बादशाही ऑम्लेट
बादशाही ऑम्लेट :
साहित्य
अंडी - २
कांदे - १ मध्यम आकाराचा
आलंलसूण पेस्ट - १ चमचा
मिरच्या - ५-६ बारीक चिरलेल्या
सोया सॉस - १ चमचा
चिलीसॉस ( ग्रीन ) - १ चमचा
तेल - गरजेनुसार
जिरं - चिमूटभर
मोहरी - चिमुटभर
मीठ - चवीपुरते
कॄती :
प्रथम अंडी एका भांड्यात फोडून घ्यावीत, त्यानंतर त्यात सोया सॉस व चिलीसॉस मिसळून ती व्यवस्थित फेटून घ्यावीत
त्यानंतर एका लहान भांड्यात चमचाभर तेल टाकून त्यात बारीक चिरलेल्या मिरच्या, आलं लसूण पेस्ट व्यवस्थीत परतून घ्यावी ( मिश्रण जास्त घट्ट होता कामा नये )
मिरच्या व आलं लसूण पेस्ट व्यवस्थित परतल्यागेल्यावर त्यात जिरं व मोहरी टाकून गॅस बंद करावा
जिरं मोहरी फुलून आल्या बरोबर ती फोडणी मघाशी फेटून घेतलेल्या अंड्यांच्या मिश्रणात टाकावी
थोडावेळ ते मिश्रण थंड होऊन द्यावे. यात चवीनूसार मिठ टाकावे.
नंतर पॅनवर चमचाभर तेल टाकून त्यावर हे मिश्रण ओतावे.
.
.
यानंतर जे तयार होईल त्याला तुमचं काळीज खरंच सहन करू शकत असेल तर त्याला ऑम्लेट म्हणायला हरकत नाही.
तटी. : ही पाककृती वाचून जर तुम्ही ऑम्लेट तयार करणारच असाल तर तुमची स्वयंपाकघरातली हुकूमशाही बाद होंण्याची पुर्ण खात्री असल्यानं याला `बाद' शाही ऑम्लेट म्हणता येईल. :D
वर्गीकरण
प्रतिक्रिया
खत्रा!!
फटु
फोटू पाहिजे फोटू.....
म्हणून फोटू नाही लोडवला का?
जबरदस्त ! चकित करणारी पाककृती
मस्त !
लय बाद लागेल हो असलं आम्लिट .