मिसळलेला काव्यप्रेमी यांनी लहानपणीचा आठवणींचा पेटारा उघडलाच आहे तर त्याच अनुषंगाने. आत्ता आचानक मुकद्दर का सिकंदर मधले 'ओ साथी रे...तेरे बीना भी क्या जीना' गाणे मी ऐकले आणि लिहावेसे वाटले.
हे गाणे ऐकले आणि मला लहानपणी उन्हाळ्याचा सुट्टीत वाड्यात सगळे एकत्र खेळायचो ते दिवस आठवले. तेंव्हा हा चित्रपट आणि हे गाणे खुपच फेमस झाले होते आणि सतत कानावर पडत असे. हे गाणे आंणि ते दिवस याची मन आपोआपच सांगड घालते. तेंव्हा एकत्र घालवलेले ते क्षण ते सवंगडी यांची आठवण येते. आता ते सवंगडी बरोबर नसले ते दिवस नसले तरी हे गाणे ऐकले की ते सगळे स्पष्ट डोळ्यासमोर उभे रहाते.
प्रत्येकाचा मनात एखाद्या गाण्याचे विशेष स्थान असते. गाणे कोणतेही असो ते विशिष्ट गाणे ऐकले की मन प्रसन्न होते, गहिवरते, आठवणींचा जगात नेते असे एक तरी गाणे प्रत्येकाचा आयुष्यात असतेच. ते आपल्याला वेगळ्याच जगात घेऊन जाते. त्याचे आपल्याशी जोडलेले नाते कधीच तुटत नाही. अस आठवणीतले गाणे ‘माझे गाणे’ असे आपल्याला वाटते. आपण ते कधी कोणासमोर व्यक्त केलेले असते कधी नसते. ते गाणे एकदम कुठे ऐकले की आपण स्तब्ध होतो काही क्षणापुरते का होईना भावनीक होतो. ‘असे आठवणीतले गाणे’ मी तुमचा बरोबर शेअर करते आहे.. तुम्ही पण तुमच्या मनातील तुमचे ते विशेष गाणे शेअर करा…
प्रतिक्रिया
30 Jan 2013 - 8:31 am | श्रीरंग_जोशी
हे गाणे आम्हाला पहिलीत असताना म्हणवले जात असे. त्याचे बोल आठवले की आजही रोमांच उभे राहते...
या धाग्यामूळे चित्रफीत प्रथमच पाहिली पण तो परिणाम मात्र अजिबात जाणवला नाही...
30 Jan 2013 - 8:59 am | किसन शिंदे
चाळीतल्या आमच्या घराशेजारी एक काका राहायचे त्यांच्याकडे भालजी पेंढारकरांच्या सगळ्या चित्रपटांच्या गाण्याच्या कॅसेट्स होत्या. येता जाता ती सगळी गाणी कानावर पडली अनं मनात कुठेतरी खुप खोलवर रूजली. केव्हाही जावं आणि टेपरेकॉर्डर चालू करून ती गाणी ऐकावीत. 'वाट पाहूनी जीव शिणला' किंवा 'अखेरचा हा तुला दंडवत' सारखी सगळी आर्त गाणी त्या लहान वयातही प्रचंड आवडू लागली होती. आज भालजीं पेंढारकरांच्या कुठल्याही चित्रपटातलं कोणतंही गाणं ऐकलं कि ते काका आणि त्यांच्याजवळ असलेल्या भालजी पेंढारकरांच्या चित्रपटाच्या बहुमोल अश्या कॅसेट्स आठवतात.
अंवातराबद्दल क्षमस्व पण..
हे वाचलं अनं आम्हाला गविंच मुकंदर का सिकंदर? हे आठवलं. :)
30 Jan 2013 - 10:30 am | ह भ प
तूनळी वर जाऊन आवडत्या गाण्याची ध्वनीचित्रफीत शोधून मग बघण्यापेक्षा हा धागा सतत बघितला तरी हौस भागवता येईल.. धन्स अक्षयाजी... :)
30 Jan 2013 - 10:45 am | इनिगोय
गाणी सदोदित ऐकत असल्याने गाण्याशी जोडलेल्या आठवणी म्हणण्यापेक्षा प्रत्येक आठवणीशी जोडलेलं एक गाणं सापडेल :)
कधीही गाणं गात नसताना एका घरगुती कार्यक्रमात कोणत्याही पूर्वतयारीशिवाय 'या जन्मावर या जगण्यावर' गायलं होतं. आजही ते ऐकलं की त्यावेळी जगण्यावर खरोखरच दाटून आलेलं प्रेम आणि त्यामुळे मनापासून गायलं गेलेलं ते गाणं जसंच्या तसं आठवतं.
'स्वये श्रीराम प्रभू ऐकती' चे सूर कानावर पडले की मुंबईत झालेला बाबुजींचा सत्कार आठवतो. त्यावेळी स्वाक्षरी घेताना अगदी जवळून दिसलेले कर्मयोगी बाबूजी आठवतात.
ही आणि अशी अनेक..
30 Jan 2013 - 5:03 pm | प्रभाकर पेठकर
पूर्वीच्या काळी माध्यमि़क शालान्त परीक्षेचे निकाल वर्तमानपत्रात छापून यायचे. आपला आसन क्रमांक त्यात शोधताना हृदय धडधडायचं. वर्तमानपत्र घरपोच असले तरी तो पर्यंत धीर निघायचा नाही. रेल्वे स्थानकावर जाऊन आपला वर्तमानपत्रवाला हुडकून आपले वर्तमानपत्र त्याच्याकडून ताब्यात घ्यायचे आणि धडधडत्या छातीने आसन क्रमांक शोधायचा. असा तणावपूर्ण प्रसंग असायचा. माझा आसनक्रमांक शोधताना शेजारच्या उपहारगृहातील रेडियोवर 'रूप तेरा मस्ताना, प्यार मेरा दिवाना भूल कोई हमसे ना हो जाएSSSSS' असे आराधना चित्रपटाचे गाणे लागले होते. वर्तमानपत्रात निकाल पाहिला आणि माझ्याकडून कोणतीही (अभ्यासाच्या बाबतीत) 'भूल' झाली नाही हे सांगायला घराकडे धूम ठोकली होती.
11 Feb 2013 - 11:33 pm | मूकवाचक
18 Feb 2013 - 5:44 pm | स्वप्निल घायाळ
One song I recall is not from any movie but one of my favorite Serial "Friends"
This song reminds me of my college days...
20 Feb 2013 - 11:39 am | आप्पा
http://www.youtube.com/watch?v=7rzWRxTFcuA
20 Feb 2013 - 11:50 am | अक्षया
20 Feb 2013 - 12:25 pm | नानबा
डायरेक्ट युट्युब ची लिंक इकडे कशी देतात? मी लिंक देतोय तर पेज चा पत्ता दाखवतो इकडे. :(
20 Feb 2013 - 12:40 pm | अक्षया
तिथे 'शेअर' बटण वर क्लिक करा मग 'एंबेड' वर क्लिक करा. तिथे जी लिंक येईल ती इथे पोस्ट करा म्हणजे व्हिडिओ दिसेल. :)
23 Feb 2013 - 5:59 pm | ग्रेटथिन्कर
खाली अक्षयाने सांगितलेच आहे, फक्त FULL HTML सिलेक्ट करा.
20 Feb 2013 - 11:49 pm | खटासि खट
ते गाणं सुंदर वगैरे असतं असं नाही, पण तरीही आपल्यासाठी खास असतं. बालपणीच्या स्मृतींना उजाळा देणारी गोष्ट गहीवर आणतेच..
21 Feb 2013 - 10:36 am | अक्षया
आठवणींमुळे ते गाणे आपल्याला जवळचे वाटते.
21 Feb 2013 - 10:53 am | पैसा
नेमकं कोणतं गाणं घ्यावं आणि कोणाला मागे ठेवावे हे निश्चित करता येणार नाही. पण लहान असताना रात्रीच्या वेळी आईची सगळी कामं आटपली की आम्ही घराच्या अंगणात बसून रेडिओवर विविधभारतीवरची गाणी ऐकत असू ते लख्ख डोळ्यासमोर उभं राहिलं. गावातलं घर. भोवताली आंब्याची नारळाची झाडं, बाजूला दोणीतल्या पाण्याचा थंडावा आणि घराच्या लाकडी रेज्यांतून येणारा अर्धवट उजेड. त्या उजेडात घर हसतंय असं वाटायचं आणि या सगळ्या उबदार वातावरणात वडिलांना चिकटून बसलेली आम्ही भावंडं...
21 Feb 2013 - 11:00 am | गवि
बास गो पैसाताई आता.. फारच आठवणी येतात.
आता विश्वास बसत नाही की कधीतरी आपण भरलेल्या डोणीत डुंबत बसण्याइतके लहान होतो.
21 Feb 2013 - 11:04 am | अक्षया
आठवण फार छान लिहिलीत पैसाताई..
धन्यवाद. :)
21 Feb 2013 - 11:37 am | kanchanbari
आभारी आहोत अक्षया ता,आवडती गाणी असंख्य आहे पण
http://youtu.be/EvdTOHZHQEA हे गाण मनाला निरागस बाळाची आठवण करुन देते
मन उधान उधान
त्याले नाही कशाची सर
गाणे आठवनीतले सारे
वाहे काळ्जाचे नीर
23 Feb 2013 - 5:23 pm | अस्मी
अक्षया, छान धागा.
आठवणीतील गाणी तशी खूप आहेत. त्यातील एक म्हणजे कॉलेजला जातानाची.
कॉलेजला जाताना सकाळी लवकर एसटी ने जावं लागायचं, तेव्हा गाडीतली सगळीजणं आजूबाजूच्या गावातील आणि तशी ओळखीची होती. आमची गाडी पण तशी खासंच होती :) टीपिकल एसटी; तिला त्या गणपतीतल्या सजवायच्या माळा लावलेल्या आणि तिचं नाव ठेवलेलं 'धाडस'!! कारण त्या गाडीच्या मागे तसं लिहीलेलं होतं :P आमच्या धाडसमध्ये एक टेपरेकॉर्डर होता आणि त्यावर रोज एकच गाणं लावलेलं असायचं...तेच रोज म्हणत, ऐकत आम्ही ३ वर्ष प्रवास केला...
ते गाडीत लोंबकळत म्हणलेलं ते (पूर्ण पाठ झालेलं ;)) गाणं 'छोटा सफर हो..लंबा सफर हो सूनी डगर हो या मेला...' अजूनही लक्षात आहे...
धन्यवाद अक्षया...आज त्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या.
27 Feb 2013 - 10:39 am | अक्षया
छान आठवण शेअर केल्या बद्द्ल धन्यवाद.
तीन वर्षे रोज एकच गाणे ऐकणे म्हणजे चांगलेच धाडस आहे. :)
23 Feb 2013 - 5:54 pm | रमेश आठवले
संगीताचा आनंद हा पुन्हप्रत्ययाचा आनंद असतो असे म्हणतात. मला सचिनदेव बर्मन यांचे गायलेले किंवा संगीत बद्ध केलेले गाणे पहिल्या ऐकण्यात विशेष आवडत नसे परंतु ते जसे जसे पुन्हा पुन्हा ऐकावे तसे तसे जास्त मधुर वाटत जाते.
23 Feb 2013 - 9:01 pm | फिरंगी
अमरप्रेम मधील सर्व गाणी अशीच आठवणीत ठेवणयाजोगी आहेत
27 May 2013 - 8:28 pm | पैसा
आदुबाळ आणि मदनबाण यांच्यासाठी हा धागा खास.
सोबत मला आवडणारं एक गाणं इथे देतेय. "जॉनी मेरा नाम" सिनेमातलं. सिनेमा क्लायमॅक्सकडे जातानाचं. लताचे सूर पकड घेणारे आहेतच. पण हेमामालिनीच्या डौलदार नृत्यामुळे तितकंच प्रेक्षणीय. "चुप चुप मीरा रोये"
27 May 2013 - 8:39 pm | मदनबाण
ठांकु ठांकु...
माझ्या गाण्यांच्या यादीची सुरुवात या गाण्यापासुन करतो... ;)
27 May 2013 - 8:50 pm | मदनबाण
हे वरील गाणं मला विशेष आवडतं कारण या गाण्यातल्या काही लोकेशन्सवर मी फिरलो आहे,आणि फोटु सुद्धा काढले आहेत. गाण्यात दिसणार्या फुलांचे देखील्,तलावाचे देखील.गाणं आवडतं याच्या अनेक कारणां पैकी हे एक. :)
27 May 2013 - 9:32 pm | इनिगोय
क्या बात!
27 May 2013 - 9:30 pm | आदूबाळ
वाद्यसंगीत आणि कंठसंगीताची जुगलबंदी नेहेमीच रंगते असं नाही. कंठसंगीत श्रोत्याला चट्कन अपील होतं. त्यामानाने वाद्यसंगीत अॅबस्ट्रॅक्ट असतं. अशा जुगलबंदीत बर्याचदा गायकाला जास्त दाद मिळते आणि वादक नकळत 'साथ करणार्याच्या' भूमिकेत जातो. तो नाजूक तोल सांभाळणं सगळ्यांनाच जमत नाही.
असा उत्तम समतोल असलेलं हे एक गाणं/वाजवणं. "बाजो रे मौंदरवा" ही शुद्ध कल्याण रागातली एक प्रसिद्ध बंदिश आहे. गायक आहेत जयतीर्थ मेवुंडी आणि बासरीवादक आहेत प्रवीण गोडखिंडी.
27 May 2013 - 10:59 pm | रमेश आठवले
अप्रतिम जुगलबंदी
27 May 2013 - 9:40 pm | इनिगोय
हे माझं आवडतं गाणं. किशोरसाठी, अमिताभसाठी.
आणि एके काळी मुंबईला आणखी देखणी बनवत बरसणार्या देखण्या पावसासाठी..
28 May 2013 - 9:50 am | कोमल
पाऊस सुरू झाला की सर्वात पहिल्यांदा हेच गाणं मनात झंकारू लागतं.. :)
29 May 2013 - 11:49 am | मोदक
हे आमच्या पिढीतले ;-)
27 May 2013 - 11:00 pm | मदनबाण
लहानपणी हा सिनेमा पाहिला होता (शेहनषाह)तेव्हा हे गाणं पाहिल होत ते कायम लक्षात राहिल्.यातल संगीत्,आणि टाळ्यांचा गाण्यात केलेला वापर मला फार आवडले. या गाण्याचे लोकेशन सुद्धा मला फिरायला मिळाले. :)
ज्या तलावात अमिताभ आणि मिनाक्षी यांनी बोटींग केले,त्याच तलावात मी सुद्धा बोटींग केले.
काही क्षण टिपलेले... २ (Pykara Lake १ )
काही क्षण टिपलेले... ३ (Pykara Lake २ )
हे वरचे फोटो खालच्या गाण्यात शोधा... ;)
28 May 2013 - 8:31 am | मदनबाण
खुदा गवाह या चित्रपटातील मला २ गाणी जास्त आवडतात... एक म्हणजे तू न जा रे मेरे बादशाह आणि दुसरे म्हणजे तू मुझे कबुल.हे गाणं तस बर्यापैकी मोठं आहे,या गाण्यातली एक ओळ फार आवडते,ती अशी :-हो कोई गुलाम चाहे बादशाह इश्क के बिगर जिंदगी गुनाहं.
हा चित्रपट म्हणे काबुल मधे सलग १० आठवडे हाउसफुल चालला होता. :)
28 May 2013 - 8:58 am | मदनबाण
हे गाणं आवडायला काही वेगळ कारण हवं ?
28 May 2013 - 9:16 am | मदनबाण
किशोर कुमार यांनी गायलेली ही दोन गाणी १) जब चाहा यारा तुमने आखाँ से मारा तुमने २) जितने भी करले सितम.
जितने भी करले सितम याची २ व्हर्जनस आहेत. एक किशोरदांनी गायलेले आणि दुसरे आशा भोसले यांनी गायलेले.दोन्ही इथे देत आहे,पण यातील मला किशोर कुमार यांनीच गायलेल आहे...हे गाण जरा जास्त वेगवान आहे.संगीत तर अफलातुन !
28 May 2013 - 9:31 am | मदनबाण
संजुबाबा सध्या जेलयात्रेवर आहेत्,त्याच्या पहिल्या चित्रपटातील हे गाणं मात्र फार आवडतं.
28 May 2013 - 9:45 am | मदनबाण
वरील गाण्याचे बोल आहेत क्या यही प्यार आहे... असेच पण संपूर्ण वेगळे गाणं माझं आवडतं आहे... जरास संथ पण क्या यही प्यार है ? हेच विचारणार ! ;) हे गाणं कमाल खान ने गायलं आहे. हो हाच तो कमाल खान ज्याने ओ ओ जाने जाने जाना गायलं आहे. गाणं फक्त ३ मिनीटांच आहे,तरी मला आवडतं. तेरा मेरा प्यार ! ;)
तेरा मेरा प्यार अमर... हे अप्रतिम गाण तर सगळ्यांनाच ठावुक आहे पण कुमार सानु यांनी गायलेल एक गोड गाणं मला फार आवडतं... गाण तर सुंदरच आहे, पण व्हिडीयो देखील तितकाच सुंदर आहे. यातला गिटारचा वापर मला फारच आवडला.
आता वरती जराशी २ संथ गाणी दिल्यावर एक वेगवान गाणं इथे दिल्या शिवाय मला राहवत नाही.
तूम बीन या चित्रपटातलं सुरु रु रु हे गाणं आवडण्यासारखचं आहे.
28 May 2013 - 9:52 am | कोमल
खूपच भारी खजीना मिळाला आहे असं वाटत आहे.. आणि मबा त्यात एक एक रत्नं वाढवत जात आहेत..
मी पण येते माझ्या आठवणींतिल गाणी घेऊन.. :)
28 May 2013 - 10:45 am | मीउमेश
तसा मी काहि नविन गाण्याचा शौकीन नाहि, पण रंग दे बसंती चित्रपटातले तु बिन बताए मुझे ले चल कही हे गाण काळिजाचे तुकडे तुकडे करुन टाकतॅ. डोळ्यातुन पाणी आल्याशिवाय राह्त नाही.
प्रत्तेकाच एखादे गाण आवड्ण्यासाटी काहितरि कारण असतच!
28 May 2013 - 10:58 am | रमेश आठवले
आपआपल्या फर्माईश ची गाणी सर्वजण देत आहेत. त्यातच हे माझे योगदान -
अब्दुल करीमखान यांनी अजरामर करून ठेवलेली आणि किराणा घराण्याची खास मानली जाणारी ही प्रसिद्ध ठुमरी कुमार गंधर्व यांनी १९७५ च्या सवाई गंधर्व सम्मेलनात खास गायला निवडली होती. भीमसेन जोशी रसिकांमध्ये बसून ऐकताना दिसतात.
https://www.youtube.com/watch?v=_wq_HaTqkTM
28 May 2013 - 11:09 am | मदनबाण
आता जरा साउथ ट्रॅक पकडावा म्हणतो... गाणी कुठल्याही भाषेतली असोत देशातली असोत ती मला आवडतात. :)
28 May 2013 - 11:28 am | अक्षया
वाह !! एका पेक्षा एक छान गाणी शेअर करता आहात सगळे..
अजुन येवुद्यात. :)
28 May 2013 - 5:22 pm | पूनम शर्मा
mujhse juda hokar mp3 download
28 May 2013 - 6:05 pm | मदनबाण
ही गाणी मला का आवडली ते ती पाहिल्यावर कळेलच...
अधिक इथे :-Meet Alaa Wardi, the Bolly magician!
28 May 2013 - 6:44 pm | मदनबाण
सध्या गाजत असलेल गाणं... रिक्षाच आणि कशा कशाच टेंशनु ते तिलाच ठावुक ! ;)
28 May 2013 - 6:52 pm | मोदक
अ र्र र्र र्र... हा धागा कसा सुटला नजरेतून...??
एकदा चॅनेल सर्फिंग करताना अचानक हे गाणे पाहण्यात आले होते व लगेचच विसरले गेले. आठवत होती एक फ्रेम आणि एक ओळ - "पाहतो जेंव्हा तुला मी, गझल उमटे अंतरी.."
त्यावेळी नक्की काय गुगल काय करावे हाही एक प्रश्न होता, अचानक बर्याच वर्षांनी हे गाणे सापडले..
मायकेल जॅक्सन आणि या गाण्याच्या लिरीक्स साठी..
आयटम साँग.. त्याचा अर्थ वगैरे गोष्टी फाट्यावर मारून फक्त या गाण्याच्या "संगीतासाठी" अजय अतुलला लै वेळा धन्यवाद!!
एकेकाळी नियमीतपणे 'जीम'ला जाताना "रॉकी" सोबत असायचा.. हे ऐकताना हेडफोन मस्ट!!
बाकी गाणे नाही, पण रॉकीची ही फाईट.. आणि त्याचे आभाराचे भाषण.
भाषण -
"I came here tonight and I didn't know what to expect. I seen a lot of people hating me and I didn't know what to feel about that so I guess I didn't like you much none either. During this fight I seen a lot of changing, the way yous felt about me, and the way I felt about you. In here there were two guys killin each other, but I guess it's better than 20 million. What I'm trying to say is, that if I can change, and you can change, everybody can change!"
28 May 2013 - 8:24 pm | मदनबाण
काही गाणी जग्गु दादाची...
28 May 2013 - 9:18 pm | मदनबाण
आता जरा इंग्रजी गाण्यांकडे वळावे म्हणतो...
28 May 2013 - 10:14 pm | मोदक
बाणा.. एक विंग्लीश गाणे आहे.
you have take my breath away..
गायिकेने काळा गाऊन घातला आहे आणि बहुदा रेनडीअर्स व बर्फामध्ये पिक्चरायझेशन झाले आहे त्या गाण्याचे.
मला सापडत नाहिये. माहिती असल्यास कृपया कळवणे!!
29 May 2013 - 9:33 am | अक्षया
29 May 2013 - 10:18 am | मदनबाण
@ मोदक अरे बरीच गाणी आहेत ! घोडा सापडला, पण रेनडीअर आणि ती बाई काही सापडेना !
आजची काही वेगळी गाणी...
29 May 2013 - 11:40 am | दिपक.कुवेत
पण ईथे तुनळि दिसत नाहि त्यामुळे स्वःतच गुणगुणुन समाधान मानतोय. वेल ह्या निमित्ताने गैरफिल्मी पण गाणी येउद्यात. कुवेतमधील जयवीच्या (जयश्रि अंबासकर) कवीतांना मधे देवकि पंडित, स्वप्निल बांदोडकर आणि वैशाली सामंत ह्यानी स्वरबध्द केलेली. ती सगळि गाणी तर छान आहेतच पण त्यातलं देवकि पंडितनी गायलेलं 'तुझा हळवा पाउस आज आठवतो मला' हे मला खुपच आवडतं. मुसळधार बरसणार्या पाउसात आपल्या आवडत्या व्यक्तिची आठवण आली नाहि तर नवलच! कुणी लिंक दिली तर जरुर एका.
29 May 2013 - 4:09 pm | मदनबाण
१:४२ ते १:४५ मधील मुव्हमेंटस पाहुन जीव गेला... ;) बाकी गाणं केवळ अप्रतिम ! ;)
29 May 2013 - 4:18 pm | प्यारे१
http://www.youtube.com/watch?v=FH7OXblvPg8&feature=player_detailpage
हे एक नंबर.
29 May 2013 - 4:23 pm | प्यारे१
बॉम्बे मधलं तू ही रे आहे. कुणीतरी दुरुस्त करा प्लीज.
29 May 2013 - 4:33 pm | अक्षया
29 May 2013 - 4:44 pm | भावना कल्लोळ
मी हे गाणे किती वेळा हि एकू शकते …
29 May 2013 - 4:46 pm | भावना कल्लोळ
तुनळीची लिंक का येत नाही आहे, बाय द वे, तनु वेड मनु मधले रंगरेज हे गाणे.
29 May 2013 - 4:51 pm | अक्षया
29 May 2013 - 5:55 pm | मदनबाण
29 May 2013 - 6:20 pm | मदनबाण
आता मोदकाने आयटम साँगला संगीत प्रेमामुळे फाट्यावर मारलेलचं आहे तर्...माझही संगीत प्रेम उफाळुन आलं ! ;)
29 May 2013 - 9:01 pm | मदनबाण
29 May 2013 - 9:45 pm | मदनबाण
कोणी ऐकल होतं का हे गाणं आधी ?
29 May 2013 - 10:12 pm | मैत्र
पहिली दोन गाणी मुक्तामधली आहेत. संगीत - आनंद मोडक, गीते नाधोंची आणि गायली आहेत जयश्री शिवराम यांनी
वळण वाटातल्या
जाईजुईचा गंध मातीला
धुंद होते शब्द सारे - उत्तरायण
संगीत - अमर्त्य राहूल, गीत - कौस्तुभ सावरकर
वर सर्वांनी दिल्याप्रमाणे तूनळीचा preview इथे दिसेल अशी सोय कुठे आहे.
29 May 2013 - 10:30 pm | मोदक
मैत्रा - तूनळीच्या दुव्यावर राईट क्लिक करून COPY EMBED CODE असा ऑप्शन सिलेक्ट कर आणि तो कोड येथे पेस्ट कर.
शिंपल! :-)
30 May 2013 - 12:25 am | अत्रुप्त आत्मा
गाण्याची अठवण---
दिवाळिची सुट्टी...मावशीच्या घरी-दादरला दादासाहेब फाळके रोडवरिल चाळ... तिथली मागच्या बाजुची बांधकाम अर्धवट र्हायलं म्हणून तयार झालेली ओपन टेरेस-गच्ची...अगदी गार नसला,तरी भरपूर वारा ,समोर काहि अंतरावरून जाणार्या लोकल्स...वेळ संध्याकाळी ५:३० ते ६:३० ची आणी गच्चिवर तिथले कुणी एक काका लांब एरियलचा ट्रांझिस्टर(की कॅसेट प्लेअर? अठवत नाही) घेऊन एका कोपर्यात ''हवा'' खात गाणी ऐकायला आलेले...आणी त्यावेळी लागलेलं गाणं,,,''माना हो तुम बेहद हंसी,वैसे बुरे हम भी नही...'' मला त्या गच्चीत एकतर समोरून त्या धावत जाणार्या लोकल ट्रेन्सचं प्रचंड आकर्षण होतं..आणी त्या धरतिवर मी हे गाणं पहिल्यांदा ऐकलं आणी लव्ह अॅट फस्ट साइट सारखं मला ते कायम अठवणीत र्हायलं,नंतर जेंव्हा जेंव्हा म्हणून मी हे गाणं ऐकलं तेंव्हा तेंव्हा मी आपोआप त्या गच्ची मध्ये गेलेलो आहे. अजुनही जातो. गाण्यांच्या अश्या अठवणी खूप आहेत..पण आज ही पहिली...
अठवणितलं गाणं----
30 May 2013 - 9:32 am | मदनबाण
30 May 2013 - 10:08 am | अक्षया
वा खुप नविन नविन गाणी ऐकायला आणि पहायला मिळत आहेत. :)
30 May 2013 - 11:02 am | मदनबाण
30 May 2013 - 3:25 pm | मदनबाण
Anaida
Suchitra
Alisha Chinoy
31 May 2013 - 11:17 am | मदनबाण
31 May 2013 - 8:49 pm | कोमल
1 Jun 2013 - 10:39 am | मदनबाण
थॅक्स "को" तू दिलेल हे गाणं मी पहिल्यांदाच ऐकल... गाणं गाण्यातली जपानी गुडीया आणि तिचा तो पंखा पाहुन खालचं गाण पहावसं वाटलं ! दोन्ही गाण्यात ज्यॉय मुखर्जी आहे हे विशेष ! ;)
2 Jun 2013 - 12:15 am | चिगो
लिंक्स शेयर करता येत नाही, पण काही गाणी..
१)"कल दिल दुखाया था मैनें तुम्हारा" (तेजाब).. गाणं आवडत वगैरे नाही, पण हे गाणं मी नेहमी "कंदिल दुखाया था" असं म्हणायचो लहानपणी, म्हणून आठवतंय..
२) "लिये सपने निगाहों में, चला हुं तेरी राहो में" (मशाल).. आयुष्यातल्या एका कठीण फेजमध्ये हे गाणं माझं "अँथम" होतं..
३) "तू बीन बताए मुझे ले चल कहीं" (रंग दे बसंती) सुंदर गाणं, सुरेख आठवणी.. ह्याच चित्रपटातलं "लुकाछुपी बहुत हुई" अत्यंत आर्ततेनं मनाला भिडणारं, आणि " अभी अभी हुआ यकीन" हे एकदम जोशीलं गाणं..
४) "चांदण्यात फिरतांना माझा धरलास हात", आणि "तुझ्या माझ्यासवे कधी गायचा पाऊसही" ही गाणी अभ्यासाचा दट्ट्या आणि प्रेमात भारलेलं मन, ह्यांच्या कात्रीत सापडलेली तीन वर्षे पुन्हा समोर घेऊन येतात.. थँकफुली, "तुझ्या माझ्यासवे" मधलं शेवटचं कडवं आमच्यापुरतं गैरलागू.. ;-)
"आओगे जब तुम ओ साजना" आणि "तुम से ही" (जब वी मेट) ही गाणीही ह्याचमुळे जास्त आवडीची..
५) आता आवडती गाणी
"पहला नशा पहला खुमार"
"खामोशीयां गुनगुनाने लगी" (वन टू का फोर)
"गुंजी सी है सारी फिजा, आओ ना" (क्यु हो गया ना)
"रंगरेज" (तनु वेड्स मनु)
"कितने दफे दिल ने कहा" (त.वे.म)
"नादान परींदे" (रॉकस्टार) (ह्यातील बहुतेक सगळीच)
"नेव्हर से नेव्हर" (कराटे कीड चित्रपटाचे जस्टीन बीबरच्या आवाजातले थीम साँग)
"यु कॅन पुट द ब्लेम ऑन मी" (अकॉन)
"अँड आय डोंट वॉना मिस अ थिंग" (एरोस्मिथ : आर्मागेडन थीम साँग)
"लेट्स मेक अ नाईट टू रिमेंबर", "हॅव यु एव्हर लव्ड अ वुमन" "कट्स लाइक नाईफ" इ. ब्रायन अॅडम्स
लोबोची गाणी
"इफ टूमारो नेव्हर कम्स" रोनॅन किटींग
आणखीही बरीच आहेत, येतील हळूहळू...
2 Jun 2013 - 12:15 am | चिगो
लिंक्स शेयर करता येत नाही, पण काही गाणी..
१)"कल दिल दुखाया था मैनें तुम्हारा" (तेजाब).. गाणं आवडत वगैरे नाही, पण हे गाणं मी नेहमी "कंदिल दुखाया था" असं म्हणायचो लहानपणी, म्हणून आठवतंय..
२) "लिये सपने निगाहों में, चला हुं तेरी राहो में" (मशाल).. आयुष्यातल्या एका कठीण फेजमध्ये हे गाणं माझं "अँथम" होतं..
३) "तू बीन बताए मुझे ले चल कहीं" (रंग दे बसंती) सुंदर गाणं, सुरेख आठवणी.. ह्याच चित्रपटातलं "लुकाछुपी बहुत हुई" अत्यंत आर्ततेनं मनाला भिडणारं, आणि " अभी अभी हुआ यकीन" हे एकदम जोशीलं गाणं..
४) "चांदण्यात फिरतांना माझा धरलास हात", आणि "तुझ्या माझ्यासवे कधी गायचा पाऊसही" ही गाणी अभ्यासाचा दट्ट्या आणि प्रेमात भारलेलं मन, ह्यांच्या कात्रीत सापडलेली तीन वर्षे पुन्हा समोर घेऊन येतात.. थँकफुली, "तुझ्या माझ्यासवे" मधलं शेवटचं कडवं आमच्यापुरतं गैरलागू.. ;-)
"आओगे जब तुम ओ साजना" आणि "तुम से ही" (जब वी मेट) ही गाणीही ह्याचमुळे जास्त आवडीची..
५) आता आवडती गाणी
"पहला नशा पहला खुमार"
"खामोशीयां गुनगुनाने लगी" (वन टू का फोर)
"गुंजी सी है सारी फिजा, आओ ना" (क्यु हो गया ना)
"रंगरेज" (तनु वेड्स मनु)
"कितने दफे दिल ने कहा" (त.वे.म)
"नादान परींदे" (रॉकस्टार) (ह्यातील बहुतेक सगळीच)
"नेव्हर से नेव्हर" (कराटे कीड चित्रपटाचे जस्टीन बीबरच्या आवाजातले थीम साँग)
"यु कॅन पुट द ब्लेम ऑन मी" (अकॉन)
"अँड आय डोंट वॉना मिस अ थिंग" (एरोस्मिथ : आर्मागेडन थीम साँग)
"लेट्स मेक अ नाईट टू रिमेंबर", "हॅव यु एव्हर लव्ड अ वुमन" "कट्स लाइक नाईफ" इ. ब्रायन अॅडम्स
लोबोची गाणी
"इफ टूमारो नेव्हर कम्स" रोनॅन किटींग
आणखीही बरीच आहेत, येतील हळूहळू...
2 Jun 2013 - 1:43 am | अत्रुप्त आत्मा
फिल कॉलिन्सचा-बट सिरियसली...जिओ जान से अवडणारा अल्बम...आणी त्यातली ही जास्त अवडणारी गाणी :)
Phil Collins - Another Day In Paradise
Phil Collins - I Wish It Would Rain
14 Jun 2013 - 9:35 pm | मदनबाण
15 Jun 2013 - 12:35 pm | विसोबा खेचर
liked..
15 Jun 2013 - 7:07 pm | मदनबाण
27 Jun 2013 - 3:57 pm | अक्षया
27 Jun 2013 - 5:20 pm | मदनबाण
अक्षया तुम्ही या धाग्याचा दुसरा भाग काढा.
तसेच पुढील भागात व्हिडीयोची साईज 400 X 300 (अंदाजे) अशी द्यायची विनंती (सर्व व्हिडीयो टाकणार्यांना करा.) हा धागा बर्याच वेळी क्रॅश होतो आहे,त्यामुळे इतरांनी दिलेली गाणी पाहणे आणि ऐकणे शक्य होत नाही. :(
तेव्हा कॄपया नवा धागा काढा...