प्राणिपात कोटि कोट

सतिश जे न देखे रवी...
दाबुन हुन्दक्आना या स्पुन्धतात भिन्ति हलुवर काकाणचि किण्किण थाम्बलेलि शन एक खालि झुकले हे उन्च उन्च ईमले पायातली तयानच्य मज्बुत वीट हलली तुम्च्याच दर्शनचि तीज आस होति दादा करुनि ह्रुदय समर्पित हलकेच ती निमालि वय थोरेले परन्तु वारधक्य नाहि आले सेवेत देह झिझला जीवन सुवर्ण झाले अव्घया नभास भेदुनि वैकूनट लीन झाली प्राणिपात कोटि कोटि त्या थोर माउलिला कवि सुरेश्चन्द्र जोशि दोम्बिवलि २२/११/२००८
वर्गीकरण
लेखनविषय:

63 टिप्पण्या 42,618 दृश्ये

Comments

परिकथेतील राजकुमार नवीन

In reply to by आनंदयात्री

का कोणासा ठाउक पण मला राहुन राहुन असे वाटत आहे की हे सतिशराव म्हणजे गतजन्मीचे नारायणराव पेशवे असावेत आणी त्यांनी मै बदला लुंगा वगैरे निर्धारानी परत जन्म घेतला असावा 'राघोबा' जोशींचा पुतण्या म्हणुन ;) ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी... आमचे राज्य

रामदास नवीन

दाबुन हुंदक्यांना या स्फुंदतात भिंती हळूवार काकणांची किणकिण थांबलेली क्षण एक खाली झुकले हे उंच उंच इमले पायातली तयांच्या मजबूत वीट हलली तुमच्याच दर्शनाची तीज आस होती दादा करुनि ह्रुदय समर्पित हलकेच ती निमालि वय थोरले परंतू वार्धक्य नाही आले सेवेत देह झिझला जीवन सुवर्ण झाले अवघ्या नभास भेदुनि वैकुंठ लीन झाली प्राणिपात कोटि कोटि त्या थोर माउलिला कविता आवडली. आता प्रश्न एव्हढाच आहे की सुरेश्चन्द्र जोशि दोम्बिवलि हे कोण?

सतिश नवीन

In reply to by रामदास

हेल्लो हे कवि डोम्बिवलि येथे रहातात्.ते मझे आत्त्याचे यज्मन आहेत्.फोन नो ९५२५१२५१३४९१.डोम्बिवलि विश्णु नगर स्वस्तिक सोच एथे रहातात.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे नवीन

In reply to by सतिश

तुमच्या आत्याच्या यजमानांना सांगा कविता छान आहे. फोन नंबर दिलाच आहे ,जमलं तर त्यांना फोनही करतो ! (फोन लागत नाही. नंबर बरोबर आहे का ? ) -दिलीप बिरुटे

भडकमकर मास्तर नवीन

In reply to by रामदास

खूप प्रयत्न करूनही वैकूनट हा प्रकार काही कळाला नव्हता... सांगितल्याबद्दल रामदासभौंचे आभार... .. अवांतर : कविता चांगली वाटत आहे.... ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

गणपा नवीन

In reply to by रामदास

एका चांगल्या कवितेची टंकनातील चुकांमुळे माती कशी होते याचा उत्कृष्ट नमुना आहे. रामदास काकांमुळे ती नीट वाचता आली. धन्स हो काका.

किसन शिंदे नवीन

In reply to by गणपा

हेच बोलतो, टंकलेखनातील चुकांमूळे एका चांगल्या कवितेचा पार कचरा झालाय आणी तीच रामदास काकांची शुध्द लेखनातली कविता निर्मळ वाटतेय.

दशानन नवीन

=)) =)) अरे ही तुमची महान कलाकृती आमच्या नजरेतून राहीली कशी :? च्यामायला अर्धे मिपाकर तर ह्याच कवितेवर वारले असते त्याच वेळी =)) भयानक राव... जबरा ! तुम्ही मराठी भाषेला एक नवीन रुप दिले आहे अभिनंदन ! =)) =)) =)) =)) =)) काल पासून नुस्ता हसतो आहे... सुट्टी असताना देखील पण फक्त तुमच्या साठी ऑफिस उघडून बसलो आहे राव !!!!

विंजिनेर नवीन

In reply to by दशानन

येगजॅग्टली ... मी पण कालपासून हसून नुसता गडाबडा लोळतो आहे. नशीब माझं की हापिसात बसून नाही वाचली. इथे लोकांना मराठी कळत नाही. येडा म्हणाले असते... काय कविता... काय प्रतिसाद.. काय निवेदनं... च्यायला... बास करा लेको आता... हसून हसून जबडे दुखायला लागले आमचे... -- आक्षरास हासून ये

विनायक प्रभू नवीन

In reply to by दशानन

असेच म्हणतो. आय्.सी.यु (ऍड्मीट)

मृगनयनी नवीन

In reply to by दशानन

काल पासून नुस्ता हसतो आहे... सुट्टी असताना देखील पण फक्त तुमच्या साठी ऑफिस उघडून बसलो आहे राव !!!! =)) =)) =)) =)) =)) राजे ....___/\___.... तुम्ही दोम्बिवलीच्या सुरेश्चन्दरा जोशीईंचे फैन झाले की कंय ? की माणनीय कवी" सतिष "यन्चे फैन झले? बाय डा वे.. दोम्बिवली ते थाआने अन्त्र केती अहे? ;) ;) मल य्य कव्यात्ला सर्वाआत अव्द्लेला सब्ड : "वैकूनट" (वैकुन्ठ) ज ब रा!!!!! =)) =)) =)) =)) =)) अज्जुन येउ डेत...... --- .|. --- म्रुर्गणय्णीई प्ररषुर्राम लेमायेए. :) युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

मिंटी नवीन

In reply to by दशानन

च्यामायला अर्धे मिपाकर तर ह्याच कवितेवर वारले असते त्याच वेळी =)) =)) =)) =)) =))

नरेश_ नवीन

यथाशक्ती या धाग्याचा वाचनांक वाढवा. निवेदन संपले. सही /- आगरी बोली - आगरी बाना.

३_१४ विक्षिप्त अदिती नवीन

आता मी पण कविता उघडते (प्रतिसाद वाचायला!) =)) अदिती माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

कालिन्दि मुधोळ्कर नवीन

आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार महाराष्ट्र शासन निविदा क्र. ५०३.९८७ (क) नुसार आंतरजालावर लेखन करणेपूर्वी (काळ्या, मण्या-मण्यांच्या) पाटीवर बाराखडी घोटणे सक्तीचे आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती नवीन

In reply to by कालिन्दि मुधोळ्कर

निविदा क्रमांक? =)) ठ्यॉ करून हसले .... =)) =)) =)) आणि काळी, मण्या-मण्यांची पाटी का आधी ४८६ वर मराठी टंकण्याची सवय मग पुढे मिपा-मिपा खेळणे? ;-) अदिती माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

परिकथेतील राजकुमार नवीन

कुठे गेले शुद्ध मराठीचे आग्रही संपादक. कच्चा माल वाट पहात आहे. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य

पुण्याचे वटवाघूळ नवीन

कविवर्यांनी लिहिलेली "मोकलाया दाही दिशा" ही कविता खूपच फेमस झाली. त्यामानाने या तितक्याच उत्तम कवितेकडे दुर्लक्ष झाले आहे. म्हणून ही पण कविता मुद्दामून वर आणत आहे.

एस नवीन

मोकलाया प्राणिपात! दाबुन हुन्दक्आना >> आधी वाटलं अरेबिक पाककृती आहे की काय? लगेच प्रपे आणि दि.कु. यांना विचारायचं पक्कं केलं मनातल्या मनात. स्पुन्धतात भिन्ति >> हम्म्म्... 'मल कुन्वित आहे' ची सर नाही पण. हलुवर काकाणचि >> मला हे हलवत काकांची असे काय (च्या काय) तरी वाटले आणि खालपासून वरपर्यंत हादरलो. छ्या:! असं काहीही वाटलं तरी काहीही लिहायचं काय? मिपा असलं म्हणून काय झालं! शन एक खालि झुकले >> आधी वाटलं मंत्रयोग-जपयोग मध्ये काही तरी गुप्त शनैस्त्रोत्र असावं आणि त्याने गहिवरून येऊन आपल्या कड्यांसकट शनि पृथ्वीवरील या जपकर्त्याला भेटायला आला असावा की काय? वारधक्य >> हा मताधिक्य वगैरे सारखा काहीतरी प्रकार असावा आणि तो वारल्यावर मिळत असावा असा आमुचा बापुडा ग्रह झाला होता! मग 'सेवेत देह झिझला' ही त्याखालची ओळ वाचून आम्हांला धक्का बसोन आम्ही जाग्यावर आलो. अव्घया >> काय प्रतिभा आहे! आवग्या गावभरच्या शेवग्याला बहर आला हे वाचून. वैकूनट >> या शब्दाचा अर्थ लावता लावता आमची प्रतिभा घाटात बंद पडलेल्या गाडीसारखी ढिम्म झाली. मग मास्तरांचा प्रतिसाद वाचल्यावर शुद्धीवर येऊन थोडी हलूचालू लागली. आणि सर्वात खास... प्राणिपात >> वाचून शक्तिपात झाला मिपाकरांचा. बास्स्स्स्... तुम्हांला प्रणिपात हो! जाताजाता ते 'दोम्बिवलि' वाचून मात्र हसू आलं. मध्यवर्ती ठिकाणाला असं बोलू नये हो, लोकु बोलु लावितात तुमचिया स्थळासि आणि कुळासि| नाराज नका होऊ बरं का. लिहित रहा इथे अधूनमधून. :-) (संमं - कृहघे. ;-) )

मुक्त विहारि नवीन

In reply to by एस

कुणी डोंबिवली म्हणा वा डोंबोली किंवा "दोम्बिवलि"... मध्यवर्ती ठिकाण एकच...

एस नवीन

In reply to by मुक्त विहारि

ब्याटमना, जरा बघ रे. डोंबिवलीचे खरे पुरातन नाव हेच असावे असा दाट सौंशय आहे. पानशेतच्या पुरात गेलेल्या जीवन्भौंच्या मूळकाव्यात संदर्भ सापडतील बहुतेक. रच्याकने: काय हो मुवि, तेव्हा पण 'दोम्बिवलि' मध्यवर्तीच असावी काय? तुमचा काय अंदाज आहे? ;-)

बॅटमॅन नवीन

In reply to by एस

अगदी बरोबर आहे रे. दोम्बिवलि हेच जुने रूप आहे असे जीवनभौंच्या मूळकाव्यात लिहिल्याचे पु ना ओकांच्या एका पुस्तकात लिहिल्याचे आठवले, ते पुस्तकही पानशेतच्या पुरात निजधामी गेल्याचे कळाले तेव्हा अश्रूंना पारावार उरला नाही.

तिमा नवीन

In reply to by बॅटमॅन

एकेकाळी ते पेन्शनरांचे गांव होते. म्हणून त्याचे मूळ नांव 'दोन्दिवली'( दोंद बाळगून असलेले) असावे अशी शंका आहे.

बॅटमॅन नवीन

In reply to by तिमा

ठ्ठो =)) =)) =)) =)) (नॉनपेन्शनर असूनही दोन्दिवलीकर होण्याकडे वाटचाल करू लागलेला) बट्टमण्ण.

मन१ नवीन

हे दुसर्‍या क्रमांकाचे कैलास लेणे. ( पयला नम्बर अर्थातच धागाकर्त्याच्याच अजून एका कलाकृतीचा आहे !!! ) . . वरच्या प्रतिसादांपैकी 'एस ' ह्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जावी. आताच बेभान हसत सुटण्यासाठी हापिसातून कडक तम्बी मला मिळालिये त्यांच्यामुळे. =))

संदीप डांगे नवीन

रामदासकाकांनी शुद्धलेखन सुधारुन दिलं तरी मूळ कविता का बदलली गेली नाही ह्याबद्दल आश्चर्य वाटले, कारण कविता खरंच चांगली होती. फक्त तिचं शुद्धलेखन टंकणारामुळे गंडलं म्हणून. आता तमाम प्रतिसादकर्त्या मिपाकरांनी ह्याबद्दल काहीच बोलू नये ह्याचंही आश्चर्य वाटलं. मूळ कविता हसण्यासाठी वा खिल्ली उडवण्यासाठी टाकली नसावी एवढेही लक्षात येऊ नये? वर 'आपण एवढे उद्धट का?' ह्या धाग्यावर अहमाअहमीने चर्चा करायच्या... बरंय.

चित्रगुप्त नवीन

वा. मोकलायाची आणखी एक भैण आहे, हे ठाऊक नव्हते. आणखीही आहेत का ?

गड्डा झब्बू नवीन

पूर्वीचं मिपा राहिलं नाही असे का म्हणतात जुने मिपाकर याचा प्रत्यय आला :-)) एवढं दर्जेदार लेखन/काव्य येत होतं तर त्या काळी. __/\__

प्रचेतस नवीन

मोकलाया दाही दिशा ह्या कवितेला जितकी प्रसिद्धी मिळाली त्यामानाने ही कविता अंमळ दुर्लक्षितच राहिली.

राघव नवीन

त्ये दुर्लक्षिलेलं रत्न वगैरे ठीक हाय..पन येक वाचूनच फेफरं निघालं हुतं.. आता आक्षि दुसरं दिसल्यावर काय व्हायचं... छ्या...

ॲबसेंट माइंडेड… नवीन

स्पीच टु टेक्स्टची पहीली ट्रायल लेखन करताना घेतली असणार यात तीळमात्र शंका नाही. हातानी इतके डेंजर टायपींग कोणी करू शकत नाही. प्रतिक्रीया वाचताना हसुन मुरकुंडी वळली.

मोगरा (verified= न पडताळणी केलेला) नवीन

अरे बापरे., खुप दिवसांनी मिपा वर आले आणि हसू आवरेना.

Bhakti नवीन

वाह एक एक शब्दावर संशोधन होऊ शकते... अव्घया बस..डोळे भरून पावले ;);)