Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by इनिगोय on Mon, 11/19/2012 - 21:07
लेखनविषय (Tags)
हे ठिकाण
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
यकु गेला. इथल्या अनेकांशी बोलून, भांडून, मनात येईल ते येईल तेव्हा बेधडक सांगून. मैत्री करून. पंगे घेऊन. शाब्दिक हाणामार्‍या करून. म्हणतात तसं, एक तर आपण त्याचे मित्र झालो, किंवा शत्रू; पण त्याच्याकडे दुर्लक्ष करणं शक्य नव्हतं. यकु गेला. अनेक अर्धवट गोष्टी मागे ठेवून. अनेक प्रश्न घालून. एका अत्यंत बुद्धीमान माणसाचं हे असं का व्हावं हे त्यातलं सगळ्यात मोठा प्रश्न. अखेरीस त्याच्या मनात काय होत होतं हे आता नीटसं कधीच कळायचं नाही. त्याचे अलीकडचे विचार ऐकून, त्याच्याशी बोलताना नेहमीच याचा हा असा काहीतरी शेवट असेल हेच वाटत राहायचं. ते तसं होऊ नये, यासाठी कोणालाही काही करायलाही वाव न ठेवता, प्रचंड अस्वस्थ करून यकु गेला. गेलाच. काय केलंस यकु? राग येतो आहे तुझा. खूप राग येतो आहे.
  • Log in or register to post comments
  • 42338 views

प्रतिक्रिया

Submitted by नंदन on Tue, 11/20/2012 - 02:55

Permalink

...

वाईट झालं. धक्कादायक बातमी.
  • Log in or register to post comments

Submitted by Nile on Tue, 11/20/2012 - 03:00

Permalink

वाईट बातमी.

बातमी वाचून वाईट वाटलं.
  • Log in or register to post comments
Profile picture for user सुहास झेले

Submitted by सुहास झेले on Tue, 11/20/2012 - 03:36

Permalink

:( :( :(

अरे काय यार....दोन वर्षापूर्वी स्टारमाझा कार्यक्रमात भेट झाली होती.. किती बडबड करत होतास. आपण कट्टे करूया, गप्पा करू... पण तू सगळं सोडून निघून गेलास :( :(
  • Log in or register to post comments

Submitted by कौशी on Tue, 11/20/2012 - 03:41

Permalink

खुप वाईट झाले..

यकु ला भावपूर्ण श्रद्धांजली...
  • Log in or register to post comments

Submitted by चित्रगुप्त on Tue, 11/20/2012 - 04:39

Permalink

श्रद्धांजली.

श्रद्धांजली. अवघ्या सव्वीस वर्षे वयात त्याला असे काय झाले असेल ज्यातून असे घडले, हा प्रश्न वारंवार येतोय. ओशो बद्दल त्याचे मत आणि लेखन, त्याचे युजींच्या विचारांनी भारून जाणे, त्याने दिलेले युजींचे ( विचित्र, अकल्पनीय) व्हिडियो, यामुळे जरा आश्चर्य वाटले होते. 'पुढच्यास ठेच मागचा शहाणा' म्हणून जाणकारांना यावर काही प्रकाश टाकता येइल का? बाकी होणार ते अटळच असते, हेही खरेच.
  • Log in or register to post comments

Submitted by राजेश घासकडवी on Tue, 11/20/2012 - 04:45

Permalink

सकाळी बातमी कळली, आणि

सकाळी बातमी कळली, आणि त्यानंतर दिवसभर सुन्न होतो. प्रतिसाद लिहिण्याचा विचार करत होतो, पण काय लिहावं कळत नव्हतं. यकुसारख्या तरुणाचा असा शेवट व्हावा ही फारच खेदाची गोष्ट आहे. त्याला मी कधीच भेटलो नाही. पण लेखनातून बरीच ओळख झाली होती. त्याने लिहिलेलं जवळपास सगळं मी वाचून काढलेलं आहे. त्याचे विचार आणि दृष्टिकोन मला व्यक्तीशः कधी पटले नाहीत, पण तरीही त्याच्या लेखनात एक पॅशन होती. त्यामुळे त्याची नैसर्गिक शैलीही सर्वसामान्य लेखकापेक्षा वेगळी होती. त्याचा लेख पाडलेला कधीच नसायचा - त्याला खरोखर पडलेले प्रश्न तो सरळसरळ मांडायचा. कुठचेही आढेवेढे न घेता, शुगरकोटिंग न करता. वर धनंजयने म्हटल्याप्रमाणे त्याचं मनस्वी व्यक्तिमत्व होतं, आणि लेखनात त्याचं स्वच्छ प्रतिबिंब पडलेलं दिसायचं. शेवटच्या शेवटच्या लिखाणात काहीतरी नेहमीच्या पॅशनपलिकडचं, काहीतरी डगमगल्यासारखं वाटत होतं. अनेकांना तसं जाणवल्याचं लक्षात आलं होतं. खूप जणांनी त्याला वेळोवेळी 'सांभाळ रे बाबा' असं म्हटलं होतं. आईवडिलांपासून दूर, एकटा राहून तो प्रश्नांशी लढा देत होता. त्याला मदतीची गरज होती. पण असं काही होईल अशी कोणालाच सूतरामही कल्पना नसावी. जालीय विश्वातल्यांशी प्रत्यक्ष भेटण्याची वेळ मोजक्या लोकांच्या बाबतीतच येते. तरीही त्यांचा आपल्या जीवनाला स्पर्श होतोच. अशा वेळी पश्चातबुद्धीने 'अरे, काहीतरी करायला हवं होतं राव' अशी चुकचुकही लागणं साहजिकच आहे. दुर्दैवाने प्रत्येक ठिकाणी आपल्याला हवी तितकी मदत करता येत नाही, आणि बऱ्याच वेळा किती मदतीची गरज आहे याचीही जाणीव होत नाही. मागे वळून पहाताना बऱ्याच गोष्टी अधिक स्पष्ट दिसतात हेच खरं.
  • Log in or register to post comments

Submitted by चित्रा on Tue, 11/20/2012 - 05:39

Permalink

दुर्दैवी प्रकार

खूप वाईट वाटले. ओळख अशी नव्हती. पण त्यांनी मला पुलंच्या काही सुरेख विडियोंचे दुवे दिले. यकु स्मरणात राहतील.
  • Log in or register to post comments

Submitted by आबा on Tue, 11/20/2012 - 06:54

Permalink

आर. आय. पी.

यकूंच्या लिखाणामध्ये जानवण्याइतपत असंबद्धता आली होती... काळाची पावले आपल्याला ओळखता आली नाहीत... हा गिल्ट जायचा नाही कधीच !
  • Log in or register to post comments

Submitted by निनाद on Tue, 11/20/2012 - 07:02

Permalink

अविश्वसनीय

अगदीच अविश्वसनीय... :(
  • Log in or register to post comments

Submitted by मृदुला सूर्यवंशी on Tue, 11/20/2012 - 07:22

Permalink

दु:खद

यकुंची काहीच ओळख नसतांना देखील यकूंच्या लिखाणामुळे ते अनोळखी वाटले नाही. फार वाईट झाले...
  • Log in or register to post comments

Submitted by चाफा on Tue, 11/20/2012 - 08:17

Permalink

सुन्न..

मिपा वर आल्यानंतर सगळ्यात आधी पुढे आलेला दोस्तीचा हात, अपरात्री हमखास सापडणारा परवा परवा पर्यंत व्यनीतून शिव्या घालत होतो त्याला. नालायकाला सिलिंग फॅन मित्रांपेक्षा जवळचा वाटला. कालचा दिवस सुन्न.. अजुनही वाटतंय 'व्यक्तीगत संदेश १' असं दिसेल आणि हाच साला कसं गंडवलं म्हणून फिरकी घेईल.
  • Log in or register to post comments

Submitted by जयंत कुलकर्णी on Tue, 11/20/2012 - 08:19

Permalink

मिपाचा मित्र........

अमोल क्षणांची फूले खय्यामला माझ्यामते मित्र आणि सवंगडी यांच्याशिवाय मुळीच करमत नसावे. आपल्या सारखेच. त्याच्या सगळ्या मित्रांना त्याच्या प्रेयसीएवढेच महत्व आहे. किंबहुना जरा जास्तच आणि त्यामुळे मित्रांमधील एखादा जाणे यासारखी दु:खद घटना तो सहन करु शकत नसावा. एखादा मित्र जाणे हा त्याला देवाचा दुष्टपणा वाटत असे. अर्थात त्याचे मित्रपण त्याच लायकीचे असणार हे निर्विवाद. ज्यांचे जीवनावर प्रेम आहे त्यांना मित्र असणे अपरिहार्य आहे. त्यांची एखादा मित्र गेल्यावर काय अवस्था होते हे आरती प्रभूंनी फार छान सांगितले आहे - एखाद्या मेलेल्या मित्राच्या स्म्रृतींवर हलकेच कधीतरी अमोल क्षणांचा एखादा ताटवा वाहून रात्रभर जागतात, आणि मग कधीतरी झोपेतून उठून स्वत:वरच आनंदाश्रू ढाळतात, स्वत:लाच नमस्कार करतात ! एकमेकांच्या संगतीतील दिवस आठवून ! देवाच्या ह्या दुष्टपणाला उत्तर म्हणजे जास्त विचार करायचा नाही. म्हणजे हाच क्षण जगायचा नाहीतर गेलेल्या मित्रांशिवाय जगणे अशक्य आहे. खय्याम म्हणतो, मित्रांनो, त्याचा दुष्टपणा हा जाणुन घ्या मित्रांना नेले ओढुन, जग हे रिते पहा जगता आला क्षण अपुल्यापुरता, आज जगा शोधा न काल, ना उद्या बघा, क्षण हाच पहा
  • Log in or register to post comments

Submitted by प्रशु on Tue, 11/20/2012 - 08:26

Permalink

दुखःद...

अतिशय दुखःद बातमी, फार वाईट वाट्ले. कर्त्या सवर्त्या वयात अस जाणं त्याच्या मागे असलेल्या त्याच्या कुटुंबीयां साठी फार धक्कादायक ठरेल. मागे त्याच्याशी ज्ञानेश्वरांची समाधी कि आत्महत्या असा काहिसा वाद माझा झाला होता. तेव्हा तो बहुतेक युजी. च्या प्रेमात होता. खुप वाईट वाट्ले..
  • Log in or register to post comments

Submitted by श्री गावसेना प्रमुख on Tue, 11/20/2012 - 08:50

Permalink

खुप वाइट वाटले ऐकुन,

खुप वाइट वाटले ऐकुन,
  • Log in or register to post comments

Submitted by चौकटराजा on Tue, 11/20/2012 - 08:58

Permalink

यकू, हे रे काय ?

मला तर मिपावर येऊन फक्त आठ नउ महिने झालेयत . परवा वल्लीच्या पाठीमागे बसून जाताना कासारवाडी फ्लाय ओव्हर पाशी १४ तारखेला युकुची आठवण आली नि तीन चार दिवसात हे अघटित ! एनी वे , यकू मला आजोबा पदावर बसवणारा तूच ना रे इथला मिशकिल नातू ? तुला जीवनाचा अर्थच कळला नाही रे ! की तुलाच कळला फक्त ?
  • Log in or register to post comments

Submitted by मूकवाचक on Tue, 11/20/2012 - 09:01

Permalink

भावपूर्ण श्रद्धांजली

मृतात्म्यास सद्गती मिळो अशी ईश्वरचरणी विनम्र प्रार्थना.
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on Tue, 11/20/2012 - 09:14

Permalink

सुन्न झालो

आपट्या, भाड्या लेका कुठे उलथ्तोस रे सारखा काढली गाडी कि निघाला . तुझा जीव किती नि त्या गाडीचा किती ??? दर वेळी GTALK वर यकूच हे असलं काहीतरी पिंग यायचं , नि गप्पा सुरु व्हायच्या "मला न्या , मला न्या" सुरु असायचं , सुधागड च्या वेळी माझ्या गाडीवरून फिरायचं म्हणून साहेब औरंगाबाद हून इथे आले देखील पण आयत्यावेळी काय बिनसलं माहित नाही .. मला नाही जमणार म्हणून तसाच निघून गेला :( अगदी दिवाळीच्या आधी बोलणं झालेलं , माझ्या गावाला "आडिवऱ्याला" यायचं होत त्याला .. दर वेळी म्हणायचा तुझ बरंय स्वताला गुंतवुन घेतलंस , साला मी जाम एकटा पडलोय . पण तो हे असं काही पाऊल उचलेल ,अस स्वप्नात देखील वाटलं नव्हत काल पासून डोक सुन्न झालंय कुठल्या अघोरी पंथाला लागलेला देवच जाणे . काही सुचत नाहीये अजूनही वाटतंय त्याच पिंग येईल "आपट्या, भाड्या लेका कुठे उलथ्तोस रे सारखा ? काढली गाडी कि निघाला ." :(
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीरंग_जोशी on Tue, 11/20/2012 - 09:15

Permalink

श्रद्धांजली

हि बातमी वाचून धक्काच बसला. २६ व्या वर्षी हि वेळ यावी? एखाद्या विषयामागे झपाटून घेतलेल्या व्यक्तीने असे करावे अशा काही दुर्दैवी उदाहरणांचे स्मरण झाले अन त्यात एकाची भर पडली. या घटनेबद्दल अनेक जर तर मनात येतात पण आता कितीही विचार केला तरी हाती काय येणार? अशी वेळ शत्रूवरही न येवो...
  • Log in or register to post comments

Submitted by माझीही शॅम्पेन on Tue, 11/20/2012 - 09:17

Permalink

काय चाललाय काय , कळत नाही..

काय चाललाय काय , कळत नाही.. मी त्याला ओळखत नाही पण एवढा धडाडीचा माणूस आत्म-हत्या कशी करेल ? पोलिसांनी तपास पूर्ण केला काय ?
  • Log in or register to post comments

Submitted by जयवी on Tue, 11/20/2012 - 09:20

Permalink

ओह गॉड....... अत्यंत वाईट

ओह गॉड....... अत्यंत वाईट बातमी !! विनम्र श्रद्धांजली !!
  • Log in or register to post comments

Submitted by वामन देशमुख on Tue, 11/20/2012 - 09:23

Permalink

श्रद्धांजली!

श्रद्धांजली!
  • Log in or register to post comments

Submitted by अक्षया on Tue, 11/20/2012 - 09:24

Permalink

माझा मिपावरचा पहिल्या ...

माझा मिपावरचा पहिल्या लेखनाची पहिली प्रतिक्रिया कधीच विसरणार नाही.. अतिशय वाईट वाटले.. विनम्र श्रद्धांजली :(
  • Log in or register to post comments

Submitted by ज्ञानोबाचे पैजार on Tue, 11/20/2012 - 09:25

Permalink

यक्या भाड्या काय केलस हे? या

यक्या भाड्या काय केलस हे? या थराला जाशिल असे कधिच वाटले नव्हते. असे जायचे होते तर भेटलासच कशालारे उगाच जीवाला घोर लावायला? पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

Submitted by llपुण्याचे पेशवेll on Tue, 11/20/2012 - 09:27

Permalink

यकु भेटायचे राहून गेले बघ. १

यकु भेटायचे राहून गेले बघ. १-२ वेळा फोनवर बोललो रे तुझ्याशी पण भेटायचे राहून गेले. भेटायची तीव्र इच्छा होती. तीव्र.
  • Log in or register to post comments

Submitted by लीलाधर on Tue, 11/20/2012 - 09:47

Permalink

यक्कुदा...................

अरे अशी खरड कोणाला पाठवू रे अता ??????? :( वर स्पा म्हणतोय त्याप्रमाणे सुधागडला येणार आहेस हे त्याने सांगितले होते पण तेव्हाही आला नाहीस.......... म्हण्टले त्यानिमित्याने भेट होईल पण कसले काय ? शेवटी नाही ती नाहीच फार वाईट वाटले रे........... विनम्र श्रद्धांजली ;(
  • Log in or register to post comments

Submitted by लीलाधर on Tue, 11/20/2012 - 09:48

Permalink

यक्कुदा...................

अरे अशी खरड कोणाला पाठवू रे अता ??????? :( वर स्पा म्हणतोय त्याप्रमाणे सुधागडला येणार आहेस हे त्याने सांगितले होते पण तेव्हाही आला नाहीस.......... म्हण्टले त्यानिमित्याने भेट होईल पण कसले काय ? शेवटी नाही ती नाहीच फार वाईट वाटले रे........... विनम्र श्रद्धांजली :(
  • Log in or register to post comments

Submitted by चिंतामणी on Tue, 11/20/2012 - 09:53

Permalink

अत्यंत दु़:खद घटना.

प्रत्यक्ष भेटीचा योग जरी आला नव्हता तरी खरडवही, चेपु आणि चॅटद्वारे संवाद व्हायचे. हे काय वय होते जाण्याचे. काय लिहावे हेच समजत नाही. विनम्र श्रद्धांजली
  • Log in or register to post comments

Submitted by इरसाल on Tue, 11/20/2012 - 10:03

Permalink

अरे देवा

मिपावर चाललेल्या परिक्रमेबद्दल लिहीताना यकुचा गोंधळ बरेच काही सुचवु पहात होता परंतु दुर्दैवाने कोणाच्या लक्षात आले नाही.मिपावर लिहीता असताना त्याचा ओढा जिकडे वाटत होता त्यात तो बराच गुरफटला होता.मग मधे असे काय घडले की त्याला इहलोक नकोसा झाला ?
  • Log in or register to post comments

Submitted by माम्लेदारचा पन्खा on Tue, 11/20/2012 - 10:04

Permalink

अत्यंत धक्कादायक बातमी

तसा आमचा काही परिचय नव्हता परंतु मिपा च्या निमित्ताने आपण सगळेच एकमेकांशी जोडले गेलो आहोत. मिपा परिवारातील एक सदस्य असे काही करू शकेल ह्यावर विश्वासच बसत नाही. काय भयानक असेल तो क्षण ज्यावेळी यकु च्या मनात हा विचार आला असेल? त्याचे प्रश्न त्यालाच ठाऊक असणार पण कोणत्याही गोष्टीचा "जीव देणे" हा उपाय असूच शकत नाही. अस्वस्थ झालो आहे. ईश्वर त्याच्या आत्म्याला शांती देवो.
  • Log in or register to post comments

Submitted by अविनाशकुलकर्णी on Tue, 11/20/2012 - 10:22

Permalink

असे काय दुख्ख वा प्रश्न

असे काय दुख्ख वा प्रश्न असावेत त्याचे उत्तर नसावे...वा जे सुटू शकत नाहीत>??? खूप वाईट वाटले हे ऐकून..
  • Log in or register to post comments

Submitted by प.पु. on Tue, 11/20/2012 - 10:31

Permalink

भावपूर्ण श्रद्धांजली...

भावपूर्ण श्रद्धांजली...
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on Tue, 11/20/2012 - 10:35

Permalink

धक्का बसला.. वाईटही वाटलं!

अरेरे..वैयक्तीक परिचय नव्हता तरी इतक्या टोकाचा प्रकार घडेल वाटलं नव्हत :( धक्का बसला.. वाईटही वाटलं! त्यास अंजली!
  • Log in or register to post comments

Submitted by मृत्युन्जय on Tue, 11/20/2012 - 10:42

Permalink

दु:ख झाले आहे तसाच धक्काही

दु:ख झाले आहे तसाच धक्काही बसला. राजेश घासकडवींनी आधीही एका प्रतिक्रियेत की लेखात सांगितले होते की यकुला मदतीची गरज आहे. त्यावेळेस खरे वाटले नाही. गुर्जी उगाच नस्ती ठाम मते मांडत आहेत असे वाटले. आता वाटते त्यांचे बरोबरच होते. कदाचित त्यांना याचा आधीच अंदाज आला असावा. असो. यकु हुषार होता तरी त्याने असे का केले कधीच समजणार नाही. यकुच्या आत्म्याला शांती लाभो हीच इश्वरचरणी प्रार्थना
  • Log in or register to post comments

Submitted by तिमा on Tue, 11/20/2012 - 10:46

Permalink

दु:खद

यकुंचे लिखाण मनस्वी असायचे. अतिशय वाईट वाटले. नैराश्याच्या विळख्यातून, तरुण पिढीला सोडवण्यासाठी मिपावर काही करता येईल का ?
  • Log in or register to post comments

Submitted by नगरीनिरंजन on Tue, 11/20/2012 - 10:57

Permalink

धक्कादायक!

धक्कादायक! काय म्हणावे सुचत नाहीये. गर्दीने वेढलेला असूनही माणूस किती एकटा असतो याची तीव्र जाणीव झाली.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on Tue, 11/20/2012 - 11:05

Permalink

निशब्द.

कुटुंब सदस्य गेल्याची अस्वस्थ भावना निर्माण झाली आहे. काय लिहू? शब्दच नाही उरले.
  • Log in or register to post comments

Submitted by पियुशा on Tue, 11/20/2012 - 11:07

Permalink

अनबिलिव्हेबल ..........अतिशय

अनबिलिव्हेबल ..........अतिशय दुखःद बातमी :( एका लेखावर त्याने माझ्याबद्दल भलतीच प्रतिक्रिया दिली होती नंतर आमच्यात शाब्दिक चकमक झाली होती " मला प्रतिक्रियेत माझा असा उल्लेख अजिबात आवडला नाही य.कु. मी मुलगी आहे जरा सांभाळुन लिहीत जा तर लगेच पाच मिनिटात त्याचा भलामोठा व्य नी आलेला " मला माफ कर ,माझ्या लिहिण्याने दुखावली गेली असशील तर मी क्षमस्व आहे मी ते मिस्किलपणे लिहीले होते तरीही तुला त्यात काही वावगे वाटत असेल तर सॉरी, अन भविष्यातदेखील मी अस काही लिहिणार नाही ज्यामुळे तुला त्रास होइल .खात्री बाळ्ग " अन यक्याने तो शब्द पाळला :) " फिलहालचा / भानाचा पुढ्चा भाग कधी लिहितेस गं ? आधी कथा पुर्ण कर मग कायतरी नविन लिही ,इतक छान लिहितेस नी सगळ अर्धवट सोड्तेस अस म्हणनारा यक्या आज सगळ अर्धवट सोडुन गेलाय :( काय केलंस हे यकु ? कुठतरी मनं मोकळ का नाही केलस ?
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Tue, 11/20/2012 - 11:10

Permalink

काय बोलायचं अशा वेळी कळत नाही

काय बोलायचं अशा वेळी कळत नाही. असो. श्रद्धांजली !!
  • Log in or register to post comments

Submitted by सर्वसाक्षी on Tue, 11/20/2012 - 11:18

Permalink

दूर्दैवी घटना

एखादा तरूण असा टोकाला का जात असेल? हे पराकोटीचे नैराश्य की विरक्ती की स्वतःचाच तिरस्कार की काय म्हणायचे? संभाषण बंद होणे हे अत्यंत घातक असते. माझा यकुचा परिचय नाही पण इथे प्रतिसादात जे वाचतोय त्यावरुन त्याने जाण्यापूर्वी संपर्क टाळला होता. ही तयारी होती? इश्वर त्याच्या आत्म्यास शांती देवो.
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Tue, 11/20/2012 - 11:21

Permalink

त्रास सगळ्यांनाच होणार. मला

त्रास सगळ्यांनाच होणार. मला मात्र किंचित जास्तच होतोय. त्याच्याशी सतत बोलत होतो. मागच्या वेळेस योग्य वेळी हस्तक्षेप करता आला आणि परिस्थिती सुधारली. मात्र दुर्दैवाने काही वैयक्तिक कारणांमुळे गेल्या महिन्या दोन महिन्यात फारसे बोलणे होऊ नाही शकले. तो धोक्याच्या बाहेर आहे असं वाटत होतं म्हणूनही फोन करणं कमी झालं असावं माझ्याकडून. शेवटी चकवलंच साल्याने!
  • Log in or register to post comments

Submitted by राही on Tue, 11/20/2012 - 11:25

Permalink

अतिशय दु:खद

सव्विसावं वर्ष हे काय वय आहे का जाण्याचं? स्वप्नांचा गालिचा एका बाजूने उलगडता उलगडता दुसर्‍या बाजूने तो त्याची गुंडाळीही करू लागला होता हे त्याच्या लेखनावरून सतत जाणवत होतं. त्याला मदतीची तीव्र गरज असावी असंही जाणवत होतं. मी फारच दूरस्थ,जालावरचा संपर्क केवळ वाचनमात्रतेचा.पण निकटच्या सुहृदांकडूनही अशी मदत या मनस्वी माणसाने स्वीकारली नसतीच कदाचित.त्यापेक्षा गुंगारा देणंच पसंत केलं त्याने, कसं फसवलं सगळ्यांना असं म्हणून. तो जे काही कदाचित शोधीत होता ते आता तरी त्याला लाभो. किंवा जे काही त्याला सापडलं होतं ते सदैव त्याच्याजवळ राहो.
  • Log in or register to post comments

Submitted by कवितानागेश on Tue, 11/20/2012 - 11:33

Permalink

आत्ता कळतय, आत्महत्या करणे हा

आत्ता कळतय, आत्महत्या करणे हा खरोखर मोठा गुन्हा आहे. त्याची शिक्षा कायम भोगावी लागते........मागे उरलेल्या सगळ्यांना.
  • Log in or register to post comments

Submitted by मितान on Tue, 11/20/2012 - 11:36

Permalink

काल बातमी समजल्यापासून सुन्न

काल बातमी समजल्यापासून सुन्न झालेय ! अतीबुद्धिमान आणि अतीसंवेदनशील व्यक्तीचा असा शेवट होण्याचे ओळखीतले हे तिसरे उदाहरण ! यकु, फसवलंस रे !
  • Log in or register to post comments

Submitted by हिटलर on Tue, 11/20/2012 - 11:46

Permalink

विनम्र श्रद्धांजली

विनम्र श्रद्धांजली
  • Log in or register to post comments

Submitted by किसन शिंदे on Tue, 11/20/2012 - 11:47

Permalink

दोन तीन ठरलेली भेट कँसल झाली.

दोन तीन वेळा ठरलेली भेट कँसल झाली. सुधागडच्या वेळी भेटेल असं वाटलं होतं पण तो आलाच नाही. शेवटी भेट राहीलीच. :( यकू! राजा, आता जिथे असशील तिथे तरी निवांत बस .
  • Log in or register to post comments

Submitted by पप्पु अंकल on Tue, 11/20/2012 - 11:51

Permalink

सुन्न झालोय

भावपूर्ण श्रद्धांजली...
  • Log in or register to post comments

Submitted by अमृत on Tue, 11/20/2012 - 11:58

Permalink

असं का?

हे असं वागताना या बुद्धीमान लोकांना आपल्या माय बापाचा, बायका पोरांचा कसाकाय विसर पडतो? केवळ स्वतःची सुटका करून घ्यायची आणि इतरांना आयुष्यभर पुरणार्‍या दु:खात लोटून जायचं.. मृतात्म्यास श्रद्धांजली :-( नुकतच एका जवळच्या नातेवाईकानी सुद्धा असाच वेडेपणा केला... अप्पलपोटे लेकाचे
  • Log in or register to post comments

Submitted by विसुनाना on Tue, 11/20/2012 - 11:59

Permalink

काय झालं हे?

धक्कादायक आणि दु:खद बातमी. एका उमद्या तरुणाचा अकाली अंत - हा मानसिक अपघातच झाला म्हणायचा त्याला.
  • Log in or register to post comments

Submitted by अविनाश पांढरकर on Tue, 11/20/2012 - 12:02

Permalink

श्रद्धांजली

काय बोलायचं अशा वेळी कळत नाही. असो. श्रद्धांजली !!
  • Log in or register to post comments

Submitted by ५० फक्त on Tue, 11/20/2012 - 12:05

Permalink

वाईट वाटलं, पण आश्चर्य नाही.

वाईट वाटलं, पण आश्चर्य नाही. गणराजच्या कट्ट्यानंतर त्याला सोडायला गेलो होतो शिवाजीनगर पर्यंत. त्या पंधरा मिनिटात जेवढं शक्य होतं तेवढं समजावलं, कारण भिती होती, उघडला गाडीचा दरवाजा आणि खाली उडी मारली तर काय घ्या ? तोंडदेखलं तरी हो हो म्ह्णाला होता, नीट राहेन, नविन नोकरी पाहतो वगैरे वगैरे. त्याच्या धाग्यावर ब-याच वेळा उघड उघड विरोध केला होता या गोष्टीत अडकु नये म्हणुन. असो. तरी अजुन लग्न केलेलं नव्हतं ही एक चांगली गोष्ट,त्याच्या आई वडीलांना काय वाटत असेल हा प्रश्न आहेच, त्याला वर म्हणल्याप्रमाणे काळ हेच एक औषध आहे.
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com