✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

वाहनविश्व : भाग १ प्रस्तावना

क
कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी
Mon, 09/29/2014 - 15:49  ·  लेख
लेख
आजच्या धावपळीच्या युगामधे वेळेत अपेक्षित ठिकाणी पोचण्यासाठी आपण वाहनाच्या कुठल्याना कुठल्या प्रकारावर सतत अवलंबुन असतो. नोकरीला ३०-४० कि.मी. जायचं असु दे किंवा शेजारच्या चौकातुन कोंथिंबिरीची गड्डी आणायची असु दे. ऐन पावसाळ्यात महत्त्वाच्या पिलिअन रायडर (मि.पा. वरच्या नाही) बरोबरची सहल असु देत. गाडीवर (मोदकरावांसारखे उत्साही लोकं आजही सायकलवर :) ) टांग टाकली की निघालं असा प्रकार असतो. आपल्या पे.रु.चा.पा.पा. एवढ्याच महत्त्वाच्या असणार्‍या गाडीच्या काम करायच्या पद्धतीविषयी मात्र बहुतांश लोकं उदासिन असतात. स्पाच्या ह्या धाग्यावर बर्‍याच लोकांनी बर्‍याच शंका एकमेकांना विचारलेल्या आहेत. त्यापासुन प्रेरणा घेऊन एक वाहनविश्वाची सफर घडवुन आणणारी एक लेखमाला मी आजपासुन सुरु करत आहे. ह्या मालिकेचा मुख्य उद्देश असा आहे की, १. वाचकवर्गाला वाहनविश्वाचा इतिहास समजावा. २. ईंधनावर चालणार्‍या वाहनांचे वेगवेगळे प्रकार काय असतात? ३. वाहन नक्की कसं काम करतं? ४.काळानुरुप वाहनांमधे आणि त्यामधे वापरल्या जाणार्‍या तंत्रज्ञानामधे कसे बदल होत गेले? ५. आत्ताच्या काळात प्रोटोटाईप स्टेज ला असणार्‍या आणि भविष्यात वाहन क्षेत्रात अमुलाग्र बदल घडवुन आणणार्‍या वाहनांची आणि त्यावर चालु असणार्‍या संशोधनाची माहीती देणं. ६. काही ब्रँड स्पेसिफिक टेक्नॉलोजिज. ७. काही प्रसिद्ध स्पोर्ट्सकार्स. ८. वाहनाची देखभाल. ह्या सगळ्या गोष्टींची जमेल तेवढ्या साध्या सोप्या भाषेमधे माहीती द्यायचा प्रयत्न मी करणार आहे. वाहनांशी संबंधित शेकडो तांत्रिकी नावं आहेत. मराठी प्रतिशब्द सुचवता आले तर सुचवाच. पण किचकट अणि जडबंबाळ शब्दप्रयोग टाळण्यासाठी मी शक्यतो प्रचलित ईंग्रजी नावचं वापरणार आहे. जसे की स्पार्क प्ल्ग (ईंधन प्रज्वलक), हायड्रॉलिक ब्रेक (तैल गतिनिंयंत्रक ईत्यादी), फ्युएल ईंजेक्श्न (ईंधन टोचक =)) ) ईथेच आपण आपल्या वाहनाविषयी काही शंका असतील तर त्याविषयीही चर्चा करु. कोणाला वाहन उद्योगाविषयी अजुन जास्तीची माहीती हवी असेल तर तिही तुम्ही इथे विचारु शकता. कोणाला माहीतीमधे भर घालायची असेल तर तीही मला सांगाच. तसं सांगायचं झालं तर ही लेखमाला ६० ते ७० भाग एवढी मोठी होऊ शकते. वाचकांचा कसा प्रतिसाद मिळतोय त्यावर किती खोलात माहीती द्यायची हे ठरवीन :) . चला तर मग उद्यापासुन सुरु करु वाहन विश्वाची एक मोठ्ठी सफर. Ford T model (फोर्ड टी- मॉडेल वर्ष १९१७) (क्रमशः) *सर्व चित्रे आं.जा. वरुन साभार. पुढचा भाग
  • वाहनविश्व : भाग २ इतिहास
  • वाहनविश्व: भाग ३ संरचना आणि विभागणी
  • वाहनविश्व: भाग ४ इंटर्नल कंबशन इंजिन्स

Book traversal links for वाहनविश्व : भाग १ प्रस्तावना

  • वाहनविश्व : भाग २ इतिहास ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
13877 वाचन

💬 प्रतिसाद (19)

प्रतिक्रिया

अत्यंत इंटरेस्टिंग.. वाट

गवि
Mon, 09/29/2014 - 15:51 नवीन
अत्यंत इंटरेस्टिंग.. वाट पाहात आहे..
  • Log in or register to post comments

हेच बोलतो

काउबॉय
Mon, 09/29/2014 - 15:56 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

चांगला उपक्रम.

शिद
Mon, 09/29/2014 - 15:53 नवीन
चांगला उपक्रम. बरीच नवीन माहीती मिळेल असं वाटतंय त्यामूळे पुढील लेखांची वाट पाहत आहे.
  • Log in or register to post comments

वाट पहातो आहे.

आदूबाळ
Mon, 09/29/2014 - 15:54 नवीन
वाट पहातो आहे. खेडूत हेही या क्षेत्रातले जाणकार आहेत. त्यांच्या प्रतिसादांची प्रतीक्षा असेल.
  • Log in or register to post comments

चांगला उपक्रम.

मोदक
Mon, 09/29/2014 - 15:55 नवीन
चांगला उपक्रम. पुढील भागांच्या प्रतिक्षेत..!!
  • Log in or register to post comments

विषय फारच मोठा आणि जटील आहे

ज्ञानोबाचे पैजार
Mon, 09/29/2014 - 15:55 नवीन
विषय फारच मोठा आणि जटील आहे कितिही भाग होत असले तरी न कंटाळता लिहा. वाचायला नक्की आवडेल.
  • Log in or register to post comments

+१

स्पा
Mon, 09/29/2014 - 16:00 नवीन
असेच बोलतो वाचतोय :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

आण्दो

टवाळ कार्टा
Mon, 09/29/2014 - 16:32 नवीन
आण्दो :)
  • Log in or register to post comments

वा मस्त.. एक गोष्ट सुचवु

उगा काहितरीच
Mon, 09/29/2014 - 16:47 नवीन
वा मस्त.. एक गोष्ट सुचवु इच्छितो की सरसगट सगळ्या वाहनांबद्दल लिहिन्यापेक्षा अगोदर दुचाकी वा चारचाकी बद्दल लिहा.
  • Log in or register to post comments

वा मस्त.. एक गोष्ट सुचवु

उगा काहितरीच
Mon, 09/29/2014 - 16:49 नवीन
वा मस्त.. एक गोष्ट सुचवु इच्छितो की सरसगट सगळ्या वाहनांबद्दल लिहिन्यापेक्षा अगोदर दुचाकी वा चारचाकी बद्दल लिहा.
  • Log in or register to post comments

रोचक विषय आणि सुंदर सुरुवात !

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 09/29/2014 - 18:02 नवीन
रोचक विषय आणि सुंदर सुरुवात ! फोटोवरून चारचाकीने सुरुवात होईल असे वाटते. सर्वच वाहनांबद्दल लिहिल्यास वर अनेकजणांनी म्हटल्याप्रमाणे चारचाकी आणि दोनचाकी वेगळ्या विभागांत ठेवल्यास बरे... अर्थात हा विचार तुम्ही केला असणारच म्हणा.
  • Log in or register to post comments

+१००

सुबोध खरे
Mon, 09/29/2014 - 18:04 नवीन
+१००
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

चांगला उपक्रम. पु भा प्र.

खेडूत
Mon, 09/29/2014 - 18:23 नवीन
चांगला उपक्रम. पु भा प्र. वाहन विषयक कितीही माहिती मिळवली तरी कमीच! तुमचा टंकनोत्साह पहाता रोचक मालिका वाचायला मिळेल याची खात्री आहे.
  • Log in or register to post comments

वाचिंग!

अत्रुप्त आत्मा
Mon, 09/29/2014 - 21:29 नवीन
वाचिंग!
  • Log in or register to post comments

जबरी वाट पहात आहे.

खटपट्या
Mon, 09/29/2014 - 23:13 नवीन
जबरी वाट पहात आहे.
  • Log in or register to post comments

+१

दशानन
Mon, 09/29/2014 - 23:19 नवीन
उत्तम विषय!
  • Log in or register to post comments

उत्तम सुरुवात

श्रीरंग_जोशी
Mon, 09/29/2014 - 23:21 नवीन
एका मोठ्या विषयाला हात घातलाय, कॅप्टन. लेट्स मार्च फॉरवर्ड.
  • Log in or register to post comments

वा

काउबॉय
Tue, 09/30/2014 - 00:55 नवीन
रोचक विषय.
  • Log in or register to post comments

व्य. नि.

मुक्त विहारि
Tue, 09/30/2014 - 22:23 नवीन
केला आहे.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा