✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

उद्धव ठाकरेंना कुणीतरी जागे करेल काय ?

ज
जीएस यांनी
Tue, 10/21/2014 - 05:57  ·  लेख
लेख
उद्धव ठाकरेंना कुणीतरी जागे करेल काय ? उद्धव ठाकरेंच्या एका घोडचुकीने विधानसभेत शिवसेनेला बलवान बनवण्याची आणि ज्या मुख्यमंत्रीपदासाठी ते एवढे आतुर झाले होते ते पद मिळवण्याची दारी चालून आलेली संधी त्यांनी दवडली आहे. आता त्यांची आणखी एक घोडचूक शिवसेनेचे फार मोठे खच्चीकरण करू शकते. कसे ते सांगण्यासाठी मी राजकीय परिस्थितीचे माझ्या प्रदीर्घ अनुभवाद्वारे विश्लेषण वगैरे करणार नाही कारण ते किती सापेक्ष असते हे आपण विविध विश्लेषकांचे लेख वाचून अनुभवतो आहोत. मी फक्त निकालाच्या आकड्यांचा आधार घेऊन, आकडे काय दाखवतात ते लिहिणार आहे. उद्धव ठाकरेंची पहिली घोडचूक: युती तुटू देणे. युती खरच कोणी तोडली हा वाद न संपणारा आहे. आकड्यांचा मुद्दा काय होता ते बघू. (१) २००९ मध्ये शिवसेना १६० आणि भाजप ११९ अशा जागा लढवल्या होत्या. तेंव्हाही कमी जागा लढवून भाजपाने जास्त जागा जिंकल्या होत्या. (२) २०१४ मध्ये मोदी या घटकाने भाजपाची तुलनात्मक ताकद भरपूर वाढली होती हे लोकसभा निकालांनी स्पष्ट झाले होते. (३) या पार्श्वभूमीवर भाजपने आधी समसमान म्हण्जे १३५-१३५ जागा लढवू अशी मागणी केली होती. आणि नंतर शिवसेना १४० - भाजपा १३० याला सुद्धा तयारी दाखवली होती. शिवसेनेने ९ जागा इतर मित्रपक्षांना देऊन १५१ चा आकडा लावून धरला होता. (४) उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचेच होते, तेंव्हा भाजपापेक्षा जास्त जागा मिळवल्याच पाहिजेत हे त्यांना आवश्यक होतेच, त्यात काही गैर नाही पण शिवसेनेची आणि भाजपाची तुलनात्मक ताकद काय आणि त्या प्रमाणात न्याय्य जागावाटप होणे आवश्यक होते जे उद्धव ठाकरेंनी साफ धुडकावून लावले. ११९:१५१ प्रमाण न्याय्य होते की १३०:१४० न्याय्य होते हे आपण निकालाच्या विश्लेषणात बघूया. (५) भाजपाला १२२ जागा मिळाल्या आणि शिवसेनेला ६३. शिवाय ३४ ठिकाणी भाजपा शिवसेनेच्या पुढे आणि दुसर्‍या स्थानावर आहे, तर ३५ ठिकाणी शिवसेना दुसर्‍या स्थानावर आणि भाजपाच्या पुढे आहे. म्हणजे भाजपा शिवसेना प्रमाण १५६:९८ आहे. (६) भाजप तर यापेक्षा फारच कमी जागा मागत होता. त्या नाकारण्यामागे उद्धव ठाकरेंचा इगो होता की संजय राउतने केलेली दिशाभूल होती की काही डावपेच होते की वस्तुस्थितीचे भान नव्हते याचे उत्तर शिवसेनेच्या आतल्या गोटातीलच देऊ शकतील. पण त्या नाकारून उद्धव ठाकरेंनी स्वतःच्या पायावर कसा धोंडा पाडून घेतला ते मात्र आता आपण पुन्हा आकड्यांद्वारे बघू शकतो. जर भाजप शिवसेना युती १३०:१४० या प्रमाणात झाली असती तर काय झाले असते ? (७) सध्या मिळालेल्या जागा. भाजप १२२, शिवसेना ६३. (८) शिवसेना भाजप एकत्र असते आणि राष्ट्रवादी व कॉंग्रेस एकत्र असते तर दोघांना आता मिळालेल्या मतांची बेरीज करता शिवसेनेला २२ आणि भाजपाला १६ जागा अधिक मिळाल्या असत्या. म्हणजे भाजप १३८ आणि शिवसेना ८५. (९) भाजपने २००९ मध्ये लढवलेल्या ५ जागांवर शिवसेनेला यंदा विजय मिळाला. जर युती असती तर या जागा भाजपाकडे असत्या. म्हणजे भाजप १३८+५=१४३ आणि शिवसेना ८५-५=८०. (१०) शिवसेनेने २००९ मध्ये लढवलेल्या ३९ जागांवर भाजपला विजय मिळाला. जर युती असती तर या जागा शिवसेनेकडे असत्या. पण युती झाली असती तर शिवसेनेने १३०-११९ म्हणजे ११ जागा भाजपाला लढायला दिल्या असत्या त्यातील साधारण ७ जागांवर भाजप जिंकला असे धरले तर उरलेल्या ३९-७=३२ जागांवर शिवसेना निवडून आली असती. म्हणजे भाजप १४३-३२=१११ आणि शिवसेना ८०+३२=११२. (११) यात एक दोन जागांची चूक होण्याची शक्यता गृहीत धरुनही हे पुरेसे स्पष्ट होते की १३०:१४० तत्वावर युती झाली असती तर शिवसेनाही भाजपएवढीच ताकदवान असती, युतीकडे मित्रपक्ष वगळूनही २२३ एवढे मोठे मताधिक्य असते आणि उद्धव ठाकरेंना हवे असलेले मुख्यमंत्रीपद मिळण्याचीही ५०% तरी शक्यता होती. शिवाय स्वबळावर न लढल्याने शिवसेनेची झाकली मूठ मोठ्या भावाची राहिली असती. जी आता १५६:९८ या प्रमाणामुळे किमान पुढच्या निवडणूकीपर्यंत तरी फारच लहान भावाची झाली आहे. (१२) दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आकडे काय म्हणतात हे समजून न घेताच शिवसेना आणि त्यांचे समर्थक स्तंभलेखक अजूनही खंजीर, आम्ही मोठे भाऊ, दिल्ली विरुद्ध महाराष्ट्र यातच रममाण झाले आहेत. निवडणूक प्रचारातही दोन पक्षांच्या जागावाटपाच्या भांडणात नक्की चूक कुणाची ? शिवसेना नेत्याचा अपमान म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचा अपमान !!! किंवा धाकल्या बाळराजांना 'काका, काका' म्हणत दुडूदुडु धावत जाऊन बसायला आज भाजपमध्ये मांडी शिल्लक राहिली नाही !!! हे महाराष्ट्रापुढच्या खर्‍या आव्हानांचा काहीही संबंध नसलेले पक्ष व व्यक्तीकेंद्रित मुद्दे उगाळले गेले तेंव्हाच उद्धव ठाकरे वास्तवपासून किती दूरच्या जगात वावरत आहेत याचे दर्शन घडले होते. पुन्हा घोडचुकीकडे (१३) शिवसेनेची निकालानंतरची वक्तव्ये व सामनामधील लेख पाहिले तर त्यांना अजूनही वस्तुस्थितीचे भान आले आहे असे दिसत नाही. (१४) भाजपला बहुमतासाठी फक्त २२ जागा कमी पडत आहेत. त्यात १० अपक्षांनी आणि ४१ सदस्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा जाहीर केला आहे. ( भाजपने हा पाठिंबा घेणे योग्य आहे असे माझे म्हणणे नाही. ज्यांच्याविरुद्ध लढले म्हणून लोकांनी साथ दिली त्यांच्याच पाठिंब्याने सरकार स्थापन करायचे असला केजरीवालछाप अनैतिक संधीसाधूपणा भाजपने करू नये असे मला वाटते, पण तो या लेखाचा विषय नाही) (१५) आता आम्ही आधी भाजपशी बोलणार नाही. उपमुख्यमंत्रीपद हवेच. विशिष्ट खाती हवीच वगैरे अडवणूक केल्यास आता अशी चूक शिवसेनेला पुढच्या पाच वर्षात मोठ्या खच्चीकरणाकडे नेऊ शकते याचे भान असलेल्या कुणीतरी उद्धवजींना जागे करून वस्तुस्थितीच्या जगात आणण्याची गरज आहे असे वाटते. हे जागे करण्याचे काम कुणी करेल काय ? -जीएस
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
राजकारण
लेखनप्रकार (Writing Type)
विचार

प्रतिक्रिया द्या
54468 वाचन

💬 प्रतिसाद (186)

प्रतिक्रिया

झोपलेल्याला जागं करता येतं

कॅप्टन जॅक स्पॅरो
Tue, 10/21/2014 - 08:06 नवीन
झोपलेल्याला जागं करता येतं झोपेचं सोंग घेतलेल्याला नाही.
  • Log in or register to post comments

अतिशय छान आणि उत्तम विश्लेषण

खटपट्या
Tue, 10/21/2014 - 08:23 नवीन
अतिशय छान आणि उत्तम विश्लेषण !!
  • Log in or register to post comments

+१

शिद
Tue, 10/21/2014 - 15:28 नवीन
+१ अवांतरः सगळेच मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसण्यास उत्सुक आहेत. उप-मुख्यमंत्र्यांची खुर्ची अजूनपण ओली आहे की काय? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

लैच इंटेलिजन्ट..

चिगो
Wed, 10/29/2014 - 16:41 नवीन
उप-मुख्यमंत्र्यांची खुर्ची अजूनपण ओली आहे की काय?
:D =)) लै म्हंजे लैच इंटेलिजन्ट टायपातला जोक आहे की हो.. मला कळायलाच दोन मिनटं लागली..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिद

:D =)) :D =)) :D =)) :D

बॅटमॅन
Wed, 10/29/2014 - 16:52 नवीन
=)) :D :D =)) =)) :D :D =)) =)) :D :D =)) =)) :D :D =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिगो

हा हा हा...धन्यवाद.

शिद
Wed, 10/29/2014 - 17:26 नवीन
हा हा हा...धन्यवाद. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिगो

छान लेख..! विश्लेषण आवडलं...

पिलीयन रायडर
Tue, 10/21/2014 - 09:17 नवीन
छान लेख..! विश्लेषण आवडलं...
  • Log in or register to post comments

विश्लेषण आवडलं...

मदनबाण
Tue, 10/21/2014 - 09:23 नवीन
विश्लेषण आवडलं...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :-US fund flow into Pakistan occupied Kashmir dam floods Delhi with concern
  • Log in or register to post comments

दिवाळीपर्यंत शिवसेनेने

आनन्दा
Tue, 10/21/2014 - 09:41 नवीन
दिवाळीपर्यंत शिवसेनेने कोणताही निर्णय घेतला नाही आणि त्यानंतर जर शिवसेनेत मोठी फूट पडली तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. ६०/३ = २०, आणि १२३ + २० = १४३. तेव्हा शिवसेनेने सावध व्हावे हेच उत्तम.
  • Log in or register to post comments

दुश्यन्त यांनी येथे दिलेल्या

आनन्दा
Tue, 10/21/2014 - 16:35 नवीन
दुश्यन्त यांनी येथे दिलेल्या खुलाश्यानुसार मी माझे शब्द मागे घेत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा

अतिशय उत्तम विश्लेषण. खर तर

सुहास पाटील
Tue, 10/21/2014 - 10:09 नवीन
अतिशय उत्तम विश्लेषण. खर तर उद्धव ठाकरे ला अजुंनहि कळत नाही कि महाराष्ट्राच्या जनतेला काय हवय. पण त्याच्या अडमुढ्या भूमिकेमुळे उगाचच भाजप ला राष्ट्रवादीचा सपोर्ट घ्यावा लागेल.
  • Log in or register to post comments

पवरांची खेळी

अमित मुंबईचा
Tue, 10/21/2014 - 10:17 नवीन
एका बातमी अनुसार शरद पवार स्वतहाचेच आमदार फोडून भाजपा ला समर्थन देऊ शकतात
  • Log in or register to post comments

चायला हे झाले तर हैट्ट असेल..

टवाळ कार्टा
Tue, 10/21/2014 - 10:25 नवीन
चायला हे झाले तर हैट्ट असेल...काही नेम नाही पवारांचा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमित मुंबईचा

गोलमाल

अमित मुंबईचा
Tue, 10/21/2014 - 10:51 नवीन
शिवाय एका वर्षानंतर केंद्रात सपोर्ट देऊन एक कॅबिनेट व एक राज्यमंत्री पद मागण्याची चिन्ह आहेत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

तरीही भाजप दूरान्वयेदेखील

आनन्दा
Tue, 10/21/2014 - 10:57 नवीन
तरीही भाजप दूरान्वयेदेखील राकाँचा पाठिंबा घेईल असे वाटत नाही. याचे कारण म्हणजे भाजपाला महाराष्ट्रात किमात १० वर्षे तरी सत्तेत राहण्याची आशा आहे. अश्यावेळी ते राष्ट्रवादीचा पाठिंबा घेण्याची चूक करणार नाहीत. भाजपाच्या सामान्य मतदारांचा राष्ट्रवादीवर राग आहे. अश्यावेळेस जर त्यांचाच पाठिंबा घेतला तर हा परंपरागत मतदार भाजपापासून दूर जायची शक्यता आहे. बहुधा १० दिवसात ते याचाच कानोसा घेणार असतील, म्हणूनच निर्णय दिवाळीच्या पुढी ढकलला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

जर भाजप शिवसेना युती १३०:१४०

आनन्दा
Tue, 10/21/2014 - 11:03 नवीन
जर भाजप शिवसेना युती १३०:१४० या प्रमाणात झाली असती तर काय झाले असते ?
हा लेख लिहिल्याबद्दल धन्यवाद. मी अश्याच एका विश्लेषणाची वाट बघत होतो
  • Log in or register to post comments

शरद पवार आणि सत्ता असे समिकरण

मदनबाण
Tue, 10/21/2014 - 11:29 नवीन
शरद पवार आणि सत्ता असे समिकरण राष्ट्रवादीच्या जन्मापासुनच आहे ! मला वाटत नाही की हा पक्ष स्थापने पासुन सत्ते पासुन दुर राहिला असेल ! तसेही भाजपला बिनशर्त पाठिंबा आधी दर्शवुन त्यांनी पहिली खेळी खेळलीच आहे,यात दोन गोष्टी साध्य करता येतील. १} महाराष्ट्रातले यांचे अडकलेले मंत्री अडचणीत येउ नये याची दक्षता २} केंद्रात प्रफुल्ल पटेल एअर इंडियाच्या ७२०० कोटी तोट्याला कारणीभूत ठरले आहेत म्हणे ! त्यामुळे तिकडे त्यांचे विमान कोसळु न देणे. आता शिवसेनेने आडमुठेपणा केला तर भाजपला { जरी लोक भाजपा+राष्ट्रवादी या युतीस अनुकुल नाहीत} शिवसेनेवर खापर फोडुन कोणत्याही अटीविना आणि न मागता दिलेल्या पाठिंब्यामुळे राष्ट्रवादी बरोबर नाइलाजाने जावे लागते आहे अशी घोषणा सुद्धा करतील. तिकडे मग शिवसेनेला हात चोळत बसुन "सामना" मधुन अफजल खान आणि त्यांचे सौन्य अशी आरडा-ओरडी करण्या पलिकडे काही करु शकणार नाहीत... शिवाय पक्षात मोठी फुट निर्माण होण्याची भिती निर्माण होइल ती वेगळी ! { हल्ली पक्षाची विचार सरणी वगरै सगळे फाट्यावर मारुन सत्ता / खुर्ची कशी मिळेल ? हेच पाहिले जाते} तेव्हा दिवाळीत पक्षाचे दिवाळे तर निघणार नाही याची काळजी पक्ष प्रमुख घेतील अशी आशा आहे. आता भाजपासाठी :- २५ वर्ष युती असलेल्या सेने बरोबर परत युती केल्यास त्यांच्या विरुद्ध जनक्षोभ उसळणार नाही, शिवाय पवार कधी उडी मारतील त्याचा काही भरवसा नाही ! पण सध्या राष्ट्रवादीच्या नाड्या आवळण्याची शक्ती मात्र त्यांच्याच हातात आहे, हे शिवसेनेला कळु नये याचे मात्र नवल वाटते.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :-US fund flow into Pakistan occupied Kashmir dam floods Delhi with concern
  • Log in or register to post comments

शरद पवार नावचे ग्रहण

समीरसूर
Tue, 10/21/2014 - 12:32 नवीन
शरद पवार नावाचे ग्रहण लागले आहे महाराष्ट्राला. ते सुटेल तो खरा महाराष्ट्रासाठी सुदिन म्हणावा लागेल. इतका अतिभयंकर स्वार्थी, सत्तापिपासू, कुठल्याही परिस्थितीत फक्त स्वतःच्या फायद्याचा विचार करणारा, कुटिल, कारस्थानी, विश्वासघातकी, निर्लज्ज, जनतेची आणि राज्याची कवडीमात्र काळजी नसणारा पाताळयंत्री नेता महाराष्ट्रात दुसरा झाला नाही आणि होणारही नाही. ६२ वरून ४१ वर आले तरी राष्ट्रवादीचा माज जात नाही. आमचा जनाधार वाढला आहे म्हणे! किती हा निर्लज्जपणा! सगळीकडून राष्ट्रवादीची छीथू होत असते तरी यांची मुजोरी जात नाही. आपली जनता एक मूर्ख आहे; अजून या मतलबी आणि गुंडांच्या पक्षाला मते देते. हा पक्ष नेस्तनाबूत व्हायलाच हवा. त्याशिवाय महाराष्ट्राचे भले होणे नाही.याखेपेस भाजपने जर राष्ट्रवादीचा आधार घेतला तर भाजपची गत काँग्रेससारखीच होईल आणि पुढच्या खेपेस भाजप आऊट होणार हे नक्की. उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार, अजित पवार, नारायण राणे...काय साले एक-एक फडतूस नेते मिळाले आहेत महाराष्ट्राला...दुर्दैव महाराष्ट्राचं...दुसरं काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद

मदनबाण
Tue, 10/21/2014 - 13:11 नवीन
उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार, अजित पवार, नारायण राणे...काय साले एक-एक फडतूस नेते मिळाले आहेत हॅहॅहॅ... त्यातही राज ठाकरेंची गंमत वाटते मला ! उद्धव ठाकरेंशी फोनवरील चर्चेत भाजप असेच करणार होती हे मला बाहेर राहुन कळाले ते तुला कसे समजले नाही ? अशा आशयाचा प्रश्न त्यांनी विचारला होता. पण तुमच्या पक्षाचे राम कदम भाजपात का गेले ? तेव्हा हवा नक्की कुठल्या दिशेला वाहतेय हे यांना कळु नये ? ते सुद्धा लोक सभेचे निकाल समोर असताना ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :-US fund flow into Pakistan occupied Kashmir dam floods Delhi with concern
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीरसूर

ह्या गोष्टी मोठ्याने बोल्य नये ! खर्या असल्या तरी....

सामान्यनागरिक
Tue, 10/21/2014 - 18:32 नवीन
शरद पवारांना असली दुष्णे देऊ नये. जरी ती खरी असली तरी आणि तंतोतंत लागु पडत असली तरी ! आपल्या जीवाची काळजी घ्या जरा. एकटे बाहेर पडुनका सरकार स्थापन होई पर्यंत ! आणि तुमच्या गल्लीच्या तोंडाशी असलेल्या एन्सीपीच्या कार्यालयाच्या जवळ फिरकु नका. कोणाचा काय भरवसा ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीरसूर

खरे आहे

समीरसूर
Wed, 10/22/2014 - 09:06 नवीन
ही भीती पण आहेच. :-( आजकाल त्यांना कुणीही दूषणे देतं. आधीचा रुबाब राहिला नाही त्यांचा. ;-) 'जाणत्या राजा'ने एकदा आपल्याविषयी लोकं काय काय बोलतात हे पाहिलं/ऐकलं तरी 'अजूनही जनता माझाच विचार करते म्हणजे माझा जनाधार किती असामान्य आहे हे लक्षात येतं' असं म्हणून ते पुन्हा एकदा खुशीत एखादी चाल खेळण्यासाठी कामाला लागतील. नुसताच शुद्ध धूर्तपणा, दुसरं काहीच नाही! :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सामान्यनागरिक

मधे कोकणात गेलो होतो तेव्हा

जयंत कुलकर्णी
गुरुवार, 10/23/2014 - 16:42 नवीन
मधे कोकणात गेलो होतो तेव्हा कोल्हापूरात चहासाठी एका टपरीत थांबलो होतो. चहावाल्याबरोबर गप्प मारताना नेहमीप्रमाणे गप्पा राजकारणाकडे वळला. शरद पवारांबद्द्ल त्याने जे उदगार काढले ते असे, "अरे बाबा सुईणीला पोटात सापडणार नाही असा माणूस आहे तो '' एक नवी म्हण कळाली आणि त्याचा अर्थही अचूक समजला.... :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीरसूर

"अरे बाबा सुईणीला पोटात

शिद
गुरुवार, 10/23/2014 - 19:59 नवीन
"अरे बाबा सुईणीला पोटात सापडणार नाही असा माणूस आहे तो"
=)) जबरदस्त.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

नवीन म्हण माहित झाली !!

सूड
Fri, 10/24/2014 - 14:01 नवीन
"अरे बाबा सुईणीला पोटात सापडणार नाही असा माणूस आहे तो ''
अशा म्हणी कोकणातऽऽऽच सापडू शकतात !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

प्रतिसाद नीट वाचा!

बॅटमॅन
Fri, 10/24/2014 - 14:13 नवीन
जयंतराव थांबले होते कोल्लापुरात. तस्मात म्हण आहे ती कोल्लापुरातली. हां आता कोल्लापूर कोकणात आहे असं म्हणायचं असेल तर मग हर्कत नाही. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

हे कोल्लापूर आमच्या कोकनाला

खटपट्या
Fri, 10/24/2014 - 23:33 नवीन
हे कोल्लापूर आमच्या कोकनाला लागून हाये. आणि आमी बर्याच येळंला कोल्लापूर मार्गे कोकनात उतर्तो. सांप्रत हि म्हण मलकापूर मार्गे कोकणात उतरली असावी. असा अंदाज हाये. अधिक सन्शोधण चालू हाये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

आमचे गाव अस्सल कोकणात देवगड

llपुण्याचे पेशवेll
Sat, 10/25/2014 - 13:18 नवीन
आमचे गाव अस्सल कोकणात देवगड तालुक्यात असून आमचे गाव एकेकाळी कोल्हापूर झिल्ल्यात होते असे लिखित पुरावे आहेत. गावातले इनामदार आणि मिरासकीवर कोल्लापूरकर शाहूंची (होय तेच फुले, शाहू वाले) मोहोर मी पाहीली आहे. जुने कागद पत्र कोल्हापूरसंस्थानचे आहे. नंतर कधीतरी या कोकणी लोकांनी गेम करून आमचा गाव कोकणात ओढला. :-) पूर्वी इतर कोकणवाले जसे हुंबईला पळतात तसे आमचे गाववाले आणि आजूबाजूचे लोक कोल्लापुरास पळायचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

भौगोलिक दृष्ट्या जो भाग

खटपट्या
Sun, 10/26/2014 - 06:52 नवीन
भौगोलिक दृष्ट्या जो भाग घाटाच्या खाली आहे तो कोकण असे विभाजन केले गेले बहुदा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

ओह अच्छा. माहितीकरिता धन्यवाद

बॅटमॅन
Sun, 10/26/2014 - 12:42 नवीन
ओह अच्छा. माहितीकरिता धन्यवाद! काही भाग असेल म्हणा कोकणात. एकदम खाली अन एकदम पश्चिमेला आहे कोल्लापूर जिल्हा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

अवश्य. कोल्लापूर कोकणाला

बॅटमॅन
Sun, 10/26/2014 - 12:41 नवीन
अवश्य. कोल्लापूर कोकणाला लागूनच आहे, पण कोकणचा भाग नाही. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

आय मीन कोल्लापुर शहर.

बॅटमॅन
Sun, 10/26/2014 - 12:44 नवीन
आय मीन कोल्लापुर शहर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

खराय

मनिमौ
Tue, 10/21/2014 - 12:04 नवीन
र्‍आ र्का चा स्पोर्त घेऊ नये
  • Log in or register to post comments

तुमि मौतैच्य दुअयदि क?

टवाळ कार्टा
Tue, 10/21/2014 - 13:03 नवीन
तुमि मौतैच्य दुअयदि क?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनिमौ

ऐम आय ऐम चा प्रवेश

मनिमौ
Tue, 10/21/2014 - 12:10 नवीन
ंअला नादेद आनि औरन्गाबाद च्या लोका चि कीव वातते. ़या रझाकारा विर्द्धा मराथ्वादा लधला त्याचा आदर्श थेवलेल्या पक्शाला मतदान करु नये. आसे मला वातते
  • Log in or register to post comments

उत्तम विश्लेषण

समीरसूर
Tue, 10/21/2014 - 12:22 नवीन
आकड्यांच्या आणि गणिताच्या आधारे ठोस विश्लेषण!! आवडले आणि पटलेदेखील...
  • Log in or register to post comments

उत्तम

क्लिंटन
Tue, 10/21/2014 - 12:36 नवीन
जबरदस्त विश्लेषण जी.एस. अशा प्रकारचे विश्लेषण मला करायचे होते पण गेल्या दोन दिवसात ते करायला वेळ मिळाला नाही. या विश्लेषणासाठी लागणारा माझा वेळ वाचवल्याबद्दल आभारी आहे :) प्रतिसादांमधून टेबल टाकून नक्की कोणत्या मतदारसंघांमध्ये असे निकाल फिरले हे दाखविता येईल का? माझ्या जिव्हाळ्याच्या या चर्चेत मी अजून भाग घेईनच. पण सध्यापुरते एवढेच लिहितो.
  • Log in or register to post comments

आकड्यांच्या आधारे केलेले

श्रीगुरुजी
Tue, 10/21/2014 - 12:39 नवीन
आकड्यांच्या आधारे केलेले मुद्देसूद विश्लेषण पटले. उद्धव ठाकरे किंवा शिवसेना कधी सुधारतील असे वाटत नाही, कारण ते त्यांच्या डीएनए मध्येच नाही. शिवसेना कायम भावनिक प्रश्न, पोकळ वल्गना, असभ्य टीका इ. गुंतुन राहिली. अजूनही ते भ्रमातच आहेत आणि भ्रमातच राहतील.
  • Log in or register to post comments

माहितीपूर्ण विश्लेषण

मोहन
Tue, 10/21/2014 - 13:03 नवीन
धन्यवाद जी.एस. बहुतेकांच्या मनात असलेला कयास आपल्या विश्लेषणाने कन्फर्म झाला असेल. बाकी ऊद्धवजीं बद्द्ल काय बोलावे ? विनाश काले विपरीत बुद्धी होउ नये म्हणजे मिळवली.
  • Log in or register to post comments

उठसुठ कोणताही पक्ष फुटेल

दुश्यन्त
Tue, 10/21/2014 - 14:09 नवीन
उठसुठ कोणताही पक्ष फुटेल असे समजणाऱ्या लोकांसाठी - आता पक्ष फोडायला १ /३ नाही तर २/३ सदस्य लागतात नाहीतर आमदारकी रद्द होवू शकते. तेव्हा सेना ६३* २/३= ४२ इतके आमदार फुटतील असे स्वप्न पाहणार्यांनी जागे व्हावे. हा एनसीपी फुटू शकते किंवा पवार साहेब स्वतः फुटली असे दाखवू शकतात. असेही एन्सिपिने भाजपला बाहेरून पाठींबा जाहीर केला आहेच (बाहेरून पाठींबा म्हणजे आतून फुल सेटिंग असते हे सगळे जाणतात). माझ्या मते सेनेने सरळ विरोधात बसावे. लोकांना भाजपा आणि राष्ट्रवादी (मोदींच्या भाषेत नॅचरली करप्ट पार्टी‘, महाभ्रष्टाचार वादी वगैरे) यांचे साटे लोटे उघड होवू द्यावे. विरोधी पक्षनेते पद (कॅबिनेट दर्जा) शिवसेनेलाच मिळेल.
  • Log in or register to post comments

उठसुठ कोणताही पक्ष फुटेल असे

मदनबाण
Tue, 10/21/2014 - 14:30 नवीन
उठसुठ कोणताही पक्ष फुटेल असे समजणाऱ्या लोकांसाठी भाजपचा गेमप्लॅन, सेनेला सत्तेपासून दूर ठेवणार!

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :-US fund flow into Pakistan occupied Kashmir dam floods Delhi with concern
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दुश्यन्त

अश्या उलट सुलट बातम्या येतातच

दुश्यन्त
Tue, 10/21/2014 - 14:35 नवीन
अश्या उलट सुलट बातम्या येतातच हो. मी सेना फुटेल असे समजणार्यांसाठी लिहितोय. सेना फोडायची तर ४२ आमदार फोडावे लागतील हे शक्य नाही. त्यापेक्षा एनसीपी फोडा. किंवा पवार स्वताच एनसीपी फोडून देतील.पवार साहेबांच कुणी काही सांगू शकत नाही. मात्र एन्सिपिने बाहेरून पाठींबा दिला तरी किंवा एक गट फुटून पाठींबा दिला तरी त्याची किंमत वसूल करणारच ना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

येस्स.. मी माझे शब्द मागे घेत

आनन्दा
Tue, 10/21/2014 - 16:34 नवीन
येस्स.. मी माझे शब्द मागे घेत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दुश्यन्त

पक्ष फोडणे एवढे सोप्पे असते

दुश्यन्त
Tue, 10/21/2014 - 14:16 नवीन
पक्ष फोडणे एवढे सोप्पे असते तर भाजपवाल्यांनी दिल्लीत केव्हाच सरकार बनवले असते. तिथे सुरुवातीला ३ आणि आता ५-६ आमदार कमी पडत आहेत तरी सरकार बनवायला किंवा सरळ निवडणुका घ्यायला घाबरत आहेत आणि इथे कुठला पक्ष फोडणार? आणि समजा एनसीपी फोडला किंवा त्यांचे बाहेरून समर्थन घेतले तरी त्याची किंमत द्यावी लागणारच ना. एनसीपी काय खैरात म्हणून पाठींबा देणार काय? त्यांची मोठी किंमत भाजपा आणि जनतेला चुकवावी लागणार आहे. सेना आडमुठेपणा करत आहे पण भाजपही तेच करत आहे. मुळात केंद्रात १८ खासदार असताना त्यांनी सेनेला १ मंत्रिपद तेही अवजड खाते देवून खिजवले आणि आता एनसीपीशी सेटिंग करून दबाव आणत आहेत.
  • Log in or register to post comments

खरेतर दोन्ही शिवसेना भाजप

दुश्यन्त
Tue, 10/21/2014 - 14:52 नवीन
खरेतर दोन्ही शिवसेना भाजप आडमुठे आहेत. भाजपने कर्नाटकात आणि बिहारमध्ये अनुक्रमे कुमारस्वामी आणि मायावतीला त्यांच्या जागा कमी असताना पण मुख्यमंत्री केले होते. कुमारस्वामी बरोबर २०-२० महिन्याचा करार झाला होता त्याने २० महिने मुख्यमंत्री पद भोगले आणि नंतर भाजपला टांग दिली होती. असेही प्रसंग आहेत.सत्ता भाजपला बनवायची आहे आता त्यांनी पुढाकार घेवून सेनेकडे जायला हवे. सोनिया गांधी २००४ ला सगळ विसरून पवारांच्या घरी बोलणी करायला गेल्या होत्या. भाजपला अनुकूल असच बोलायचं झाल तर माझ्या मते खालील पर्याय असू शकतात. : १) सेनेने विरोधी पक्ष नेते पद घ्यावे. विश्वास दर्शक ठरवला गैरहजर/ तटस्थ राहावे. सरकार तरेल. विधानसभेत सभापती भाजपचा आणि उपसभापती सेनेचा करावा. म्हणजे कॉंग्रेस- एनसीपीला सुरुवातीला तरी पदेच मिळू देवू नयेत. नंतर ६ महिने- एक वर्षाने सेनेने सत्तेत येवून बसावे. या बदल्यात भाजपने सेनेला केंद्रात १ कॅबिनेट, १-२ राज्यमंत्रीपदे, एखाद राज्यपाल पद द्यावे. भाजपला यात जास्त फायदा आहे कारण राज्यात त्यांची पूर्ण सत्ता राहील. २) सेनेने भाजपला बाहेरून पाठींबा द्यावा. वरील पैकी विरोधी पक्षनेतेपद पण सेनेकडून जाइल.(इथे पण भाजपचाच जास्त फायदा होईल मात्र सरकारवर सेनेचे नियंत्रण राहील) ३) भाजपने सरळ आधी सरकार बनवावे.अपक्ष, बविआ धरून १३५ आमदार तरी बरोबर येतीलच. भाजपने सांगावे ज्यांना सरकार पडायचे त्यांनी पाडावे आम्ही कुणाला पाठींबा मागत नाही. यात एनसीपी तटस्थ राहून/पाठींबा देवून सरकार वाचवेलच. एकदा सरकार बनवल तर नंतर सेनेशी वाटाघाटी करायला सोपे जाइल कारण सेनेला सत्तेत बसायचाच असल्यास ते मिळेल तेवढी मंत्रिपदे घेतील नाहीतर विरोधात बसतील. मात्र यात भाजपचा तोटा म्हणजे विश्वासार्हता पणाला (भाजप आणि मोदींची पण) लागेल.हा धोका आहे.
  • Log in or register to post comments

१) सेनेने विरोधी पक्ष नेते पद

टवाळ कार्टा
Tue, 10/21/2014 - 16:17 नवीन
१) सेनेने विरोधी पक्ष नेते पद घ्यावे. विश्वास दर्शक ठरवला गैरहजर/ तटस्थ राहावे. सरकार तरेल. विधानसभेत सभापती भाजपचा आणि उपसभापती सेनेचा करावा. म्हणजे कॉंग्रेस- एनसीपीला सुरुवातीला तरी पदेच मिळू देवू नयेत. नंतर ६ महिने- एक वर्षाने सेनेने सत्तेत येवून बसावे. या बदल्यात भाजपने सेनेला केंद्रात १ कॅबिनेट, १-२ राज्यमंत्रीपदे, एखाद राज्यपाल पद द्यावे. भाजपला यात जास्त फायदा आहे कारण राज्यात त्यांची पूर्ण सत्ता राहील.
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दुश्यन्त

हुश्श!!!

अन्नू
Tue, 10/21/2014 - 15:00 नवीन
काय बोलनार?? एक कटु सत्य- भाजप कधीही- शिवसेनेलाच काय पण युतीतल्या कुठल्याच पक्षाला 'मुख्यमंत्री' वा 'उपमुख्य मंत्री' पद देणार नाहीत! वास्तविक बघायला गेलं तर, लोकांनी समोरच्या पुढार्‍याला बघून वोट केलेलं आहे. उरली सुरली कसर पैशाने भरुन काढली आहे! पण हे, भाजप लोक कधीच मान्य करत नाहीत. सगळं यश फक्त आणि फक्त मोदीमुळेच आलंय असं त्यांचं मत आहे. अक्षरश: डोक्यावर घेऊन नाचायला लागलेत मोदींना! अहो ज्यावेळी कर्नाटकच्या सिमावादात मराठी भाषिकांना बेकायदेशीरपणे- बेदम मारहाण करण्यात आली तेव्हा कुठे गेले होते तुमचे मोदी? रेल्वेचे पास दुपटीने वाढवले तेव्हा काय करत होते मोदी? रेल्वे विकली- व्यापार्‍यांवर लावलेला एल बी टी काढून टाकला- आर बी आयचे ऑफिस गुजरातमध्ये हलवले- महागाई आणखीन वाढवून सामान्यांच्या दु:खात भर टाकली. या सर्वांवरुन महाराष्ट्रीयनांनी मोदीकडेच बघून मतदान केले असेल का? अच्छे दिन आले- नक्की कोणाचे? सामान्य जनतेचे कि बड्या उद्योगपत्तींचे? सत्तेवर आल्यापासून किती मंत्र्यांचे ब्लॅक मनी भारतात आणले? महागाई कमी झाली? नाही! उलट भाजपच्याच एका नेत्याला, 'महागाई कमी न होता, वाढतच का गेली' असा प्रश्न विचारल्यावर "मला रेव्हेन्यु मंत्री बनवा मग मी सांगते!" असं उत्तर आलं होतं! नंतर मिडीयावाल्यांनी एकदा बिजेपी वाल्यांना विचारलं- तुम्ही निवडणुकीच्या वेळी जाहीरातीत 'आंम्ही हे करु- ते करु' असं बोलत होता. मग आत्ता सत्ता मिळाली तरी तुंम्ही तसं का काही करत नाही? त्यावर भाजप वाले बोलले- "ती फक्त जाहीरातबाजी होती, सगळेच करतात- आंम्हीही केली- बिघडलं काय?" छे! राहु द्या. जेवढं बोलेल तेवढं कमीच आहे! शेवटी काय? कॉन्गेस तिथे बिजेपी! आणि पुढे.. येरे माझ्या मागल्या!
  • Log in or register to post comments

महागाई कमी झाली? नाही! उलट

आनन्दा
Tue, 10/21/2014 - 16:39 नवीन
महागाई कमी झाली? नाही! उलट भाजपच्याच एका नेत्याला, 'महागाई कमी न होता, वाढतच का गेली' असा प्रश्न विचारल्यावर "मला रेव्हेन्यु मंत्री बनवा मग मी सांगते!" असं उत्तर आलं होतं! नंतर मिडीयावाल्यांनी एकदा बिजेपी वाल्यांना विचारलं- तुम्ही निवडणुकीच्या वेळी जाहीरातीत 'आंम्ही हे करु- ते करु' असं बोलत होता. मग आत्ता सत्ता मिळाली तरी तुंम्ही तसं का काही करत नाही? त्यावर भाजप वाले बोलले- "ती फक्त जाहीरातबाजी होती, सगळेच करतात- आंम्हीही केली- बिघडलं काय?"
जरा लिन्का पण द्या. बाकी कांदा आज ४०-५० रू किलो आहे. गेल्यावर्षी दिवाळीत ८०-९०च्या पुढे गेला होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्नू

बर्र...

प्रदीप
Tue, 10/21/2014 - 18:12 नवीन
तेव्हा कुठे गेले होते तुमचे मोदी? रेल्वेचे पास दुपटीने वाढवले तेव्हा काय करत होते मोदी? रेल्वे विकली व्यापार्‍यांवर लावलेला एल बी टी काढून टाकला- आर बी आयचे ऑफिस गुजरातमध्ये हलवले- महागाई आणखीन वाढवून सामान्यांच्या दु:खात भर टाकली उगी, उगी! आपण ना त्या मोदीच घर उन्हातच बांधूया. आणि त्याचबरोबर त्याला व त्याच्या पार्टीच्या लोकांना निवडून देणार्‍या तमाम जन्तेचंही. काही कळतच नाही मेल्यांना. अजून तुमचे येऊ दे असेच काही. आम्हाला अशी अगाध माहिती देऊन उपकृत करत रहावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्नू

मला वाटतं

धर्मराजमुटके
Tue, 10/21/2014 - 18:29 नवीन
आर बी आयचे ऑफिस गुजरातमध्ये हलवले-
मला वाटत मोदी अमेरीकेला गेले तेव्हा आरबीआयवाल्यांनी चुपचाप आपले कार्यालय गुजरातमधे हलवले असेल. महाराष्ट्रातल्या नागरीकांना दु:खी व्ह्यायचे काम नाही. सगळ्या भाजपवाल्यांच बाप ( स्वारी पितृसंघटना) इथे महाराष्ट्रातच बसलाय. म्हणजे महाराष्ट्रच सर्वात मोठा आहे. कल्लावं कायं ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्नू

>>> अहो ज्यावेळी कर्नाटकच्या

श्रीगुरुजी
Tue, 10/21/2014 - 21:11 नवीन
>>> अहो ज्यावेळी कर्नाटकच्या सिमावादात मराठी भाषिकांना बेकायदेशीरपणे- बेदम मारहाण करण्यात आली तेव्हा कुठे गेले होते तुमचे मोदी? कर्नाटकातील मराठी भाषिकांना बेदम मारहाण करणारे सरकार काँग्रेसचे होते. तेव्हा कोठे गेले होते सोनिया, राहुल आणि मंडळी? हा प्रश्न सध्या न्यायालयात प्रलंबित आहे. दोन राज्यांच्या सीमावादात केंद्राने तटस्थ भूमिका घेऊन वादात न पडणे हेच उत्तम! >>> रेल्वेचे पास दुपटीने वाढवले तेव्हा काय करत होते मोदी? कोणतीही सेवा सतत तोट्यात चालविली जाऊ शकत नाही. >>> रेल्वे विकली- कधी ? कोणी ? कोणाला ? केवढ्याला ? जरा आम्हालाही कळू दे हा व्यवहार? >>> व्यापार्‍यांवर लावलेला एल बी टी काढून टाकला- कधी ? कोणी ? एल बी टी लावणे किंवा काढून टाकणे हे राज्य सरकारच्या अखत्यारीत आहे. भाजपचे सरकार या क्षणापर्यंत सत्तेत आलेले नाही. त्यामुळे त्यांनी हे काढून टाकणे संभवतच नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने काढला असल्यास मोदींना शिव्या का? >>> आर बी आयचे ऑफिस गुजरातमध्ये हलवले- कधी ? कोणी ? जरा सविस्तर व विश्वसनीय माहिती देता का? मोदींनी बहुतेक माध्यमांवर सेन्सॉरशिप लादली असावी. अशा महत्त्वाच्या बातम्या कोणत्याच माध्यमातून कशा आल्या नाहीत? एकंदरीत शिवसेनेने सोशल मिडियावर पसरवलेल्या अफवांवर काही गलीबल मंडळी अजूनही डोळे झाकून विश्वास ठेवत आहेत असं दिसतंय. >>> महागाई आणखीन वाढवून सामान्यांच्या दु:खात भर टाकली. या सर्वांवरुन महाराष्ट्रीयनांनी मोदीकडेच बघून मतदान केले असेल का? महागाई निर्देशांकाचा गेल्या ३ वर्षातील नीचांक झाला आहे. १६ मे २०१४ च्या तुलनेत पेट्रोलचे भाव प्रतिलिटर ७ पेक्षा जास्त रूपयांनी कमी झाले आहेत. डिझेलचे भाव २-३ साडेतीन रूपयांनी कमी झाले आहेत. >>> अच्छे दिन आले- नक्की कोणाचे? सामान्य जनतेचे कि बड्या उद्योगपत्तींचे? सर्वांचेच >>> सत्तेवर आल्यापासून किती मंत्र्यांचे ब्लॅक मनी भारतात आणले? परदेशात गेलेला काळा पैसा परत आणणे म्हणजे नाक्यावरच्या भाजीवाल्याकडून भाजी आणण्याइतके सोपे वाटले का? >>> महागाई कमी झाली? नाही! उलट भाजपच्याच एका नेत्याला, 'महागाई कमी न होता, वाढतच का गेली' असा प्रश्न विचारल्यावर "मला रेव्हेन्यु मंत्री बनवा मग मी सांगते!" असं उत्तर आलं होतं! असे कोणताही नेता म्हटलेला नाही. याबाबतीत जरा पुरावे देता का? >>> नंतर मिडीयावाल्यांनी एकदा बिजेपी वाल्यांना विचारलं- तुम्ही निवडणुकीच्या वेळी जाहीरातीत 'आंम्ही हे करु- ते करु' असं बोलत होता. मग आत्ता सत्ता मिळाली तरी तुंम्ही तसं का काही करत नाही? त्यावर भाजप वाले बोलले- "ती फक्त जाहीरातबाजी होती, सगळेच करतात- आंम्हीही केली- बिघडलं काय?" असे कोणताही नेता म्हटलेला नाही. याबाबतीत जरा पुरावे देता का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्नू
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा