Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by टवाळ कार्टा on Sun, 12/30/2012 - 20:29
मुली शोधाण्यातले frustration नाव वाचूनच समजले असेल की सध्या मुली शोधण्याचा कार्यक्रम चालू आहे ..अगदी बरोबर..अर्थात लग्नासाठी आणि लेख फक्त आणि फक्त frustration मुळे लिहिला आहे माझा traditional match making वर अजिबात विश्वास नाहीये कारण त्यात स्वभाव किती जुळतात याला सगळ्यात कमी importance आहे ...so i prefer to chat with girls before actually deciding future aspects पण जे अनुभव आले ते इथे लिहित आहे पण मला फक्त जाणून घ्यायचे आहे की सगळ्याच so called forward मुली अशा असतात कि मलाच हे "नग" मिळाले (त्याच बरोबर मिपाकरांना दंगा करायला मोकळे रान मिळणार आहे याचीही जाणीव आहे ) मुलगी type १ डॉक्टर - matrimony site वर माझ्या request ला +ve reply केला म्हणून मी chat request पाठवली पहिल्याच chat मध्ये म्हणाली ...चुकुन +ve reply केला :( मुलगी type २ मार्केटिंग professional - matrimony site वर माझ्या request ला +ve reply केला म्हणून मी chat request पाठवली २-३ वेळा chat केल्यावर एके दिवशी मला expected असलेल्या गुणाविषयी बोलत होतो तर सहज म्हणालो "एका लग्नाची दुसरी गोष्ट" मध्ये मुक्ता बर्वेने जे "character" केले आहे त्या type ची मुलगी मी शोधत आहे लगेच रेप्ली आला ....माझ्या expectations खूप फिल्मी आहेत ....आणि दुसर्या क्षणापासून chat बंद मुलगी type ३ engineer - matrimony site वर माझ्या request ला +ve reply केला म्हणून मी chat request पाठवली ७-८ chat नंतर चेपू वर add झालो ...आणखी ४-५ chat नंतर तिने upload केलेल्या फोटोवर comment लिहिली "rose with rose"...तो फोटो बागेतल्या गुलाबाबरोबर काढला होता त्यानंतर चेपुच्या फ्रेंड लिस्ट मधून बाहेर आणि chat contact blocked उरलेल्यांपैकी बर्याच matrimony site वर माझ्या request ला +ve/-ve कसलाच reply नाही चेपुवर message पाठवला तर तिथेही काही reply नाही जर वाट बघून call केला तर खालीलपैकी १ उत्तर तयार दिवसाला ५० mails येतात ....किती जणांना reply करणार ....(अर्रे मग profile hidden का नाही ठेवत ????) किंवा (this is classic) नकार देऊन कुणाला दुखवायला नाही आवडत...(चायला दुसर्यांना वाट बघायला लाऊन काय सुख मिळते???) किंवा घरच्यांना जातीबाहेराचा मुलगा नाही चालणार...(तरी मी so called उच्च जातीतला आहे) जर तिला तिचे स्वतःचे मत विचारले तर उत्तर ....तिला जातीचा फरक पडत नाही पण ती parents चे ऐकणार because she respects her parents...उद्या नवर्याने त्याच्या आई-वडिलांचे चुकीचे म्हणणे सुद्धा "respect" साठी ऐकले ....तर ते सुद्धा बरोबरच love marriage असेल तर तिच्या घरच्यांना जातीचा काहीही प्रॉब्लेम नाही पण arrange marriage जातीबाहेर नाही करायचे जवळपास सगळ्याच मुलींचे reply असेच ...(almost १००+)...आणि almost सगळ्या highly educated आजच्या जमान्यात सुद्धा सगळ्यांचे अनुभव असेच आहेत??? (पुढील लेखांमध्ये शुद्धलेखनाच्या चुका हळूहळू कमी होतील)
  • Log in or register to post comments
  • 125535 views

प्रतिक्रिया

Submitted by एस on Sun, 12/30/2012 - 22:19

Permalink

चांगला प्रयत्न आहे.

एक सांगू? स्वतःला काय हवे आहे यापेक्षा किंचित जास्त आपण इतरांच्या अपेक्षा कितपत पूर्ण करू शकतो यावर लक्ष केंद्रित करा. आख्खं आयुष्यच अर्थपूर्ण होईन. :)
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Sun, 12/30/2012 - 22:39

In reply to चांगला प्रयत्न आहे. by एस

Permalink

असेच स्वप्नरंजन मी सुध्धा

असेच स्वप्नरंजन मी सुध्धा केलेले...तीने दुसर्याला निवडल्यावर जमिनिवर आलो
  • Log in or register to post comments

Submitted by एस on Mon, 12/31/2012 - 23:50

In reply to असेच स्वप्नरंजन मी सुध्धा by टवाळ कार्टा

Permalink

लढ बापू...

आता खुश्कीचे युद्ध सुरू...
  • Log in or register to post comments

Submitted by दादा कोंडके on Mon, 12/31/2012 - 00:32

Permalink

हम्म...

नकार देऊन कुणाला दुखवायला नाही आवडत...(चायला दुसर्यांना वाट बघायला लाऊन काय सुख मिळते???)
तुम्ही वाट बघता म्हणजे नक्की काय करता? त्या मुलीचा (पहिल्याच केलेल्या requestला) reply येइल म्हणून इतर मुलींना contact करणं बंद करता का?
घरच्यांना जातीबाहेराचा मुलगा नाही चालणार...(तरी मी so called उच्च जातीतला आहे)
म्हणजे का? इतर जातीतले ही असली अट ठेवायला eligible नाहीत का?
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Mon, 12/31/2012 - 12:39

In reply to हम्म... by दादा कोंडके

Permalink

"तुम्ही वाट बघता म्हणजे नक्की

"तुम्ही वाट बघता म्हणजे नक्की काय करता? त्या मुलीचा (पहिल्याच केलेल्या requestला) reply येइल म्हणून इतर मुलींना contact करणं बंद करता का?" आधी वाट बघायचो (१०-१५ दिवस)...पण नंतर अनुभवातुन शहाणा झालो आणि वाट बघणे सोडले "म्हणजे का? इतर जातीतले ही असली अट ठेवायला eligible नाहीत का?" मला प्रश्न समजला नाही ... मी "(तरी मी so called उच्च जातीतला आहे)" हे फक्त एव्हड्यासठीच लिहिले कारण माझा अजुन्पर्यंत समज हाच होता की भारतात आंतर्जातीय विवाह करताना फक्त "so called" (sarcasm expected here) उच्च-कनिष्ठ जातींमधेच तणाव असतो... आणि दोन "so called" (sarcasm expected here) उच्च जातींसाठी तरी काहीच हरकत नसावी... DISCLAIMER - FOR ME, CASTE/RELIGIONS DON'T HAVE ANY PRECEDENCE NOR THEY ACT AS ANY CRITERIA FOR SHORTLISTING GIRL
  • Log in or register to post comments

Submitted by आबा on Mon, 12/31/2012 - 03:13

Permalink

:)

सिरियसली.... "rose with rose", "मुक्ता बर्वे टाईप.." वगैरे नंतर तुम्हाला रिप्लाईज येतिल, अशी अपेक्षा होती तुमची ?! :))
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Mon, 12/31/2012 - 05:15

Permalink

मला या प्रकारातला फारसा अनुभव

मला या प्रकारातला फारसा अनुभव नाही पण मुक्ता बर्वे आणि रोझ विथ रोझ या दोन्ही नंतर मीही अगदी दुसर्‍या क्षणानंतर संवाद बंद केला असता. पैसाताईशी सहमत. नव्या प्रकारे लग्न जमत नसेल तर कांदेपोहे कार्यक्रम करून लग्न करायला काहीच हरकत नाही. मुक्ता बर्वेची जी मालिका थोडीफार पाहिली आणि त्यातली तिची भूमिका लिहिणारा प्राणी कन्फ्युज्ड असावा किंवा त्याला प्रेक्षकांना कन्फ्यूज करणे जमले असे म्हणीन. तुम्हाला लवकरच मुलगी पसंत पडो, तिलाही तुम्ही पसंत पडो आणि आम्हाला लाडू मिळोत अशी इच्छा!
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Mon, 12/31/2012 - 12:18

In reply to मला या प्रकारातला फारसा अनुभव by रेवती

Permalink

हा सगळ्याच मुलींचा प्रॉब्लेम

हा सगळ्याच मुलींचा प्रॉब्लेम आहे का?? मी ती कमेंट लिहिलेली कारण... १.आमाची आमचे १५-१६ वेळा online chat (every time atleast for 20 minutes) झालेले आणि आम्ही बर्याच विषयांवर मोकळेपणाने बोललेलो... अगदी each other's ex, reasons for past breakups, expectations from each other 2.ज्या मुलीच्या फोटोवर "ती" कमेंट लिहिलेली ती २ वर्षे परदेशात राहुन आलेली... त्यामुळे माझ्यामते तरी तिला "ती" कमेंट बरिच सोज्वळ वटायला वाटायला काहीच हरकत नव्हती आणि सगळ्यात महत्वाचे...इतके सगळे जण हा लेख वाचत आहेत...एकालाही असे वाटु नये की त्या मुलीला जर मझी कमेंट आवडली नाही तर तसे सरळ्पणे सांगायला हवे होते...का सगळ्यांचे असेच मानणे आहे की "मुली अश्याच वागतात"???
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Mon, 12/31/2012 - 19:26

In reply to हा सगळ्याच मुलींचा प्रॉब्लेम by टवाळ कार्टा

Permalink

आहे हे असे आहे. त्याच्याकडे

आहे हे असे आहे. त्याच्याकडे प्रॉब्लेम म्हणून बघायचे का हे तुम्ही ठरवा. जर प्राथमिक संवादात हा प्रॉब्लेम वाटत असेल तर पिक्चर अभी बाकी है मेरे भाय. लग्नाच्या बाबत शेवटचा निर्णय तुम्हाला घ्यावा लागणार. आईवडीलही चहा पोहे झाल्यावर "बघ बाबा आता, आम्हाला स्थळ बरं वाटतय, तुला आवडली मुलगी तर हो म्हण." असंच म्हणतात. कोणत्याही मुलीला दुसर्‍या मुलीचे उदाहरण देऊन तू तशी असायला हवीस असे म्हणणे आवडत नाही (मुलांचेही असेच असावे असा अंदाज). ती मुलगी किंवा आणखी कोणी परदेशात राहू दे नाहीतर परग्रहावर, लग्नासारख्या गोष्टींमध्ये बहुतेकवेळा तुमचे संस्कार जसे असतील तसे वागले जाते (हे सकारात्मक दृष्टीने वाचणे) कारण ते सुरक्षित वाटते (म्हणून आईबाबांकडे धाव घ्यावीशी वाटते). मुलीने कोणती गोष्ट सरळपणे सांगायला हवी हे तुम्ही ठरवू शकत नाही, निदान लग्नाच्या बाबतीत तरी. तुम्ही तिला टर्न ऑफ केलेत की संपले. हे मुलांच्या बाबतीतही आहे. फक्त तसा अनुभव तुम्हाला अजून आला नसेल. वाट बघा. आपल्या अपेक्षा सटासट् कधी कमी होतात ते समजत नाही. ही जर तडजोड वाटत असेल तर संसार करताना त्याच्या कितीतरी पट तडजोड करण्याचे गणित (मनातल्या मनात) मांडा.
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Tue, 01/01/2013 - 14:10

In reply to आहे हे असे आहे. त्याच्याकडे by रेवती

Permalink

"आहे हे असे आहे"

"आहे हे असे आहे" आहे हे असे आहे म्हणजेच भले जे आहे ते चुकीचे असेल पण ते तसेच चालणार कदाचीत त्यामुळेच असेल...पण आजकाल कोणतीही मुलगी जर स्त्री-पुरुष समानतेबाबत बोलु लागली तर असेच वाटते की पुरुषांच्या जागी स्त्री असती आणि स्त्री च्या जागी पुरुष असते तर स्त्रीयासुद्धा अशाच वागल्या असत्या... माझ्याबाबत तरी मुलींबद्दल माझा रिस्पेक्ट फार कमी झाला आहे (हे वाक्य फार वादग्रस्त ठरु शकते याची जाणिव आहे पण परदेशात राहील्यावर लग्नाबद्दल बोलण्यात जो मोकळेपणा दिसतो तसा जर खरोखर आचरणात आणला तर अरेंज लग्नानंतर्च्या बर्याच 'तडजोडी' कमी होतील...)
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Tue, 01/01/2013 - 20:07

In reply to "आहे हे असे आहे" by टवाळ कार्टा

Permalink

'आहे हे असं आहे' याचा अर्थ

'आहे हे असं आहे' याचा अर्थ म्हणजे जगातल्या सगळ्या बायकांचा तो स्वभाव आहे (उगाच का बायको माहेरी गेल्यावर बरेचजण आनंदी राहतात?) ;). आणि बुवा, परदेशातल्या दोन वर्षांत विचारात बदल वगैरे फारसा घडत नाही. रिस्पेक्ट कमी झालाय का तरी? ओक्के. तुम्ही अजून लग्नासाठी तयार नाही असंच दिसतय. विचार करा थोडे दिवस. अस्संच हवं नी तस्संच हवं असं फार चिवडू नका (शेवटी अपर्णा म्हणाली त्याच शब्दापर्यंत आले मी).
  • Log in or register to post comments

Submitted by तथागत on गुरुवार, 01/03/2013 - 03:49

In reply to हा सगळ्याच मुलींचा प्रॉब्लेम by टवाळ कार्टा

Permalink

आम्ही बर्याच विषयांवर

आम्ही बर्याच विषयांवर मोकळेपणाने बोललेलो... अगदी each other's ex, reasons for past breakups >> तेंव्हा एक्ष कशी पटविली होती ते आठवा तेच पुन्हा करुन लगेच मुलीला मागणी घाला.
  • Log in or register to post comments

Submitted by जेनी... on Sat, 01/05/2013 - 05:07

In reply to हा सगळ्याच मुलींचा प्रॉब्लेम by टवाळ कार्टा

Permalink

त्च्च् .... छ्या ! नै रे ...

त्च्च् .... छ्या ! नै रे ... मुली अश्या नसतात . :) झालं कै असेल मैते का ... तिच्या नव्या मित्राने ओब्जेक्शन घेतलं असणारे ... त्यामुळे तिने तुला उडवला असणारे .., एवडं कै मनाला लाउन घेतो ... ती नै त कुइ उर सै असा विचार करुन जगायचं अस्तय रे ;)
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Sat, 01/05/2013 - 22:21

In reply to त्च्च् .... छ्या ! नै रे ... by जेनी...

Permalink

पुजाबै...या बाबतीत "बस, ट्रेन

पुजाबै...या बाबतीत "बस, ट्रेन ऑर लडकी..." एकदम पर्फेक्ट...
  • Log in or register to post comments

Submitted by स्पंदना on Mon, 12/31/2012 - 07:54

Permalink

प्रेमात पडुन करा, चॅट करुन

प्रेमात पडुन करा, चॅट करुन करा, वा कांदा पोहे खाउन करा, पण लग्न म्हणजे वर्षानु वर्षाची बांधणुक असते. अन मग ते तुम्ही कितीही ठरवलात तरी शेवटी तडजोडीनेच टिकते. आता स्वभावात फारच फरक असेल तर वेगळी गोष्ट पण साधारण आवडी निवडी शिक्षण अन बॅकग्राउंड जमत असेल तर झटक्यात करुन टाका. ट्रस्ट मी फार चिवडाल तर हाताला गाळ येइल.
  • Log in or register to post comments

Submitted by शैलेन्द्र on Mon, 12/31/2012 - 10:42

In reply to प्रेमात पडुन करा, चॅट करुन by स्पंदना

Permalink

+१

"ट्रस्ट मी फार चिवडाल तर हाताला गाळ येइल." अगदी.. १००% सहमत..
  • Log in or register to post comments

Submitted by भिकापाटील on Mon, 12/31/2012 - 20:33

In reply to प्रेमात पडुन करा, चॅट करुन by स्पंदना

Permalink

फार चिवडाल तर हाताला गाळ येइल

फार चिवडाल तर हाताला गाळ येइल.
+१००००००००००००००००० लै चाफीत बसला तर चिंगळ्याच हातात येतील...... =)) त्यामुळे फार अपेक्षा न ठेवता करुन टाक झटपट...
  • Log in or register to post comments

Submitted by अमोल खरे on Mon, 12/31/2012 - 09:50

Permalink

लेख बरा आहे.

मुलींच्या अपेक्षा आणि पेट्रोलचे भाव कधीही खाली येत नाहीत हे वैश्विक सत्य आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by किचेन on Sat, 02/06/2016 - 08:55

In reply to लेख बरा आहे. by अमोल खरे

Permalink

लै भारी .

लै भारी .
  • Log in or register to post comments

Submitted by प्रकाश घाटपांडे on Mon, 12/31/2012 - 10:22

Permalink

छान

पैसा रेवती अपर्णा यांच्याशी सहमत आहे. टवाळाला कार्येषु मंत्री करुणेषु| दासी भोजनेषु माता शयनेषु रंभा || अशी बायको पाहिजे. प्रत्येक पुरुषाला असेच वाटत असते असो
  • Log in or register to post comments

Submitted by sagarpdy on Mon, 12/31/2012 - 11:06

In reply to छान by प्रकाश घाटपांडे

Permalink

त्ये पयलं दांडकं एक शब्द

त्ये पयलं दांडकं एक शब्द अलीकडं आलं बगा.
  • Log in or register to post comments

Submitted by स्पंदना on Mon, 12/31/2012 - 17:16

In reply to त्ये पयलं दांडकं एक शब्द by sagarpdy

Permalink

दांडक? अग आआई ग!

दांडक? अग आआई ग!
  • Log in or register to post comments

Submitted by प्रकाश घाटपांडे on Mon, 12/31/2012 - 18:45

In reply to त्ये पयलं दांडकं एक शब्द by sagarpdy

Permalink

बूच

आता तुमी बूच मारल्याव काय कर्नार!
  • Log in or register to post comments

Submitted by sagarpdy on Mon, 12/31/2012 - 19:10

In reply to बूच by प्रकाश घाटपांडे

Permalink

(No subject)

:P
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Mon, 12/31/2012 - 12:02

In reply to छान by प्रकाश घाटपांडे

Permalink

"कार्येषु मंत्री करुणेषु|

"कार्येषु मंत्री करुणेषु| दासी भोजनेषु माता शयनेषु रंभा ||" असे मी कधी लिहिले?? "प्रामाणिक, स्पष्टवक्ती, बहिर्मुख, सुशिक्षित, आनंदी, आत्मविश्वासपूर्ण, स्वतंत्र विचारांची" हे सगळेच गुण नसतील तरी यातील काही तरी हवे... आणि आजवरचा अनुभव असा'च' आहे की मुलगी कितिही शिकलेली असुदे... बोलतानामात्र "आइ-बाबा सांगतील तेच बरोबर" हाच ऐटिट्युड... अजुन एक...ज्या मुली स्वताला "स्वतंत्र विचारांची" समजतात त्यांना जर एखाद्या विषयावरचे मत (उदा. जात, groom's minimum expected income, लग्नानंतर पगाराचे शेअरींगच्या अपेक्शा ) justify करायला सांगितले तर मात्र उत्तर येते "या माझ्या अपेक्शा आहेत आणि मला त्यासाठी कोणाला justific द्यायची गरज नाही"
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदी गोपाळ on Tue, 01/01/2013 - 21:30

In reply to "कार्येषु मंत्री करुणेषु| by टवाळ कार्टा

Permalink

जसजसे वाचतोय तसा तुमच्या

जसजसे वाचतोय तसा तुमच्या म्याचुरिटीचा अंदाज बांधतोय.
अजुन एक...ज्या मुली स्वताला "स्वतंत्र विचारांची" समजतात त्यांना जर एखाद्या विषयावरचे मत (उदा. जात, groom's minimum expected income, लग्नानंतर पगाराचे शेअरींगच्या अपेक्शा ) justify करायला सांगितले तर मात्र उत्तर येते "या माझ्या अपेक्शा आहेत आणि मला त्यासाठी कोणाला justific द्यायची गरज नाही"
जर ती स्वतंत्र विचारांची आहे, तर तिचे विचार तिने तुम्हाला जस्टिफाय का करायला हवेत?
आणि आजवरचा अनुभव असा'च' आहे की मुलगी कितिही शिकलेली असुदे... बोलतानामात्र "आइ-बाबा सांगतील तेच बरोबर" हाच ऐटिट्युड...
अ‍ॅटिट्यूड नस्तो तो. एस्केप प्ल्यान असतो. ऐन टायमाला तुमच्यात काही लोचा वाटला तर "आईबाबा नको म्हंतात" म्हणून कल्टी मिळेल तुम्हाला.
  • Log in or register to post comments

Submitted by जेनी... on Sat, 01/05/2013 - 05:14

In reply to जसजसे वाचतोय तसा तुमच्या by आनंदी गोपाळ

Permalink

हिहिहि .

हिहिहि . अ‍ॅटिट्यूड नस्तो तो. एस्केप प्ल्यान असतो. ऐन टायमाला तुमच्यात काही लोचा वाटला तर "आईबाबा नको म्हंतात" म्हणून कल्टी मिळेल तुम्हाला. --------- अगदि तोंडातलं वाक्य =))
  • Log in or register to post comments

Submitted by किचेन on Sat, 02/06/2016 - 09:23

In reply to "कार्येषु मंत्री करुणेषु| by टवाळ कार्टा

Permalink

स्वतंत्र विचार आहेत म्हणून आई

स्वतंत्र विचार आहेत म्हणून आई बाबाना विचारायचच नाहि अस नाहि.एकमेकांशी चर्चा करून निर्णय घेतल.त्यांच्या अनुभवाचा आणि आपल्या अपेक्षंाचा मेळ बसत असेल तर हो नाहितर नाहि. आणि फेसबुक वरचि व्यक्ति आणि तिचा प्रोफाईल यात बराच फरक असतो.
  • Log in or register to post comments

Submitted by चौकटराजा on Mon, 12/31/2012 - 10:29

Permalink

लग्न म्हणजे

लग्न म्हणजे थ्री ईन वन आईसक्रीम असते. नवरा म्हणजे सहकारी, सजण सरकार अशा तीन भूमिकाचे ते आईसक्रीम असावे.ती सहकारी सचिव सखी असावी.पण हे असताना परस्परांचे अहंकार जपण्याची कसरत करण्यापेक्षा संसाराच्या हितासाठी अहंकारांची होळी करण्याचा मोठेपणा दोघात असेल तर सुख मिळते. नाहीतर मुले होतात, गाडी येते, पेंट हाउस मिळते , दागिने मिळतात पण सुख लाभेलच असे नाही.
  • Log in or register to post comments
Profile picture for user धन्या

Submitted by धन्या on Mon, 12/31/2012 - 10:36

In reply to लग्न म्हणजे by चौकटराजा

Permalink

पण हे असताना परस्परांचे

पण हे असताना परस्परांचे अहंकार जपण्याची कसरत करण्यापेक्षा संसाराच्या हितासाठी अहंकारांची होळी करण्याचा मोठेपणा दोघात असेल तर सुख मिळते. नाहीतर मुले होतात, गाडी येते, पेंट हाउस मिळते , दागिने मिळतात पण सुख लाभेलच असे नाही.
चौराकाका, "दोन इगो क्लॅश होत असतानाही विवाहबंधन टीकून राहतं, फक्त ती हेल्दी रीलेशनशीप नसते" असं तुम्ही गृहीत धरत आहात. आजचं वास्तव वेगळं आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Tue, 01/01/2013 - 17:45

In reply to पण हे असताना परस्परांचे by धन्या

Permalink

धन्या खाली 'आणखी काही' किं वा

धन्या खाली 'आणखी काही' किं वा बरंच काही लिहायचं होतं का रे?
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Mon, 12/31/2012 - 12:05

Permalink

मुक्ता बर्वे छाप आणि रोझ विथ

मुक्ता बर्वे छाप आणि रोझ विथ रोझ म्हंजे कहर आहे. मुलगी तद्दन ढ असेल तरच परतिसाद देईल या अपेक्षांना. नै म्हंजे काय बोलताय इतकंच कसं बोलताय यालाही महत्व असतं. उद्या समजा पोरीनं म्हटलं की मला दबंग मधल्या सल्मानसारखा पोरगा पाय्जे तं मग कप्पाळाला हात नै का लावणार तुमी? तसंच हाय हितं.
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Mon, 12/31/2012 - 12:19

In reply to मुक्ता बर्वे छाप आणि रोझ विथ by बॅटमॅन

Permalink

परत एकदा

परत एकदा मी फक्त उदहरण दिलेले..."तश्शीच" असवी अशी अपेक्शा कधीही नाही
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Mon, 12/31/2012 - 12:30

In reply to परत एकदा by टवाळ कार्टा

Permalink

परत एकदा...उदाहरण

परत एकदा...उदाहरण देतानासुद्धा, जिच्यासारखी असावी हे सांगताना तद्दन फिल्मी उदाहरण घेतल्याने तो मोठा टर्न ऑफ होतो. तुम्हाला कॉन्फिडंट, औटगोईंग्,इ.इ. असलेली मुलगी हवी तर तसे सरळ सांगा, त्याची कल्पना येण्यासाठी मुक्ता बर्विणीला कशाला मध्ये आणताय फुक्कट? नै म्हंजे कॉन्फिडंट वैग्रे सांगताना लोकांना शब्द कळणार नैत असे वाट्टे की काय? की मुक्ताबै जास्तच रुतून राहिलीये मनात? उपमा देणे सोडवत नै? हा तर मेन प्राब्ळम आहे. एकदा तुमच्याकडून जरा नीट असले सगळे की मग पोरींची खुस्पटे काढणे बरे दिसते, त्याआधी नै ;)
  • Log in or register to post comments
Profile picture for user धन्या

Submitted by धन्या on Mon, 12/31/2012 - 12:38

In reply to परत एकदा...उदाहरण by बॅटमॅन

Permalink

ब्याम्या, लईच इस्कटून

ब्याम्या, लईच इस्कटून सांगायला बे...
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Mon, 12/31/2012 - 12:55

In reply to ब्याम्या, लईच इस्कटून by धन्या

Permalink

(No subject)

:)
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Mon, 12/31/2012 - 12:44

In reply to परत एकदा...उदाहरण by बॅटमॅन

Permalink

मी आधी "honest, frank,

मी आधी "honest, frank, outgoing, well educated, jolly, confident, independent thinker" याच शब्दात त्या मुलीला माझ्या अपेक्शा सांगीतलेल्या...त्यावर तीची प्रतिक्रिया होती "बकवास" मग उदाहरण देउन सांगताना बर्वेबाइंना आणले
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Mon, 12/31/2012 - 12:55

In reply to मी आधी "honest, frank, by टवाळ कार्टा

Permalink

ओक्के. मग ती पोरगी अंमळ गंडकी

ओक्के. मग ती पोरगी अंमळ गंडकी होती असे दिसते. असो. पण एका पोरीला हे सर्व बकवास वाटले म्हणून सर्व पोरींना बर्वेछाप सांगू लागला तर मग प्राब्ळम है भौ.
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Mon, 12/31/2012 - 13:06

In reply to ओक्के. मग ती पोरगी अंमळ गंडकी by बॅटमॅन

Permalink

"बर्वेछाप" आज पर्यंत फक्त

"बर्वेछाप" आज पर्यंत फक्त एकदाच वापरावे लागले ... बाकी बर्याचशा खालील क्याटेगरी मधील आहेत matrimony site वर माझ्या request ला +ve/-ve कसलाच reply नाही चेपुवर message पाठवला तर तिथेही काही reply नाही जर वाट बघून call केला तर खालीलपैकी १ उत्तर तयार दिवसाला ५० mails येतात ....किती जणांना reply करणार ....(अर्रे मग profile hidden का नाही ठेवत ????) किंवा (this is classic) नकार देऊन कुणाला दुखवायला नाही आवडत...(चायला दुसर्यांना वाट बघायला लाऊन काय सुख मिळते???) किंवा घरच्यांना जातीबाहेराचा मुलगा नाही चालणार...(तरी मी so called उच्च जातीतला आहे) जर तिला तिचे स्वतःचे मत विचारले तर उत्तर ....तिला जातीचा फरक पडत नाही पण ती parents चे ऐकणार because she respects her parents...उद्या नवर्याने त्याच्या आई-वडिलांचे चुकीचे म्हणणे सुद्धा "respect" साठी ऐकले ....तर ते सुद्धा बरोबरच love marriage असेल तर तिच्या घरच्यांना जातीचा काहीही प्रॉब्लेम नाही पण arrange marriage जातीबाहेर नाही करायचे
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Mon, 12/31/2012 - 14:08

In reply to "बर्वेछाप" आज पर्यंत फक्त by टवाळ कार्टा

Permalink

नै जमलं कै जर बराच वेळपर्यंत

नै जमलं कै जर बराच वेळपर्यंत तर मग सरळ घरच्यांना बनवा तुमचे गूगल. इन एनी केस, सर्च चालू ठेवा इतकेच सांगून मी आपली रजा घेतो :)
  • Log in or register to post comments

Submitted by जेनी... on Sat, 01/05/2013 - 05:19

In reply to ओक्के. मग ती पोरगी अंमळ गंडकी by बॅटमॅन

Permalink

ए भौराया ... तुझ्यापासनं सावध

ए भौराया ... तुझ्यापासनं सावध रैला हवे बे :-/
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Sat, 01/05/2013 - 22:24

In reply to ए भौराया ... तुझ्यापासनं सावध by जेनी...

Permalink

हे कोणासाठी???

हे कोणासाठी??? ;)
  • Log in or register to post comments

Submitted by कवितानागेश on Tue, 01/01/2013 - 11:45

In reply to मी आधी "honest, frank, by टवाळ कार्टा

Permalink

कमाल झाली.

हुशार दिसतेय मुलगी!! =)) तुमच्या व्याख्येतली मुलगी तुम्हाला कुठेही सापडणार नाही. ते टीव्हीवर सगळे खोटं असतं. आधी टीव्ही बघणं बंद करा बरं. जी मुलगी तुम्हाला प्रत्यक्ष भेटून 'हो' म्हणेल तिच्याशी पटकन लग्न करुन घ्या.
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Sat, 01/05/2013 - 22:25

In reply to कमाल झाली. by कवितानागेश

Permalink

सगळेच गुण असतील अशी माझी

सगळेच गुण असतील अशी माझी अपेक्शा कधीही नाही...पण १-२ तरी हवे
  • Log in or register to post comments

Submitted by शैलेन्द्र on Mon, 12/31/2012 - 12:43

Permalink

टवाळा.. अनुभवाचे बोल ऐक..

टवाळा.. अनुभवाचे बोल ऐक.. तुझ्या एकंदर मनोवृत्तीवरुन, मुलगी शोधणे, शोधली तरी तिला तुझ्याशी विवाह करायला राजी करणे यासाठी वडीलधार्‍यांची मदत घे, उशिर करशील तितका पस्तावशील
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Mon, 12/31/2012 - 12:47

In reply to टवाळा.. अनुभवाचे बोल ऐक.. by शैलेन्द्र

Permalink

मी कसा आहे याबद्दल व्यनी कराल

मी कसा आहे याबद्दल व्यनी कराल का? मलासुद्धा जाणुन घ्यायला आवडेल इथे भांडणाचा अजीबात उद्देश नाहे...फक्त इतकेच जाणुन घ्यायचे आहे की या लेखावरुन माझी काय इमेज तयार झाली आहे
  • Log in or register to post comments

Submitted by शैलेन्द्र on Mon, 12/31/2012 - 12:57

In reply to मी कसा आहे याबद्दल व्यनी कराल by टवाळ कार्टा

Permalink

आम्ही फक्त सल्ला फुकट देतो,

आम्ही फक्त सल्ला फुकट देतो, तो "का" दिला याच्या विश्लेशनाचे पैसे घेतो.. :) जास्त मनावर घेवु नकोस आणी इथल्या पब्लीकच्या नादाला लागशील तर असं घुमवतील की त्या मुली बर्‍या वाटायला लागतील..
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Mon, 12/31/2012 - 13:06

In reply to आम्ही फक्त सल्ला फुकट देतो, by शैलेन्द्र

Permalink

माहीत आहे

माहीत आहे ;)
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Mon, 12/31/2012 - 12:45

Permalink

मराठी भाषांतर of this article

मराठी भाषांतर of this article कुठे मिळेल ? any idea कोणाला ?
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Mon, 12/31/2012 - 12:47

In reply to मराठी भाषांतर of this article by परिकथेतील राजकुमार

Permalink

(No subject)

:D
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • पान 5
  • पान 6
  • पान 7
  • पान 8
  • पान 9
  • …
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com