एका गारुड्याची गोष्ट ९: मण्यार: पडद्यामागचे कलाकार !
पण अभियांत्रिकीच्या व्हायवा च्या परीक्षकासारखे कधी या मण्यारीचे डोके सटकेल सांगता येत नाही. “आता माझी सटकली” म्हणत ती दंश करायला लागली की संपले सगळेच, शेतकऱ्याचे पूर्ण कुटुंब जमिनीवर झोपलेले आहे, आणि मण्यार घरात आली आणि काही कारण नसताना सगळ्या कुटुंबाला दंश करून गेली, कोणाचे हा-की-चू-नाही...आणि काम तमाम.
पर्वतीच्या जनता वसाहती मधून सकाळी ६:३० वाजता एक कॉल आला, मी आपला नेहमी सारखा टेकडी ओलांडून पाण्याच्या टाकीच्या बाजूने वसाहती मध्ये घुसलो. घराच्या बाहेर बेक्कार मोठी गर्दी, त्यात ४-५ बायका छातीपिटून रडत होत्या, मला आधी वाटले कोणी तरी माझा “बकरा” बनवला. पण तरी पण धीर करून त्या गर्दीत घुसलो. समोरचे दृश्य बघून फ्ल्याशब्याक माझ्या डोळ्या समोर आला, “हा तळीराम रात्री पहिल्या धारेची लावून आला असेल, आणि खोलीत जावून नेमका मण्यारी वरच बहुतेक पडला असेल, “मिशन काश्मीर मध्ये त्या अंधाऱ्या खोलीत जश्या गोळ्या चालतात” तसाच हल्ला त्या मण्यारने केला असेल. (त्याला पोटावर, आणि पाठीवर दंश होते.) श्वास असे पर्यंत थोडी झटपट पण केली असेल, पण “बेवडाच तो -आवाज करणारच”, यामुळे शेजाऱ्यांनी पण दुर्लक्ष केले असेल.” मी त्या घरात शोधले तर कॉट खालीच घुशीचे बीळ होते, खूप उकरून पहिले पण सगळी बिळे जोडली असल्यामुळे ती मण्यार पसार झाली होती.
जरा वेगळ्या शेड मधली चकचकीत काळी मण्यार.
मण्यारीचे विष हे नागाप्रमाणे मज्जासंस्थे वर हल्ला करते, म्हणजे मेंदुमधून जे आपले शरीर कार्यरत राहायला संदेशवहन चालते ते गंडवते. थोडक्यात म्हणजे जीमेल मध्ये असा व्हायरस टाकायचा की हळू हळू एक पण इमेल आपल्याला मिळणार नाही आणि शेवटी खाते बंद पडेल. मण्यार चावल्यावर, सुरवातीला श्वास घ्यायला त्रास व्हायला लागतो, मग हळू हळू ऐक-ऐक क्रिया बंद पडत, कार्डियाक अरेस्ट होऊन माणूस दगावतो.(भाग ५)
पण हे विष नागाच्या विषापेक्षा जास्त (~८ पट) जहाल असते, म्हणजे नागाचे विष “रेड वाईन” (~२५ प्रुफ) असेल तर “मण्यारीचे विष पहिल्या धारेची मोसंबी (२०० प्रुफ) असते. निसर्गाने या विषाची जहालता वाढवली आहे, याचे मुख्य कारण म्हणजे मण्यार रात्री शिकार करते, त्यामुळे कमीत कमी वेळात आणि तिच्या कक्षेत भक्ष टपकले पाहिजे. तसेच तिच्या खाण्यात इतर चपळ साप पण असतात, त्यामुळे “एका झटक्यात” कायमचा इलाज गरजेचा असतो. ( मण्यारीचे मुख्य भक्ष: उंदीर, पाली, सरडे, आणि साप इ.)
मण्यारीचे विष दंत छोटे असतात, त्यामुळे हे जहाल विष मोठ्या माणसाच्या शरीरात पसरायला वेळ लागतो, त्यामुळे “किडा मुंगी” चावली असेल, असे म्हणून रात्री दुर्लक्ष केले जाते, आणि जेंव्हा समजते तेंव्हा “अर्ध्या गोवऱ्या स्मशानात गेलेल्या असतात. त्यामुळे अजूनही प्रतिविष उपलब्ध असून माणूस दगावण्याचे प्रमाण ५०% आहे. व्हियेतनामच्या युद्धात अमेरिकेन सैनिक मण्यारीला “५ स्टेप स्नेक” म्हणायचे, मण्यार ने शॉट दिला की ५ पावलात मृत्यू. (वेट लॉस इन ३० डेज च्या चालीवर !)
मण्यारीची न्याहारी मोठा बेडूक.
आधी लिहल्या प्रमाणे, हा मण्यार हा डे-नाईट म्याचचा खेळाडू आहे, त्यामुळे दिवसा तो जरा आळसावलेला असतो. पण एकदा का फ्लड लाईट लागले की क्रिस गेलच्या बापाला पण ऐकत नाही. रात्री कॉल वर साप पकडताना मला मण्यार पकडताना खूप काळजी घ्यावी लागायची. “आपण सापाला डिवचल्याशिवाय साप कधी चावत नाही! ” या सर्पनियमाला हा साप म्हणजे अपवाद आहे. शेवटी जशी “कहानी” मधली शांत-सोज्वळ विद्या बालन उसळते (आणि मिलन दामजीला ढगात पोहोचवते !), तशीच शांत बसलेली मण्यार, काही आवाज न करता झटक्यात अंगावर आलेली मी अनुभवली आहे.
ज्यांनी कोणी विकास मनोहरांचे “नेगल” वाचले आहे त्यांना पट्टेरी मण्यार माहित असेल. ती साधरण दाट गडचिरोली, गोवा, दंडेली च्या दाट जंगलात सापडते (त्यामुळे माझा कधी संबध आला नाही.) ती खूप शांत असते, त्यामुळे गारुड्या कडे पण बघायला मिळू शकते. काळ्या-पिवळ्या रंगाचे सुंदर पट्टे असलेली ही मण्यार “आर्थर कानोन डायलला ” पण भुरळ टाकून गेली. त्यांनी शेरलॉक होम्सच्या “The Adventure of the Speckled Band” या गोष्टी मधून तिला सेलीब्रिटी बनवले. ज्या नियमाने जगण्यासाठी "सेम जॉब प्रोफाईलला" न्युयोर्क सारख्या (खर्चिक) शहरात पगार जास्त मिळतो, त्याच नैसर्गिक नियमाने जंगलात राहणाऱ्या पट्टेरी मण्यारीला आकाराने मोठी आणि चपळ भक्ष मारण्यासाठी साध्या मण्यारीपेक्षा जास्त जहाल विष निसर्गाने दिले आहे. पण जंगलात राहत असल्याने यांचा संबध फक्त आदिवासी किंवा सर्प संशोधकांशी येतो.
२००१ साली “जो स्लोवेन्स्क्की” नावाचा अमेरिकन सर्पसंशोधक म्यानमार मध्ये सापांवर संशोधन करत होता. एका पावसाळी रात्री, त्याला पट्टेरी मण्यारीचा दंश झाला. दाट जंगलात, वादळी हवामानात त्याला वैदकीय मदत मिळाली नाही, आणि त्याने सर्पसृष्टी साठी प्राण सोडला.
हीच ती शेरलॉक होम्स ची पट्टेरी मण्यार.
साधरणपणे मण्यारीचे कॉल माझ्या भागात कमी यायचे पण जे यायचे त्याला मी "झेड-लेव्हलची" काळजी घ्यायचो. “कमीत कमी वेळात साप पिशवीत गेला पाहिजे, सापाला दोन पिशव्यात प्याक करायचे, स्टिक शिवाय सापाला हात लावायचा नाही”. हे सगळे नियम कसोशीने पाळायचो. पुण्यासारख्या शहरात लोकं जास्ती करून वरती झोपत असल्याने, आणि हा साप जास्ती करून रात्री निघत असल्याने नागाच्या तुलनेत मण्यारीने होणारे दंशाचे प्रमाण कमी आहे.
पावसाळ्यात कोथळीगडावरच्या गुहेमध्ये आमच्या ट्रेक ग्रुप चा मुक्काम होता. साधारण करून आम्ही मेणबत्त्या घेऊन जायचो पण त्या वेळी विसरलो होतो, म्हणून बाजूच्या गुहेतून उदबत्त्या आणून त्याच्या प्रकाशात आम्ही गप्पा टाकल्या, बाहेर पाऊस “मी” म्हणत होता.
गुहा तश्या सेफ होत्या, आत मधल्या गुहेत थोडी वटवाघुळे होती, पण संध्याकाळीच ती डिनर साठी बाहेर उडून गेली होती. तसेच बाहेरच्या बाजूला दीड एक फुटाचा चौथरा होता, त्या वरतीच आम्ही आमचे बूट काढून ठेवले होते आणि दुसऱ्या दिवशी न्यायचा कचरा जमा करून (प्लास्टिक च्या पिशवीत) ठेवला होता. गुहेची बाहेरची पोकळी दगड लावून बंद केलीली होती. सगळ्यांचे डोळे मिटायला लागले तसे आम्ही पथाऱ्या टाकल्या, गारुडी असल्यामुळे बाहेरच्या बाजूला झोपलो. आमच्या एका मित्राचे आणि उंदरांचे बेक्कार वाकडे आहे, म्हणून तो झोपल्या-झोपल्या उंदराची आई-माई काढत होता, त्याच्या तालावरच मला झोप लागली.
२-३ च्या सुमाराला, एक मित्र ओरडला, “अरे साप”, मी कसाबसा चष्मा लावून पहिले, तर आमच्या पासून ३-४ फुटावर चौथऱ्यावर एक चकचकीत काळी मण्यार होती. सगळ्या मित्रांना ओरडून बाजूला केले, कोणालाच तो साप कुठला आहे हे माहित नव्हते, त्यामुळे साक्षात “काळ” समोर असूनही सगळे निवांत होते.
माझ्या कडे स्नेकस्टिक पण नव्हती, आणि शेकोटीच्या काडीने ती ४-५ फुटी संटी मण्यार पकडणे म्हणजे “राम नाम सत्य” याची मला पूर्ण पणे जाणीव होती. मी सगळ्यांना आधी दूर हालवले, आणि एका टोर्च च्या मंद प्रकाशात स्वतः चे अन्द्रेलीन काबूत ठेवत तिचे निरक्षण करू लागलो. रात्री आपण उठून जसे किचन मधले डबे झांबलतो, तशी ती निवांत दगडातल्या खोबण्या झांबलत होती. ती गुहा म्हणजे तिचे ‘अपना बाजार” होते, उंदीर आणि त्यांना खायला येणारे इतर साप, फुल दावत ! पुढचे ४ तास, उजाडे पर्यंत मी तिचे निरक्षण करत होतो, चौथऱ्यावरून ती जर खाली उतरली असती तर तिला पकडणे सोडा, मारणे पण शक्य झाले नसते. माझ्यातला गारुडी हा तिचा आदर करत असल्याचे तिला बहुतेक समजले असावे, ती आली तशी दगडात गायब झाली. नंतर मला एकट्यालाच नंतर शांत पणे झोप लागली.... ही एक माझ्या जीवनातील एक यशस्वी माघार होती.
पुढच्या लेखात घोणस आणि फुरसे...
(या लेखातले सर्व फोटो अंतरजालावरून घेतले आहेत.त्यांना कुठल्या पद्धतीने बदलण्यात आले नाही.)In reply to मस्त! by दादा कोंडके
आधी सापाला घाबरत नव्हतो पण ही मालिका वाचून घाबराय लागलोय+१०००००००
In reply to आधी सापाला घाबरत नव्हतो पण ही by माझीही शॅम्पेन
अर्धमेला झालेला साप, किंवा नुकताच मेलेला साप पण तेवढाच हानीकारक असतो. याचे ध्यान ठेवा !हे वाचून तर भितीने गाळणच काय चहाची किटलीसुद्धा उडाली. :(
In reply to हा ही लेख नेहमीप्रमाणे वाचनीय by मोदक
In reply to बापरे by चाणक्य
In reply to बापरे by चाणक्य
In reply to काटा काटा आला अंगावर वाचुन. by स्पंदना
In reply to खुसखुशीत आणि थरारक by पैसा
In reply to खुसखुशीत आणि थरारक by पैसा
In reply to खुसखुशीत आणि थरारक by पैसा
In reply to खुसखुशीत आणि थरारक by पैसा
In reply to आवडला. by नि३सोलपुरकर
In reply to काय जबरदस्त लेख! by आदूबाळ
In reply to मी वरती लिहिले आहे, की अंगावर by जॅक डनियल्स
In reply to 'अ पेक्युलिअर येलो बँड विथ by पिशी अबोली
In reply to पट्टेरी मण्यार च्या डोक्याकडे by जॅक डनियल्स
In reply to मोठ्ठा बेडूक कि 'डब्बल बेडूक'? ! by भाकरी
In reply to मोठ्ठा बेडूक कि 'डब्बल बेडूक'? ! by भाकरी
पण एकदा का फ्लड लाईट लागले की क्रिस गेलच्या बापाला पण ऐकत नाही. या लेखातले चौके छक्के पाहून हा लेखही रात्रीच्या पार्टीनंतर आलेल्या मूडाच्या फ्लड लाईटमध्ये लिहिलेला आहे असा अंदाज आहे ;).... लिखाणाचा अंदाज भयंकर आवडला !In reply to हाही लेख मस्तच!! by सूड
नाग म्हणजे सर्पसृष्टी मधला हृतिक असेल तर मण्यार म्हणजे पिउष मिश्रालै बेक्कर उपमा.. =)) सगळे नाग हृतिक ची सिग्नेचर स्टेप करतायत असं चित्र डोळ्यासमोर आलं... बाकी नाग चावल्यावर " एक पल का जीना , फिर तो है जाना" हे शब्दशः खरं करणार लेकाचे...!!!
In reply to नेहमीप्रमाणेच थरारक भाग. by एस
In reply to खूप वर्षांपूर्वी by एस
In reply to खूप वर्षांपूर्वी by एस
“आता माझी सटकली” म्हणत ती दंश करायला लागली की संपले सगळेच, शेतकऱ्याचे पूर्ण कुटुंब जमिनीवर झोपलेले आहे, आणि मण्यार घरात आली आणि काही कारण नसताना सगळ्या कुटुंबाला दंश करून गेली, कोणाचे हा-की-चू-नाही...आणि काम तमामवरील बाबतीत माझे मत थोडेसे वेगळे आहे. हि मते लष्करी प्रशिक्षण, वाचन आणि सर्पविष उपचार यातील अनुभव यावर आधारित आहेत. यात काही चूक असेल तर मला त्याबद्दल माहिती अद्ययावत करायला आवडेल. मण्यार हि जरी रात्री जास्त उत्साहात येत असली तरी ती उगाच कुणाला चावत नाही. अक्खे कुटुंब तिला बळी पडले हि फारच दुर्मिळ घटना असावी. साधारणपणे मण्यार हि पावसाळ्यात बिळात पाणी शिरले तर कोरड्या जागेच्या शोधात घरी घुसते वा उंदीर आणि दुसरा साप (होय दुसरे साप हे पण तिचे अन्न आहेत)यांच्या मागे ती घरात येते. एखादे वेळी फार थंडी असेल तर जमिनीवर झोपलेल्या माणसाच्या पांघरुणात उबेसाठी शिरते. त्यावेळी जर माणसाचा हात व पाय तिच्या अंगावर पडला तर ती प्रतिकारासाठी चावते. दुर्दैवाने मण्यारीच्या विषात फक्त मज्जासंस्था बधिर करणारी द्रव्ये असल्याने (रक्त किंवा उती विघटन करणारी(hemolytic ) द्रव्ये नसतात. त्यामुळे चावल्या जागी आग किंवा दुखणे होत नाही आणि डास किंवा किडा चावला आहे असे समजून माणूस गप्प झोपतो. त्यानंतर सकाळी एकतर तो सरळ स्वर्गात उठतो किंवा उठल्यावर सरळ बोलणे अशक्य झाल्याने लोकांना त्याचे बोलणे समजत नाही आणि ते समजेपर्यंत फार उशीर झालेला असतो. कोकणातील मुसलमान लोक खाटेवर झोपतात त्यामुळे त्यांच्यात मण्यार किंवा कांडार ) चावून मृत्यू होण्याचे प्रमाण अतिशय कमी आहे असे डॉक्टर हिम्मतराव बावस्करांचे (महाड आणि बिरवाडी येथील) अनुभव आहेत. मण्यार चावल्यावर इलाज न केल्यास मृत्युचे प्रमाण पन्नास ते सत्तर टक्के असते.हेच प्रमाण नागाच्या बाबतीत फक्त ६ ते १५ % आहे (सर्प दंश आणि सर्प विषबाधा या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. प्रत्येक दन्शात विषबाधा होईलच असे नाही आणि प्रत्येक विषबाधा हि जीवघेणी असेलच असे नाही). कारण मण्यारीचे विष वजनाच्या मानाने नागाच्या पेक्षा बरेच जास्त शक्तीचे असते आणि मण्यार जेंव्हा चावते तेंव्हा बर्याच वेळेस चावा पूर्ण करून बरेच विष आत उतरवते. शिवाय नंतर जखमेची फारशी आग न झाल्याने त्यावर उपचार केला जात नाही. मांजर किंवा मार्जार कुळातील इतर प्राणी यांची चपलता सापांपेक्षा जास्त असल्याने आणि त्यांची प्रीतीक्शिप्त क्रिया(reflexes) जास्त तीक्ष्ण असल्याने साप सहजासहजी मांजराना चावू शकत नाही.शिवाय मांजराना रात्री जास्त स्वच्छ दिसते आणि ऐकू येते. कोंकणात याचमुळे घरात मांजर पाळण्याची पद्धत आहे खालील दुवा पहा https://www.youtube.com/watch?vI379HHdy7ak= थंडी किंवा पावसात ट्रेकला जाताना शेकोटी पेटवण्यापेक्षा झोपेची पिशवी घेऊन जाणे जास्त सुरक्षित आहे कारण एकतर आपले सामान/ कपडे पेटण्याची शक्यता नाही आणि दुसरे त्या उबेसाठी साप किंवा उंदीर आणि त्यामागे साप हि शक्यता नाही. आपल्या झोपेच्या पिशवीमुळे आपले केवळ थंडीच नव्हे तर आग, किडे, विंचू आणि साप या सर्वांपासून संरक्षण होते
In reply to “आता माझी सटकली” म्हणत ती दंश by सुबोध खरे
In reply to “आता माझी सटकली” म्हणत ती दंश by सुबोध खरे
In reply to आता माझी फाटली by निनाद मुक्काम …
In reply to चायला...ट्रेकला जाउ कि नको by टवाळ कार्टा
In reply to सरळ आणि सोप्प्या शब्दात . by अद्द्या
In reply to धन्यवाद् ! by जॅक डनियल्स
In reply to धन्यवाद् ! by जॅक डनियल्स
अख्ख्या आयुष्यात तुम्हाला हा साप कधी दिसणार पण नाही
ऑ..??
जेडी - या वाक्याशी थोडासा असहमत.
मण्यारीने आतापर्यंत शहरातच तीन चारदा दर्शन दिले आहे. वरती सूडने उल्लेखलेला प्रसंग बालगंधर्व जवळच झाला होता. (मी आणि अत्रुप्त आत्मा त्या सापाचे फटू काढायला येड्यासारखे त्याच्या मागे पळत होतो - मोबाईलचा कॅमेरा ऑन करून. त्यावेळी हा लेख आणि मण्यारीच्या विषाची दाहकता माहिती नव्हती!!)
मण्यार वारंवार दिसण्यावरून पण काही अंधश्रद्धा / समज आहेत का..? ;-)In reply to अख्ख्या आयुष्यात तुम्हाला हा by मोदक
In reply to तुमचे भाग्य चांगले आहे की by जॅक डनियल्स
In reply to मण्यार सारखा साप चावल्या नंतर by माझीही शॅम्पेन
मण्यार सारखा साप चावल्या नंतर जखम साधारण पणे कशी दिसते ? हे महत्वाच आहे ?हे सांगणे खूप अवघड आहे, कारण जरी पुस्तकामध्ये जरी विषारी साप "असे दात लावतो !" असे दिले असेल तरी, तो प्रत्येक वेळी पूर्ण चावेलच असेल नाही, मृत्यू व्हायला घासून गेलेला दात पण पुरतो. उंचावर झोपणे, घराच्या बाजूला स्नेक त्रेन्चेस (एक खड्डा की ज्यातून साप आत येऊ शकणार नाही) आणि घराच्या आसपासचा परिसर खूप स्वच्छ ठेवणे हे काही उपाय आहेत.
In reply to (लेखकानी असही सुचवले होते की by सुबोध खरे

In reply to तिसऱ्या फोटोला झब्बू by टिल्लू
In reply to झक्कास लेख जे डी by मालोजीराव
मग काय त्यांचा उत्साहाचा पार मनमोहनसिंग झाला !हे वाचून हसताहसता माझा नवज्योतसिंग सिद्धू झाला =)) =)) =)) =))
In reply to मग काय त्यांचा उत्साहाचा पार by बॅटमॅन
In reply to झक्कास लेख जे डी by मालोजीराव
In reply to साधी मण्यार (४-५ फुट ) ही साधारण करून पुण्यात सापडते by जिन्क्स
"पुण्यात साधारण करून साधी मण्यार (४-५ फुट )सापडते "हो तसेच हवे होते...लिहिण्याच्या ओघात चूक झाली..
In reply to आमच्याकडे हाच मण्यार एका लहान by सँम (verified= न पडताळणी केलेला)
In reply to अतिशय दुर्दैवी घटना by उपाशी बोका
In reply to याला म्हणतात, सगळेच मुसळ by विश्वनाथ मेहेंदळे
मस्त!