Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by प्रियाली on Fri, 09/19/2008 - 06:09

Submitted by आजानुकर्ण on Fri, 09/19/2008 - 06:45

Permalink

मै रंगीला प्यार का राही दूर मेरी मंजील

आपला, (प्रतिसादक) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments

Submitted by प्रियाली on Fri, 09/19/2008 - 14:38

In reply to मै रंगीला प्यार का राही दूर मेरी मंजील by आजानुकर्ण

Permalink

पहिल्या प्रतिसादाचा आणि पहिल्या उत्तराचा आनंद वेगळाच असतो

इतके कठिण कोडे ओळखले याबद्दल अभिनंदन. बक्षिस खरडवहीत सापडेलच.
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Fri, 09/19/2008 - 07:12

Permalink

हाहाहा.....

हाणला जोरदार.. प्रियाली, बाई तुझ्या उर्दूला आणि विनोद बुद्धीला सलाम! गाणे कर्णाने दिले आहेच वरती.. मै रंगिला प्यार का राही, दूर मेरी मंजिल शौख नजर का तीर तूने मारा दिल हुआ घाइल तेरेलिये ही सम्हाल के रख्खा था प्यार भरा ये दिल तेरे इशारो पे चलता रहेगा ओ मेरे कातिल.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by प्रियाली on Fri, 09/19/2008 - 14:37

In reply to हाहाहा..... by प्राजु

Permalink

प्राजुताई तुमच्या प्रतिसादाचा आदर वाटतो

गाणं ओळखल्याबद्दल अभिनंदन. शब्द न शब्द ओळखून दाखवण्याने तुमच्या अफाट प्रतिभेचे दर्शन झाले. बक्षिस खरडवहीत सापडेल. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by फटू on Fri, 09/19/2008 - 07:47

Permalink

मी रंगीला...

मी रंगीला प्यारचा, राही दूर माझी मंझिल... भाषांतर एकदम जबराट झाले आहे =)) =)) =)) सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Fri, 09/19/2008 - 08:06

Permalink

प्रियालीद

प्रियालीदेवी, तू आणि चक्क कवितेच्या प्रान्तात? मानलं तुला! लै लै भारी अणुवाद! :) येऊ द्या अजूनही.... खालील गाणे जो ओळखून दाखवेल त्याच्या खरडवहीत मोठ्ठ्या अक्षरांत अभिनंदन!!! कित्ती कित्ती हुश्शार तुम्ही!! असे लिहिले जाईल. हे बाकी मस्तच! :) तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रियाली on Fri, 09/19/2008 - 14:44

In reply to प्रियालीद by विसोबा खेचर

Permalink

गेले काही दिवस माझी खैर नव्हती

तू आणि चक्क कवितेच्या प्रान्तात? मानलं तुला!
माझ्या या भाषांतराच्या रसास्वादाला मिसळपावाच्या चालकांनी प्रतिसाद द्यावा याहून अधिक भाग्य नाही. :) (मीच त्यांच्या खरडवहीत कवितेचा दुवा दिला होता आणि प्रतिसाद द्यायलाच हवा अशी सुविधा करून टाकली होती हा भाग वेगळा तो उगीच जाहिर बोलायचा नसतो. ;) ) मी कवितेच्या प्रांतात अशासाठी की गेले काही दिवस "खैर रे" हा शब्द माझ्या कानात सतत गुणगुणत असतो. कुठे पाच मिन्टे टेकले की २-४ ट्वीटी बर्डस येऊन "खैर रे खैर रे" असा चिवचिवाट करत पिंगा घालतात. गाडीचं इंजिन सुरु केलं की ते "खैर्रर्रर्रर्रर्ररर्रर्रर्र र्रे!" असा अवाज करत सुरू होते. दर रात्री विश्वनाथ खैरे आणि चंद्रकांत खैरे स्वप्नात झिम्मा फुगडी खेळतात. काहीतरी उपाय करणे आवश्यक होते. कविता लिहून हा प्रकार बंद करता येईल काय याचा मागोवा घेत होते. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by नंदन on Fri, 09/19/2008 - 14:55

In reply to गेले काही दिवस माझी खैर नव्हती by प्रियाली

Permalink

>>> दर

>>> दर रात्री विश्वनाथ खैरे आणि चंद्रकांत खैरे स्वप्नात झिम्मा फुगडी खेळतात. =))

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

Submitted by टग्या (verified= न पडताळणी केलेला) on Fri, 09/19/2008 - 18:57

In reply to गेले काही दिवस माझी खैर नव्हती by प्रियाली

Permalink

सुटलात!

> दर रात्री विश्वनाथ खैरे आणि चंद्रकांत खैरे स्वप्नात झिम्मा फुगडी खेळतात. नीलिमकुमार वारले म्हणून... नाहीतर...
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on Fri, 09/19/2008 - 09:32

Permalink

:)

=)) =)) =)) =)) -(हसरा) ऋषिकेश
  • Log in or register to post comments

Submitted by विसुनाना on Fri, 09/19/2008 - 11:15

Permalink

:)

भाषांतर, अनुवाद आणि परभाषिक शब्दांतल्या कविता पाहून हा प्रकार आपल्यालाही जमण्यासारखा आहे याची जाणीव झाली. :) :) वा! मिपाचे आणि आमचे अहोभाग्य! आता एखादी भयकविता होऊन जाऊ द्या! (नवा कलाप्रकार शोधल्याबद्दल आमचे अभिनंदन.)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रियाली on Fri, 09/19/2008 - 14:46

In reply to :) by विसुनाना

Permalink

विसुनाना, तुमचे हार्दिक अभिनंदन. हीच तर भयकविता आहे

आता एखादी भयकविता होऊन जाऊ द्या! (नवा कलाप्रकार शोधल्याबद्दल आमचे अभिनंदन.)
अहो नाना, वरील कविते-विडंबनापेक्षा भयंकर काही आहे का? उद्यापासून तुमच्या स्वप्नात वॉ वॉ वॉ वॉ वॉ असं केकाटत मेहमूद आणि शुभा खोटे आले नाहीत म्हणजे मिळवली ;) हुश्श! बरेच प्रतिसाद जमले. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by छोटा डॉन on Fri, 09/19/2008 - 15:05

In reply to विसुनाना, तुमचे हार्दिक अभिनंदन. हीच तर भयकविता आहे by प्रियाली

Permalink

सहमत आहे ...

अहो नाना, वरील कविते-विडंबनापेक्षा भयंकर काही आहे का? उद्यापासून तुमच्या स्वप्नात वॉ वॉ वॉ वॉ वॉ असं केकाटत मेहमूद आणि शुभा खोटे आले नाहीत म्हणजे मिळवली
सहमत आहे, अर्थातच स्वप्नाचा प्रकार सोडुन ...
तुझ्या इशार्‍यांवर चालत राहील, ओ माझ्या कातिल
"ओ माझ्या कातिल" ??? हरे राम !!!! काही पण असो, हा प्रकार भयानक आवडला ... आता दर आठवड्याला एक ह्या हिशोबाने " हिमेश रेश्मियाच्या" गाण्यांचा रसास्वाद मिपावर टाकायला हरकत नाही ... ( प्रतिसादही मिळतात, अजुन काय पाहिजे ? )
हुश्श! बरेच प्रतिसाद जमले.
=)) =)) =)) हा घ्या अजुन १ .... अवांतर : खरडवहीचे सोडा, आमचे नाव आम्ही " हुश्शार छोटा डॉन" असे बदलुन घेऊ का ? छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments

Submitted by विसुनाना on Fri, 09/19/2008 - 15:12

In reply to विसुनाना, तुमचे हार्दिक अभिनंदन. हीच तर भयकविता आहे by प्रियाली

Permalink

ऑं !??

क्लीन बोल्ड! :O #o एकदम खैरनार? अवांतरः रौशनीला मराठीत दीप्ती म्हणतात, शिवाय ती दमही देते हे तात्यांना कोण सांगेल बरं?. :?
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदयात्री on Fri, 09/19/2008 - 11:32

Permalink

लै भारी

>>खालील गाणे जो ओळखून दाखवेल त्याच्या खरडवहीत मोठ्ठ्या अक्षरांत अभिनंदन!!! कित्ती कित्ती हुश्शार तुम्ही!! असे लिहिले जाईल. =)) खत्तरनाक !!
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Fri, 09/19/2008 - 11:47

Permalink

>>>पुढील

>>>पुढील वेळीस आणखी हिंदी/ उर्दू शब्दांचा भरणा करण्याचा प्रयत्न करेन =))
  • Log in or register to post comments

Submitted by मनिष on Fri, 09/19/2008 - 14:59

Permalink

:)

कुठे पाच मिन्टे टेकले की २-४ ट्वीटी बर्डस येऊन "खैर रे खैर रे" असा चिवचिवाट करत पिंगा घालतात. गाडीचं इंजिन सुरु केलं की ते "खैर्रर्रर्रर्रर्ररर्रर्रर्र र्रे!" असा अवाज करत सुरू होते. दर रात्री विश्वनाथ खैरे आणि चंद्रकांत खैरे स्वप्नात झिम्मा फुगडी खेळतात.
कोणीतरी तो गडाबडा लोळण्याचा स्माईली शिकवा रे.....जमीनीवरून लोळून उठलो की टाईप करीन तो! :)
  • Log in or register to post comments

Submitted by नंदन on Fri, 09/19/2008 - 15:01

In reply to :) by मनिष

Permalink

=))

गडाबडा म्हणजे दोन आडव्या रेषा आणि दोन उजवे कंस. :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

Submitted by नंदन on Fri, 09/19/2008 - 14:59

Permalink

मूळ

गाणे, जाणकार लोकांनी ओळखलं आहेच. पण एकंदरीत 'भय इथले संपत नाही' आठवले. काही काळाने 'मी संध्याकाळी गातो, तू मला शिकविली (अनुवादित) गीते' असे होऊ नये म्हणजे मिळवली. ;) [कृ. सर्व संबंधितांनी. ह. घे.]

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

Submitted by मनीषा on Fri, 09/19/2008 - 15:01

Permalink

घाईल ..

शौख नजरेचा तीर तू मारला, मी झालो घाईल... खरोखरच घाईल मूळ गाण्या पेक्षा "हे काव्यांतर " फार फार आवडले .
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Fri, 09/19/2008 - 17:53

In reply to घाईल .. by मनीषा

Permalink

घाईल

शौख नजरेचा तीर तू मारला, मी झालो घाईल... खरोखरच घाईल घाईल म्हणजे गात असतानाच फारच घाईची लागल्यासारखे वाटते तुमची प्यान्ट ढील्ली होत असेल तर जाडी कमी झाल्याची तारीफ करू नका, हे मान्य करा की प्यान्टची नाडी ज्योतिषा कडे विसरलात
  • Log in or register to post comments

Submitted by प्रियाली on Fri, 09/19/2008 - 18:01

In reply to घाईल .. by मनीषा

Permalink

घाईलच हवं

या शब्दावर मी पूर्ण ५ सेकंद आणि ४ मिली सेकंद विचार केला. त्यात माझ्या डोळ्यासमोर तो रांगडा जाट सन्नी देओल उभा राहू लागला. अहो, हिंदी-उर्दूने इतके नाजूक शब्द आपल्याला दिले असता हे काय मध्येच घायाळ सन्नीला आठवायचं ;) म्हणून घाईल :D
  • Log in or register to post comments

Submitted by ब्रिटिश टिंग्या on Fri, 09/19/2008 - 15:22

Permalink

:)

सही आहे नवीन काव्यकलाकृती :D अवांतर - धाग्याचे नांव मी रंगी'ली' हवं होतं ना प्रिया'ली' ;)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रियाली on Fri, 09/19/2008 - 15:54

In reply to :) by ब्रिटिश टिंग्या

Permalink

रंगीली शोभलं असतं पण....

रंगीली शोभलं असतं पण भाषांतराचेही काही नियम असतात :( ते पाळावेच लागतात. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by बेसनलाडू on Fri, 09/19/2008 - 15:25

Permalink

एकंदर बरीच करमणूक झाली

मजा आली. नाइट मारणे वसूल; तेही शुक्रवारच्या आरंभीच. हापिसात उरलेला दिवस चांगला जाणार ;) (करमणूकप्रिय)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

Submitted by प्रियाली on Fri, 09/19/2008 - 16:15

In reply to एकंदर बरीच करमणूक झाली by बेसनलाडू

Permalink

करमणूक केल्याबद्दल अतिशय आभारी आहे

करमणूक खरीच. माझ्या या काव्याविष्कारावर इतके प्रतिसाद जमतील अशी कल्पना नव्हती आणि या विडंबनाला कोणी टवाळा आवडे विनोद असेही म्हणू शकत नाही ही जमेची बाजू. ;) आपली (टवाळ) प्रियालीताई याहीपेक्षा भयंकर काही असू शकते का या विसुनानांच्या प्रतिसादावर अधिक विचार करता, मिसळपावाने आपला शिक्का उमटवण्यासाठी मराठी गाण्यांची हिंदी भाषांतरे करून मराठी काव्याची खुबसुरती इतरांपर्यंत पोहोचवावी असे वाटते. ;) उदाहरणादाखल, काही कवींना खुराक - बुगडी मेरी सांड गयी, जाते सातारेकु हो जाते सातारेकु चुगली नहीं सांगना हो, कोई इसके म्हातारेकु इसके म्हातारेकु मेरे शेजारी तरुण रहता है टकमक टकमक मेरेकुच बघता है कभी खूण करके जवल बुलाए जवल बुलाए कभी भुल गयी नहीं ग बाई मै उसकी इशारेकु उसके इशारेकु
  • Log in or register to post comments

Submitted by चित्रा on Fri, 09/19/2008 - 18:14

In reply to करमणूक केल्याबद्दल अतिशय आभारी आहे by प्रियाली

Permalink

वा वा!

सुरेख! हिंदी बोलीतील प्रादेशिक विविधतेचे प्रतिबिंब या गाण्यात उतरवणे हे कठीण काम. भाषांतरकारांच्या या प्रयत्नाचे कौतुक करावे तेवढे थोडे!
  • Log in or register to post comments

Submitted by धनंजय on Sat, 09/20/2008 - 16:04

In reply to वा वा! by चित्रा

Permalink

वा वा!

सातारेकू बुगडी सांडी!
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Sun, 09/21/2008 - 09:10

In reply to करमणूक केल्याबद्दल अतिशय आभारी आहे by प्रियाली

Permalink

मेरे

मेरे शेजारी तरुण रहता है टकमक टकमक मेरेकुच बघता है कभी खूण करके जवल बुलाए जवल बुलाए कभी भुल गयी नहीं ग बाई मै उसकी इशारेकु उसके इशारेकु आयला! प्रियाली एकदम फार्मात दिसते आहे! :) भेंडी, मिपाचा दिवाळी अंक काढला असता तर त्यात कविता लिवण्यासाठी तुला नक्की सांगितलं असतं! :) बाकी काय? अन्य कुठल्या दिवाळी अंकाकरता कविता पाठवली आहेस की नाही? ;) आपला, (व्रात्य प्रियालीचा द्वाड मित्र) तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on Fri, 09/19/2008 - 17:25

Permalink

पायंडा

http://vipravani.wordpress.com/ नविन पायंडा - अभिनंदन मारुती कांबळेचे काय झाले? (भयकथा) वि.प्र.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रियाली on Fri, 09/19/2008 - 17:41

In reply to पायंडा by विनायक प्रभू

Permalink

मारुती कांबळे कोण?

जिवंत आहे की मेलेला? हे कोड्यात कोडे काय असावे? (कोड्यात) प्रियाली
  • Log in or register to post comments

Submitted by आजानुकर्ण on Fri, 09/19/2008 - 19:31

In reply to मारुती कांबळे कोण? by प्रियाली

Permalink

मारूती कांबळे कोण?

मारुती कांबळे कोण? काय हे? कमळे, कमळे! किती साखर खाशील? आपला, (मधुमेही) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments

Submitted by अनिल हटेला on Fri, 09/19/2008 - 17:34

Permalink

शौख नजरेचा

शौख नजरेचा तीर तू मारला, मी झालो घाईल आधी वाटल भूताची कविता असावी , म्हणुन घाबरत घाबरत सुरवात केली !! पण प्रियाली जी मस्त च कविता (?) केलिये!!! ( भूताला घाबरणारा) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments

Submitted by टग्या (verified= न पडताळणी केलेला) on Fri, 09/19/2008 - 19:05

Permalink

नाही समजली बुवा!

एनी क्लू? - (ढ) टग्या. (आणि माझं "अय्या कित्ती कित्ती ढ तुम्ही" पारितोषिक कुठ्ठाय???)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रियाली on Fri, 09/19/2008 - 19:09

In reply to नाही समजली बुवा! by टग्या (verified= न पडताळणी केलेला)

Permalink

हा तर माझ्या भाषांतराचा बहुमान समजायला हवा

तुम्हाला गाणं ओळखता आलं नाही म्हणजे मी भाषांतर सुरेख केले की क्रिप्टीक केले असे तुम्हाला वाटते? ;) =))
  • Log in or register to post comments

Submitted by टग्या (verified= न पडताळणी केलेला) on Fri, 09/19/2008 - 19:22

In reply to हा तर माझ्या भाषांतराचा बहुमान समजायला हवा by प्रियाली

Permalink

पुरेसे क्रिप्टिक केले नाही!

नाहीतर समजले नसते?
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on Fri, 09/19/2008 - 19:20

Permalink

भयकथा

http://vipravani.wordpress.com/ मागे आपण एका भयकथेचे वचन दिले होते ताई. त्याचे काय झाले. वाट बघतो आहे. वि.प्र.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रियाली on Fri, 09/19/2008 - 19:25

In reply to भयकथा by विनायक प्रभू

Permalink

ती भयकथा नव्हती

अहो ती भयकथा नव्हती. म्हणजे भयकथाच पण सामाजिक कथा असणार, अमानवी नाही. (अरेरे! हे काय क्रिप्टीक होत चाललं आहे - ह. घ्या) ती कथा लक्षात आहे पण ती लिहायला बर्‍यापैकी वेळ लागेल. लिहिन लवकरच.
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Sat, 09/20/2008 - 09:28

Permalink

ज्या प्रियालीताई त्यांच्या खरडवहीच्या अग्रभागी

२. कविता मला कळत नाहीत म्हणून आवडत नाहीत. असे लिहितात - त्या चक्क एका हिंदी गाण्याचा भन्नाट विडंबनयुक्त अनुवाद करतात, ह्यात मला मिसळपावची आणि विडंबनपंथाची थोरवी दिसते! ;) बोला मिसळपाव झिंदाबाद! बोला विडंबनपंथ चिरायू होवो!! B) (खुद के साथ बातां : विडंबनाची धुरा आणी धारा कुठेकुठे पोचली हे पाहून केसुशेठला आनंद होईल!) चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by केशवसुमार on Sat, 09/20/2008 - 10:54

Permalink

हा हा हा हा हा!!

प्रयालीताई, टवाली आवडली.. खैर रे खैर रे.. ने आपल्या मनावर इतक परिणाम केला असेल याची कल्पना नव्हती.. (निवृत्त टवाळ)केशवसुमार स्वगतः प्रत्येक प्रतिसादाला उत्तर!! खैर ना खैर ना...
  • Log in or register to post comments

Submitted by प्रियाली on Sat, 09/20/2008 - 17:18

In reply to हा हा हा हा हा!! by केशवसुमार

Permalink

ज्यांनी हे भूत उभे केले त्यांना माझा प्रणाम

खैर रे खैर रेचे भूत माझ्या डोक्यात जागे करण्यात ज्या मांत्रिकांचा मोलाचा वाटा आहे त्यांना माझा प्रणाम. - प्रियाली खैर
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Sat, 09/20/2008 - 16:18

Permalink

हा हा हा हा हा

लय भारी भाषांतर झालं !!! मानलं राव तुम्हाला :) बुगडी मेरी सांड गयी, जाते सातारेकु हो जाते सातारेकु चुगली नहीं सांगना हो, कोई इसके म्हातारेकु इसके म्हातारेकु:) =)) क्या बात है !!! बुगडी मेरी सांड गयी, लैच आवडले.
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Sat, 09/20/2008 - 17:29

Permalink

प्रियालीत

प्रियालीतै, भा री! आता अशा कविता लिहिण्याची पाकृ लिही ना! तुझी फ्यान/छोटी/अदिती
  • Log in or register to post comments

Submitted by प्रियाली on Sun, 09/21/2008 - 01:29

In reply to प्रियालीत by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

जिन्नस बाजारातून आणले की लिहितेच

तशी पाककृती करण्यास अतिशय सोपी आहे. लघुपाककृती स्पर्धेत पहिले बक्षिस मिळवेल. ही पाककृती करण्यासाठी जठराग्नी अर्रर्र अंतराग्नी प्रज्वलित करण्याचीही गरज नाही परंतु त्यासाठी लागणारे जिन्नस सध्या घरात नाही. ;) आणायला निघालेच आहे, परतले की लिहिनच. ;) आपली (बल्लवाचार्या)प्रियाली
  • Log in or register to post comments

Submitted by अभिज्ञ on Sat, 09/20/2008 - 18:13

Permalink

जबरी.

.../\... "भयानक" विडंबन. अभिज्ञ.
  • Log in or register to post comments

Submitted by लिखाळ on Mon, 09/22/2008 - 19:16

Permalink

मस्त !

मै रंगिला प्यार का राही, दूर मेरी मंजिल बरोबर ओळखलं की नाही ?!! अनुवाद, सर्व प्रतिसाद आणि त्या प्रत्येक प्रतिसादाला तू दिलेला प्रतिसाद सर्वच मस्त ! फारच मस्त ! --लिखाळ.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रियाली on Mon, 09/22/2008 - 19:46

In reply to मस्त ! by लिखाळ

Permalink

देरीने आलात पण दुरुस्त आलात, त्यामुळे बक्षिस देणे भाग आहे

देरीने आलात पण दुरुस्त आलात, त्यामुळे बक्षिस देणे भाग आहे. असे गाणे ओळखले की मनाला अनोखा तोष होतो.
  • Log in or register to post comments

Submitted by लिखाळ on Mon, 09/22/2008 - 19:53

In reply to देरीने आलात पण दुरुस्त आलात, त्यामुळे बक्षिस देणे भाग आहे by प्रियाली

Permalink

बरोबर.

गाणे ओळखणे एरवी अवघड झाले असते..पण तुझा अनुवाद इतका सरस होता की लगेच ओळखत आले. गाण्यामध्ये मूळ भाषेचा लहजा सुंदर सांभाळला गेला आहे. :) पण अनुवाद करताना वेगळे मराठी शब्द न वापरल्याने शब्द वापरावर चर्चा होऊ शकली नाही. त्यामुळे काहितरी राहून गेल्या सारखे वाटले. पुढच्या प्रयत्नात एखाद मराठी शब्द असा योजावा की त्यावर सुद्धा चर्चा शक्य असेल. (संबंधितांनी ह.घ्या. हे सांनलगे) -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 20408 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com