास's picture

24 Oct 2014 - 7:22 pm | विकास

काहीच कसं नाही? भ्रष्टाचार झाला की! ;) त्याहूनही अधिक महत्वाचे म्हणजे ६० वर्षात जनता इतकी खुळी झाली की काही विचार न करता ३० वर्ष न दिलेले बहुमत दिले! ;)

सुहास..'s picture

24 Oct 2014 - 8:47 pm | सुहास..

ही घ्या १०० दिवसांतील प्रगती !! खरचं काँग्रेस ने जे ६० वर्षात केले नाही ते यांनी जरा लवकरच केले ;)

http://maharashtratimes.indiatimes.com/nation/asset-issue-of-ministers-i...

विश्वनाथ मेहेंदळे's picture

24 Oct 2014 - 11:13 pm | विश्वनाथ मेहेंदळे

मंत्र्यांचा खुलासा पण वाचा की. मुख्य पानावरच आहे तो.

नितिन थत्ते's picture

25 Oct 2014 - 9:32 am | नितिन थत्ते

आधीच्या काळात असे खुलासे 'समरीली डिसमिस' करायची रूढी होती.

आता लोक खुलासे वाचू लागले म्हणजे नक्कीच अच्छे दिन येऊ लागले आहेत.

असो. यावेळेस किमान जाहीर तरी झाले. पूर्वी ५ वर्षांनी कळायचे. पुढच्या निवडणूकीच्या वेळेस.

विकास's picture

24 Oct 2014 - 7:23 pm | विकास

तेच विचारत आहे. पण त्यात निवडून आलेल्या व्यक्तीचे पद रदबादल करण्याची तरतुद आहे का?

सुहास..'s picture

24 Oct 2014 - 7:37 pm | सुहास..

हो आहे ! अर्थात आधी आक्षेप आणि मग कोर्टात केस केली आणि शाबित केली तर ...अर्थात आता जर का अर्ज पडताळणीत खोटी माहीती असेल तर निवडणुक आयोग दुसर्‍या क्रमांकावर असलेल्या उमेदवाराला किंवा पोट निवडणुका असा पर्याय देते.....ज्स्ट फोन केला होता जैस्वालांच्या कार्यकर्त्याला ...ते या दोन्ही गोष्टी करणार आहेत !!

मनसे ची एक नगरसेविकेच पद वय-पडताळणी त एका वर्षाने गेले, त्याला कोर्टात जावे लागले होते, इथे मामला गरम आहे , निवडणुक आयोगाकडे , बिधीमंडळ स्थापन व्हायच्या आत अर्ज गेला पाहिजे ..

क्लिंटन's picture

24 Oct 2014 - 7:35 pm | क्लिंटन

निवडुन येण्यार्‍या कोणास ही दोन च्या वर अपत्ये नसावीत असा कायदा आहे !!

हे नक्की कशाच्या आधारावर म्हणता? तुम्हाला कसलाही पुरावा मागून फार उपयोग होईल असे वाटत नाही.तरीही या चर्चेत रेकॉर्ड स्ट्रेट असावा म्हणून लिहितो. लोकसभा आणि विधानसभा सदस्यत्वाचे नियम राज्यघटना आणि The Representation Of The People Act,1951 अन्वये ठरविले जातात.या दोन्ही दस्तऐवजांमध्ये दोनपेक्षा जास्त अपत्ये असलेल्या कोणालाही निवडणुक लढवायचा हक्क नाही असे म्हटलेले मला तरी आढळले नाही. आणि निवडून येणार्‍या कोणालाही दोनपेक्षा जास्त अपत्ये नसावीत या म्हणण्याचा अर्थ कोणाही उमेदवाराला दोनपेक्षा जास्त अपत्ये नसावीत असा आहे असे मानायला हरकत नसावी. अन्यथा पन्नास अपत्ये असतील तरी निवडणुका लढवायला बंदी नाही पण निवडून आल्यास मात्र निवडणुक रद्द होणार याची संगती लागत नाही.

लालू यादवांना दोनपेक्षा जास्त अपत्ये आहेत तरीही ते कित्येक वर्षे निवडणुका लढवत आणि जिंकत होते.त्यांना २०१४ मध्ये निवडणुक लढविता आली नाही याचे कारण त्यांना दोन पेक्षा जास्त वर्षांची तुरूंगवासाची शिक्षा झाली आहे. त्यांना किती अपत्ये आहेत याच्याशी त्याचा संबंध नाही. तसेच बिहारचे सध्याचे मुख्यमंत्री जितनराम मांझी यांना अपत्ये आहेत. मग त्यांना अशी आडकाठी कशी नाही?

हा नियम महाराष्ट्रात आणि इतर काही राज्यात लोकल बॉडीजसाठी (जिल्हा परिषद, महानगरपालिका इत्यादी) लागू आहे. विधानसभा आणि लोकसभेसाठी हा नियम (अजूनतरी) लागू नाही.

नियम आहे आणि कारवाई ही आहे , जी तु उदाहरणे दिलीत त्यात आक्षेप नोंदविला गेला नसेल ...असो निवडणुक लढवायला कोणालाही बंदी नाही , निवडुन आल्यावर कारवाई होते म्हणुनच फॉर्म तर गुन्हेगाराला ही भरता येतात , आक्षेप नोंदविला की मग मात्र कारवाई होते .. असो ...

सुहास..'s picture

24 Oct 2014 - 7:40 pm | सुहास..

अगदी तरूंगातुन ही !!

एका ठराविक वयाची अट आहे रे,त्याला जोडुन !! हे ७ वेळा निवडुन गेलेल्याची आणि लालु बहुधा त्यामुळेच वाचले असतील...

आत्ता किंचीत शोधाशोध केली तेंव्हा लक्षात आले ते असे:

हा जास्तीत जास्त दोन मुलेच असण्याचा नियम हा महाराष्ट्र सरकारचा आहे (तसेच गुजरात मधे देखील आहे). राज्य सरकार केवळ ग्रामपंचायत, जिल्हा परीषदा आणि नगरपालीकांपुरतेच निवडणूक नियम बनवू शकतात. त्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगाच्या अख्त्यारीत येतात. राज्य विधानसभा आणि लोकसभा निवडणुका या केंद्रिय निवडणूक आयोगाच्या अख्त्यारीत येतात आणि मला असे वाटते की त्या साठी संपूर्ण देशभर समान कायदा आहे. त्यामुळे त्यात दोन मुलेच असावीत हा मुद्दा नाही. थोडक्यात मिमच्या जिंकलेल्या उमेदवाराची उमेदवारी रद्द करता येणार नाही :( असे दिसते. असो.

क्लिंटन's picture

24 Oct 2014 - 8:32 pm | क्लिंटन

हा जास्तीत जास्त दोन मुलेच असण्याचा नियम हा महाराष्ट्र सरकारचा आहे (तसेच गुजरात मधे देखील आहे). राज्य सरकार केवळ ग्रामपंचायत, जिल्हा परीषदा आणि नगरपालीकांपुरतेच निवडणूक नियम बनवू शकतात. त्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगाच्या अख्त्यारीत येतात. राज्य विधानसभा आणि लोकसभा निवडणुका या केंद्रिय निवडणूक आयोगाच्या अख्त्यारीत येतात आणि मला असे वाटते की त्या साठी संपूर्ण देशभर समान कायदा आहे. त्यामुळे त्यात दोन मुलेच असावीत हा मुद्दा नाही.

+१.

गेल्या आठवड्यात अनेकविध व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर मिमच्या विजयी उमेदवाराची आमदारकी रद्द होणार अशा प्रकारचे पोस्ट कित्येकवेळा बघितले आहेत. व्हॉट्सअ‍ॅपचे फायदे आहेत तसे तोटेही आहेत आणि त्यातील सगळ्यात मोठा तोटा म्हणजे एखादी तथ्यहिन गोष्टही अगदी छातीठोकपणे पोस्ट होते. फॉरवर्ड करायला फारसे कष्ट लागत नसल्यामुळे अशा गोष्टी हा हा म्हणता कित्येक लोकांपर्यंत पोहोचतात आणि तीच गोष्ट खरी आहे असे चित्र मात्र उभे राहते.

हा दावा करणारे मिपाकरही "आहे एक कायदा, आहे एक नियम" यापेक्षा अजून स्पेसिफिकमध्ये (नक्की कोणता कायदा, कोणते कलम, त्यात नक्की काय म्ह्टले आहे, त्याला कोणते कॅव्हिएट्स लागू आहेत) इत्यादी काहीच बोलायला तयार नाहीत यातच सगळे काही आले.

सुहास..'s picture

24 Oct 2014 - 8:38 pm | सुहास..

गेल्या आठवड्यात अनेकविध व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर मिमच्या विजयी उमेदवाराची आमदारकी रद्द होणार अशा प्रकारचे पोस्ट कित्येकवेळा बघितले आहेत. व्हॉट्सअ‍ॅपचे फायदे आहेत तसे तोटेही आहेत आणि त्यातील सगळ्यात मोठा तोटा म्हणजे एखादी तथ्यहिन गोष्टही अगदी छातीठोकपणे पोस्ट होते. फॉरवर्ड करायला फारसे कष्ट लागत नसल्यामुळे अशा गोष्टी हा हा म्हणता कित्येक लोकांपर्यंत पोहोचतात आणि तीच गोष्ट खरी आहे असे चित्र मात्र उभे राहते. >>>

अश्या बाबी ची नेहमी काळजी घेतलेली आहेच ....म्हणुन तर आज ही अ‍ॅन्टी-मोदी चा शिक्का मिरवतोय .....

हा दावा करणारे मिपाकरही "आहे एक कायदा, आहे एक नियम" यापेक्षा अजून स्पेसिफिकमध्ये (नक्की कोणता कायदा, कोणते कलम, त्यात नक्की काय म्ह्टले आहे, त्याला कोणते कॅव्हिएट्स लागू आहेत) इत्यादी काहीच बोलायला तयार नाहीत यातच सगळे काही आले. !! >>>

दुसरी बाब म्हणजे काही ही माहीत नसताना ..विकिपिडीत लांबलचक प्रतिसाद तो ही ठळक आणि छाती ठोकुन म्हणणारे , त्या ही पेक्षा मोठे गुन्हेगार आहेत ...... ( अति-अभ्यास असला की होते असे कधी - कधी ) !! स्पेसिफिकेश देतो लवकरच ........

क्लिंटन's picture

29 Oct 2014 - 1:49 pm | क्लिंटन

स्पेसिफिकेश देतो लवकरच

सुहासरावांची लवकरची नक्की व्याख्या काय? :)

सुहास..'s picture

29 Oct 2014 - 4:20 pm | सुहास..

दिलीत की , वाचा की जरा ....

अरे हो ज्वर उतरला की कळवा , मग आजुन डीप मध्ये देतो ..नमोज्वर !!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Oct 2014 - 8:45 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मिम च्या उमेदावाराच्या बाबतीत वाट्स्पवर मेसेज फिरतोय त्या उमेदवाराला दोन बायका आहेत आणि प्रत्यकी दोन मुले आहेत आणि त्याची आमदारकी रद्द होणार असा स्वप्नाळु मेसेज पुढे ढकलला जातोय. वर क्लिंटन आणि विकास यांनी खुलासा केलाच आहे.

मीमच्या आमदाराची आमदारकी अजिबात जात नाही प्रकरण कोर्टात जाईल आणि निकाल लागेपर्यंत पाच वर्ष निघूनही जातील.

बाय द वे, महाराष्ट्र विधानसभेच्या इतिहासात असं प्रकरण पूर्वी कधी घडलं आहे का ?

दिलीप बिरुटे

शेतकर्‍यांचा जीवावर उठलाय तो मुद्दा ( शेती-प्रधान देश आहे आपला, आणि नागरिक समान आहे आहेत. शेतकर्‍याने थोड मध्यमवर्गीय झाल्यास का हरकत असावी, इथे आधीच शेतीचा टक्का घसरत चाललाय ! )

शेतकर्‍याने मध्यमवर्गीय व्हावे की, पण ते अनुदानावर नव्हे. त्याला सक्षम बनवले गेले पाहिजे. शेतकर्‍याला भाव हवा असेल तर बाजरव्यवस्था सुधारली पाहिजे. मधले दलाल कमी केले पाहिजेत. निर्यातीच्या अधिक संधी निर्माण केल्या पाहिजेत. इ.इ. हमीभाव आणि आयात निर्यातीवरील बंदी म्हणजे तात्पुरती मलमपट्टी होते.
तसेही जेव्हा कांदा महाग होतो तेव्हा नक्की फायदा कोणाचा होतो याचा काही अभ्यास केला आहे का? असल्यात तो देखील इथे मांडावा अशी विनंती.

रायनची आई's picture

21 Oct 2014 - 5:17 pm | रायनची आई

मस्त लेख्..अगदी मनातल लिहिलत्..स्पेशली ते खन्जिर, अफजलखान वगैरे :-)

वेल्लाभट's picture

21 Oct 2014 - 5:29 pm | वेल्लाभट

वा! मजा आली वाचताना. या लोकांनी राजकारणातला सेन्स शून्य केलेला असला तरी मनोरंजन मूल्य वाढवून ठेवलंय राव. सही विश्लेषण !

क्लिंटन's picture

21 Oct 2014 - 5:53 pm | क्लिंटन

दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आकडे काय म्हणतात हे समजून न घेताच शिवसेना आणि त्यांचे समर्थक स्तंभलेखक अजूनही खंजीर, आम्ही मोठे भाऊ, दिल्ली विरुद्ध महाराष्ट्र यातच रममाण झाले आहेत. निवडणूक प्रचारातही दोन पक्षांच्या जागावाटपाच्या भांडणात नक्की चूक कुणाची ? शिवसेना नेत्याचा अपमान म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचा अपमान !!! किंवा धाकल्या बाळराजांना 'काका, काका' म्हणत दुडूदुडु धावत जाऊन बसायला आज भाजपमध्ये मांडी शिल्लक राहिली नाही !!! हे महाराष्ट्रापुढच्या खर्‍या आव्हानांचा काहीही संबंध नसलेले पक्ष व व्यक्तीकेंद्रित मुद्दे उगाळले गेले तेंव्हाच उद्धव ठाकरे वास्तवपासून किती दूरच्या जगात वावरत आहेत याचे दर्शन घडले होते.

+१. युती तुटण्यामागे शिवसेनेने दाखविलेली आडमुठी भूमिका ही नक्कीच जास्त जबाबदार आहे. भाजपची राज्यात ताकद शिवसेनेपेक्षा जास्त आहे (विशेषतः लोकसभा निवडणुकांनंतर) हे समोर दिसत असूनही उद्धव ठाकरे १५१ जागांवर अडून बसले. युती करताना कोणताही पक्ष आपल्यापेक्षा कमी ताकद असलेल्या पक्षाला जास्त जागा लढवायला देत नाही. अमित शहांनीही आज तेच स्पष्ट केले.

तरीही सगळी प्रसारमाध्यमे, फेसबुकवर आणि इथेही युती तुटायला भाजपा आणि त्यातूनही मोदीच जबाबदार असे म्हटले जात आहे. येनकेनप्रकारेण नरेंद्र मोदींवर टिका करणे हा आपण किती उदारमतवादी, नि:ष्पक्ष इत्यादी इत्यादी आहोत हे दाखवून द्यायचा राजमार्ग आहे असे ही मंडळी समजत असतात असे वाटते.

सध्या सेनेला किती ही नावे ठेवली तरी सेने शिवाय भाजपा कडे योग्य असा पर्याय उपलब्ध आहे का ? मग कशाला त्रागा करताय ( आठमुठी म्हणा वा पत्ते हातात ठेवणे म्हणा ) ...असेल तर ठेवा म्हणा सेने ला बाजुला ..करा युती कोणाशी करायची ते !!

तरीही सगळी प्रसारमाध्यमे, फेसबुकवर आणि इथेही युती तुटायला भाजपा आणि त्यातूनही मोदीच जबाबदार असे म्हटले जात आहे. येनकेनप्रकारेण नरेंद्र मोदींवर टिका करणे हा आपण किती उदारमतवादी, नि:ष्पक्ष इत्यादी इत्यादी आहोत हे दाखवून द्यायचा राजमार्ग आहे असे ही मंडळी समजत असतात असे वाटते. >>>

अतिशय बायस्ड जातोय प्रतिसाद ...याच फेबु, प्रसारमाध्यमे यांचा पदर धरत मोदींचा गुजरात किती ग्रेट आहे हे ही आधी शाबीत झालय आणि हिन्दी मिडीया अजुन एक रू. ची टिका करत नाहीये मोदींवर, राहिली फेबु ची गोष्ट तर , तर तिथे शब्दिक वाद चालु आहेत ( तुमच अस म्हणणे असेल की मोदींविषयी बोलायचच नाही तर मग मात्र आमचा कोपरापासुन दंडवत आहे ब्वा ! ) ...युती तुटली किंवा नाही तुटली यावर मोदींचाच खुद्द " मौनीबाबा " झालेला दिसलाय स्पष्ट पणे, मुक रहाण्याला ही होकार समजल्या जातो कधी कधी !!!

....मला वाटते मिपाने 'राजकारण साक्षरता अभियान' अस उपक्रम सुरु करावा आणि तुला 'प्रमुख मार्गदर्शक' नेमावे, त्यामुळे कदाचित तमाम 'राजकारण निरक्षर' मिपाकरांमध्ये 'राजकिय ज्ञान साक्षरता' वाढीला लागेल, असे मला वाटतेय.

दुश्यन्त's picture

21 Oct 2014 - 6:22 pm | दुश्यन्त

सुहास- +१ . सगळी प्रसार माध्यमे मोदी आणि भाजपची तळी उचलत आहेत हे गेल्या ४-६ महिन्यात दिसून आलेच आहे.

आजानुकर्ण's picture

21 Oct 2014 - 6:30 pm | आजानुकर्ण

मला भाजपाविषयी काडीचेही ममत्व नाही. मात्र झोपेतल्या उद्धवामुळे शिवसेना संपली तर बरेच आहे. (दगडापेक्षा वीट मऊ!). कोणतेही आर्थिक, सामाजिक, राजकीय धोरण नसलेल्या या पक्षाला इतक्या जागा मिळाल्या त्याचेच आश्चर्य वाटते. तेलकट वडे, चिकनसूप, शिववडा याच्यापलीकडे यांची झेप जात नाही. इतकी वर्षे मुंबई महापालिकेत सत्ता असून काय दिवे लावले?

धर्मराजमुटके's picture

21 Oct 2014 - 6:35 pm | धर्मराजमुटके

अहो शुक शुक ! ते चिकनसुप कशाला त्यांच्या तोंडात घालताय ? ते दुसर्‍या सायेबांचे हाये.

सामान्यनागरिक's picture

21 Oct 2014 - 6:40 pm | सामान्यनागरिक

प्रादेशिक पक्ष संपलेच पाहिजेत ! संकुचित दृष्टीची नेते मंडळी हा भारतीय लोकशाहीला लागलेला मोठा रोग आहे. त्यात शिवसेना तर ही दिशाहीन पक्ष आहे. बाळासाहेबांनीच योग्य वेळी विसर्जन करायला पाहिजे होते राज बाहेर पडल्यानंतर !
त्या दोघांना जे काय करायचे ते आपल्या ताकदीवर करु द्या. उगाच बाळासाहेबांचे नांव खराब व्हायला नको! दाखवा की आपल्या मनगटाच्या ताकदीवर लढुन !

बाळासाहेबांचे नांव खराब व्हायला नको

बाळासाहेबांनी वडापाव आणि 'लुंगी हटाव पुंगी बजाव' सोडून कोणता कार्यक्रम दिला? नक्की त्यावेळी काय दिशा होती की आता तो पक्ष दिशाहीन वाटतोय?

अनुप ढेरे's picture

25 Oct 2014 - 4:51 pm | अनुप ढेरे

हा हा हा. अगदी!

इतकी वर्षे मुंबई महापालिकेत सत्ता असून काय दिवे लावले?
कधी नव्हे ते,लंबकर्णाशी सहमत ! ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Rajan gets his way on RBI's restructuring plan

कपिलमुनी's picture

21 Oct 2014 - 6:26 pm | कपिलमुनी

हुकुमी एक्का सेनेच्याच हातामधे आहे. त्यांनी मागण्या जाहीर करून शांत बसावे.
घेउ दे राष्ट्रवादीचा सपोर्ट भाजपाला! हाच त्यांचा आत्मघात ठरेल कारण थोरले काकांना मध्यावधीची सवय आहे ,मोदीलाट ओसरली की ते तोच प्रयोग करणार.

तेव्हा सेनेलाच फायदा होईल .
बाकी नमोरुग्णांची एक कमाल आहे .. उद्या मोदी पादले तरी वास छानच आहे असा कौतुक करत सुटतील .
( सदर वाक्य हे एक उदाहरण आहे . त्यांच्या वाईट कामाचा उदो उदो करण्याबद्दल)

अविनाशकुलकर्णी's picture

21 Oct 2014 - 6:31 pm | अविनाशकुलकर्णी

अरे शिटा किति.. मागताय काय?....उमेदवार १० वि नापास अन म्हणे फायनास मंत्री करा.......

अविनाशकुलकर्णी's picture

21 Oct 2014 - 6:32 pm | अविनाशकुलकर्णी

क्रोधाद्भवति संमोह: संमोहत्स्मृतिविभ्रम: |
स्मृतिभ्रंशाद् बुद्धिनाशो बुद्धिनाशात्प्रणश्यति ||
(श्रीमद्भगवद्गीता अध्याय २ श्लोक ६३)
क्रोधामुळे विवेक सुटत जातो.अविवेकामुळे विस्मरण होते.विस्मरणामुळे निश्चयात्मक बुद्धि नष्ट होते.आणि बुद्धिनाश झाला की सर्वस्वाचा नाश होतो.
|| श्रीकृष्णार्पणमस्तु ||

अविनाशकुलकर्णी's picture

21 Oct 2014 - 6:34 pm | अविनाशकुलकर्णी

टी.व्ही वर एक विधान ऐकुन चक्कर आली...
"आप ने निवडणुका लढवायला हव्या होत्या.." श्रीमति मेधा पाटकर

विकास's picture

21 Oct 2014 - 8:19 pm | विकास

"आप ने निवडणुका लढवायला हव्या होत्या.." श्रीमति मेधा पाटकर

=))
=))

हहपुवा. तरी देखील आपने निवडणुका लढवल्या असत्या तर त्या निमित्ताने केजरीवालांना परत एकदा बोर्डावर आलेले पाहता आले असते आणि करमणूक झाली असती हे विसरता येणार नाही! ;)

बाकी काल फिरत असलेला एस एम एस आठवला: "मनसे" आणि "आप" आता एकत्र होणार आहेत. नवीन पक्षाचे नाव "मनस्ताप"!

वरकरणी जागावाटपाच्या मुद्द्यावरून युती तुटली अस दिसत असलं तरी ते एकच कारण असेल अस मला वाटत नाही. कुणामुळे तुटली यात मतभेद आहेत आणि तो मुद्दा बाजूला ठेवला तरी आता गेलेल्या "मोठ्या भावाची" जागा भाजपा बरोबर पुन्हा सत्तेत जाण्याने भरून येणार नाहीच. लाँग टर्म फायदा पाहता, भाजपाला राष्ट्रवादीबरोबर जावू देण्यातच त्यांचे भले आहे. यामुळे जर का इरिगेशन स्कॅम्स वर भाजपाने कठोर पावलं उचलली नाहीत तर ज्याचं भांडवल पुढल्या निवडणूकीत करता येऊ शकेल.

+१. आत्ता सगळ्यात व्हल्नरेबल भाजपाच आहे. मध्ये एक लेख वाचला होता. त्यात म्हटले होते - भाजपासमोर ताट वाढून ठेवले आहे, पण खायला हात नाहीत. आणि सेनेकडे ताट आहेत, हात आहेत, पण ताटातच काही नाही.

बाकी आता सेनेचे ताट थोरले साहेब पळवतात की काय ते बघायचे.

सुहास..'s picture

21 Oct 2014 - 7:05 pm | सुहास..

असो ...सर्व प्रतिसाद कर्त्यांसह , धागाकर्त्यासाठी आनंदाची बातमी , उध्दव जाणार आहेत म्हणे मोदींची भेट घ्यायला .......
उध्दव माफीनामा दिल्याशिवाय बोलणी होणार नाहीत :)

( हे राजु परूळेकरांच्या स्टेटस वरुन साभार )

सुहास..'s picture

21 Oct 2014 - 7:08 pm | सुहास..
दुश्यन्त's picture

21 Oct 2014 - 7:12 pm | दुश्यन्त

राजू परुळेकर म्हणजे तेच का आधी राज ठाकरेंची भाटगिरी करत उद्धववर टीका करायचे . आता राज उद्धव दोघे सोडून भाजपच्या कळपात गेले वाटत.

कपिलमुनी's picture

21 Oct 2014 - 7:25 pm | कपिलमुनी

अण्णां हजारेंचा ब्लॉग हेच लिहायचे का ?

सुहास..'s picture

21 Oct 2014 - 7:17 pm | सुहास..

=)) =))

होय !!

दुश्यन्त's picture

21 Oct 2014 - 7:27 pm | दुश्यन्त

अण्णां हजारेंचा ब्लॉग हेच लिहायचे का ? येस!

विकास's picture

21 Oct 2014 - 8:14 pm | विकास

लेख आणि माहिती एकदम मस्त आहे. आणि (बरीचशी) चर्चा देखील माहितीपूर्ण आहे!

थोडक्यात म्हणायचे झाले तर इतकेच म्हणेन की, राजकारण्यांना बदलत्या काळाचा अंदाज येत नाही आहे आणि (आधी कधी न शिकल्याने) शिकायची तयारी देखील नाही. उद्धवला हे लागू पडते आणि मला वाटते पवारांना देखील. त्याच त्याच ट्रीक सारख्या नाही चालणार असे वाटते....

उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचेच होते, तेंव्हा भाजपापेक्षा जास्त जागा मिळवल्याच पाहिजेत हे त्यांना आवश्यक होतेच, त्यात काही गैर नाही

उद्धव विधानसभेच्या कुठच्या मतदार संघातून निवडणू़क लढवत होते? मला माहीत आहे की आत्ता मंत्री/मुख्यमंत्री होऊन नंतर सहा महीन्यात निवडणूक लढवून अथवा मागच्या दरवाजाने विधानपरीषदेत येता येईल ते. पण त्यातून स्वतःची ताक्द काय दिसते?

विकास's picture

21 Oct 2014 - 8:48 pm | विकास

भारतातील २१ ऑक्टोबर संध्याकाळच्या सातच्या दरम्यानच्या झी टिव्ही वरील बातमीनुसार...

शिवसेना भाजपला पाठिंबा देणार

अर्थात अजून उपमुख्यमंत्रीपद अथवा गृह/अर्थ खात्याचा बालहट्ट आहे का माहीत नाही..

आणि

आपल्या पक्षास एकही आमदारकी मिळाली नाही हे आठवले विसरले आणि म्हणत आहेत की "आम्हाला दोन मंत्रिपदे हवीत"

मला वाटते मिसळपाव अथवा इतर कुठे सोशल मेडीयात मी भाजपाच्या बाजूने लिहीलेले असल्याने मी देखील गेला बाजार एखाद्या कुडमुड्या महामंडळाचे अध्यक्षपद तरी मागण्यात काही गैर नाही... ;)

अर्धवटराव's picture

21 Oct 2014 - 9:07 pm | अर्धवटराव

मला वाटतं राजनाथसिंगने शब्द टाकला असावा शिवसेनेकरता. आणि त्यांनीच सेनेला वेळेचं महत्व पटवुन देत लवकर निर्णय घ्यायचा सल्ला दिला असावा. अडवाणींना तेव्हढच सुख :) . अर्थात, सेनेच्या अटी, मानापमान वगैरे अजुनही तेजीत असतील तर हा चान्स सुद्धा घालवुन देईल सेना.

विकास, म्हणजे एखादे पद नक्की ना ;)

जीएस's picture

21 Oct 2014 - 9:16 pm | जीएस

प्रतिसादांबद्दल धन्यवाद.
क्लिंटन, मी तक्ते टाकायचा प्रयत्न करतो उद्या.
इथे पूर्वी अतिशय तपशीलवार निवड्णूकपूर्व विश्लेषण वाचल्याचे स्मरते. ते कोण करायचे ? मला त्यांच्याकडून थोडी माहिती हवी आहे.

खेडूत's picture

21 Oct 2014 - 10:22 pm | खेडूत

नक्कीच टाका.

>> इथे पूर्वी अतिशय तपशीलवार निवड्णूकपूर्व विश्लेषण वाचल्याचे स्मरते. ते कोण करायचे ? मला त्यांच्याकडून थोडी माहिती हवी आहे.

तेच क्लिन्टन !

जीएस's picture

21 Oct 2014 - 10:17 pm | जीएस

क्लिंटनच करतात की.

झोपी गेलेला जागा झाला ( ज़रा लेट, बूंद से जो गई वह तो गई)

भाजप जरी शिवसेनेशीच घरोबा करणार असले तरी अमित शहा आणि नमो उध्दव ठाकरे यान्ना एका गोष्टीची स्पष्ट जाणिव करुन देणार की तुम्ही बाळासाहेब नाहीत. आणि तुमचे कर्तुत्वही तेवढे नाही की मातोश्रीवर भेटावयास यावे. तुम्हीच आता दिल्ली वारीची सवय लावावी. या पुढे शिवसेनेचा आर्थिक कणा मोडण्याचे काम भाजप करणार. तसे अहमदाबाद ला नवीन शेअर ट्रेडिन्ग सुरु होणार असे एकले आहे. मुन्बईचे आर्थिक महत्त्व कमी केले जाणार हे नक्की.

दशानन's picture

21 Oct 2014 - 10:40 pm | दशानन

अरे वाह!!! उत्तम बातमी!!!

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

22 Oct 2014 - 3:35 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

मुंबईचे आर्थिक महत्व कमी झाले तर बरेच आहे असे आमचे मत.केवळ मुंबईच नाही तर देशातल्या बड्या शहरांचे महत्व क्मी झाले व त्या बदल्यात छोट्या शहरांचे महत्व वाढले तर असंतुलन कमी होण्यास नक्कीच मदत होईल.मुंबईत बाहेरचे लोक खूप येतात्,घाण करतात अशी ओरड दोन्ही सेनांकडून चालू होती.आता महत्व कमी झाले तर येणार्यांची संख्या नक्कीच मंदावेल.

मुंबईचे आर्थिक महत्व कमी केले जाणार असेल तर ते चांगलेच होईल. मुंबई,ठाणे, नवी मुंबई, डोंबिवली, कल्याण,अंबरनाथ आणि बदलापूर या भागात महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या २०% लोकसंख्या तरी नक्कीच आहे. सगळ्यांनी मुंबईत यायचे, इथे घाण,ट्रॅफिक जॅम, गर्दी, प्रदूषण इत्यादींबरोबरच जागांच्या किंमती वाढवायच्या हेच तर इतकी वर्षे चालू आहे. जर मुंबईचे महत्व कमी होणार असेल तर हे सगळे प्रश्न थोडे तरी कमी होतील. या राज आणि उद्धव या रिकामटेकड्यांचा मराठी बाणा जपता यावा म्हणून लाखो लोकांना दररोजचा त्रास सहन करायला लावणे नक्कीच बरोबर नाही. मी तर म्हणतो की काही उद्योगांना सक्तीने मुंबईबाहेर घालवले पाहिजे. मुंबईतील गर्दी किमान अर्ध्याने कमी व्हायला हवी.

(मराठी बाणा वगैरे फुकाच्या गोष्टींना फाट्यावर मारणारा) क्लिंटन

बॅटमॅन's picture

26 Oct 2014 - 12:47 pm | बॅटमॅन

अगदी अगदी...

नजीकच्या भविष्यकाळात येणाऱ्या झारखंड (२०१४) बिहार (२०१५) आणि उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड (२०१६) या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिवसेनेपुढे लोटांगण घालणारा पक्ष अशी आपली प्रतिमा होऊ नये असे भाजपला वाटत असावे. या चार राज्यातून मोठ्या प्रमाणावर भय्ये महाराष्ट्रात येत असतात आणि यांच्या विरुद्ध मनसे आणि शिवसेनेने वेळोवेळी आंदोलन करून आपली मराठी प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु येथे येणारे भय्ये हे मोठ्या प्रमाणावर पैसे आपल्या "घरी" पाठवत असल्याने त्यांच्या मतांना त्यांच्या राज्यात किंमत/ वजन असते. त्यामुळे महाराष्ट्राचे सिंहासन नाही मिळाले तरी चालेल ( नाहीतरी दुसरा कोणीही येथे येऊ शकतच नाही) पण वरील राज्यात नुकसान झाले तर राज्यसभेतील सदस्यसंख्येवर परिणाम होईल या डावपेचाअंतर्गत भाजप शिवसेनेला जास्त भिक घालत नाही असे वाटते. बाकी शिवसेना किंवा मनसे किती मुत्सद्दी आहेत हे लोकांनी लिहिलेले आहेच.
महत्त्वाचे -- मी राजकीय विश्लेषक/ विशेषज्ञ नाही

विवेकपटाईत's picture

22 Oct 2014 - 5:56 pm | विवेकपटाईत

मला ही असेच वाटत होते. थोडं डोक्याचा वापर गेला असता तर मोदी लाटे वर

सर्फिंग

करत मुख्यमंत्री ही झाले असते. आता लाटेत बुडाले एवढेच.

मुंबईचे आर्थिक महत्व कमी करून ते अहमदाबाद, दिल्लीकडे वळवायचे असेल तर का विरोध नसावा. मात्र मोठ्या शहरांपेक्षा महाराष्ट्रातीलच बाकी लहान शहरे विकसित करायची असल्यास हरकत नाही.

सुहास..'s picture

22 Oct 2014 - 6:02 pm | सुहास..

+१

शहा-मोदींनी आधीच राज्य भाजपला बजावून सांगितले होते की मुख्यमंत्री आपलाच असायला हवा. परवा रुडी पण बोलून गेले की मित शहांनाच युती तोडायची होती. युती केली असती तरी सेना जिथे लढत देते किंवा मागे कधी जिंकली होती त्या जागांवर पण भाजपने उमेदवार आयात करायला सुरुवात केली होती (ठळक उदा. भुसावळ) शिवसेनेने हे आधीच ओळखायचे होते. एकतर युती तोडायची किंवा ते न जमल्यास सेनेच्या निवडून येणाऱ्या जागा आपल्याकडे खेचून सेनेची कोंडी करायची जेणेकरून आपलेच आमदार जास्त यावेत हा भाजपचा डाव होता. अर्थात पक्ष वाढवायचे प्रत्येकाला स्वतन्त्र्य आहे त्यात दोष नाई मात्र सेनेला हे लवकर लक्षात आले नसावे.शिवसेनेने भाजपने आमचा कसा विश्वासघात केला हा मुद्दा कारणाशिवाय जास्त लांबवला. लोकांना या गोष्टीचे सोयरसुतक नसते आणि मिळाली थोडी सहानुभूती तरी असल्या मुद्द्यावर फार लोक मत देत नसतात.

जेपी's picture

22 Oct 2014 - 7:51 pm | जेपी

चला झाले उद्धवजी जागे.
पण माझ्यातर्फे शुभरात्री. :-)

पैसा's picture

22 Oct 2014 - 9:37 pm | पैसा

अतिशय अभ्यासपूर्ण लेख आणि बरीचशी चर्चा आवडली.

नितिन थत्ते's picture

23 Oct 2014 - 8:55 am | नितिन थत्ते

१. उद्धव ठाकरेचे नेतृत्व कमकुवत आहे असे म्हटले जात होते.
२. लोकसभा निवडणुकीत युतीने ४८ पैकी ४४ जागा मिळवल्या. त्या केवळ भाजप-मोदीमुळे. त्या लाटेत शिवसेनेला फुकटात फायदा झाला असे म्हटले जात होते. म्हणजे शिवसेनेला स्वतःचा काही जनाधार उरलेला नाही; शिवसेनेचे जे खासदार निवडून आले ते आलेच नसते वगैरे....
३. उद्धवला मुख्यमंत्री व्हायचे होते. धाकट्या भावाची भूमिका घेऊन ते मिळालेच नसते. त्यामुळे त्यांना हा जुगार खेळणे भागच होते.

जुगार खेळून मुख्यमंत्री होता आले नसले तरी इतर आक्षेपांना व्यवस्थित उत्तर दिले गेले आहे. शिवसेनेतील त्याचे नेतृत्व सध्यातरी बळकट झाले आहे. त्याच्या नेतृत्वाखाली, बाळ ठाकरे नसताना, 'मोदी लाटे'च्या विरोधात एकट्याने लढून ~६० जागा मिळाल्या हे लक्षणीय यश आहे असे मला वाटते. त्यामुळे भाजप बहुमतापासून रोखला गेला हे कुणाकुणाला आवडले नाही तरी उद्धवसाठी (बाळासाहेबांच्या अनुपस्थितीत) स्वतःला सिद्ध करणे भाग होते ते त्याने केले आहे असे या निकालांतून दिसून येते.

थोडक्यात उद्धव वाटतो तितका भोट नाही इतके या निकालांनी स्पष्ट होत आहे.

श्रीगुरुजी's picture

24 Oct 2014 - 1:05 pm | श्रीगुरुजी

>>> ३. उद्धवला मुख्यमंत्री व्हायचे होते. धाकट्या भावाची भूमिका घेऊन ते मिळालेच नसते. त्यामुळे त्यांना हा जुगार खेळणे भागच होते.

धाकट्या भावाची भूमिका घेऊन मुख्यमंत्रीपद मिळालेच नसते. स्वतंत्र लढूनही ते मिळाले नसते. जर मोठ्या भावाची भूमिका कायम ठेवून भाजपने दिलेला १२५-१४५-१८ हा फॉर्म्युला स्वीकारला असता तरच भाजपपेक्षा २० जागा जास्त लढवायला मिळाल्याने भाजपपेक्षा शिवसेनेच्या जास्त जागा जिंकून आणणे शक्य झाले असते. हा फॉर्म्युला मान्य करून शिवसेनेची मोठ्या भावाची झाकली मूठ झाकलेलीच असती आणि आपण २४ जागा सोडून भाजपवर उपकार करत आहोत असे मिरविता आले असते व त्याच्या बदल्यात महत्त्वाची मंत्रिपदे, सभापतीपद, महामंडळाची अध्यक्षपदे इ. पदे मागून घेता आली असती.

आता स्वतंत्र लढल्याने शिवसेनेच्या सामर्थ्याची झाकली मूठ उघड झाली, मोठ्या भावाची भूमिका कायमची संपली, मुख्यमंत्रीपद गेलेच आणि आता भाजपकडून अवहेलना सहन करावी लागत आहे.

उद्धव ठाकरे खेळले तो जुगार नसून आत्मघात होता.

>>>> जुगार खेळून मुख्यमंत्री होता आले नसले तरी इतर आक्षेपांना व्यवस्थित उत्तर दिले गेले आहे. शिवसेनेतील त्याचे नेतृत्व सध्यातरी बळकट झाले आहे. त्याच्या नेतृत्वाखाली, बाळ ठाकरे नसताना, 'मोदी लाटे'च्या विरोधात एकट्याने लढून ~६० जागा मिळाल्या हे लक्षणीय यश आहे असे मला वाटते.

शिवसेनेत त्यांच्या नेतॄत्वाला आव्हानच नव्हते. त्यामुळे त्यांचे नेतृत्व बळकट झाले आहे या विधानाला अर्थ नाही. आघाडी सरकारविरोधात इतकी प्रचंड लाट होती की त्यामुळेच शिवसेनेला स्वतंत्र लढूनही ६३ जागा मिळाल्या. जर १२५-१४५-१८ असे जागावाटप असते तर शिवसेनेला किमान १०० जागा मिळाल्या असत्या.

>>> त्यामुळे भाजप बहुमतापासून रोखला गेला हे कुणाकुणाला आवडले नाही तरी उद्धवसाठी (बाळासाहेबांच्या अनुपस्थितीत) स्वतःला सिद्ध करणे भाग होते ते त्याने केले आहे असे या निकालांतून दिसून येते.

स्वतःला सिद्ध करताना उद्धवमुळे शिवसेनेची मात्र वाट लागली. एकतर मोठ्या भावाचे स्थान कायमचे गमावले, भाजपपेक्षा आम्ही ताकदवान आहोत हा २५ वर्षे जोपासलेला भ्रम उघडकीला आला, कोकण वगळता सर्वत्र भाजप शिवसेनेपेक्षा ताकदवान आहे हे दिसून आले, भाजप नेतृत्वाविरूद्ध असभ्य व नकारात्मक प्रचारामुळे मतदारांची नाराजी पत्करावी लागली, कायम गुर्मीत वावरणार्‍या शिवसेनेला आता भाजपच्या नाकदुर्‍या काढाव्या लागत आहेत आणि भविष्यात मुंबई व इतर महापालिकातील सत्ता टिकविण्यासाठी शिवसेनेला कायम भाजपचे पाय धरावे लागतील.

स्वतःला सिद्ध करण्याच्या नादात उद्धवने पक्ष कमकुवत केला.

>>> थोडक्यात उद्धव वाटतो तितका भोट नाही इतके या निकालांनी स्पष्ट होत आहे.

उद्धव वाटतो त्याच्यापेक्षा जास्त अप्रगल्भ व लघुदृष्टीचा आहे हे या निकालांनी स्पष्ट होत आहे.

तिमा's picture

23 Oct 2014 - 11:00 am | तिमा

मनसे आणि आप पक्ष आता एकत्र येऊन 'मनस्ताप' पक्ष स्थापन करणार आहेत.

पिंपातला उंदीर's picture

23 Oct 2014 - 4:42 pm | पिंपातला उंदीर

थत्ते यांच्याशी सहमत . आणि एका निवडणुकी मधल्या पिछेहाटिने पक्ष संपत नसतात . ना मनसे संपेल आणि शिवसेना तर नाहीच नाही . जोपर्यंत महानगरामध्ये भूमिपुत्रांचे मुद्दे आहेत तोवर या पक्षाना मरण नाही . १९८४ मध्ये २ जागांवर सिकुडलेली भाजप आज पूर्ण बहुमताने देशात सत्तेवर आहे आणि ज्यांचा मृत्युलेख माध्यमांनी लिहून ठेवला होता त्या कॉंग्रेस ने २००४ साली वाजपेयी यांच्यासारख्या दिग्गजाला धूळ चारली होती . ज्या राणे यांनी २००४ साली शिवसेनेला सिंधुदुर्ग मधून संपवून टाकल होत त्याच शिवसेनेने राणे याना १० वर्षानंतर का होईना पण भुइसपाट केल . त्यामुळे एका पराभवाने पक्ष संपत नसतात . शिवसेना आज बाळासाहेबांच्या काळात पण नव्हती . मुंबई -ठाणेमहानगरपालिका , १८ खासदार , ६३ आमदार आणि अनेक स्वराज्य संस्था मध्ये असणारा पक्ष एका रात्रीत नाही संपणार . राज ठाकरे पण चाणाक्ष राजकारणी आहेत .आता त्यांनी तळ गाठला आहे . त्याना माहित आहे कि आता गमावण्यासारखे त्यांच्याकडे काही फार नाही . ते नक्कीच bounce back करतील . महाराष्ट्राच्या जनतेला जेन्व्हा त्यांची गरज वाटेल तेंव्हां ते पुन्हा वापसी करतील . बाकी एका निवडणुकी मधल्या यशा अपयशाने महाराष्ट्रात मोदी लाट आहे असे म्हणे किंवा शिवसेना -मनसे - कॉंग्रेस -राष्ट्रवादी संपले अशा हाकाटी करणे कितपत योग्य ठरेल ?

श्रीगुरुजी's picture

24 Oct 2014 - 1:10 pm | श्रीगुरुजी

>>> मुंबई -ठाणेमहानगरपालिका , १८ खासदार , ६३ आमदार आणि अनेक स्वराज्य संस्था मध्ये असणारा पक्ष एका रात्रीत नाही संपणार . राज ठाकरे पण चाणाक्ष राजकारणी आहेत .आता त्यांनी तळ गाठला आहे . त्याना माहित आहे कि आता गमावण्यासारखे त्यांच्याकडे काही फार नाही . ते नक्कीच bounce back करतील . महाराष्ट्राच्या जनतेला जेन्व्हा त्यांची गरज वाटेल तेंव्हां ते पुन्हा वापसी करतील .

एका रात्रीत हा पक्ष संपणार नाही. परंतु शिवसेनेबरोबरच महाराष्ट्रातील इतर प्रादेशिक पक्षांच्या अंताची ही सुरूवात आहे. पुढील काळात हे पक्ष हळूहळू कायमचे संपतील किंवा इतर मोठ्या पक्षात विलीन होतील किंवा आपापसात विलीन होतील किंवा शेकापसारखे कोमात असणारे मृतप्राय पक्ष होतील.

विकास's picture

24 Oct 2014 - 7:10 pm | विकास

नितिनराव आणि पिंपातला उंदीर यांच्याशी सहमत. वर "पिंपातला उंदीर" यांनी अनेक उदाहरणे दिली आहेतच. त्यात भर आणि निव्वळ उदाहरण म्हणून एशिअन एज मधील The isolated man of Indian politics लेख पहा. २०१२ च्या या लेखात लेख लिहीणार्‍या विचारवंताने मोदी कसे संपले ("They, and he, must know that his political career is now almost over") असे शेवटच्या परीच्छेदात खूप छान पटवून दिले आहे. सध्या या महाशयांचे journalistic career केवळ व्टिटर ब्लॉग पुरतेच मर्यादीत असावे. ;)

या पुढचा काळ हा राजकारण्यांसाठी पुर्वीसारखा सोपा असेल असे वाटत नाही. काम करा नाहीतर घरी बसा ही अवस्था येऊ शकेल. त्यात कुठलिही तडजोड केली जाण्याची लक्षणे नाहीत. मोदी हे जाणून आहेत आणि त्या दिशेने प्रयत्न करत आहेत, तीच कथा विशेष करून शिवराजसिंग चौहान आणि मनोहर पर्रीकरांची आहे असे वाटते. इतरांचे माहीत नाही... महाराष्ट्रात जो कोणी मुख्यमंत्री होईल त्याला देखील असेच जागून काम करावे लागेल. नाहीतर पुढच्या वेळेस नारळ मिळेल.

ही गोष्ट विशेष करून राज ठाकर्‍यांना समजली तर त्यांना आणि त्यांच्या पक्षाला परत भवितव्य येईल. नाहीतर मनसेचा पण समाजवादी नसून समाजवादी पक्षांसारखी अवस्था होईल ... इतिहासजमा.

शिवसेनेकडे आत्ता स्थानिकपातळीवर सत्ता आहे आणि अगदी युतित जायचे नाही ठरवले तरी प्रमुख विरोधीपक्ष म्हणून काम करता येईल आणि अजून मोठे होता येईल. पण त्यासाठी पारंपारीक जमिनदारी माज आणि आळस यांना कायमचे गाडावे लागेल. नाहीतर बापाने कमावले आणि पोराने (आणि नातवाने) गमावले होईल.

असो.

हुप्प्या's picture

23 Oct 2014 - 8:49 pm | हुप्प्या

शिवसेनेने मोदी व भाजपाबद्दल सभ्यतेची पातळी सोडून वाईट भाषा वापरली ह्याचा त्यांना फटका बसला असेलच. मोदींचा बाप काढणे, एका संघाचा वारसा सांगणार्‍या नेत्याला अफझलखान वगैरे उपमा देणे ह्याने संघावर श्रद्धा असणारा एक वर्ग शिवसेनेच्या विरोधात गेला. हे असंस्कृतपणाचे प्रदर्शन प्रगल्भतेचे लक्षण नव्हे.
मुंबई महानगरपालिका इतकी वर्षे आपल्या हातात असताना काही चांगले करुन दाखवायचे नाही, निव्वळ बाळासाहेब अमुक बाळासाहेब तमुक करुन उमाळे काढायचे. हे काही वर्षे चालेल पण नंतर जनता कामाकडेच बघणार.
जर निव्वळ माज, शिवराळ आणि आक्रमक भाषा, भाषणावळ्या आणि विरोधकांना लाथाळ्या इतकेच भांडवल असेल तर शिवसेनेची घसरण होतच राहील.
प्रचाराला वेळ कमी असताना भाजपावर तोंडसुख घेण्यात उद्धव ठाकरेने वेळ वाया घालवलाच पण नुकसानही करुन घेतले. एखाद्या पक्षाचा सर्वेसर्वा बनण्यातला तोटा असा आहे की तुम्ही काहीतरी चूक करताय असे सांगणारा कुणी उरत नाही. तळागाळातून वर येऊन सर्वश्रेष्ठ पदावर बसणे वेगळे आणि निव्वळ वारसाहक्काने बसणे वेगळे.

विकास's picture

23 Oct 2014 - 9:48 pm | विकास

एखाद्या पक्षाचा सर्वेसर्वा बनण्यातला तोटा असा आहे की तुम्ही काहीतरी चूक करताय असे सांगणारा कुणी उरत नाही. तळागाळातून वर येऊन सर्वश्रेष्ठ पदावर बसणे वेगळे आणि निव्वळ वारसाहक्काने बसणे वेगळे.

+१ सहमत

नितिन थत्ते's picture

26 Oct 2014 - 10:59 am | नितिन थत्ते

>>एका संघाचा वारसा सांगणार्‍या नेत्याला अफझलखान वगैरे उपमा देणे ह्याने संघावर श्रद्धा असणारा एक वर्ग शिवसेनेच्या विरोधात गेला. हे असंस्कृतपणाचे प्रदर्शन प्रगल्भतेचे लक्षण नव्हे.

अफझलखान म्हटले नसते तर (भाजप-सेना युती नसताना) हा वर्ग शिवसेनेच्या बाजूस राहणार होता का?

पिंपातला उंदीर's picture

26 Oct 2014 - 11:05 am | पिंपातला उंदीर

लोळलो हसून हसून

बॅटमॅन's picture

26 Oct 2014 - 12:51 pm | बॅटमॅन

ठ्ठो =))

प्रसाद१९७१'s picture

24 Oct 2014 - 2:16 pm | प्रसाद१९७१

बसप ला ७% पेक्षा जास्त मत मिळाली आहेत, ह्या कडे सर्वच लोक दुर्लक्ष करत आहेत. मनसे पेक्षा पण दुप्पट.
काँ आणि राकॉ संपले तर बसप आणि भाजप अशीच फाईट् होईल.

क्लिंटन's picture

29 Oct 2014 - 1:53 pm | क्लिंटन

उध्दव ठाकरेंच्या उध्दटपणामुळे आता शिवसेनेपुढे वेगळीच समस्या निर्माण झाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या सर्वच मंत्री-नेत्यांची अफझल खानाच्या फौजांशी तुलना करणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी माफी मागितल्याशिवाय शिवसेना-भाजप युतीचे घोडे पुढे सरकणार नाही, असा स्पष्ट संदेश भाजप हायकमांडने दिल्याचे वृत्त आहे असे मटामध्ये आले आहे.

आता यावर उध्दव ठाकरे समर्थकांचे काय म्हणणे आहे हे बघणे इंटरेस्टींग ठरेल.

अनुप ढेरे's picture

29 Oct 2014 - 2:35 pm | अनुप ढेरे

माफी बिफी प्रकार उगाच आहे. निवडणूकीत सगळेच दुसर्‍याला शिव्या घालत असतात. त्यात माफी काय मागायची.

कपिलमुनी's picture

29 Oct 2014 - 2:35 pm | कपिलमुनी

ठाकरे माफी मागणार नाहीत . भाजपाने एवढा माज दाखवणे चुकीचा आहे.

भाजपाचे मराठी मतदार यामुळे दूर जाणार आहेत आणि राष्ट्रवादीच्या पाठींब्यावर सरकार स्थापन केले तर संघीय मतदार दूर जातील .

अविनाशकुलकर्णी's picture

29 Oct 2014 - 5:38 pm | अविनाशकुलकर्णी

श्री उद्धव सभ्य सामाजिक संकेत विसरले.
माननिय मु.म श्री देवेन याना अभि नंदनाचा फोन पण केला नाहि..
ना कुठल्या नेत्याने केला..्ना सामना तुन लेख लिहिला
खर तर उद्धव यानी पुष्पगुछ्छ देऊन अभिनंदन करणे अभिप्रेत होते..
त्याला मन विशाल लागते ...
असो..

श्रीगुरुजी's picture

29 Oct 2014 - 9:09 pm | श्रीगुरुजी

भाजप जरा जास्तच माज करत आहे. निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेचा नक्षा बर्‍यापैकी उतरलेला दिसत आहे. अशावेळी मोठेपणाचा आव आणून शिवसेनेला बरोबर घेणे हेच योग्य ठरेल.

अर्धवटराव's picture

29 Oct 2014 - 9:30 pm | अर्धवटराव

पवार साहेब काहिच काहि कुरबुर न करता पाच वर्षं सरकार टिकु देतील आणि राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचारावर पांघरुण घालण्याचं पाप जनता सहज माफ करेल अशा भ्रमात जर भाजपश्रेष्ठी असतील तर अवघड आहे. सेनेची झाली तेव्हढी शोभा पुरे. भाजपने थोरल्या भावाचे मोठेपण कृतीने सिद्ध करायची संधी गमवु नये.

झालेल्या घटनांवरून असेच म्हणता येईल की, राजकारणात छोटा भाऊ-मोठा भाऊ असे काही नसते. असतात ती फक्त राजकीय समीकरणं. म्हणूनच मला युतीमध्ये सारे काही आलबेल होते आणि ती केवळ जागा वाटपावरून तुटली असे वाटत नाही.

उद्भवलेल्या सध्य परिस्थितीत उद्धवला माफी मागणं भाग आहे. त्याला दोन कारण आहेत. पहिलं म्हणजे, एक जमाना होता तेव्हा सेना नेत्यांची निष्ठा बाळासाहेबांवर होती. आत्ताचे किती नेते उद्धववर आणि "बाळराजेंवर" निष्ठा ठेवतील ही शंका आहे. निष्ठा जरी काही विचारांवर असली तरी, खास करून पक्षाचं भवितव्य अंधारात असताना बराचकाळ सत्तेबाहेर राहणं ही पण एक कसोटीच असेल. दुसरं म्हाणजे, भाजपाच्या पाठींब्यावर चालू असलेल्या महानगर पालिकेच्या राज्यकारभारातून पक्ष चालवायला मिळणा-या "रसदीवरही" त्याचा परिणाम होईल. एकूणच ताठरपणामुळे सगळीकडून कोंडी होईल. जर नमतेपणा नाही घेतला तर पक्ष फुटायला आणि काही भागांपुरताच /महानगरपालिकेपुरताच शिल्लक रहायला वेळ लागणार नाही. एकूणात "पवार प्ले" मुळे आणि भाजप हायकमांडच्या संबंध ताणण्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीचा एक प्रतिस्पर्धी दुस-या एका प्रतिस्पर्ध्याकडून कमकूवत होण्याची शक्यता जास्त वाटते.

बाकी, "हाय कमांड" आणि त्याअनुशंघाने येणारे "गटबाजीचे राजकारण" म्हटल्यावर याआधी एकच पक्ष माझ्या डोळ्यासमोर यायचा. सेना कमकुवत झाली की, "ॲंटी बिजेपी (कॉमन एनिमी)" अजेंडातून आणि नव्या राजकीय समीकरणातून बाकी पक्ष एकत्र येऊ शकतात. बाय पोल निवडणूकीत त्याची एक चुणूक दिसलीच

आदित्य ठाकरे यांना भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांकडे पाठवणे तसे योग्य होते ( पक्षाचा भावी वारसदार), परंतु आदित्य आणि शिवाजी महाराज यांची तुलना करणे अतिशय अयोग्य असेच होते. निवड्णुकांच्या काळात चायवाला प्रंतप्रधान असे सांगणे, त्यांच्या वडिलाचा उद्धार करणे हे अयोग्य असे होते.

आतातरी सर्वच नेत्यांनी सभ्यपणे आणि सुसंस्कृत वागणे असेच अपेक्षित आहे.