चला बर्लीनमध्ये फिरुया ! (उत्तरार्ध)
लेखनप्रकार
नमस्कार मंडळी !
पहिल्या भागात (http://www.misalpav.com/node/3636)आपण बर्लीनमधल्या काही महत्वाच्या वास्तूंचे दर्शन घेतले.
आता बोटीत बसून बर्लीनमधल्या 'श्प्रे' या नदीमधून प्रवास करुया.
या नदी काठी बर्लीनमधले एक जगप्रसिद्ध वस्तूसंग्रहालय आहे. पार्गामोन या संग्रहालयात आम्ही गेलो तेव्हा बाबिलॉनियन संकृतीविषयी विशेष दालन करण्यात आले होते. आम्हाला त्या संस्कृतीविषयी काही चित्रफिती, चित्रे आणि पुराणवस्तू पहायला मिळाल्या. त्या संग्रहालयात कायमस्वरुपी असे जे प्रदर्शन आहे त्यात सुद्ध अनेक मोठमोठे भग्नावशेष जतन करुन ठेवण्यात आले आहेत. त्यातीलच काही चित्रे पहा.
या संग्रहालयात चांगले तीन-चार तास फिरुन अनेक उत्तमोत्तम शिल्पे पाहुन आम्ही इजिप्शिअन संग्रहालय पाहण्यास गेलो.
वरचे उजवीकडचे चित्र हे नेफेर्तीती या राणीचे आहे. तो पुतळा तीन-साडेतीन हजार वर्षांपुर्वीचा आहे. तो अत्यंत सुस्थितीमध्ये राहिला आहे.
इजिप्तमधली काही चित्रेकाढलेली भांडी आणि दगडावर कोरलेली चित्रलिपी
काही देवता, सांकेतीक प्राणीचिन्हे
आता त्या संग्रहालयातले एक आकर्षण म्हणजे ममी.
तेथे आई-वडिल-मुले अश्या ममी ठेवल्या आहेत. त्याकाळी कुटुंबीयांना एकाच ठिकाणी दफन करत. त्यामुळे सर्व कुटुंब कालांतराने पुन्हा एकत्रच येई. तसेच बालमृत्युचा दर सुद्धा जास्त असे. खालच्या चित्रांमध्ये डावीकडे वडिल तर उजवीकडे तीन मुले आहेत.
वस्तूसंग्रहालये पाहुन झाल्यावर आम्ही बर्लीनच्या जवळचेच शहर पोट्सडाम येथे गेलो. हे शहर इतिहास प्रसिद्ध आहे कारण प्रशियाचे राजे इथे असलेल्या राजवाड्यात राहत असत. येथे एक अत्यंत महत्वाची वास्तू आहे ती म्हणजे सिसिलिअनहोफ राजवाडा.
या राजवाड्यामध्ये दुसरे महायुद्ध जिंकल्यावर ट्रुमन-चर्चील+ऍटली-स्टॅलिन यांची ऐतिहासिक भेट झाली होती. या भेटीच्या वेळी ट्रुमन-ऍटली-स्टॅलीन यांच्यात पोट्सडाम करार झाला. या वाड्यामध्ये त्या सर्व आठवणी संग्रहालयाच्या रुपात जतन करण्यात आल्या आहेत. त्या वेळचे फोटो, त्या लोकांनी वापरलेले सामान, त्यांच्या उठबसण्याच्या खोल्या, त्याच्या सहिची कागदपत्रे इत्यादी पाहण्यास मिळते. पण आतमध्ये प्रकाशचित्रणास मनाई असल्याने त्या वाड्याची बाहेरुन काढलेली चित्रे दिली आहेत.
पोट्सडाम पाहुन झाल्यावर आमचा परतीचा प्रवास चालू झाला. या बर्लीनभेटी दरम्यान अनेक भव्य वास्तू आणि ऐतिहासिक महत्वाच्या स्थळांना भेट दिली. तुम्हाला हा चित्र-प्रवास आवडला असेल अशी आशा करतो.
आपलाच,
--लिखाळ.

वाचने
7933
वाचनखूण
प्रतिक्रिया
24
लेख आवडला
चित्रे सुंदर
In reply to चित्रे सुंदर by प्रियाली
नेफेर्तीती
In reply to नेफेर्तीती by लिखाळ
सुंदर गणली जाते खरी पण....
In reply to सुंदर गणली जाते खरी पण.... by प्रियाली
खरेतर
In reply to खरेतर by लिखाळ
बर्लिनचे सचित्र दर्शन
In reply to बर्लिनचे सचित्र दर्शन by चित्रा
.
In reply to . by लिखाळ
चपला आणि कपडे
In reply to चपला आणि कपडे by प्रियाली
.
सहल छान झाली.
उत्तम
मस्त
बर्लिनचा चित्रदर्शी प्रवास आवडला!
आम्ही फुकटे
मस्त जर्मनी....
मस्त
In reply to मस्त by ३_१४ विक्षिप्त अदिती
वा !
ऍस्क्लेपायस
In reply to ऍस्क्लेपायस by प्रियाली
वा
In reply to वा by लिखाळ
हो!
In reply to हो! by प्रियाली
वा
In reply to वा by लिखाळ
हाहा!
चित्रमय लेख
मस्त सफर