Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by उद्दाम on Sat, 11/09/2013 - 19:30
भारतात पूर्वी काही संस्थाने होती . त्याना प्रिन्सली स्टेट असे म्हणत. इथे त्यांची यादी आहे. http://en.wikipedia.org/wiki/List_of_princely_states_of_India भारतातील लोकांचा आजही मुघल आणि इंग्रज यांच्यावर प्रचंड राग आहे. त्यान्नी देशाला लुटले हीच भावना आजही कायम आहे. पण १८५७ साली अखेरचा मुघल बादशाहा बहाद्दूर शहा जफर इंग्रजांविरुद्ध लढला . त्यात तो हरला. अखेर काही वर्षे तुरुंगात राहून मग तो त्यातच मेला. मुघल साम्राज्याचे इतर तुकडेही असेच नष्ट झाले.. म्हणजे इंग्रजांनी गिळले. लखनौ (अवध) चा नबाब साजिद अली हाही इंग्रजांपुढे पराभूत झाला. जेंव्हा त्याला इंग्रज पकडून घेऊन जात होते, तेंव्हा त्याने त्याच्या भावना व्यक्त करायला चार ओळी खरडल्या. सैगलपासून पार भिमसेनजींपर्यंत सर्वांनाच त्या ओळीनी भुरळ घातली. बाबुल मोरा, नैहर छूटो ही जाए चार कहार मिल, मोरी डोलिया सजावें (उठायें) मोरा अपना बेगाना छूटो जाए | बाबुल मोरा ... आँगना तो पर्बत भयो और देहरी भयी बिदेश जाए बाबुल घर आपनो मैं चली पीया के देश | बाबुल मोरा ... मुघल संपले. त्यांच्या इमारती, राज्ये, पैसा हे सर्व इंग्रजांच्या मालकीचे झाले. पुढे १९४७ साली इंग्रजही देश सोडून गेले आणि त्यान्नी इंग्लंडला नेलेलं जरी आपल्याकडून गेलं, तरी भारतातील गंगाजळी, भारतातील स्थावर मालमत्ता , इतर उद्योगधंदे , इतर शासकीय संपत्ती ही भारतातच आणि भारताच्या मालकीचीच राहिली. त्यामुळं मुघलानी आणि इंग्रजान्नी घेतलेलं काही अंशी तरी देशाला परत मिळालं. पण ज्या संस्थानिकांच्या गढ्या, राजवाडे , महाल होते, त्यातील मात्र बर्‍याचशा वास्तू संस्थानिक घराण्याच्याच राहिल्या आणि आजही त्या 'शासकीय ' मालकीच्या झालेल्या नाहीत. १९४७ साली संस्थानिकांनी आपली प्रजा लोकशाहीच्या मांडीवर बसवली , पण राजकोष आणि राजमहाल हे भारतात विलीन झाले का? उदाहरणार्थ, आमच्या गावचा कुरुंदवाडचा राजवाडा हा आजही संस्थानिकांचीच खाजगी मालमत्ता आहे. का, ही त्यांची अर्जित प्रॉपर्टी होती? इतर ठिकाणी काय परिस्थिती आहे? मुघलांचे वाडे सरकारचे झाले. शिवाजी महाराजांचे किल्ले सरकारजमा आहेत. इंग्रजांच्या वास्तूही सरकारजमा आहेत. पेशवाई शनिवारवाडा हाही पेशव्यांचा खाजगी राहिलेला नाही. मग संस्थानिकांच्या गढ्या, महाल, वाडे हे मात्र त्यांच्याच नावाने कसे राहिले?
  • 42664 views

प्रतिक्रिया

Submitted by चित्रगुप्त on Sun, 11/10/2013 - 10:26

Permalink

जपणूक आणि वाताहात

गढ्या शासनाच्या मालकीच्या व्हायला पाहीजेत असं का ? कपडे, जोडे, मंगळसूत्र, बादली, मग, टमरेल यांच्याबद्दल काय ?
शंभर टक्के सहमत. तसा हा विषय फार मोठा आहे, आणि कुणाचा यावर अभ्यास असेल, तर त्याने अवश्य विवेचन करावे, असा आहे. आजमितीला सुध्द्धा, तेही तरूण पीढीपैकी, या राजेलोकांबद्दल प्रचंड आदर असणारे अनेक लोक आहेत. आणि त्यात काहीही गैर आहे, असे वाटत नाही. गढ्या, राजवाडे इ. पैकी प्रत्येक हकिगत वेगळी असणार. याबद्दल सरसकट विधान करता येणार नाही. सर्वच देशातील प्रासाद वगैरे त्या त्या देशातील मौल्यवान प्रमुख सांस्कृतिक ठेवा असून देशासाठी मिळकतीचा स्त्रोत आहेत. जे प्रासाद सरकार जमा झाले, त्यांची वाताहात झाली, उलट वंशजांनीच नीट जपणूक केली, असेही दिसते.

Submitted by ग्रेटथिन्कर on Sun, 11/10/2013 - 10:30

Permalink

या संस्थानिकांनी विविध संस्था

या संस्थानिकांनी विविध संस्था,ट्रस्ट स्थापण करुन त्या नावे हजारो एकर जमिनी वर्ग केल्या आहेत. त्यावर ट्रस्टी यांचेच बगलबच्चे असतात, कायदा करणारे हेच लोक असल्याने त्यात पळवाटा ठेऊन आपल्या गढ्या यांनी वाचवल्या आहेत.

Submitted by अन्या दातार on Sun, 11/10/2013 - 11:49

In reply to या संस्थानिकांनी विविध संस्था by ग्रेटथिन्कर

Permalink

??

कायदा करणारे हेच लोक असल्याने त्यात पळवाटा ठेऊन आपल्या गढ्या यांनी वाचवल्या आहेत.
कोणत्या कायद्याबद्दल बोलत आहात? का उगाच सामाजिक विषयावर लिहिण्याची खाज / कंड भागवून घेत आहात

Submitted by मुक्त विहारि on Sun, 11/10/2013 - 16:03

In reply to ?? by अन्या दातार

Permalink

@ अन्या दातार....

जाने दो... ते अद्याप नथु गुग्गूळ घेत आहेत. त्यामुळे चिंता नसावी....

Submitted by मुक्त विहारि on Sun, 11/10/2013 - 16:06

In reply to या संस्थानिकांनी विविध संस्था by ग्रेटथिन्कर

Permalink

@ ग्रे.थि.

अरेरे काय हे... किती वेळा तोंडावर पडणार? जा बर...तुमची नथू गुग्गुळ घ्यायची वेळ झाली आहे...

Submitted by अनुप ढेरे on Sun, 11/10/2013 - 16:22

Permalink

अवांतरः अवध चा तो नबाब सजिद

अवांतरः अवध चा तो नबाब सजिद अली नाही... वाजीद अली शाह. गाण्याचा एकदम शौकिन... अमजद खाननी त्याचं काम केलं होतं 'शतरंजके खिलाडी' नावाच्या पिच्चरमध्ये.

Submitted by रमेश आठवले on Sun, 11/10/2013 - 18:44

Permalink

संस्थानिकांचे हक्क आणि सवलती

भारत निर्माण झाले त्यावेळी सर्व स्न्स्थानीकावर इंग्रजांची suzerainty होती. त्यांनी सर्व संस्थानिकांना स्वतंत्र होण्याची किंवा भारतात अथवा पाकिस्तानात विलीन होण्याची मुभा दिली होती. त्यांतर भारत सरकारच्या ( म्हणजे वल्लभभाई पटेलांच्या ) हिकमती मुळे जवळ जवळ सर्व संस्थानिक भारतात विलीन झाली. त्यावेळी सर्व स्न्स्थानिकांच्या खालील अटी भारत सरकारने मान्य केल्या- १. त्यांचा राजमहाल अथवा गढी अथवा किल्ला (ल्ले ) त्यांच्याच ताब्यात रहावे. २. त्याना विजेचा उपयोग मोफत असावा. ३. त्यांच्या गाड्यांवर त्याना स्वत:च्या number प्लेट लावू द्याव्या. वगैरे वगैरे. या तहाच्या अटी प्रमाणे किल्ले अथवा महाल आज सुद्धा स्न्स्थानिकाञ्च्या मालकीचे आहेत. या शिवाय प्रत्येक संस्थानाच्या महसुलावर आधारित एक वार्षिक रक्कम ( privy purse ) देण्याचे करार झाले होते. नंतर इंदिरा गांधी यांनी one time settlement करण्याचे ठरवले आणि वार्षिक रक्कम देणे बंद केले.

Submitted by विश्वनाथ मेहेंदळे on Mon, 11/11/2013 - 11:44

In reply to संस्थानिकांचे हक्क आणि सवलती by रमेश आठवले

Permalink

विषयच संपला !!!

विषयच संपला !!!

Submitted by उद्दाम on Mon, 11/11/2013 - 15:42

In reply to संस्थानिकांचे हक्क आणि सवलती by रमेश आठवले

Permalink

.

अगागागा ! या सगळ्याची किंमत ५५ कोटींपेक्षा नक्कीच जास्त होईल .. म्हणजे पाकिस्तानपेक्षा हे संस्थानिकच देशाला डबर्‍यात घालणारे निघाले म्हणायचे. :)

Submitted by llपुण्याचे पेशवेll on Mon, 11/11/2013 - 22:17

In reply to . by उद्दाम

Permalink

म्हणे संस्थानिक

होना! एकतर स्वतः काही पराक्रम केला नाही. नुसते आपले सातारकर भांडतायत कोल्हापूरकरांशी, कोल्हापूरकर भांडतायत सातारकर आणि नागपूरकरांशी, सगळे मिळून भांडतात शिंद्यांशी, शिंदे भांडतात होळकरांशी. बिनकामाचे लेकाचे.

Submitted by मृत्युन्जय on Wed, 11/13/2013 - 10:55

In reply to म्हणे संस्थानिक by llपुण्याचे पेशवेll

Permalink

हो. आणि वर हेच लोक एक्मेकांना

हो. आणि वर हेच लोक एक्मेकांना धोतरबडवी सल्ले देणार आणि देश धर्माला खड्ड्यात घालणार. गण्या (शिर्के फेम. फुटु देत डोळे, सोलु देत जीभा वाले) पेक्षा हे काय वेगळे? सगळॅ एकाच जातीचे.

Submitted by मुक्त विहारि on Mon, 11/11/2013 - 15:41

Permalink

आयला....

तुमचा हाच लेख मायबोली वर पण प्रसिद्ध झाला आहे..... http://www.maayboli.com/node/46232

Submitted by वेताळ on Mon, 11/11/2013 - 18:09

Permalink

भारतात आजकाल खुप विचित्र गोष्टी होताहेत नाही

संजीव पिल्ले ला महाराष्ट्रातील गढ्यांची काळजी लागुन राहिली आहे.केरळात मग काय त्यावेळी सर्व मालमत्ता लोंकाच्या मालकीची होती काय?

Submitted by परिंदा on Mon, 11/11/2013 - 18:28

In reply to भारतात आजकाल खुप विचित्र गोष्टी होताहेत नाही by वेताळ

Permalink

मुघलांचे गोडवे गाणारे "हे"

मुघलांचे गोडवे गाणारे "हे" हैद्राबादच्या निजामाला बरे विसरलेत?

Submitted by ग्रेटथिन्कर on Mon, 11/11/2013 - 18:43

In reply to मुघलांचे गोडवे गाणारे "हे" by परिंदा

Permalink

तूमी खरे 'हे 'आहात, निजामाची

तूमी खरे 'हे 'आहात, निजामाची आठवण ठेवलीत.

Submitted by उद्दाम on Tue, 11/12/2013 - 09:22

In reply to भारतात आजकाल खुप विचित्र गोष्टी होताहेत नाही by वेताळ

Permalink

.

वर लेखात मी संपूर्ण भारतील प्रिन्सली स्टेटची यादी दिलेली आहे. हा लेख केवळ म्हाराष्ट्रातील नव्हे, भारतातील सर्व संस्थानिकांना लागू आहे.

Submitted by इरसाल on Wed, 11/13/2013 - 10:28

In reply to भारतात आजकाल खुप विचित्र गोष्टी होताहेत नाही by वेताळ

Permalink

ख्या ख्या ख्या

जागो .....जागो मोहन प्यारे !!!!!

Submitted by परिंदा on Mon, 11/11/2013 - 18:30

Permalink

भारतातेल संस्थानिकांनी

भारतातेल संस्थानिकांनी राजवाडे , पैसा गिळंकृत करुन वर पुन्हा पेन्शन खाल्लेली आहे, हे भयाणच आहे. एकीकडे जे स्वातंत्र्यासाठी लढले त्यान्ना दीडकीभर पेन्शन आणि यान्ना मात्र वाडे, महाल, पेन्शन. भारतीय जनतेला वर्षानुवर्षे मूर्ख बनवण्याचे काम या संस्थानिकानी केले. देशभक्ती / प्रांतभक्तीच्या नावाने आम जनता यान्नी शताकानुशतके लढवली आणि त्याचा एंड प्रॉडक्ट काय? तर गोळा झालेली संपत्ती ही त्यांची खाजगी मालमत्ता ! म्हणजे 'देशप्रेम' हा त्यांचा फ्यामिली बिझनेस झाला नै का? याउलट, मुघल इंग्रजांविरुद्ध कडवेपणाने लढले आणि अखेर तुरुंगात जाऊन मेले. त्यांची संपत्तीही देशाला काही अंशी परत मिळाली. इतक्या पुण्याईवर मुघल हे प्रातःस्मरणीय ठरवायला हरकत नसावी , नै का?
ही अख्खी पोस्ट आजच्या महान राजकारण्यांना अगदी जशीच्या तशी लागू होते. :)

Submitted by आसिफ on Tue, 11/12/2013 - 03:15

Permalink

आमच्या गावचा कुरुंदवाडचा राजवाडा...

तुम्ही उल्लेख केलेला कुरुंदवाड चा राजवाडा आज अस्तित्वात नाही. तीनशे, साडेतीनशे वर्षांपासुन दिमाखदार पणे उभा असलेला राजवाडा ह्या वर्षी एप्रिल मे मध्ये जमीनदोस्त करण्यात आला. अवांतरः राजवाडा पाडु नये म्हणुन मध्यंतरी एका पक्षाने आंदोलन केलेले, पण खाजगी मालमत्ता असले कारणाने काही होउ शकले नाही.आता त्या जागेवर घर संकुल बनवण्याचा पटवर्धन राजे साहेबांचा मनसुबा आहे असे कळाले. -आसिफ राजवाडयाच्या सर्व भागात मुक्त संचार केलेला आणि त्याला जमिनदोस्त होताना हळवा झालेला..

Submitted by उद्दाम on Tue, 11/12/2013 - 09:20

In reply to आमच्या गावचा कुरुंदवाडचा राजवाडा... by आसिफ

Permalink

.

हो. मला माहीत आहे. मी तेंव्हा कुरुंदवाडातच होतो.

Submitted by उद्दाम on Wed, 11/13/2013 - 09:19

Permalink

.

सरकारी कार्यालये, शाळा, कॉलेज, हॉस्पिटले याना या जागा द्याव्यात. सी एस टी पासून लाल किल्ल्याप्र्यंत ढीगभर वास्तू भारतीय जनता आनंदाने वापरत आहे. लोकोपयोगी कामांना जागा नाही आणि नॉस्टाल्गियाच्या नावानं असल्या रावबहाद्दुरांचे फोटो आणि त्यांच्या रखेल्यांची भांडी कुंडी ठेवायला जनतेच्या हक्काच्या जागा कशाला वापरायच्या? एखाददुसरा हॉल ठेवावा. पण मुख्य जागा आणि संपत्ती सरकारजमाच व्हायला हवी. इंदिरा गांधींनी या बांडगुळांची पेन्शन बंद करुन एक चांगला पायंडा पाडला. या जागा ताब्यात घेऊन याला लोकशाही राजवटीचा पुढचा अध्याय जोडला जायला हवा.

Submitted by अनुप ढेरे on Wed, 11/13/2013 - 09:35

In reply to . by उद्दाम

Permalink

पण मुख्य जागा आणि संपत्ती

पण मुख्य जागा आणि संपत्ती सरकारजमाच व्हायला हवी.
म्हणजे बिल्डर लोकांना घशात घालता येइल आरामात. आणि काचेच्या भिंती असलेले ठोकळे बनवता येतील.

Submitted by उद्दाम on Wed, 11/13/2013 - 10:42

In reply to पण मुख्य जागा आणि संपत्ती by अनुप ढेरे

Permalink

.

काचेचा ठोकळा पाडला.

Submitted by मालोजीराव on Wed, 11/13/2013 - 13:39

In reply to . by उद्दाम

Permalink

सरकारी कार्यालये, शाळा, कॉलेज

सरकारी कार्यालये, शाळा, कॉलेज, हॉस्पिटले याना या जागा द्याव्यात
पुणे,कोल्हापूर,सातारा,मुंबई,नागपूर इथे दिल्यात कि जागा-वाडे , प्रतिसाद आणि लेख दोन्हीही अभ्यास करून टाकत चला !

Submitted by उद्दाम on Wed, 11/13/2013 - 13:44

In reply to सरकारी कार्यालये, शाळा, कॉलेज by मालोजीराव

Permalink

.

ज्या जागा अद्यापही संस्थानिकांकडेच आहेत, त्यांच्याबद्दल हा लेख आहे. तुमचा अभ्यास वाढवायचा असेल तर कुरुंदवाडात येऊन बघून जा. अजुनही भारतात अनेक ठिकाणे असलीत, तिथे फिरुन या.

Submitted by ग्रेटथिन्कर on Wed, 11/13/2013 - 13:57

In reply to सरकारी कार्यालये, शाळा, कॉलेज by मालोजीराव

Permalink

सगळ्या द्या, त्या तूमचा खाजगी

सगळ्या द्या, त्या तूमचा खाजगी नाहीत जनतेच्या आहेत.

Submitted by वेताळ on Wed, 11/13/2013 - 20:10

In reply to सरकारी कार्यालये, शाळा, कॉलेज by मालोजीराव

Permalink

आजकाल भिक देखिल धमकावुन मागितली जाते

काळाचा महिमा बाकि काय.........

Submitted by ग्रेटथिन्कर on Wed, 11/13/2013 - 20:32

In reply to आजकाल भिक देखिल धमकावुन मागितली जाते by वेताळ

Permalink

जे स्वतःचे आहे ते जनतेने परत

जे स्वतःचे आहे ते जनतेने परत मागतले तर भिक कशी होते हो?

Submitted by बॅटमॅन on गुरुवार, 11/14/2013 - 03:31

In reply to जे स्वतःचे आहे ते जनतेने परत by ग्रेटथिन्कर

Permalink

तुमच्याकडे कुणी भीक मागितली

तुमच्याकडे कुणी भीक मागितली की तुझेच धन तुला देतो म्हणून परत देता का =)) मीपण लग्गेच येतो आहे नै ते घ्यायला.

Submitted by ग्रेटथिन्कर on गुरुवार, 11/14/2013 - 11:47

In reply to तुमच्याकडे कुणी भीक मागितली by बॅटमॅन

Permalink

प्रश्न संस्थानिकांच्या

प्रश्न संस्थानिकांच्या मालमत्तेचा आहे, ती मालमत्ता जनतेचीच आहे. ती परत मागितली की भीक होते का.. बरं बरं असेल असेल.

Submitted by अनुप ढेरे on गुरुवार, 11/14/2013 - 12:31

In reply to प्रश्न संस्थानिकांच्या by ग्रेटथिन्कर

Permalink

जनतेनी मागितली म्हणजे नक्की

जनतेनी मागितली म्हणजे नक्की कुणी मागितली? का हे अर्णव गोस्वामी च्या 'जनता आपसे जवाब मांग रही है' या प्रश्नाच्या छापाचं??

Submitted by वेताळ on गुरुवार, 11/14/2013 - 17:25

In reply to प्रश्न संस्थानिकांच्या by ग्रेटथिन्कर

Permalink

राग येवु देवु नका भाऊ

मला एक सांगा भारतातील किंवा जगातील जे काही राजे किंवा संस्थानिक झालेत्,त्या सर्वानी आपली मालमत्ता फक्त जनतेला ठकवुन मिळवली होती का? जी काही किल्ले किंवा गढ्या उभ्या आहेत त्या १०० % जनतेवर अत्याचार करणार्‍यानी ऊभ्या केल्या आहेत? अहो ज्याच्या मनगटात धमक होती किंवा ज्याना आपल्या जिवाची पर्वा नव्हती असे त्यात कित्येक योध्दे होते. त्यानी पराक्रम गाजवला त्यानी संपत्ती मिळवली. ज्यानी जनतेवर अत्याचार केले त्याची संपत्ती जनतेने उठाव करुन लुटली आहेच ना.जर तुमचे आमचे पुर्वज भ्याड किंवा भाडखावु असतील तर आपल्याला ह्यातले काहिच मिळणार नाही. उगाच ह्याचा वाडा का नाही मिळाला,किण्वा त्याची जमीन का सरकार जमा झाली नाही असे दाखले देण्यात काय हाशिल आहे?त्याच्या मनगटात आज जोर आहे ते लोक सोन्याचा धुर काढत आहेत,तुम्ही पण कष्ट करुन मिळवाना संपती आणि त्यावर बांधा ना महाल. मुकेश अंबानीने आज जगातील सर्वात दिमाखदार महाल उभा केलाच आहे ना?तुम्ही आम्ही फक्त आम्हाला राखिव कोटा द्या व ह्याचा वाडा व जमीन सरकार जमा करुन आम्हाला वापरायला द्या हेच तुणतुणे वाजवत राहणार आहे. मग ही भीक नाही तर काय आहे?

Submitted by डॉ.प्रसाद दाढे on Wed, 11/13/2013 - 11:17

Permalink

नक्की काय फरक आहे ?

तेंव्हाचे शिरपेच अन मोरचेल मिरविणारे, रयतेकडून जुलमाने खंडरुपी धन गोळाकरून अनेक बेगमा/ उपस्त्रिया ठेवणारे, स्वतंत्र गाडीतून फिरणारे, आपल्याच नातेवाईकाला मोठ्या अधिकराच्या जागा देणारे, अनेक नोकर-चाकर पदरी बाळगणारे, मन रिझवण्यासाठी शिकार करणारे, कधी नर्तकीच्या वा गाणारीच्या कलेचा मद्य धुंद होउन अस्वाद घेणारे अन इंग्रजांपुढे लाचार असणार्‍या पण स्वकियांपुढे मुजोर असणार्‍या संस्थानिकांमध्ये आणि आजच्या नगरसेवक-आमदार-राज्य मंत्री-खासदार-केंद्रिय मंत्री ह्यांच्यात काय फरक आहे. किरकोळ तपशिलात फरक असेल पण तीच मुजोरी, तीच भ्रष्ट सिस्टीम, आपल्या मुला-नातवंडांसाठी, वारसांसाठी अमाप जमिनी इस्टेटी, कंत्राटांमधून प्रचंड नफा/ लाच, बदल्या करण्यासाठी लाच, घोटाळे, निवडणूकांमध्ये अफरातफर, आलिशान सरकारी महाल, लाल दिव्याच्या गाड्यांचा ताफा, शिकारी, प्रोटोकॉलच्या नावाखाली झडणारे सॅल्यूट्स, स्वतःच्या मुलाला मंत्रीपद मिळण्यासाठी आटापिटा... यादी खूप मोठी आहे. मी तर म्हणेन तेव्हांच्या संस्थानिकांपेक्षा अन इंग्रजांपेक्षासुद्धा हे आत्ताचे नीच राजकारणी खरे भारतद्रोही आहेत. कसली लोकशाही आहे आपल्याकडे..थट्टा मात्र आहे. निवडणूकांच्या काळात मतदारांना पाच पाच हजार वाटण्याचे प्रकार मी माझ्या डोळ्यांनी पाहिले आहेत. जाऊ देत, हा सगळा विषयच बीपी वाढविणारा आहे, त्यामुळे हतबल होण्यापलिकडे आपल्या हातात काहीही उरलेले नाही.

Submitted by मंदार कात्रे on Wed, 11/13/2013 - 12:28

Permalink

सहमत

कसली लोकशाही आहे आपल्याकडे..थट्टा मात्र आहे.
१००% सहमत

Submitted by लोटीया_पठाण on Wed, 11/13/2013 - 14:54

Permalink

दिल्लिचा पाटील.....Lol

दिल्लिचा पाटील.....Lol

Submitted by पुष्कर जोशी on गुरुवार, 11/14/2013 - 12:19

Permalink

http://shivsamarthyog

http://shivsamarthyog.blogspot.in जाउदे आपण ह्याची वाट पाहु

Submitted by विजुभाऊ on गुरुवार, 11/14/2013 - 12:59

Permalink

१८५७ च्या लढ्यात महादजी

१८५७ च्या लढ्यात महादजी शिंद्यांचे वंशज इंग्रजाना समर्थ देत होते. त्यांचा स्वतःचा दिल्लीतील वाडा हा इंग्रजांचा किल्ला म्हणून वापरात होता. त्यांचे वंशज आता केंद्रीयमंत्री म्हणून दोन्ही मोठ्या पक्षांतर्फे मिरवतात.

Submitted by मालोजीराव on गुरुवार, 11/14/2013 - 14:40

In reply to १८५७ च्या लढ्यात महादजी by विजुभाऊ

Permalink

१८५७ च्या लढ्यात महादजी

१८५७ च्या लढ्यात महादजी शिंद्यांचे वंशज इंग्रजाना समर्थ देत होते.
झाशीची राणी आणि तात्या टोपे यांच्याविरुद्ध…याला झाशी संस्थान बळकवण्याची जयाजीरावाची इच्छा आणि पेशवा-शिंदे कटू संबंधाची पार्श्वभूमी होती. १८५७ स्वातंत्रलढ्याच्या मुख्य प्रवाहाशी याचा संबंध नाही. हा लढा मोडून काढण्यात राजपुतान्याचा सिंहाचा वाटा होता.

Submitted by ग्रेटथिन्कर on गुरुवार, 11/14/2013 - 15:00

In reply to १८५७ च्या लढ्यात महादजी by मालोजीराव

Permalink

उत्तरेकडे खरा पराक्रम दाखवला

उत्तरेकडे खरा पराक्रम दाखवला शिंदे आणि होळकर या दोन सरदारांनी, परंतु त्याचे श्रेय पुण्यात बसणार्या पेशव्यांनी घ्यायचे असे चालू होते. एक तर पेशव्यानी सातारच्या गादीला नामधारी बनवले होते वर पळीपंचांगानुसार युद्धाचे मुहुर्त काढायचे ,असला पोरखेळ शिंदे व होळकरांना मानवणार कसा? त्यातच नर्तकीचे प्रकरण, दारुबाजपणा , ध चा मा करण्याची या पेशव्यांची अनैतीक वृत्ती . शिवभुपाचे स्वराज्य पेशव्यांनी कवडीमोलाने उधळायचा सपाटा लावला होता. त्यामुळेच पेशवे शिंदे यांच्या संबंधात कटुता आली.

Submitted by श्रीगुरुजी on गुरुवार, 11/14/2013 - 15:07

In reply to उत्तरेकडे खरा पराक्रम दाखवला by ग्रेटथिन्कर

Permalink

पानिपतच्या युद्धात अतुलनीय

पानिपतच्या युद्धात अतुलनीय पराक्रम गाजवून भाऊसाहेब पेशवे व विश्वासराव पेशवे हुतात्मा झाले होते. त्याच युद्धात मल्हारराव होळकर युद्ध सोडून निघून आले होते.

Submitted by मृत्युन्जय on गुरुवार, 11/14/2013 - 15:12

In reply to पानिपतच्या युद्धात अतुलनीय by श्रीगुरुजी

Permalink

युद्ध सोडुन पळुन गेले असे

युद्ध सोडुन पळुन गेले असे म्हणायचे आहे का तुम्हाला?

Submitted by ग्रेटथिन्कर on गुरुवार, 11/14/2013 - 17:54

In reply to पानिपतच्या युद्धात अतुलनीय by श्रीगुरुजी

Permalink

शिंदे ,होळकरांची खडी फौज होती

शिंदे ,होळकरांची खडी फौज होती, तर पेशव्यांच्या ताफ्यात अर्धेअधिक बाजारबुणगेच होते. त्यात परत फुकट जेवणारे, तीर्थयात्रा करणारे भोळसट बायाबापुडे घेऊन सदाशिवभाऊ युद्धाला आले होते .या असल्या बाजारबुणग्यांमुळे लाख मराठा तिथे कापला गेला.या बाजारबुणग्यांनीच अर्धी रसद खाऊन संपवली होती. युद्ध कूटनीती करायचे सोडून ब्राह्मणभोजने आणि तिर्थक्षेत्री जिर्णोधार करण्यात पेशवाई मश्गुल होती .यामुळे मराठ्यांची चाल धीमी पडली .अशा मुर्खांसाठी होळकर कशाला जीव धोक्यात घालतील? आणि होळकरांनी माघार घेतली त्याआधी सदाशीवभाऊ युद्धातुन पळुन गेले होते असेही इतिहासकार मान्य करतात. हरीयाणात भाऊंचे मंदीरही आहे. जिथे ते छुपे रहात होते.ते महाराष्ट्रात पळून आल्याचेही मानले जाते.

Submitted by बॅटमॅन on गुरुवार, 11/14/2013 - 18:15

In reply to शिंदे ,होळकरांची खडी फौज होती by ग्रेटथिन्कर

Permalink

आणि होळकरांनी माघार घेतली

आणि होळकरांनी माघार घेतली त्याआधी सदाशीवभाऊ युद्धातुन पळुन गेले होते असेही इतिहासकार मान्य करतात. हरीयाणात भाऊंचे मंदीरही आहे. जिथे ते छुपे रहात होते.ते महाराष्ट्रात पळून आल्याचेही मानले जाते.
पानिपतात प्रत्यक्ष हजर असलेला अवधचा नबाब सुजाउद्दौला याचा दिवाण काशीराज याने त्या एकूण प्रकरणावर काही वृत्तांत लिहिला आहे. त्याचे भाषांतर कोणा ब्राऊन नामक इंग्रजाने केलेय आणि शेजवलकरांनी ते आपल्या ग्रंथात वापरलेय. त्यात स्पष्ट दिलेय की लढाईच्या दुसर्‍या दिवशी काही मंडळी सुजाकडे आली आणि डेड बॉडी दहनाकरिता मागू लागली. विश्वासरावांची बॉडी पेंढा भरून काबूलला नेऊ म्हणून पठाण मागे लागले होते पण त्यांना मनवण्यात कसेबसे यश आले. सदाशिवरावभाऊंचे धड दुसर्‍या दिवशी मिळाले. शीर कापले होते. त्या धडावरचे भरजरी कपडे, अलंकार व काही जखमा, विशेषतः १७५९ साली पुण्यातल्या गारपिरावर एका गारद्याने केलेला वार, इ. ताडून पाहता ते भाऊचेच आहे याची खात्री पटली. पण शीर काही मिळाले नाही. पुढे काही वेळाने एका पठाण सैनिकाने ते कापून जमिनीत पुरून ठेवले होते असे कळाले. मग ते उकरून ताब्यात घेतले आणि दहन झालेय रणभूमीवरच. अस्सल पुरावे बघण्याचे कष्ट न घेऊन सोनवणी आणि नरके यांच्यासारख्या रेम्याडोक्यांच्या भजनी लागणारी तुमच्यासारख्यांची पिलावळ आजकाल वाढत लागली आहे. कधी हे ग्रहण सुटणार देव जाणे.

Submitted by ग्रेटथिन्कर on गुरुवार, 11/14/2013 - 21:58

In reply to आणि होळकरांनी माघार घेतली by बॅटमॅन

Permalink

तुम्ही सफेद दाढीवाल्याच्या

तुम्ही सफेद दाढीवाल्याच्या भजनी लागला आहात ना! मग ठीकाय तर.

Submitted by बॅटमॅन on Fri, 11/15/2013 - 01:08

In reply to तुम्ही सफेद दाढीवाल्याच्या by ग्रेटथिन्कर

Permalink

नरके आणि सोनवणी हे तुमचे गुरू

नरके आणि सोनवणी हे तुमचे गुरू, तुम क्या जानो सच्चाई क्या होती है. अश्वत्थाम्याला खरे दूध काय ते माहितीच नव्हते म्हणतात, पाण्यात पीठ मिसळून तेच खात असे गरिबीमुळे. पुढे हस्तिनापुरात खरे दूध प्याला ते त्याला आधीच्या सवयीमुळे आवडेचना तशी गत झालीये तुमची =))

Submitted by ग्रेटथिन्कर on Fri, 11/15/2013 - 09:10

In reply to नरके आणि सोनवणी हे तुमचे गुरू by बॅटमॅन

Permalink

सफेद दाढ्या वाढवलेले प्लांटेड

सफेद दाढ्या वाढवलेले प्लांटेड लोक तुमचे गुरु, या दाढीवाल्याने अनेक ऐतीहासिक अस्सल कागदपत्र नष्ट केल्याचे सांगितले जाते. संस्थानिक ,वंशज यांच्याकडून कागदपत्र मिळवायची आणि नंतर गहाळ करायची .शिवाजीँचे धर्मनिरपेक्ष स्वरुप लोकांसमोर येऊ नये याची पुरेपुर खबरदारी ही आरेसी बांडगुळे घेत असतात. या दाढीवाल्याची लबाडी कळल्यानंतर एका संस्थानिकाने याला काठीने बदडून हाकलून दिले होते. काही संघटनांनी यांची लायकी मराठी जनांपुढे आणली हे एक बरेच झाले .लोक जाब विचारायला लागले ,लोकांची चर्चेची वादाची तयारी असूनही हे कणाहीन इतिहासतज्ञ कुठे गायब झालेत हे त्या पासोड्या विठोबाला आणि पत्र्या मारुतीलाच ठाऊक.

Submitted by बॅटमॅन on Fri, 11/15/2013 - 11:48

In reply to सफेद दाढ्या वाढवलेले प्लांटेड by ग्रेटथिन्कर

Permalink

नरके, सोनवणी अन खेडेकर यांचे

नरके, सोनवणी अन खेडेकर यांचे बाळकडू पिलेला ट्रोल असेच बोलणार हो. भांडारकरवर हल्ला करणार्‍यांची जात तुमची, तुम्ही काय ऐकणार हिंसेत कुणाला.

Submitted by श्रीगुरुजी on Fri, 11/15/2013 - 20:24

In reply to आणि होळकरांनी माघार घेतली by बॅटमॅन

Permalink

+१

बॅटमन, तुम्ही ज्या तत्परतेने ग्रेटस्टिंकरसारख्या ब्राह्मणद्वेष्ट्या जातीयवाद्यांचे निराधार आरोप सप्रमाण खोडून काढत आहात त्याबद्दल तुमचे अभिनंदन! खेडेकर, कोकाटे, नरके, सोनवणी इ. जातीयवाद्यांची पुस्तके हे वाचणार आणि इथे येऊन त्यातली गरळ ओकणार. पण तुम्ही त्यांचा प्रत्येक गलिच्छ आरोप सप्रमाण खोडून काढलेला आहे.

Submitted by ग्रेटथिन्कर on Fri, 11/15/2013 - 20:34

In reply to +१ by श्रीगुरुजी

Permalink

तूम्हीही ज्या तत्परतेने

तूम्हीही ज्या तत्परतेने पुरंदरे ,मेहंदळे, बेडेकर या आरेसी बांडगुळांचे, जातियवाद्यांचे,इतिहासाची मोडतोड करणार्यांचे समर्थन करण्यासाठी जो आटापीटा करत आहात त्यासाठी आपले अभिनंदन.

Submitted by श्रीगुरुजी on Fri, 11/15/2013 - 20:41

In reply to तूम्हीही ज्या तत्परतेने by ग्रेटथिन्कर

Permalink

पुरंदरे, पांडुरंग बलकवडे,

पुरंदरे, पांडुरंग बलकवडे, मेहेंदळे, बेडेकर इ. स्वतंत्र प्रज्ञेचे व निष्पक्षपाती इतिहास संशोधक आहेत. ते काही इतरांसारखे सरकार स्पॉन्सर्ड जातीयवादी ब्राह्मणद्वेष्टे नाहीत. अर्थात तुम्हाला ते काय कळणार म्हणा? आणि तुम्हाला हे समजत नाही यात तुमचा फारसा दोष नाही.

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com