Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by बिपिन कार्यकर्ते on Sat, 10/11/2008 - 07:18
  • Log in or register to post comments
  • 30730 views

Book traversal links for माझं खोबार... भाग ३

  • ‹ माझं खोबार... भाग २
  • Up
  • माझं खोबार... भाग ४ ›

प्रतिक्रिया

Submitted by अभिजीत on Sat, 10/11/2008 - 07:31

Permalink

उत्तम लिखाण

वाचून खूपच मजा आली. >>खरं सांगतो आयुष्यात एवढं असहाय्य कधीच वाटलं नव्हतं परक्या देशात सुरुवातीलाच असा अनुभव आल्यावर डोकं फिरणारच .. पुढच्या भागासाठी शुभेच्छा ..
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on Sat, 10/11/2008 - 10:18

In reply to उत्तम लिखाण by अभिजीत

Permalink

ए क नं ब र

बिप्पीन भौ .. या भागात खरं तर मी तुमचे विक पॉइंट बघुन तुम्हाला जरा पॉझिटीव्ह कम निगेटिव्ह रिस्पाँस देणार होतो .. पण आय कुडंट .. ज ह ब ह र्‍या .... एयरपोर्ट वरून रीटर्न आल्यावर शेजार्‍यांसमोर कसलं बेक्कार फीलींग आलं असेल .. नाकं मुरडणारे हळूच .. "आला ग बाइ परत .. विमान चुकलं वाट्ट, जाताना मारे मिरवत होता .. आता बस्स म्हणा तेल लावत " असं कुजबुजताहेत असं उगाच वाटतं ... बाकी हा अनुभव पण बेष्ट आमची कनेक्टींग फ्लाईट होती इथोपिया वरून , तिथे माझा असाच गोंधळ... आणि एकदा नैरोबी एयरपोर्टावर तुमच्या पोर्टर सारखं मला पण एक कल्लु भेटलेलं .. साला आय ऍम युवर फ्रेंड म्हणत इमिग्रेशन पार केल्याचे ५० डॉलर मागत होता ... मी त्याला असला चुना लावला ना ... त्याला म्हणालो ब्र्दर यु हेल्प मी समबडी स्टिल माय वॉलेट .. मी मायसेल्फ शॉर्ट ऑफ मनी . . तो इतका इमोशनल झालेला की मलाच केनियन शिलींग्स देत होता .. म्हंटलं राहु दे राजा कंपनीचा माणूस आलाय ... -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आजकाल ... डोकं नापीक झालं आहे ...
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ.प्रसाद दाढे on Wed, 10/15/2008 - 09:47

In reply to उत्तम लिखाण by अभिजीत

Permalink

अप्रतिम लिखाण!

बिपिनराव, तिन्ही भाग आत्ताच वाचले. बेहद्द आवडले. तुम्ही खूप छान लिहिता. एखादा चित्रपट पाहतो आहे असे वाटले. अतिशय ओघवती व रसाळ शैली आहे. फारच आवडले. पुढील भाग लवकर टाका..
  • Log in or register to post comments

Submitted by नंदन on Sat, 10/11/2008 - 07:33

Permalink

मस्त

हा भागही ओघवता झालाय, बिपिनराव. दर १५ मिनिटांनी पीठ खायला लावायचा किस्सा वाचून गंमत वाटली, पण तिची बिचारीची फार वाईट अवस्था झाली असेल. बाकी मराठी पुस्तकं न्यायची नाहीत, हा तर जुलूम झाला. नशीब त्या कस्टमच्या दिव्यातून पार पडून ती पुस्तकं परत मिळाली. अवांतर - पर्सरला काय प्रतिशब्द आहे हो मराठीत? - पुलंनी सुंद आणि उपसुंद मधला सुंद वापरला आहे :). हवाईसुंदरी आणि हवाईसुंद

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

Submitted by प्रमोद देव on Sat, 10/11/2008 - 09:42

In reply to मस्त by नंदन

Permalink

नंदनशी सहमत!

मस्तच !!!!!!!
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Sat, 10/11/2008 - 07:42

Permalink

व्वा

व्वा बिपिनजी,, वल्ला क्या सॉलिड लिखती तुम..पढनेको बहुत मजा आती.. मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Sat, 10/11/2008 - 08:25

Permalink

फारच भयानक..

बिपिनदा, तुझी अवस्था काय झाली असेल याची कल्पना करू शकते. आणि हे काय रे नविनच सुरू केल आहे? आणि....... ही काय पद्धत झाली अशा ठिकाणी भाग संपवायची? पुढचा भाग या विकेंडलाच येऊदे. लवकर लिही. धावपट्टीवर मात्र त्या विमानाने वेग घेतला आणि भानावर आलो. खिडकीतून बाहेर बघितलं, त्या विमानाचे प्रचंड पंख खेळण्यातल्यासारखे पण एका मंद लयीत वर खाली होत होते आणि एका क्षणात विमानाने आकाशात झेप घेतली. ज्या मुंबईत आत्तापर्यंतचे आयुष्य घालवले ती मुंबई हळूहळू लहान होत गेली. मी जेव्हा सर्वप्रथम अमेरिकेला मुलाला घेऊन एकटी आले ना, तेव्हा माझीही अवस्था काहीशी अशीच झाली होती. विमानाने रनवे वरून टेक ऑफ घेतल्यानंतर.. माझा माझ्या मातीशी संबंध तुट्ला... ही भावना खूप ओरखडे करून गेली हृदयावर. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Tue, 10/14/2008 - 01:13

In reply to फारच भयानक.. by प्राजु

Permalink

ओरखडा...

मी जेव्हा सर्वप्रथम अमेरिकेला मुलाला घेऊन एकटी आले ना, तेव्हा माझीही अवस्था काहीशी अशीच झाली होती. विमानाने रनवे वरून टेक ऑफ घेतल्यानंतर.. माझा माझ्या मातीशी संबंध तुट्ला... ही भावना खूप ओरखडे करून गेली हृदयावर.
तो क्षण, विशेषतः पहिल्या प्रवासाच्या वेळचा, काहितरी विचित्रच असतो. ज्ञात सोडून अज्ञाताकडे निघालो असतो आपण. आपलं घर सोडून जायचं त्याची हूरहूर असते, त्याच बरोबर नविन जगाबद्दल उत्सुकता, कुतूहल, भिती असं काहितरी मिश्रण असतं. छ्या: ..... तू ओरखडा शब्द छान वापरला आहेस. ओरखडा हा नेहमी असा असतो की त्यामुळे खूप मोठी जखम तर होत नाही पण एक सेकंदाकरता का होईना पण थेट डोक्यापर्यंत कळ जाते. बिपिन.
  • Log in or register to post comments

Submitted by अनिल हटेला on Sat, 10/11/2008 - 08:42

Permalink

>>मी कायम

>>मी कायम आप्त-मित्रांच्या मधे होतो. गरज लागली तर पटकन धावून येणारे भाऊ होते, आधाराला आई-वडिल आणि इतर लोक होते, मित्र होते. एका क्षणात हे सगळं नाहीसं झालं, उरलो मी एकटा. मग विचार आला की, काय होईल? नविन ठिकाणी परत उभे राहू, तिथे गोतावळा जमवू. एक उमेद होती मनात. मला जाणवत होतं, आज पर्यंत नुसताच वयाने मोठा झालो, त्या ३ तासाच्या प्रवासात मात्र मी 'मी' म्हणून मोठा होत होतो. मनात विचारांचा नुसता गुंता झाला होता, अगदी योग्य शब्दात वर्णन केलत ,राव !! >>माझा नंबर आला एकदाचा. माझी ती महाकाय बॅग चढवली त्या टेबलावर. पुढे जे काही घडले त्याला मी अजिबात तयार नव्हतो. तो कष्टम साहेब एवढे कष्ट देईल असे वाटलेच नव्हते. त्याने माझी बॅग अक्षरशः चेव आल्या सारखी उघडली आणि उपसली. उपसली म्हणजे दोन्ही हात बाजूने आत घुसवून सगळं सामान लहान मुलांच्या बोरन्हाणात बोरं, गोळ्या, चॉकलेटं उधळतात तसं उधळलं. सगळे कस्टम वाले सारखेच साले !!! हाँगकॉंग कस्टम वाल्यानी पन २ तास पीडल होत मला ...... येउ देत खोबार चा पूढला भाग !! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments

Submitted by फटू on Sat, 10/11/2008 - 09:13

Permalink

बिपिनदा...

हा भाग तर एकदम जबराट लिहला आहेस रे... वाचताना असं वाटत होतं की आपण एखादा वेगवान चित्रपट अगदी सीटचे दोन्ही दांडे गच्च पकडून पाहत आहोत... बाकी "तिकडे " जात होता तर भीती ही वाटली असेल ना :P सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Sat, 10/11/2008 - 09:26

Permalink

मस्त बिपिन, हा ही भाग जमेश!

ट्रकवाल्या डायवरांच्या भाषेत बोलायचं तर 'एकदम मस्त मौसम पकडला आहेस'. (तुझी सकाळची फ्लाईट रात्री निघालेली वाचून, आमची मुंबईहून रात्री ९.३० वा. निघणारी एअर इंडियाची फ्लाइट तब्बल दुसर्‍या दिवशी सकाळी साडेसातला निघालेली आठवली आणि अंगावर काटा आला! आम्ही तर पुण्याहून आलेले असल्याने परत घरी जाणे वगैरे बातच सोड. चिडचिड, वैताग, संताप, अतिशय टोकाचा राग, असहायता, हतबलता, नैराश्य आणि शेवटी वैराग्य अशा सर्व भावनातून केवळ १० तासात आम्हाला नेण्याचे महान काम एअर इंडियाने केले होते!) पहिल्या उड्डाणातली हुरहुर समजण्याजोगी. दर १५ मिनिटानी पीठ खायला लागणे म्हणजे वैतागच की रे! उपसली म्हणजे दोन्ही हात बाजूने आत घुसवून सगळं सामान लहान मुलांच्या बोरन्हाणात बोरं, गोळ्या, चॉकलेटं उधळतात तसं उधळलं. हे लईच भारी जमलंय वाक्य! ;) लगे रहो! पुढचं लवकर लवकर टाक रे. (खुद के साथ बातां : रंग्या, पुढचा भाग जर एक दिवसात आला नाही तर बिपिनला दर १५ मिनिटांनी पीठ खायची शिक्षा द्यायची का? B) ) चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by वैशाली हसमनीस on Sat, 10/11/2008 - 09:29

Permalink

जबरदस्त !

जबरदस्त अनुभव आणि जबरदस्त वर्णन ! उत्सुकता वाढत चालली आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on Sat, 10/11/2008 - 09:38

Permalink

वाह!

माशाल्ला. हा भाग देखील सुरेख. ओघवते वर्णन. वाचायला मजा येते आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Sun, 10/12/2008 - 09:54

In reply to वाह! by सहज

Permalink

हा भाग

हा भाग देखील सुरेख. ओघवते वर्णन. हेच म्हणतो.... बिपिनशेठ, छानच लिहिताय तुम्ही. लगे रहो.... तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by झकासराव on Sat, 10/11/2008 - 09:38

Permalink

................ http://picas

................ http://picasaweb.google.co.in/zakasrao आज पर्यंत नुसताच वयाने मोठा झालो, त्या ३ तासाच्या प्रवासात मात्र मी 'मी' म्हणून मोठा होत होतो>>>>> क्या बात है. :) सही चाललय. जरा भाग लवकर लवकर येवु देत. :)
  • Log in or register to post comments

Submitted by चन्द्रशेखर गोखले on Sat, 10/11/2008 - 10:02

Permalink

खोबर

छान किसताय ! चालू द्या!! मस्त वाटतय वाचायला !!!
  • Log in or register to post comments

Submitted by जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला) on Sat, 10/11/2008 - 10:15

Permalink

जबरा विपीन

जबरा विपीन ! मस्त वेगवान लेखन झालं आहे ... आवडलं बॉ ! लवकर लिही पुढील भाग ! जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग
  • Log in or register to post comments

Submitted by भाग्यश्री on Sat, 10/11/2008 - 14:22

In reply to जबरा विपीन by जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)

Permalink

सहमत..

सहमत..
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on Sat, 10/11/2008 - 15:14

Permalink

पिप

http://vipravani.wordpress.com/ ह्याला म्हणत्तात पिप इन कार्यकर्ते. मग इतके दिवस फक्त वाचन मात्र का?
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Tue, 10/14/2008 - 01:21

In reply to पिप by विनायक प्रभू

Permalink

मग इतके

मग इतके दिवस फक्त वाचन मात्र का?
काही खास कारण नाही हो मास्तर. लिहावसं वाटलं म्हणून लिहिलं... बिपिन.
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on Sat, 10/11/2008 - 16:25

Permalink

सुंदर भाग!

सुंदर भाग! नेहेमीप्रमाणे ओघवता.... नव्या देशाच्या वर्णना मुळे अनुभव, संदर्भ सारेच बदलते.. :) खूपच रोचक शैली.. हा भागही आवडला.. पुढील भाग येऊ दे!
हवाईसुंदर्‍या (पर्सरला काय प्रतिशब्द आहे हो मराठीत?)
हवाईसुंदर्‍या नको हो अगदी (उंदर्‍या सारखं वाटतं ;) ).. पुलंचा हवाईसुंद आहेच नाहितर हवाईदेखणा चालेल ;) इंडियन एयरलाईन्स / एअर इंडिया मधे हवाईकाकू असतात तत्सम पुरुषप्रकाराला हवाईकाका कसा वाटातो ;) -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Tue, 10/14/2008 - 01:25

In reply to सुंदर भाग! by ऋषिकेश

Permalink

देखणा... मस्

देखणा... मस्तच. मी असं म्हणेन की एअर इंडिया / इंडियन एयरलाईन्स असेल तर हवाई काका / काकू आणि इतर कुठलीही असेल तर हवाई सुंदरी / देखणा. बिपिन.
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Tue, 10/14/2008 - 02:14

In reply to सुंदर भाग! by ऋषिकेश

Permalink

हवाईकाका!!??

नकोरे, मग हिंदीत 'हवाईचाचा!' म्हणावे लागेल!! अर्थाचा अनर्थ ;) चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by रामदास on Sat, 10/11/2008 - 16:45

Permalink

बिपीन ,

वाचला लेख .सगळे लेख परत वाचले. लेखांची चढती कमान छान जमली आहे. प्रत्येक लेख एकटा वाचला तरी छान वाटतोय. लिहीत रहा .तुमचा फॅन क्लब तयार झाला आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by सुहास कार्यकर्ते on Sat, 10/11/2008 - 16:51

Permalink

(वाह खुपच

(वाह खुपच चान सम्पुर्न लिहुन त्याच्या कौपिज काधुन थेव
  • Log in or register to post comments

Submitted by सर्वसाक्षी on Sat, 10/11/2008 - 17:37

Permalink

झकास

खोळंबा, सरकारी सोपस्कार ... परदेशात काय हे स्वागत! आता बाहेर पडल्यावर काय? एकदम मालिकांसारखे - पुढील भागात पाहा:) झकास लेखन
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Sat, 10/11/2008 - 18:52

Permalink

हा भाग

सर्वात छान जमलाय. आता क्रमशः ची आपल्याला चांगलीच सवय झाली आहे. लेख कुठे संपवायचा हे बरोब्बर कळले आहे. पुढचा भाग वाचायची उत्सुकता आहे. रेवती
  • Log in or register to post comments

Submitted by पिवळा डांबिस on Sat, 10/11/2008 - 20:19

Permalink

चांगलं आहे...

ह्यावेळेचं खोबरं ही चांगलं आहे.... (पुढला नारळ कधी फुटेल याची वाट पहाणारा) डांबिसकाका (अवांतरः या प्रवासात तुमच्याबरोबर तुमच्या सौ. ही होत्या का हो? नाही म्हणजे विमानतळावर होत्या, नंतर गायब झालेल्या दिसतायत! असत्या तर कस्टम्सने तुमची बॅग उपसल्यावर झालेली त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यात जरा मजा आली असती...) :)
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Tue, 10/14/2008 - 01:35

In reply to चांगलं आहे... by पिवळा डांबिस

Permalink

अहो... ती

अहो... ती फक्त मला सोडायला आली होती विमानतळावर. मी एकटाच गेलो होतो सुरवातीला. आणि तिथे काहिही झाले तरी त्या क्षणी कोणाच्याही मनात एकच भावना असते, भयंकर घाबरल्याची. पहिल्यांदा सौदीला जाताना प्रत्येक जण घाबरलेला असतो जाम. :) बिपिन.
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती दिनेश on Sat, 10/11/2008 - 22:14

Permalink

वा..

मस्त झालाय हा भाग सुध्दा.. आवडला. स्वाती
  • Log in or register to post comments

Submitted by चित्रा on Sun, 10/12/2008 - 08:09

Permalink

आवडले.

मुंबईची चमक दमक एका मोठ्या अंधार्‍या खाईने गिळून टाकली, उरला फक्त अंधार आणि खाली समुद्रात लुकलुकणारे बोटींचे अंधुक होत जाणारे दिवे... मला एकदम जाणीव झाली... आता मी एकटा. एकदम पहिल्या परदेशी विमानप्रवासाची आठवण आली. लेखन आवडले.
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Sun, 10/12/2008 - 11:37

Permalink

मस्त

मस्त चाललाय लेखन प्रवास!
  • Log in or register to post comments

Submitted by घासू on Sun, 10/12/2008 - 17:26

Permalink

५० प्रवासा॑चा अनुभव

अहो पहिल्या परदेश प्रवासाच्यावेळीच तुम्ही ५० प्रवासा॑चा अनुभव गाठीशी बाध॑लात की, एका क्षणी अस वाटल॑ की आपणच आता सौदी अरेबियात उतरतो की काय? पण मानल॑ बुआ तुम्हाला एकदम झकास लिहिता.
  • Log in or register to post comments

Submitted by शितल on Sun, 10/12/2008 - 17:33

Permalink

मस्त लिहिले आहे.

प्रवास आवडला. :)
  • Log in or register to post comments

Submitted by मृदुला on Sun, 10/12/2008 - 22:03

Permalink

लेखांक आवडला

लेखांक आवडला. तुमच्या पत्नी सुरुवातीला विमानतळावर होत्या व नंतर विमानातून उतरताना नव्हत्या हे काही कळले नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Sun, 10/12/2008 - 22:14

In reply to लेखांक आवडला by मृदुला

Permalink

तुमच्या

तुमच्या पत्नी सुरुवातीला विमानतळावर होत्या व नंतर विमानातून उतरताना नव्हत्या हे काही कळले नाही. त्यांच्या पत्नी पोटूश्या होत्या ना. विमानतळावर बिपिनदा ला बाय बाय करायला आल्या होत्या.. त्यामुळे बाय बाय झाल्यावर घरी परतल्या आणि विमानातून उतरताना बिपिनदा एकटाच होता.. सोप्प आहे हो.. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Tue, 10/14/2008 - 01:51

In reply to तुमच्या by प्राजु

Permalink

बरोब्बर... क

बरोब्बर... कित्ती कित्ती हुश्शार तुम्ही असं तुमच्या ख.व. मधे लिहिलं जाईल. ;) बिपिन.
  • Log in or register to post comments

Submitted by भडकमकर मास्तर on Mon, 10/13/2008 - 00:33

Permalink

बिपिनभौ,

बिपिनभौ, तीन्ही लेख वाचले... एकदम मस्त झालेत... ... पुढचे येउद्यात हो लवकर लवकर... :) ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदयात्री on Mon, 10/13/2008 - 12:12

Permalink

मस्त

पुढच्या भागाची वाट पहातोय.
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Mon, 10/13/2008 - 12:20

In reply to मस्त by आनंदयात्री

Permalink

मी पण!

खोबरागडचे बिपीनचंद्रराजे, लवकर टाका हो पुढचे भाग!
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Tue, 10/14/2008 - 01:43

In reply to मी पण! by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

प्रतिक्रिया...

आधी (कौतुकाची एखादी सुंदर) प्रतिक्रिया टाका, मग पुढचे भाग मागा. लिखाण काय फुकटात येतं? मेहेनत लागते त्या साठी कळ्ळं? X( बिपिन.
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Tue, 10/14/2008 - 09:53

In reply to प्रतिक्रिया... by बिपिन कार्यकर्ते

Permalink

आधी

आधी (कौतुकाची एखादी सुंदर) प्रतिक्रिया टाका, मग पुढचे भाग मागा. लिखाण काय फुकटात येतं? मेहेनत लागते त्या साठी कळ्ळं? व्वा! काय मस्त लिहिलंत हो बिपीनचंद्रराजे तुम्ही! मी तर एकदम फ्यान झाल्ये तुमची! पण तो विमानतळावरून परत जाणं, फर्स्टक्लासमधे प्रवास करायला मिळणं वगैरे काय भारी भारी कल्पना सुचल्यात हो तुम्हाला, मान गये मुघल-ए-आझम! कसं काय हो सुचतं तुम्हाला एवढं सगळं? तुम्ही रोज सकाळी दूध-बदाम खात असाल नाही?? बाकी तुम्ही काय म्हणा मोठे राजे, राजकारणी लोकं; तुम्ही जे कराल त्याला आम्ही सामान्य जनता चांगलंच म्हणणार. बिपीनभौ आगे बढो, हम तुम्हारे साथ है! जीतेगा भाई जितेगा, बिपीनकुमार जितेगा! (आणि सगळ्यात शेवटी, ह.घ्या असं लिहिलेलं नसेल तरी ते लिहिलेलं आहे असं समजा, आणि टाका पटापट पुढचे भाग; एला, मला छळत असतात एलियनचं काय झालं, एलियन आता काय करणार म्हणून!) अदिती
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on Tue, 10/14/2008 - 01:56

In reply to मी पण! by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

काय हो ?

लवकर टाका हो पुढचे भाग! काय हो आज्जी ? सगळेच लोकं खगोलशास्त्रज्ञ नसतात ... बिपीन भौंना काम करावं लागतं हापिसात ... चाल्ले मोठे .. " भाग टाका भाग " ... काय जिल्ब्या आहेत का बुंदी आहे ? पटपट टाकायला .. बिप्पीन भौ .. उशीर झाला चालेल .. पण क्वालिटी ठेवा ... नाय तर ... ( हे सां. न. ल. ) -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आजकाल ... डोकं नापीक झालं आहे ...
  • Log in or register to post comments

Submitted by भिंगरि on Mon, 10/13/2008 - 22:54

Permalink

हा भाग

हा भाग देखील सुरेख. ओघवते वर्णन. +१ हेच म्हणते. काहिहि कारण नसताना निव्वळ त्रास द्यायचा म्हणुन देणारे अधिकारि सगळिकडेच असतात हे समजण्यासारख आहे पण तुमचा अनुभव वाचुन परत एकदा संताप आला.
  • Log in or register to post comments

Submitted by धनंजय on Tue, 10/14/2008 - 02:17

Permalink

छान जमलाय

आता पुढच्या भागात उंट! (हा कहवा प्रकार करून बघायला पाहिजे. मागे कोणीतरी पाकृ दिली होती...)
  • Log in or register to post comments

Submitted by मनस्वी on Tue, 10/14/2008 - 12:01

Permalink

मस्त

छान झालाय हा भाग.
तिला २-३ तास बसवून ठेवलं आणि दर १५ मिनिटांनी ते पीठ तिला थोडं थोडं खायला घालत होते
हे काहीतरीच! पण, मि.इंडियातला तेजा आठवला. :) मनस्वी
  • Log in or register to post comments

Submitted by सुनील on Tue, 10/14/2008 - 15:04

Permalink

झक्कास

झक्कास प्रवासवर्णन बिपिनभौ! आयला दोन्-चार मराठी कादंबर्‍यांपायी ही फरफट? कमाल आहे सौदीवाल्यांची. आणि दर पंधरा पंधरा मिनिटांनी कच्चे पीठ खाणारीची तर दया येते हो! अपचन झालं असेल दुसर्‍या दिवशी!! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ.प्रसाद दाढे on Wed, 10/15/2008 - 09:55

In reply to झक्कास by सुनील

Permalink

आणि दर

आणि दर पंधरा पंधरा मिनिटांनी कच्चे पीठ खाणारीची तर दया येते हो! अपचन झालं असेल दुसर्‍या दिवशी!! नशीब ते 'हि॑गाष्टक चूर्ण' नव्हते ! :)
  • Log in or register to post comments

Submitted by llपुण्याचे पेशवेll on Tue, 10/14/2008 - 16:11

Permalink

मस्त वर्णन बिपीनभाऊ

मला खरेतर मुंबईवरून उडालो तेव्हा तर असे काही वाटले नव्हते पण जेव्हा विमान मध्यंतरासाठी ब्रुसेल्स ला थांबले व तेथून परत उड्डाण केले तेव्हा मला खरे एकटे एकटे वाटले. आणि या गोष्टीचीही जाणीव झाली की आता परतीचे दोर तुटले आहेत कमीत कमी काही महिन्यांसाठी तरी. तुमच्या मागच्या २-३ लेखांमुळे या सर्व्याची परत आठवण झाली.. पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप चित्रे on Wed, 10/15/2008 - 00:19

Permalink

मस्तच जमलाय लेख ..

चला पहिल्याच विमान प्रवासात प्रथम दर्जा ! ते बोरन्हाणाचं वाक्यं खूपच आवडलं. परदेशात आल्यावर एकटेपणाची जाणीव, निदान सुरूवातीला तरी, खूपच कुरतडते :( त्यातही पहिला महिना विस्फारलेल्या नजरेने सगळं टिपण्यात जातो आणि मग दुसर्‍या महिन्यात घराच्या आठवणी खूपच तीव्र होतात ! तिसर्‍या महिन्यात मन स्वतःची समजूत काढून स्वतःला घट्ट करतं !!
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com