माया ही पात्तळ-१"बेशर्त स्वीकृती"

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जे न देखे रवी...
13 Jul 2013 - 2:13 am

ढीश्श....क्लेमर!!! >>> आंम्हास तसे सर्व काही साधे सरळ रुचते,आणी पचतेही! वेळच आली तर,वेडे/वाकडेही पचवू कदाचित.,,,
पण... सरळ होणारे पदार्थ मुद्दाम कोणी जड करून खावयास दिले,आणी वरून मी सांगतो तितके वेळाच चाव,आणी मी म्हणतो तसेच गिळ! असे म्हटले तर ते आमच्या लेखी(इथे लिहायच्या नव्हे! ;) ) गिळगिळीतच होइल. म्हणून आंम्हास "त्यानी" जे सुचविले,ते यांना बोधप्रद होवो,अशी "जड" प्रस्तावना करून ही जिल्बी तळायला-सोडत आहे. तिचा बाकिच्यांनीही आस्वाद घ्यावा..असे मी सांगतो.
अता हिची(ही) "बेशर्त स्वीकृती" होते का?-ते पहायचं!

माया ही पात्तळ आत नाही विठ्ठल ।
सांगतो केवळ आत्मरंग ॥१॥

पाव-बटर-चहा भूकेलागी खावे ।
म्हणावे का त्यासी ब्रेकं....फाश्टं ? ॥२॥

फुलं-पाखरू ते..आधी सुरवंट ।
हिशेब तो साधा निसर्गाचा ॥३॥

ध्यान मन पूजा सरळ आनंद ।
हाची बेशर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्त शोभतसे ॥४॥

सरळ मनाचा चोळामोळा केला ।
अर्थ' कोठे गेला(?) आपणं(ही) कोठे? ॥५॥

देखोनी चर्चा ही हेची आले मनीं ।
खर्‍या आत्मज्ञाना,साधी बोली ॥६॥

कॉकटेल रेसिपीहास्यसंस्कृतीधर्मविडंबनमौजमजा

प्रतिक्रिया

अर्धवटराव's picture

13 Jul 2013 - 2:49 am | अर्धवटराव

बुवांची काव्यप्रतिभा काय वर्णावी महाराज...

अर्धवटराव

रामपुरी's picture

13 Jul 2013 - 3:34 am | रामपुरी

सांख्य आणि भक्ती यात तुमचा गोंधळ झाला आहे. स्वाभाविकच आहे. तुम्ही तुमच्या मनाचे पूर्णपणे विश्लेषण केलेच नाहीये. "मी" सांगतो तसं एकदा करून पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की माया हा भ्रम आहे. मनापासून मुक्त होण्याचा मार्ग फक्त "मी" सांगतो तोच आहे आणि या विश्वातील प्रत्येकाने मनापासून मुक्ती मिळवलीच पाहीजे. मग बघा जीवनात कशी मजा येते ते. स्वानुभवाने सांगतो, तुम्ही काहीही म्हणा मी निश्चिंत आहे. पाव-बटर-चहा भूकेलागी खावे हे तुम्ही सकाळी उठल्यावर ब्रेकं....फाश्टं ची वेळ झाली म्हणून खाता. तसे न करता मी सांगतो तसे कष्ट करून भूक लागल्यावर खाल्ले तर क्या बात है. तुम्हाला रोज तो अनुभव घ्यावासा वाटेल.
पुढच्या ओळीत तुम्ही म्हणता फुलं-पाखरू ते..आधी सुरवंट. हे निखालस चूक आहे. "मी" म्हणतो आधी फुलपाखरू. कारण त्याशिवाय सुरवंट संभवतच नाही.
ध्यान आणि पूजा हे निरर्थक आहे त्यामुळे पुढचे सर्व निरर्थक ठरते.
सरळ मनाचा तुम्ही चोळामोळा केला आहे त्यावरून तुमची मानसिक अवस्था "मी" जाणू शकतो. चर्चा सकारात्मक होण्यासाठी ती "मी" म्हणतो त्याच दिशेने गेली पाहीजे.
तेव्हां शेवटच्या ओळीतले तुम्ही म्हणता ते आत्मज्ञान तुम्हाला झालेले नाही हे स्पष्ट आहे. "माझा" प्रतिसाद नीट वाचलात तर ते तुमच्या सहज लक्षात येईल.
थोडक्यात "मी" म्हणातो त्या मार्गाने चर्चा जात नसेल तर हे सर्व व्यर्थ आहे.

अत्रुप्त आत्मा's picture

13 Jul 2013 - 9:43 am | अत्रुप्त आत्मा

तुमचे मला पटले. ;-)
अता माझे तुम्हाला पटेल का? =))

तुमची माझी इच्छा, तो "राम" पुरि करो...अशी माझ्या मनाची प्रार्थना! =))

कवितानागेश's picture

13 Jul 2013 - 11:54 pm | कवितानागेश

जमलय, जमलय!! =))

बॅटमॅन's picture

14 Jul 2013 - 12:09 am | बॅटमॅन

+१०^१००!!!!!

अगदी पर्फेक्ट जमलंय!!!

पैसा's picture

13 Jul 2013 - 9:45 am | पैसा

समजून घेण्यासाठी प्रिंट ऑट काढत आहे. :-/

अत्रुप्त आत्मा's picture

13 Jul 2013 - 10:00 am | अत्रुप्त आत्मा

मग...??? :P
नैच कळायला पायजे! =))

स्पा's picture

13 Jul 2013 - 10:02 am | स्पा

चान जिलबी

चौकटराजा's picture

13 Jul 2013 - 10:23 am | चौकटराजा

अध्यात्माची जिलबी , "अहं"चा च मट्ठा
मीच वस्त्ताद आणि मीच आहे पट्ठा

तुम्ही काय सांगता साध्या बोलीची गरिमा
क्लिष्टतेत खरा आहे ज्ञानीयांचा महिमा

टाके जिलबी आता त्यागून मस्त कविता
आत्मज्ञान आले खरे बुवांस पै आता

बुबा यापेक्षा जास्त काही येत नाही हो. आमचा ष्टॉक लय मर्यादित हाय !

सस्नेह's picture

13 Jul 2013 - 1:36 pm | सस्नेह

__/\__ !!

कवितानागेश's picture

13 Jul 2013 - 11:53 pm | कवितानागेश

चौराकाका, तुम्हेसुद्धा!! =))

जिलबिच्या शेवटच्या टोका पासुन मागोवा काढण्यास सुरवात करावी म्हणजे तीच्या गोलाईची मूळ सुरुवात कुठुन सुरु झाली हे एकदा कळेल आणि एकदा कळले की तुम्हाला समजेल ही गोल गोल जिलबी नसुन फक्त भ्रम आहे. ;)

(अत्रुप्त प्रेमी) ;)

अत्रुप्त आत्मा's picture

13 Jul 2013 - 10:50 am | अत्रुप्त आत्मा

@ही गोल गोल जिलबी नसुन फक्त भ्रम आहे. >>> http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-044.gif काय मोडलीये राव!!!

चेतन माने's picture

13 Jul 2013 - 11:02 am | चेतन माने

मस्त आत्मा जी ……. प्रतिसाद पण एकेक खतरनाक आलेत ;)
(हे असले हल्ले वारंवार झाले तरी आपण त्यांच्याकडे लक्ष देत नाही!!!)
:D:D:D

जेपी's picture

13 Jul 2013 - 11:25 am | जेपी

या जिलबी सोबत मठ्ठा पाहिजे होता :-)

प्रभाकर पेठकर's picture

13 Jul 2013 - 1:48 pm | प्रभाकर पेठकर

नीट मनापासून पाहिलेत तर 'मठ्ठा' ची कलाकृती आजूबाजूलाच सापडेल.

=)) =)) =)) =)) ग्रेट अन्वेषक पेठकर काका.
पण गुर्जी तुम्हाला काय होतंय सध्या? असं का करता? काळजी घ्या हो जरा ;)

अत्रुप्त आत्मा's picture

13 Jul 2013 - 2:48 pm | अत्रुप्त आत्मा

जी...काळबा!!! :p

=)) =)) =))

छिद्रान्वेषी पेठकरकाका, सादर प्रणाम _/\_

कवितानागेश's picture

13 Jul 2013 - 11:59 pm | कवितानागेश

बुवा,
मला पाव-बटर-चहा!
मला तितकंच कळतय! ;) बाकीचं कळण्याइतकी मला समजच नाही मुळी.
- (अज्ञानाच्या अन्धःकारात मायेचं पांघरुण गुरफटून झोपलेली)माउ

अत्रुप्त आत्मा's picture

14 Jul 2013 - 1:51 pm | अत्रुप्त आत्मा

माऊ... माऊ... गुर्रर्रर्र...माऊ! =))

उगाचेची शब्द, नसत्या करामती
फाटकी संस्कृती.. ’वीट’लेली.

सर्व जन भ्रमी, मीच केवळ ज्ञानी
सतत हेची जनी, आळवावे..

एक पालुपद स्विकृती बिनशर्त
जगणे होई मस्त... मस्तवाल!

सांगोनी जे गेले संत-ज्ञानी काही
त्यांना काही नाही, अनुभव.

मीच घेतलाहे अनुभवाचा ठेका
हाच माझा हेका.. सांगतोय.

म्हणोन राघवा ऐक बोल माझे
ढोल अनुभवाचे.. बडवलेले.

अत्रुप्त आत्मा's picture

14 Jul 2013 - 9:06 pm | अत्रुप्त आत्मा

रघु भाय... ऐकत नाय... =))
येक नंबर !!! :-D

यशोधरा's picture

14 Jul 2013 - 5:51 pm | यशोधरा

देवा रे! सगळेच सुटलेत! =))

प्रभाकर पेठकर's picture

14 Jul 2013 - 6:34 pm | प्रभाकर पेठकर

सर्वांच्या सहनशीलतेचा अंत पाहीला की आणखिन काय होणार?

मनाला विचारा बरं हा प्रश्न! :P

प्रभाकर पेठकर's picture

15 Jul 2013 - 2:18 pm | प्रभाकर पेठकर

पण त्यासाठी तुम्हाला मनाच्या ताब्यात असलेल लगाम स्वतःच्या हाती घ्यावा लागेल. मी आणि मन ह्या दोन भिन्न गोष्टी आहेत. बहुतेक जणं स्वत;लाच मन समजतात आणि सर्व घोळ होतो. मनापासून मुक्त व्हा आणि मनात येणारे विचार नियंत्रित करा. अनुभवातून लिहीतो आहे त्यामुळे त्यात काही चुक असण्याची शक्यता संभवतच नाही.

हुश्शः... नाही जमत बुवा अनाकलनिय लिखाण. बेशर्त शरणांगती.

पेठकरकाका, मिपावर मन म्हणून आयडी होता ना? त्याने लगाम धरलाय का? :P

मला ते दोन माणसांचं लिहीलेलं 'ए क अ क्ष र सु द्धा' कळत नाय ब्वा.
एक 'माझं' नि दुसरे ते यु जी कृष्णमूर्तींचं.

काय क्रावं ब्रं?

निवेदिता-ताई's picture

14 Jul 2013 - 7:08 pm | निवेदिता-ताई

मस्त

मध्यंतरी लैच गंभीर मोड मध्ये गेलेले जुने बुवा आता परत दिसायाले लागलेत.

मजा आली वाचून.

मोदक's picture

15 Jul 2013 - 10:39 am | मोदक

"मला" याचा अर्थ कोणीतरी समजावून सांगेल काय..?

अवतार's picture

15 Jul 2013 - 11:06 am | अवतार

बेशर्त स्वीकृतीचा आग्रह धरणाऱ्या भ्रमराला एकही प्रतिसाद न देता ह्या धाग्याची बेशर्त स्वीकृती करणे जमेल काय?

आत्मास झाले बघा आत्मज्ञान, पुढला ज्ञानियाचा राजा आत्मा तोच. बोला अ आत्मा ह्यांचा विजय असो.

बाळ सप्रे's picture

15 Jul 2013 - 2:58 pm | बाळ सप्रे

सगळ्यांनी नीट न वाचताच प्रतिसाद द्यायची घाई केली आहे!!

अत्रुप्त आत्मा's picture

15 Jul 2013 - 8:27 pm | अत्रुप्त आत्मा

नको रे नको भगवंता... हा उप-हास =))
आज हसून हसून मरणार...!!! प्रचंड म्हणजे प्रचंड उपहास होतोय...तरी "तो" शरणा गती स्विकारायला तयार होत नाही!!! =))

@पेठकर काका>>> हुश्शः...नाही जमत बुवा अनाकलनिय लिखाण.बेशर्त शरणांगती.>>> http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-060.gif नको हो नको! http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-060.gif

@अवतार>>> बेशर्त स्वीकृतीचा आग्रह धरणाऱ्या भ्रमराला एकही प्रतिसाद न देता ह्या धाग्याची बेशर्त स्वीकृती करणे जमेल काय?>>>>>> http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-044.gif अवतारबाबा की जय http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-044.gif

@निश>>> बोला अ आत्मा ह्यांचा विजय असो. >>> विजय असो...!!! विजय असो...!!! ( मीच माझं कौतिक करायच नाय...तर,दुसरं कोण करणार!!! :p ....)

@बाळ सप्रे>>> सगळ्यांनी नीट न वाचताच प्रतिसाद द्यायची घाई केली आहे!! >>> http://www.sherv.net/cm/emo/laughing/laughing-out-loud-smiley-emoticon.gif