सामान्य आणि अ सामान्य
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
श्री अमोल पालेकर पोलिसाकडे तक्रार करून आले
त्यांचे नाव मतदार यादीतून गायब कसे झाले याचा शोध पोलिसांनी घ्यावा असे त्यांचे म्हणणे दिसते
माझे नाव मतदार यादीत आहे का नाही हे मी नेट वर पाहिले
मतदार यादी नेट वर दिसते हे मी वर्तमानपत्रातून वाचले
माझे नाव मतदार यादीत दिसत नव्हते
नेटवरून मी तक्रार नोंदविली
एका आठवड्यात मला SMS वरून कोणाला भेटावे ते कळवण्यात आले
मी त्या अधिकारी व्यक्तीस जाऊन भेटलो
माझे म्हणणे ऐकल्यावर मला माझे नाव नोंदवून मिळाले
माझे नाव गायब का झाले तेही समजले
मी सामान्य माणूस असल्याने कायदे पाळण्याकडे माझा जास्त कल आहे
चांगले अधिकारी भेटले तर माझे काम लवकर होते
हा योग कधीतरी येतो हे मुद्दाम नमूद करतो
श्री अमोल पालेकर हे सामान्य व्यक्तीत मोडत नाहीत त्यामुळे पोलीस अधिकारी त्यांची तक्रार
नोंदवून घेतात --खालील प्रश्न न विचारता
'' तुम्ही शिकलेले लोक पेपर वाचत नाही का ? मतदार यादीत नाव आहे का नाही हे नेट वर
कधी पाहिले ? का पाहिले नाही ? नाव दिसले नाही तर तेव्हाच पाठपुरावा का केला नाही ?
आत्ताच देशप्रेम आठवले का ? तुमच्या मताने फरक पडेल अस कस काय वाटते तुम्हाला ?
आम्ही एक सुट्टीला मुकलो . तुम्हाला तर मतदानाच्या दिवशी सुट्टी आहे . करा ना मजा ''
पोलीस अधिकारी सामान्य नसणारे लोकांची तक्रार -- असली तक्रार -का नोंदवून घेत असतील ?
लोकशाही दुबळी होण्याची कारणे त्यात सापडतील असे मला वाटते कारण मी सामान्य आहे ना ,
माझी समजही सामान्यच !!
प्रतिक्रिया
लोकशाही दुबळी होण्याची कारणे प्रत्येकाने एकटे एकटे लढणे होय!
अमोल पालेकर
आपल्या मतासाठी संघर्ष न
माझा एक मित्र जुन्या
हा एक प्रयत्न आहे
स्वतःला सो कॉल्ड जागरूक
हे ३ वेळा कसे झाले कळत नाही
३ वेळा झाले ते चांगलेच झाले!
अहो, एकही वेळा न होण्यापेक्षा
एकाच अधिकारी व्यक्तीस तीन
अगदी सहमत. माझ्या
माझा निष्कर्ष..
@थॉर माणूस;; इतके प्रयत्न