माझ्या या भाषांतराच्या रसास्वादाला मिसळपावाच्या चालकांनी प्रतिसाद द्यावा याहून अधिक भाग्य नाही. :) (मीच त्यांच्या खरडवहीत कवितेचा दुवा दिला होता आणि प्रतिसाद द्यायलाच हवा अशी सुविधा करून टाकली होती हा भाग वेगळा तो उगीच जाहिर बोलायचा नसतो. ;) )
मी कवितेच्या प्रांतात अशासाठी की गेले काही दिवस "खैर रे" हा शब्द माझ्या कानात सतत गुणगुणत असतो.
कुठे पाच मिन्टे टेकले की २-४ ट्वीटी बर्डस येऊन "खैर रे खैर रे" असा चिवचिवाट करत पिंगा घालतात.
गाडीचं इंजिन सुरु केलं की ते "खैर्रर्रर्रर्रर्ररर्रर्रर्र र्रे!" असा अवाज करत सुरू होते.
दर रात्री विश्वनाथ खैरे आणि चंद्रकांत खैरे स्वप्नात झिम्मा फुगडी खेळतात.
काहीतरी उपाय करणे आवश्यक होते. कविता लिहून हा प्रकार बंद करता येईल काय याचा मागोवा घेत होते. ;)
अहो नाना, वरील कविते-विडंबनापेक्षा भयंकर काही आहे का? उद्यापासून तुमच्या स्वप्नात
वॉ वॉ वॉ वॉ वॉ असं केकाटत मेहमूद आणि शुभा खोटे आले नाहीत म्हणजे मिळवली
सहमत आहे, अर्थातच स्वप्नाचा प्रकार सोडुन ...
तुझ्या इशार्यांवर चालत राहील, ओ माझ्या कातिल
"ओ माझ्या कातिल" ???
हरे राम !!!!
काही पण असो, हा प्रकार भयानक आवडला ...
आता दर आठवड्याला एक ह्या हिशोबाने " हिमेश रेश्मियाच्या" गाण्यांचा रसास्वाद मिपावर टाकायला हरकत नाही ...
( प्रतिसादही मिळतात, अजुन काय पाहिजे ? )
हुश्श! बरेच प्रतिसाद जमले.
=)) =)) =))
हा घ्या अजुन १ ....
अवांतर : खरडवहीचे सोडा, आमचे नाव आम्ही " हुश्शार छोटा डॉन" असे बदलुन घेऊ का ?
कुठे पाच मिन्टे टेकले की २-४ ट्वीटी बर्डस येऊन "खैर रे खैर रे" असा चिवचिवाट करत पिंगा घालतात.
गाडीचं इंजिन सुरु केलं की ते "खैर्रर्रर्रर्रर्ररर्रर्रर्र र्रे!" असा अवाज करत सुरू होते.
दर रात्री विश्वनाथ खैरे आणि चंद्रकांत खैरे स्वप्नात झिम्मा फुगडी खेळतात.
कोणीतरी तो गडाबडा लोळण्याचा स्माईली शिकवा रे.....जमीनीवरून लोळून उठलो की टाईप करीन तो! :)
गाणे, जाणकार लोकांनी ओळखलं आहेच. पण एकंदरीत 'भय इथले संपत नाही' आठवले.
काही काळाने 'मी संध्याकाळी गातो, तू मला शिकविली (अनुवादित) गीते' असे होऊ नये म्हणजे मिळवली. ;)
या शब्दावर मी पूर्ण ५ सेकंद आणि ४ मिली सेकंद विचार केला. त्यात माझ्या डोळ्यासमोर तो रांगडा जाट सन्नी देओल उभा राहू लागला. अहो, हिंदी-उर्दूने इतके नाजूक शब्द आपल्याला दिले असता हे काय मध्येच घायाळ सन्नीला आठवायचं ;) म्हणून घाईल :D
करमणूक खरीच. माझ्या या काव्याविष्कारावर इतके प्रतिसाद जमतील अशी कल्पना नव्हती आणि या विडंबनाला कोणी टवाळा आवडे विनोद असेही म्हणू शकत नाही ही जमेची बाजू. ;)
आपली
(टवाळ) प्रियालीताई
याहीपेक्षा भयंकर काही असू शकते का या विसुनानांच्या प्रतिसादावर अधिक विचार करता, मिसळपावाने आपला शिक्का उमटवण्यासाठी मराठी गाण्यांची हिंदी भाषांतरे करून मराठी काव्याची खुबसुरती इतरांपर्यंत पोहोचवावी असे वाटते. ;) उदाहरणादाखल, काही कवींना खुराक -
बुगडी मेरी सांड गयी, जाते सातारेकु हो जाते सातारेकु
चुगली नहीं सांगना हो, कोई इसके म्हातारेकु इसके म्हातारेकु
मेरे शेजारी तरुण रहता है
टकमक टकमक मेरेकुच बघता है
कभी खूण करके जवल बुलाए जवल बुलाए
कभी भुल गयी नहीं ग बाई
मै उसकी इशारेकु उसके इशारेकु
असे लिहितात -
त्या चक्क एका हिंदी गाण्याचा भन्नाट विडंबनयुक्त अनुवाद करतात, ह्यात मला मिसळपावची आणि विडंबनपंथाची थोरवी दिसते! ;)
बोला मिसळपाव झिंदाबाद! बोला विडंबनपंथ चिरायू होवो!! B)
(खुद के साथ बातां : विडंबनाची धुरा आणी धारा कुठेकुठे पोचली हे पाहून केसुशेठला आनंद होईल!)
प्रयालीताई,
टवाली
आवडली..
खैर रे खैर रे.. ने आपल्या मनावर इतक परिणाम केला असेल याची कल्पना नव्हती..
(निवृत्त टवाळ)केशवसुमार
स्वगतः प्रत्येक प्रतिसादाला उत्तर!! खैर ना खैर ना...
तशी पाककृती करण्यास अतिशय सोपी आहे. लघुपाककृती स्पर्धेत पहिले बक्षिस मिळवेल. ही पाककृती करण्यासाठी जठराग्नी अर्रर्र अंतराग्नी प्रज्वलित करण्याचीही गरज नाही परंतु त्यासाठी लागणारे जिन्नस सध्या घरात नाही. ;) आणायला निघालेच आहे, परतले की लिहिनच. ;)
गाणे ओळखणे एरवी अवघड झाले असते..पण तुझा अनुवाद इतका सरस होता की लगेच ओळखत आले.
गाण्यामध्ये मूळ भाषेचा लहजा सुंदर सांभाळला गेला आहे. :)
पण अनुवाद करताना वेगळे मराठी शब्द न वापरल्याने शब्द वापरावर चर्चा होऊ शकली नाही. त्यामुळे काहितरी राहून गेल्या सारखे वाटले. पुढच्या प्रयत्नात एखाद मराठी शब्द असा योजावा की त्यावर सुद्धा चर्चा शक्य असेल. (संबंधितांनी ह.घ्या. हे सांनलगे)
-- लिखाळ.
प्रतिक्रिया
19 Sep 2008 - 6:45 am | आजानुकर्ण
आपला,
(प्रतिसादक) आजानुकर्ण
19 Sep 2008 - 2:38 pm | प्रियाली
इतके कठिण कोडे ओळखले याबद्दल अभिनंदन. बक्षिस खरडवहीत सापडेलच.
19 Sep 2008 - 7:12 am | प्राजु
हाणला जोरदार..
प्रियाली,
बाई तुझ्या उर्दूला आणि विनोद बुद्धीला सलाम!
गाणे कर्णाने दिले आहेच वरती..
मै रंगिला प्यार का राही, दूर मेरी मंजिल
शौख नजर का तीर तूने मारा दिल हुआ घाइल
तेरेलिये ही सम्हाल के रख्खा था प्यार भरा ये दिल
तेरे इशारो पे चलता रहेगा ओ मेरे कातिल..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
19 Sep 2008 - 2:37 pm | प्रियाली
गाणं ओळखल्याबद्दल अभिनंदन. शब्द न शब्द ओळखून दाखवण्याने तुमच्या अफाट प्रतिभेचे दर्शन झाले. बक्षिस खरडवहीत सापडेल. ;)
19 Sep 2008 - 7:47 am | फटू
मी रंगीला प्यारचा, राही दूर माझी मंझिल...
भाषांतर एकदम जबराट झाले आहे =)) =)) =))
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
19 Sep 2008 - 8:06 am | विसोबा खेचर
प्रियालीदेवी,
तू आणि चक्क कवितेच्या प्रान्तात? मानलं तुला!
लै लै भारी अणुवाद! :)
येऊ द्या अजूनही....
खालील गाणे जो ओळखून दाखवेल त्याच्या खरडवहीत मोठ्ठ्या अक्षरांत अभिनंदन!!! कित्ती कित्ती हुश्शार तुम्ही!! असे लिहिले जाईल.
हे बाकी मस्तच! :)
तात्या.
19 Sep 2008 - 2:44 pm | प्रियाली
माझ्या या भाषांतराच्या रसास्वादाला मिसळपावाच्या चालकांनी प्रतिसाद द्यावा याहून अधिक भाग्य नाही. :) (मीच त्यांच्या खरडवहीत कवितेचा दुवा दिला होता आणि प्रतिसाद द्यायलाच हवा अशी सुविधा करून टाकली होती हा भाग वेगळा तो उगीच जाहिर बोलायचा नसतो. ;) )
मी कवितेच्या प्रांतात अशासाठी की गेले काही दिवस "खैर रे" हा शब्द माझ्या कानात सतत गुणगुणत असतो.
कुठे पाच मिन्टे टेकले की २-४ ट्वीटी बर्डस येऊन "खैर रे खैर रे" असा चिवचिवाट करत पिंगा घालतात.
गाडीचं इंजिन सुरु केलं की ते "खैर्रर्रर्रर्रर्ररर्रर्रर्र र्रे!" असा अवाज करत सुरू होते.
दर रात्री विश्वनाथ खैरे आणि चंद्रकांत खैरे स्वप्नात झिम्मा फुगडी खेळतात.
काहीतरी उपाय करणे आवश्यक होते. कविता लिहून हा प्रकार बंद करता येईल काय याचा मागोवा घेत होते. ;)
19 Sep 2008 - 2:55 pm | नंदन
>>> दर रात्री विश्वनाथ खैरे आणि चंद्रकांत खैरे स्वप्नात झिम्मा फुगडी खेळतात.
=))
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
19 Sep 2008 - 6:57 pm | टग्या (not verified)
> दर रात्री विश्वनाथ खैरे आणि चंद्रकांत खैरे स्वप्नात झिम्मा फुगडी खेळतात.
नीलिमकुमार वारले म्हणून... नाहीतर...
19 Sep 2008 - 9:32 am | ऋषिकेश
=)) =)) =)) =))
-(हसरा) ऋषिकेश
19 Sep 2008 - 11:15 am | विसुनाना
भाषांतर, अनुवाद आणि परभाषिक शब्दांतल्या कविता पाहून हा प्रकार आपल्यालाही जमण्यासारखा आहे याची जाणीव झाली.
:) :)
वा! मिपाचे आणि आमचे अहोभाग्य!
आता एखादी भयकविता होऊन जाऊ द्या! (नवा कलाप्रकार शोधल्याबद्दल आमचे अभिनंदन.)
19 Sep 2008 - 2:46 pm | प्रियाली
अहो नाना, वरील कविते-विडंबनापेक्षा भयंकर काही आहे का? उद्यापासून तुमच्या स्वप्नात
वॉ वॉ वॉ वॉ वॉ असं केकाटत मेहमूद आणि शुभा खोटे आले नाहीत म्हणजे मिळवली ;)
हुश्श! बरेच प्रतिसाद जमले. ;)
19 Sep 2008 - 3:05 pm | छोटा डॉन
सहमत आहे, अर्थातच स्वप्नाचा प्रकार सोडुन ...
"ओ माझ्या कातिल" ???
हरे राम !!!!
काही पण असो, हा प्रकार भयानक आवडला ...
आता दर आठवड्याला एक ह्या हिशोबाने " हिमेश रेश्मियाच्या" गाण्यांचा रसास्वाद मिपावर टाकायला हरकत नाही ...
( प्रतिसादही मिळतात, अजुन काय पाहिजे ? )
=)) =)) =))
हा घ्या अजुन १ ....
अवांतर : खरडवहीचे सोडा, आमचे नाव आम्ही " हुश्शार छोटा डॉन" असे बदलुन घेऊ का ?
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
19 Sep 2008 - 3:12 pm | विसुनाना
क्लीन बोल्ड! :O #o
एकदम खैरनार?
अवांतरः
रौशनीला मराठीत दीप्ती म्हणतात,
शिवाय ती दमही देते हे तात्यांना कोण सांगेल बरं?. :?
19 Sep 2008 - 11:32 am | आनंदयात्री
>>खालील गाणे जो ओळखून दाखवेल त्याच्या खरडवहीत मोठ्ठ्या अक्षरांत अभिनंदन!!! कित्ती कित्ती हुश्शार तुम्ही!! असे लिहिले जाईल.
=)) खत्तरनाक !!
19 Sep 2008 - 11:47 am | यशोधरा
>>>पुढील वेळीस आणखी हिंदी/ उर्दू शब्दांचा भरणा करण्याचा प्रयत्न करेन
=))
19 Sep 2008 - 2:59 pm | मनिष
कोणीतरी तो गडाबडा लोळण्याचा स्माईली शिकवा रे.....जमीनीवरून लोळून उठलो की टाईप करीन तो! :)
19 Sep 2008 - 3:01 pm | नंदन
गडाबडा म्हणजे दोन आडव्या रेषा आणि दोन उजवे कंस. :)
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
19 Sep 2008 - 2:59 pm | नंदन
गाणे, जाणकार लोकांनी ओळखलं आहेच. पण एकंदरीत 'भय इथले संपत नाही' आठवले.
काही काळाने 'मी संध्याकाळी गातो, तू मला शिकविली (अनुवादित) गीते' असे होऊ नये म्हणजे मिळवली. ;)
[कृ. सर्व संबंधितांनी. ह. घे.]
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
19 Sep 2008 - 3:01 pm | मनीषा
शौख नजरेचा तीर तू मारला, मी झालो घाईल... खरोखरच घाईल
मूळ गाण्या पेक्षा "हे काव्यांतर " फार फार आवडले .
19 Sep 2008 - 5:53 pm | विजुभाऊ
शौख नजरेचा तीर तू मारला, मी झालो घाईल... खरोखरच घाईल
घाईल म्हणजे गात असतानाच फारच घाईची लागल्यासारखे वाटते
तुमची प्यान्ट ढील्ली होत असेल तर जाडी कमी झाल्याची तारीफ करू नका, हे मान्य करा की प्यान्टची नाडी ज्योतिषा कडे विसरलात
19 Sep 2008 - 6:01 pm | प्रियाली
या शब्दावर मी पूर्ण ५ सेकंद आणि ४ मिली सेकंद विचार केला. त्यात माझ्या डोळ्यासमोर तो रांगडा जाट सन्नी देओल उभा राहू लागला. अहो, हिंदी-उर्दूने इतके नाजूक शब्द आपल्याला दिले असता हे काय मध्येच घायाळ सन्नीला आठवायचं ;) म्हणून घाईल :D
19 Sep 2008 - 3:22 pm | ब्रिटिश टिंग्या
सही आहे नवीन काव्यकलाकृती :D
अवांतर - धाग्याचे नांव मी रंगी'ली' हवं होतं ना प्रिया'ली' ;)
19 Sep 2008 - 3:54 pm | प्रियाली
रंगीली शोभलं असतं पण भाषांतराचेही काही नियम असतात :( ते पाळावेच लागतात. ;)
19 Sep 2008 - 3:25 pm | बेसनलाडू
मजा आली. नाइट मारणे वसूल; तेही शुक्रवारच्या आरंभीच. हापिसात उरलेला दिवस चांगला जाणार ;)
(करमणूकप्रिय)बेसनलाडू
19 Sep 2008 - 4:15 pm | प्रियाली
करमणूक खरीच. माझ्या या काव्याविष्कारावर इतके प्रतिसाद जमतील अशी कल्पना नव्हती आणि या विडंबनाला कोणी टवाळा आवडे विनोद असेही म्हणू शकत नाही ही जमेची बाजू. ;)
आपली
(टवाळ) प्रियालीताई
याहीपेक्षा भयंकर काही असू शकते का या विसुनानांच्या प्रतिसादावर अधिक विचार करता, मिसळपावाने आपला शिक्का उमटवण्यासाठी मराठी गाण्यांची हिंदी भाषांतरे करून मराठी काव्याची खुबसुरती इतरांपर्यंत पोहोचवावी असे वाटते. ;) उदाहरणादाखल, काही कवींना खुराक -
बुगडी मेरी सांड गयी, जाते सातारेकु हो जाते सातारेकु
चुगली नहीं सांगना हो, कोई इसके म्हातारेकु इसके म्हातारेकु
मेरे शेजारी तरुण रहता है
टकमक टकमक मेरेकुच बघता है
कभी खूण करके जवल बुलाए जवल बुलाए
कभी भुल गयी नहीं ग बाई
मै उसकी इशारेकु उसके इशारेकु
19 Sep 2008 - 6:14 pm | चित्रा
सुरेख!
हिंदी बोलीतील प्रादेशिक विविधतेचे प्रतिबिंब या गाण्यात उतरवणे हे कठीण काम. भाषांतरकारांच्या या प्रयत्नाचे कौतुक करावे तेवढे थोडे!
20 Sep 2008 - 4:04 pm | धनंजय
सातारेकू बुगडी सांडी!
21 Sep 2008 - 9:10 am | विसोबा खेचर
मेरे शेजारी तरुण रहता है
टकमक टकमक मेरेकुच बघता है
कभी खूण करके जवल बुलाए जवल बुलाए
कभी भुल गयी नहीं ग बाई
मै उसकी इशारेकु उसके इशारेकु
आयला! प्रियाली एकदम फार्मात दिसते आहे! :)
भेंडी, मिपाचा दिवाळी अंक काढला असता तर त्यात कविता लिवण्यासाठी तुला नक्की सांगितलं असतं! :)
बाकी काय? अन्य कुठल्या दिवाळी अंकाकरता कविता पाठवली आहेस की नाही? ;)
आपला,
(व्रात्य प्रियालीचा द्वाड मित्र) तात्या.
19 Sep 2008 - 5:25 pm | विनायक प्रभू
http://vipravani.wordpress.com/
नविन पायंडा - अभिनंदन
मारुती कांबळेचे काय झाले? (भयकथा)
वि.प्र.
19 Sep 2008 - 5:41 pm | प्रियाली
जिवंत आहे की मेलेला? हे कोड्यात कोडे काय असावे?
(कोड्यात) प्रियाली
19 Sep 2008 - 7:31 pm | आजानुकर्ण
मारुती कांबळे कोण?
काय हे? कमळे, कमळे! किती साखर खाशील?
आपला,
(मधुमेही) आजानुकर्ण
19 Sep 2008 - 5:34 pm | अनिल हटेला
शौख नजरेचा तीर तू मारला, मी झालो घाईल
आधी वाटल भूताची कविता असावी ,
म्हणुन घाबरत घाबरत सुरवात केली !!
पण प्रियाली जी मस्त च कविता (?) केलिये!!!
( भूताला घाबरणारा)
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
19 Sep 2008 - 7:05 pm | टग्या (not verified)
एनी क्लू?
- (ढ) टग्या.
(आणि माझं "अय्या कित्ती कित्ती ढ तुम्ही" पारितोषिक कुठ्ठाय???)
19 Sep 2008 - 7:09 pm | प्रियाली
तुम्हाला गाणं ओळखता आलं नाही म्हणजे मी भाषांतर सुरेख केले की क्रिप्टीक केले असे तुम्हाला वाटते? ;)
=))
19 Sep 2008 - 7:22 pm | टग्या (not verified)
नाहीतर समजले नसते?
19 Sep 2008 - 7:20 pm | विनायक प्रभू
http://vipravani.wordpress.com/
मागे आपण एका भयकथेचे वचन दिले होते ताई. त्याचे काय झाले. वाट बघतो आहे.
वि.प्र.
19 Sep 2008 - 7:25 pm | प्रियाली
अहो ती भयकथा नव्हती. म्हणजे भयकथाच पण सामाजिक कथा असणार, अमानवी नाही. (अरेरे! हे काय क्रिप्टीक होत चाललं आहे - ह. घ्या)
ती कथा लक्षात आहे पण ती लिहायला बर्यापैकी वेळ लागेल. लिहिन लवकरच.
20 Sep 2008 - 9:28 am | चतुरंग
२. कविता मला कळत नाहीत म्हणून आवडत नाहीत.
असे लिहितात -
त्या चक्क एका हिंदी गाण्याचा भन्नाट विडंबनयुक्त अनुवाद करतात, ह्यात मला मिसळपावची आणि विडंबनपंथाची थोरवी दिसते! ;)
बोला मिसळपाव झिंदाबाद! बोला विडंबनपंथ चिरायू होवो!! B)
(खुद के साथ बातां : विडंबनाची धुरा आणी धारा कुठेकुठे पोचली हे पाहून केसुशेठला आनंद होईल!)
चतुरंग
20 Sep 2008 - 10:54 am | केशवसुमार
प्रयालीताई,
टवाली
आवडली..
खैर रे खैर रे.. ने आपल्या मनावर इतक परिणाम केला असेल याची कल्पना नव्हती..
(निवृत्त टवाळ)केशवसुमार
स्वगतः प्रत्येक प्रतिसादाला उत्तर!! खैर ना खैर ना...
20 Sep 2008 - 5:18 pm | प्रियाली
खैर रे खैर रेचे भूत माझ्या डोक्यात जागे करण्यात ज्या मांत्रिकांचा मोलाचा वाटा आहे त्यांना माझा प्रणाम.
- प्रियाली खैर
20 Sep 2008 - 4:18 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लय भारी भाषांतर झालं !!! मानलं राव तुम्हाला :)
बुगडी मेरी सांड गयी, जाते सातारेकु हो जाते सातारेकु
चुगली नहीं सांगना हो, कोई इसके म्हातारेकु इसके म्हातारेकु:)
=)) क्या बात है !!!
बुगडी मेरी सांड गयी, लैच आवडले.
20 Sep 2008 - 5:29 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
प्रियालीतै,
भा री! आता अशा कविता लिहिण्याची पाकृ लिही ना!
तुझी फ्यान/छोटी/अदिती
21 Sep 2008 - 1:29 am | प्रियाली
तशी पाककृती करण्यास अतिशय सोपी आहे. लघुपाककृती स्पर्धेत पहिले बक्षिस मिळवेल. ही पाककृती करण्यासाठी जठराग्नी अर्रर्र अंतराग्नी प्रज्वलित करण्याचीही गरज नाही परंतु त्यासाठी लागणारे जिन्नस सध्या घरात नाही. ;) आणायला निघालेच आहे, परतले की लिहिनच. ;)
आपली
(बल्लवाचार्या)प्रियाली
20 Sep 2008 - 6:13 pm | अभिज्ञ
.../\...
"भयानक" विडंबन.
अभिज्ञ.
22 Sep 2008 - 7:16 pm | लिखाळ
मै रंगिला प्यार का राही, दूर मेरी मंजिल
बरोबर ओळखलं की नाही ?!!
अनुवाद, सर्व प्रतिसाद आणि त्या प्रत्येक प्रतिसादाला तू दिलेला प्रतिसाद सर्वच मस्त !
फारच मस्त !
--लिखाळ.
22 Sep 2008 - 7:46 pm | प्रियाली
देरीने आलात पण दुरुस्त आलात, त्यामुळे बक्षिस देणे भाग आहे.
असे गाणे ओळखले की मनाला अनोखा तोष होतो.
22 Sep 2008 - 7:53 pm | लिखाळ