Skip to main content

पिझ्झा पुरी

लेखक Mrunalini यांनी बुधवार, 20/03/2013 01:17 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः मैदा - १ कप रवा - २ चमचे टोमॅटो प्युरी - १/२ कप बेसिल - १/४ चमचा ओरेगानो - १/४ चमचा काळि मिरी पावाडर - १/२ चमचा रेड चिली फ्लेक्स - १/२ चमचा चीज - १/२ वाटी खायचा लाल रंग - १/४ चमचा तेल तळण्यासाठी मिठ चवीनुसार कॄती: १. मैदा व रवा एकत्र करुन घ्यावा. त्यात टोमॅटो प्युरी, बेसिल, ओरेगानो, काळि मिरी पावडर, चिली फ्लेक्स, लाल रंग व चवीनुसार मिठ टाकुन पीठ मळुन १ तास झाकुन ठेवावे. p1 २. एका वाटीत चीज, काळि मिरी पावडर व चिली फ्लेक्स टाकुन चांगले मळुन घ्यावे. ३. पीठातील एक गोळा काढुन, त्यात मोदकांना भरतो त्याप्रमाणे थोडे चिज भरुन घ्यावा. p2 ४. ह्याची अगदी अलगद हाताने, पुरी लाटुन घ्यावी. p3 ५. कढईत गरम केलेल्या तेलामधे ही पुरी मध्यम आचेवर दोन्ही बाजुने तळुन घ्यावी. p4 ६. गरमा-गरम पिझ्झाच्या चवीची पुरी तयार आहे. p5

वाचने 44043
प्रतिक्रिया 29

प्रतिक्रिया

लैच इनोव्हेटीव्ह आणि देखणी पाकृ. कलर्स पण एकदम मस्त आणि वेगळेच आलेत. (माझ्याकडे डोमिनोजची लै पाउचेस राहतात. त्याचा उपयोग करता येईल ;) ) धन्यवाद मृणालिनी :)

आह्हा! काय मस्त दिसतायत पुर्‍या. याच्याबरोबर तोंडी लावायला एखादे मस्त सॅलेड/ चटणी पण करुन पाकृ द्या.

इनोव्हेटिव्ह आणी इम्प्रेसीव्ह :)

पु~रांचा रंग काय भन्नाट आलाय! ते पाहुनच खाव्याश्या वाटतायत. आयडियाची कल्पना आवडली :)

छान आहे पिझ्झा पुरी! स्वाती

खरच एकदम मास्टरशेफच्या पातळीवरची आहे ही रेसेपी .मला खुपच आवडली :)

रंग काय दिसतोय :) तों.पा.सु !!ह्याच धरतीवर पराठा पण बनेल असं वाटतं!!

हा नवीन प्रकार लवकरात लवकर करण्याचा हुकूम सोडण्यात येईल. - पाकअज्ञ तिमा

तोंडाला पाणी सुटणारा पदार्थ आहे, पण त्याचे नाव काही तितके रुचले नाही.

In reply to by बंडा मामा

धन्यवाद मामा :) ... पण पुरी मी पिझ्झाच्या चवीची केली त्यामुळे मी हे नाव दिले.. मला दुसरे कुठले नाव सुचले नाही. :( तुम्हाला कुठले नाव सुचत असल्यास, प्लीज सांगा... मला नक्कीच आवडेल. :)

मस्त दिसते आहे पाककृती. ह्याला 'टोमॅटो पित्झारी' असे नांव देता येईल.

काय खल्लास रंग आलाय!