हिंदु धर्म आणि शाप

उद्दाम's picture
उद्दाम in काथ्याकूट
22 Oct 2013 - 12:18 pm
गाभा: 

हिंदु धर्म आणि शाप

हिंदु धर्मात शाप देण्याची प्रथा आढळते. तशी ती हॅरी पॉटरमध्येही आहे. पण हिंदु धर्मातील बरेच शाप पीडीकृत शाप या कॅटॅगेरीत येतील. तत्क्षण मरण शाप अगदी क्वचितच. स्मित शंकराने मदनाला जाळून भस्म केला, हा त्या प्रकारात कन्सीडर होईल कदाचित.

प्रचंड तिरस्कार मनात घेऊन शाप दिल्यास तो कदाचित फळाला येत असावा की काय असे वाटते. पण मग याने शाप देणार्‍याला काही त्रास नसेल का होत? प्रत्येकालाच कुणाचा ना कुणाचा शाप आहे. हिंदु धर्मात तशी एकंदरच क्षमा केल्याची उदाहरणे क्वचितच दिसतील. मग आपण स्वतःला क्षमाशील / सहिष्णू वगैरे का समजतो ? शापाला उ:शापही असतात का? ते नेमके कुणाकडून घ्यावेत ? ज्याने शाप दिले त्याच्याचकडून ? की कोणाकडूनही?

कर्मविपाक म्हणतो की माझे फळ माझ्या कर्मानुसार मला मिळाले. मग माझे कर्म चुकीचेच असेल तर समोरचा मनुष्य मला शाप देवो किंवा माफ करो, मला फळ भोगावेच लागणार ना? मग शाप देणार्‍याने शाप द्यायच्या फंदात पडावेच कशाला? मग हिंदु धर्मातील लोक ऊठ सूठ शाप का देतात?

अशा शापांच्या मनोरंजक कथा / प्रसंग / तात्पर्य एकत्र करण्यासाठी हा धागा आहे. इतर धार्मिक माहितीही चालेल.

१. सर्वात भीषण शाप. वाल्मिकीनी व्याधाला दिला. पक्ष्याला मारल्याबद्दल.

२. दशरथाला श्रावणाच्या पिताजींचा शाप.

३. कर्णाला परशुरामाचा शाप ( तुझी विद्या विफल होईल .)

४. अर्जुनाला उर्वशीचा शाप. ( तिची कामवासना पूर्ण न केल्याने तिने शाप दिला तू नपुंसक होशील. मग तो बृहन्नडा झाला.)

५. वेदवतीचा रावणाला शाप. ( तुला मुलगी होईल, ती तुझा नाश करेल. ती मुलगी म्हणजे सीता.)

६. रामाला वालीचा शाप. ( तू बाण लागून मरशील. तो कृष्णावतारात खरा ठरला.)

७. रामाला वालीची पत्नी तारा हिचा शाप. ( तुझी बायको तुला मिळेल, पण अल्पकाळात ती पुन्हा दुरावेल.)

८. गणपतीचा चंद्राला शाप. ( क्षय)

९. अर्जुनाचा समस्त स्त्रीजातीला शाप. ( तुमच्या मनात कोणतेही रहस्य लपून रहाणार नाही. )

१०. कृष्णाला गांधारीचा शाप. ( निर्वंश होशील.)

११. यादव कुळाला कुण्या ऋषीचा शाप. ( नष्ट व्हाल. ऋषीची चेष्टा केल्यामुळे.)

१२. जय विजय याना कुणा अप्सरेचा शाप की तुम्ही प्रत्येक जन्मात राक्षस व्हाल.

१३. ब्रह्मदेवाला शंकराचा शाप. तुझी कुणी पूजा करणार नाही. ( कारण काय?)

१४. अश्वत्थाम्याला कृष्णाचा / द्रौपदीचा शाप . ( डिटेल्स ?)

१५. कुणला तरी शाप . तू साप चाउन मरशील. मग बोराच्या बीतून अळी येऊन त्याचा साप होतो.

१६. अंबेचा भीष्माला शाप. अंबेला शिखंडीचा जन्म मिळाला त्यातही आणखी कुठला तरी एक शाप आहे.

१७. इंद्राला सहस्त्र भोकं पडतील असा शाप. ( अहिल्या लफडे प्रकरण )

अँड सो ऑन ............

शाप घेण्यात पुरुष आघाडीवर दिसतात, तर शाप देण्यात स्त्रीया.

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

22 Oct 2013 - 12:37 pm | मुक्त विहारि

लहानपणी मी एक कथा वाचली होती....

एकदा एका मुनीने आपल्या २ शिष्यांना जवळ बोलावले आणि सांगीतले की जा आणि एक-एक मनुष्य शोधून आणा.कसा. तर एक वाईट आणि एक चांगला.प्रत्येक जण एक एक मनुष्य शोधून आणतो.

तसेच आपण पण केले आहेच.

असो,

निदान हिंदू धर्माचे आपण अशा रीतीने तरी वाचन केलेत, हे ही नसे थोडके.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

24 Oct 2013 - 6:28 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

प्रतिसाद वर दिसण्यासाठी शॉर्टकट वापरला आहे.

वरच्या १७ पैकी १५ शाप पुरुषांना मिळाले आहेत. १० शाप पुरुषांनी दिले आहेत. थोडक्यात बदला, प्रतिशोध घ्यावासा वाटावा अशी कामं पुरुषांनी प्रचंड प्रमाणात केलेली आहेत. आणि अशा कृत्यांचा रागही पुरुषांनाच जास्त आलेला आहे. धागालेखकाचे निष्कर्ष पटलेले नाहीत.

हे संशोधन सुरू ठेवा, त्यासाठी शुभेच्छा.

प्यारे१'s picture

24 Oct 2013 - 8:59 pm | प्यारे१

>>>प्रतिसाद वर दिसण्यासाठी शॉर्टकट वापरला आहे.
स्वगत : एवढ्या 'प्रामाणिक'पणं कबूल केला गेलेला हा पहिलाच प्रतिसाद असेल. इतक्या दिवसात अशी घुसखोरी साळसूदपणं होत होती. असो. बदलांचं स्वागत करायला शिक प्यार्‍या. ;)

"जसे आज काल आपण मुद्दाम आणि गहन विचार पण वाचतो आहोतच की..."

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

24 Oct 2013 - 11:53 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

बदल असलाच तर हा नॉस्टॅल्जिया आहे. एकेकाळी हे असे प्रतिसाद सर्रास दिसत. गेले ते दिन गेले (काही वाईट झालं असं नाही.) पण ते असो.

चौकटराजा's picture

22 Oct 2013 - 12:44 pm | चौकटराजा

शाप घेण्यात पुरुष आघाडीवर दिसतात, तर शाप देण्यात स्त्रीया.
असतील असतील.
पुरूष लोकांना शापा ऐवजी पाश घालणे जास्त आवडत असावे !

मुक्त विहारि's picture

22 Oct 2013 - 12:47 pm | मुक्त विहारि

शेवटी कुणाचे लक्ष कूणावर?

आम्ही देवीचे उपासक तर कुणी ????????

उद्दाम's picture

22 Oct 2013 - 12:54 pm | उद्दाम

मोक्षाला गेलेलं पब्लिक भारतीय की अमेरिकन हा सर्वे केला तर चालतो. मग शापाच्या क्षेत्रात बाया किती बापे किती हा स्टडी केला तर त्यात वाइट काय?

मुक्त विहारि's picture

22 Oct 2013 - 1:47 pm | मुक्त विहारि

इतिहास साक्षी आहे.

"तुम्ही बायकांचा विचार जास्त करणार"

अनिरुद्ध प's picture

22 Oct 2013 - 1:01 pm | अनिरुद्ध प

तर आपल्या पुराणग्रन्थात बर्याच गोष्टी नन्तर घुसडल्या गेल्या आहेत त्यामुळे खरे किती आणि खोटे किती हे देवच जाणे,असो आपण अभ्यास करत आहात हि चान्गलीच गोष्ट आहे,शुभेच्छा.

अत्रुप्त आत्मा's picture

22 Oct 2013 - 1:50 pm | अत्रुप्त आत्मा

आमच्या मते शाप हा सत्यकथांना लावायचा हुकमी चाप आहे. ;-)

मग त्या कोणत्याही काळातील असोत! :)

आणि

गंमत म्हणजे ते झाकून ठेवायचे सोडून मुद्दाम गहन विचार कर्रुन टंकत पण बसतात....

बालगंधर्व's picture

22 Oct 2013 - 2:13 pm | बालगंधर्व

५. वेदवतीचा रावणाला शाप. ( तुला मुलगी होईल, ती तुझा नाश करेल. ती मुलगी म्हणजे सीता.)

ह्ये नाहि समजल. रवनाने सितेचे हरन करन्यापुर्वी वेदवतीने सीतेचे रुप धारण केले होते अनि ख्रि सिता अग्निमय्धे समावुन गेली होते. पुनहा जेवहा रामाने रावनाला मारले.. तेह्वा अगनिपरिक्षा केली गेले. खोति सीता म्हनजे वेदवती अगनित गेली अनि खरी सिता बाहेर अले. अनि ती रमाबरोबर चालु पडली. पुह्ना युपीला. पन सीताचा ज्ञम्न हा जमिनीतुन झला होता. तो पन युपी साईदच्या कुथेततेरी रज्यात. मग ती साउदकदच्या रवनाकडुन कशी अले? त्यची मुल्गी कशे झाले? हे मला सान्गा. मिसल्पाववर्तीच मी कुथेतरी वचले होते की वेदवतीला रमाशी लगन करय्चे होते. पन तो एकबयको वला असल्यने त्यने वेद्वतीला पुडच्या ज्म्नी बायको करन्यचे वचन दिले. अनि वेदवती पुडच्या जम्नि थिरुपती बालाजीची बायको पदमावथी बनली. पन मग सीता रवनाची मुल्गी कशी झाले?

मुक्त विहारि's picture

22 Oct 2013 - 2:23 pm | मुक्त विहारि

मला तर एक पण शाप समजला नाही.....

मुळात आपण जे काही चांगले आहे ते शोधतो....

ते शाप वगैरे शोधण्याचे आणि बायकांना शोधण्याचे काम इतर जणांना करू द्यात.

चला आज मस्त समस्त गंध्रर्वांची गाणी ऐकू आणि पडले राहू त्या स्वर चांदण्यांत.

बालगंधर्व's picture

22 Oct 2013 - 2:36 pm | बालगंधर्व

मुत्कविहरी,तुह्मी खुप चानगल्या मनचे अहेत. पन अप्ल्या देवआन्बद्दल जी काय थोदेफर म्हायती आप्लयाला अहे,ती जर चुकेचे असेल,तर नककी कहरी महिते कय अहे हे अपलय्ल समझने महततवचे अहे.असे मलआ वतते.

मुक्त विहारि's picture

22 Oct 2013 - 2:47 pm | मुक्त विहारि

तुम्ही नका जास्त विचार करू.

जमले तर या डोंबिवली कट्ट्याला.....

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Oct 2013 - 2:56 pm | डॉ सुहास म्हात्रे

तिथे काय "कंबल परेड" करायचा विचार आहे काय? +D

मुक्त विहारि's picture

22 Oct 2013 - 3:01 pm | मुक्त विहारि

पण

क्लब परेड आहे

(असे मला वाटते)

स्पंदना's picture

23 Oct 2013 - 5:31 am | स्पंदना

तुम्च नव मुत्क विहरी कधीपाद्सुन झाल्य? :)) :))

मुक्त विहारि's picture

23 Oct 2013 - 10:50 am | मुक्त विहारि

जे काही आहे ते

मिपाच्या पदवीत आहे...

बॅटमॅन's picture

22 Oct 2013 - 2:56 pm | बॅटमॅन

बलगन्धर्व, तुह्मी खुप चानगल्या मनचे अहेत. पन अप्ल्या देवआन्बद्दल जी काय थोदेफर म्हायती आप्लयाला अहे,ती तन्कनअधि नककी असे तन्कन्यचि कहरी प्रेरन कय अहे हे अपन लोकन्न समझावने महततवचे अहे.असे मलआ वतते. मोकलय भशेचे पन्दित अहत तुह्मी, तुमच्य पयवर लोतन्गन.

अत्रुप्त आत्मा's picture

22 Oct 2013 - 3:23 pm | अत्रुप्त आत्मा

@तुमच्य पयवर लोतन्गन.>>> =))
किच्चु ताईईईईईईई .. लवक्ल ये! अतवन येथे! =))

झाली मोकलाया लीपी सुरू झाली...

चौकटराजा's picture

22 Oct 2013 - 6:12 pm | चौकटराजा

आम्हाला या लेखनश्यलीमुले वातले की म्कट वीहरि देवांनम्द चे चहते असून त्यनी त्य्बद्द्ल कही महिती दिली आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Oct 2013 - 2:55 pm | डॉ सुहास म्हात्रे

प्न मल पहल्ल्यांदा हे संअगा कि टूमचे "सुद्द्लेकन" वचन्याचा शाप तुमि मिपावाचकांना क दिलाहे?

कारण तुमची सही तर सही आहे ;)

मुक्त विहारि's picture

22 Oct 2013 - 2:56 pm | मुक्त विहारि

तुम्ही पण?

चला आता खरे मिपाकर झालात.....

डॉ सुहास म्हात्रे's picture

24 Oct 2013 - 6:52 pm | डॉ सुहास म्हात्रे

मल खउप मजाअ वत्लि अस लिहयल. ज्र्रा वेल ज्स्त लाग्तय ब्स ;)

बालगंधर्व's picture

22 Oct 2013 - 3:04 pm | बालगंधर्व

प्न मल पहल्ल्यांदा हे संअगा कि टूमचे "सुद्द्लेकन" वचन्याचा शाप तुमि मिपावाचकांना क दिलाहे?

कारण तुमची सही तर सही आहे Wink

उत्तर द्या

ते चोप्य पस्तेद अहे. मी अनेकदा शुद्द बाहशा तनकन्याचा प्रयन्त करतो... पन त्याल कुहुप वेल लग्तो. मलआ तुमचयशे भबह्र कहे बोलयचे असेल. तर ते बह्रबहर तनकतना अशुद्द होते. पन प्लिस मझया भवना समजुन ग्य्हा.

सूड's picture

22 Oct 2013 - 3:29 pm | सूड

तुमचं लिखाण वाचून मला मिपावरच्या माझ्या आडनावभगिनीची आठवण झाली. तुमच्यासारखंच लिहायची बिचारी. आता कुठे असेल देव जाणे. =))

सूड's picture

22 Oct 2013 - 3:31 pm | सूड

तुमची स्वाक्षरी प्रतिसादांपेक्षा अंमळ जास्त शुद्ध वाटते, फार कष्ट पडले असतील नै टंकायला!!

डॉ सुहास म्हात्रे's picture

24 Oct 2013 - 6:55 pm | डॉ सुहास म्हात्रे

त्य चोप्य पस्ते अस्त्य !

अमित खोजे's picture

24 Oct 2013 - 12:28 am | अमित खोजे

कदाचित हि लिंक तुम्हाला उपयोगाची ठरावी. येथे english मध्येच type करावे ते आपल्या मीपा च्या शुद्ध भाषेत उमटत राहील

http://www.google.com/intl/mr/inputtools/cloud/try/

मृत्युन्जय's picture

22 Oct 2013 - 4:12 pm | मृत्युन्जय

तुम्च्यसर्खे ज्येश्थे स्द्स्य ज्र असे वगयल लगले तर मिपचे कसे व्हयचे? न्विन स्द्स्यम्न प्रोतहन दययचे सोदुन तुम्हे त्यन दिस्चोउरगे क्र्त अहत. मि यच प्रोतेस्त क्र्तो

अमित खोजे's picture

24 Oct 2013 - 12:30 am | अमित खोजे

कदाचित हि लिंक तुम्हाला उपयोगाची ठरावी. येथे english मध्येच type करावे ते आपल्या मीपा च्या शुद्ध भाषेत उमटत राहील

http://www.google.com/intl/mr/inputtools/cloud/try/

- changala dattya

उद्दाम's picture

23 Oct 2013 - 9:10 am | उद्दाम

मुद्द्यांवरुन शापकथा तयार करा . ( ५ गुण)

वेदवती नावाच्या स्त्रीचा रावणाने विनयभंग केला --- रावणाला शाप , तुला मुलगी होईल ती तुझा नाश करेल --- रावण मंदोदरी लग्न ---- मुलगी ---- शाप आठवला --- रावणाने घाबरुन ती मुलगी पेटीत घातली --- पेटी शेतात फेकली --- ते शेत जनकाचे होते ---- ....

विजुभाऊ's picture

23 Oct 2013 - 1:13 pm | विजुभाऊ

पेटी शेतात फेकली --- ते शेत जनकाचे होते
रामाला नाशीकपासून लंकेत जायला सहा महिने लाग्ले. रावणाला पेटी लंकेपासून दूर मालदीव वगैरे भागात फेकता आली असती. किंबहुना शेतात फेकायच्या ऐवजी त्याने ती समुद्रात फेकली हे जास्त सयुक्तीक वाटेल.
पेटी फेकायला तो अयोध्या शेजारच्या जनकाच्या राज्यापर्यन्त आला हे पटत नाही

नाकातुन तीर मारतो...

ते पण गहन विचार कर्रुन. अरे तो मुद्दाम शब्द राहिलाच की?

तुम्ही मुद्दाम गहन विचार करत नाही असे मी किंचीत विचार करुन ठरवले आहे.

उद्दाम's picture

23 Oct 2013 - 3:28 pm | उद्दाम

राम चालत फिरत होता.

रावण पुष्पक विमानातून फिरत होता.

( पुष्पक विमान नाकारणे हे म्हणजे तुम्ही नास्तिक / बुद्धीप्रामाण्यवदी /परधर्मीय / हिंदु विरोधी / चार्वाकवादी / ब्रिगेडी / डाव्या पक्षाचे / रिपब्लिक / काँग्रेसवादी / संघविरोधी / अंनिसवाले यापैकी काहीतरी आहात याचा पुरावा ठरेल. त्यामुळे या मताचा आदर ठेवलाच पाहिजे. )

ग्रेटथिन्कर's picture

23 Oct 2013 - 3:54 pm | ग्रेटथिन्कर

पुष्पक विमानाची फॅक्टरी चैनैजवळच सापडली आहे, असा हिंदुत्ववाद्यांचा दावा आहे. २००८ मधील 'द हिंदू 'या वृत्तपत्रातली बातमी इथे पहा.. खरेच आपल्याकडे विमानं होती का हो.

आनन्दा's picture

22 Oct 2013 - 2:55 pm | आनन्दा

बहुतांश कथांमध्ये असे दिसते की इतरत्र मिळालेल्या वरदानांमुळे जेव्हा सम्बंधित लोक उद्दाम झाले आणि त्यांनी अन्न्याय्य वर्तन करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना शाप मिळालेत.. तेव्हा वरांचे प्रमाण शापांपेक्षा जास्त दिसते..

असो भाउ तुम्ही पण जरा सावध, नाहीतर तुम्हाला पण पंख कापण्याचा शाप मिळायचा :)

बॅटमॅन's picture

22 Oct 2013 - 2:59 pm | बॅटमॅन

शापयादी आवडली. असेही कंपायलेशन करणे गरजेचे आहे.

बाकी, उद्दू काका आणि ग्रेट्या हे दोघेही आरेसेस एजंट आहेत असे आमचे स्पष्ट म्हण्णे आहे.

(बॅटविजय सिंह)

मुक्त विहारि's picture

22 Oct 2013 - 3:04 pm | मुक्त विहारि

त्यांना आरेसेस एजंट म्हणाल्या बद्दल णिषेध....

अरे बाबा इतके गहन विचारी नसतात बाबा आरेसेस एजंट.....

बॅटमॅन's picture

22 Oct 2013 - 3:06 pm | बॅटमॅन

अहो पण आहेतच ते एजंट. विरोधभक्ती करून करून या पदाला प्राप्त झालेत.

बालगंधर्व's picture

22 Oct 2013 - 3:05 pm | बालगंधर्व

इअत्कया पर्तिकिरिया येउनही मझया प्रस्न्हाच उत्तर कहे मिलल न।अ‍ॅ.

बॅटमॅन's picture

22 Oct 2013 - 3:10 pm | बॅटमॅन

पन प्रस्न्ह क अहे? ते त्री संगा ओ. कं मागे रह्हताय?

प्रसाद प्रसाद's picture

22 Oct 2013 - 5:30 pm | प्रसाद प्रसाद

महानुभाव पंथाच्या लीळाचरित्र वाचतोय की काय असं वाटलं असली भाषा वाचून.........

मोकलाया नामक लीळाचरित्रातून उगम पावलेली भाषाये ही...तषीच अष्णार.

इरसाल's picture

25 Oct 2013 - 3:28 pm | इरसाल

मोकळाया दिशा आमुच्या गेलो आम्ही रानात
लोकांना मिळाला मोक्ष बसल्या बसल्या वावरात.

भेंडी हाय काय त्यात जोडला ट ला ट झाली कं नाय कविता.

प्रसाद गोडबोले's picture

22 Oct 2013 - 3:05 pm | प्रसाद गोडबोले

असेही कंपायलेशन करणे गरजेचे आहे.

मग पहिल्यांदा मोक्ष मिळालेल्या लोकांची यादी करुयात =))

बॅटमॅन's picture

22 Oct 2013 - 3:09 pm | बॅटमॅन

हा हा हा, अगदी अगदी =)) बादवे आपण कुणाला मोक्ष मिळवून दिला तर त्याचं यादीत नाव घातलं तर चालेल ना ;)

मुक्त विहारि's picture

22 Oct 2013 - 3:24 pm | मुक्त विहारि

मी बॅट्मॅन ह्यांचे प्रतिसाद वाचून कधी कधी मोक्ष पदाला गेलो आहे...

परत एकदा बॅटमॅन ह्यांच्या प्रतिसादांचा चाहता....मुवि....

ग्रेटथिन्कर's picture

22 Oct 2013 - 3:27 pm | ग्रेटथिन्कर

णिषेध !षिणेध! धिणेष!
प्रचारकाला एजंट म्हण्ण्याची पापे कुठे फेडाल ,कर्मविपाकातल्या जिलब्या आता तूमाला खाव्या लागणार.
-किसलेला(grate) विचारवंत(thinker)

बॅटमॅन's picture

22 Oct 2013 - 3:32 pm | बॅटमॅन

पण तुम्ही आरेसेसचे आहात किनै????? नाकबूल केले तर ingrate थिंकर म्हणावे लागेल :P

अनिरुद्ध प's picture

22 Oct 2013 - 3:47 pm | अनिरुद्ध प

त्याना एक्दम विचारजण्ता वरुन विचारवंत या पदावर पोचवलेत?

म्हैस's picture

22 Oct 2013 - 3:41 pm | म्हैस

इथे येवून details विचारण्यापेक्षा आणि ऊठ सूट हिंदू धर्माच्या नावाने बोंबा मारण्यापेक्षा लोक google वर का नाही आधी search करत ?
आपल्याकडे पुष्कळ धार्मिक पुस्तके ग्रंथ आहेत ती का नाही वाचत . शाप कशासाठी देतात ? नक्की कोणी कोणाला शाप दिलाय , कशासाठी दिलाय हे हि माहित नाही . अश्या लोकांनी खुशाल धर्मांतर करावा न. हिंदू धर्माला असल्या भोंदू हिंदूंची काही गरज नहिये.

बॅटमॅन's picture

22 Oct 2013 - 3:46 pm | बॅटमॅन

अगं म्हशी, मागं तूच तर हंबरली होतीस ना की "नेटवरच्या लिंक्सना कशाला किंमत द्यायची..हम्म्म्म्माऽऽ" म्हणून! मग आता काय झालं एकदम? खरं तर अजून कुणाच्या धर्मांतरापेक्षा तुझ्या परलोकप्रवेशाने लै लोकांना बरे वाटेल.

मुक्त विहारि's picture

22 Oct 2013 - 3:51 pm | मुक्त विहारि

मोक्ष दिला....आणि मला एक नविन विषय मिळाला.आता ह्यांतच पी.एच.डी. करतो...

कपाळमोक्ष की बॅटमॅनमोक्ष

विनोद१८'s picture

22 Oct 2013 - 11:46 pm | विनोद१८

श्रीयुत बॅ.मॅ. ..

का बरे गरीब गायीला म्हशीबरोबर बान्धतोस ??? अरे म्हैस 'रेकते' हम्बरत नाही. *clapping*

विनोद१८

बॅटमॅन's picture

23 Oct 2013 - 3:36 am | बॅटमॅन

आयमाय स्वारी बरंका. हां आता कळ्ळे हे साहेब असे 'रेक'लेसपणे का प्रतिसादत असतात ते =)) बहुत धन्यवाद विनोदजी.

मृत्युन्जय's picture

22 Oct 2013 - 3:57 pm | मृत्युन्जय

मिपालाही कसलेकसले शाप मिळाले आहेत म्हणे. उ:शाप आहेत की नाही देव जाणे.

काही कारणामुळे देवी लक्ष्मी मनुष्य रुपात भूलोकात येवून भगवान विष्णुंची तपस्या करत बसली होती . तिचा नाव वेदवती . रावणाला वासनेची मस्ती चढली होति. त्याने तिचा आणि भगवान विष्णूंचा अपमान करण्याचा प्रयत्न केला . तेव्हा वेद्वातीने रावणाचा स्पर्श झाला म्हणून आपल्या शरीराला अग्नीमध्ये समर्पित केल. पण जाताना तिने त्याला शाप दिला कि मी पुन्हा येईन आणि तुझ्या मृत्यूचा कारण बनेन आणि भगवान विष्णू स्वतः तुझा वध करतील .
तुला मुलगी होईल वगेरे … काहीही फेकलाय ह्या लेखात . सीता रावणाची मुलगी असण्याचा सम्बन्ध येतोच कुठे?

सीता तर रावणाची स्वामिनी होति. रावण हा खरं तर विष्णू , लक्ष्मीचा महान सेवक होता . म्हणून तर श्री रामांनी त्याला अनेकवेळा सीतेला सोडून देवून शरण येण्याचा सल्ला दिला .

मुक्त विहारि's picture

22 Oct 2013 - 4:04 pm | मुक्त विहारि

"काहीही फेकलाय ह्या लेखात."

त्यांना टंकायला आवडते म्हणून ते टंकतात...आणि ते जे काही टंकतात तेच ब्रह्म वाक्य असे पण ते समजतात....उगाच का ब्रह्म्देवाने भारतात राहून प्रुथ्वी निर्माण केली...

रावणाचा सावत्र भाऊ कुबेर हा लंकेचा राजा होता. रावणाने त्याच्याकडून लंका जिंकून घेतली. त्याचे पुष्पक विमान देखिल बळकावले. त्याच विमानातून तो जात होता तेव्हा एका पर्वतावर त्याच्या दृष्टीला वेदवती दिसली. तिचा मोह होऊन तो त्या पर्वतावर थांबला. वेदवतीला जेव्हा त्याचा हेतू लक्षात आला तेव्हा तिने त्याला त्यांच्या नात्याची आठवण करून दिली. ती कुबेराची सुन होती.. म्हणजेच रावणाची देखिल सुन म्हणजेच कन्येसमान. पण रावणाने तिचे न ऐकता तिला भ्रष्टं केले. त्यावेळी तिने तिच्या तपःसामर्थ्याने अग्नी निर्माण केला, आणि त्यात जळून गेली. त्यावेळी तिने त्याला शाप दिला कि कुणाही स्त्री चा तिच्या इच्छेविरूद्ध उपभोग घ्यायचा प्रयत्नं केला तर त्याला मृत्यु येईल.
आणि मंदोदरी ही एका अप्सरेची मुलगी होती. आणि त्याच अप्सरेच्या कुळात सितेचा जन्मं झाला होता. म्ह्णून मंदोदरी तिला मातेसमान होती. म्ह्णून ती रावणाची कन्या. असे काहीसे आहे.

या शापांच्या यादीत वालीने रामाला दिलेला शाप आहे का?
सुग्रीव आणि वाली या दोन बंधुंच्या भांडणात रामाने सुग्रीवाची बाजू घेतली. खरं म्हणजे वालीची बाजू न्यायाची होती. आणि तीही कशी तर वाली आणि सुग्रीवाचे द्वंद्व चालू असताना झाडाआडून त्याने वालीचा वध केला. तेव्हा वालीने शाप दिला की आमच्या घरात जशी दुही झाली आणि त्याचा फायदा तू घेतलास .. तसेच तुझ्या घरातही होईल आणि तुझे कुळ नाश पावेल. आणि पुढे तसे घडलेही.
अर्थात या सर्वं पुराणातल्या कथा... त्या तिथेच असलेल्या बर्‍या, नाही का?

पिलीयन रायडर's picture

23 Oct 2013 - 1:31 pm | पिलीयन रायडर

मला फाटे फोडायचे नाहीयेत पण एक बेसिक प्रश्न पडला..
जर वेदवती तपःसामर्थ्याने अग्नि निर्माण करु शकत होती तर ती रावणाला स्वतःला हात लावण्यापासुन रोखु शकत नव्हती का? अग्नि निर्माण करायचाच होता तर आधीच करायचा आणि त्यात रावणाला जाळुन मारायचं.. स्वतःच्या शक्तिचा डिफेन्सिव्ह वापर करायचा ना..सगळं होइस्तोवर सहन का करायचं?

ग्रेटथिन्कर's picture

23 Oct 2013 - 1:43 pm | ग्रेटथिन्कर

तुमास्नी आमास्नी चघळाय कायतरी ईशय लागत्यातच.. म्हणुनशान द्येव असलं कायबी करत बसत हुतं... त्येनला म्हैतय त्येन्नी लै शॅनपणा क्येला तर मंग त्येनच्या स्टोर्या कुण लिवणार ..अन त्यावर पैकं कमावणार्याच काय.. रामनंद सागराला स्टोर्या कोण द्येणार.. पीलीयन रायडर?

थोडा फायदा होत आहे हं.

पण ते जरा पथ्याचे बघा जरा.

बाकी हे असले काही चघळण्यापेक्षा तुमच्या जातबांधवांबरोबर जात का नाही?

का तिथे पण तुम्हाला घेत नाहीत?

ग्रेटथिन्कर's picture

23 Oct 2013 - 2:07 pm | ग्रेटथिन्कर

मी अजातशत्रु आहे.

"शत्रू"

बरोबर....

आता अजात, विचार, की नक्की कुठले ते मात्र समजत नाही...

असो....

निदान एका वाक्यावर यायचे इतपत तरी पथ्य पाळलेत...पण पुर्ण पाळाहो...

थोडा फायदा होत आहे... पथ्य पाळलेत की फार छान होईल बघा...

कपिलमुनी's picture

23 Oct 2013 - 2:32 pm | कपिलमुनी

अजातशत्रु ते हेच काय ??

मुक्त विहारि's picture

23 Oct 2013 - 2:52 pm | मुक्त विहारि

लोळतोय...

वेदवतीने असे का केले/ अथवा केले नाही याची मला काही कल्पना नाही.
आणि तिला त्याबद्दल विचारून शंका निरसन करता येणे शक्य नाही आता.

मालोजीराव's picture

23 Oct 2013 - 4:28 pm | मालोजीराव

तत्कालीन पुष्पक विमानात ऐर होस्टेस असतील का ? असतील तर त्या मानविणी,यक्षिणी का राक्षशिणी असतील ? फ्लाईट डोमेस्टिक असेल कि विंटरन्याश्णल ?

ग्रेटथिन्कर's picture

23 Oct 2013 - 4:33 pm | ग्रेटथिन्कर

त्ये ईमान बायांना होस्टेज बनवाय काढल्यालं, तिथ ऐरहोस्टेस कशाला झक माराय जातीला.. यडा कि खुळा रं तु.?

मालोजीराव's picture

23 Oct 2013 - 4:37 pm | मालोजीराव

इजय मल्ल्या आन त्याच्या एर होस्टेसेस , रावण आन त्याच्या एर होस्टेसेस…

ग्रेटथिन्कर's picture

23 Oct 2013 - 4:45 pm | ग्रेटथिन्कर

म्या आटोबोट न्हाय गालबोट हाय...आस ब्हार्या म्हणत हुता कालपास्नं ...कुट पांगलं काय म्हैत..ब्हार्या आर्र गड्या कुट हाय तू.. जम्नीत ग्येला का ,येताळाना धर्ला तुला..

प्रचेतस's picture

23 Oct 2013 - 4:47 pm | प्रचेतस

हे बघा रावणाचे पुष्पक यान.

a

मनीषा's picture

24 Oct 2013 - 12:36 pm | मनीषा

बहुदा राक्षशिणी असाव्यात, कारण श्रीलंकेची फ्लाईट होती ना ती. आणि अर्थातच इंटरनॅशनल.

खटपट्या's picture

23 Oct 2013 - 1:07 am | खटपट्या

मूळ रामायण ईसराया लागलोय !!!!

उद्दाम's picture

23 Oct 2013 - 9:14 am | उद्दाम

मुद्द्यांवरुन शापकथा तयार करा . ( ५ गुण)

वेदवती नावाच्या स्त्रीचा रावणाने विनयभंग केला --- रावणाला शाप , तुला मुलगी होईल ती तुझा नाश करेल --- रावण मंदोदरी लग्न ---- मुलगी ---- शाप आठवला --- रावणाने घाबरुन ती मुलगी पेटीत घातली --- पेटी शेतात फेकली --- ते शेत जनकाचे होते ---- ....

( दक्षिण भारतीय रामायणात ही कथा आहे.)

तुम्ही लोकांना का पेपर घालता आहात? तुमचा काय आभ्यास आहे ते पण सांगा ना.

( दक्षिण भारतीय रामायणात ही कथा आहे.)
असेल असेल ..
शेवटी काय? पुराणातली वांगी सगळी ....

उद्दाम's picture

23 Oct 2013 - 11:26 am | उद्दाम

काही कारणामुळे देवी लक्ष्मी मनुष्य रुपात भूलोकात येवून भगवान विष्णुंची तपस्या करत बसली होती .

कैतरीच बै! नवरा कायम घरातच सापावर झोपलेला असताना पुन्हा त्याचीच तपस्या करायला बायकोने भूलोकात का यावे?

ग्रेटथिन्कर's picture

23 Oct 2013 - 11:51 am | ग्रेटथिन्कर

या देवांना कंटाळा कसा येत नाही, अनादी अनंत काळ एकाच सापावर बसुण राहणे(त्यो साप अमर आहे कि त्याचाही नंतर' अन्थोनी' होतो?) वीणा खाजवत एकच वाक्य बडबडत बसणे, मेनका आणि उर्वशी अनादी काळ नाचत्यात.. त्येच बघत बसणे..अरे काय चेंज हाय की नाय...

मुक्त विहारि's picture

23 Oct 2013 - 12:01 pm | मुक्त विहारि

हा प्रश्र्न मला पण पडला होता... पण मिपावर आलो आणि उत्तर मिळाले...

एकाच मुद्द्यावर टंकत राहणे,(तो मुद्दा पण नंतर अमर होतो की त्याचा पण नंतर "गाढव" होतो?)

काय असे तो पाव्/अर्धा मेंदू खाजवत एकच धोशा लावत बसणे.वगैरे वगैरे....

बाकी अजून तुम्ही पथ्य सुरु केलेले दिसत नाही....

असो....

बाकी चालू द्या...

ग्रेटथिन्कर's picture

23 Oct 2013 - 12:47 pm | ग्रेटथिन्कर

तुमच्या बिहारी स्वभावावर औषध म्हणून नथुगुग्गुळवटी आणि विदारीष्ट काढा पाठवत आहे... आनंद मानुन घ्या तो...
आपला बिहारी मित्र प्वॉट साफ नसल्याने खंग्रीगिरी करतोय हे आस्मादींकाना(म्हंण्जी मी स्वोत्ता) बघवत नाय.. ढसा ढसा ढसा ढसा..

मुक्त विहारि's picture

23 Oct 2013 - 1:01 pm | मुक्त विहारि

असे काय करता...

परवा तर आपण स्वतःच कबूल केलेत की आपण नक्की कोण आहात? आणि हे परत परत सिद्ध कशाला करत आहात? कारण पोटाचा आणि खंग्री पणाचा पण काही संबंध नसतो हो..

कारण,,, मागे एका लेखात पण आपण नगू ची चर्चा केली होती.तुम्ही नुसतेच नगू घेता पण पथ्य पाळत नाही असे दिसत आहे.

असो....

बाय द वे ,,,, तुम्ही पो.पा. मॅडमचे माजी विद्यार्थी दिसता....

विजुभाऊ's picture

22 Oct 2013 - 4:05 pm | विजुभाऊ

बलगनदहर्व / बयातमयान / इते तुमी तनकन्याच परयतन करतय पन नककी कय हओअतय कई कल नहई. पन असए तनकनयात बहरईच वएल जतओ. अआणई नककई कय तनकलेय ते क्ल्त नहई. मातर वचनआअरालआ मतर बहरपऊअर कशट पदतआत. लईच मजजा यएतए.
अएअक शनका : बलगनधर्व्.तऊमई तऊमचई सवकशरई कओणाकडऊन तनकौन गहेतली?

विजुभउ (सल्ल तुमच्य नवाआआच इद्म्बन करत येना) हि भस बघुन मरथिचच जुन रुप असव अस वततयल्ल लगल्लय. परकऋत भशेचे अत लुपतपर्रय झहलेले रुप. मोदि लिपिच कस होत नै क लिहिनरल क तर्रस नै पन वचनराआलाअ लय तरस. तसच झलय. त्यच लिप्पिच जलिय अवताआआआर्र वत्तु रहयलय.

मुक्त विहारि's picture

22 Oct 2013 - 4:15 pm | मुक्त विहारि

त्रिवार निशेध

हे तुम्ही असे काहीतरी लिहीता आनि नव्या मिपाकरान्चा उत्साह घालवता...

ऩवे़ मिपाक़रही़ क़मी नाही़त़. स़ग़ऴ्यांना पु़रू़ऩ उ़ऱतील़ अ़से़ आ़हे़त़.

खालील पैकेजेस बाजारात लवकरच येत आहेत.

मोकलाया लीपी वर्जन १.०
मोकलाया लीपी वर्जन २.० विथ सर्वीस पैक

विजुभाऊ's picture

22 Oct 2013 - 4:24 pm | विजुभाऊ

सही====> नानू सरंजामे म्हणाला, "मी झोपतो करून हिमालयाची शी"====

=)) =)) =)) =))

मुक्त विहारि's picture

22 Oct 2013 - 4:31 pm | मुक्त विहारि

मिपाकर झालो तर...

विजुभाऊ's picture

22 Oct 2013 - 4:23 pm | विजुभाऊ

"परकऋत भशेचे"
"मोदी लिपी"

ठ्यॉ.....=)) ;)

परकर या वसतराचा य इथ कय समबनध?
"मोदी लिपी" मोदीनी तवडहच करयचए बकई हओअतं?

तुमल नक्कि क महनयचय.....वस्तर क वसतर...घलयच कि केस कपयच?

अन मोदिनि पन्तप्रधन व्हयच त इतक केलच पहिजे. बकि मोदि लिपि हि अलिकदच्य गुज्जु लिपिशि थोदि सिमिलर पन अहे.

खटपट्या's picture

23 Oct 2013 - 1:14 am | खटपट्या

"तुमल नक्कि क महनयचय.....वस्तर क वसतर...घलयच कि केस कपयच?

ठार मेलो....

हि बत्मन होव दो योउ थिन्क थिस स्च्रिप्त वोर्क्स इन थिस रेप्ल्य?
विथ थिस स्च्रिप्त ओने चन व्रिते लोत्स ओफ बूक्स इन मरथि

अन्द मन्य विल बे फूलेद इन्तो बेलिएविन्ग थिस इस सोमे सोर्त ओफ चोदे =))

थिस इस थे पेर्फेच्त स्च्रिप्त फोर व्रितिन्ग नोत ओन्ल्य मरथि बुत अल्सो एन्ग्लिश इन थिस फोरुम.

भगवान विष्णूंचे द्वारपाल जय आणि विजय ह्यांनी सनत कुमारांचा (हे ४ सनत कुमार त्यावेळी प्रजापती दक्षाच्या शापामुळे लहान मुल झाले होते ) अपमान केला . त्यांना वाटले हि लहान मुले भगवान विष्णूंना भेटायला जातात म्हणजे काय? त्यांनी त्यांची टिंगल केलि. वारंवार सांगून हि त्यांनी ऐकले नाही तेव्हा सनत कुमारांनी त्यांना शाप दिला कि श्री हरींचे द्वारपाल आहात म्हणून एवढा माज आलाय का तुम्हाला ? आता तुम्ही तुमचं हे द्वारपाल म्हणून करत असलेलं कार्य आणि भगवान विष्णू दोघांनाही विसरून जाल आणि राक्षस होवून राहाल
हा गोंधळ ऐकून श्रीहरी बाहेर आले आणि त्यांनी स्वतः सनत कुमारांची क्षमा मागितली तेव्हा जय विजय घाबरले आणि क्षमा मागू लागले तेव्हा त्यांची दया येवून त्यांना उशाप दिला कि ३ जन्म तरी तुम्हाला भूलोकावर रहावच लागेल . तेव्हा जय विजय नि श्रीहरींना विनंती केली कि ३ हि जन्मात त्यांना श्रीहरीन च्या हातून मृत्यू यावा .
त्या नंतर जय हिरण्याक्ष झाला . विजय हिरण्य कश्यपु. पुढच्या जन्मामध्ये दोघे रावण आणि कुंभकर्ण झाले . त्याच्या पुढच्या जन्मात शिशुपाल आणि दुसर्याचा नाव आठवत नाहीये पण शेवटची २ अक्षरे 'दुर्ग ' अशी आहेत

मुक्त विहारि's picture

22 Oct 2013 - 4:51 pm | मुक्त विहारि

इतक्या लवकर अशा कथा देवू नका.

अति सत्य (संक्षिप्त रूप अ.सत्य) कथा लवकर पचत नाहीत काही लोकांना...

त्यांचे अजून नथूगुग्गुळ औषध सुरु आहे......

अजून ते शाप आणि बायका ह्यांतच अडकलेले आहेत.तिथून सुटका झालीच (म्ह्नजे स्वतःहून केलीच तर) की मग ते वर आणि नर ह्यांच्या कडे वळतील.

हे सारं घडत असताना तुम्ही तिथे होता का?

केकाट न्या पेक्षा हम्बरलेल बारा न. कुई SS कुई SS कुई SS

मुक्त विहारि's picture

22 Oct 2013 - 5:31 pm | मुक्त विहारि

कलयुग सुरु झाले की काय?

मी हंबरण्याचा आवाज "हम्म हम्मा" असा ऐकला होता....आज काल "कुई SS कुई SS कुई SS" असा झाला की काय? का म्हशी रोडावल्या आणि कोल्ह्याच्या आकारच्या झाल्या?

इरसाल's picture

22 Oct 2013 - 5:38 pm | इरसाल

९ वा शाप शापच चुकलं कि वो !

प्रसाद प्रसाद's picture

22 Oct 2013 - 5:40 pm | प्रसाद प्रसाद

शापाच्या चर्चेत उ:शापाची चर्चा असावी का?

उ:शाप

मानवाच्या जीवनाला, काय दैवा, शाप आहे?
तो कुणाचा पुत्र आहे वा कुणाचा बाप आहे...

अन्नवस्त्राची शिदोरी पोसते आहे तनूला,
तेवढ्याने होत नाही, भावनांचा व्याप आहे...

कोणत्या नाजूक वेळी तोकड्या शक्तीस याच्या,
धीर देण्या माउलीचा हात देतो थाप आहे...

आपल्या पाठी उभा आहे पिता या भावनेने,
हिंमतीचा जोर येतो, शत्रुची का टाप आहे...

खुंटल्या यत्नास जेंव्हा मार्ग दावाया कुणाच्या
युक्तिचा आधार लाभे, आदराची छाप आहे...

साथ देण्या भावनांना, जाणुनी त्या पातळीने,
जीव लावी हेच मोठे सख्यभावा माप आहे...

या मनाला गुंतवाया मोहुनी सर्वस्वभाना,
भामिनीच्या डोळियांचा कामदेवी चाप आहे...

एक धागा हा सुखाचा लाभतो प्रेमात मोठा,
जीवनी संगीत वाटे, घेतसे आलाप आहे...

सर्व संबंधांस साधा, भावनेला साथ देती,
नाचतो त्यांच्याप्रमाणे, लागते रे धाप आहे...

ना कधी होते मनाचे मानल्या इच्छेप्रमाणे,
वेळ येता दे दगा ते आपुले, हा ताप आहे...

ज्या भरोशाने जगाला लाविलेले ऊरपोटी,
तो तुटे, हा भावनेला वेदनेचा राप आहे...

शास्त्र सांगे सोडुनी द्या, मोहमायेचा पसारा,
वागणे ना त्याप्रमाणे, कोण जाणे पाप आहे...

काव्य देई या मनाच्या भावनांना वाट सोपी,
लेखणी हाती धरावी, एवढा उ:शाप आहे...

चौकटराजा's picture

22 Oct 2013 - 6:19 pm | चौकटराजा

भूपाच्या मैफलीत येक्दम जोगिया लावला की हो तुम्ही !

मुक्त विहारि's picture

22 Oct 2013 - 6:22 pm | मुक्त विहारि

धाग्यात दमच तेव्हढा आहे...

मुदाम फार गहन विचार कर्रुन काढलेला धागा आहे हा.

चौकटराजा's picture

22 Oct 2013 - 6:59 pm | चौकटराजा

अजून वर्गणी नाही मिपाला
म्हन्ताना लेखन व्याप आहे
एकदा पैशे झाले सुरू की
काय कुणाची टाप आहे .... ? ऑ<

आशु जोग's picture

22 Oct 2013 - 7:06 pm | आशु जोग

मुक्त विहारि

तुमच्या बर्‍याच प्रतिसादांना 'लाइक' करायचे आहे पण बटनच दिसत नाही

आनंदी गोपाळ's picture

22 Oct 2013 - 8:41 pm | आनंदी गोपाळ

वापरायचा प्रेत्न करून पहा ;)

मुक्त विहारि's picture

22 Oct 2013 - 9:07 pm | मुक्त विहारि

लिहा,,,

नितिन थत्ते's picture

22 Oct 2013 - 8:41 pm | नितिन थत्ते

श्रावण बाळाच्या आईबापांनी दशरथाला "पुत्रवियोगाने मरशील" असा शाप दिला तो त्याला "पुत्रप्राप्तीचा वर" वाटला ही गंमत पण वाटेल.

अत्रुप्त आत्मा's picture

22 Oct 2013 - 9:53 pm | अत्रुप्त आत्मा

@ तो त्याला "पुत्रप्राप्तीचा वर" वाटला ही गंमत पण वाटेल.>>> धा.....ड!

धन्या's picture

23 Oct 2013 - 12:46 pm | धन्या

हे आजवर कधी लक्षातच आलं नाही.

आशु जोग's picture

22 Oct 2013 - 11:23 pm | आशु जोग

एक सूचना
या सगळ्या पौराणिक कोथा डेटाबेस स्वरुपात साठवल्यास आपल्याला पाहिजे तशा क्वेरीज चालवता येतील

शाप - म्हटले की शापाच्या कथा,
उ:शाप - की त्या अहिल्येच्या कोथा
कुमारी माता- की तसल्या कोथा
कथा + भाष्ये
कुमारी माता & इरावती कर्वे यांचे भाष्य
झालच तर कुमार पिता हेही यात येऊ शकतील

असं बरच काय काय
अजूनही काय काय अ‍ॅट्रीब्युटस् टाकायला हरकत नाही, म्हणजे आपला आपणच अभ्यास वाढवता येइल

असं नीट ष्टोअर केलं तर 'तुमच्यासाठी काय पण' माहिती शोधून काढता येइल

बॅटमॅन's picture

23 Oct 2013 - 3:43 am | बॅटमॅन

असा डेटाबेस बनवला तर लै बरे होईल. कितीक वादांचा जागेवरच कंडका पडेल.

मनीषा's picture

23 Oct 2013 - 12:04 am | मनीषा

मला वाटतं..
ज्या प्रमाणे आशिर्वाद अथवा वरदान खरी ठरतातच असं नाही तसच शापाचं
पण म्हणून शापाचं महत्वं कमी होत नाही.
ज्या प्रमाणे एखाद्या व्यक्तीबद्दल खूप चांगल्या भावना तुमच्या मनात असतील आणी त्या व्यक्तीचे भले व्हावे असे तुम्हाला मनोमन वाटत असेल तर तुम्ही आशिर्वाद देता. किंवा त्याचे मंगल होवो असे मनात आणता.
तसच एखाद्याबद्दल अत्यंतिक तिरस्कार वाटत असेल तर तुम्ही त्याला शिक्षा व्हावी अशी मनोकामना करता ना? तोच शाप. आता त्याचा उच्चार केल्याने कुणाला थोडेफार समाधान मिळत असेल तेव्हढेच त्या शापाचे महत्वं बाकी काही नाही.

अग्निकोल्हा's picture

23 Oct 2013 - 1:22 am | अग्निकोल्हा

.

मन१'s picture

23 Oct 2013 - 7:24 am | मन१

फुल्टु कल्ला चल्लेला दिस्तोय.

मुक्त विहारि's picture

23 Oct 2013 - 10:52 am | मुक्त विहारि

हा धागा आहे.

प्रतिसादांपेक्षा उपप्रतिसादच जास्त

उद्दाम's picture

23 Oct 2013 - 9:16 am | उद्दाम

धागा अमर रहे.

उद्दाम's picture

23 Oct 2013 - 11:22 am | उद्दाम

आधुनिक काळातील शाप राहिला.

गोहत्या प्रतिबंध्क कायद्यासाठी साधूंनी संसदेवर मोर्चा काढला होता. त्यावेळी इंदिराजींनी लाठीमार की गोळीबाराचे आदेश दिले होते. तो दिवस गोपूजेचा होता ( म्हणजे नेमका कोणता दिवस?)

त्यावेळी एका साधूने शाप दिला की तुमच्यावरही ( म्हणजे इंदिराबैंवर) असाच शस्त्रहल्ला होईल.

इंदिराजींची हत्या झाली. तो दिवसही तोच म्हणजे गोपूजेचा होता ( म्हणे)

( साभार - सनातन वांगमय , चुभुदेघे)

चिगो's picture

23 Oct 2013 - 1:23 pm | चिगो

आता बाकीचे गांधी म्हणजे महात्मा गांधी, राजीव गांधी, संजय गांधी ह्यांच्याबद्दलही काही कथा असल्यास लिहाव्या.. ;-)

मुक्त विहारि's picture

23 Oct 2013 - 2:58 pm | मुक्त विहारि

गाय गेली वासरू आले
वाघाने पण बछडा आणला
हत्तीने ही पिल्लू आणले
तरीही आपण सगळे झोपलेले

"अंगठा" मुवि

उद्दाम's picture

23 Oct 2013 - 3:31 pm | उद्दाम

हे घ्या ऐका.

http://www.youtube.com/watch?v=eBLr9VWbAdE

कपिलमुनी's picture

23 Oct 2013 - 12:47 pm | कपिलमुनी

कोणे एके काळी एका आयडी ने एकोळी धागा काढला म्हणून त्याला शाप दिला होता ..

आजकाल तो आयडी शापामुळे ट्रोलिंग करत फिरतो..

श्रीगुरुजी's picture

23 Oct 2013 - 1:13 pm | श्रीगुरुजी

हिंदू धर्मात निधर्मान्ध निपजतील आणि 'कुर्‍हाडीचा दांडा गोतास काळ' या उक्तीप्रमाणे ते आपल्याच धर्माच्या मुळावर येतील असा हिंदू धर्माला शाप आहे.

ग्रेटथिन्कर's picture

23 Oct 2013 - 11:27 pm | ग्रेटथिन्कर

चूक.... हिंदूंना जातीत विभागणारे, कर्मकांड माजवणारे जन्मतील आणि धर्माचे ठेकेदार बनतील असा हिंदूना शाप आहे.

पुराणातल्या कथांमधे लॉजिक शोधायला क्ष मूर्खपणा लागतो.
पुराणांतील कथांवरून आजच्या समाजावर भाष्य करायला क्ष चा वर्ग मूर्खपणा लागतो.

हिंदु धर्मात शाप देण्याची प्रथा आढळते

शाप हे फक्त हिंदू धर्मातच दिले गेले आहेत का?

हिंदु धर्मात तशी एकंदरच क्षमा केल्याची उदाहरणे क्वचितच दिसतील

जोक of the millenium

कर्मविपाक म्हणतो की माझे फळ माझ्या कर्मानुसार मला मिळाले. मग माझे कर्म चुकीचेच असेल तर समोरचा मनुष्य मला शाप देवो किंवा माफ करो, मला फळ भोगावेच लागणार ना? मग शाप देणार्‍याने शाप द्यायच्या फंदात पडावेच कशाला? मग हिंदु धर्मातील लोक ऊठ सूठ शाप का देतात?

चुकून कोणाकडून हि आपलं थोडाजरी नुकसान झालं तर लगेच आपल्या तोंडात शिव्या येतात . शाप हा त्याचाच सभ्य प्रकार .
खून, दरोडे , बलात्कार आणि अजून भयानक अपराध करणार्यांना त्यांच्या कर्माची फळे भोगावी लागतील म्हणून कोर्ट , पोलिस ह्या गोष्टी बंद केल्या तर चालतील का? गुन्हेगाराला त्याच्या गुन्ह्याची जाणीव तिथल्या तिथे करून द्यावी आणि इतरांना जरब बसावी म्हणून शाप देण्याची प्रथा होति.
सामान्य माणसांमध्ये शाप द्यायची ताकद नसल्यामुळे त्यांना नाईलाजाने
पोलिस, कोर्ट कचेरी ह्यांच्यावर अवलंबून राहावं लागतं
ज्याच्यामध्ये ती ताकद आहे तो कशाला ह्यांची वाट बघत बसेल

श्रीगुरुजी's picture

24 Oct 2013 - 11:34 am | श्रीगुरुजी

भारत हा एकंदरीत शापित देश आहे. आधी मुस्लिम, नंतर ब्रिटिश आणि नंतर काँग्रेसच्या राजवटीचा महाशाप भारत व भारतीयांना मिळालेला आहे.

ग्रेटथिन्कर's picture

24 Oct 2013 - 12:09 pm | ग्रेटथिन्कर

आरेसेस भाजप बजरंग दल मोदी पेशवाई जातीव्यवस्था वर्णव्यवस्था ही वरदानं आहेत! .. हो की नै रे गुर्जी!

अनिरुद्ध प's picture

24 Oct 2013 - 12:28 pm | अनिरुद्ध प

खान्ग्रेसि सभ्यता दुसरे काय?

सुबोध खरे's picture

24 Oct 2013 - 12:18 pm | सुबोध खरे

व्यर्थ मी जन्मले हिंदुकुळी
लागला कॉंग्रेसचा फास गळी

असे आचार्य अत्रेंच्या एका पुस्तकात वाचल्याचे आठवते

शाप देणे फक्त हिंदू धर्मातील पौराणिक कथांमध्ये नाही .ग्रिक कथांतही "Cursed" आहे . हिंदू धर्मातली जन्मलेली व्यक्ति नि:संकोच धर्मावरच टिका करते ते खपवून घेतले जाते (तसे इतर धर्मांत नाही अथवा दगड मारून ठार करतात)ही सहिष्णूता . निसर्गातले चांगले चमत्कार( पाऊस वगैरे)अथवा वाईट ( भूकंप ,पूर ,रोगांच्या साथी ,मृत्यू इत्यादि )यांचे वैज्ञानिक कारण मानवाला देता येत नव्हते त्यावेळी त्याने पौराणिक कथा पुष्टीसाठी केल्या .यामागे असलेल्या काही गूढशक्तिंना संतुष्ट केल्यास (पुजा ,बळी वगैरेने) आपल्याला त्रास देणार नाहित या विचाराने ही रीत सुरू झाली .तरीही आपत्ती आली की त्याला कोप म्हणायचे .सर्वच धर्मांमध्ये वाईट प्रवृत्ती आहेतच फक्त त्यांना व्यक्त करता येत नाहित .

म्हैस's picture

24 Oct 2013 - 3:23 pm | म्हैस

खरं तर अजून कुणाच्या धर्मांतरापेक्षा तुझ्या परलोकप्रवेशाने लै लोकांना बरे वाटेल.

तुमची लायकी प्रमाणेच तुम्ही विनोद करणार . तुमच्या बुद्धीची कुवत दाखवून दिलित.

नामस्मरणाने मनासारख्या गोष्टी घडत नसतात.घडणाऱ्या गोष्टी मनासारख्या वाटतात.

:P

पुष्कर जोशी's picture

28 Oct 2013 - 7:21 am | पुष्कर जोशी

खरच भारी .. पण काम झाले कि .. मन: शांती मिळाली कि ...

हिंदू धर्मात निधर्मान्ध निपजतील आणि 'कुर्‍हाडीचा दांडा गोतास काळ' या उक्तीप्रमाणे ते आपल्याच धर्माच्या मुळावर येतील असा हिंदू धर्माला शाप आहे.

मलाही आता असंच वाटू लागलाय

माम्लेदारचा पन्खा's picture

24 Oct 2013 - 8:35 pm | माम्लेदारचा पन्खा

अतिशय त्रासाने दिलेली शापवाणी खरी होते हे काही खरे वाटत नाही....

जर हे खरे असते तर आपल्या देशात सर्वसामान्यांचे शाप खरे होऊन न्यायाचे आणि कायद्याचे राज्य आले असते....