काही चित्रे, काही प्रेक्षक, काही संवाद... (भाग १)
काही चित्रे, काही प्रेक्षक, काही संवाद...
स्थळ: युरोपातील एक मोठे चित्र- संग्रहालय व प्रदर्शन.
पात्रे: महाराष्ट्रातून आलेली काही टूरिस्ट मंडळी:
१. तळवळकर मास्तर: जुन्या पिढीचे वास्तववादी चित्रकार, आर्टस्कूलचे निवृत्त प्रिन्सिपाल.
२. डी. कुमार: नव्या पिढीचा आधुनिक चित्रकार.
३. सात्विक गुरुजी: माध्यमिक शाळेतील संकृत - कम- इतिहास- कम -पीटी- कम- चित्रकला शिक्षक.
४. गणूशेठ: गावातील एक श्रीमंत, शौकीन व्यापारी.
५. कुसुमकलिका : लेखिका- कवियत्री.
६. सदानंद : एक रसिक, समंजस जाणकार.
७,८,९ . श्री व सौ. फणसे: एक मध्यमवयीन जोडपे आणि यांचा अजय हा आर्टस्कुलात शिकणारा मुलगा.
----------------------------------------------------------------
ही मंडळी खालील चित्रासमोर उभी आहेत:
तळवळकर मास्तर: व्वा. काय सुरेख चित्रे आहेत , याला म्हणतात खरी कला. शेड-लाईट, प्रपोर्शन, काम्पोझीशन सर्व फारच सुंदर.
कुसुमकलिका : खरंच. आणि चेहर्यावरचे भाव काय सुंदर आहेत...
डी. कुमार : डॅम इट..रॉटन...हम्बग... आय जस्ट हेट इट...
गणूशेठ: आपल्याला यातलं काही समजत नाही बघा, पण बघायला छान वाटते... विकतात काहो ही चित्रं इथे? घेउन टाकू आपण. काय लागले दोन- चार हजार तरी काय हरकत नाय.
सदानंद: अहो हे म्युझियम आहे. इथे शेकडो वर्षांपासूनच्या कलाकृती जतन केलेल्या आहेत. करोडोंमध्ये सुद्धा मिळणार नाहीत ही चित्रे. हां, विकण्यासाठी छापील प्रती असतात इथे.
सौ. फणसे: खिश्चनांची दिसतायत इथे सगळी चित्रं ... साईबाबांचं असेल का हो इथे? आज गुरुवार आहे, अनायसे दर्शन होईल...
अजय: अगं आई, काहीतरीच काय बोलतेस, इथे कसं साईबाबांचे चित्र असेल?
------------------------------------------------------------------
थोड्या वेळाने दुसऱ्या दालनात...
गणूशेठ: ... अगागागा ... काय हो ह्ये... लई वंगाळ.. (स्वगत: च्यामायला, लईच भारी हाईत ही टमाटम चित्रं...)
सौ. फणसे: शी: आपण इथे यायलाच नको होतं. तीस युरो वाया गेले, तेवढ्यात कुमीसाठी कॉस्मेटिक चं सामान घेता आलं असतं. चला हो आता इथून.
अजय: अगं आई, असं काय करतेस? केवढी मोठी संधी आहे शिकण्याची...
सात्विक गुरुजी: सगळीकडे नग्नतेचा सुळसुळाट. यांना आणखी काही सुचतच नाही का? (स्वगत : साला फुकट भारतात जन्मलो.. आपल्याला नाही मिळाली अशी चित्रं काढायला मॉडेल्स कधी)...
गणूशेठ: पन ह्या बाया हैत तरी कोन, आणि अश्या काहून बसल्या हैत?
तळवळकर मास्तर: अहो, न्यूड - स्टडीज आहेत यात, छान आहेत.फार कठीण असतात अशी चित्रं काढायला.
डी. कुमार: माईट बी वेल डन, बट देअर ईज नो क्रिएटिव्हिटी... जस्ट वर्कमॅनशिप. दॅट्स ऑल. एक्सप्रेशनीझम, अॅब्स्ट्रॅक्शन, दॅट इज रियल आर्ट....
गणूशेठ: आरं ढेकण्या, (डी.कुमार हा मुळात नंदकुमार ढेकणे.) लेका मराठीत बोल की जरा, आन तुला काय बी आवडेना तर हितं आलास कशापाई? आन तुला काढता येईनात अशी सुंदर चित्रं, म्हनून तू घालतोस शिव्या.
सात्विक गुरुजी: खरे आहे, हे मॉडर्न-आर्ट वाले असेच असतात.
कुससुमकलिका: अहो, यातील नग्नता ही सांकेतिक आहे. चित्रकारानं आपल्या सामाजिक जाणीवा व्यक्त करायला नग्नतेचा सहारा घेतलेला आहे. तो समाजातील नग्न सत्य दाखवण्याचा प्रयत्न करतोय, स्त्रियांची त्याकाळची स्थिती, त्यांच्या दडपलेल्या भावना...त्यांचा होणारा कोंडमारा, कुचंबणा...बघा ना त्यांच्या चेहर्यावरचे भाव...
सात्विक गुरुजी: अहो कसला डोंबलाचा कोंडमारा ? मस्त आरामात पहुडल्यात की त्या... पण मला कळत नाही, ही असली अश्लील चित्रं इथे मांडावीतच कशाला ?
सदानंद: श्लील-अश्लील हा सगळा समजुतींचा खेळ आहे. आपल्याकडे नाहीत का मंदिरांवर मिथुन-शिल्पे असतात? खजुराहोचे मंदिर तर पूर्ण भरलेले आहे अश्या शिल्पांनी.
... खरेतर पूर्वी नग्नता हे निरागसतेचे, पावित्र्याचे प्रतीक मानले जायचे. लहान मूल नागडे असते, तसे. शिवाय पूर्वी युरोपात चर्चमधे, राजवाड्यांमध्ये लावायला मोठमोठी चित्रं करत. ती अगदी हुबेहूब खर्यासारखी दिसावीत, यावर फार भर असायचा, त्यामुळे आधी नग्न व्यक्तींना हव्या त्या पोज मध्ये उभे करून नीट अभ्यास-चित्र बनवायचे. मग त्यावर कपडे वगैरे चढवून चित्र पूर्ण करायचे. शिवाय ग्रीक व रोमन पौराणीक कथा घेउन त्यात नग्नाकृती चित्रित करण्याची पद्धत असायची. आपल्याप्रमाणेच पूर्वी ग्रीक संस्कृतीत नग्नता वाईट मानली जात नसे. खरेतर ख्रिस्ती धर्माने नग्नता म्हणजे पाप, हे समीकरण रूढ केले. त्यापूर्वी जगभरात त्यात काही अनिष्ट मानले जात नसे....
...ही चित्रे आंग्र या प्रसिद्ध फ्रेंच चित्रकाराची आहेत. हा त्या काळचा फार प्रसिद्ध चित्रकार होता ...

वर्गीकरण
प्रतिक्रिया
कुसुमकलिकेचे संवाद आवडले .
अर्धवटच लिहिले की काय हो?
वेगळा प्रयोग. पुढचे भागही येऊ
इतके नीट जमलेले वाटले नाही..
काही गोष्टीमुळे...
लईच वेगळ्या टोन मध्ये लिहिलास
नाही .काका..
आवडला!
चित्रांची
मलाही हा प्रयोग तितकासा आवडला
+१
या लेखाविषयीची भूमिका
पुभाप्र
चित्र नं १ च्या प्रेमात आहे.
प्रयोग आवडला