✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

एक संवाद

श
शुचि यांनी
Mon, 01/13/2014 - 08:54  ·  लेख
लेख
ज्योतिषाचे वावडे असेल त्यांनी दूसरा धागा उघडावा ___________________________________________ "शुचि तुझी मजा आहे बाई नवीन नवीन पार्ट्या अन सोशल इव्हेंट्स नेहमी एन्जॉय करत असतेस. मला तुझा हेवा वाटतो बरेचदा" - कामिनी गेल्या काही महिन्यात तिसर्यांदा मला बोलली. "कामे हजारदा तुला सांगीतले आहे - कितीका उडले तरी मी खरी किंचित पटकन विशवास न टाकणारी अन संषयीच आहे. तुला माझं "मिथुन" लग्न तेवढं दिसतं अन वृश्चिक स्टॅलिअम मात्र तू सोइस्कर रीत्या विसरतेस." - मी चिडूनच बोलले. "शुचि तुझा प्रॉब्लेम काय आहे? तुझं मिथुन लग्न मला बरयापैकी आनंदी, फुलपाखरी, स्वच्छंद अन सकारात्मक देणगी वाटते." - कामिनी आपला मुद्दा रेटत म्हणाली. "कामि तुझ खरे आहे माझा स्वभाव पहिल्या भेटीत खुपसा उथळ, स्वच्छंद अन फुलपाखरी असा तू म्हणतेस तसा भासतो. अन तशा प्रकारच्या स्वभावाकडे आकर्षित होणारे दिव्य लोक माझ्याभोवती रूंजीही घालतात. पण मी काय म्हटले ते तू ऐकलास का नीट? "भासतो" म्हणजे मी तशी आहे असे नव्हे. लगनराशी ही केवळ मुखवटा असते हे मी तुला सांगायला नको. तेवढं ज्योतिष तू ही जाणतेस. दर वेळी पुढे काय होते तुला माहीती आहे - वृश्चिकेच्या स्टलिअम ने आलेली खोली अन इंटेंसिटी लक्षात येताच बरेच जन टर्न ऑफ़ होतात अन पोबारा करतात." "पण तू तुझी वृश्चिक बाजू दाखवातेसच कशाला?" कामी नी मठ्ठ गुगली टाकला. "अगं कशाला म्हणजे काय कामे, मी तशीच आहे. त्यामुळे ते कधीना कधी बाहेर येतच. वृश्चिकेच्या कार्कत्वाखाली येणारे बरेच विषय मला हॉट वाटतात. माझा उपाय नाही." "कोणते विषय?" - कामी विचारती झाली. "मिस्टीकल, near डेथ, अब्यूस, सेक्शुअलिटी शी निगडीत अशा गंभीर विषयांची यादीच आहे. शिवाय अन्य जलराशीतील ग्रह मदत सोडाच उलट हे विषय हायलाइटच करतात Sad " - मी वैतागने म्हटले. कामी विचारती झाली - "शुचि मग दुखते कुठे?" "कामे प्रथमदर्शनी फुलपाखरी स्वभावाला भुललेले लोक जेव्हा एकेक करून काढता पाय घेतात तेव्हा ही मजा बाहेर निघते. अन म्हणे सकारात्मक जगते मी. तुझ्या नानाची टांग." - मी कामीही तशी हुशार आहे. तिने मार्मिक प्रश्न टाकला - "शुचे कोणी वृश्चिक किंवा जल राशीचा मित्र नाही भेटला का मग?" "माझ्याबरोबर राहून राहून हुशार झालीएस कामे" मी हसत म्हटले. "तसा एक मित्र सापडलाय अन अजून तरी त्याने सुम्बाल्या केलेला नाहीये. पण मी तुला इतक्यात काहीच सांगणार नाही." - (दात काढत) अस्मादिक! यावर केस उपटत कामी म्हणाली "हेच हेच तुम्हा जल राशीच्या लोकांचे. अर्धवट सांगून उत्सुकता ताणायची अन मग एकदम गप्प होऊन जायचं.यावर मी म्हणाले "सांगेन गं योग्य वेळ आल्यावर. पण तुझ पटतय आता. I am quite lucky to have this planetary alignment. कामी नी फ़क्त डोक्याला हात लावला.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
ज्योतिष
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
7685 वाचन

💬 प्रतिसाद (34)

प्रतिक्रिया

मिथुन लग्न असलेले

धन्या
Mon, 01/13/2014 - 09:03 नवीन
मिथुन लग्न असलेले ईंटलेक्च्युअल असतात आणि वॄश्चिक लग्न असलेल्यांची कामवासना प्रबळ असते. (असं मी ज्योतिषावरच्या काही पुस्तकांमध्ये वाचलंय ;) ) Pandit Dhanuresh Kashipande Bhagyank Jyotish & Vastushastra Salla Kendra Specialist in Astrology, Gemology & Vastushastra info.bhagyank@femail.com 1234567890
  • Log in or register to post comments

I have read the same though

शुचि
Mon, 01/13/2014 - 09:07 नवीन
I have read the same though have no experience ;) since am not either.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

पास.

प्रभाकर पेठकर
Mon, 01/13/2014 - 10:05 नवीन
अरे बापरे! फक्तं ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासकांसाठी दिसतो आहे हा धागा.. पास......
  • Log in or register to post comments

पण किंचीत (नगण्य) का होईना

शुचि
Tue, 01/14/2014 - 19:31 नवीन
पण किंचीत (नगण्य) का होईना वैश्विक साहीत्यीक मूल्य आहेच की ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

अर्धवट

ज्ञानव
Tue, 01/14/2014 - 20:17 नवीन
सांगून उत्सुकता.....वगैरे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

ही कामिनी कन्या राशीची दिसतेय

कवितानागेश
Mon, 01/13/2014 - 10:52 नवीन
ही कामिनी कन्या राशीची दिसतेय.. :)
  • Log in or register to post comments

नाही ग तिच्यातही थोडा

शुचि
Tue, 01/14/2014 - 19:30 नवीन
नाही ग तिच्यातही थोडा मिथुनपणा आहेच. प्रश्न बघ ना किती विचारते ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

तुळ या राशी विषयी काय मत आहे

सुहास..
Mon, 01/13/2014 - 11:03 नवीन
तुळ या राशी विषयी काय मत आहे . म्हणतात लय रोमॅन्टिक असते रास ?
  • Log in or register to post comments

संतुलित रास असते. नवरा आहे

शुचि
Tue, 01/14/2014 - 19:29 नवीन
संतुलित रास असते. नवरा आहे माझा. सासू च्या कटकटी मी सांगायला लागले की मला बेमालूमपणे, थंड करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..

मिथुन लग्न.....

ज्ञानव
Tue, 01/14/2014 - 12:06 नवीन
आणि वृश्चिक रास हे डेडली कॉम्बिनेशनच म्हणावे लागेल. कारण मिश्किलपणाच्या आवरणात दडलेली वर्मी घाव घालणारी नांगी फक्त इथेच पाह्यला मिळते. तूळ रास "लय रोमॅन्टिक"...नाही हो. (आणि तुम्हाला अपेक्षित "लय रोमॅन्टिक"पणा कृत्तिकेचा शुक्र शोधा ) अवांतर " @शुची ह्या धाग्यावर प्रतिक्रिया खरड वहीतून खरडलीत तर आवडेल.
  • Log in or register to post comments

हो का? कृत्तिकेचा शुक्र का?

शुचि
Tue, 01/14/2014 - 19:28 नवीन
हो का? कृत्तिकेचा शुक्र का? मग तो वृषभेचा की काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानव

अर्धवट

ज्ञानव
Tue, 01/14/2014 - 20:22 नवीन
सांगून उत्सुकता....वगैरे. (बाकी आम्ही मेषेत (एकच चरण असून) बरेच पहिले / पाहिल्या आहेत )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

असेल. माझं ज्योतिषविषयक ज्ञान

शुचि
Tue, 01/14/2014 - 20:24 नवीन
असेल. माझं ज्योतिषविषयक ज्ञान नगण्य आहे. पण मला स्वभाव नीरीक्षण खूप आवडते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानव

माझही.....

ज्ञानव
Tue, 01/14/2014 - 20:41 नवीन
अज्ञान अगाधच आहे. पण चर्चा करायला आवडते ज्याने ज्ञान वाढेल अशी अपेक्षा....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

जल्म १४ फेब्रुवारी चा असल तर

खटपट्या
Tue, 01/14/2014 - 12:43 नवीन
जल्म १४ फेब्रुवारी चा असल तर रास कंची म्हनायची ?
  • Log in or register to post comments

सूर्य रास = कुंभ.

शुचि
Tue, 01/14/2014 - 19:27 नवीन
सूर्य रास = कुंभ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

ओके. मग रोजच्या पेपरात जे

खटपट्या
गुरुवार, 01/16/2014 - 04:52 नवीन
ओके. मग रोजच्या पेपरात जे राशिभविष्य येते ते चंद्र राशीनुसार कि सुर्याराशीनुसार असते ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

जल रास

प्रसाद गोडबोले
Tue, 01/14/2014 - 12:53 नवीन
हेच हेच तुम्हा जल राशीच्या लोकांचे. अर्धवट सांगून उत्सुकता ताणायची अन मग एकदम गप्प होऊन जायचं
ही आयडीया भारी आहे ... उगाचच लोकांची क्युरीयॉसीटी ताणायची अन गप्प व्हायचं :-)))) ( शिवाय आमची रास कर्क आहे ;) त्यामुले हे करायला नक्की जमेल )
  • Log in or register to post comments

वृषभ राशी कशी आहे वो.....!

बाबा पाटील
Tue, 01/14/2014 - 13:03 नवीन
साला आमची व बायकोची दोघांची ही एकच रास आहे हो.पण ती आम्हाला शुद्ध बैल म्हणते हो....!
  • Log in or register to post comments

हाहाहा

शुचि
Tue, 01/14/2014 - 19:27 नवीन
हाहाहा :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबा पाटील

अशी झोडिअ‍ॅक किलबिल

गवि
Tue, 01/14/2014 - 14:00 नवीन
अशी झोडिअ‍ॅक किलबिल मुलींच्यात खूप ऐकू येत असे. याच्याच इंग्रजी व्हर्शनमधे "ए कसला पक्का लिओ आहे ना हा?!" असे मंजूळ उद्गार ऐकून शिरशिरी की कायशीशी म्हणतात ती यायची. आयाळ उगवल्याचा रुबाब यायचा..इ इ. पण पोरींचं हे कॉलेजातच संपतं अशी समजूत होती. छान.
  • Log in or register to post comments

सेम!!!!!!!!!!!!!

बॅटमॅन
Tue, 01/14/2014 - 14:28 नवीन
सेम!!!!!!!!!!!!! बाकी आमच्या मेषराशीबद्दलसुद्धा थोडे लिवा ही इणंती. (गविन्ना न्हवे शुचिमामींना, गविन्ना सुपारी दिली तं मेषपात्र म्हणून वाभाडे काढतील आमचे =)) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

तु पण "डोक्या"ने विचार करणारा

टवाळ कार्टा
Tue, 01/14/2014 - 17:49 नवीन
तु पण "डोक्या"ने विचार करणारा का :) डायरेक्ट एक घाव दोन तुकडे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

काय की बॉ. लोक तरी म्हंटात.

बॅटमॅन
Tue, 01/14/2014 - 18:26 नवीन
काय की बॉ. लोक तरी म्हंटात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

अरे जालावर मेषचे दोघे माहीत

शुचि
Tue, 01/14/2014 - 19:26 नवीन
अरे जालावर मेषचे दोघे माहीत आहेत. कसले, वादपटू आहेत. गेस त्यातला एक कोण असेल? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

दुसरा कोण आहे

बॅटमॅन
Tue, 01/14/2014 - 20:51 नवीन
दुसरा कोण आहे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

वा!! चक्कट्फु? वा रे वा!!

शुचि
Tue, 01/14/2014 - 21:00 नवीन
वा!! चक्कट्फु? वा रे वा!! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

धनयवाद गवि,.

शुचि
Tue, 01/14/2014 - 19:46 नवीन
धनयवाद गवि,.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

नॉन

बर्फाळलांडगा
Tue, 01/14/2014 - 18:12 नवीन
सेन्स!
  • Log in or register to post comments

सर्व प्रतिसादकरत्यांचे आभार.

शुचि
Tue, 01/14/2014 - 18:15 नवीन
सर्व प्रतिसादकरत्यांचे आभार.
  • Log in or register to post comments

मिथुन लग्न वाल्यांचा खरोखरच

सूड
Tue, 01/14/2014 - 18:36 नवीन
मिथुन लग्न वाल्यांचा खरोखरच लोच्या असतो नै !! ;) (मिथुन लग्नवाला)सूड
  • Log in or register to post comments

माहीत नाही ब्वॉ

शुचि
Tue, 01/14/2014 - 19:25 नवीन
माहीत नाही ब्वॉ ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

कर्क बद्दलही सांगा हो काहीतरी

तुमचा अभिषेक
Wed, 01/15/2014 - 23:23 नवीन
कर्क बद्दलही सांगा हो काहीतरी .. म्हणजे रोमान्स वगैरे मध्ये ते कसे असतात.. बरेच जणांच्या तोंडून हि रास मुलांपेक्षा जास्त मुलींना सूट होते असे ऐकून बरेचदा हिरमोड झालाय माझा.. तेवढे तसे करू नका बस्स.. :(
  • Log in or register to post comments

लिंडा गुडमन

सुबोध खरे
गुरुवार, 01/16/2014 - 10:03 नवीन
मी पण कर्क राशीचा आहे. आमची बायको ते लिंडा गुडमन का कायतरी वाचून हे असंच बोलायची( टिपिकल कैन्सेरियन आहे वगैरे.आमच्या वर्गातील मुलीपण तसे काहीतरी(लिंडा पुराण) बोलत असत पण त्यातली कोणीही तशी (!) पाहण्यासारखी वाटली नाही त्यामुळे लिंडा पुरण वाचले नाही. नाहीतर आमच्या वर्गात IUPAP (international union for pure and applied palmistry) चे सदस्य बरेच होते. मी पण एक दोन मुलींचे हात वाचण्यासाठी हातात घेऊन पहिले आणि बरीच थापाथापी केली होती आणि आश्चर्य म्हणजे त्यांना ती पटली पण होती. पण अशी फसवणूक मनाला न पटणारी होती म्हणून ते सोडून दिले. पण जगातील सर्व व्यक्ती फक्त १२ स्वभाव प्रकारात कशा वर्गीकृत करता येतील ते मला समजले नाही(आमची बाळबोध शंका). पुढे बायकोने पण तो नाद सोडून दिला असावा(किंवा हा अगदीच हा! आहे म्हणून माझ्याशी बोलत नसावी).
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा