मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

हौशी चित्रकला - काही रंगचित्रे

विसुनाना · · कलादालन
नमस्कार, माझी पत्नी सुवर्णा एक हौशी चित्रकार आहे. बर्‍याच वर्षांपूर्वी तिनं चित्रकलेचा एक लहानसा कोर्स केला होता. तेव्हापासून ती अधूनमधून चित्रे काढत असते. आमचं घर म्हणजे तिच्या चित्रांचं एक छोटं प्रदर्शनच आहे. ;) ती अधूनमधून मिपावरची चित्रे पहात असते. (शार्दूल कदमांची चित्रं पाहून ती थक्क झाली.) संगणक/ आंतरजाल/ मराठी कळदाबी यापासून ती दूर असल्याने तिच्यावतीने मी तिची चित्रे चिकटवत आहे. तिनं काही प्रख्यात चित्रकारांची चित्रं नकलली आहेत तर काही चित्रं लोककला स्वरूपाची आहेत. बघा, तुम्हाला कशी वाटतात - (मूळ चित्रकार - राजा रविवर्मा . अ वूमन होल्डिंग अ फ्रूट .ऑईल ऑन कॅन्वास.पोर्ट्रेट १.५ फूट * २फूट)
From Suwarna's Paintings
(मूळ चित्रकार - जॉन पाईक . ऑपेरा हाऊस. वॉटरकलर,इंप्रेशनिस्ट १.५ फूट * २ फूट )
From Suwarna's Paintings
(मूळ चित्रकार - रॉजर डिसोटर . इन द स्ट्रेट ऑफ मॅगेलन .ऑईल ऑन कॅन्वास.२ फूट * ३ फूट)
From Suwarna's Paitings
राधाकृष्ण जलविहार - ओरिसा पटचित्र.. पोस्टरकलर २ फूट * १ फूट
From Suwarna's Paintings
राधाकृष्ण बासरीवादन - भारतीय मिनिएचर .. पोस्टरकलर १फूट * १.५ फूट
From Suwarna's Paintings
चित्रांवर टिचकी मारल्यास मोठी चित्रे पाहता येतील.
लेखनविषय:

वाचन 18138 प्रतिक्रिया 37